09-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, वृक्षपती बाबांनी तुम्हा मुलांवर बृहस्पतीची दशा बसवली आहे, आता तुम्ही अविनाशी सुखाच्या दुनियेमध्ये जात आहात”

प्रश्न:-
अविनाशी बृहस्पतीची दशा कोणत्या मुलांवर बसते, त्यांची लक्षणे काय असतील?

उत्तर:-
जी मुले जिवंतपणी देहाच्या सर्व नात्यांचा त्याग करून स्वतःला आत्मा निश्चय करतात, अशा निश्चय आत्मिक बुद्धी असणाऱ्या मुलांवर बृहस्पतीची दशा बसते. त्यांच्याच सुखाचे गायन आहे की अतींद्रिय सुख गोप-गोपींना विचारा. त्यांचा आनंद कधीही हरवू शकत नाही.

गीत:-
ओम् नमो शिवाय…

ओम शांती।
मुलांनी बाबांची महिमा ऐकली. आजच्या दिवसाला म्हटलेच जाते वृक्षपती डे, या सर्वांना मिळून म्हटले आहे - ‘बृहस्पती’. यालाच गुरुवार देखील म्हटले जाते. ना केवळ गुरुवार परंतु सद्गुरुवार. बंगालमध्ये खूप मानतात. गायले जाते मनुष्य सृष्टीचे बीजरूप म्हणून वृक्षपती म्हणतात. बीज झाले, तर पती देखील झाले. वृक्षाच्या बीजाला पिता देखील म्हणणार. त्यांच्यापासून वृक्षाची उत्पत्ती होते. हे आहे मनुष्यसृष्टीरूपी झाड. याचे बीज वर आहे. तुम्ही जाणता आम्हा मुलांवर आता अविनाशी वृक्षपतीची दशा आहे कारण अविनाशी स्वराज्य मिळत आहे. सतयुगाला म्हटलेच जाते अविनाशी सुखधाम. कलियुगाला म्हटले जाते विनाशी दुःखधाम. आता दुःखधामचा विनाश होणार आहे. सुखधाम अविनाशी आहे, हे अर्धा कल्प चालते जे अविनाशी वृक्षपती स्थापन करत आहेत. मुलांनी सेवेसाठी पॉईंट्स नोट करून घ्यायचे आहेत. प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने हे-हे पॉईंट्स समजावून सांगायचे आहेत कारण मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. खरोखर, हे आहे ज्ञान. आता बाबा हे ज्ञान देतातच मुळी नवीन आणि जुन्या दुनियेच्या मध्यावर, नंतर मग हे प्रायः लोप होते. देवतांना हे ज्ञान नसते. जर या चक्राचे ज्ञान असेल तर मग राजाईमध्ये मजाच येणार नाही. आता देखील तुम्हाला असा विचार येतो ना की, राज्य मिळवून पुन्हा आमची हीच हालत होणार काय! परंतु हा तर ड्रामा बनलेला आहे. चक्राला फिरावेच लागणार आहे. वर्ल्डची हिस्ट्री-जॉग्राफी रिपीट होत आहे. कशी रिपीट होत आहे - हे तुम्ही मुलेच जाणता. ही आहे मनुष्य सृष्टी. तुमच्या बुद्धीमध्ये मूलवतनचे झाड देखील आहे. सर्वांचा सेक्शन वेगवेगळा आहे. या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये कधीही आल्या नसतील. कोणत्या शास्त्रांमध्ये तर या गोष्टी लिहिलेल्या नाहीत. आपण आत्मे मूळचे शांतीधामचे रहिवासी आहोत, अविनाशी आहोत. कधीही विनाशाला प्राप्त होत नाही. ते समजतात की, बुडबुडा पाण्यातून निघून मग त्यामध्येच विलीन होतो. तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण रहस्य आहे. आत्मा अविनाशी आहे, जिच्यामध्ये संपूर्ण पार्ट नोंदवलेला आहे. हे चक्राचे नॉलेज कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीये. भले काही ठिकाणी स्वास्तिक देखील दाखवतात. चक्राच्या फक्त अशा-अशा रेषा मारून दाखवतात, ज्यावरून सिद्ध होते की अनेक धर्म होते. बाबांनी समजावून सांगितले आहे की, मुख्य धर्म आणि शास्त्रे चारच आहेत, सतयुग-त्रेतायुगामध्ये तर कोणताही धर्म स्थापन होत नाही, ना तिथे कोणते धर्म-शास्त्र असते. हे सर्व द्वापर पासून सुरू होते. आणि नंतर मग बघा किती वृद्धी होते. अच्छा - गीता कधी ऐकवली गेली? बाबा म्हणतात - मी कल्पाच्या संगमयुगावरच येतो. त्यांनी मग ‘कल्प’ शब्द काढून फक्त ‘संगमयुगे-युगे’ लिहिले आहे. वास्तविक, संगमयुगावर इतर कोणताही धर्म स्थापन करत नाहीत. असे नाही की त्रेताच्या शेवटी, द्वापरच्या सुरुवातीच्या संगमावर इस्लामी धर्म स्थापन झाला. नाही, म्हणतील की, द्वापरमध्ये स्थापन झाला. हा संगमाचा अतिशय सुंदर असा काळ आहे, ज्याला ‘कुंभ’ म्हणतात. ‘कुंभ’, संगमाला म्हटले जाते. हा आहे आत्मे आणि परमात्म्याच्या मिलनाचा संगम. हा रूहानी मेळावा संगमावरच होतो. त्यांनी पाण्याच्या गंगेचे नाव प्रसिद्ध करून टाकले आहे. ज्ञानसागर, पतित-पावनला कोणीही जाणतच नाहीत. त्यांनी कसे पतित दुनियेला पावन बनवले हे कोणत्याही शास्त्रामध्ये नाहीये. आता तुम्हा मुलांना बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. देहाच्या सर्व धर्मांचा त्याग करा. हे कोणाला सांगत आहेत? आत्म्यांना. याला म्हटले जाते जिवंतपणी मरणे. मनुष्य शरीर सोडतात, तेव्हा देहाची सर्व नाती संपून जातात.

