09-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - तुम्ही
इथे आला आहात सेल्फ रियलाइज (आत्म अनुभूती) करण्याकरिता, तुम्ही स्वतःला आत्मा
समजून परमात्मा पित्याकडून ऐका, देही-अभिमानी होऊन राहण्याचा अभ्यास करा”
प्रश्न:-
बरेचदा मुलांना
काहीजण प्रश्न विचारतात की, ‘तुम्ही आत्म्याचा साक्षात्कार केला आहे का?’, तर तुम्ही
त्यांना कोणते उत्तर द्याल?
उत्तर:-
बोला - हो,
आम्ही आत्म्याचा साक्षात्कार केला आहे. आत्मा ज्योतीबिंदू आहे. आत्म्यामध्येच चांगले
अथवा वाईट संस्कार आहेत. आत्म्याचे संपूर्ण नॉलेज आता आम्हाला मिळाले आहे. जोपर्यंत
आत्म्याचा साक्षात्कार केला नव्हता तोपर्यंत देह-अभिमानी होतो. आता आम्हाला
परमात्म्याद्वारे गॉड रियलायजेशन आणि सेल्फ रियलायजेशन झाले आहे (भगवंताचा
साक्षात्कार आणि आत्म साक्षात्कार झाला आहे).
गीत:-
ना वह हमसे
जुदा होंगे…
ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी हे गाणे ऐकले. रूहानी मुले बोलतात शरीराद्वारे. असे कधी कोणी
म्हणणार नाही की, आम्ही साधू-संतांसाठी प्राणही देऊ. मुले जाणतात - आपल्याला
त्यांच्या सोबत जायचे आहे, हे शरीर सोडून द्यायचे आहे. म्हणून म्हणतात - हे शरीर
सोडून आम्ही बाबांसोबत निघून जाणार. बाबा आलेलेच आहेत सोबत घेऊन जाण्याकरिता. ही
नीट समजून घेण्याची गोष्ट आहे. मुले बोलावतात - ‘आम्हा पतितांना येऊन पावन बनवा’,
मग काय करू. इथे तर सोडून जाणार नाहीत. ही सारी दुनिया पतित आहे, या पतित
दुनियेमधून पावन दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरिता बाबा आले आहेत. आम्हा आत्म्यांना
सोबत घेऊन जातील. ही सारी दुनिया विशश आहे (विकारी आहे) - हे देखील तुम्हीच जाणता.
तुम्ही कोणाला विकारी, पतित म्हणाल तरी देखील चिडतील. लोकांना खूप युक्तीने समजावून
सांगायचे आहे. महिमा करायची आहे एका बाबांची. आता तुम्हा मुलांना नॉलेज मिळाले आहे,
खूप हुशारीने बोलायचे आहे. जर असे दिसून आले की, प्रश्नोत्तरे करत आहेत, तर बोला -
‘आम्ही अजून कच्चे आहोत, आमच्या मोठ्या दीदी येऊन तुम्हाला सांगतील’.
तुम्ही म्हणता -
‘शिवबाबा म्हणतात, भगवानुवाच - सर्व मनुष्य पतित आहेत’. भगवान काही पतित असू शकत
नाहीत. पतित-पावनला बोलावतात कारण स्वतः पतित आहेत. देहधारींना ‘भगवान’ म्हणू शकत
नाही. भगवान, निराकार शिवाला म्हटले जाते, शिवाची मंदिरे देखील पुष्कळ आहेत. सर्वात
आधी जेव्हा एका गोष्टीला समजून घेतील तेव्हाच थांबू शकतील. सर्वप्रथम हे सांगा की,
शिव भगवानुवाच - शिवबाबा म्हणतात की मामेकम् (मज एकाची) आठवण करा. त्यांना आपले
स्वतःचे शरीर नाही आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील स्वतःचे सूक्ष्म शरीर आहे,
ते दिसून येते. हे तर दिसतच नाहीत; त्यांना म्हटले जाते - परमपिता परमात्मा. तुम्ही
देखील म्हणाल - मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेतो. तुम्ही आपल्या आत्म्याचा
साक्षात्कार केला आहे. भक्तिमार्गामध्ये साक्षात्कार करण्याकरिता नवधा भक्ती करतात.
