09-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - प्रत्येकाची नाडी पाहून अगोदर त्याला ‘अल्फ’ वरील (बाबांवरील) निश्चय पक्का करून घ्या नंतर पुढे जा, ‘अल्फ’ वरील निश्चयाशिवाय ज्ञान देणे म्हणजे टाईम वेस्ट करणे आहे’’

प्रश्न:-
असा कोणता एक मुख्य पुरुषार्थ आहे जो स्कॉलरशिप घेण्यासाठी अधिकारी बनवतो?

उत्तर:-
अंतर्मुखतेचा. तुम्हाला खूप अंतर्मुखी रहायचे आहे. बाबा तर आहेतच कल्याणकारी. कल्याणासाठीच मत देतात. जी अंतर्मुखी योगी मुले आहेत ती कधीही देह-अभिमानामध्ये येऊन रुसत नाहीत किंवा भांडत नाहीत. त्यांचे वर्तन अतिशय रॉयल शानदार असते. फार थोडे बोलतात, यज्ञ सेवेमध्येच रुची ठेवतात. ते ज्ञानाविषयी जास्त बकबक करत नाहीत, आठवणीमध्ये राहून सेवा करतात.

ओम शांती।
जास्त करून पाहिले जाते प्रदर्शनीच्या सेवेचे समाचार देखील येतात तर मूळ गोष्ट बाबांचा परिचय देण्याची जी आहे, त्यावर निश्चय पूर्णपणे पक्का न केल्यामुळे बाकी जे काही सांगत राहतात, ते कोणाच्या बुद्धीमध्ये बसणे अवघड होते. भले चांगले-चांगले म्हणतात परंतु बाबांचा परिचय नाही. पहिले तर बाबांचा परिचय असावा. बाबांचे महावाक्य आहे - ‘माझी आठवण करा, मीच पतित-पावन आहे. माझी आठवण केल्यानेच तुम्ही पतितापासून पावन बनाल. ही आहे मुख्य गोष्ट. भगवान एक आहेत, तेच पतित-पावन आहेत. ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर आहेत. तेच उच्च ते उच्च आहेत. हा निश्चय होईल तर मग भक्तीमार्गाची जी वेद-शास्त्रे किंवा गीता-भागवत आहेत त्या सर्वांचे खंडन होईल. भगवान तर स्वतः म्हणतात, हे मी सांगितलेले नाही आहे. माझे ज्ञान शास्त्रांमध्ये नाही आहे. ते आहे भक्तीमार्गाचे ज्ञान. मी तर ज्ञान देऊन सद्गती करून निघून जातो. नंतर मग हे ज्ञान प्राय: लोप होते. ज्ञानाची प्रारब्ध पूर्ण झाल्यानंतर मग भक्तीमार्ग सुरू होतो. जेव्हा बाबांवर निश्चय बसेल तेव्हा समजतील, भगवानुवाच - ही भक्तिमार्गाची शास्त्रे आहेत. ज्ञान आणि भक्ती अर्धे-अर्धे चालते. स्वयं भगवान जेव्हा येतात तेव्हा ते आपला परिचय देतात - ‘मी म्हणतो ५ हजार वर्षांचे कल्प आहे, मी तर ब्रह्मा मुखाद्वारे समजावून सांगत आहे’. तर पहिली मुख्य गोष्ट बुद्धीमध्ये पक्की करून घ्यायची आहे की, भगवान कोण आहेत? ही गोष्ट जोपर्यंत बुद्धीमध्ये बसत नाही तोपर्यंत बाकी काहीही समजावून सांगितल्याने काहीच परिणाम होणार नाही. सगळी