08-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - नेहमी याच आनंदामध्ये रहा की आपण ८४ चे चक्र पूर्ण केले आहे, आता आपल्या
घरी जात आहोत, आणखी काही दिवसांसाठीच हे कर्मभोग आहेत”
प्रश्न:-
विकर्माजीत
बनणाऱ्या मुलांना विकर्मांपासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टीवर खूप लक्ष द्यायचे आहे?
उत्तर:-
सर्व विकर्मांचे मूळ जो देह-अभिमान आहे, त्या देह-अभिमानामध्ये कधीही येऊ नये, यावर
लक्ष ठेवायचे आहे. यासाठी सारखे-सारखे देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे.
चांगले अथवा वाईटाचे फळ जरूर मिळते, शेवटी विवेक (मन) खायला लागतो. परंतु या
जन्मातील पापांच्या ओझ्याला हलके करण्यासाठी बाबांना खरे-खरे ऐकवायचे आहे.
ओम शांती।
मोठ्यात मोठे ध्येय आहे आठवणीचे. खूप जणांना फक्त ऐकण्याची आवड असते. ज्ञानाला समजणे
खूप सोपे आहे. ८४ च्या चक्राला समजायचे आहे, स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. जास्त
काहीच नाही. तुम्ही मुले समजता आपण स्वदर्शन चक्रधारी आहोत. स्वदर्शन चक्राने
कोणाचाही गळा कापत नाही. जसे श्रीकृष्णासाठी दाखवले आहे. आता हे लक्ष्मी-नारायण
विष्णूचीच दोन रूपे आहेत. त्यांना सुदर्शन चक्र आहे काय? मग श्रीकृष्णाला चक्र का
दाखवतात? एक मॅगेझीन निघते, त्यामध्ये श्रीकृष्णाची अशी बरीच चित्रं दाखवतात. बाबा
तर येऊन तुम्हाला राजयोग शिकवतात, चक्राने काही असुरांचा घात करत नाहीत. असुर
त्यांना म्हटले जाते, ज्यांचा आसुरी स्वभाव आहे. बाकी मनुष्य तर मनुष्यच आहेत ना.
असे नाही स्वदर्शन चक्राने सर्वांना मारत बसतील. भक्तीमार्गामध्ये काय-काय चित्रं
बनविली आहेत. रात्रं-दिवसाचा फरक आहे. तुम्हा मुलांनी या सृष्टीचक्राला आणि साऱ्या
ड्रामाला जाणून घ्यायचे आहे कारण सर्व ॲक्टर्स आहेत. ते हदचे ॲक्टर्स तर ड्रामाला
जाणतात. हा आहे बेहदचा ड्रामा. यामध्ये डिटेलमध्ये समजू शकणार नाहीत. तो तर दोन
तासांचा ड्रामा असतो. डिटेलमध्ये पार्टला जाणतात. इथे तर ८४ जन्मांना जाणायचे असते.
बाबांनी समजावून
सांगितले आहे - मी ब्रह्माच्या रथामध्ये प्रवेश करतो. ब्रह्माच्या देखील ८४ जन्मांची
कहाणी असली पाहिजे. मनुष्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी येऊ शकत नाहीत. हे देखील
समजत नाहीत की ८४ लाख आहे का ८४ जन्म आहेत? बाबा म्हणतात तुमच्या ८४ जन्मांची कहाणी
ऐकवितो. ८४ लाख जन्म असतील तर किती वर्ष ऐकवण्यासाठी जातील.(!) तुम्ही तर
सेकंदामध्ये जाणता - ही ८४ जन्मांची कहाणी आहे. आपण ८४ चे चक्र कसे फिरलो, ८४ लाख
असतील तर सेकंदामध्ये थोडेच समजू शकला असता. ८४ लाख जन्मच नाही आहेत. तुम्हा मुलांना
देखील आनंद झाला पाहिजे. आमचे ८४ चे चक्र पूर्ण झाले. आता आपण घरी जातो. आणखी काही
दिवसांसाठी हा कर्मभोग आहे. विकर्म भस्म होऊन कर्मातीत अवस्था कशी होईल, यासाठी ही
युक्ती सांगितली आहे. बाकी समजावून सांगतात या जन्मामध्ये जी काही विकर्म केली आहेत
ती लिहून द्या म्हणजे ओझे हलके होईल. जन्म-जन्मांतरीची विकर्म काही कोणी लिहू शकणार
नाही. विकर्म तर होतच आली आहेत. जेव्हापासून रावण राज्य सुरु झाले आहे तेव्हापासून
कर्म, विकर्म होऊ लागतात. सतयुगामध्ये कर्म अकर्म होतात. भगवानुवाच - तुम्हाला
कर्म-अकर्म-विकर्माच्या गतीला समजावून सांगतो. विकर्माजीतचे संवत लक्ष्मी-नारायणा
पासून सुरु होते. शिडीच्या चित्रामध्ये एकदम क्लिअर आहे. शास्त्रांमध्ये काही या
गोष्टी नाही आहेत. सूर्यवंशी, चंद्रवंशीचे रहस्य देखील तुम्हा मुलांनी समजून घेतले