परंतु भक्ती करणाऱ्यांनी कधी साक्षात्कार केलेला नाही. ते काय चीज आहेत, हे अजिबात
जाणत नाहीत. फक्त म्हणतात - ते निराकार आहेत. बोलते तर आत्माच. संस्कार देखील
आत्म्यामध्येच असतात. आत्मा निघून जाते तर ना आत्मा, ना शरीर बोलू शकते. आत्मा
शरीराशिवाय काहीही करू शकत नाही. पहिले तर आत्म्यालाच ओळखायचे आहे आणि बाबांद्वारेच
बाबांना ओळखू शकाल. आत्म्याला परमपिता परमात्म्याचा साक्षात्कार कसा होऊ शकतो -
जेव्हा की स्वतःलाच जाणत नाहीत, ना पाहू शकत. भले म्हणतात - ‘चमकता है अजब सितारा…’
परंतु हे कोणाला माहित नाही की आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेला आहे.
मनुष्य एकदम देह-अभिमानामध्ये राहतात. आता बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना. स्वतःला
आत्मा समजून मग माझ्याकडून ऐका. ऐकणारी आत्मा आहे, आत्म्याला ऐकविणारे परमात्माच
पाहिजेत. मनुष्याला समजावून सांगणारा मनुष्यच असेल. हे आत्म्याचे ज्ञान कोणालाच
नाहीये; म्हणून म्हटले जाते पहिले आत्म्याला जाणून घ्या. सेल्फ रियलायजेशन (आत्म
अनुभूती) करा. आत्मा स्वतःच म्हणते - आम्ही आत्म्याचा अनुभव कसा करायचा? हे थोडेच
कोणाला माहित आहे की, आपल्या आत्म्यामध्ये कसा सगळा पार्ट भरलेला आहे. साधू-संन्यासी
इत्यादी कोणीही सांगू शकणार नाही. बाबांनाच येऊन मुलांना सेल्फ रियलायजेशन (आत्म
अनुभूती) करवून द्यावे लागते. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मज निराकार
परमपिता परमात्म्याकडून ऐका. आत्मा आणि परमात्मा जेव्हा भेटतील तेव्हाच या गोष्टी
होतील. दुनियेला हे ठाऊकच नाही की परमपिता परमात्मा कधी येतात. येऊन कसे समजावून
सांगतील? त्यांना न जाणल्या कारणाने मतभेदामध्ये येतात. त्या सर्वांचा आधार
शास्त्रांवर अवलंबून आहे. बाबा म्हणतात - त्याद्वारे (शास्त्रांद्वारे) तुम्ही ना
मला अनुभव करू शकणार, ना स्वतःला अनुभव करू शकणार. ते तर म्हणतात - ‘आत्मा सो
परमात्मा’. असे म्हटल्याने काय होणार. आपल्याला पतितापासून पावन कोण बनवेल?
त्रिकालदर्शी कोण बनवेल? आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही; म्हणून
तुम्ही म्हणता - जे आत्मे आपल्या पित्याला ओळखत नाहीत ते नास्तिक आहेत. ते मग
म्हणतात की जे भक्ती करत नाहीत, ते नास्तिक आहेत. आता तुम्ही मुले भक्ती तर करत नाही.
तुमच्याकडे चित्रे खूप चांगली आहेत. चित्रांवरूनच ज्ञान समजावून सांगितले जाते. कोणी
जगाचा नकाशाच पाहिला नसेल तर त्यांना कसे ठाऊक होईल, लंडन कुठे आहे? अमेरिका कुठे
आहे? जोपर्यंत टीचर बसून नकाशावरून समजावून सांगणार नाहीत. म्हणून तुम्ही ही चित्रे
बनवून घेतली आहेत परंतु डिटेलमध्ये कोणी समजू शकत नाही. सूर्यवंशीयांनी ही राजधानी
कुठून घेतली? मग चंद्रवंशीयांनी कशी घेतली? सूर्यवंशीं सोबत युद्ध केले काय? तुम्ही
समजता सर्वांना वारसा एका बाबांकडून मिळतो. सूर्यवंशी, चंद्रवंशी तर विश्वाचे मालक
आहेत. दुसरा कोणताच धर्म तिथे नसतो तर युद्धाचा प्रश्नच नाही. आता तुम्ही समजता,
आपण विश्वाचे मालक बनतो. असे नाही की सूर्यवंशीयांकडून चंद्रवंशीयांनी जिंकून घेतले
अथवा युद्ध झाले. नाही, वेगवेगळे घराणे असते.
