08-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, या
सभेमध्ये बहिर्मुखी बनून बसायचे नाही, बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे,
मित्र-संबंधी किंवा धंदा इत्यादीची आठवण केल्याने वायुमंडळामध्ये विघ्न पडते”
प्रश्न:-
तुम्हा
मुलांच्या रुहानी ड्रिलची विशेषता कोणती आहे, जी मनुष्य करू शकत नाहीत?
उत्तर:-
तुमची रुहानी
ड्रिल बुद्धीची आहे, त्याची विशेषता हीच आहे की तुम्ही आशिक बनून आपल्या माशूकची
आठवण करता. याचाच उल्लेख गीतेमध्ये देखील केलेला आहे - ‘मनमनाभव’. परंतु मनुष्य
आपल्या माशूक परमात्म्याला जाणतच नाहीत तर मग ड्रिल तरी कसे करू शकतील. ते तर
एकमेकांना भौतिक ड्रिल (शारीरिक व्यायाम) शिकवतात.
ओम शांती।
मुले देखील
समजतात, बाबा देखील समजतात की मुले इथे (जी योग-अभ्यास करत आहेत ती) काय करत आहेत!
आठवणीच्या यात्रेची ड्रिल करत आहेत. मुखाने काहीच बोलायचे नाहीये. कोणाची आठवण आहे?
परमपिता परमात्मा शिवबाबांची. त्यांच्या आठवणीमध्ये राहिल्याने आपली जी काही विकर्म
आहेत, ती भस्म होतील आणि विकर्माजीत बनू; जितके जे आठवणीच्या ड्रिल मध्ये राहतील.
ही आत्म्याची ड्रिल आहे, शारीरिक ड्रिल नाहीये. भारतामध्ये जी काही ड्रिल (व्यायाम)
शिकवतात, ती सर्व आहे शारीरिक, ही आहे रुहानी ड्रिल (आत्म्याचा व्यायाम). या रुहानी
ड्रिल विषयी तुम्हा मुलांशिवाय इतर कोणीही जाणत नाहीत.
‘रुहानी ड्रिल’चा
उल्लेख गीतेमध्ये आहे जरूर. भगवानुवाच अथवा भगवंताच्या मुलांचे देखील उवाच आहे.
तुम्ही आता भगवान शिवबाबांची संतान बनला आहात ना. मुलांना आदेश मिळाला आहे -
‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. बाबा देखील ड्रिल शिकवतात. मुले देखील हीच ड्रिल
शिकवतात. कल्पापूर्वी देखील बाबांनी हेच सांगितले होते की, मज पित्याची आठवण करा.
हे काही वारंवार सांगण्याची गरज नाहीये, परंतु सांगावे लागते. इथे बसून कोणी आपल्या
मित्र-संबंधी, धंदा इत्यादींची आठवण करत राहतात तर वायुमंडळामध्ये विघ्न टाकतात.
बाबा म्हणतात - जसे इथे तुम्ही आठवणीमध्ये बसले आहात, तसेच चालता-फिरता, कर्म
करतानाही आठवणीमध्ये रहायचे आहे. जसे आशिक-माशूक एकमेकांची आठवण करतात. त्यांची
आठवण दैहिक आहे. तुमची आहे रुहानी आठवण. आत्मे भक्तिमार्गामध्ये देखील परमपिता
परमात्मा माशूकचे आशिक असतात. परंतु माशूकला जाणत नाहीत, ना आपल्या आत्म्याला
जाणतात. माशूक बाबा आलेले आहेत. भक्तिमार्ग सुरु झाल्यापासून आत्मे आशिक बनले आहेत.
ही आहेच आत्मा आणि परमात्म्याची गोष्ट. बाबा मुलांना सन्मुख सांगतात - तुम्ही आशिक
मज माशूकची आठवण करता की, ‘बाबा या, येऊन आम्हाला दुःखातून लिबरेट करा आणि तुमच्या
सोबत शांतीधाममध्ये घेऊन चला.’ तुम्ही जाणता आता या दुःखधाम, मृत्युलोक चा विनाश
होणार आहे. अमरलोक जिंदाबाद, मृत्युलोक मुर्दाबाद. तुम्ही आता ब्राह्मण मुले बनला
आहात, तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्था नुसार आहेत. तुम्हा मुलांना पूर्ण
निश्चय असला पाहिजे की आपण आता २१ जन्मांकरिता नरकवासी पासून स्वर्गवासी बनत आहोत.
एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा म्हणतात - स्वर्गवासी झाला. परंतु किती काळासाठी
स्वर्गवासी झाला... हे कोणीही जाणत नाही. तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात स्वर्गवासी
बनण्याकरिता. हा निश्चय कोण करवून घेत आहेत! ते आहेत गीतेचे भगवान. परंतु ते तर एकच
निराकार आहेत. मनुष्य समजतात - निराकार तर निराकारच आहे. ते कसे काय इथे येऊन
शिकवतील? बाबांना न जाणल्यामुळे ड्रामा अनुसार श्रीकृष्णाचे नाव चुकून घातले आहे.
यावेळी श्रीकृष्ण आणि शिव यांचा जवळचा संबंध आहे. शिव जयंती संगमावर साजरी केली जाते.
मग उद्या असेल श्रीकृष्ण जयंती. शिव जयंती आहे रात्रीची, श्रीकृष्ण जयंती आहे सकाळी,
त्याला प्रभात असे म्हणतात. जेव्हा शिवरात्र पूर्ण होते तेव्हा मग श्रीकृष्ण जयंती
होते. या गोष्टी मुलेच समजू शकतात. हा नियम आहे की, इथे सभेमध्ये कोणीही बहिर्मुखी
असू नये. बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे. मनुष्य बोलावतात देखील - ‘हे
पतित-पावन या, येऊन पावन बनवा’. परंतु ड्रामा अनुसार पत्थर-बुद्धी असल्यामुळे काहीही
समजत नाहीत. जर जाणत असते तर सांगितले असते. त्यांना हे देखील माहीत नाहीये की, आता
कलियुगाचा अंत आहे, मग जेव्हा बाबा येतात तेव्हा आदि होते. मनुष्य तर अगदीच घोर
अंधारामध्ये आहेत. लोक समजतात कलियुगाला अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. बेहदचे बाबा
समजावून सांगतात - हदचे पिता कधीही पतित-पावन होऊ शकत नाहीत. ‘बापू’ नाव तर अनेकांचे
ठेवले आहे. वृद्ध व्यक्तीला देखील ‘बापूजी’ अथवा ‘पिताजी’ म्हणतात. हे रुहानी
पिताश्री तर एकच आहेत, जे पतित-पावन, ज्ञानाचे सागर आहेत. मुलांना पावन बनण्याकरिता
ज्ञान पाहिजे. पाण्यामध्ये स्नान केल्याने कोणी पावन थोडेच बनतील. तुम्ही जाणता
शिवबाबा आपल्या समोर या तनामध्ये प्रत्यक्ष आहेत. ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांना
राजयोग शिकवत आहेत. ते तर म्हणतात भगवानुवाच अर्जुनाप्रती. ब्राह्मणांचे नामोनिशाण
सुद्धा नाहीये. गायले जाते - ब्रह्मा द्वारे स्थापना, विष्णू द्वारे पालना. स्थापना
तर ब्रह्मा द्वारेच करतील, ना विष्णू द्वारा, ना शंकरा द्वारे करणार. तुम्हा मुलांना
हे स्पष्टीकरण आता मिळाले आहे. बाबांना इथे यावे लागते, परत घरी तर कोणतीही आत्मा
जाऊ शकत नाही. जे कोणी येतात त्यांना सतो-रजो-तमो अवस्थांमधून जावेच लागते.
श्रीकृष्ण देखील पूर्ण ८४ जन्म घेतात आणि पूर्ण ५ हजार वर्षे पार्ट बजावला आहे.
