09-08-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - हे पुरुषोत्तम संगमयुग कल्याणकारी युग आहे, यामध्येच शिक्षणाद्वारे
तुम्हाला श्रीकृष्णपुरीचा मालक बनायचे आहे”
प्रश्न:-
बाबा मातांवर
ज्ञानाचा कलश का ठेवतात? कोणता एक रिवाज भारतामध्येच चालतो?
उत्तर:-
पवित्रतेची राखी बांधून सर्वांना पतितापासून पावन बनविण्याकरिता बाबा मातांवर
ज्ञानाचा कलश ठेवतात. रक्षाबंधनाचा देखील भारतामध्येच रिवाज आहे. बहिण भावाला राखी
बांधते. ही पवित्रतेची निशाणी आहे. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही मामेकम् (मज
एकाची) आठवण करा तर पावन बनून पावन दुनियेचे मालक बनाल’.
गीत:-
भोलेनाथ से
निराला…
ओम शांती।
ही आहे भोलेनाथाची महिमा, ज्यांच्यासाठी म्हणतात की, तो देणारा आहे. तुम्ही मुले
जाणता श्री लक्ष्मी-नारायणाला हे राज्यभाग्य कोणी दिले. जरूर भगवंताने दिले असेल
कारण स्वर्गाची स्थापना तर तेच करतात. स्वर्गाची बादशाही भोलेनाथने जशी
लक्ष्मी-नारायणाला दिली तशीच श्रीकृष्णाला दिली. राधे-कृष्ण अथवा लक्ष्मी-नारायणाची
गोष्ट एकच आहे. परंतु राजधानी नाही आहे. त्यांना परमपिता परमात्म्याशिवाय कोणीही
राज्य देऊ शकत नाही. त्यांचा जन्म स्वर्गातच म्हणणार. हे तुम्ही मुलेच जाणता. तुम्ही
मुलीच जन्माष्टमी विषयी समजावून सांगाल. श्रीकृष्णाची जन्माष्टमी आहे तर राधेची
देखील असली पाहिजे कारण दोघेही स्वर्गवासी होते. राधे-कृष्णच स्वयंवरा नंतर
लक्ष्मी-नारायण बनतात. मुख्य गोष्ट ही आहे की त्यांना हे राज्य कोणी दिले. हा
राजयोग केव्हा आणि कोणी शिकवला? स्वर्गामध्ये तर शिकवला नसेल. सतयुगामध्ये तर ते
आहेतच उत्तम पुरुष. कलियुगानंतर असते सतयुग. तर जरूर कलियुगाच्या अंताला राजयोग
शिकले असतील. ज्यामुळे मग नवीन जन्मामध्ये राजाई प्राप्त केली. जुन्या दुनियेपासून
नवीन पावन दुनिया बनते. जरूर पतित पावनच आले असतील. आता संगमयुगावर कोणता धर्म असतो,
हे कोणालाही माहिती नाही. जुनी दुनिया आणि नवीन दुनियेचे हे आहे पुरुषोत्तम संगमयुग,
ज्याचे गायन आहे. हे लक्ष्मी-नारायण आहेत नवीन दुनियेचे मालक. यांच्या आत्म्याला
आधीच्या जन्मामध्ये परमपिता परमात्म्याने राजयोग शिकवला. ज्या पुरुषार्थाचे
प्रारब्ध पुन्हा नवीन जन्मामध्ये मिळते, याचे नावच आहे कल्याणकारी पुरुषोत्तम
संगमयुग. जरूर अनेक जन्मांच्या अंतीम जन्मामध्येच यांना कोणीतरी राजयोग शिकवला असेल.
कलियुगामध्ये आहेत अनेक धर्म, सतयुगामध्ये होता एक देवी-देवता धर्म. संगमावर कोणता
धर्म आहे, ज्यामध्ये हा पुरुषार्थ करून राजयोग शिकले आणि सतयुगामध्ये प्रारब्ध भोगले.
असे मानले जाते की संगमयुगावर ब्रह्मा द्वारे ब्राह्मणच जन्माला आले. चित्रांमध्ये
देखील आहे ब्रह्मा द्वारे स्थापना, कृष्णपुरीची. विष्णू अथवा नारायणपुरी म्हणा,
गोष्ट तर एकच आहे. आता तुम्ही जाणता आपण या शिक्षणाने आणि पावन बनण्याने कृष्णपुरीचे
मालक बनतो. शिव भगवानुवाच आहे ना. श्रीकृष्णाची आत्माच अनेक जन्मांतील अंतीम
जन्मामध्ये पुन्हा अशी बनते. ८४ जन्म घेतात ना. हा आहे ८४ वा जन्म, यांचेच मग
ब्रह्मा नाव ठेवतात. नाहीतर मग ब्रह्मा कुठून आला. ईश्वराने रचना रचली तर
ब्रह्मा-विष्णू-शंकर कुठून आले. कसे रचले? काय छू मंत्र केला ज्यामुळे जन्माला आले.
