08-02-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
31.12.2008 ओम शान्ति
मधुबन
“या नवीन वर्षामध्ये
परिवर्तन शक्तीच्या वरदानाद्वारे निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन करून,
संकल्प, श्वास आणि समयाला सफल करा, सफलतामूर्त बना”
आज नव जीवन देणारे
बाबा आपल्या चोहो बाजूच्या नव जीवन धारण करणाऱ्या मुलांना पाहून हर्षित होत आहेत.
हे नव जीवन आहेच नवीन युग बनविण्याकरिता. लोकं नवीन वर्ष साजरे करतात आणि तुम्ही
सर्व नवीन जीवन असणारी मुले सर्व आत्म्यांना शुभेच्छा देखील देता आणि सोबत हीच
खुशखबरी देता की, नवीन युग आले कि आले. तुम्हा सर्व मुलांना तर बाबांनी वारशाच्या
रूपामध्ये गोल्डन दुनियेची गिफ्ट दिली आहे. ज्या गोल्डन दुनियेमध्ये अनेक गोल्डन
भेटवस्तू आहेतच आहेत. तुम्हा सर्वांना हाच नशा आहे ना की ही गोल्डन दुनियेची सौगात
(भेट) तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आजच्या दुनियेमध्ये कोणी कोणाला कितीही
मोठ्यात मोठी भेट दिली, तरीही मोठ्यात मोठी भेट कोणती देतील! ताज किंवा तख्त (मुकुट
किंवा सिंहासन). परंतु तुमच्या गोल्डन दुनियेच्या गिफ्टच्या समोर ती काय चीज आहे?
काही मोठी चीज आहे काय! तुमच्या मनामध्ये आनंद आहे की आमच्या बाबांनी आम्हाला
सर्वात उच्च ते उच्च नवीन युगाची गिफ्ट दिली आहे. निश्चय आहे आणि निश्चित आहे. ही
भावी कोणीही टाळू शकत नाही. हा अटळ निश्चय सदैव स्मृतिमध्ये राहतो का! सदैव राहतो
की कधी-कधी कमी होऊन जातो? जन्मसिद्ध अधिकार आहे तर जन्मसिद्ध अधिकार कधी टळू शकत
नाही.
आज तुम्ही सर्व
वेगळ्या-वेगळ्या ठिकाणाहून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आला आहात. तर नवीन वर्षाचे
लक्ष्य काय ठेवले आहे? या नवीन वर्षामध्ये काय विशेष करायचे आहे? या नवीन वर्षाची
विशेषता आहे की बाप समान संपन्न आणि संपूर्ण बनायचेच आहे. काहीही पुरुषार्थ करावा
लागला परंतु निश्चित आहे की बाप समान बनायचेच आहे. बोला, सर्वांच्या मनामध्ये हाच
पक्का संकल्प आहे ना! आहे? मान हलवा. बाबा देखील हेच इच्छितात की प्रत्येक मुलगा
बाप समान बनावा. बाबा तर बाबा आहेत परंतु मुले बाबांपेक्षाही उच्च आहेत. तर बाप
समान बनण्याच्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी बाबांना फॉलो करावे लागेल. विचार करा,
बाबा, ब्रह्मा बाबा संपूर्ण कसे बनले? त्यांची कोणती विशेषता होती? संपूर्णतेचा
विशेष आधार कोणता होता? ब्रह्मा बाबांनी आपला प्रत्येक क्षण सफल केला. श्वासो-श्वास,