आता तुमच्या
बुद्धीमध्ये या चित्रांचे सगळे नॉलेज आहे. शाळेमध्ये देखील स्टूडेंट शिकतात तर
बुद्धीमध्ये सगळे नॉलेज येते. छोट्या मुलांना पुस्तकामध्ये दाखवले जाते - हा हत्ती
आहे, हा अमका आहे. आता तुम्ही या ड्रामा विषयी जाणले आहे. हे सारे चक्र बुद्धीमध्ये
आहे. या आहेत सर्व नवीन गोष्टी आणि या गोष्टींना ब्राह्मण कुळाचेच समजतील. बाकीचे
तर फालतू वाद-विवाद करत बसतील. असे देखील नाही की सर्वांना एकत्र बसवून सांगितले
जाऊ शकते. नाही, वेगवेगळे बसवून समजावून सांगावे लागेल. नियम सुद्धा आहे - पहिले
पित्याला आणि आत्म्याला समजून घ्यावे लागेल, त्यानंतर मग त्यांनी क्लासमध्ये बसावे,
तेव्हा त्यांना समजेल, नाहीतर काहीच समजू शकणार नाहीत. शंकाच काढत बसतील. तुम्हाला
समजावून सांगायचे आहे भगवान एकच आहेत - ते उच्च ते उच्च आहेत. देवतांना देखील भगवान
म्हणू शकत नाही. आत्म्याचे देखील ज्ञान आता तुम्हाला मिळाले आहे. कर्माचे फळ आत्माच
भोगते. संस्कार आत्म्यामध्येच असतात. आत्मा ऐकते या कर्मेंद्रियांद्वारे. भगवान पिता
एक आहेत, वारसा त्यांच्याकडूनच मिळतो. बाबांनी सांगितले आहे - तुम्ही स्वतःला आत्मा
निश्चय करा आणि बाबांशी बुद्धीयोग लावा. जन्म-जन्मांतर भक्ती करत आला आहात.
हनुमानाचे देखील पुजारी असतील तर हनुमानाची आठवण करतील किंवा श्रीकृष्णाचे पुजारी
असतील तर श्रीकृष्णाची आठवण करतील. आता तुम्हाला समजावून सांगितले जाते आहे की,
तुम्ही आत्मा आहात. तुमचे पिता परमपिता परमात्मा आहेत. त्यांची आठवण केल्याने त्या
पित्याचा वारसा मिळेल; जे पिता स्वर्गाचे रचयिता आहेत, तर जरूर आपण स्वर्गामध्ये
असायला हवे. भारत स्वर्ग होता. आता काही स्वर्ग नाही आहे, जिथे राज्य असेल.
नरकामध्ये तर रावणाचे राज्य आहे. आपले राज्य कसे चालले, आणि मग खाली कसे उतरलो,
काहीच जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता - पुनर्जन्म घेत-घेत आपल्याला खाली उतरायचेच आहे
(पतन व्हायचेच आहे). आता पुन्हा बाबा म्हणतात, माझी आठवण करा तरच तुम्ही पावन बनाल.
