08-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जोपर्यंत जगायचे आहे बाबांची आठवण करायची आहे, आठवणीनेच आयु वाढेल, शिक्षणाचे सारच आहे - आठवण”

प्रश्न:-
तुम्हा मुलांचे अतींद्रिय सुख गायले गेले आहे, ते का?

उत्तर:-
कारण तुम्ही नेहमीच बाबांच्या आठवणीमध्ये आनंद साजरा करता, आता तुमचा कायमचाच ख्रिसमस आहे. तुम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत, यापेक्षा जास्त आनंद अजून कोणता असेल, हा दररोजचा आनंद आहे म्हणून तुमचेच अतींद्रिय सुख गायले गेले आहे.

गीत:-
नयन हीन को राह दिखाओ प्रभू…

ओम शांती।
ज्ञानाचा तिसरा नेत्र देणारे रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. ज्ञानाचा तिसरा नेत्र बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. तर आता मुलांना ज्ञानाचा नेत्र मिळाला आहे. आता बाबांनी समजावून सांगितले आहे की, भक्तीमार्ग आहेच मुळी काळोखा मार्ग. जसे रात्रीचा उजेड नसतो तर मनुष्य धक्के खात राहतात. गायले देखील जाते ब्रह्माची रात्र, ब्रह्माचा दिवस. सतयुगामध्ये असे म्हणणार नाही की आम्हाला रस्ता दाखवा कारण आता तुम्हाला मार्ग मिळत आहे. बाबा येऊन मुक्तिधाम आणि जीवन-मुक्तीधामचा रस्ता सांगत आहेत. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात. आता जाणता की बाकी थोडा वेळ आहे, दुनिया तर बदलणार आहे. ही तर गाणी देखील बनलेली आहेत - ‘दुनिया बदलने वाली है…’ परंतु मनुष्य बिचारे जाणत नाहीत की दुनिया केव्हा बदलणार आहे, कशी बदलणार आहे, कोण बदलतात कारण ज्ञानाचा तिसरा नेत्र काही नाही आहे. आता तुम्हा मुलांना हा तिसरा नेत्र मिळाला आहे ज्या द्वारे तुम्ही या सृष्टी चक्राच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. आणि हेच तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचे सॅक्रिन आहे. जशी चिमूटभर सॅक्रिन सुद्धा खूप गोड असते तसे ज्ञानाचे दोन शब्द ‘मनमनाभव…’ हीच सर्वात मोठी गोष्ट आहे, बस्स, बाबांची आठवण करा.

बाबा येतात आणि येऊन रस्ता सांगतात. कुठला रस्ता दाखवतात? शांतीधाम आणि सुखधामचा. तर मुलांना खूप आनंद होतो. दुनिया जाणत नाही की आनंद केव्हा साजरा केला जातो? आनंद तर नवीन दुनियेमध्ये साजरा केला जाणार ना. ही तर अगदी कॉमन गोष्ट आहे की जुन्या दुनियेमध्ये आनंद येणार कुठून? जुन्या दुनियेमध्ये मनुष्य त्राही-त्राही करत आहेत कारण तमोप्रधान आहेत. तमोप्रधान दुनियेमध्ये आनंद कुठून येणार? सतयुगाचे ज्ञान तर कोणालाच नाहीये, म्हणून बिचारे इथे आनंद साजरा करत राहतात. बघा, ख्रिसमसच्या वेळी देखील किती आनंद साजरा करतात. बाबा तर म्हणतात की जर आनंदाच्या गोष्टी विचारायच्या असतील तर गोप-गोपींना (माझ्या मुलांना) विचारा कारण बाबा खूप सोपा मार्ग सांगत आहेत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना, आपल्या काम-धंद्याचे कर्तव्य पार पाडत असताना कमलपुष्प समान रहा आणि माझी आठवण करा. जसे आशिक-माशुक असतात ना, ते देखील काम-धंदा करत असताना एकमेकांची आठवण करत असतात. त्यांना साक्षात्कार देखील होतात; जसे लैला-मजनू, हीर-रांझा ते विकारासाठी एकमेकांचे आशिक होत नाहीत. त्यांच्या प्रेमाचे गायन केले गेले आहे. त्यामध्ये एकमेकांचे आशिक होतात. परंतु इथे ती गोष्ट नाहीये. इथे तर तुम्ही जन्म-जन्मांतर त्या माशुकचे आशिकच असता. ते माशुक (शिवबाबा) तुमचे आशिक नाहीत. तुम्ही त्यांना इथे येण्यासाठी बोलावता - ‘ओ भगवान, नयन हीन असणाऱ्यांना येऊन रस्ता दाखवा’. तुम्ही अर्धे कल्प बोलावत आले आहात. जेव्हा दुःख वाढते तेव्हा जास्त बोलावता. जास्त दुःखामध्ये जास्त आठवण करणारे देखील असतात. बघा, आता आठवण करणारे किती असंख्य आहेत. गायले गेले आहे ना - ‘दुःख में सिमरण सब करें…’ जितका जास्त काळ लोटतो, तितके अधिकच तमोप्रधान बनत जातात. तर तुम्ही चढत आहात, ते आणखीनच उतरत आहेत कारण विनाश होत नाही तोपर्यंत तमोप्रधानता वाढतच जाते. दिवसेंदिवस माया देखील तमोप्रधान, वृद्धिंगत होत जाते. यावेळी बाबा देखील सर्वशक्तिमान आहेत, तर मग माया देखील यावेळी सर्वशक्तिमान आहे. ती देखील जबरदस्त आहे.

