09-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर अर्थात सर्व धर्मपित्यांचे देखील आदि पिता आहेत
प्रजापिता ब्रह्मा, ज्यांच्या ऑक्युपेशनला तुम्ही मुलेच जाणता”
प्रश्न:-
कर्मांना
श्रेष्ठ बनविण्याची युक्ती कोणती आहे?
उत्तर:-
या जन्मातील कोणतेही कर्म बाबांपासून लपवू नका, श्रीमतानुसार कर्म करा तर प्रत्येक
कर्म श्रेष्ठ होईल. सर्व काही कर्मांवर अवलंबून आहे. कोणते पाप कर्म करून जर ते
लपवलेत तर त्याचा १०० पटीने दंड होतो, पापाची वृद्धी होत राहते, बाबांपासून योग
तुटतो. मग असे लपवणाऱ्यांचा सत्यानाश होतो, म्हणून खऱ्या बाबांशी खरे रहा.
ओम शांती।
गोड-गोड सिकीलधी मुले (खूप-खूप वर्षांनी भेटलेली मुले) हे तर समजतात की या जुन्या
दुनियेमध्ये आता आपण थोड्या दिवसांचे प्रवासी आहोत. दुनियेचे मनुष्य तर समजतात की,
इथे अजून ४० हजार वर्षे रहायचे आहे. तुम्हा मुलांना तर निश्चय आहे ना. या गोष्टी
विसरू नका. इथे बसला आहात तर तुम्हा मुलांना आतून पुलकित झाले पाहिजे. या डोळ्यांनी
जे काही पाहता ते तर नष्ट होणार आहे. आत्मा तर अविनाशी आहे. हे देखील बुद्धीमध्ये
आहे मी आत्म्याने पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत, आता बाबा आलेले आहेत घेऊन जाण्याकरिता.
जुन्या दुनियेचा कालावधी जेव्हा पूर्ण होतो तेव्हा बाबा नवीन दुनिया बनविण्याकरिता
येतात. नवीन दुनियेपासून जुनी, मग जुन्या दुनियेपासून नवीन दुनिया, या चक्राचे
ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे. अनेकदा आपण हे चक्र फिरलो आहोत. आता हे चक्र पूर्ण
होत आहे. मग नवीन दुनियेमध्ये आपण फार थोडे देवताच असणार. मनुष्य नसणार. आता आम्ही
मनुष्यापासून देवता बनत आहोत. हा तर पक्का निश्चय आहे ना. बाकी सर्व काही कर्मांवरच
अवलंबून आहे. मनुष्य उलटे कर्म करतात तर ते आतून मनाला जरूर खात राहते म्हणून बाबा
विचारतात या जन्मामध्ये असे कोणते पाप तर केले नाहीत? हे आहेच छी-छी (विकारी)
रावण-राज्य. हे देखील तुम्ही समजता. दुनिया जाणत नाही की रावण कोणत्या गोष्टीचे नाव
आहे. बापूजी म्हणत होते रामराज्य पाहिजे; परंतु अर्थ समजत नव्हते. आता बेहदचे बाबा
समजावून सांगतात की राम-राज्य कोणत्या प्रकारचे असते. ही तर आंधळी दुनिया आहे. आता
बेहदचे बाबा मुलांना बेहदचा वारसा देत आहेत. आता तुम्ही भक्ती करत नाही. आता बाबांचा
हात मिळाला आहे. बाबांचा सहारा नसल्यामुळे तुम्ही विषय वैतरणी नदीमध्ये गटांगळ्या
खात होता, अर्धा कल्प आहेच भक्ती. ज्ञान मिळाल्याने तुम्ही नवीन दुनिया सतयुगामध्ये
निघून जाता. आता तुम्हा मुलांना हा निश्चय आहे - आम्ही बाबांची आठवण करता-करता
पवित्र बनणार, मग पवित्र राज्यामध्ये येणार. हे ज्ञान देखील आता पुरुषोत्तम
संगमयुगावर तुम्हाला मिळते. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. जेव्हा की तुम्ही छी-छी
पासून गुल-गुल, काट्यांपासून फूल बनत आहात. कोण बनवतात? बाबा. बाबांना जाणले आहे.