स्वर्गाचा वारसा मिळेल. आपण बाबांचे बनतो तर बाबांचा वारसा मिळतो. परंतु जोपर्यंत
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनत नाही, योगाद्वारे पावन बनणार नाही तोपर्यंत वारसा
मिळू शकणार नाही. बाबा म्हणतात, माझी आठवण केल्याने तुमची विकर्म विनाश होतील,
विकर्माजीत बनाल, ही गॅरंटी आहे. स्पष्टीकरण द्यावे लागते. कोणी समजून घेतील, तर
कोणी पंडित-बुद्धीवाले असले तर ते गोंधळ घालू लागतात. कोणी ना कोणी विघ्न टाकणारे
देखील समोर येतात. कोणी गोंधळ घातला तर बोलले पाहिजे - एकांतामध्ये येऊन समजून घ्या.
इथला कायदा आहे - ७ दिवस भट्टीमध्ये राहून समजून घेणे; कारण हे ज्ञान नवीन असल्या
कारणाने माणसे गोंधळतात. कुठेही जेव्हा पहिले नवीन सेंटर उघडते तर तिथे हुशार मुले
असली पाहिजेत जी सर्वांना समजावून सांगू शकतील. भगवान तर सर्वांचे एकच आहेत, सर्व
आत्मे भाऊ-भाऊ आहेत. परमात्मा सर्वांचे पिता आहेत. बोलावतात की, ‘पतित-पावन या’, तर
जरूर ते पावन आहेत, ते कधीही पतित बनत नाहीत. बाबाच येऊन पतितांना पावन बनवतील.
सतयुगामध्ये सर्व आहेत पावन. कलियुगामध्ये सर्व आहेत - पतित. पतित संख्येने जास्त
असतात, पावन कमी असतात. सगळेच काही सतयुगामध्ये जाणार नाहीत. जे पतितापासून पावन
बनतात, तेच पावन दुनियेमध्ये जातात. बाकी सर्व निर्वाण दुनियेमध्ये निघून जातील. हे
देखील जाणता, सारी दुनिया काही येऊन श्रीमत घेणार नाही. हे कठीण आहे, जे तुम्ही
साऱ्या दुनियेला मत द्याल. आता सर्वांच्या महाविनाशाची वेळ आहे. विनाश सर्वांचा
होणारच आहे. समजावून सांगण्यासाठी मोठे चातुर्य पाहिजे. जे शांतीने बसून ऐकतील,
कोणताही व्यत्यय आणणार नाहीत. सर्वप्रथम तर बाबांचा परिचय द्या. शिवबाबाच पतित-पावन
आहेत, तेच समजावून सांगतात. गीतेमध्ये देखील हे शब्द प्रसिद्ध आहेत. पतित-पावन
बाबाच सांगतात की, ‘माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील’. हे शब्द गीतेशीच
संबंधित आहेत. शिवबाबांनी सांगितले आहे - माझी आठवण करा. मी सर्वशक्तिवान पतित-पावन
आहे. गीता ज्ञान दाता, ज्ञानाचा सागर आहे. गीतेमधील शब्द तर आहेत ना. फक्त ते
दुनियावाले म्हणतात - श्रीकृष्ण भगवानुवाच, आणि तुम्ही म्हणता - शिव भगवानुवाच.
भगवान निराकार आहेत, ते कधीही पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. अलौकिक दिव्य जन्म घेतात.
स्वतःच सांगतात - मी साधारण वृद्ध तनामध्ये येतो, ज्याला भागीरथ म्हणतात. ब्रह्मा
द्वारेच रचना रचतात. तर मनुष्याचे नाव ‘ब्रह्मा’ ठेवले जाते. व्यक्त ब्रह्मा मग
पावन अव्यक्त फरिश्ता बनतात. बाबा येतातच मुळी पतितांना पावन बनविण्याकरिता. तर
जरूर मग पतित दुनिया, पतित शरीरामध्येच येतील. हे आहे विस्तृत स्पष्टीकरण.
सर्वप्रथम तर हे समजावून सांगितले पाहिजे की, भगवान म्हणतात की, कल्पापूर्वी प्रमाणे
माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील, पतितापासून पावन बना. गातात देखील -
‘हे पतित-पावन या’. गंगा तर आहेच. तुम्ही जर बोलावता तर जरूर कुठून तरी येतील.