तुम्ही मुले यावेळी ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मण कुलभूषण आहात. तुमचे आहे सर्वोत्तम कूळ, याला म्हटले जाते उच्च ते उच्च कूळ. यावेळी तुमचे हे जीवन अमूल्य आहे म्हणून या जीवनाला (शरीराला) जपायचे देखील आहे कारण ५ विकारांमुळे शरीराचे देखील आयुर्मान तर कमी होत जाते ना. तर बाबा म्हणतात - आता यावेळी ५ विकारांना सोडून योगामध्ये रहा तर आयुष्य वाढत राहील. आयुष्य वाढत-वाढत भविष्यामध्ये तुमचे आयुष्य दीडशे वर्षांचे होईल, आत्ता नाही; म्हणून बाबा म्हणतात की, या शरीराची देखील खूप काळजी घेतली पाहिजे. नाहीतर म्हणतात - हे शरीर काही कामाचे नाही, मातीचा पुतळा आहे. आता तुम्हा मुलांना समज मिळाली आहे की जोपर्यंत जगायचे आहे बाबांची आठवण करायची आहे. आत्मा बाबांची आठवण करते - का? वारशासाठी. बाबा म्हणतात - तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा आणि दैवी गुण धारण करा तेव्हा मग तुम्ही असे बनाल. तर मुलांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. अभ्यासामध्ये आळस इत्यादी करता कामा नये नाहीतर नापास व्हाल. खूप कमी दर्जाचे पद मिळेल. अभ्यासामध्ये देखील मुख्य गोष्ट ही आहे ज्याला तंत (सार) म्हटले जाते ती आहे - बाबांची आठवण करा. जेव्हा प्रदर्शनीमध्ये किंवा सेंटरवर कोणीही येतात तर त्यांना सर्वप्रथम हे समजावून सांगा की बाबांची आठवण करा कारण ते सर्वश्रेष्ठ आहेत. तर सर्वश्रेष्ठ असणाऱ्याचीच आठवण केली पाहिजे, त्यांच्यापेक्षा कमी असलेल्याची थोडीच आठवण केली पाहिजे. म्हणतात देखील - उच्च ते उच्च भगवान. भगवंतच तर नवीन दुनियेची स्थापना करणारे आहेत. बघा, बाबा देखील म्हणतात - नवीन दुनियेची स्थापना मी करतो म्हणून तुम्ही माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. तर हे पक्के लक्षात ठेवा कारण बाबा पतित-पावन आहेत ना. ते हेच सांगतात की, जेव्हा तुम्ही मला पतित-पावन म्हणता तर तुम्ही तमोप्रधान आहात, खूप पतित आहात, आता तुम्ही पावन बना.