सेकंद-सेकंद सफल केला. तर बाप समान बनण्यासाठी या वर्षाचे लक्ष्य काय ठेवणार? सफल
करायचे आहे आणि सफलतामूर्त बनायचेच आहे. सफलता आमच्या गळ्यातील हार आहे. सफलता
आमच्या बाबांचा वारसा आहे. तर या दृष्टिकोनातून चेक करा - दररोज आपणच स्वतःला चेक
करायचे आहे की, सफलतामूर्त बनून समय, श्वास, खजिने, शक्ती, गुण सर्व सफल केले? कारण
की आत्ताच्या सफलतेमुळे भविष्यासाठी देखील जमा होते. आत्ता जे काही सफल केले, त्याचे
फळ २१ जन्मांसाठी जमा होते. हे जाणता ना! यापूर्वी देखील सांगितले आहे की, जेव्हा
तुम्ही इथे समय सफल करता तेव्हा भविष्यामध्ये देखील तुम्हाला राज्यभाग्याचा संपूर्ण
काळ, राज्य भाग्याची प्राप्ति होते. श्वास सफल करता तर २१ जन्म निरोगी रहाल. कधीही
कोणत्याही प्रकारची स्वास्थ्यामध्ये कमतरता राहणार नाही आणि त्याच सोबत जे खजिने जमा
करता, सर्वात मोठा खजिना आहे ज्ञानाचा, ज्ञानाचा अर्थ आहे समज. तर ज्ञानाचा खजिना
सफल केल्यामुळे भविष्यामध्ये तुम्ही असे हुशार बनता जेणेकरून तुम्हाला कोणत्या
वजिराचा सल्ला घ्यावा लागत नाही. स्वतःच अखंड, अटळ राज्य चालवता आणि तुमच्या
राज्यामध्ये कोणते विघ्न देखील नसते. निर्विघ्न अखंड, अटळ आहे. हे आहे ज्ञानाचा
खजिना जमा करण्याचे फळ. एक जन्म सफल केला आणि अनेक जन्म सफलतेचे फळ खाता.
त्याचप्रमाणे ज्या शक्ती तुम्हाला प्राप्त आहेत त्यांना स्व प्रति अथवा इतरांप्रति
सफल करता तेव्हा भविष्यामध्ये तुमच्या राज्यामध्ये सर्व शक्ती आहेत, कधीही कोणत्याही
शक्तीची कमतरता भासत नाही. कोणत्याही शक्तीची उणीव नसते. त्याचप्रमाणे जर गुण दान
करता तर तुमच्या अंतिम ८४ व्या जन्मापर्यंत देखील जी जड चित्रे बनवतात त्यामध्ये
शेवटपर्यंत तुमची महिमा काय करतात? सर्वगुण संपन्न. तर प्रत्येक सफलतेच्या
प्राप्तीचे अनेक जन्मांसाठी अधिकारी बनता. तर या वर्षी काय करायचे आहे? लक्ष्य
ठेवायचे आहे, एकही श्वास, एकही सेकंद असफल होऊ नये. जमा करायचे आहे. जमा करण्याचा
वेळ एक छोटासा जन्म आणि फळ उपभोगण्याचा वेळ २१ जन्म, तर या वर्षामध्ये बाप समान
बनण्याचे लक्ष्य आहे का? सर्वांचे लक्ष्य आहे का की बाप समान बनायचेच आहे? फक्त
बनायचे नाही, तर बनायचेच आहे. बनायचेच आहे यावर अंडरलाईन. अच्छा. ही छोटी मुले
देखील बनणार का? छोटी-छोटी मुले देखील बनणार. मुलांचा ताज छान वाटत आहे. (सर्व
मुलांनी ताज घातला आहे) खूप छान वाटत आहे.
या वर्षाचे लक्ष्य
देखील ठेवले आणि सोबत बाबांना फॉलो करण्याचा मंत्र, सफल करून सफलतामूर्त बनायचे आहे.
