09-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, गरीब निवाज बाबा तुम्हाला कवडी पासून हिऱ्यासमान बनविण्याकरिता आले आहेत, तर तुम्ही नेहमी त्यांच्या श्रीमतावर चाला”

प्रश्न:-
तुम्हाला सर्वप्रथम कोणते एक गूढ रहस्य सर्वांना समजावून सांगायचे आहे?

उत्तर:-
“बाप-दादां”चे. तुम्ही जाणता इथे आपण बापदादांकडे आलो आहोत. हे दोघेही एकत्र आहेत. शिवाची आत्मा देखील यांच्यामध्ये आहे, ब्रह्माची आत्मा देखील आहे. एक आत्मा आहे, दुसरे परम आत्मा आहेत. तर सर्वप्रथम हे गूढ रहस्य सर्वांना समजावून सांगा की, हे बापदादा दोघेही एकत्र आहेत. हे (दादा) काही भगवान नाहीत. मनुष्य भगवान असू शकत नाही. भगवान म्हटले जाते निराकारला. ते पिता शांतीधाममध्ये राहणारे आहेत.

गीत:-
आखिर वह दिन आया आज….

ओम शांती।
बाबा, दादाद्वारे अर्थात शिवबाबा, ब्रह्मा-दादाद्वारे समजावून सांगत आहेत, हे पक्के करा. लौकिक नात्यामध्ये पिता वेगळे, दादा (आजोबा) वेगळे असतात. पित्याकडून दादांचा (आजोबांचा) वारसा मिळतो. म्हणतात - आजोबांचा वारसा घेत आहोत. ते गरीब-निवाज आहेत. गरीब-निवाज त्यांना म्हटले जाते, जे येऊन गरिबांना मुकुटधारी सिरताज बनवतात. तर सर्वप्रथम हा निश्चय पक्का झाला पाहिजे की, हे कोण आहेत? तसे तर दिसण्यामध्ये मनुष्यच आहेत, यांना हे सर्वजण ब्रह्मा म्हणतात. तुम्ही सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहात. तुम्ही जाणता, आपल्याला वारसा शिवबाबांकडून मिळतो. जे सर्वांचे पिता आहेत, ते सर्वांना वारसा देण्यासाठी आले आहेत. बाबा सुखाचा वारसा देतात. आणि मग अर्ध्याकल्पा नंतर रावण दुःखाचा शाप देतात. भक्ती मार्गामध्ये भगवंताला शोधण्यासाठी खूप खस्ता खातात. भेटत तर कोणालाच नाहीत. भारतवासी गातात - ‘तुम मात-पिता…’, आणि मग म्हणतात - तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हीच एक आमचे असणार, दुसरे कोणीही नाही. इतर कोणाशीही आम्ही ममत्व ठेवणार नाही. आमचे तर एक शिवबाबा. तुम्ही जाणता, हे शिवबाबा आहेत गरीब निवाज. गरिबाला श्रीमंत बनविणारे, कवडीला हिरे तुल्य बनवतात अर्थात कलियुगी पतित गरिबापासून सतयुगी मुकुटधारी बनविण्यासाठी बाबा आले आहेत. तुम्ही मुले जाणता, इथे आपण बापदादांपाशी आलो आहोत. हे दोघे एकत्र आहेत. शिवाची आत्मा देखील यांच्यामध्ये आहे, ब्रह्माची आत्मा देखील आहे, तर दोन झाले ना. एक आत्मा आहे, दुसरे परमात्मा आहेत. तुम्ही सर्व आहात आत्मे. गायले जाते - आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल... तुम्हीच सर्व प्रथम भेटणारे आत्मे आहात, अर्थात जे आत्मे आहेत ते परमात्मा पित्याला भेटतात, ज्यांच्यासाठीच बोलावताना म्हणतात - ओ गॉड फादर. तुम्ही त्यांची संतान आहात. फादर कडून जरूर वारसा मिळतो. बाबा म्हणतात - भारत जो मुकुटधारी होता, तो आता किती गरीब बनला आहे. आता मी पुन्हा तुम्हा मुलांना मुकुटधारी बनविण्याकरिता आलो आहे. तुम्ही डबल मुकुटधारी बनता. एक मुकुट असतो पवित्रतेचा, त्यामध्ये प्रकाश दाखवतात. दुसरा आहे रत्नजडित मुकुट. तर सर्वप्रथम हे गूढ रहस्य सर्वांना समजावून सांगायचे आहे की, हे बाप-दादा एकत्र