08-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, तुमचे
आता ईश्वरीय न्यू ब्लड आहे, तुम्ही खूप मस्तीमध्ये (आत्मिक उत्साहामध्ये) भाषण केले
पाहिजे; नशा असावा की शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत”
प्रश्न:-
तुम्हाला
तुमच्या एम ऑब्जेक्टचा नशा स्थायी टिकून राहावा, त्यासाठी कोणती युक्ती वापराल?
उत्तर:-
आपला राजाई
पासपोर्ट काढून ठेवा. खाली साधारण चित्र, वर राजाई पोशाखाने सजवलेले चित्र आणि
त्याच्यावर शिवबाबा, अर्थात मग एम ऑब्जेक्टची स्मृती सहज राहील. पॉकेटमध्ये हा
पासपोर्ट ठेवलेला असावा. जेव्हा कधी मायेची वादळे येतील तेव्हा विचार चालेल की आता
आपला हा पासपोर्ट तर कॅन्सल होईल. आपण स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही.
गीत:-
रात के राही
थक मत जाना…
ओम शांती।
मुलांना तर या
गाण्याचा अर्थ समजला आहे. आता भक्तिमार्गाची घोर अंधाराची रात्र संपली आहे. मुले
जाणतात की, आता आमच्याजवळ काळ येऊ शकत नाही. इथे बसलो आहोत, आमचे एम ऑब्जेक्ट आहे
मनुष्यापासून देवता बनण्याचे. जसे संन्यासी लोक म्हणतात - तुम्ही स्वतःला म्हैस समजा
तर ते रूप व्हाल. ते आहेत भक्तिमार्गाचे दृष्टांत. जसे हा देखील एक दृष्टांत आहे ना
की रामाने वानरांची सेना घेतली आणि रावणावर विजय मिळवला. तुम्ही इथे बसला आहात,
जाणता - आपण तेच देवी-देवता डबल सिरताज बनणार आहोत. जसे शाळेमध्ये शिकतात तर
म्हणतात की, मी हे शिकून डॉक्टर बनेन, इंजिनिअर बनेन. तुम्ही जाणता आपण या शिक्षणाने
सो देवी-देवता बनत आहोत. हे शरीर सोडणार आणि आमच्या डोक्यावर ताज असेल. ही तर खूप
छी-छी (घाणेरडी) दुनिया आहे. नवीन दुनिया आहे फर्स्टक्लास दुनिया. जुनी दुनिया आहे
अगदी थर्डक्लास. ही दुनिया तर खलास होणार आहे. आम्हाला विश्वाचा मालक बनविणारा जरूर
विश्वाचा रचयिताच असेल, दुसरा कोणीही शिकवू शकणार नाही. शिवबाबाच आम्हाला शिकवून
राजयोग शिकवतात. बाबांनी समजावून सांगितले आहे की आत्म-अभिमानी बना. आत्म-अभिमानी
बनण्यातच मेहनत आहे. पूर्ण आत्म-अभिमानी बनले तर अजून काय हवे. तुम्ही ब्राह्मण तर
आहातच, जाणता आपण देवता बनत आहोत. नशा राहतो - मी हा बनत आहे. अगोदर आम्ही कलियुग
नरकामध्ये पतित होतो. असुर आणि देवता यांच्यामध्ये किती फरक आहे. देवता किती पवित्र
आहेत. इथे किती पतित मनुष्य आहेत. चेहरा जरी मनुष्याचा आहे, परंतु आचरण बघा कसे आहे.
जे देवतांचे पुजारी आहेत ते स्वतः देखील त्यांच्यासमोर महिमा गातात. तुम्ही सर्वगुण
संपन्न... आमच्यात कोणताही गुण नाही. आता तुम्ही परिवर्तित होऊन देवता बनाल.
श्रीकृष्णाची पूजा करतातच यासाठी की आपण कृष्णपुरी मध्ये जावे. परंतु हेच ठाऊक नाही
की कधी जाणार. भक्ती करत राहतात की भगवान येऊन फळ देतील. भक्तीचे फळ आहे - सद्गती.