यासाठी बापदादा मुलांना जास्त मेहनत करण्याचा सुद्धा त्रास देत नाहीत, अतिशय सोपी
विधी सांगत आहेत, सोपी विधी कोणती आहे? जो कोणता संकल्प कराल तर पहिले चेक करा - हा
संकल्प बाबांसारखा होता! जे शब्द बोलता तर चेक करा, बाप समान बनायचेच आहे ना! तर
संकल्प बोल आणि कर्म, संबंध-संपर्क अगोदर विचार करा. चेक करा हा बाबांसारखा आहे? आणि
तसेच स्वरूप बना. ब्रह्मा बाबांना फॉलो करा. फॉलो फादर तर गायले गेले आहे ना! काही
मुले खूप चांगले-चांगले खेळ दाखवतात. ठाऊक आहेत कोणते खेळ दाखवतात ते? फॉलो करत
नाहीत परंतु काय म्हणतात? इच्छा नव्हती, परंतु झाले. अगोदर विचार करून, फक्त विचार
करू नका स्वरूप बना. जर स्वरूप बनलात तर असे म्हणणार नाही की विचार केला नव्हता
परंतु झाले. करणारे, विचार करणारे तुम्ही श्रेष्ठ आत्मे आहात, मालक आहात. झाले, याचा
अर्थ आहे कर्मेंद्रियांवर कंट्रोल नाहीये.
तर या वर्षामध्ये हेच
स्लोगन लक्षात ठेवा - बाप समान करायचेच आहे, बनायचेच आहे. अवघड तर नाही आहे ना? जसे
बाबांनी केले तसे करायचे आहे. कॉपी करणे तर सोपे आहे ना, विचार करण्याची गरजच नाही.
आणि निश्चित आहे की तुम्हा सर्वांना जसे बाबा, ब्रह्मा बाबा फरिश्ता बनले तर हे
निश्चित आहे की, फरिश्ता सो देवता बनायचेच आहे. तर तुम्हाला देखील फरिश्ता सो देवता
बनायचेच आहे. बरीच मुले म्हणतात की चालता-चालता अपोझिशन (विरोध) खूप होतो, तर
अपोझिशनमुळे पोझिशनवरून खाली येतात. परंतु आठवा बाप समान बनायचे आहे तर स्थापनेच्या
आदिला (सुरुवातीच्या काळामध्ये) ब्रह्मा बाबांनी किती अपोझिशनला पोझिशन मध्ये
परिवर्तित केले? प्रत्येक गोष्ट नवीन, चॅलेंज होते. आता तर खूप जमाना बदललेला आहे
परंतु एकटे ब्रह्मा बाबा किती स्वमानाच्या सीटवर बसून पोझिशन द्वारे अपोझिशनचा सामना
केला. जिथे पोझिशन आहे तिथे अपोझिशन काहीही करू शकत नाही. अगोदर काय म्हणत होते?
‘धमाल’ (उपद्रव) करत आहेत आणि आता काय म्हणतात? ‘कमाल’ (चमत्कार) करत आहेत. एवढा
फरक झाला आहे. याचे कारण काय? ब्रह्मा बाबांनी स्वतः स्वमानाची सीट आणि दृढ
निश्चयाच्या शस्त्रांद्वारे अपोझिशनला नष्ट केले. तर तुम्ही या वर्षी काय करणार?
समान बनायचे आहे ना! तर जर अपोझिशन झाले जरी तरीही तुम्ही स्वमानाच्या सीटवर बसा,
तर अपोझिशन, पोझिशनमध्ये बदलेल. आहे हिंमत? ब्रह्मा बाप समान बनायचेच आहे, यामध्ये
तर हात वर केला, परंतु इतकी हिंमत आहे? पहिले स्वतःच्या परिवर्तनाचे, नंतर आहे अनेक
संबंध-संपर्कामध्ये येणारे आत्मे आणि मग विश्वातील आत्मे. या सर्वांना आपल्या मनसा
शुभ भावना, शुभ कामनेद्वारे, दृढ संकल्पाद्वारे परिवर्तन करा.
या वर्षामध्ये बापदादा
विशेष एका शक्तीचे वरदान देखील देत आहेत. मनापासून ‘माझे बाबा’ म्हणाल तर शक्ती हजर
होतील; असेच वरवर ‘माझे बाबा’ म्हणायचे नाही, मनापासून म्हटले, अधिकार ठेवला, माझे
बाबा आणि शक्ती तुमच्या समोर हजर होईल. ती कोणती शक्ती? परिवर्तनाची शक्ती.