मेहनतच या गोष्टीमध्ये आहे. बाबा येतातच कबरी मधून जागे करण्यासाठी. शास्त्र इत्यादी वाचल्याने तर जागे होणार नाहीत. परम आत्मा आहे ज्योती स्वरूप तर त्यांची मुले देखील ज्योती स्वरूप आहेत. परंतु तुम्हा मुलांची आत्मा पतित बनली आहे, ज्यामुळे ज्योत विझली आहे. तमोप्रधान झाले आहेत. सर्व प्रथम बाबांचा परिचय न दिल्याने मग जी काही मेहनत करता, ओपिनियन (अभिप्राय) इत्यादी लिहितात ते काहीच कामाचे राहत नाहीत म्हणून सेवा होत नाही. निश्चय होईल तेव्हा समजतील बरोबर ब्रह्मा द्वारे ज्ञान देत आहेत. मनुष्य ब्रह्माला पाहून किती गोंधळतात कारण बाबांची ओळख नाही आहे. तुम्ही सर्व जाणता भक्तीमार्ग आता होऊन गेला आहे. कलियुगामध्ये आहे भक्तिमार्ग आणि आता संगमावर आहे ज्ञान मार्ग. आपण संगमयुगी आहोत. राजयोग शिकत आहोत. दैवी गुण धारण करत आहोत नवीन दुनियेसाठी. जे संगमयुगावर नाहीत ते दिवसेंदिवस तमोप्रधानच बनत जातात. त्या बाजूला तमोप्रधानता वाढत जाते या बाजूला तुमचे संगमयुग पूर्ण होत चालले आहे. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. ज्ञान समजावून सांगणारे देखील नंबरवार आहेत. बाबा रोज पुरुषार्थ करवून घेतात. निश्चय-बुद्धी विजयन्ती. मुलांमध्ये बकबक करण्याची सवय खूप आहे. बाबांची आठवणच करत नाहीत. आठवण करणे खूप कठीण आहे. बाबांची आठवण करायची सोडून आपलीच बकबक ऐकवत राहतात. बाबांवरील निश्चय पक्का केल्याशिवाय बाकी चित्रांकडे जाताच कामा नये. निश्चय नसेल तर काहीच समजणार नाहीत. ‘अल्फ’वर (बाबांवर) निश्चय नसेल तर बाकी ‘बे’मध्ये (वारशामध्ये) जाणे म्हणजे टाईम वेस्ट करणे आहे. कोणाच्या नाडीला जाणत नाहीत, ओपनिंग करणाऱ्यांना देखील अगोदर बाबांचा परिचय द्यायचा आहे. हे आहेत उच्च ते उच्च बाबा ज्ञानाचा सागर. बाबा हे ज्ञान आताच देत आहेत. सतयुगामध्ये या ज्ञानाची गरज राहत नाही. नंतर सुरू होते भक्ती. बाबा म्हणतात - जेव्हा माझी निंदा पूर्ण होण्याची वेळ येते तेव्हा मी येतो. अर्धा कल्प त्यांची निंदा करायचीच आहे, ज्यांची पण पूजा करतात त्यांच्या ऑक्युपेशन विषयीच माहिती नाही. तुम्ही मुले बसून समजावून सांगता परंतु स्वतःचाच बाबांशी योग नसेल तर इतरांना काय समजावून सांगू शकाल. भले शिवबाबा म्हणतात परंतु अजिबात योगामध्ये राहत नाहीत त्यामुळे मग विकर्म सुद्धा विनाश होत नाहीत, धारणा होत नाही. मुख्य गोष्टच आहे एक बाबांची आठवण करणे.

