08-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - कधीही मिथ्या अहंकारामध्ये येऊ नका, या रथाचा देखील पूर्णपणे रिगार्ड ठेवा”

प्रश्न:-
तुम्हा मुलांमध्ये पद्मा-पदम भाग्यशाली कोण आहेत आणि दुर्भाग्यशाली कोण आहेत?

उत्तर:-
ज्यांचे वर्तन देवतांप्रमाणे आहे, जे सर्वांना सुख देतात ते आहेत पद्मा-पदम भाग्यशाली आणि जे नापास होतात त्यांना म्हणणार दुर्भाग्यशाली. काही जण तर महान दुर्भाग्यशाली बनतात, ते सर्वांना दुःखच देत राहतात. सुख देणे जसे त्यांना ठाऊकच नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, आपली चांगल्या रीतीने काळजी घ्या. सर्वांना सुख द्या, लायक बना.

ओम शांती।
रूहानी बाबा बसून रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत. तुम्ही या पाठशाळेमध्ये उच्च दर्जा प्राप्त करता. मनातून समजता आपण खूप उच्च ते उच्च स्वर्गाचे पद प्राप्त करत आहोत. अशा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे. जर सर्वांना निश्चय आहे तरीही सर्व एक समान असू शकत नाहीत. फर्स्ट नंबर पासून लास्ट नंबर पर्यंत असतातच. पेपर्समध्ये देखील फर्स्ट पासून लास्ट नंबर पर्यंत क्रमवारीने असतात ना. कोणी नापास देखील होतात, तर कोणी पास देखील होतात. तर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचे आहे - बाबा जे आपल्याला इतके श्रेष्ठ बनवत आहेत, मग मी कितपत लायक बनलो आहे? अमक्या पेक्षा चांगला आहे की कमी आहे? हे शिक्षण आहे ना. हे देखील दिसून येते की, जे एखाद्या सब्जेक्टमध्ये कोणी कमजोर असतात तर खालच्या नंबरला जातात. भले मॉनिटर असेल तरी देखील एखाद्या सब्जेक्टमध्ये कमजोर असेल तर खालच्या क्रमांकावर जाईल. विरळेच कोणी स्कॉलरशिप घेतात. हे देखील स्कूल आहे. तुम्ही जाणता आपण सर्वजण शिकत आहोत, यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे - पवित्रतेची. बाबांना बोलावले आहे ना - पवित्र बनविण्याकरिता. जर क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) काम करत असेल तर स्वतः देखील अनुभव करत असतील. बाबांना लिहितात देखील - ‘बाबा, मी या सब्जेक्टमध्ये कमजोर आहे’. स्टुडंटच्या बुद्धीमध्ये हे जरूर असते - मी अमक्या सब्जेक्टमध्ये खूप-खूप कमजोर आहे. कोणी तर हे देखील समजतात की आपण नापास होणार. यामध्ये पहिल्या नंबरचा सब्जेक्ट आहे - पवित्रता. अनेक जण लिहितात बाबा आम्ही हार खाल्ली, तर त्यांना काय म्हणावे? त्यांचे मन समजत असेल - आता मी चढू शकणार नाही. तुम्ही पवित्र दुनिया स्थापन करत आहात ना. तुमचे एम ऑब्जेक्टच हे आहे. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा आणि पवित्र बना तर या लक्ष्मी-नारायणाच्या घराण्यामध्ये जाऊ शकता’. टीचर तर समजत असतील, हे इतके उच्च पद मिळवू शकतील की नाही? ते आहेत सुप्रीम टीचर. हे दादा देखील शाळा तर शिकलेले आहेत ना. काही-काही मुले देखील असे वाईट कृत्य करतात ज्यामुळे शेवटी शिक्षकाला सजा द्यावी लागते. पूर्वी खूप कडक सजा देत असत. आता सजा इत्यादी कमी केली आहे तर स्टुडंट अजूनच जास्त बिघडतात. आजकाल स्टुडंट किती हंगामा करतात. स्टुडंटला ‘न्यू ब्लड’ (नवीन रक्ताचे) म्हटले जाते ना. ते पहा काय-काय करतात? आग लावतात, आपला तारुण्याचा अभिमान दाखवतात. ही आहेच आसुरी दुनिया. तरुण मुलेच खूप खराब असतात, त्यांची दृष्टी खूप क्रिमिनल (विकारी) असते. दिसतात तर खूप चांगले. जसे म्हटले जाते ना - ईश्वराचा अंत मिळवू शकत नाही, तसा त्यांचा देखील अंत मिळवू शकत नाही की, ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे. हो, बुद्धीमत्तेवरून ज्ञान समजून येते, हा कसा शिकत आहे, याचा कार्यव्यवहार कसा आहे. कोणी तर असे बोलतात की जणूकाही मुखातून शब्दसुमने बाहेर पडतात, कोणी तर असे बोलतात जसे दगड बाहेर काढतात. दिसायला खूप चांगले आहेत, पॉईंट्स इत्यादी सुद्धा लिहितात परंतु आहेत पत्थर-बुद्धी. बाहेरचा शो आहे. माया खूप वाईट आहे म्हणून गायन आहे - आश्चर्यवत् सुनन्ती, स्वतःला शिवबाबाची संतान म्हणून घेवन्ती, इतरांना ऐकवन्ती, कथन्ती आणि मग भागन्ती अर्थात ट्रेटर बनन्ती. असे नाही की, हुशार असणारे ट्रेटर (विद्रोही) बनत नाहीत, चांगले-चांगले हुशार असणारे देखील ट्रेटर बनतात. त्या सेनेमध्ये देखील असे होते. फितूर बनून एरोप्लेन सहित दुसऱ्या देशामध्ये निघून जातात. इथे देखील असेच होते, स्थापनेमध्ये खूप मेहनत करावी लागते. मुलांना देखील अभ्यासामध्ये मेहनत करावी लागते, टीचरला देखील शिकवताना मेहनत करावी लागते. पाहिले जाते हे सर्वांना डिस्टर्ब करतात, शिकत नाहीत तर शाळांमध्ये छडी मारतात. हे तर बाबा आहेत, मग बाबा काहीच म्हणत नाहीत. बाबांकडे असा कायदा नाहीये, इथे तर एकदम शांत रहावे लागते. बाबा तर सुखदाता, प्रेमाचा सागर आहेत. तर मुलांचे वर्तन देखील असे असले पाहिजे ना, जसे देवता असतात. तुम्हा मुलांना बाबा नेहमी म्हणतात तुम्ही पद्मा-पदम भाग्यशाली आहात. परंतु पद्मा-पदम दुर्भाग्यशाली देखील बनतात. जे नापास होतात त्यांना तर दुर्भाग्यशालीच म्हणणार ना. बाबा जाणतात - अंतापर्यंत हे होत राहते. कोणी ना कोणी महान दुर्भाग्यशाली देखील जरूर बनतात. वर्तनच असे असते समजून येते हे इथे टिकू शकणार नाहीत. इतके उच्च बनण्या लायक नाही आहेत, सर्वांना दुःख देत राहतात. सुख देणे जसे की ठाऊकच नाही तर त्यांची काय हालत होईल! बाबा नेहमी म्हणतात - मुलांनो, आपली चांगल्या रीतीने काळजी घ्या, हे देखील ड्रामा अनुसार होणारच आहे, अजूनच लोखंडापेक्षाही खराब बनतात. जे चांगले-चांगले आहेत ते देखील कधी पत्र सुद्धा लिहीत नाहीत. बिचाऱ्यांचे काय हाल होतील!