बाबाच त्यांची हिस्ट्री सांगतात. ॲडॉप्ट केले जाते तेव्हा नाव बदलतात. ब्रह्मा नाव
तर नव्हते ना. म्हणतात - अनेक जन्मांच्या अंतामध्ये… तर जरूर तो पतित मनुष्य आहे.
ब्रह्मा कुठून आला, कोणालाही माहिती नाही. अनेक जन्मांतील अंतीम जन्म कोणाचा झाला?
असे तर लक्ष्मी-नारायणाने देखील अनेक जन्म घेतले आहेत. नाव, रूप, देश, काळ बदलत जाते.
श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये ८४ जन्मांची कहाणी क्लियर लिहिलेली आहे. जन्माष्टमीला
श्रीकृष्णाची चित्रे देखील खूप विकली जात असतील कारण श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये तर
सर्व जातील ना. राधे-कृष्णाच्या मंदिरामध्येच जातात. श्रीकृष्णासोबत राधा जरूर असेल.
राधे-कृष्ण, प्रिन्स-प्रिन्सेसच मग लक्ष्मी-नारायण महाराजा-महाराणी बनतात. त्यांनीच
८४ जन्म घेतले मग शेवटच्या जन्मामध्ये ब्रह्मा-सरस्वती बनले. अनेक जन्मांच्या
अंतामध्ये बाबांनी प्रवेश केला. आणि यांनाच म्हणतात की तुम्ही आपल्या जन्मांना जाणत
नाही. तुम्ही पहिल्या जन्मामध्ये लक्ष्मी-नारायण होता. मग हा जन्म घेतला तर त्यांनी
अर्जुन नाव दिले आहे. अर्जुनाला राजयोग शिकवला. अर्जुनाला वेगळे केले आहे. परंतु
त्यांचे नाव काही अर्जुन नाहीये. ब्रह्माचे जीवन चरित्र पाहिजे ना. परंतु ब्रह्मा
आणि ब्राह्मणांचे वर्णन कुठेही नाही. या गोष्टी बाबाच बसून समजावून सांगतात. सर्व
मुले ऐकतील आणि मग मुले इतरांना समजावून सांगतील. कथा ऐकून मग इतरांना बसून ऐकवतात.
तुम्ही देखील ऐकता आणि मग ऐकवता. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग, लीप युग. एक्स्ट्रा
युग. पुरुषोत्तम मास असतो तेव्हा १३ महिने होतात. या संगमयुगाचे सणच दरवर्षी साजरे
करतात. या पुरुषोत्तम संगमयुगाविषयी कोणालाच माहिती नाही. या संगमयुगावरच बाबा येऊन
आम्हाला पवित्र बनविण्यासाठी प्रतिज्ञा करवून घेतात. पतित दुनियेपासून पावन दुनियेची
स्थापना करतात. रक्षाबंधनाचा देखील भारतामध्ये रिवाज आहे. बहिण भावाला राखी बांधते.
परंतु ती कुमारी देखील मग अपवित्र बनते. आता बाबांनी तुम्हा मातांवर ज्ञानाचा कलश
ठेवला आहे. ज्यामुळे ब्रह्माकुमार-कुमारी बसून पवित्रतेची प्रतिज्ञा करण्यासाठी राखी
बांधतात. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही पावन बनून पावन
दुनियेचे मालक बनाल. बाकी कोणती राखी वगैरे बांधण्याची आवश्यकता नाही. हे समजावून
सांगितले जाते. जसे साधू-संन्यासी लोक दान मागतात. कोणी म्हणतात क्रोधाचे दान द्या,
कोणी म्हणतात कांदा खाऊ नका. स्वतः खात नसतील ते दान मागत असतील. या सर्वांपेक्षा
मोठी प्रतिज्ञा तर बेहदचे बाबा करवून घेतात. तुम्ही पावन बनू इच्छिता तर पतित-पावन
बाबांची आठवण करा. द्वापर पासून तुम्ही पतित बनत आला आहात, आता सर्व दुनिया पावन
पाहिजे, ती तर बाबाच बनवू शकतात. सर्वांचा गती-सद्गती दाता कोणी मनुष्य असू शकत नाही.