बाबा म्हणतात - जी काही देहाची नाती आहेत ती सर्व सोडून स्वतःला आत्मा निश्चय करा. निश्चय आत्मिक-बुद्धी बना. जितकी जास्त आठवण कराल तर बृहस्पतीची दशा बसेल. चेक करा की, मी शिवबाबांची किती आठवण करतो! आठवणीद्वारेच गंज निघत जाईल आणि तुम्हाला आनंद होईल. तुम्ही अनुभव करू शकता, मी आत्मा बाबांची किती आठवण करतो. जर कमी आठवण कराल तर गंज सुद्धा कमीच निघेल. आनंदही कमी असेल. पद देखील कमी दर्जाचे प्राप्त कराल. आत्माच सतो, रजो, तमो बनते. गोप-गोपींच्या अतींद्रिय सुखाचे हे गायन याच वेळचे आहे. बाबांशिवाय इतर कशाचीही आठवण येत नाही, तेव्हाच आनंदाचा पारा चढेल. आमच्यावर बृहस्पतीची दशा अथवा सद्गुरूची दशा आहे. आणि जेव्हा कधी आनंद नाहीसा होतो तर म्हणतात - बृहस्पतीची दशा बदलून राहूची दशा बसली आहे. कोणी खूप श्रीमंत असतात, कोणी सट्टा लावतात आणि दिवाळे निघते. भारतातच जेव्हा ग्रहण लागते तेव्हा म्हणतात - ‘दे दान तर सुटेल ग्रहण’. तुमचा देवी-देवता धर्म देखील १६ कला संपूर्ण होता, त्याला ग्रहण लागलेले आहे. राहूची दशा बसते म्हणून देवतांच्या समोर जाऊन गातात - ‘तुम्ही सर्वगुण संपन्न... आम्ही पापी, कपटी आहोत’. आता तुम्ही समजता राहूचे ग्रहण लागल्यामुळे सर्वजण काळे बनले आहेत. चंद्राची शेवटी एक कोर शिल्लक राहते. बाबा देखील समजावून सांगतात तुम्हा देवी-देवतांची देखील चित्रे आहेत. गीता हेच आदि सनातन देवी-देवता धर्माचे शास्त्र आहे. परंतु ते आपल्या धर्माला जाणत नाहीत. रिलीजस हेड्सच्या कॉन्फरन्सेस (धार्मिक प्रमुखांच्या परिषदा) आयोजित करतात. तुम्ही तिथेही जाऊन समजावून सांगू शकता - ईश्वर काही सर्वव्यापी नाहीये. ते तर बेहदचे पिता आहेत. मुलांना येऊन वारसा देतात. साधू-संत इत्यादींना तर वारसा मिळत नाही मग ते मानणार तरी कसे! तुम्हा मुलांनाच वारसा मिळतो. मुख्य गोष्ट तर हीच सिद्ध करायची आहे की, ईश्वर सर्वव्यापी नाही. शिवजयंती करतात. ‘शिवजयंती’ म्हणा अथवा ‘रुद्र जयंती’ म्हणा; ‘रुद्र’ हा ज्ञान-यज्ञ रचतात. आहेत तर शिव. तोच गीता ज्ञान-यज्ञ आहे, ज्यामधून विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली आहे. प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही पाहता की, निराकार बाबांनी कसा रुद्र ज्ञान-यज्ञ रचला आहे. साकार तर काही करू शकत नाही. हा बेहदचा यज्ञ आहे, यामध्ये सारी जुनी दुनिया स्वाहा होणार आहे. बाकीचे तर ते सर्व आहेत भौतिक यज्ञ. किती रात्रं-दिवसाचा फरक आहे. बाबा म्हणतात - हा रुद्र ज्ञान-यज्ञ आहे, विनाश देखील होणार आहे. तुम्ही जेव्हा पास व्हाल, पूर्ण योगी आणि ज्ञानी बनाल तेव्हा मग तुमच्यासाठी नवीन दुनिया स्वर्ग पाहिजे. नरकाचा विनाश जरूर झाला पाहिजे. राजस्व अश्वमेध शब्द देखील योग्य आहे. घोड्याला स्वाहा करतात, वास्तविक हा आहे तुमचा रथ. एक, ‘दक्ष प्रजापती’चा देखील यज्ञ रचतात, त्याची देखील एक कहाणी आहे.