बाबा म्हणतात - मी आलो आहे सर्वांचे कल्याण करण्याकरिता. आज सर्वांची सद्गती करतो, उद्या मग दुर्गती होते. तुम्ही म्हणाल - आम्ही विश्वाचे मालक होतो, मग आज गुलाम बनलो आहोत. आता सारे झाड तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. हे वंडरफुल झाड आहे. लोकांना हे देखील ठाऊक नाहीये. आता तुम्ही जाणता कल्प अर्थात पूर्ण ५ हजार वर्षांचे ॲक्युरेट झाड आहे. एका सेकंदाचा देखील फरक पडू शकत नाही. या बेहदच्या झाडाचे तुम्हा मुलांना आता नॉलेज मिळत आहे. नॉलेज देणारे आहेत वृक्षपति. बीज किती छोटे असते त्यातून फळ बघा किती मोठे तयार होते. हे मग आहे वंडरफूल झाड, याचे बीज अतिशय सूक्ष्म आहे. आत्मा किती सूक्ष्म आहे. बाबा देखील अति सूक्ष्म, या डोळ्यांनी पाहू देखील शकत नाही. भले विवेकानंदांविषयी सांगतात - विवेकानंद म्हणाले, त्यांच्यामधून (त्यांच्या गुरूंच्या मस्तकातून) ज्योत निघून माझ्यामध्ये सामावली. अशी कोणती ज्योत निघून मग सामावून थोडीच जाऊ शकते. काय निघाले? हे समजत नाहीत. अशा प्रकारचे साक्षात्कार तर खूप होतात, परंतु ते लोक त्यांना मान देतात, आणि मग महिमा देखील लिहितात. भगवानुवाच - कोणत्याही मनुष्याची महिमा नाही आहे. महिमा असेल तर फक्त देवतांची आहे आणि जे असे देवता बनविणारे आहेत त्यांचीच महिमा आहे. बाबांनी निमंत्रण कार्ड खूपच सुंदर बनवले होते. जयंती साजरी करायची असेल तर एका शिवबाबांची. यांना (लक्ष्मी-नारायणाला) देखील असे बनविणारे तर शिवबाबा आहेत ना. बस्स, एकाचीच महिमा आहे, त्या एकाचीच आठवण करा. हे (ब्रह्मा बाबा) स्वतः म्हणतात - मी उच्च ते उच्च बनतो आणि मग खाली देखील उतरतो. हे कोणालाच ठाऊक नाही आहे की, उच्च ते उच्च लक्ष्मी-नारायणच मग ८४ जन्मानंतर खाली उतरतात (पतन होते) तत् त्वम्. तुम्हीच विश्वाचे मालक होता आणि आता काय बनला आहात! सतयुगामध्ये कोण होते? तुम्हीच तर सर्व होता, नंबरवार पुरुषार्थानुसार. राजा-राणी देखील होते, सूर्यवंशी-चंद्रवंशी डिनायस्टीचे (घराण्याचे) देखील होते. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात. चालता-फिरता या सृष्टी चक्राचे ज्ञान तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये असले पाहिजे. तुम्ही चैतन्य लाईट हाऊस आहात. सर्व अभ्यास लक्षात राहिला पाहिजे. परंतु ती अवस्था अजून झालेली नाही, होणार आहे. जे पास विद ऑनर होतील त्यांची ही अवस्था होईल. सारे ज्ञान बुद्धीमध्ये असेल. बाबांची लाडकी, आवडती मुले देखील तेव्हाच म्हटले जाल. अशा मुलांवर बाबा स्वर्गाची राजाई कुर्बान करतात (ओवाळून टाकतात). बाबा म्हणतात - मी राज्य करत नाही, तुम्हाला देतो, याला निष्काम सेवा म्हटले जाते. मुले जाणतात बाबा आम्हाला डोक्यावर उचलून घेतात, तर अशा बाबांची किती आठवण केली पाहिजे. हा देखील ड्रामा बनलेला आहे. बाबा संगमावर येऊन सर्वांना सद्गती देतात, नंबरवार पुरुषार्था नुसार. नंबर वन आहे सर्वोच्च संपूर्ण पवित्र, लास्ट नंबर आहे पूर्णपणे अपवित्र. प्रेमपूर्वक आठवण तर बाबा सर्वांना देतात.

बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात, कधीही मिथ्या अहंकार (खोटा अहंकार) येता कामा नये. बाबा म्हणतात - सावध राहायचे आहे, रथाचा (ब्रह्मा बाबांचा) देखील आदर ठेवायचा आहे. यांच्याद्वारे तर बाबा ज्ञान ऐकवतात ना. यांनी (ब्रह्मा बाबांनी) तर कधी शिवी खाल्ली नव्हती. सर्वजण प्रेम करत असत. आता तर बघा किती शिव्या खातात. कितीतरी ट्रेटर (विद्रोही) बनून भागन्ती झाले तर मग त्यांची गती काय होईल, नापास होतील ना! बाबा समजावून सांगतात - माया अशी आहे त्यामुळे खूप सावध रहा. माया कोणालाही सोडत नाही. सगळ्या प्रकारची आग लावते. बाबा म्हणतात - माझी सर्व मुले काम-चितेवर चढून काळे कोळसे बनली आहेत. सगळेच काही एकसारखे नसतात. ना सर्वांचा एक सारखा पार्ट आहे. याचे नावच आहे वेश्यालय, किती वेळा काम-चितेवर चढले असतील. रावण किती शक्तिशाली आहे, बुद्धीलाच पतित बनवतो. इथे येऊन बाबांकडून शिकणारे देखील असे बनतात. बाबांच्या आठवणी शिवाय क्रिमिनल दृष्टी (विकारी दृष्टी) कधीही बदलू शकत नाही म्हणून सुरदासाची कहाणी आहे. आहे तर बनवलेली कथा, दृष्टांत सुद्धा देतात. आता तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळत आहे. अज्ञान अर्थात अंधार. म्हणतात ना - तुम्ही तर आंधळे, अडाणी आहात. आता ज्ञान आहे गुप्त, यामध्ये काही बोलायचे नाही आहे. एका सेकंदामध्ये सारे ज्ञान येते, सर्वात सोपे ज्ञान आहे. तरी देखील शेवटपर्यंत मायेची परीक्षा चालत राहील. या वेळेला तर वादळाच्या मध्यभागी आहात, पक्के झालात की मग इतके वादळ येणार नाही. घसरणार नाही. मग बघा तुमचे झाड किती वाढते. प्रसिद्ध तर व्हायचेच आहे. झाड तर वाढतच जाते. थोडासा विनाश झाला की मग खूप सावध राहू लागतील. मग बाबांच्या आठवणीमध्ये एकदम चिकटून राहतील. समजतील वेळ खूप थोडा आहे. बाबा तर खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात. आपसामध्ये अतिशय प्रेमाने वागा. डोळे वटारून दाखवू नका. क्रोधाचे भूत आल्याने चेहराच बदलून जातो. तुम्हाला तर लक्ष्मी-नारायणा सारखा चेहरा असणारे बनायचे आहे. एम ऑब्जेक्ट समोर आहे. साक्षात्कार शेवटी होतो, जेव्हा ट्रान्सफर होतात. जसे सुरुवातीला साक्षात्कार झाले तसे शेवटी देखील खूप पार्ट बघाल. तुम्ही खूप आनंदी व्हाल. ‘मिरुआ मौत मलूका शिकार…’ शेवटी खूप दृश्ये बघायची आहेत तेव्हाच तर पश्चाताप देखील करतील ना की, आपण हे काय केले. मग त्याची सजा देखील खूप कठोर मिळते. बाबा येऊन शिकवतात, त्यांचा देखील आदर ठेवत नाहीत तर सजा मिळेल. सर्वात कठोर सजा त्यांना मिळेल जे विकारामध्ये जातात, या शिवबाबांची निंदा करण्याच्या निमित्त बनतात. माया खूप शक्तिशाली आहे. स्थापनेमध्ये काय-काय होते. तुम्ही तर आता देवता बनत आहात ना. सतयुगामध्ये असूर इत्यादी असत नाहीत. ही संगमाचीच गोष्ट आहे. इथे विकारी मनुष्य किती दुःख देतात, मुलींना मारतात, लग्न करायला लावतात. पत्नीला विकारासाठी किती मारतात, किती विरोध करतात. म्हणतात - संन्यासी देखील राहू शकत नाहीत, आणि मग हे कोण आहेत जे पवित्र राहून दाखवतात. पुढे चालून समजतील देखील जरूर. पवित्रते शिवाय तुम्ही देवता काही बनू शकत नाही. तुम्ही समजावून सांगता - आम्हाला एवढी प्राप्ती होते तेव्हाच तर हा काम विकार सोडला आहे. भगवानुवाच - ‘काम जीते जगतजीत’. असे लक्ष्मी-नारायण बनणार असू तर का नाही पवित्र राहणार. मग माया देखील खूप पछाडते. उच्च शिक्षण आहे ना. बाबा येऊन शिकवतात - याची मुले चांगल्या रीतीने आठवण करत नाहीत त्यामुळे मग माया थप्पड लगावते. माया खूप अवज्ञा देखील करायला लावते, मग त्यांचे काय हाल होतील. माया अशी बेफिकीर बनवते, अहंकारामध्ये आणते की काही विचारू नका. नंबरवार राजधानी बनत आहे तर काही कारणाने बनेल ना. आता तुम्हाला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर (वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळाचे) ज्ञान मिळत आहे तर किती चांगल्या रीतीने लक्ष दिले पाहिजे. अहंकार आला आणि हा मेला. माया एकदम वर्थ नॉट ए पेनी बनवते. बाबांची अवज्ञा झाली तर मग बाबांची आठवण करू शकणार नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपसामध्ये अतिशय प्रेमाने वागायचे आहे. कधीही रागाने चिडून एकमेकांना डोळे वटारून दाखवायचे नाहीत. बाबांची अवज्ञा करायची नाही.