आम्हा आत्म्यांचे ते बेहदचे पिता आहेत. लौकिक पित्याला बेहदचा पिता म्हणणार नाही.
पारलौकिक पिता आत्म्यांच्या हिशोबाने सर्वांचे पिता आहेत. मग ब्रह्माचे देखील
ऑक्युपेशन पाहिजे ना. तुम्ही मुलांनी सर्वांचे ऑक्युपेशन जाणले आहे. विष्णूच्या
देखील ऑक्युपेशनला जाणता. किती सजलेला आहे. स्वर्गाचा मालक आहे ना. हा (ब्रह्मा) तर
संगमातीलच म्हणणार. मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन, ते देखील संगमामध्ये येतात ना.
बाबा समजावून सांगतात जुनी दुनिया आणि नवीन दुनियेचा हा संगम आहे. बोलावतात देखील -
‘हे पतित-पावन या’. पावन दुनिया आहे - नवीन दुनिया आणि पतित दुनिया आहे - जुनी
दुनिया. हे देखील जाणता की बेहदच्या बाबांचा देखील पार्ट आहे. क्रियेटर, डायरेक्टर
आहेत ना. सर्वजण मानतात तर जरूर त्यांचे तसे काही तरी कार्य असेलच ना! त्यांना
मनुष्य म्हटले जात नाही, त्यांना काही शरीर नाही आहे. बाकी सर्वांना एक तर मनुष्य
किंवा देवता म्हणणार. शिवबाबांना ना देवता, ना मनुष्य म्हणू शकतो, कारण त्यांना
शरीरच नाहीये. हे तर टेम्पररी घेतले आहे. स्वतः म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, मी
शरीराशिवाय राजयोग कसा शिकवू!’ मला तर मनुष्यांनी दगडा-धोंड्यामध्ये आहेत असे म्हटले
आहे, परंतु आता तर तुम्ही मुले समजता की मी कसा येतो! आता तुम्ही राजयोग शिकत आहात.
कोणताही मनुष्य काही शिकवू शकणार नाही. देवतांनी सतयुगी राज्य कसे घेतले? जरूर
पुरुषोत्तम संगमयुगावर राजयोग शिकले असतील. तर याची आठवण करून तुम्हा मुलांना अपार
आनंद झाला पाहिजे. आपण आता ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. बाबा कल्प-कल्प येतात. बाबा
स्वतः म्हणतात की हा अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे. श्रीकृष्ण जो सतयुगाचा
प्रिन्स होता, तोच मग ८४ चे चक्र फिरतो. तुम्ही शिवाचे काही ८४ जन्म सांगणार नाही.
तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार जाणतात. माया खूप शक्तिशाली आहे,
कोणालाही सोडत नाही. हे बाबा चांगल्या रीतीने जाणतात. असे समजू नका की बाबा काही
अंतर्यामी आहेत. नाही, सर्वांच्या कर्मावरून जाणतात. बातम्या येतात - माया एकदम
कच्चा पोटात घालते. अशा खूप गोष्टी तुम्हा मुलांना माहिती नसतात, बाबांना तर सर्व
काही कळते. लोक मग समजतात की बाबा अंतर्यामी आहेत. बाबा म्हणतात - मी अंतर्यामी नाही
आहे. प्रत्येकाच्या वर्तनावरून माहिती होते. खूप छी-छी (घाणेरडे) वर्तन असते. बाबा
मुलांना सावध करतात. मायेपासून सांभाळायचे आहे. माया अशी आहे की कोणत्या ना कोणत्या
रूपामध्ये एकदम गिळूनच टाकते. मग भले बाबा समजावून सांगतात तरी सुद्धा बुद्धीमध्ये
टिकत नाही; त्यामुळे मुलांनी खूप जागरूक राहायचे आहे. काम विकार महाशत्रू आहे.