आता तुम्हा मुलांना किती आनंद झाला पाहिजे - आम्हाला वृक्षपती बाबा शिकवत आहेत. आमच्यावर आता बृहस्पतीची दशा आहे, आमची अवस्था खूप चांगली आहे. मग चालता-चालता लिहितात - ‘बाबा, आम्ही तर गोंधळून गेलो आहोत. आधी आम्ही खूप आनंदात होतो, आता माहिती नाही काय झाले आहे’. इथे येऊन बाबांचे बनणे ही खूप मोठी यात्रा आहे. तिथे तीर्थयात्रांना जातात तेव्हा किती पैसे खर्च करतात. आता इथे तर दान करण्याची गोष्टच नाही. यामध्ये काहीच पैसा खर्च करायचा नाहीये. त्या आहेत भौतिक यात्रा, तुमची आहे रूहानी यात्रा. भौतिक यात्रेने काहीच फायदा नाही. गीतेमध्ये देखील आहे ना - ‘चोहो दिशांना फेऱ्या मारल्या, तरीही जन्म-जन्मांतर दूरच राहिलो’. आता तुम्ही समजता किती असंख्य यात्रा केल्या असतील. कुठे ना कुठे मनुष्य जातात जरूर. हरिद्वारमध्ये गंगाजीच्या स्थळावर जरूर जातात. गंगेला पतित-पावनी समजतात ना. आता वास्तविक तुम्ही आहात खऱ्या-खऱ्या ज्ञान-गंगा. तुमच्याकडे सुद्धा पुष्कळ लोक येऊन ज्ञान स्नान करतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - सद्गुरू एकच आहे. सर्वांचा सद्गती दाता एका सद्गुरूंशिवाय दुसरा कोणीही गुरू नाही. बाबा म्हणतात - मी तुम्हाला कल्प-कल्प संगमयुगावर येऊन सद्गती देऊन पुजारी पासून पूज्य बनवितो. आणि मग पुन्हा तुम्ही पुजारी बनून दुःखी बनता. हे देखील आताच समजले आहे. बरोबर आमचे अर्धा कल्प राज्य चालते, मग द्वापरमध्ये आम्ही सो देवी-देवता वाममार्गामध्ये निघून जातो. जेव्हा रावण राज्य सुरू होते तेव्हापासूनच वाममार्ग सुरू होतो. त्याच्या देखील खाणाखुणा आहेत. जगन्नाथाच्या मंदिरात गेलात तर आत काळी मूर्ती आहे. बाहेर देवतांची गलिच्छ चित्रे आहेत. त्या वेळी आपल्याला थोडेच कळत होते की हे काय आहे. विकारी मनुष्य विकारी दृष्टीनेच पाहणार. तर वाटत होते की, देवता देखील विकारी होते. हे लिहिलेले आहे देवता वाममार्गामध्ये जातात. ड्रेस देखील देवतांचाच दाखवला आहे. इथे दिलवाडा मंदिरामध्ये देखील जर गेलात तर वर छतावर स्वर्ग दाखवलेला आहे. खाली तपस्येमध्ये बसले आहेत. या सर्व रहस्यांना इतर कोणीही जाणत नाही. बाबांचा तर अनुभवी रथ आहे ना.

