08-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - आठवणीने विकर्म विनाश होतात, ट्रान्सने (साक्षात्काराने) नाही. साक्षात्कार तर दिड-दमडीचा खेळ आहे, त्यामुळे ट्रान्समध्ये जाण्याची आशा ठेवू नका

प्रश्न:-
मायेच्या भिन्न-भिन्न रुपांपासून वाचण्यासाठी बाबा सर्व मुलांना कोणती एक खबरदारी घ्यायला सांगतात?

उत्तर:-
गोड मुलांनो, ट्रान्सची (साक्षात्काराची) इच्छा ठेवू नका. ज्ञान-योगामध्ये ट्रान्सचा कोणताही संबंध नाही. मुख्य आहे अभ्यास. कोणी ट्रान्समध्ये जाऊन म्हणतात - आमच्यामध्ये मम्मा आली, बाबा आले. हे सर्व सूक्ष्ममायेचे संकल्प आहेत, यापासून खूप सावध रहायचे आहे. माया बऱ्याच मुलांमध्ये प्रवेश करून उलटे कार्य करायला लावते त्यामुळे ट्रान्सची आशा ठेवू नका.

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुले हे तर समजले आहेत की एकीकडे आहे भक्ती, दुसरीकडे आहे ज्ञान. भक्ती तर अथाह आहे आणि शिकविणारे अनेक आहेत. शास्त्रे देखील शिकवतात, मनुष्य देखील शिकवतात. इथे मात्र ना कोणते शास्त्र आहे, ना मनुष्य आहे. इथे शिकविणारे एकच रुहानी बाबा आहेत जे आत्म्यांना समजावून सांगतात. आत्माच धारण करते. परमपिता परमात्म्यामध्ये हे सारे ज्ञान आहे, ८४ च्या चक्राचे ज्ञान त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांना (शिवबाबांना) देखील स्वदर्शन चक्रधारी म्हणू शकतो. आम्हा मुलांना देखील ते स्वदर्शन चक्रधारी बनवत आहेत. बाबा देखील ब्रह्माच्या तनामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना ब्राह्मण देखील म्हटले जाऊ शकते. आपण देखील त्यांची मुले ब्राह्मण सो देवता बनतो. आता बाबा बसून आठवणीची यात्रा शिकवत आहेत, यामध्ये हठयोग इत्यादीची काही गोष्टच नाही. ते लोक हठयोगाने ट्रान्स इत्यादी मधे जातात. हि काही महानता नाहीये. ट्रान्समध्ये (साक्षात्कारामध्ये) बढाई मारण्यासारखे काहीच नाही आहे. ट्रान्स तर एक दीड-दमडीचा खेळ आहे. तुम्ही असे कधीही कोणाला सांगायचे नाही आहे की आम्ही ट्रान्समध्ये जातो; कारण आजकाल विदेश इत्यादी ठिकाणी जिकडे-तिकडे पुष्कळ लोक ट्रान्समध्ये जातात. ट्रान्समध्ये जाण्याने ना त्यांना काही फायदा आहे, ना तुम्हाला काही फायदा आहे. बाबांनी समज दिली आहे. ट्रान्समध्ये ना काही आठवणीची यात्रा आहे, ना ज्ञान आहे. ध्यानामध्ये जाणारा अथवा ट्रान्सवाला कधीही काहीही ज्ञान ऐकणार नाही, आणि ना काही पापे भस्म होऊ शकणार. ट्रान्सचे काहीही महत्त्व नाही आहे. मुले योग लावतात, त्याला काही ट्रान्स म्हटले जात नाही. आठवणीने विकर्म भस्म होतील. ट्रान्समध्ये विकर्म विनाश होणार नाहीत. बाबा सावध करतात की, मुलांनो, ट्रान्सचा छंद ठेवू नका.