आहेत. हे (ब्रह्मा) भगवान नाहीत. मनुष्य भगवान असू शकत नाही. भगवान म्हटले जाते निराकारला. ते पिता शांतीधामला राहणारे आहेत. जिथे तुम्ही सर्व आत्मे राहता, ज्याला निर्वाण धाम अथवा वानप्रस्थ म्हटले जाते; आणि मग तुम्हा आत्म्यांना शरीर धारण करून इथे पार्ट बजावायचा असतो. अर्धे कल्प सुखाचा पार्ट, अर्धे कल्प आहे दुःखाचा पार्ट. जेव्हा दुःखाचा अंत होतो तेव्हा बाबा म्हणतात मी येतो. हा ड्रामा पूर्व नियोजित आहे. तुम्ही मुले इथे येता भट्टीमध्ये. इथे अजून काही बाहेरचे आठवता कामा नये. इथे आहेतच माता, पिता आणि मुले. आणि इथे शूद्र संप्रदाय नाहीये. जे ब्राह्मण नाहीत त्यांना शूद्र म्हटले जाते. त्यांचा संग तर इथे नाहीच आहे. इथे आहेच ब्राह्मणांचा संग. ब्राह्मण मुले जाणतात की शिवबाबा ब्रह्मा द्वारे आम्हाला नरकातून काढून स्वर्गाच्या राजधानीचा मालक बनविण्यासाठी आले आहेत. आता आम्ही मालक नाही आहोत कारण आम्ही पतित आहोत. आम्ही पावन होतो मग ८४ चे चक्र फिरून सतो-रजो-तमोमध्ये आलो आहोत. शिडीमध्ये ८४ जन्मांचा हिशोब लिहिलेला आहे. बाबा बसून त्या मुलांना समजावून सांगत आहेत ज्या मुलांना सर्वप्रथम भेटतात; मग त्यांनाच सर्वप्रथम सतयुगामध्ये यायचे आहे. तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत. रचता आणि रचनेचे सर्व नॉलेज एका बाबांकडेच आहे. तेच मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. जरूर बीजामध्येच नॉलेज असेल की या झाडाची कशी उत्पत्ती, पालना आणि विनाश होतो. हे तर बाबाच समजावून सांगतात. तुम्ही आता जाणता की, आपण भारतवासी गरीब आहोत. जेव्हा देवी-देवता होतो तेव्हा किती श्रीमंत होतो. हिऱ्यांनी खेळत होतो. हिऱ्यांच्या महालामध्ये राहत होतो. आता बाबा आठवण करून देत आहेत की तुम्ही कसे ८४ जन्म घेता. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन, गरीब-निवाज बाबा या. आम्हा गरिबांना पुन्हा स्वर्गाचे मालक बनवा’. स्वर्गामध्ये भरभरून सुख होते, आता अतोनात दुःख आहे. मुले जाणतात यावेळी सर्व पतित बनले आहेत. आता कलियुगाचा अंत आहे नंतर मग सतयुग पाहिजे. सुरुवातीला भारतामध्ये एकच आदि सनातन देवी-देवता धर्म होता, आता तो प्रायः लोप झाला आहे आणि सर्वजण स्वतःला हिंदू म्हणवून घेतात. यावेळी ख्रिश्चन खूप झाले आहेत कारण हिंदू धर्माचे पुष्कळजण कन्व्हर्ट झाले आहेत. तुम्हा देवी-देवतांचे मूलतः कर्म श्रेष्ठ होते. तुम्ही पवित्र प्रवृत्तीमार्गवाले होता. आता रावण राज्यामध्ये पतित प्रवृत्तीमार्गवाले बनला आहात, म्हणून दुःखी आहात. सतयुगाला म्हटले जाते शिवालय. शिवबाबांनी स्थापन केलेला स्वर्ग. बाबा म्हणतात - मी येऊन तुम्हा मुलांना शूद्रापासून ब्राह्मण बनवून तुम्हाला सूर्यवंशी, चंद्रवंशी राजधानीचा वारसा देतो. हे बाप-दादा आहेत यांना विसरू नका. शिवबाबा ब्रह्मा द्वारे आम्हाला स्वर्गाच्या लायक बनवत आहेत कारण पतित आत्मा काही मुक्तिधाममध्ये जाऊ शकत नाही, जोवर पावन बनत नाही. आता बाबा म्हणतात - मी येऊन तुम्हाला पावन बनण्याचा रस्ता सांगतो. मी तुम्हाला पदमपती स्वर्गाचा मालक बनवून गेलो होतो, बरोबर तुम्हाला स्मृती आली आहे की आपण