जेव्हा आत्मा गर्भामध्ये आहे तेव्हा देखील जन्म तर आहे. श्रीकृष्णाची आत्मा जेव्हा
सतयुगामध्ये येते, गर्भामध्ये प्रवेश केला तेव्हा पासून त्याला ५ हजार वर्षांमध्ये
८४ जन्मांचा पार्ट बजावायचा आहे. जसे शिव जयंती साजरी करतात तर यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये) बसले आहेत ना. श्रीकृष्णाची आत्मा देखील गर्भामध्ये आली, चूरपूर झाली,
त्या क्षणापासून ५ हजार वर्षांची गणना सुरू होते. यामध्ये जर कमी-जास्त दिवस झाले
तर मग ५ हजार वर्षांमधून तितका काळ कमी होईल. या अतिशय सूक्ष्म गोष्टी समजून
घ्यायच्या आहेत. मुले जाणतात श्रीकृष्णाची आत्मा आता पुन्हा हे ज्ञान घेत आहे,
पुन्हा श्रीकृष्ण बनण्याकरिता. तुम्ही देखील कंसपुरी मधून कृष्णपुरी मध्ये जात आहात.
या गोष्टी बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत.
बाबा सांगतात - माया
खूप अशक्यप्राय आहे. चांगल्या-चांगल्या महारथींना देखील हरवून टाकते. ज्ञान
घेता-घेता मधेच कुठेतरी ग्रहचारी बसते. आश्चर्यवत आमचे बनन्ती, कथन्ती... अहो माया,
तरीही पळून जातात. कमाईमध्ये ग्रहचारी बसते. राहूचे ग्रहण सर्वांना लागलेले आहे. आता
तुमच्यावर बृहस्पतीची दशा बसली आहे, आणि मग चालता-चालता कोणावर राहूचे ग्रहण बसते,
तेव्हा म्हणतात - महान कमबख्त (सर्वात दुर्दैवी) या दुनियेमध्ये पाहायचा असेल तर इथे
पहा. तुमची आत्मा म्हणते - आम्ही बाबांकडून कायम सुखाचा वारसा घेत आहोत. बाबा,
तुमच्या कडून कल्पापूर्वी देखील हा वारसा घेतला होता. आता पुन्हा बाबांकडे आलो आहोत.
बाबांनी समजावून सांगितले आहे - बाहेर तुमच्या सेंटर्सवर हे ज्ञान समजून घेण्यासाठी
भरपूर जण येतील. इथे ही आहे इंद्रसभा. ‘इंद्र’, शिवबाबा आहेत ना, जे ज्ञान वर्षा
करतात. तर अशा सभेमध्ये कोणीही पतित येऊ शकत नाही. सब्ज परी, पुखराज परी ज्या
ब्राह्मणी पंडा बनून येतात, त्यांना बाबा सांगतील - तुम्ही तुमच्या सोबत विकारामध्ये
जाणाऱ्या कोणालाही इथे घेऊन येऊ शकत नाही, नाहीतर दोघेही जबाबदार ठरतील. कोणत्याही
विकारी व्यक्तीला सोबत घेऊन आलात तर घेऊन येणाऱ्यावर खूप डाग (कलंक) लागतात. आणि मग
खूप कठोर सजा मिळते. पऱ्यांवर (ब्राह्मणींवर) खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणतात की,
मानसरोवर मध्ये स्नान केल्याने परी बनतात. वास्तविक हे आहे ज्ञान मानसरोवर. बाबा
मनुष्य तनामध्ये येऊन ज्ञान वर्षा करतात. ज्ञान सागर आहेत ना. तुम्ही नदी देखील
आहात, सरोवर देखील आहात. ज्ञान सागर यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बसून मुलांना
स्वर्गामध्ये जाण्या करिता लायक बनवत आहेत. स्वर्गामध्ये आहे श्री लक्ष्मी-नारायणाचे
राज्य. हे आहे प्रवृत्ती मार्गाचे एम-ऑब्जेक्ट. म्हणतात, आम्ही दोघे ज्ञान-चितेवर
बसून लक्ष्मी-नारायण बनणार आहोत. उच्च पद प्राप्त करायचे आहे ना. अर्धा कल्प आत्मे
तळमळत राहतात. बाबा या, येऊन आम्हाला राजयोग शिकवून पावन बनवा. बाबा इशारा देतात.