परिवर्तनाच्या शक्तीद्वारे विशेष निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये चेंज करा. निगेटिव्ह
संकल्प, निगेटिव्ह वर्तनाला बघत असतानाही पॉझिटिव्हमध्ये चेंज करा. पॉझिटिव्ह बघणे,
बोलणे, करणे हे केवळ शुभ भावना आणि शुभ कामनेद्वारेच सहज शक्य होईल कारण हा विरोध
होईल, परंतु तुमच्या परिवर्तनाची शक्ती तुम्हाला सहज सफलता मिळवून देईल. तर समजले
या वर्षाचे विशेष वरदान परिवर्तनाच्या शक्तिला दृढ संकल्पाने कार्यामध्ये लावा. करू
शकता ना परिवर्तन? तुमचे चॅलेंज आहे, लक्षात आहे ना! विश्व परिवर्तक आहात ना! जेव्हा
टायटलच विश्व परिवर्तकचे आहे तर काय स्वतःला परिवर्तन करणे कठीण आहे काय! मनामध्ये
कोणतीही कठीण गोष्ट आली, तसे तर कठीण गोष्ट नसते परंतु तुम्ही बनवता. मास्टर
सर्वशक्तिवान त्याच्या समोर कठीण काही आहे काय? परंतु तुम्ही एक चूक करता आणि कठीण
बनवता. जसे बघा अचानक इथे अंधार झाला तर जर कोणी चुकून अंधाराला पळवून लावण्याचा
प्रयत्न करू लागला तर अंधार पळून जाईल काय? योग्य विधी आहे - तुम्ही उजेडाचा स्विच
ऑन करा तर अंधार सेकंदामध्ये पळून जाईल. तर तुम्ही देखील ही चूक करता जी गोष्ट होऊन
गेली ना, त्याच्या ‘का, काय, केव्हा कसे…’ या ‘क्यू’ च्या क्यू मध्ये जाता. छोटीशी
गोष्ट मोठी करता आणि मोठी गोष्ट तर कठीण असते. छोटी गोष्ट करा तर सोपी होईल. बाबांनी
कोणत्याही शक्तीला कार्यामध्ये लावण्याची अगदी सोपी विधी सांगितली आहे - “मी मास्टर
सर्व शक्तिवान आहे”, आपल्या या स्मृतीच्या सीटवर बसा, जर या सीटवर बसला तर अपसेट
होणार नाही. सीटविना अपसेट होता, सीट असेल तर अपसेट होणार नाही. ६३ जन्मांचे
संस्कार इमर्ज होतात. ६३ जन्म कसे होते? आता-आता सेट, आता-आता अपसेट. तर सदैव
स्वमानाच्या सीटवर सेट रहा. आणि या वर्षी काय करणार? नवीन वर्षामध्ये गिफ्ट तर
सर्वांना देणार ना. तर कोणती गिफ्ट देणार? शुभेच्छा देखील देणार आणि सोबत गिफ्ट
कोणती देणार? गिफ्ट तर तुमच्या जवळ खूप आहेत. जितक्या देऊ इच्छिता तितक्या देऊ शकता.
