08-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - सर्वोत्तम युग हे संगम आहे, यातच तुम्ही आत्मे परमात्मा बाबांना भेटता,
हाच खराखुरा कुंभ आहे”
प्रश्न:-
कोणता पाठ
फक्त बाबाच शिकवतात, कोणताही मनुष्य शिकवू शकत नाही?
उत्तर:-
देही-अभिमानी बनण्याचा पाठ एक बाबाच शिकवतात, हा पाठ कोणी देहधारी शिकवू शकत नाही.
सर्व प्रथम तुम्हाला आत्म्याचे ज्ञान मिळते. तुम्ही जाणता आपण आत्मे परमधाम वरून ॲक्टर
बनून पार्ट बजावण्यासाठी आलो, आता नाटक पूर्ण होत आहे, हा ड्रामा पूर्वनियोजित आहे,
याला कोणीही बनवलेले नाही म्हणून याचा आदि आणि अंत देखील नाही आहे.
गीत:-
जाग सजनीयां
जाग…
ओम शांती।
मुलांनी हे गीत तर अनेकदा ऐकले असेल. साजण सजणींना सांगत आहेत. ते जेव्हा शरीरामध्ये
येतात तेव्हा त्यांना साजण म्हटले जाते. नाहीतर ते पिता आहेत, तुम्ही मुले आहात.
तुम्ही सर्व भक्तिणी आहात. भगवंताची आठवण करता. ब्राईड्स, ब्राईडग्रुमची (नववधू,
नवरदेवाची) आठवण करतात. सर्वांचा माशुक आहे ब्राईडग्रुम. ते बसून मुलांना समजावून
सांगतात - आता जागे व्हा, नवीन युग येत आहे. नवीन अर्थात नवीन दुनिया सतयुग. जुनी
दुनिया आहे कलियुग. आता बाबा आलेले आहेत, तुम्हाला स्वर्गवासी बनवतात. कोणता मनुष्य
काही असे म्हणू शकत नाही की मी तुम्हाला स्वर्गवासी बनवतो. संन्यासी तर स्वर्ग आणि
नरकाला अजिबातच जाणत नाहीत. जसे इतर धर्म आहेत तसा संन्याशांचा देखील अजून एक धर्म
आहे. तो काही आदि सनातन देवी-देवता धर्म नाहीये. आदि सनातन देवी-देवता धर्माची
स्थापना भगवानच येऊन करतात, जे नरकवासी आहेत तेच मग सतयुगी स्वर्गवासी बनतात. आता
तुम्ही नरकवासी नाही आहात. आता तुम्ही आहात संगमयुगावर. संगम असतोच मध्यावर.
संगमावर स्वर्गवासी बनण्याचा तुम्ही पुरुषार्थ करत आहात, म्हणून संगमयुगाची महिमा
आहे. सर्वोत्तम कुंभचा मेळा देखील वास्तविक हा आहे. यालाच पुरुषोत्तम म्हटले जाते.
तुम्ही जाणता आपण सर्व एका बाबांची मुले आहोत, ब्रदरहुड (बंधूभाव) म्हणतात ना. सर्व
आत्मे आपसामध्ये भाऊ-भाऊ आहेत. असे म्हणतात - हिंदू-चिनी भाई-भाई, सर्व धर्मांच्या
हिशोबाने तर भाऊ-भाऊ आहेत - हे ज्ञान तुम्हाला आता मिळाले आहे. बाबा समजावून
सांगतात - ‘तुम्ही मज पित्याची संतान आहात’. आता तुम्ही सन्मुख ऐकत आहात. ते तर
फक्त म्हणायचे म्हणून म्हणतात की सर्व आत्म्यांचा पिता एक आहे, त्या एकाचीच आठवण
करतात. स्त्री अथवा पुरुष दोघांमध्येही आत्मा आहेत. या हिशोबाने भाऊ-भाऊ आहेत नंतर
मग भाऊ-बहीण आणि त्यानंतर मग पती-पत्नी होतात. तर बाबा येऊन मुलांना समजावून
सांगतात. गायले देखील जाते - ‘आत्मायें-परमात्मा अलग रही बहुकाल…’ असे म्हणत नाहीत
की, ‘नद्या आणि सागर अलग रहे बहुकाल…’ मोठ-मोठ्या नद्या तर सागराला जोडलेल्या असतात.