तर हे आहे शिक्षण. पहिला तर हा निश्चय हवा की, आम्हाला शिकवत कोण आहेत. हे आहेत श्री
श्री… तुम्ही मुले जाणता - बाबा आम्हाला श्रीमत देत आहेत. ज्यांना हे माहितच नाही,
ते श्रेष्ठ कसे बनू शकतील. आजकाल तर एकमेकांना भ्रष्ट बनवण्याचे मत देतात (सल्ला
देतात). भ्रष्ट मत आहे आसुरी मत. इतके सर्व ब्राह्मण श्री श्री शिवबाबांच्या मतावर
चालत आहेत. परमात्माच्या मताद्वारेच श्रेष्ठ बनतात. ज्यांच्या नशिबामध्ये असेल
त्यांच्याच बुद्धीमध्ये बसेल. नाहीतर काहीही समजणार नाहीत. जेव्हा समजतील तेव्हा
स्वतःच मदत करू लागतील. कित्येकांना तर माहितच नाहीये की हे कोण आहेत, म्हणून बाबा
कोणालाही भेटत सुद्धा नाहीत. ते तर आणखीनच आपले आसुरी मत शोधून काढतील. आता सर्वजण
मानवी मतावरच चालत आहेत. श्रीमताला न जाणल्याकारणाने ब्रह्मा बाबांना देखील आपले मत
देऊ लागतात. आता बाबा आलेच आहेत तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनविण्याकरिता.
आता मुले म्हणतात -
बाबा, ५ हजार वर्षांपूर्वीप्रमाणेच आम्ही तुम्हाला भेटलो आहोत. ज्यांना माहितच नाही,
ते असा प्रतिसाद देऊ शकणार नाहीत. मुलांना शिक्षणाचा खूप नशा असायला हवा. हे खूप
उच्च शिक्षण आहे. परंतु माया देखील खूप अगेन्स्ट आहे (विरोधात आहे). तुम्ही जाणता
आपण ते शिक्षण शिकत आहोत, ज्याद्वारे आमच्या मस्तकावर डबल ताज असणार आहे. आम्ही
भविष्य जन्म-जन्मांतर डबल ताजधारी बनणार. तर त्यासाठी मग असा पुरुषार्थ केला पाहिजे.
याला म्हटले जाते - राजयोग. किती वंडर आहे. बाबा नेहमी सांगतात, लक्ष्मी-नारायणाच्या
मंदिरामध्ये जा. पुजाऱ्याला देखील तुम्ही समजावून सांगू शकता. त्यांना विचारा की,
लक्ष्मी-नारायणाला हे पद कसे मिळाले? हे विश्वाचे मालक कसे बनले? अशाप्रकारे कोणाला
बसून जर ऐकवाल तर पुजाऱ्याचे देखील कल्याण होईल. तुम्ही म्हणू शकता की, या
लक्ष्मी-नारायणाला राज्य कसे मिळाले ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. गीतेमध्ये
देखील भगवानुवाच आहे ना की, मी तुम्हाला राजयोग शिकवून राजांचाही राजा बनवतो. तर
मुलांना किती नशा असायला हवा; की, आपण असे बनत आहोत. पाहिजे तर स्वतःचे चित्र आणि
राजाईचे चित्र देखील सोबत काढा. खाली तुमचे चित्र, वरती राजाईचे चित्र असावे,
यामध्ये खर्च तर काहीच नाही. राजाई पोशाख तर लगेच बनू शकतो. तो आपल्याजवळ ठेवून द्या
अर्थात घडोघडी आठवण येत राहील. आपणच देवता बनत आहोत. वरच्या बाजूला भले शिवबाबा
असावेत. अशी ही सर्व चित्रे काढावी लागतील. आम्ही मनुष्यापासून देवता बनत आहोत. हे
शरीर सोडून आम्ही जाऊन देवता बनू, कारण आता हा राजयोग शिकत आहोत. तर हे फोटो मदत
करतील. वरती शिव, मग राजाईचे चित्र, आणि खाली तुमचे साधारण चित्र. शिवबाबांकडून
आम्ही राजयोग शिकून डबल मुकुटधारी देवता बनत आहोत. चित्र ठेवलेले असेल, कोणीही
विचारले तर तुम्ही सांगू शकाल. आम्हाला शिकविणारे हे शिवबाबा आहेत. चित्र पाहून
मुलांना नशा चढेल. हवे तर दुकानामध्ये देखील हे चित्र ठेवून द्या. भक्तिमार्गामध्ये
बाबा नारायण यांचे चित्र ठेवत असत. पॉकेटमध्ये सुद्धा असायचे. तुम्ही देखील आपला
फोटो ठेवून द्या, अर्थात आठवण राहील की आपण सो देवी-देवता बनत आहोत. बाबांची आठवण
करण्याचा उपाय शोधला पाहिजे. बाबांची आठवण विसरल्यामुळेच खाली पडतात (पतित होतात).
विकारामध्ये पडाल तर मग लाज वाटेल की आता तर आपण असे देवता बनू शकत नाही. हार्ट फेल
होईल की आपण आता देवता कसे बनणार. बाबा म्हणतात - विकारामध्ये जाणाऱ्याचा फोटो काढा.