कळणार सुद्धा नाही की आपण विकारामध्ये गेलो आहोत, असे देखील होते. म्हणून बाबा
म्हणतात काहीही चूक इत्यादी झाली तर स्पष्टपणे सांगा, लपवू नका. नाही तर शंभर पटीने
पाप होईल, जे आतमध्ये खात राहील. एकदम खाली कोसळाल. खऱ्या बाबांसोबत अगदी खरे राहिले
पाहिजे, नाहीतर खूप मोठे नुकसान होईल. या वेळी माया तर खूप बलवान आहे. ही रावणाची
दुनिया आहे. आपण या जुन्या दुनियेची आठवण तरी का करावी! आम्ही तर नवीन दुनियेची
आठवण करणार, जिथे आता जात आहोत. बाबा नवीन घर बनवतात तर मुले समजतात ना आमच्यासाठी
घर बनत आहे. आनंद होतो. ही आहे बेहदची गोष्ट. आमच्यासाठी नवीन दुनिया स्वर्ग बनत आहे.
स्वर्गामध्ये जरूर राहण्यासाठी घरे देखील असतील. आता आम्ही नवीन दुनियेमध्ये जाणार
आहोत. जितकी बाबांची आठवण कराल तितके गुल-गुल फूल बनाल. आम्ही विकारांच्या वश
झाल्याने काटे बनलो होतो. बाबा जाणतात की माया अर्ध्यांना तर एकदम खाऊन टाकते.
तुम्ही देखील समजता की जे येत नाहीत ते तर मायेच्या वश झाले ना! बाबांकडे काही येत
नाहीत. अशी माया खूप जणांना गिळंकृत करते. ज्ञान खूप छान आहे-छान आहे असे म्हणून जे
जातात - आम्ही असे करू, हे करू, आम्ही तर यज्ञासाठी प्राण देण्यासाठी तयार आहोत, ते
आज नाही आहेत. तुमचे युद्ध आहेच मायेसोबत. दुनियेमध्ये हे कोणीही जाणत नाहीत -
मायेशी युद्ध कसे होते. आता तुम्हा मुलांना बाबांनी ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे,
ज्यामुळे तुम्ही अंधारातून प्रकाशामध्ये आला आहात. आत्म्यालाच हा ज्ञान नेत्र देतात;
म्हणून बाबा म्हणतात - स्वतःला तुम्ही आत्मा समजा. बेहदच्या बाबांची आठवण करा.
भक्तीमध्ये तुम्ही आठवण करत होता ना. म्हणत सुद्धा होता की, तुम्ही याल तर आम्ही
बलिहार जाऊ. कसे बलिहार जाणार! हे थोडेच जाणत होता. आता तुम्ही समजता की आपण जसे
आत्मा आहोत तसे बाबा देखील आहेत. बाबांचा आहे अलौकिक जन्म. तुम्हा मुलांना किती
चांगल्या रीतीने शिकवतात! तुम्ही स्वतः म्हणता - हे तर तेच बाबा आहेत जे कल्प-कल्प
आमचे बाबा बनतात. आम्ही देखील ‘बाबा-बाबा’ म्हणतो, बाबा देखील ‘बाळांनो-बाळांनो’ असे
म्हणतात. तेच टिचरच्या रूपामध्ये राजयोग शिकवतात. बाकीचे तर कोणी राजयोग शिकवू
शकणार नाहीत. विश्वाचा तुम्हाला मालक बनवतात तर अशा बाबांचे बनून मग त्याच टिचर
कडून शिकले देखील पाहिजे ना. आनंदाने पुलकित झाले पाहिजे. जर छी-छी (विकारी) बनलात
तर मग तो आनंद होणार नाही. भले कितीही डोके आपटेल मग जणू काही तो आपला जात-भाई
नाहीये. इथे लोकांची किती सरनेम (आडनावे) असतात. तुमचे सरनेम बघा किती मोठे आहे! हे
आहेत मोठ्यात मोठे ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर ब्रह्मा. त्यांना कोणी जाणतही नाही.