आहे की आपणच होतो. विराट रूपाचे चित्र देखील खूप बनवतात परंतु अर्थ काहीच समजत
नाहीत. बाबांशिवाय कोणीही समजावून सांगू शकणार नाही. या ब्रह्माच्या वर देखील कोणी
तरी आहे ना, ज्याने शिकवले असेल. जर कोणत्या गुरूने शिकवले असते तर त्या गुरुचा
फक्त एकच शिष्य तर असू शकत नाही. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्हाला पतितापासून पावन,
पावनपासून पतित बनायचेच आहे. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. अनेकदा हे चक्र पार
केले आहे. आणि पार करतच राहणार. तुम्ही आहात ऑलराऊंड पार्टधारी. आदि पासून
अंतापर्यंतचा पार्ट आणखी कोणाचाच नाही. तुम्हालाच बाबा समजावून सांगतात. मग तुम्ही
हे देखील समजता की इतर धर्मवाले अमक्या-अमक्या वेळेवर येतात. तुमचा तर ऑलराऊंड
पार्ट आहे. ख्रिश्चनांसाठी तर म्हणणार नाही की सतयुगामध्ये होते. ते तर द्वापरच्याही
मध्यावर येतात. हे नॉलेज तुम्हा मुलांच्याच बुद्धीमध्ये आहे. कोणाला समजावून देखील
सांगू शकता. इतर कोणीही सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत. रचयित्यालाच जाणत
नाहीत तर रचनेला तरी कसे जाणतील. बाबांनी समजावून सांगितले आहे - रायटियस (नीतिमत्तेच्या)
ज्या गोष्टी आहेत त्या छापून एरोप्लेनमधून सर्व ठिकाणी टाकायच्या आहेत. हे पॉईंट्स
अथवा टॉपिक्स बसून लिहिले पाहिजे. मुले म्हणतात काहीच काम नाहीये. बाबा म्हणतात -
ही सेवा तर पुष्कळ आहे. इथे एकांतामध्ये बसून हे काम करा. ज्यापण मोठ-मोठ्या संस्था
आहेत, गीता पाठशाळा इत्यादी आहेत, त्या सर्वांना जागे करायचे आहे. सर्वांना संदेश
द्यायचा आहे. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जे समजदार असतील ते लगेच समजतील, जरूर
संगमयुगावरच नवीन दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश होतो. सतयुगामध्ये
पुरुषोत्तम मनुष्य असतात. इथे आहेत आसुरी स्वभाव वाले पतित मनुष्य. हे देखील बाबांनी
समजावून सांगितले आहे, कुंभमेळा इत्यादी जो भरतो तिथे पुष्कळ लोक स्नान करण्यासाठी
जातात. का स्नान करण्यासाठी जातात? कारण पावन बनू इच्छितात. तर जिथे-जिथे मनुष्य
स्नान करण्यासाठी जातात तिथे जाऊन सेवा केली पाहिजे. लोकांना समजावून सांगितले
पाहिजे की, हे पाणी काही पतित-पावनी नाहीये. तुमच्याकडे चित्रे देखील आहेत. गीता
पाठशाळांमध्ये जाऊन ही पत्रके वाटली पाहिजेत. मुले सेवेची मागणी करतात. तर हे बसून
लिहा - गीतेचा भगवान परमपिता परमात्मा शिव आहे, ना की श्रीकृष्ण. मग त्यांच्या
बायोग्राफीची महिमा लिहा. शिवबाबांची बायोग्राफी लिहा. मग ते आपणच योग्य तो निर्णय
घेतील. हा पॉईंट देखील लिहायचा आहे की पतित-पावन कोण आहेत? त्यानंतर मग शिव आणि
शंकर यातील फरक देखील दाखवायचा आहे. शिव वेगळे आहेत, शंकर वेगळे आहेत. हे देखील
बाबांनी समजावून सांगितले आहे - कल्प ५००० वर्षांचे आहे. मनुष्य ८४ जन्म घेतात, ना
की ८४ लाख. या मुख्य-मुख्य गोष्टी शॉर्ट मध्ये लिहिल्या पाहिजेत. ज्या छापून
एरोप्लेन मधून देखील खाली टाकू शकता आणि समजावून देखील सांगू शकता. जसे हे गोळ्याचे
चित्र आहे, यामध्ये क्लिअर आहे अमके-अमके धर्म अमक्या-अमक्या वेळी स्थापन होतात. तर
हा गोळा देखील असला पाहिजे म्हणून मुख्य बारा चित्रांची कॅलेंडर्स देखील छापू शकता
ज्यामध्ये सर्व ज्ञान येईल आणि सेवा सहज होऊ शकेल. ही चित्रे खूप गरजेची आहेत. कोणती
चित्रे बनवायची आहेत, काय-काय पॉईंट लिहिले पाहिजेत. ते बसून लिहून काढा.