बोला, तू स्वर्गामध्ये जाण्याच्या लायक नाहीस. तुझा पासपोर्ट खलास. स्वतः देखील फील
करतील - आपण तर घसरलो! आता स्वर्गामध्ये कसे जाणार. जसे बाबा नारदाचे उदाहरण देतात
- त्याला सांगितले की, ‘आपले तोंड तर बघ, लक्ष्मीला वरण्या लायक आहेस?’ तर चेहरा
माकडासारखा दिसला; तशी मनुष्यानाही लाज वाटेल - आपल्यामध्ये तर हे विकार आहेत मग
श्री लक्ष्मी-नारायणाला कसे वरू शकतो. बाबा युक्त्या तर खूप सांगतात. परंतु कोणी
विश्वास सुद्धा ठेवायला हवा ना. विकाराचा नशा चढतो तेव्हा समजतात की, या हिशोबाने
आपण राजांचाही राजा डबल ताजधारी कसे काय बनू शकणार. पुरुषार्थ तर केला पाहिजे ना.
बाबा समजावून सांगतात की अशा काही सुंदर युक्त्या शोधा आणि सर्वांना सांगत राहा. या
राजयोगाद्वारे स्थापना होत आहे. आता विनाश समोर उभा आहे. दिवसेंदिवस वादळांचा जोर
वाढत जाईल. बॉम्ब्स इत्यादी सुद्धा तयार होत आहेत.
तुम्ही मुले हे
शिक्षण शिकतच आहात उच्च पद प्राप्त करण्याकरिता. तुम्ही एकदाच पतितापासून पावन बनता.
मनुष्य समजतात थोडेच की आपण नरकवासी आहोत कारण पत्थर-बुद्धी आहेत. आता तुम्ही
पत्थर-बुद्धी पासून पारस-बुद्धी बनत आहात. नशिबात असेल तर लगेच समजतील. नाहीतर
कितीही डोके फोडा, बुद्धीमध्ये बसणारच नाही. बाबांनाच जाणत नाहीत तर नास्तिक आहेत
अर्थात अनाथ आहेत. शिवबाबांची मुले आहेत तर धनीचे (मालकाचे) बनले पाहिजे. इथे
ज्यांना ज्ञान आहे ते आपल्या मुलांना विकारापासून वाचवत राहतील. अज्ञानी लोक तर
आपल्यासारखेच मुलांना देखील विकारामध्ये अडकवत राहतील. तुम्ही जाणता इथे
विकारांपासून वाचवले जाते. कन्यांना तर आधी वाचवले पाहिजे. आई-वडील तर जणू विकारात
ढकलून देतात. तुम्ही जाणता की ही भ्रष्टाचारी दुनिया आहे. श्रेष्ठाचारी दुनिया तर
सर्वांना हवी आहे परंतु ती कोण बनवणार? भगवानुवाच - मी या साधू-संतांचा देखील
उद्धार करतो. गीतेमध्ये देखील लिहिले आहे की भगवंतालाच सर्वांचा उद्धार करायचा आहे.
एकच भगवान पिता येऊन सर्वांचा उद्धार करतात. या वेळी जर समजले की खरोखर गीतेचा
भगवान शिव आहेत तर माहित नाही काय होईल! परंतु अजून थोडा वेळ आहे. नाहीतर सर्वांचे
अड्डे एकदम हालू लागतील. सिंहासन हलतात ना. युद्ध जेव्हा सुरू होते तेव्हा समजते की
यांचे सिंहासन हालू लागले आहे, आता कोसळणार. आता हे हलले तर खळबळ माजेल. पुढे जाऊन
हे होणार आहे. तर भाषणामध्ये देखील तुम्ही समजावून सांगू शकता. जे संस्कृत चांगल्या
प्रकारे जाणतात ते श्लोक ऐकवू शकतात. पतित-पावन, सर्वांचे सद्गति दाता स्वतः
म्हणतात, खरोखर ब्रह्माच्या तनाद्वारे स्थापना करत आहेत. सर्वांची सद्गती म्हणजेच
उद्धार करत आहेत. भाषण करण्यासाठी खूप उत्साह हवा. कन्यांचे न्यू ब्लड आहे. ज्ञानाचा
दगड मारू शकतात. स्टुडंटचे न्यू ब्लड असते ना, तर खूप दंगल करतात. दगड मारतात.
यामध्ये ते हुशार असतात. आता हे देखील तुमचे न्यू ब्लड आहे. तुम्ही जाणता ते किती
नुकसान करत आहेत. तुमचे हे ईश्वरीय न्यू ब्लड आहे. तुम्ही जुन्यापासून नवीन बनत
आहात. तुमची आत्मा जी जुनी आयर्न एज्ड बनली आहे, ती आता नवीन गोल्डन एज्ड बनत आहे.
तर मुलांना खूप आवड असायला हवी. नशा कायम ठेवला पाहिजे. आपल्या हमजीन्सना जागे केले
पाहिजे. गायले देखील जाते - गुरु माता. माता, गुरु कधी होते ते तुम्ही जाणता.