जी मुले ‘ज्ञानी तू आत्मा’ बनण्या सोबतच ‘योगी’ बनत नाहीत, त्यांच्यामध्ये देह-अभिमानाचा अंश जरूर असणार. योग असल्याशिवाय समजावून सांगणे काहीच कामाचे नाही. मग देह-अभिमानामध्ये येऊन कोणाला ना कोणाला हैराण करत राहतील. मुले भाषण चांगले करतात तर समजतात मी ज्ञानी तू आत्मा आहे. बाबा म्हणतात - ज्ञानी तू आत्मा तर आहात परंतु योग कमी आहे, योगावर पुरुषार्थ खूप कमी आहे. बाबा किती समजावून सांगतात- चार्ट ठेवा. मुख्य आहेच योगाची गोष्ट. मुलांमध्ये ज्ञान समजावून सांगण्याची आवड तर आहे परंतु योग नाही आहे. तर योग असल्या शिवाय विकर्म विनाश होणार नाहीत मग पद तरी काय प्राप्त करणार! योगामध्ये तर खूप मुले फेल आहेत. समजतात आम्ही १०० टक्के आहोत. परंतु बाबा म्हणतात २ टक्के आहात. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतः सांगतात - ‘भोजन करत असताना आठवणीमध्ये राहतो, मग विसरून जातो. स्नान करतो तरी देखील बाबांची आठवण करतो. भले त्यांचा मुलगा आहे तरी देखील आठवण विसरायला होते’. तुम्ही समजता हे तर नंबरवनमध्ये जाणारे आहेत, जरूर ज्ञान आणि योग व्यवस्थित असेल. तरीही बाबा म्हणतात - योगामध्ये खूप मेहनत आहे. ट्रायल करून पहा मग अनुभव ऐकवा. समजा, शिंपी कपडे शिवतात तर पाहिले पाहिजे बाबांच्या आठवणीमध्ये असतो. खूप गोड माशुक आहे. त्यांची जितकी आठवण करु तितकी आपलीच विकर्मे विनाश होतील, आपण सतोप्रधान बनू. स्वतःला पहा की, मी किती वेळ आठवणीमध्ये राहतो. बाबांना रिजल्ट सांगितला पाहिजे. आठवणीमध्ये राहिल्यानेच कल्याण होईल. बाकी जास्त सांगत बसल्याने कल्याण होणार नाही. समजत काहीच नाहीत. ‘अल्फ’शिवाय काम कसे होणार? एक ‘अल्फ’ विषयी माहिती नसेल तर बाकी बिंदू, बिंदू होतो. अल्फ च्या सोबत बिंदू दिल्याने फायदा होतो. योग नाही त्यामुळे संपूर्ण दिवस टाईम वेस्ट करत राहतात. बाबांना तर दया येते, हे काय पद प्राप्त करतील. भाग्यामध्ये नाही आहे तर बाबा तरी काय करणार. बाबा तर घडो-घडी समजावून सांगतात - दैवी गुण चांगले ठेवा, बाबांच्या आठवणीमध्ये रहा. आठवण खूप जरुरी आहे. आठवणीची आवड असेल तरच श्रीमतावर चालू शकाल. प्रजा तर पुष्कळ बनणार आहे. तुम्ही इथे आलेच आहात - हे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी, यामध्येच मेहनत आहे. भले स्वर्गामध्ये जाल परंतु सजा खाऊन मग अंताला येऊन थोडेसे पद प्राप्त कराल. बाबा तर सर्व मुलांना जाणतात ना. जी मुले योगामध्ये कच्ची आहेत ती देह-अभिमानामध्ये येऊन रुसतात आणि भांडण-तंटा करत राहतात. जे पक्के योगी आहेत त्यांचे वर्तन अतिशय रॉयल शानदार असेल, फार थोडे बोलतील. यज्ञ सेवेमध्ये देखील आवड असेल. यज्ञ सेवेमध्ये हाडे सुद्धा स्वाहा व्हावीत. असे काहीजण आहेत देखील. परंतु बाबा म्हणतात आठवणीमध्ये जास्त रहा तर बाबांवर प्रेम होईल आणि आनंदामध्ये रहाल.