भारतवासी जे देवी-देवतांना मानणारे आहेत त्यांनी जरूर ८४ जन्म उपभोगले आहेत. जे
देवी-देवतांचे भक्त आहेत, प्रयत्न करून त्यांना समजावून सांगा. बाबा कसे येऊन ३
धर्मांची स्थापना करतात - ब्राह्मण, सूर्यवंशी, चंद्रवंशी; हे तीनही धर्म बाबा
स्थापन करतात. अर्धाकल्प मग दुसरा कोणताही धर्म स्थापन होत नाही. नंतर मग
अर्ध्याकल्पामध्ये किती मठ-पंथ इत्यादी धर्म असंख्य स्थापन होतात. कुठे
अर्धाकल्पामध्ये एक धर्म, तोही संगमयुगावर भविष्याकरिता राजधानी स्थापन करतात. ते
सर्व जुन्या दुनियेमध्येच आपला धर्म स्थापन करतात. इथे बाबा अर्ध्याकल्पासाठी एका
धर्माची स्थापना करतात. बाकी कोणामध्येच ही ताकद नाहीये. बाबा तुम्हाला आपले बनवून,
सूर्यवंशी-चंद्रवंशी घराणे स्थापन करून बाकी सर्वांचा विनाश घडवून आणतात. सर्व आत्मे
शांतीमध्ये निघून जातात. तुम्ही सुखामध्ये येता, त्या वेळी कोणतेही दुःख नसते,
ज्यासाठी गॉडची आठवण करतील. हे ज्ञान देखील तुमच्याच बुद्धीमध्ये आहे. तुम्ही जाणता
- बाबा जे ज्ञानाचा सागर आहेत, ते नॉलेज देत आहेत. सागर तर एकच आहे. तुम्ही स्वतःला
सागर म्हणवून घेणार नाही. तुम्ही त्यांचे मदतगार बनता म्हणून तुमचे नाव आहे -
ज्ञान-गंगा. बाकी त्या आहेत पाण्याच्या नद्या. बाबा म्हणतात - मज सागराची तुम्ही
मुले काम-चितेवर बसून जळून खाक झाला आहात अर्थात पतित बनला आहात. आता पुन्हा माझी
आठवण केल्यानेच तुम्ही पावन बनाल. हे सृष्टीचे चक्र ५ हजार वर्षांचे आहे. हे देखील
कोणाला ठाऊक नाहीये. सृष्टीचे चक्र पूर्ण ४ भागांमध्ये आहे. ४ युगे आहेत ना. हे
संगमयुग आहे कल्याणकारी युग. कुंभ म्हणतात ना. कुंभ म्हटले जाते मेळाव्याला. जिथे
नदी येऊन सागराला मिळते. आत्मा येऊन परमात्म्याला मिळते, याला कुंभ म्हणतात. आत्मा
आणि परमात्म्याचा मेळा देखील तुम्ही बघता. तुम्ही आपसात भेटता, सेमिनार करता, याला
कुंभ म्हणणार नाही. सागर तर आपल्या जागेवर बसले आहेत. या तनामध्ये (ब्रह्मा
बाबांच्या तनामध्ये) आहेत ना. जिथे यांचे तन आहे, तिथे ज्ञानाचे सागर आहेत. बाकी
तुम्ही आपसात ज्ञान-गंगा भेटता. नद्या लहान-मोठ्या तर असतात ना. तिथे स्नान
करण्यासाठी जातात. गंगा, यमुना, सरस्वती इत्यादी तर आहेतच. दिल्ली यमुनेचा तीर आहे
- स्वर्ग. दिल्लीसाठी म्हणतात - दिल्ली परिस्तान होते, जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे
राज्य होते. असे नाही की श्रीकृष्णाचे राज्य होते. राधे-कृष्ण युगल असतील तेव्हा
राज्य करू शकतील.
आता तुम्ही मुले किती
आनंदामध्ये आहात. मायेची वादळे तर खूप येतील. बेहदची बॉक्सिंग आहे. प्रत्येकाचे ५
विकारांसोबत युद्ध चालते. आपल्याला वाटते की, बाबांची निरंतर आठवण करावी. माया आपला
योग उडवून टाकते. एक खेळ देखील दाखवतात - परमात्मा आपल्या बाजूला खेचतात, माया
तिच्या बाजूला खेचते. असे एक नाटक बनवले आहे. चित्रपटाची फॅशन आता निघाली आहे.