तुम्ही मुले आता समजत आहात - आत्मायें और परमात्मा अलग रहे बहुकाल... तुम्ही जे सर्वात आधी बाबांपासून वेगळे झाला (दुरावला) आहात आणि मग तुम्हीच सर्वात पहिले बाबांना येऊन भेटता. सतयुगाचा फर्स्ट प्रिन्स आहे - श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचे वडील देखील असतील ना. श्रीकृष्णाच्या आई-वडीलांविषयी इतके काही दाखवत नाहीत. फक्त एवढेच दाखवतात की, डोक्यावर ठेवून नदीतून त्या पलीकडे घेऊन गेले. राजाई इत्यादी काहीच दाखवलेली नाहीये. श्रीकृष्णाच्या वडिलांची महिमा का नाहीये! आता तुम्ही जाणता या वेळी श्रीकृष्णाच्या आत्म्याने चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे. ज्यामुळे आई-वडीलांपेक्षाही उच्च पद प्राप्त केले आहे. तुम्ही समजता आम्ही श्रीकृष्णाच्या राजधानीमध्ये होतो, स्वर्गामध्ये तर होतो ना. नंतर मग आम्ही चंद्रवंशी बनलो. आता पुन्हा सूर्यवंशी बनण्यासाठी श्रीमतावर चालून पावन बनून पावन दुनियेचे मालक बनणार. प्रत्येक जण आपल्या अवस्थेला पाहू शकता. जर आपण या वेळी शरीर सोडले तर कोणत्या गतीला प्राप्त करू. प्रत्येक जण समजू शकतात. जितकी बाबांची आठवण कराल तितकी विकर्म विनाश होतील. मनुष्यावर जेव्हा काही संकटे येतात किंवा दुःख होते किंवा दिवाळे निघते तेव्हा साधूंकडे जाऊन त्यांच्या सहवासात जाऊन बसतात. मग लोक समजतात की हा तर भक्त माणूस आहे, फसवणूक थोडीच करेल. अशा व्यक्ती देखील दोन-चार वर्षांतच खूप श्रीमंत होतात. त्यांचे खूप लपवून ठेवलेले पैसे असतात. प्रत्येक जण आपल्या बुद्धीने समजू शकतो. तुमच्यामध्येही असे अनेक आहेत जे खूप कमी आठवण करतात म्हणून बाबा म्हणतात स्वतःचे कल्याण करू इच्छित असाल तर स्वतःजवळ नोटबुक ठेवा. चार्ट लिहा की, मी दिवसभरामध्ये किती वेळ आठवणीमध्ये राहिलो. माणसे तर आपली संपूर्ण जीवन कहाणी लिहितात. तुम्हाला तर फक्त आठवणीचा चार्ट लिहायचा आहे, यामध्ये आपलीच उन्नती आहे. बाबांची आठवण केली नाही तर ऊंच पद प्राप्त करू शकणार नाही. विकर्मच जर विनाश झाली नाहीत तर उच्च पद कसे प्राप्त कराल. मग सजा भोगाव्या लागतील. जे मोचरा (सजा) खाणार नाहीत त्यांना चांगले पद मिळेल. सजा खाऊन नंतर मग थोडे-फार पद मिळवणे, ते काय कामाचे. धर्मराजाचा मार खावा लागू नये, बेइज्जती होऊ नये - हा पुरुषार्थ करायचा आहे. तुम्ही पाहता की, शिवबाबा बसलेले असतात आणि धर्मराज सुद्धा तिथे आहेत. तुम्हाला सर्व साक्षात्कार घडवतात. तू हे-हे केले होतेस, लक्षात आहे? आता खा सजा. मग त्याच वेळी तेवढीच सजा भोगतात, जितकी जन्म-जन्मांतरामध्ये भोगतात. शेवटी मग थोडासा भाकर तुकडा मिळतो, त्याने काय फायदा. सजा तर खावी लागता कामा नये. आपल्या अवस्थेची तपासणी करायची आहे. जसे पोतामेल (जमाखर्च) काढतात, कोणी ६ महिन्यांचा, कोणी १२ महिन्यांचा. कोणी कोणी तर रोजचा सुद्धा काढतात. बाबा म्हणतात - तुम्ही देखील व्यापारी आहात. कोणी विरळाच व्यापारी बेहदच्या बाबांसोबत व्यापार करतो. धन नसेल तर तन-मन तर आहे ना. त्यांना सराफ देखील म्हणतात. सट्टा-मट्टा करतात ना. तुम्ही तन-मन-धन देता तर रिटर्नमध्ये २१ जन्मांसाठी किती वारसा प्राप्त करता! बाबा, मी तुमचा आहे, अशी एखादी युक्ती सांगा ज्याने माझी आत्मा आणि शरीर या लक्ष्मी-नारायणासारखे बनेल. बाबा म्हणतात - मी तुम्हाला किती गोरे बनवतो. एकदम रूपच बदलून टाकतो. दुसऱ्या जन्मामध्ये तुम्हाला फर्स्टक्लास शरीर मिळेल. तुम्ही वैकुंठात देखील पाहता. तुम्ही जाणता हे मम्मा-बाबा पुन्हा लक्ष्मी-नारायण बनतील. एम ऑब्जेक्ट देखील दाखवतात. आता जो जितका पुरुषार्थ करेल. जर पुरुषार्थ पूर्ण केला नाहीत, अशांती माजवलीत तर आपले पदच भ्रष्ट कराल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपल्या अवस्थेची तपासणी स्वतःच करायची आहे. स्वतःच्या कल्याणासाठी डेली डायरी (रोजनिशी) ठेवायची आहे, ज्यामध्ये आठवणीचा चार्ट नोट करायचा आहे.