स्थूल गिफ्ट तर अल्पकाळासाठी चालेल परंतु तुम्ही अविनाशी बाप समान बनणारे अविनाशी
गिफ्ट द्या. मनसा द्वारे शक्तींची गिफ्ट द्या, वाचे द्वारे ज्ञानाची गिफ्ट द्या आणि
कर्मणा द्वारे गुणांची गिफ्ट द्या. आहे ना सर्वांच्या जवळ? असेल तर मान हलवा. खजिने
पुष्कळ आहेत ना, कमी तर नाही आहेत ना. कोणाशीही कार्यव्यवहारामध्ये या,
कार्यव्यवहारामध्ये तर यावे लागते ना. त्याला या वर्षामध्ये भरपूर सौगाते (गिफ्ट)
द्या. परंतु अविनाशी सौगात. सांगितले आहे ना कोणालाही रिकामे जाऊ देऊ नका. भले मनसा
सौगात द्या, भले वाणीची नाहीतर कर्माची. यासाठी तुम्हाला नेहमी एक अटेन्शन ठेवावे
लागेल, प्रत्येक वेळी मनसामध्ये शक्तींचा स्टॉक इमर्ज ठेवावा लागेल, किती शक्ती
आहेत? लिस्ट तर आहे ना! वाचेमुळे सदैव मनामध्ये मनन शक्ती, ज्ञानाला मनन करण्याची
शक्ती, लक्षात ठेवावी लागेल. वर्तनामध्ये, चेहऱ्याने, कर्मामध्ये, गुणांचे स्वरूप
बनावे लागेल. सदैव स्वतःला गुणमूर्त, ज्ञान मूर्त, शक्ती स्वरूप इमर्ज ठेवावे लागेल.
असे नाही - ‘शक्ती तर आहेतच, ज्ञान तर आहेच…’ परंतु स्वरूप बनावे लागेल. प्रत्येकाला
ईश्वरीय परिवाराच्या दृष्टी-वृत्तीने बघावे लागेल. या वर्षी जेव्हा समान बनायचेच आहे,
त्यामध्ये हात वर केला आहे, बापदादांच्या वतनमध्ये सर्वांचा हात दिसून येईल. तिथे
असा छोटा टी. व्ही. नाही आहे, खूप मोठा आहे. एका सेकंदामध्ये सर्व सेंटर्सच्या
रिझल्टला बघू शकता. तर बापदादा तुमचा जो उमंग आहे, बाप समान बनायचेच आहे, यासाठी
खुश आहेत. भाग्यवान आहात, आनंदी चेहऱ्यावाले आहात, कधी रोबवाला (संतापवाला) चेहरा
बनवायचा नाही. कोणीही तुम्हाला बघेल तर सदैव आनंदामध्ये बघेल, भले कितीही कामामध्ये
बिझी असाल, चुकीला तर ठीक करत आहात, ज्ञान समजावून सांगत आहात परंतु संतापलेला चेहरा
किंवा बोलणे नसावे. या वर्षामध्ये हे परिवर्तन करून दाखवा. प्राईज देईन. संपूर्ण
वर्षभर जो सदैव हसत राहील, कोणतीही गोष्ट येऊ देत, बरेच भाऊ-बहिणी म्हणतात,
रुहरिहान तर करतात ना सर्व जण, तर म्हणतात जर जोराने बोललो नाही ना तर समजणार नाही.
बदलणारच नाही. अगोदरच तुम्ही भावना ठेवली की, ‘हा बदलणारच नाही’, तर त्याला तुमचे
व्हायब्रेशन अगोदरच पोहोचले म्हणून या वर्षी क्रोध किंवा बाल-बच्चे यांना निरोप
द्यायचा आहे. होऊ शकते का? रोब (संताप) देखील नाही. बाबा विचारत आहेत जे कोणी
वेळोवेळी क्रोध करतात, काम होण्यासाठी, सुधारण्यासाठी, परंतु तो सुधारतो का? क्रोध
केल्यामुळे कोणी सुधारला आहे? ती लिस्ट सांगा. आणखीच चिडतो, सुधारत नाही. मनातल्या
मनात अपोजिशन (विरोध) करतो. जर मोठा असेल तर मनातून विरोध करतो, बोलू तर शकत नाही
आणि छोटा असेल तर रडायला लागतो. तर या वर्षी काय-काय करायचे आहे, ते सर्व ऐकवत आहे.
पसंत आहे? करायचे आहे ना? आता हात वर करा. करायचे आहे? टी. व्ही. वाले हा फोटो काढा.