शिवबाबांना तर सर्वव्यापी म्हटले आहे. ब्रह्मा बाबांविषयी देखील कोणालाही माहिती
नाही. ब्रह्मा-विष्णू-शंकराची चित्रे देखील आहेत. ब्रह्माला सूक्ष्मवतनमध्ये घेऊन
गेले आहेत. बायोग्राफी (जीवन चरित्र) काहीच जाणत नाहीत. सूक्ष्मवतनमध्ये ब्रह्माला
दाखवतात मग प्रजापिता ब्रह्मा कुठून येणार! तिथे मुलांना ॲडॉप्ट करतील काय! कोणालाच
माहित नाही आहे. प्रजापिता ब्रह्मा म्हणतात परंतु बायोग्राफी जाणत नाहीत. बाबांनी
सांगितले आहे - ‘हा (ब्रह्मा बाबा) माझा रथ आहे. अनेक जन्मांच्या अंताला मी हा आधार
घेतला आहे’. हे पुरुषोत्तम संगमयुग गीतेचा एपिसोड आहे. पवित्रता देखील महत्वाची आहे.
पतितापासून पावन कसे बनायचे आहे, हे दुनियेमध्ये कोणालाही ठाऊक नाही आहे. साधू-संत
इत्यादी कधी असे म्हणणार नाहीत की, ‘देहा सहित सर्वांना विसरा. एका बाबांची आठवण करा
तर मायेची पाप कर्म सर्व भस्म होऊन जातील’. कोणताही गुरु असे कधी म्हणणार नाही.
बाबा समजावून सांगतात
- हे ब्रह्मा कसे बनतात? बालपणी तर गावातील मुलगा होता. ८४ जन्म घेतले आहेत, पहिल्या
जन्मा पासून शेवट पर्यंत. तर नवीन दुनिया सो मग जुनी होते. आता तुम्हा मुलांच्या
बुद्धीचे कुलूप उघडले आहे. तुम्ही समजू शकता, धारणा करू शकता. आता तुम्ही बुद्धिमान
बनला आहात, अगोदर बुद्धिहीन होता. हे लक्ष्मी-नारायण बुद्धिवान आहेत आणि इथे
बुद्धिहीन आहेत. समोर बघा हे पॅराडाईजचे मालक होते ना. श्रीकृष्ण स्वर्गाचा मालक
होता मग गावातील मुलगा बनला आहे. तुम्हा मुलांना हे धारण करून मग पवित्र देखील जरूर
बनायचे आहे. मुख्य आहेच पवित्रतेची गोष्ट. लिहितात देखील - ‘बाबा, मायेने आम्हाला
खाली पाडले (पतन झाले). डोळे क्रिमिनल (विकारी) बनले. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा
समजा. बस्स, आता तर घरी जायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे. थोड्या वेळासाठी, शरीर
निर्वाहासाठी कर्म करून मग आपण निघून जातो. या जुन्या दुनियेच्या विनाशासाठी युद्ध
देखील केले जाते. हे देखील तुम्ही बघा - कसे युद्ध होते? बुद्धीने समजता आम्ही देवता
बनतो तर आम्हाला नवीन दुनिया देखील पाहिजे म्हणून विनाश जरूर होणार. आम्ही श्रीमतवर
आपली नवीन दुनिया स्थापना करत आहोत.
बाबा म्हणतात - मी
तुमच्या सेवेमध्ये उपस्थित होतो. तुम्ही डिमांड केली (मागणी केली) आहे की आम्हा
पतितांना येऊन पावन बनवा तर तुमच्या सांगण्यावरून मी आलो आहे, तुम्हाला खूप सोपा
मार्ग सांगतो. मनमनाभव. भगवानुवाच आहे ना फक्त श्रीकृष्णाचे नाव दिले आहे. बाबांच्या
नंतर आहे श्रीकृष्ण. हे परमधामचे मालक, तो विश्वाचा मालक. सूक्ष्मवतनमध्ये तर काहीही
घडत नाही. सर्वात नंबरवन आहे श्रीकृष्ण, ज्याच्यावर खूप प्रेम करतात. बाकी तर सर्व
त्याच्या नंतर आले आहेत. स्वर्गामध्ये तर सगळेच काही जाऊ शकत नाहीत. तर गोड-गोड
मुलांनो, तुम्हाला तर परमानंद झाला पाहिजे. कृत्रिम आनंद चालू शकत नाही. बाहेरून
तऱ्हेतऱ्हेची मुले बाबांकडे येत असत, कधीच पवित्र राहिले नाहीत. बाबा समजावून
सांगायचे की, विकारामध्ये जाता तर मग इथे येताच कशाला; तर म्हणत असत - ‘काय करू,
राहू शकत नाही. रोज येतो, माहित नाही कधी कोणता असा तीर लागेल. तुमच्या शिवाय सद्गती
कोण करणार’. येऊन बसायचा. माया खूप शक्तिशाली आहे. त्याचा विश्वास देखील होता की,
बाबा मला पतितापासून पावन गुल-गुल बनवणार. परंतु काय करणार, तरी देखील खरे तर बोलत
होता - आता जरूर तो सुधारला असेल. त्याला हा विश्वास होता की, मी यांच्याद्वारेच
सुधारु शकेन.