हे देखील मुले जाणतात, नदी सागराची मुलगी आहे. सागरातून पाणी निघते, ढगांद्वारे मग
डोगरांवर पाऊस पडतो. मग नद्या बनतात. तर सर्वजण होतात सागराचे मुलगे आणि मुली.
बऱ्याच जणांना हे देखील माहित नाही की पाणी कुठून येते. हे देखील शिकवले जाते. तर
आता मुले जाणतात ज्ञानसागर एक बाबाच आहेत. हे देखील सांगितले जाते की, तुम्ही सर्व
आत्मे आहात, पिता एक आहे. आत्मा देखील निराकार, मग जेव्हा साकारमध्ये येता तेव्हा
पुनर्जन्म घेता. बाबा देखील जेव्हा साकारमध्ये येतील तेव्हा येऊन भेटतील. बाबांचे
भेटणे एकदाच होते. आता यावेळी येऊन सर्वांना भेटले आहेत. हे देखील समजत जातील की
भगवान आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातले आहे परंतु श्रीकृष्ण तर इथे येऊ शकत
नाही. ते कसे शिव्या खातील? हे तुम्ही जाणता श्रीकृष्णाची आत्मा यावेळी आहे. सर्व
प्रथम तुम्हाला ज्ञान मिळते आत्म्याचे. तुम्ही आत्मा आहात, इतका वेळ स्वतःला शरीर
समजून चालला आहात, आता बाबा येऊन देही-अभिमानी बनवतात. साधु-संत इत्यादी तुम्हाला
कधी देही-अभिमानी बनवत नाहीत. तुम्ही संतान आहात, तुम्हाला बेहदच्या बाबांकडून वारसा
मिळतो. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपण परमधाममध्ये राहणारे आहोत मग इथे आपण पार्ट
बजावण्यासाठी आलो आहोत. आता हे नाटक पूर्ण होत आहे. या ड्रामाला कोणी बनवलेला नाहीये.
हा पूर्व नियोजित ड्रामा आहे. तुम्हाला विचारतात - ड्रामा कधीपासून सुरु झाला?
तुम्ही बोला - ‘हा तर अनादि ड्रामा आहे. याचा आदि-अंत होत नाही’. जुना सो नवीन,
नवीन सो जुना होतो. हा पाठ तुम्हा मुलांचा पक्का आहे. तुम्ही जाणता नवीन दुनिया
केव्हा बनते मग जुनी कधी होते. हे देखील काहीजणांच्याच बुद्धीमध्ये पूर्ण रीतीने आहे.
तुम्ही जाणता आता नाटक पूर्ण होत आहे परत रिपीट होईल. बरोबर आपला ८४ जन्मांचा पार्ट
पूर्ण झाला. आता बाबा आपल्याला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. बाबा गाईड सुद्धा आहेत
ना. तुम्ही सर्व पंडे आहात. पंडे लोक यात्रेकरूंना घेऊन जातात. ते आहेत देहधारी पंडे,
तुम्ही आहात रूहानी पंडे म्हणून तुमचे नाव - ‘पांडव गव्हर्मेंट’ असे देखील आहे,
परंतु गुप्त. पांडव, कौरव, यादवांनी काय केले. यावेळचीच ही गोष्ट आहे जेव्हा की
महाभारत लढाईची सुद्धा वेळ आहे. अनेक धर्म आहेत, दुनिया देखील तमोप्रधान आहे,
व्हरायटी धर्मांचे झाड पूर्ण जुने झाले आहे. तुम्ही जाणता या झाडाचे सर्वात पहिले
फाउंडेशन आहे आदि सनातन देवी-देवता धर्म. सतयुगामध्ये थोडे असतात मग वृद्धी होते.