स्वर्गाचे मालक होतो. त्यावेळी आपण फार थोडे होतो. आता तर किती असंख्य मनुष्य आहेत. सतयुगामध्ये ९ लाख असतात, तर बाबा म्हणतात - मी येऊन ब्रह्मा द्वारे स्वर्गाची स्थापना, शंकराद्वारे विनाश करवितो. कल्पा पूर्वीप्रमाणे सर्वजण तयारी करत आहेत. किती बॉम्ब्स बनवत आहेत. ५ हजार वर्षांपूर्वी देखील ही महाभारत लढाई लागली होती. भगवंताने येऊन राजयोग शिकवून मनुष्याला नरापासून नारायण बनवले होते. तर जरूर कलियुगी जुन्या दुनियेचा विनाश झाला पाहिजे. साऱ्या भंभोरला (दुनियेला) आग लागेल. नाहीतर मग विनाश कसा होणार? आज-काल बॉम्बमध्ये आग देखील भरतात. मुसळधार पाऊस, भूकंप इत्यादी सर्व होतील तेव्हाच तर विनाश होईल. जुन्या दुनियेचा विनाश, नव्या दुनियेची स्थापना होते. हे आहे संगमयुग. रावण राज्य मुर्दाबाद होऊन राम राज्य जिंदाबाद होते. नवीन दुनियेमध्ये श्रीकृष्णाचे राज्य होते. लक्ष्मी-नारायणाच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव घेतात कारण श्रीकृष्ण सुंदर आहे, सर्वात गोड मुलगा. लोकांना तर ठाऊक नाही आहे ना. श्रीकृष्ण वेगळ्या राजधानीचा, राधा वेगळ्या राजधानीची होती. भारत सिरताज (मुकुटधारी) होता. आता कंगाल आहे, मग बाबा येऊन मुकुटधारी बनवतात. आता बाबा म्हणतात - पवित्र बना आणि मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल. मग जे सेवा करून आपसमान बनवतील ते उच्च पद मिळवतील, डबल मुकुटधारी बनतील. सतयुगामध्ये राजा-राणी आणि प्रजा सर्व पवित्र असतात. आता तर आहेच प्रजेचे राज्य. दोन्ही ताज नाही आहेत. बाबा म्हणतात - जेव्हा अशी हालत होते तेव्हा मी येतो. आता मी तुम्हा मुलांना राजयोग शिकवत आहे. मीच पतित-पावन आहे. आता तुम्ही माझी आठवण करा तर तुमच्या आत्म्यातून भेसळ निघून जाईल. पुन्हा सतोप्रधान बनाल. आता श्याम पासून सुंदर बनायचे आहे. सोन्यामध्ये भेसळ पडल्याने काळे पडते तर आता भेसळीला काढून टाकायचे आहे. बेहदचे बाबा म्हणतात - तुम्ही काम-चितेवर बसून काळे बनला आहात, आता ज्ञान-चितेवर बसा आणि सर्वामधून ममत्व काढून टाका. तुम्ही आशिक आहात मज एका माशुकचे. सर्व भक्त भगवंताची आठवण करतात. सतयुग-त्रेतामध्ये भक्ती असत नाही. तिथे तर आहे ज्ञानाचे प्रारब्ध. बाबा येऊन ज्ञानाद्वारे रात्रीचा दिवस बनवतात. असे नाही की शास्त्र वाचल्याने दिवस होईल. ती आहे भक्तीची सामग्री. ज्ञान-सागर पतित-पावन एक बाबाच आहेत, ते येऊन सृष्टीचक्राचे ज्ञान मुलांना समजावून सांगतात आणि योग शिकवतात. ईश्वरासोबत योग लावणारे योग-योगेश्वर आणि मग बनतात राज-राजेश्वर, राज-राजेश्वरी. तुम्ही ईश्वराद्वारे राजांचेही राजा बनता. जे पावन राजा होते तेच मग पतित बनतात. आपेही पूज्य मग आपेही पुजारी बनतात. आता जेवढे शक्य होईल आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. जसे आशिक माशुकची आठवण करतात ना. जसे कन्येचा साखरपुडा झाला की मग एकमेकांची आठवण करत राहतात. आता हा जो माशुक आहे, त्यांचे तर अनेक आशिक आहेत भक्तीमार्गामध्ये. सर्वजण दुःखामध्ये बाबांची आठवण करतात - ‘हे भगवान, दुःख हरण करा, सुख द्या. इथे तर ना शांती आहे, ना सुख आहे. सतयुगामध्ये दोन्ही आहे.