गुरूंचा सिलसिला आता चालतो. मातांवर बाबा येऊन ज्ञान अमृताचा कलश ठेवतात. सुरुवात
देखील अशीच होते. सेंटर्ससाठी देखील म्हणतात ब्राह्मणी हवी. बाबा तर म्हणतात -
स्वतःच चालवा. हिंमत नाही का, नाही बाबा, माता हवी. हे देखील ठीक आहे, मान देतात.
आजकाल दुनियेमध्ये एकमेकांना लंगडा मान देतात. स्थायी मान कोणालाच मिळत नाही. या
वेळी तुम्हा मुलांना स्थायी राज्य-भाग्य मिळत आहे. तुम्हाला बाबा कितीतरी प्रकारे
समजावून सांगतात.
स्वतःला सदैव
हर्षितमुख ठेवण्यासाठी खूप चांगल्या-चांगल्या युक्त्या बाबा सांगतात. शुभ भावना
ठेवली पाहिजे. ओहो! आम्ही असे लक्ष्मी-नारायण बनतो. जर कोणाच्या नशिबामध्ये नसेल तर
तदबीर (पुरुषार्थ) काय करणार. बाबा तर पुरुषार्थ सांगतात, पुरुषार्थ कधी व्यर्थ जात
नाही. हा तर सदा सफल होतो. राजधानी स्थापन होईल. विनाश देखील महाभारी महाभारत लढाई
द्वारे होणार आहे. पुढे जाऊन तुम्ही देखील जोर धराल तेव्हा हे सर्व येतील. आता
समजणार नाहीत, नाहीतर त्यांची राजाई उडून जाईल. तुमच्याकडे चित्रे खूप चांगली आहेत.
ही आहे सद्गती अर्थात सुखधाम. हे आहे मुक्तिधाम. बुद्धी देखील सांगते की आपण सर्व
आत्मे निर्वाणधामामध्ये राहतो. जिथून मग टॉकीधाम मध्ये येतो. आपण आत्मे तिथले
राहणारे आहोत. हा खेळच भारतावर बनलेला आहे. शिवजयंती देखील इथेच साजरी करतात. बाबा
म्हणतात - मी आलो आहे, कल्पानंतर पुन्हा येईन. भारतच पॅराडाईज आहे. म्हणतात देखील -
क्राईस्टच्या इतक्या वर्षांपूर्वी पॅराडाईज होता. आता नाहीये, पुन्हा होणार आहे. तर
जरूर नरकवासीयांचा विनाश, स्वर्गवासीयांची स्थापना हवी. ते तर तुम्ही स्वर्गवासी
बनत आहात, नरकाचा विनाश होईल. ही देखील समज हवी. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
प्रत्येकाप्रती शुभ भावना ठेवायची आहे. सर्वांना खरा मान द्यायचा आहे. सतयुगी
राजधानीमध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे.
२) आत्म-अभिमानी
बनण्याची मेहनत करायची आहे. मानव मत सोडून एकाच्या श्रीमतावर चालायचे आहे.
अभ्यासाच्या नशेमध्ये राहायचे आहे.
वरदान:-
सर्व
आत्म्यांचे पतित संकल्प अथवा वृत्तींना भस्म करणारे मास्टर ज्ञानसूर्य भव
ज्याप्रमाणे सूर्य
आपल्या किरणांनी कचरा, घाणीतील जंतू भस्म करून टाकतो, तसे जेव्हा तुम्ही मास्टर
ज्ञानसूर्य बनून कोणत्याही पतित आत्म्याला पाहाल तर त्यांचा पतित संकल्प, पतित
वृत्ती अथवा दृष्टी भस्म होईल. पतित-पावनी आत्म्यावर पतित संकल्प वार करू शकत नाही.
पतित आत्मे पतित-पावनींवर बलिहार जातील. यासाठी सदैव माईट हाउस अर्थात मास्टर
ज्ञानसूर्य स्थितीमध्ये स्थित राहा.
बोधवाक्य:-
आपल्या धारणा
स्वरूपा द्वारे योगी जीवनाचा प्रभाव टाकणे - ही खूप मोठी सेवा आहे.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
जसे गायन आहे की
भाग्यविधाता बाबांनी ब्रह्मा द्वारे भाग्य वाटले, तर जे ब्रह्माचे काम, तेच
ब्राह्मणांचे काम. दुनियेतील लोक कपडे वाटतील, धान्य वाटतील, पाणी वाटतील परंतु
श्रेष्ठ भाग्य तर तुम्ही भाग्यविधात्याची मुलेच वाटू शकता. ज्याला भाग्य प्राप्त
होईल त्याला सर्व काही प्राप्त होते, म्हणून भाग्य वाटण्यामध्ये दिलदार बना.