तुम्ही जाणता या संन्यासी इत्यादींना ज्ञान तेव्हा मिळते जेव्हा की विनाशाची वेळ असते. भले तुम्ही त्यांना निमंत्रण तर देत रहा परंतु हे ज्ञान त्यांच्या कलशामध्ये (बुद्धीमध्ये) लवकर येणार नाही. जेव्हा विनाश समोर बघतील तेव्हा ते येतील. समजतील, आता तर मृत्यू आला की आला. विनाश जेव्हा समोर बघतील तेव्हा मानतील. त्यांचा पार्टच शेवटी आहे. तुम्ही म्हणता - आता विनाश आला की आला, मृत्यू येणारच आहे. ते (दुनियावाले) समजतात हे तर थापा मारत आहेत.

तुमचे झाड हळूहळू वाढते. संन्याशांना एवढेच सांगायचे आहे की, बाबांची आठवण करा. हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे की, तुम्हाला योग लावताना डोळे बंद करायचे नाही आहेत. डोळे बंद असतील तर बाबांना कसे पहाल. आपण आत्मा आहोत, परमपिता परमात्म्यासमोर बसलो आहोत. ते दिसत नाहीत, परंतु हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. तुम्ही मुले समजता, परमपिता परमात्मा आम्हाला शिकवत आहेत या शरीराच्या आधाराने. ध्यान इत्यादीची काही गोष्टच नाही. ध्यानामध्ये जाणे काही मोठी गोष्ट नाहीये. हा भोग लावणे इत्यादी सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सेवक बनून भोग लावून येता. जसे ते सेवक मोठ्या व्यक्तीला खाऊ घालतात. तुम्ही देखील सेवक आहात, देवतांना भोग लावण्यासाठी जाता. ते आहेत फरिश्ते. तिथे मम्मा-बाबांना बघतात. ती संपूर्ण मूर्ती देखील एम ऑब्जेक्ट आहे. त्यांना असा फरिश्ता कोणी बनवले? बाकी ध्यानामध्ये जाणे ही काही मोठी गोष्ट नाहीये. जसे इथे शिवबाबा तुम्हाला शिकवतात, तसे तिथे देखील शिवबाबा यांच्याद्वारे काही गोष्टी स्पष्ट करतील. सूक्ष्म वतनमध्ये काय असते, हे फक्त जाणून घ्यायचे असते. बाकी ट्रान्स इत्यादीला अजिबात महत्त्व द्यायचे नाही. कोणाला ट्रान्स दाखविणे (साक्षात्कार घडविणे) - हा देखील बालिशपणा आहे. बाबा सर्वांना सावध करत आहेत - ट्रान्समध्ये जाऊ नका, यामध्ये देखील बरेचदा मायेचा प्रवेश होतो.