आता तुम्ही जाणता - आपण आत्मे कसे ८४ चा पार्ट बजावतो. ब्राह्मण, देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतो. ८४ ची शिडी लक्षात आहे ना. आता जेवढे शक्य होईल तेवढी बाबांची आठवण करायची आहे तर पापे नष्ट होतील. कर्म करताना देखील बुद्धीमध्ये बाबांची आठवण रहावी. बाबांकडून आपण स्वर्गाचा वारसा घेत आहोत. बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. आठवणीद्वारेच पापे नष्ट होत जातील. जितकी आठवण कराल तितकी पवित्रतेची लाईट येत जाईल. गंज निघत जाईल. मुलांना जितके शक्य होईल वेळ काढून आठवणीचा उपाय करायचा आहे. पहाटेला वेळ चांगला मिळतो. हा पुरुषार्थ करायचा आहे. भले गृहस्थ व्यवहारामध्ये रहा, मुलांचे संगोपन इत्यादी करा परंतु हा अंतिम जन्म पवित्र बना. काम चितेवर चढू नका. आता तुम्ही ज्ञान चितेवर बसला आहात. हे शिक्षण अतिशय उच्च दर्जाचे आहे, यासाठी सोन्याचे पात्र हवे. तुम्ही बाबांची आठवण केल्याने सोन्याचे पात्र बनता. आठवण विसरल्याने मग लोखंडाचे पात्र बनता. बाबांची आठवण केल्याने स्वर्गाचे मालक बनाल. हे तर खूप सोपे आहे. यामध्ये मुख्य आहे पवित्रता. आठवणीद्वारेच पवित्र बनाल आणि सृष्टीचक्राची आठवण केल्याने स्वर्गाचे मालक बनाल. तुम्हाला घरदार सोडायचे नाहीये. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे. बाबा म्हणतात - ६३ जन्म तुम्ही पतित दुनियेमध्ये राहिले आहात. आता शिवालय अमरलोक मध्ये जाण्यासाठी तुम्ही हा एक जन्म पवित्र राहिलात तर काय झाले. खूप कमाई होईल. ५ विकारांवर विजय प्राप्त करायचा आहे तेव्हाच जगतजीत बनाल. नाहीतर पद मिळवू शकणार नाही. बाबा म्हणतात - मरायचे तर सर्वांनाच आहे. हा अंतिम जन्म आहे मग तुम्ही नवीन दुनियेमध्ये जाऊन राज्य कराल. हिरे-माणकांच्या खाणी भरपूर असतील. तिथे तुम्ही हिरे-माणकांसोबत खेळत रहाल. तर अशा बाबांचे बनून त्यांच्या मतावर देखील चालले पाहिजे ना. श्रीमताद्वारेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. रावणाच्या मतामुळे तुम्ही भ्रष्टाचारी बनला आहात. आता बाबांच्या श्रीमतावर चालून तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. बाबांची आठवण करायची आहे आणखी कोणताही त्रास बाबा देत नाहीत. भक्तीमार्गामध्ये तर तुम्ही खूप खस्ता खाल्ल्या आहेत. आता फक्त बाबांची आठवण करा आणि सृष्टीचक्राची आठवण करा. स्वदर्शनचक्रधारी बना तर तुम्ही २१ जन्मांसाठी चक्रवर्ती राजा बनाल. अनेक वेळा तुम्ही राज्य घेतले आहे आणि गमावले आहे. अर्धा कल्प आहे सुख, अर्धा कल्प आहे दुःख. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प संगमावर येतो. तुम्हाला सुखधामचा मालक बनवतो. आता तुम्हाला स्मृती आली आहे की, आपण कसे चक्र फिरतो. हे चक्र लक्षात ठेवायचे आहे. बाबा आहेत ज्ञानाचा सागर. तुम्ही इथे बेहदच्या बाबांसमोर बसला आहात. उच्च ते उच्च भगवान प्रजापिता ब्रह्मा द्वारे तुम्हाला वारसा देत आहेत. तर आता विनाश होण्यापूर्वी बाबांची आठवण करा,पवित्र बना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहण्यासाठी बुद्धीला सोन्याचे पात्र बनवायचे आहे. कर्म करत असताना देखील बाबांची आठवण रहावी, आठवणीद्वारेच पवित्रतेची लाईट येईल.