बाबा येऊन मुलांना समजावून सांगतात की तुमचे आता सुखाचे दिवस येणार आहेत, दुःखाचे दिवस पूर्ण झाले, बोलावता देखील - हे दु:ख-हर्ता, सुख-दाता. तर जाणता ना की खरोखर सतयुगामध्ये सर्वजण सुखीच सुखी आहेत. तर बाबा मुलांना म्हणतात की, सर्वांनी शांतीधाम आणि सुखधामची आठवण करत रहा. हे आहे संगमयुग, खिवैया (नावाडी) तुम्हाला पलीकडे घेऊन जातात. बाकी यामध्ये खिवैया अथवा नावेची काही गोष्ट नाहीये. ही तर महिमा करतात की नावेला पार (पलीकडे) घेऊन जा. आता एकाचीच काही नाव तर पलीकडे न्यायची नाहीये. सर्व दुनियेच्या नावेला पार करायचे आहे. ही सर्व दुनिया जणूकाही एक खूप मोठे जहाज आहे याला पार करतात. तर तुम्हा मुलांना खूप आनंद साजरा केला पाहिजे कारण तुमच्यासाठी सदैव आनंद आहे, सदैव ख्रिसमस आहे. जेव्हापासून तुम्हा मुलांना बाबा मिळाले आहेत तुमचा सदैव ख्रिसमस आहे म्हणून अतींद्रिय सुख गायले गेले आहे. बघा, हे सदैव खुश राहतात, का? अरे बेहदचे बाबा मिळाले आहेत! ते आपल्याला शिकवत आहेत. तर हा रोजच आनंद झाला पाहिजे ना. बेहदचे बाबा शिकवत आहेत वाह! कधी कोणी ऐकले आहे? गीतेमध्ये देखील भगवानुवाच आहे की मी तुम्हाला राजयोग शिकवतो, जसे ते लोक बॅरिस्टरी योग, सर्जरी योग शिकवतात, मी तुम्हा रूहानी मुलांना राजयोग शिकवतो. तुम्ही इथे येता तर बरोबर राजयोग शिकण्यासाठी येता ना. गोंधळून जाण्याची काही गरज नाही. तर राजयोग शिकून पूर्ण केला पाहिजे ना. भागन्ती तरी होता कामा नये. शिकायचे देखील आहे तर धारणा देखील चांगली करायची आहे. टीचर शिकवतात धारणा करण्यासाठी.

प्रत्येकाला आपापली बुद्धी असते - कोणाची उत्तम, कोणाची मध्यम, कोणाची कनिष्ठ. तर स्वतःला विचारले पाहिजे की, मी उत्तम आहे, मध्यम आहे का कनिष्ठ आहे? स्वतःला स्वतःच पारखायचे आहे की मी अशी उच्च ते उच्च परीक्षा पास करून उच्च पद मिळवण्याच्या लायक आहे का? मी सेवा करतो का? बाबा म्हणतात - ‘मुलांनो, सेवाभावी बना, बाबांना फॉलो करा कारण मी देखील सेवा करतो ना. आलोच आहे सेवा करण्यासाठी आणि दररोज सेवा करतो कारण रथ सुद्धा घेतला आहे ना. रथ (ब्रह्मा बाबांचे तन) देखील मजबूत, चांगला आहे आणि सेवा तर यांची सदैव चालते आहे. बाप-दादा तर यांच्या रथामध्ये सदैव आहेत. भले यांचे शरीर आजारी पडले, तरी मी तर बसलो आहे ना. तर मी यांच्यामध्ये बसून लिहितो देखील, जर हे (ब्रह्मा बाबा) मुखाने बोलू जरी शकले नाहीत तरी मी लिहू शकतो. मुरली मिस होत नाही. जोपर्यंत बसू शकतात, लिहू शकतात, तर मी मुरली देखील सांगतो, मुलांना लिहून पाठवतो कारण सर्विसेबल (सेवाभावी) आहे ना. तर बाबा येऊन समजावून सांगतात की, तुम्ही स्वतःला आत्मा समजून निश्चय-बुद्धी बनून सेवेला लागा. बाबांची सर्विस, ऑन गॉड फादरली सर्विस. जसे ते (दुनियावाले) लिहितात - ‘ऑन हीज मॅजेस्टी सर्विस’. तर तुम्ही काय म्हणणार? या मॅजेस्टी पेक्षाही उच्च सेवा आहे कारण मॅजेस्टी (महाराजा) बनवतात. हे देखील तुम्ही समजू शकता की, खरोखर आपण विश्वाचे मालक बनतो.