तुम्ही गुप्तवेषामध्ये
या जुन्या दुनियेचे परिवर्तन करत आहात. अननोन वॉरियर्स (गुप्त योद्धे) आहात.
तुम्हाला कोणीही जाणत नाही. बाबा देखील गुप्त, नॉलेज देखील गुप्त. याचे कोणते
शास्त्र इत्यादी बनत नाही, बाकी धर्मस्थापकांचे बायबल इत्यादी छापले जाते जे
आतापर्यंत वाचत आले आहेत. प्रत्येकाचे छापतात. तुमचे मग भक्ती मार्गामध्ये छापले
जाते. आता काही छापले जाणार नाहीये कारण आता तर ही शास्त्र इत्यादी सर्व नष्ट होणार
आहेत. आता तुम्हाला बुद्धीमध्ये फक्त आठवण करायची आहे. बाबांकडे देखील बुद्धीमध्ये
ज्ञान आहे. कोणते शास्त्र इत्यादी थोडेच वाचतात. ते तर नॉलेजफुल आहेत. नॉलेजफुलचा
अर्थ मग लोकं समजतात - सर्वांच्या मनातील जाणणारे. भगवान बघतात तेव्हाच तर कर्मांचे
फळ देतात. बाबा म्हणतात - याची ड्रामामध्ये नोंद आहे. ड्रामामध्ये जी विकर्म करतात
तर त्याची सजा होत राहते. चांगल्या अथवा वाईट कर्मांचे फळ मिळते. ते काही कुठे
लिहिलेले नाही. मनुष्य समजू शकतात जरूर कर्मांचे फळ दुसऱ्या जन्मामध्ये मिळते.
अंतिम घडीला मग विवेक खूप खातो (मन आतल्या आत खाते). आपण हे-हे पाप केले. सर्व काही
आठवते. जसे कर्म तसा जन्म मिळेल. आता तुम्ही विकर्माजीत बनत आहात तर कोणतेही असे
विकर्म करता कामा नये. मोठ्यात मोठे विकर्म आहे देह-अभिमानी बनणे. बाबा वारंवार
सांगतात - ‘देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करा, पवित्र तर रहायचेच आहे. सर्वात मोठे
पाप आहे काम-कटारी चालविणे. हाच आदि-मध्य-अंत दुःख देणारा आहे म्हणून संन्यासी
देखील म्हणतात - हे सुख कागविष्ठा समान आहे. तिथे दुःखाचे नाव सुद्धा असत नाही. इथे
दुःखच दुःख आहे, म्हणून संन्याशांना वैराग्य येते. परंतु ते जंगलात निघून जातात.
त्यांचे आहे हदचे वैराग्य, तुमचे आहे बेहदचे वैराग्य. ही दुनियाच छी-छी (विकारी) आहे.
सर्वजण म्हणतात - ‘बाबा, येऊन आमचे दुःख हरून सुख द्या’. बाबाच दुःखहर्ता सुखकर्ता
आहेत. तुम्ही मुलेच समजता की नवीन दुनियेमध्ये या देवतांचे राज्य होते. तिथे
कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते. जेव्हा कोणी शरीर सोडते तर मनुष्य म्हणतात -
स्वर्गवासी झाला. परंतु हे थोडेच समजतात की आपण नरकामध्ये आहोत. आपण जेव्हा मरू
तेव्हा स्वर्गामध्ये जाऊ. परंतु तो देखील स्वर्गामध्ये, गेला की इथे नरकामध्ये आला?
काहीच समजत नाही. तुम्ही मुले तीन पित्यांचे रहस्य देखील सर्वांना समजावून सांगू
शकता. दोन पिता तर सर्वांना माहित आहेत लौकिक आणि पारलौकिक आणि मग हे आहेत अलौकिक
प्रजापिता ब्रह्मा इथे संगमयुगावर. ब्राह्मण देखील पाहिजेत ना. ते (या दुनियेतील)
ब्राह्मण काही ब्रह्माची मुखवंशावळी थोडेच आहेत. जाणतात ब्रह्मा होता म्हणून
‘ब्राह्मण देवी-देवताय नमः’ म्हणतात. हे जाणत नाहीत की कोणाला म्हणतात, कोणते
ब्राह्मण? तुम्ही आहात पुरुषोत्तम संगमयुगी ब्राह्मण. ते आहेत कलियुगी. हे आहे
पुरुषोत्तम संगमयुग, जेव्हा तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. देवी-देवता धर्माची
स्थापना होत आहे. तर मुलांनी सर्व पॉईंट्स धारण करायचे आहेत आणि मग सेवा करायची आहे.