२) मुरली कधीही चुकवायची नाही. ड्रामाच्या रहस्याला यथार्थ रीतीने समजून घ्यायचे आहे. भट्टीमध्ये असताना बाहेरचे काहीही आठवता कामा नये.

वरदान:-
आपसामध्ये एकमेकांच्या विशेषतेला बघणारे आणि वर्णन करणारे श्रेष्ठता संपन्न होलीहंस भव

संगमयुगावर प्रत्येक मुलाला नॉलेज द्वारे कोणते ना कोणते विशेष गुण अवश्य प्राप्त झाले आहेत, म्हणून होलीहंस बनून प्रत्येकाच्या विशेषतेला बघा आणि वर्णन करा. ज्यावेळी कोणाची कमजोरी बघता किंवा ऐकता तर समजले पाहिजे की ही कमजोरी यांची नाही, माझी आहे कारण आपण सर्व एकाच पित्याची मुले आहोत, एकाच परिवारातील, एकाच माळेचे मणी आहोत. ज्याप्रकारे आपल्या कमजोरीला प्रसिद्ध करू इच्छित नाही तसे दुसऱ्याच्या कमजोरीचे देखील वर्णन करू नका. होलीहंस अर्थात विशेषतांना ग्रहण करणे आणि कमजोरींना नष्ट करणे.

बोधवाक्य:-
वेळेला वाचविणारे तीव्र पुरुषार्थीच सदा विजयी आहेत.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

जशी मण्यांची विशेषता असते - एकसारखे मणी माळेच्या एकाच धाग्यामध्ये ओवले जातात. तसे तुम्ही सर्व वैजयंती माळेचे मणी देखील जेव्हा एकमत, एकाच्याच प्रेमामध्ये एकरस स्थिती असणारे एकच दिसून याल तेव्हाच माळेमध्ये ओवले जाल. जर आपसामध्ये दोन मते असतील तर ते दुसऱ्या अर्थात १६००० च्या माळेचे मणी बनतात.