तुम्हा मुलांमध्ये जे चांगल्या रीतीने पुरुषार्थ करतात त्यांनाच महावीर म्हटले जाते. तर हे चेक करायचे असते की, कोण महावीर आहेत जे बाबांच्या डायरेक्शन प्रमाणे चालतात. बाबा समजावून सांगतात की मुलांनो, स्वतःला आत्मा समजा, भावा-भावाच्या दृष्टीने बघा. बाबा स्वतःला भावांचे पिता समजतात आणि भावांनाच बघतात. सर्वांना तर बघणार नाहीत. याचे तर ज्ञान आहे की शरीराशिवाय काही कोणी ऐकू शकणार नाही, बोलू शकणार नाही. तुम्ही तर जाणता ना की मी देखील इथे शरीरामध्ये आलो आहे. मी हे शरीर लोनवर घेतले आहे. शरीर तर सर्वांना आहे, शरीरासोबतच आत्मा इथे शिकत आहे. तर आता आत्म्यांना समजले पाहिजे की, बाबा आम्हाला शिकवत आहेत. बाबांची बैठक कुठे आहे? अकाल तख्तावर. बाबांनी समजावून सांगितले आहे की, प्रत्येक आत्मा अकाल मूर्त आहे, तिचा कधी विनाश होत नाही, कधीही जळत नाही, कापली जात नाही, बुडत नाही. लहान-मोठी होत नाही. शरीर लहान-मोठे होते. तर दुनियेमध्ये जे पण मनुष्यमात्र आहेत, त्यांच्यामध्ये जी आत्मा आहे तिचे तख्त हे भृकुटी आहे. शरीरे वेगवेगळी आहेत. कोणाचे अकाल तख्त पुरुषाचे, कोणाचे स्त्रीचे, कोणाचे लहान मुलाचे. तर केव्हा पण कोणाशी बोलाल तर हेच समजा की आपण आत्मा आहोत, आपल्या भावासोबत बोलत आहोत. बाबांचा संदेश देतो की, शिवबाबांची आठवण करा तर हा जो गंज चढला आहे तो निघून जाईल. जसे सोन्यामध्ये खाद पडते तर व्हॅल्यू कमी होते; तर तुमची देखील व्हॅल्यू कमी झाली आहे. आता पूर्णपणे व्हॅल्यू लेस (निरुपयोगी) झाले आहेत. याला दिवाळे निघणे देखील म्हटले जाते. भारत किती धनवान होता, आता कर्ज घेत राहतात. विनाशामध्ये तर सर्वांचा पैसा नष्ट होईल. देणारे, घेणारे सगळे नष्ट होतील बाकी जे अविनाशी ज्ञान-रत्न घेणारे आहेत ते मग येऊन आपले भाग्य घेतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांना फॉलो करून बाबांप्रमाणे सेवाभावी बनायचे आहे. आपणच स्वतःला पारखायचे आहे की मी उच्च ते उच्च परीक्षा पास करून उच्च पद मिळवण्याच्या लायक आहे?

२) बाबांच्या डायरेक्शनवर चालून महावीर बनायचे आहे, जसे बाबा आत्म्यांना बघतात, आत्म्यांना शिकवतात, तसे आत्मा भावा-भावाला पाहून बोलायचे आहे.

वरदान:-
श्रेष्ठतेच्या आधारावर समीपते द्वारे कल्पाचे श्रेष्ठ प्रारब्ध बनविणारे विशेष पार्टधारी भव

या मरजीवा जीवनामध्ये श्रेष्ठतेचा आधार या दोन गोष्टी आहेत - १) सदैव परोपकारी राहणे. २) बाल-ब्रह्मचारी राहणे. जी मुले या दोन गोष्टीमध्ये आदिपासून अंतापर्यंत अखंड राहिले आहेत, कोणत्याही प्रकारची पवित्रता अर्थात स्वच्छता सारखी-सारखी खंडित झालेली नाही आहे तसेच विश्वाप्रती आणि ब्राह्मण परिवाराप्रती जे सदैव उपकारी आहेत असे विशेष पार्टधारी बाप-दादांच्या सदा समीप राहतात आणि त्यांचे प्रारब्ध साऱ्या कल्पासाठी श्रेष्ठ बनते.

बोधवाक्य:-
संकल्प व्यर्थ असतील तर इतर सर्व खजिने देखील व्यर्थ होतात.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.

कर्मातीत स्थितीचा अनुभव करण्यासाठी ज्ञान ऐकणे आणि ऐकविण्या सोबत आता ब्रह्मा बाबांप्रमाणे न्यारे अशरीरी बनण्याच्या अभ्यासावर विशेष अटेंशन द्या. जसे ब्रह्मा बाबांनी साकार जीवनामध्ये कर्मातीत होण्यापूर्वी न्यारे आणि प्यारे राहण्याच्या अभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव करवीला. सेवेला अथवा कोणत्याही कर्माला सोडले नाही परंतु न्यारे होऊन शेवटच्या दिवशी देखील मुलांची सेवा समाप्त केली, असे फॉलो फादर करा.