हे शिक्षण आहे, कल्प-कल्प, बाबाच येऊन तुम्हाला शिकवतात. आता आहे संगमयुग. तुम्हाला ट्रान्सफर व्हायचे आहे. ड्रामा प्लॅन अनुसार तुम्ही पार्ट बजावत आहात, पार्टची महिमा आहे. बाबा येऊन शिकवतात - ड्रामा अनुसार. तुम्हाला बाबांकडून एकदाच शिकून मनुष्यापासून देवता जरूर बनायचे आहे. याचा तर मुलांना आनंदच होतो की, आम्ही बाबांना देखील आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताला सुद्धा जाणले आहे. बाबांकडून शिकवण मिळाल्याचा खूप आनंद झाला पाहिजे. तुम्ही शिकताच मुळी नवीन दुनियेसाठी. तिथे आहेच देवतांचे राज्य तर जरूर पुरुषोत्तम संगमयुगावर शिकायचे असते. तुम्ही या दुःखापासून मुक्त होऊन सुखामध्ये जाता. इथे तमोप्रधान असल्याकारणाने तुम्ही आजारी वगैरे पडता. हे सर्व रोग नष्ट होणार आहेत. मुख्य आहेच अभ्यास, याच्याशी ट्रान्स इत्यादीचा काहीही संबंध नाही. ही काही मोठी गोष्ट नाहीये. बऱ्याच ठिकाणी असे ध्यानामध्ये जातात आणि मग म्हणतात - मम्मा आली, बाबा आले. बाबा म्हणतात - असे काहीही नाही आहे. बाबा तर एकच गोष्ट समजावून सांगतात - तुम्ही जे अर्धा कल्प देह-अभिमानी बनले आहात, आता देही-अभिमानी बनून बाबांची आठवण कराल तर विकर्म विनाश होतील. याला आठवणीची यात्रा म्हटले जाते. योग म्हटल्याने यात्रा सिद्ध होत नाही. तुम्हा आत्म्यांना इथून जायचे आहे, तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही आता यात्रा करत आहात. त्यांचा (दुनियावाल्यांचा) जो योग आहे, त्यामध्ये यात्रेविषयी काहीच सांगितलेले नाहीये. हठयोगी तर अनेक आहेत. तो आहे - हठयोग, हे आहे - बाबांची आठवण करणे. बाबा म्हणतात - गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. असे इतर कोणीही कधीही समजावून सांगणार नाही. हे तर आहे शिक्षण. बाबांची संतान बनला आणि मग बाबांकडून शिकायचे आणि शिकवायचे आहे. बाबा म्हणतात - तुम्ही म्युझियम (प्रदर्शनी) उघडा, आपोआपच तुमच्याकडे येतील. त्यांना बोलावण्यासाठी त्रास होणार नाही. म्हणतील, हे ज्ञान तर खूप चांगले आहे, कधी ऐकलेले नाही आहे. याने तर कॅरॅक्टर (स्वभाव) सुधारतात. मुख्य आहेच पवित्रता, ज्याच्यावरून भांडणे इत्यादी होतात. बरेचजण नापास देखील होतात. तुमची अवस्था अशी होते, जे या दुनियेमध्ये असूनही त्यांना पहात नाही. खाता-पिता देखील तुमची बुद्धी तिकडे (नवीन घरामध्ये) असावी. जसे वडील नवीन घर बांधतात तर सर्वांची बुद्धी त्या नवीन घराकडे जाते ना. आता नवीन दुनिया बनत आहे. बेहदचे बाबा बेहदचे घर बनवत आहेत. तुम्ही जाणता, आपण स्वर्गवासी बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. आता चक्र पूर्ण झाले आहे. आता आपल्याला आपल्या घरी आणि स्वर्गामध्ये जायचे आहे तर त्यासाठी पावन देखील जरूर बनायचे आहे. आठवणीच्या यात्रेने पावन बनायचे आहे. आठवणीमध्येच विघ्न पडतात, यामध्येच तुमचे युद्ध होते. अभ्यासामध्ये युद्धाची गोष्ट असत नाही. अभ्यास तर अगदी सोपा आहे. ८४ च्या चक्राचे नॉलेज तर खूप सोपे आहे. बाकी, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, यामध्ये आहे मेहनत. बाबा म्हणतात - आठवणीची यात्रा विसरु नका. कमीत-कमी आठ तास तरी अवश्य आठवण करा. शरीर निर्वाहासाठी कर्म देखील करायचे आहे. झोपही घ्यायची आहे; सोपा मार्ग आहे ना. जर म्हटले झोपू नका, तर हा हठयोग झाला. हठयोगी तर पुष्कळ आहेत. बाबा म्हणतात - त्या बाजूला काहीही बघू नका, त्याने काहीही फायदा होणार नाही. किती सारे हठयोग इत्यादी शिकवतात. ते सारे आहे मनुष्य मत. तुम्ही आत्मे आहात, आत्माच शरीर घेऊन पार्ट बजावते, डॉक्टर इत्यादी बनते. परंतु मनुष्य देह-अभिमानी बनले आहेत - मी अमका आहे.

आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे - आपण आत्मा आहोत. बाबा देखील आत्मा आहेत. यावेळी तुम्हा आत्म्यांना परमपिता शिकवत आहेत; यासाठीच गायन आहे - आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल कल्प-कल्प भेटतात. बाकी जी काही सारी दुनिया आहे, ते सर्व देह-अभिमानामध्ये येऊन देह समजूनच शिकतात आणि शिकवतात. बाबा म्हणतात - मी आत्म्यांना शिकवतो. न्यायाधीश, वकील इत्यादी देखील आत्माच बनते. तुम्ही आत्मे सतोप्रधान पवित्र होता मग तुम्ही पार्ट बजावता-बजावता सर्व पतित बनले आहात; म्हणूनच बोलावता - बाबा, येऊन आम्हाला पावन आत्मा बनवा. बाबा तर आहेतच पावन. या गोष्टी जेव्हा ऐकतील तेव्हा धारणा होईल. तुम्हा मुलांना धारणा होते तर तुम्ही देवता बनता. बाकी कोणाच्याही बुद्धीमध्ये हे बसणार नाही कारण ही आहे नवीन गोष्ट. हे आहे ज्ञान, ती आहे भक्ती. तुम्ही देखील भक्ती करत-करत देह-अभिमानी बनता. आता बाबा म्हणतात - मुलांनो, आत्म-अभिमानी बना. आम्हा आत्म्यांना बाबा या शरीराद्वारे शिकवतात. घडो-घडी हे लक्षात ठेवा कि ही एकच वेळ आहे जेव्हा आत्म्यांचे पिता परमपिता शिकवतात. बाकी पूर्ण ड्रामामध्ये त्यांचा या संगमयुगा व्यतिरिक्त कधीही पार्टच नाही आहे; त्यामुळे बाबा तरीही म्हणतात - गोड-गोड मुलांनो स्वतःला आत्मा निश्चय करा, बाबांची आठवण करा. ही खूप श्रेष्ठ यात्रा आहे - चढ़े तो चाखे वैकुण्ठ रस. विकारामध्ये गेल्याने एकदम चक्काचुर होऊन जातो. तरी देखील स्वर्गामध्ये तर येतील, परंतु पद अतिशय कमी दर्जाचे असेल. ही राजाई स्थापन होत आहे. यामध्ये कमी पद असणारे देखील हवेत, सर्व थोडेच ज्ञानामध्ये चालतात. मग तर बाबांना भरपूर मुलांनी भेटले पाहिजे. जर भेटतात तर ते देखील थोड्या वेळाकरिता. तुम्हा मातांची खूप महिमा आहे, वंदे मातरम् देखील गायले जाते. जगत अंबेची किती मोठी जबरदस्त जत्रा भरते कारण तिने खूप सेवा केली आहे. जे खूप सेवा करतात ते मोठे राजा बनतात. दिलवाला मंदिरामध्ये तुमचीच यादगार आहेत. तुम्हा मुलींना तर खूप वेळ काढायला हवा. तुम्ही भोजन इत्यादी बनवता तर आठवणीमध्ये बसून खूप शुद्ध भोजन बनवले पाहिजे, जे कोणाला खाऊ घालाल तर त्याचे देखील हृदय शुद्ध होईल. असे खूप थोडे आहेत, ज्यांना असे भोजन मिळत असेल. स्वतःला विचारा कि आपण शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहून भोजन बनवतो का, जे खाल्ल्यानेच त्यांचे हृदय विरघळेल. वेळो-वेळी आठवण विसरायला होते. बाबा म्हणतात - विसरणे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे कारण तुम्ही १६ कला तर अजून बनलेले नाही आहात. संपूर्ण बनायचे जरूर आहे. पौर्णिमेच्या चंद्रमामध्ये किती तेज असते, मग कमी होत-होत बारीक रेषा बाकी राहते. घनघोर अंधार होतो नंतर मग स्वच्छ प्रकाश. हे विकार इत्यादी सोडून बाबांची आठवण करत रहाल तर तुमची आत्मा संपूर्ण बनेल. तुम्हाला वाटते महाराजा बनावे परंतु सगळेच तर बनू शकणार नाहीत. पुरुषार्थ सर्वांना करायचा आहे. कोणी तर काहीच पुरुषार्थ करत नाहीत म्हणून महारथी, घोडेस्वार, प्यादे म्हटले जाते. महारथी फार थोडे असतात. प्रजा किंवा लष्कर जितके असते तितके कमांडर किंवा मेजर्स नसतात. तुमच्यामध्ये देखील कमांडर, मेजर, कॅप्टन आहेत. प्यादे देखील आहेत. तुमची देखील ही रुहानी सेना आहे ना. सर्व काही आठवणीच्या यात्रेवर अवलंबून आहे. त्यानेच बळ मिळेल. तुम्ही आहात गुप्त वॉरियर्स. बाबांना आठवण केल्याने विकर्मांचा जो कचरा आहे तो भस्म होतो. बाबा म्हणतात काम-धंदा भले करा. बाबांची आठवण करा. तुम्ही जन्म-जन्मांतरीचे आशिक आहात, एका माशुकचे. आता तो माशुक भेटला आहे तर त्याची आठवण करायची आहे. आधी भले आठवण करत होता परंतु विकर्म थोडीच भस्म होत होती. बाबांनी सांगितले आहे तुम्हाला इथे तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनायचे आहे. आत्म्यालाच बनायचे आहे. आत्माच मेहनत करत आहे. याच जन्मामध्ये तुम्हाला जन्म-जन्मांतरीची घाण साफ करायची आहे. हा आहे मृत्यू लोकातील अंतिम जन्म, मग जायचे आहे अमरलोकमधे. आत्मा पावन बनल्या शिवाय जाऊ शकत नाही. सर्वांना आपला-आपला हिशोब चुकता करून जायचे आहे. जर सजा खाऊन जाल तर मग पद कमी होईल. जे सजा खात नाहीत ते माळेचे फक्त आठ मणी म्हटले जातात. ९ रत्नाची अंगठी इत्यादी बनते. असे बनायचे असेल तर बाबांची आठवण करण्याची खूप मेहनत करायची आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) संगमयुगावर स्वतःला ट्रान्सफर करायचे आहे. अभ्यास आणि पवित्रतेच्या धारणेद्वारे आपले कॅरॅक्टर (स्वभाव) सुधारायचे आहे, ट्रान्स (साक्षात्कार) इत्यादीची आवड ठेवायची नाही.