पूजा करण्यासाठी किंवा श्राद्ध खाण्यासाठी ब्राह्मण लोक येतात. त्यांच्याशी देखील
तुम्ही चर्चा करू शकता की, आम्ही तुम्हाला खरा ब्राह्मण बनवू शकतो. आता भाद्रपद
महिना येतो, तर सर्वजण पितरांना खाऊ घालतात. ही सेवा देखील युक्तीने केली पाहिजे;
नाहीतर म्हणतील की, ब्रह्माकुमारींकडे जाऊन सर्व काही सोडून दिले. असे काहीही करायचे
नाही, त्यामुळे नाराज होतील. तुम्ही युक्तीने ज्ञान देऊ शकता. जरूर ब्राह्मण लोक
येतील, तेव्हाच तर ज्ञान देतील ना. या महिन्यामध्ये तुम्ही ब्राह्मणांची खूप सेवा
करू शकता. तुम्ही ब्राह्मण तर प्रजापिता ब्रह्माची संतान आहात. सांगा - ब्राह्मण
धर्म कोणी स्थापन केला? तुम्ही घर बसल्या त्यांचे देखील कल्याण करू शकता. जसे
अमरनाथच्या यात्रेवर जातात तर ते फक्त लिखाणावरून इतके समजू शकणार नाहीत. तिथे बसून
समजावून सांगितले पाहिजे - आम्ही तुम्हाला खरी अमरनाथची कहाणी सांगतो. अमरनाथ तर
एकालाच म्हटले जाते. अमरनाथ अर्थात जो अमरपुरी स्थापन करतो. ते आहे सतयुग. अशी सेवा
केली पाहिजे. इथे पायी जावे लागते. ज्या चांगल्या -चांगल्या मोठ्या-मोठ्या व्यक्ती
आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना समजावून सांगितले पाहिजे. संन्याशांना देखील तुम्ही
ज्ञान देऊ शकता. तुम्ही साऱ्या सृष्टीचे कल्याणकारी आहात. आम्ही श्रीमतावर विश्वाचे
कल्याण करत आहोत - बुद्धीमध्ये हा नशा राहिला पाहिजे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जेव्हा
एकांत मिळतो किंवा फुरसत मिळते तेव्हा ज्ञानाच्या चांगल्या-चांगल्या पॉईंट्सवर
विचार सागर मंथन करून लिहायचे आहे. सर्वांपर्यंत संदेश पोहोचविण्याची किंवा सर्वांचे
कल्याण करण्याची युक्ती शोधायची आहे.
२) विकर्मांपासून
वाचण्यासाठी देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे. आता कोणतेही विकर्म करायचे
नाही, या जन्मामध्ये केलेली विकर्म जी आहेत ती बापदादांना खरी-खरी सांगायची आहेत.
वरदान:-
अटळ भावीला
जाणत असताना देखील श्रेष्ठ कार्याला प्रत्यक्ष रूप देणारे सदा समर्थ भव
नवीन श्रेष्ठ विश्व
बनण्याची भावी अटळ असताना देखील ‘समर्थ भव’ ची वरदानी मुले फक्त कर्म आणि फळाच्या,
पुरुषार्थ आणि प्रारब्धाच्या, निमित्त आणि निर्माणच्या कर्म फिलॉसॉफी अनुसार
निमित्त बनून कार्य करतात. दुनियावाल्यांना आशा दिसत नाही. आणि तुम्ही म्हणता हे
कार्य अनेकदा झालेले आहे, आता देखील झाल्यातच जमा आहे कारण स्व-परिवर्तनाच्या
प्रत्यक्ष प्रमाणासमोर अजून कोणत्या प्रमाणाची आवश्यकताच नाही. त्याच सोबत परमात्म
कार्य सदैव सफल होतेच. भावी
बोधवाक्य:-
बोलणे कमी,
करणे जास्त - हेच श्रेष्ठ लक्ष्य महान बनवेल.
अव्यक्त इशारे:-
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना.
सेवेमध्ये किंवा
स्वतःच्या चढत्या कलेमध्ये सफलतेचा मुख्य आधार आहे - एका बाबांवर अतूट प्रेम.
बाबांशिवाय आणखी काहीही दिसू नये. संकल्पामध्ये देखील बाबा, बोलमध्ये देखील बाबा,
कर्मामध्ये देखील बाबांची सोबत, अशा लवलीन स्थितीमध्ये राहून एक शब्द जरी बोलाल तर
ते स्नेहाचे बोल दुसऱ्या आत्म्याला देखील स्नेहा मध्ये बांधतील. अशा लवलीन आत्म्याचा
एक ‘बाबा’ शब्दच जादू-मंत्राचे काम करेल.