पतित-पावन येतात पतितापासून पावन बनविण्याचा पार्ट बजावण्यासाठी. बाबा म्हणतात,
तुम्ही आधी पावन होता मग तुमच्यामध्येच भेसळ पडली आहे, ती योगबलानेच निघेल. तुम्ही
पवित्र बनाल मग पावन दुनियेमध्येच याल. पतित दुनियेचा विनाश होईल. जे सांगितले जाते
त्याला चांगल्या रीतीने धारण करायचे आहे. आपण तर केवळ उच्च ते उच्च बाबांची महिमा
करतो. बेहदचे बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही ८४ जन्मांचा पार्ट बजावता-बजावता
किती पतित बनले आहात. अगोदर पावन होता, आता पतित बनले आहात, मग आठवणीच्या यात्रेवर
राहिल्याने तुम्ही पावन बनाल. भक्तिमार्गामुळे तुम्ही शिडी खालीच उतरत आला आहात. ही
तर अगदी सोपी गोष्ट आहे. हे तर मुलांच्या बुद्धीमध्ये पक्के झाले पाहिजे. पहाटे
उठून विचार सागर मंथन केले पाहिजे; मग जे कोणी येतील त्यांना हे ज्ञान समजावून
सांगायचे आहे. मुरलीचे मुख्य पॉईंट्स लिहून घेतले पाहिजेत, मग पुन्हा ते वाचून काढले
पाहिजेत. म्हणजे मग मनामध्ये पक्के होतील.
सर्वात पहिली मुख्य
गोष्ट आहे बाबांची आठवण करणे. बाबाच म्हणतात - मनमनाभव, माझी आठवण करा तर विकर्म
विनाश होतील. आता करा अथवा नका करू तुमची मर्जी. बाबांचा आदेश मिळालेला आहे. पावन
दुनियेमध्ये यायचे असेल तर मग पतित दुनियेमध्ये बुद्धीचा योग जाता कामा नये.
विकारामध्ये जायचे नाही. स्पष्टीकरण (माहिती) तर खूप मिळत राहते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) पहाटे लवकर
उठून विचार सागर मंथन करायचे आहे. बाबा जे ऐकवतात ते लिहून घेऊन मग ते पुन्हा वाचून
काढायचे आहे, इतरांना ऐकवायचे आहे. सर्वांना सर्वप्रथम बाबांचाच परिचय द्यायचा आहे.
२) पावन दुनियेमध्ये
येण्याकरिता या पतित दुनियेमधून बुद्धियोग काढून टाकायचा आहे.
वरदान:-
नंबर वन
बिझनेसमॅन बनून प्रत्येक सेकंदाला आणि संकल्पामध्ये कमाई जमा करणारे पदमपती भव
नंबर वन बिजनेसमॅन तो
आहे जो स्वतःला बिझी ठेवण्याच्या पद्धतीला जाणतो. बिजनेसमॅन अर्थात ज्यांचा एकही
संकल्प व्यर्थ जाणार नाही, प्रत्येक संकल्पामध्ये कमाई असेल. जसे ते बिजनेसमॅन
प्रत्येक पैशाला कार्यामध्ये लावून त्याचे कोट्यवधी बनवतात, असे तुम्ही देखील एक-एक
सेकंद आणि संकल्प कमाई करून दाखवा तेव्हाच पदमपती बनाल. यामुळे बुद्धीचे भटकणे बंद
होईल आणि व्यर्थ संकल्पांची तक्रार देखील बंद होईल.
बोधवाक्य:-
जो मागतो तो
खुशीच्या खजिन्याने समृद्ध होऊ शकत नाही.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
नेहमी मास्टर
सर्वशक्तिवानच्या सीटवर सेट राहणारेच अचल अडोल राहतात. बापदादा म्हणतात - मुलांनो,
तुमचे शरीर जरी गेले तरी तुमची खुशी गायब होऊ नये. पैसे तर त्याच्या पुढे काहीच
नाहीत, ज्याच्याकडे खुशीचा खजिना आहे त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट मोठी नाही; आणि
नेहमी सहयोगी सेवाधारी मुलांसोबत बापदादा असतातच त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज
नाही.