२) बेहदच्या बाबांसोबत खरा-खरा व्यापार करायचा आहे. आपले तन-मन-धन बाबांच्या स्वाधीन करून २१ जन्मांसाठी रिटर्न घ्यायचे आहे. निश्चय-बुद्धी बनून आपले कल्याण करायचे आहे.

वरदान:-
आनंदा सोबत शक्तीला देखील धारण करून विघ्नांना पार करणारे विघ्नजीत भव

जी मुले जमा करणे जाणतात ती शक्तिशाली बनतात. जर आता-आता कमावले आणि आताच्या आता वाटून टाकले, स्वतःमध्ये सामावले नाही (धारण केले नाही) तर शक्ती राहत नाही. फक्त वाटण्याचा किंवा दान करण्याचा आनंद होतो. आनंदा सोबत जर शक्तीची जोड असेल तर सहजच विघ्नांना पार करून विघ्नजीत बनाल. मग कोणतेही विघ्न तुमच्या दृढ विश्वासाला डिस्टर्ब करणार नाही. त्यामुळे चेहऱ्यावरून जशी आनंदाची झलक दिसून येते तशी शक्तीची झलक देखील दिसून यावी.

बोधवाक्य:-
परिस्थितीमध्ये घाबरून जाण्याऐवजी त्यांना शिक्षक समजून धडा शिका.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

लास्ट सो फास्ट पुरुषार्थ ज्वाला-रूपाचाच सांगितला गेला आहे. पांडवांमुळे यादव थांबलेले आहेत. पांडवांची श्रेष्ठ शान, रूहानी शानची स्थिती यादवांच्या चिंताग्रस्त परिस्थितीला समाप्त करेल. तर आपल्या शानद्वारे चिंताग्रस्त आत्म्यांना शांती आणि सुखाचे वरदान द्या. ज्वाला स्वरूप अर्थात लाईट हाऊस आणि माईट हाऊस स्थितीला समजून घेऊन याच पुरुषार्थामध्ये राहा.