२) शरीर निर्वाह अर्थ कर्म देखील करायचे आहे, झोप देखील घ्यायची आहे, हा काही हठयोग नाहीये, परंतु आठवणीच्या यात्रेला कधीही विसरायचे नाही. योगयुक्त होऊन असे शुद्ध भोजन बनवा आणि खाऊ घाला जे खाणाऱ्याचे हृदय शुद्ध होईल.

वरदान:-
आपल्या सूक्ष्म शक्तींवर विजयी बनणारे राजऋषि, स्वराज्य अधिकारी आत्मा भव

कर्मेंद्रियजीत बनणे तर सोपे आहे परंतु मन-बुद्धी-संस्कार या सूक्ष्म शक्तींवर विजयी बनणे - हा सूक्ष्म अभ्यास आहे. ज्यावेळी जो संकल्प, जो संस्कार इमर्ज करू इच्छिता तोच संकल्प, तोच संस्कार सहजच अंगीकारता येणे - यालाच म्हणतात सूक्ष्म शक्तींवर विजय अर्थात राजऋषि स्थिती. समजा, संकल्प शक्तीला ऑर्डर केली की, आत्ता लगेच एकाग्रचित्त हो, तर राजाचा आदेश त्याच वेळी त्याच प्रकारे मानणे, हेच आहे - राज्य अधिकाराचे लक्षण. याच अभ्यासाद्वारे अंतिम पेपरमध्ये पास व्हाल.

बोधवाक्य:-
सेवेद्वारे मिळणारे आशीर्वाद, हीच सर्वात मोठ्यात मोठी भेट आहे.