तुम्हाला ड्रामा अनुसार चित्रपटावरूनच समजावून सांगायचे होते. नाटकामध्ये तर
अदली-बदली होतात. हा तर अनादि अविनाशी ड्रामा, पूर्व-नियोजित आहे. बनी बनाई बन रही...
अमका मेला, इतकाच त्याचा पार्ट होता, आपण चिंता का करावी. ड्रामा आहे ना. शरीर सोडले
मग परत थोडाच येऊ शकतो. रडून तरी काय फायदा? याचे नावच आहे - दुःखधाम. सतयुगामध्ये
मोहजीत राजे असतात. यावर एक कहाणी देखील आहे. सतयुगामध्ये मोहाचा प्रश्नच नसतो. इथे
तर मनुष्यांना किती मोह आहे. कोणाला रडू आले नाही तर स्वतः रडून त्याला सुद्धा
रडवतील. तेव्हा त्यांना वाटते की हे दुःख व्यक्त करत आहेत. नाहीतर मग निंदा होईल.
भारतामध्येच हा सर्व रिवाज आहे. भारतामध्येच सुख, भारतामध्येच खूप दुःख असते.
भारतामध्ये गॉड-गॉडेज राज्य करत होते. परदेशी लोक पुरातन चित्रे (पेंटिंग्ज) खूप
आनंदाने घेतात. जुन्या वस्तूंचा मान असतो. सर्वात जुने ‘शिव’, ते तर इथे आले होते
ना, त्यांची किती पूजा करतात. आता तर शिवबाबा आले आहेत, परंतु तुम्ही पूजा करणार
नाही. ते होऊन गेले आहेत म्हणून त्यांची पूजा करत राहतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ड्रामाचे
ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून निश्चिंत बनायचे आहे. कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही;
कारण जाणता - बनी बनाई बन रही... निर्मोही बनायचे आहे.
२) बाबांद्वारे जेव्हा
बृहस्पतीची दशा बसली आहे, तर स्वतःला सांभाळायचे आहे, जेणेकरून राहूचे ग्रहण लागू
नये. कोणतीही ग्रहचारी असेल तर तिला ज्ञान दानाने समाप्त करायचे आहे.
वरदान:-
स्वतःच्या
टेन्शनवर अटेन्शन देऊन विश्वाचे टेन्शन समाप्त करणारे विश्व कल्याणकारी भव
जेव्हा दुसऱ्यांप्रती
जास्त अटेन्शन देता, तेव्हा आपल्यामध्ये टेन्शन चालते, म्हणून विस्तार करण्या ऐवजी
सार स्वरूपामध्ये स्थित व्हा. क्वांटिटीच्या (जास्तीच्या) संकल्पांना सामावून घेऊन
क्वालिटीवाले (शुद्ध) संकल्प करा. अगोदर आपल्या टेन्शनवर अटेन्शन द्या, तेव्हा
विश्वामध्ये जे अनेक प्रकारचे टेन्शन आहे, त्यांना समाप्त करून विश्व कल्याणकारी बनू
शकाल. पहिले स्वतःला पहा, आपली सेवा फर्स्ट, आपली सेवा कराल तर दुसऱ्यांची सेवा
आपोआपच होईल.
बोधवाक्य:-
‘योग’ची
अनुभूती करायची असेल तर दृढतेच्या शक्तीद्वारे मनाला कंट्रोल करा.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
जितके स्थापनेकरिता
निमित्त बनलेले ज्वाला-रूप असाल, तितकीच विनाश-ज्वाळा प्रत्यक्ष होईल. संघटित
रूपामध्ये ज्वाला-रूपातील आठवण विश्वाच्या विनाशाचे कार्य संपन्न करेल. यासाठी
प्रत्येक सेवाकेंद्रावर विशेष ‘योग’चे प्रोग्राम चालू राहावेत, तेव्हा
विनाश-ज्वाळेला वारा लागेल. योग-अग्नीने विनाशाची अग्नी प्रज्वलित होईल, ज्वाळेने
ज्वाळा प्रज्वलित होईल.