आता यावेळी किती ॲक्टर्स
आहेत. एकाची फीचर्स दुसऱ्याशी मेळ खावू शकत नाहीत. पुन्हा कल्पानंतर त्याच
फीचर्समध्ये पार्ट रिपीट करतील. आत्मे तर सर्व फिक्स आहेत ना. सर्व ॲक्टर्स अगदी
अचूक पार्ट बजावत राहतात. काहीही बदल होऊ शकत नाही. सर्व आत्मे अविनाशी आहेत.
त्यांच्यामध्ये पार्ट देखील अविनाशी नोंदलेला आहे. समजावून सांगण्यासाठी खूप गोष्टी
आहेत. किती समजावून सांगतात तरी सुद्धा विसरून जातात. इतरांना समजावून सांगू शकत
नाहीत. हे देखील ड्रामामध्ये होणार आहे. प्रत्येक कल्पामध्ये राजाई तर स्थापन होतेच
होते. सतयुगामध्ये येतातच फार थोडे - ते देखील नंबरवार. इथे देखील नंबरवार आहेत ना.
ज्याचा जो पार्ट आहे तोच ते जाणेल, दुसरा कोणीही जाणू शकत नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) खऱ्या
बाबांसोबत सदैव खरे राहायचे आहे. बाबांवर पूर्णपणे बलिहार जायचे आहे.
२) ज्ञानाला धारण
करून बुद्धिवान बनायचे आहे. आतून अत्यंत आनंदामध्ये राहायचे आहे. श्रीमताच्या
विरुद्ध कोणतेही काम करून आनंद गमावू नका.
वरदान:-
ड्रामाच्या
पॉईंटच्या अनुभवाद्वारे सदा साक्षीपणाच्या स्टेजवर राहणारे अचल-अडोल भव
ड्रामाच्या पॉईंटचे
जे अनुभवी आहेत ते सदैव साक्षीपणाच्या स्टेजवर स्थित राहून एकरस, अचल-अडोल स्थितीचा
अनुभव करतात. ड्रामाच्या पॉईंटचे अनुभवी आत्मे कधीही वाईटातल्या वाईटाला न बघता
चांगलेच बघतील अर्थात स्व-कल्याणाचा रस्ता दिसेल. अकल्याणाचे खाते नष्ट झाले.
कल्याणकारी बाबांची मुले आहात, कल्याणकारी युग आहे - या नॉलेज आणि अनुभवाच्या
ऑथॉरिटीने अचल-अडोल बना.
बोधवाक्य:-
जे वेळेला
अमूल्य समजून सफल करतात, ते ऐन वेळी धोका खात नाहीत.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
ज्ञान-खजिन्याद्वारे
या वेळीच मुक्ती-जीवनमुक्तीचा अनुभव करायचा आहे. जे पण दुःख आणि अशांतीचे कारण आहे,
विकार आहेत त्यापासून मुक्त व्हायचे आहे. आणि कोणते विकार आले जरी तरीही विजयी
बनायचे आहे, हार खायची नाही. अनेक व्यर्थ संकल्प आणि विकल्प, विकर्मांपासून मुक्त
बनणे - हीच जीवनमुक्त अवस्था आहे.