हे कोणालाच माहित नाही, तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत. स्टुडंट्समध्ये देखील कोणी
चांगले हुशार असतात, चांगली धारणा करतात आणि करवून घेण्याची आवड असते. कोणी तर
चांगल्या रीतीने धारण करतात. कोणी मध्यम, कोणी तिसऱ्या, कुणी चौथ्या श्रेणीतील आहेत.
प्रदर्शनीमध्ये तर चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारे हवेत. पहिले हे सांगा की,
दोन पिता आहेत. एक बेहदचा पारलौकिक पिता, दुसरा हदचा लौकिक पिता. भारताला बेहदचा
वारसा मिळाला होता. भारत स्वर्ग होता जो परत नरक बनला आहे, याला आसुरी राज्य म्हटले
जाते. भक्ती देखील सर्व प्रथम अव्यभिचारी असते. एका शिवबाबांचीच आठवण करतात.
बाबा म्हणतात -
मुलांनो, पुरुषोत्तम बनायचे असेल तर ज्या कनिष्ठ बनविणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना ऐकू
नका. फक्त एका बाबांकडूनच ऐका. अव्यभिचारी ज्ञान ऐका आणखी कोणाकडून जे ऐकाल ते सर्व
आहे असत्य. बाबा आता तुम्हाला सत्य ऐकवून पुरुषोत्तम बनवितात. ईव्हील गोष्टी (वाईट
गोष्टी) तुम्ही ऐकत-ऐकत कनिष्ठ बनले आहात. प्रकाश आहे ब्रह्माचा दिवस, अंधार आहे
ब्रह्माची रात्र. हे सर्व पॉईंट्स धारण करायचे आहेत. नंबरवार तर प्रत्येक
गोष्टीमध्ये असतातच ना. कोणी डॉक्टर एका ऑपरेशनचे दहा-बारा हजार घेतात, कोणाकडे
खाण्यासाठी देखील नसते. बॅरिस्टर देखील असे असतात. तुम्ही देखील जितके शिकाल आणि
शिकवाल तितके उच्च पद मिळवाल. फरक तर आहे ना. दास-दासींमध्ये देखील नंबरवार असतात.
सर्व काही शिक्षणावर अवलंबून आहे. स्वतःला विचारले पाहिजे आपण किती शिकतो, भविष्य
जन्म-जन्मांतर काय बनणार? जे जन्म-जन्मांतर बनाल तेच कल्प-कल्पांतर बनणार म्हणून तर
अभ्यासावर पूर्ण अटेंशन दिले पाहिजे. विष पिणे तर पूर्णपणे बंद केले पाहिजे.
सतयुगामध्ये तर असे म्हटले जाणार नाही - मूत पलीती कपड धोए. यावेळी सर्वांचे कपडे (शरीरे)
सडलेली आहेत. तमोप्रधान आहेत ना. ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. सर्वात जुने
शरीर कोणाचे आहे? आपले. आपण या शरीराला बदलत राहतो. आत्मा पतित बनत जाते. शरीर
सुद्धा पतित जुने होत जाते. शरीर बदलायचे असते. आत्मा तर बदलणार नाही. शरीर वृद्ध
झाले, मृत्यू झाला - हा देखील ड्रामा बनलेला आहे. सर्वांचा पार्ट आहे. आत्मा अविनाशी
आहे. आत्मा स्वतः म्हणते - मी शरीर सोडते. देही-अभिमानी बनावे लागेल. सर्व मनुष्य
देह-अभिमानी आहेत. अर्धा कल्प आहेत देह-अभिमानी, अर्धा कल्प आहेत देही-अभिमानी.