हात वर करा, थोडा सरळ ठेवा. टी. व्ही. वाले फोटो काढत आहेत. अच्छा.
समयानुसार बापदादा
बघत होते की समयाची गती या वेळी तीव्र आहे. तर वेळेचा सामना कोण करेल? तुम्हीच तर
करणार. बापदादांनी बघितले की दुःखी असणाऱ्यांची हाक, भक्तांची हाक, काळाची हाक खूप
कमी ऐकता. बिचारे हिंमतहीन आहेत, त्यांना पंख लावा तर उडू शकतील. हिंमतीचे पंख,
उमंग-उत्साहाचे पंख लावा. अच्छा.
चोहो बाजूंची मुले आता
बापदादांच्या होमवर्कला प्रॅक्टिकल मध्ये करून पुरावा देणाऱ्या सपूत (लायक) मुलाचा
आपला प्रभाव दाखवतील. तर चोहो बाजूंच्या मुलांना खूप-खूप हृदयापासून प्रेम आणि
हृदयापासून पद्मगुणा प्रेमपूर्वक आठवण स्वीकार असो. आणि अशा लायक मुलांना श्रेष्ठ
मुलांना बापदादांचा नमस्ते.
या वर्षीचा प्रत्येक
दिवस स्व-परिवर्तन आणि विश्व परिवर्तनाच्या रूपामध्ये साजरा करत रहा. प्रत्येक दिवशी
नवीन परिवर्तन. प्रत्येक दिवशी नवीन सेवा, प्रत्येक दिवशी सदैव उमंग आणि उत्साह,
एकही दिवस चिंतेच्या चिंतनाचा नको, नेहमी उमंग उत्साहाने दिवस आणि रात्र घालवा, या
नवीन वर्षामध्ये प्रत्येक दिवस काही ना काही नवीन स्वयं प्रति, विश्वाप्रती अथवा
सेवेप्रती करायचेच आहे, असा दृढ संकल्प करून समयाला समीप आणत संपूर्ण बाप समान बनून
उडायचे आहे आणि उडवायचे आहे. अच्छा. ओम शांती.
वरदान:-
प्रत्येकाच्या
मताला रिगार्ड देऊन विश्वाकडून रिगार्ड प्राप्त करणारे बालक सो मालक भव
भले कोणी छोटा असो
किंवा मोठा - तुम्ही प्रत्येकाच्या मताला रिगार्ड जरूर द्या कारण कोणाच्याही मताला
नाकारणे म्हणजे जणू आपणच आपल्याला नाकारणे आहे; त्यामुळे जर कोणाच्या व्यर्थला कट
जरी करायचे असेल तरी देखील अगोदर त्याला रिगार्ड द्या, स्वमान देऊन नंतर मग शिकवण
द्या. ही देखील एक पद्धत आहे. जेव्हा असे रिगार्ड देण्याचे संस्कार भरतील तेव्हा
विश्वाकडून तुम्हाला रिगार्ड मिळेल. यासाठी बालक सो मालक, मालक सो बालक बना. बुद्धी
बेहद मध्ये शुभ कल्याणाच्या भावनेने संपन्न असावी.
सुविचार:-
मस्तकावर सदैव
सोबतीच्या स्मृतीचा तिलक लावणे - हीच सौभाग्याची निशाणी आहे.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.
एकता आणण्याकरिता दोन
गोष्टी धारण कराव्या लागतील - एक तर ‘एकनामी’ बनून सदैव प्रत्येक गोष्टीमध्ये
एकाचेच नाव घ्या, दुसरे - संकल्पांची, वेळेची आणि ज्ञान खजिन्याची ‘इकॉनॉमी’ करा.
जेव्हा सर्व जण असे एकनामी आणि इकॉनॉमी वाले बनाल तेव्हा एका बाबांमध्ये सर्व
प्रकारची भिन्नता सामावून जाईल.