२) पास विद ऑनर बनण्यासाठी आपला अभ्यास बुद्धीमध्ये ठेवायचा आहे. चैतन्य लाईट हाऊस बनायचे आहे. रात्रंदिवस बुद्धीमध्ये ज्ञान फिरत रहावे.

वरदान:-
ऑलमाइटी बाबांच्या ऑथॉरिटी द्वारे प्रत्येक कार्याला सहज सोपे करणारे सदा अटल निश्चय-बुद्धी भव

आपण सर्वात श्रेष्ठ ऑलमाइटी बाबांच्या ऑथॉरिटी द्वारे सर्व कार्य करणारे आहोत - हा अटळ निश्चय इतका असावा ज्यामुळे कोणीही तुम्हाला टाळू शकणार नाही, यामुळे कितीही कोणते मोठे कार्य करत असूनही अति सहज सोपे अनुभव कराल. जसे आजकाल विज्ञानाने अशी मशिनरी तयार केली आहे ज्याद्वारे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहजच मिळते, डोके चालवण्यापासून सुटका होते. अगदी असेच ऑलमाइटी ऑथॉरिटीला समोर ठेवाल तर सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील आणि सहज मार्गाची अनुभूती होईल.

बोधवाक्य:-
एकाग्रतेची शक्ती परवश स्थितीला देखील परिवर्तित करते.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. ब्राह्मण जीवनाची मजा जीवनमुक्त स्थितीमध्ये आहे. न्यारा बनणे अर्थात मुक्त बनणे. संस्कारांकडे देखील ओढा नाही. ‘काय करू, कसे करू, करू इच्छित नव्हतो परंतु झाले’ - हे आहे जीवन-बंध बनणे. इच्छा नव्हती परंतु चांगले वाटले, शिकवण द्यायची होती परंतु क्रोध आला - ही आहे जीवन-बंध स्थिती. ब्राह्मण अर्थात जीवनमुक्त. ब्राह्मण कधीही अशा कोणत्याही बंधनामध्ये बांधले जाऊ शकत नाहीत.