देही-अभिमानी
असल्याकारणाने सतयुगी देवतांना मोहजीतचे टायटल मिळाले आहे कारण तिथे असे समजतात -
आपण आत्मा आहोत, आता हे शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. मोहजीत राजाची देखील कथा आहे
ना. बाबा समजावून सांगत आहेत - हे देवी-देवता मोहजीत होते. आनंदाने एक शरीर सोडून
दुसरे घ्यायचे आहे. मुलांना सर्व नॉलेज बाबांकडून मिळत आहे. तुम्हीच चक्र फिरून आता
परत येऊन भेटला आहात. जे इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत ते देखील येऊन भेटतील.
आपला थोडा बहुत वारसा घेतील. धर्मच बदलला ना. माहित नाही किती वेळ त्या धर्मामध्ये
राहिले आहेत. दोन-तीन जन्म घेऊ शकतात. कोणाला हिंदू पासून मुसलमान बनवले तर त्या
धर्मामध्ये येत राहील आणि मग इथे येतो. या आहेत सविस्तर गोष्टी. बाबा म्हणतात -
इतक्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नसाल तर, ठीक आहे, स्वतःला बाबांचा मुलगा तर समजा.
चांगली-चांगली मुले देखील विसरतात. बाबांची आठवण करत नाहीत. माया यामध्ये विसरायला
लावते. तुम्ही देखील आधी मायेचे मुरीद (गुलाम) होता ना. आता ईश्वराचे बनता. तो
ड्रामामध्ये पार्ट आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. जेव्हा तू
आत्मा सर्वप्रथम शरीरामध्ये आली होतीस तेव्हा पवित्र होतीस, मग पुनर्जन्म घेत-घेत
पतित बनली आहेस. आता पुन्हा बाबा सांगतात नष्टोमोहा बना. या शरीरामध्ये देखील मोह
ठेवू नका.
आता तुम्हा मुलांना
या जुन्या दुनियेपासून बेहदचे वैराग्य येते कारण या दुनियेमध्ये सर्व एकमेकांना
दुःख देणारे आहेत म्हणून या जुन्या दुनियेलाच विसरून जा. आपण अशरीरी आलो होतो आता
अशरीरी होऊन परत जायचे आहे. आता ही दुनियाच नष्ट होणार आहे. तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनण्यासाठी बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. श्रीकृष्ण तर असे
म्हणू शकत नाही की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. श्रीकृष्ण तर सतयुगामध्ये असतो.
बाबाच म्हणतात मला तुम्ही पतित-पावन देखील म्हणता तर आता माझी आठवण करा, मी ही
युक्ती सांगतो, पावन बनण्याची. कल्प-कल्पाची युक्ती सांगतो - जेव्हा जुनी दुनिया
होते तेव्हा भगवंताला यावे लागते. मनुष्यांनी ड्रामाचे आयुर्मान भलेमोठे केले आहे.
तर मनुष्य अगदीच विसरून गेले आहेत. आता तुम्ही जाणता हे संगमयुग आहे, हे आहे
पुरुषोत्तम बनण्याचे युग. मनुष्य तर एकदम घोर अंधारामध्ये पडले आहेत. यावेळी सगळे
तमोप्रधान आहेत. आता तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. तुम्हीच सर्वात जास्त
भक्ती केली आहे. भक्तीमार्ग नष्ट होतो. भक्तीमार्ग आहे मृत्यू लोकामध्ये. मग येईल
अमरलोक. तुम्ही यावेळी ज्ञान घेता मग भक्तीचे नामोनिशाण राहणार नाही. ‘हे भगवान’,
‘हे राम’ - हे सगळे भक्तीमधील शब्द आहेत. यामध्ये (ज्ञान मार्गामध्ये) काही आवाज
करायचा नाहीये. बाबा ज्ञानाचे सागर आहेत, आवाज थोडाच करतात. त्यांना म्हटलेच जाते
सुख-शांतीचा सागर. तर ऐकवण्यासाठी देखील त्यांना शरीर पाहिजे ना. भगवंताची भाषा
कोणती आहे, हे कोणीच जाणत नाहीत. असे तर नाही, बाबा सर्व भाषांमध्ये बोलतील. नाही,
त्यांची भाषाच आहे - हिंदी. बाबा एकाच भाषेमध्ये समजावून सांगतात मग ट्रान्सलेट
करून तुम्ही समजावून सांगता. फॉरेनर्स इत्यादी जे कोणी भेटतील त्यांना बाबांचा
परिचय द्यायचा आहे. बाबा आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत.