बाबा म्हणतात - भारत खंडामध्येच येतो. भारतालाच येऊन श्रेष्ठ बनवतो. सतयुगामध्ये तुम्ही विश्वाचे मालक होता, सद्गतीमध्ये होता आणि मग दुर्गती कोणी केली? (रावणाने) केव्हा सुरू झाली? (द्वापरपासून) अर्ध्या कल्पासाठी एका सेकंदामध्ये सद्गती प्राप्त करता, २१ जन्मांचा वारसा प्राप्त करता. तर जेव्हा पण कोणी चांगली व्यक्ती आली तर सर्वप्रथम त्यांना बाबांचा परिचय द्या. बाबा म्हणतात - मुलांनो, या ज्ञानाद्वारेच तुमची सद्गती होईल. तुम्ही मुले जाणता हा ड्रामा सेकंद बाई सेकंद चालू आहे. हे बुद्धीमध्ये लक्षात राहीले तरी देखील तुम्ही चांगल्या रीतीने स्थिर रहाल. इथे बसले आहात तरी देखील बुद्धीमध्ये रहावे हे सृष्टीचक्र उवे प्रमाणे कसे फिरत राहते. सेकंद-सेकंद टिक-टिक होत राहते. ड्रामा अनुसारच संपूर्ण पार्ट बजावला जात आहे. एक सेकंद गेला, संपला. रोल होत जातो. खूप हळू-हळू फिरतो. हा आहे बेहदचा ड्रामा. वृद्ध इत्यादी जे आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी बसू शकत नाही. ज्ञान देखील बसू शकत नाही. योग देखील नाही तरीही मुले तर आहेत. हां, सेवा करणाऱ्यांचे पद उच्च आहे. बाकीच्यांचे कमी पद असेल. हे पक्के लक्षात ठेवा. हा बेहदचा ड्रामा आहे, चक्र फिरत राहते. ज्याप्रमाणे टेप फिरत राहते ना. आपल्या आत्म्यामध्ये देखील अशी टेप भरलेली आहे. छोट्या आत्म्यामध्ये इतका सारा पार्ट भरलेला आहे, यालाच कुदरत म्हटले जाते. दिसून तर काहीच येत नाही. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जड-बुद्धीवाले समजू शकणार नाहीत. यामध्ये आपण जे बोलत जातो, टाइम पास होत जातो मग ५ हजार वर्षानंतर रिपीट होईल. अशी समज कोणाकडेच नाही. जे महारथी असतील ते वेळो-वेळी या गोष्टींकडे लक्ष देऊन समजावून सांगत राहतील; म्हणून बाबा म्हणतात सर्वात आधी तर गाठ बांधा - बाबांच्या आठवणीची. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. आत्म्याला आता घरी जायचे आहे. देहाची सर्व नाती सोडून द्यायची आहेत. जितके होईल बाबांची आठवण करत रहा. हा पुरुषार्थ आहे गुप्त. बाबा सल्ला देतात, परिचय देखील बाबांचाच द्या. आठवण कमी करता त्यामुळे मग परिचय देखील कमी देता. पहिले तर बाबांचा परिचय बुद्धीमध्ये पक्का व्हावा. बोला, आता लिहा - ‘खरोखर ते आमचे पिता आहेत’. देहा सहित सर्व काही सोडून एका बाबांची आठवण करायची आहे. आठवणीनेच तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. मुक्तिधाम, जीवन-मुक्तिधाम मध्ये तर दुःख-यातना असतच नाहीत. दिवसेंदिवस चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात. आपसामध्ये देखील याच गोष्टी करा. लायक सुद्धा बनले पाहिजे ना. ब्राह्मण बनून सुद्धा बाबांची रूहानी सेवा केली नाही तर काय कामाचा. अभ्यासाला तर चांगल्या रीतीने धारण केले पाहिजे ना. बाबा जाणतात असे बरेच आहेत ज्यांना एक अक्षर सुद्धा धारण होत नाही. यथार्थ रीतीने बाबांची आठवणच करत नाहीत. राजा-राणीचे पद प्राप्त करण्यामध्ये मेहनत आहे. जे मेहनत करतील ते उच्च पद प्राप्त करतील. मेहनत करतील तेव्हाच राजाईमध्ये जाऊ शकतील. नंबरवन घेणाऱ्यालाच स्कॉलरशिप मिळते. हे लक्ष्मी-नारायण स्कॉलरशिप घेतलेले आहेत. मग आहेत नंबरवार. खूप मोठी परीक्षा आहे ना. स्कॉलरशिपचीच माळा बनलेली आहे. ८ रत्न आहेत ना. ८ आहेत, मग १००, मग आहेत १६ हजार. तर माळेमध्ये ओवले जाण्यासाठी किती पुरुषार्थ केला पाहिजे. अंतर्मुखी राहण्याचा पुरुषार्थ केल्याने स्कॉलरशिप घेण्याचे अधिकारी बनाल. तुम्हाला खूप अंतर्मुखी रहायचे आहे. बाबा तर आहेतच कल्याणकारी. तर कल्याण करण्यासाठीच मत देतात. कल्याण तर संपूर्ण दुनियेचे होणार आहे. परंतु नंबरवार आहेत. तुम्ही इथे बाबांकडे शिकण्यासाठी आला आहात. तुमच्यामध्ये देखील ते स्टूडंट चांगले आहेत जे अभ्यासावर लक्ष देतात. काहीजण तर अजिबात लक्ष देत नाहीत. बरेचजण असे देखील समजतात - जे भाग्यामध्ये असेल. अभ्यासाचे तर लक्ष्यच नाही. तर मुलांनी आठवणीचा चार्ट ठेवायचा आहे. आपल्याला आता परत घरी जायचे आहे. ज्ञान तर इथेच सोडून जाणार. ज्ञानाचा पार्ट पूर्ण होतो. आत्मा इतकी छोटी, तिच्यामध्ये किती पार्ट आहे, आश्चर्य आहे ना. हा सारा अविनाशी ड्रामा आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही अंतर्मुखी होऊन स्वतःशी बोलत रहा तर तुम्हाला खूप आनंद होईल की बाबा येऊन अशा गोष्टी ऐकवतात की आत्मा कधीही नष्ट होणार नाही. ड्रामामध्ये प्रत्येक मनुष्याचा, प्रत्येक वस्तूचा पार्ट नोंदलेला आहे. याला बेअंत देखील म्हणता येणार नाही. अंत तर मिळाला आहे परंतु हा आहे अनादि. किती गोष्टी आहेत. याला कुदरत (प्रकृतीचा चमत्कार) म्हणावे! ईश्वरीय शक्ती देखील म्हणू शकत नाही. ते तर म्हणतात माझा देखील यामध्ये पार्ट आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) योगामध्ये खूप मेहनत आहे, प्रयत्न करून पहायचे आहे की कर्म करत असताना किती वेळ बाबांची आठवण राहते! आठवणीमध्ये राहिल्यानेच कल्याण आहे, गोड माशुकची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे, आठवणीचा चार्ट ठेवायचा आहे.