त्रिमूर्तीच्या चित्रावर समजावून सांगितले पाहिजे. प्रजापिता ब्रह्माच्या किती
ब्रह्माकुमार-कुमारी आहेत. कोणीही आले तर पहिले त्यांना विचारा कोणाकडे आला आहात?
बोर्ड तर लावलेला आहे प्रजापिता… ते तर रचणारे झाले. परंतु त्यांना काही भगवान म्हणू
शकत नाही. भगवान निराकारालाच म्हटले जाते. हे ब्रह्माकुमार-कुमारी ब्रह्माची संतान
आहेत. तुम्ही इथे कशासाठी येता? आमच्या बाबांकडे तुमचे काय काम! पित्याकडे मुलांचेच
काम असेल ना. आम्ही बाबांना चांगल्या रीतीने जाणतो. गायले जाते - सन शोज फादर. आपण
त्यांची मुले आहोत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) पुरुषोत्तम
बनण्यासाठी कनिष्ठ बनविणाऱ्या ज्या इव्हील गोष्टी (वाईट गोष्टी) आहेत त्या ऐकायच्या
नाहीत. एका बाबांकडूनच अव्यभिचारी ज्ञान ऐकायचे आहे.
२) नष्टोमोहा
बनण्यासाठी देही-अभिमानी बनण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. बुद्धीमध्ये रहावे
- ही जुनी दुनिया दुःख देणारी आहे, तिला विसरायचे आहे. यापासून बेहदचे वैराग्य असावे.
वरदान:-
संगमयुगाच्या
सर्व प्राप्तींना स्मृतीमध्ये ठेवून चढत्या कलेचा अनुभव करणारे श्रेष्ठ प्रारब्धी
भव परमात्म मिलन किंवा परमात्म ज्ञानाची विशेषता आहे - अविनाशी प्राप्ती होणे. असे
नाही की संगमयुग पुरुषार्थी जीवन आहे आणि सतयुग प्रारब्धवाले जीवन आहे. संगमयुगाची
विशेषता आहे एक पाऊल उचला आणि हजार पावले प्रारब्ध मिळवा. तर मी फक्त पुरुषार्थी
नाही परंतु श्रेष्ठ प्रारब्धी आहे - या स्वरूपाला नेहमी समोर ठेवा. प्रारब्धाला
पाहून सहजच चढत्या कलेचा अनुभव कराल. “पाना था सो पा लिया” - हे गाणे गा तर घुटके
आणि झुटके (घुसमटण्यापासून आणि डुलक्या काढण्यापासून) वाचाल.
बोधवाक्य:-
ब्राह्मणांचा
श्वास आहे - हिंमत, ज्यामुळे सर्वात कठीण कार्य देखील सोपे होते.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना” जसे ब्रह्मा बाबांना बघितले की
बाबांसोबत स्वतःला सदैव कंबाइंड रुपामध्ये अनुभव केले आणि करविले. या कंबाइंड
स्वरूपाला कोणी वेगळे करू शकत नाही. अशी सपूत मुले सदैव स्वतःला बाबांसोबत कंबाइंड
अनुभव करतात. कोणती ताकद नाही जी त्यांना वेगळे करू शकेल.