२) महीन-बुद्धिद्वारे या ड्रामाच्या रहस्याला समजून घ्यायचे आहे. हा खूप-खूप कल्याणकारी ड्रामा आहे, आपण जे बोलतो किंवा करतो ते मग ५ हजार वर्षानंतर रिपीट होईल, याला यथार्थ रित्या समजून घेऊन आनंदामध्ये रहायचे आहे.

वरदान:-
आपल्या श्रेष्ठ जीवना द्वारे परमात्म ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रूफ देणारे माया प्रूफ भव

स्वतःला परमात्म ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रमाण किंवा प्रूफ समजल्याने माया प्रूफ बनाल. प्रत्यक्ष प्रुफ आहे - तुमचे श्रेष्ठ पवित्र जीवन. सर्वात मोठी असंभव पासून संभव होणारी गोष्ट प्रवृत्तीमध्ये राहत असताना पर-वृत्तीमध्ये रहाणे. देह आणि देहाच्या दुनियेतील संबंधांपासून पर (न्यारे) रहाणे. जुन्या शरीराच्या डोळ्यांद्वारे जुन्या दुनियेच्या वस्तूंना पाहत असताना देखील बघायचे नाही अर्थात संपूर्ण पवित्र जीवनामध्ये चालणे - हेच परमात्म्याला प्रत्यक्ष करण्यासाठी किंवा माया प्रूफ बनण्याचे सोपे साधन आहे.

बोधवाक्य:-
अटेंशन रुपी पहारेकरी ठीक असेल तर अतींद्रिय सुखाचा खजिना हरवू शकत नाही.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना” बाबांना कंपेनियन तर बनविले आहे आता त्यांना कंबाइंड रुपामध्ये अनुभव करा आणि या अनुभवाला वारंवार स्मृतीमध्ये आणत-आणत स्मृती स्वरूप बना. वारंवार चेक करा की मी कंबाइंड आहे, दूर तर नाही गेलो? जितके कंबाइंड-रुपाचा अनुभव वाढवत जाल तितके ब्राह्मण जीवन खूप सुंदर, मनोरंजक अनुभव होईल.