बाबाच पावन बनण्याची प्रतिज्ञा करवून घेतात. भारत पावन स्वर्ग होता ना. पतित-पावन
ते परमपिता परमात्माच आहेत. श्रीकृष्णाला पतित-पावन म्हणणार नाही. त्याचा तर जन्म
होतो. त्याचे तर आई-वडील सुद्धा दाखवतात. एक शिवाचाच अलौकिक जन्म आहे. ते स्वतःच
आपला परिचय देतात की, मी साधारण तनामध्ये प्रवेश करतो. शरीराचा आधार जरूर घ्यावा
लागतो. मी ज्ञानाचा सागर पतित-पावन, राजयोग शिकविणारा आहे. बाबाच स्वर्गाचे रचयिता
आहेत आणि नरकाचा विनाश करवितात. जेव्हा स्वर्ग असतो तेव्हा नरक नसतो. आता संपूर्ण
रौरव नरक आहे, जेव्हा नरक पूर्णतः तमोप्रधान बनतो तेव्हाच बाबा येऊन सतोप्रधान
स्वर्ग बनवतात. १०० टक्के पतितापासून १०० टक्के पावन बनवतात. पहिला जन्म जरूर
सतोप्रधानच मिळेल. मुलांनी विचार सागर मंथन करून भाषण करायचे आहे. समजावून सांगणे
मग प्रत्येकाचे वेगळे-वेगळे असेल. बाबा देखील आज एक गोष्ट, उद्या मग दुसरी गोष्ट
समजावून सांगतील. एकसारखे स्पष्टीकरण तर असू शकत नाही. असे समजा टेपमधून कोणी ॲक्युरेट
ऐकले जरी परंतु ॲक्युरेट दुसऱ्यांना सांगू शकणार नाहीत, फरक जरूर पडतो. बाबा जे
ऐकवतात, तुम्ही जाणता ड्रामामध्ये सर्व नोंद आहे. अक्षरन्-अक्षर जे कल्पापूर्वी
ऐकवले होते ते पुन्हा आज ऐकवत आहेत. ही टेप भरलेली आहे. भगवान स्वतः म्हणतात मी जे
५००० वर्षांपूर्वी हुबेहूब अक्षरन्-अक्षर ऐकवले होते तेच ऐकवतो. हा शूट केलेला
ड्रामा आहे. यामध्ये जरा देखील फरक पडू शकत नाही. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये
रेकॉर्ड भरलेले आहे. आता श्रीकृष्ण जन्माष्टमी केव्हा झाली होती, हे देखील मुले
समजतात. आज पासून ५००० वर्षांमध्ये काही दिवस कमी म्हणता येईल कारण आता शिकत आहोत.
नवीन दुनियेची स्थापना होत आहे. मुलांच्या मनामध्ये किती आनंद आहे. तुम्ही जाणता
श्रीकृष्णाच्या आत्म्याने ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. आता ती पुन्हा श्रीकृष्णाच्या
नावा-रूपामध्ये येत आहे. चित्रामध्ये दाखवले आहे - जुन्या दुनियेला लाथ मारत आहेत.
नवीन दुनिया हातामध्ये आहे. आता शिकत आहेत म्हणून म्हटले जाते - श्रीकृष्ण येत आहे.
जरूर बाबा अनेक जन्मांच्या अंतामध्येच शिकवतील. हे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा कृष्ण
जन्म घेईल. अभ्यासासाठी अजून थोडा वेळ बाकी आहे. जरूर अनेक धर्मांचा विनाश
झाल्यानंतर श्रीकृष्णाचा जन्म झाला असेल. ते देखील एक श्रीकृष्ण तर नाही, सारी
श्रीकृष्णपुरी असेल. हे ब्राह्मणच आहेत जे मग हा राजयोग शिकून देवता पद मिळवतील.
देवता बनताच नॉलेजद्वारे. बाबा येऊन मनुष्यापासून देवता बनवतात - शिक्षणाद्वारे. ही
पाठशाळा आहे, यामध्ये सर्वात जास्त वेळ लागतो. शिक्षण तर सोपे आहे. बाकी योगामध्ये
मेहनत आहे. तुम्ही सांगू शकता श्रीकृष्णाची आत्मा आता राजयोग शिकत आहे - परमपिता
परमात्मा द्वारे. शिवबाबा ब्रह्मा द्वारे आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत, विष्णुपुरीचे
राज्य देण्यासाठी. आपण प्रजापिता ब्रह्माची मुले ब्राह्मण-ब्राह्मणी आहोत. हे आहे
संगमयुग. हे खूप छोटेसे युग आहे. शेंडी सर्वात छोटी असते ना. मग त्यापेक्षा मोठे
मुख, त्यापेक्षा मोठ्या भुजा, त्यापेक्षा मोठे पोट, त्यापेक्षा मोठे पाय. विराट रूप
दाखवतात, परंतु त्याविषयी कोणीही स्पष्टीकरण देत नाहीत. तुम्हा मुलांना या ८४
जन्मांच्या चक्राचे रहस्य समजावून सांगायचे आहे, शिवजयंती नंतर आहे श्रीकृष्ण जयंती.
तुम्हा मुलांसाठीच हे
संगमयुग आहे. तुमच्यासाठी कलियुग पूर्ण झाले. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, आता मी
आलो आहे तुम्हाला सुखधाम, शांतीधामला घेऊन जाण्यासाठी. तुम्ही सुखधामचे रहिवासी होता
मग दुःखधाममध्ये आलात. बोलावता - ‘बाबा या, या जुन्या दुनियेमध्ये’. ही तुमची तर
दुनिया नाहीये. आता तुम्ही काय करत आहात? योगबळाद्वारे आपली दुनिया स्थापन करत आहात.
म्हटले देखील जाते - अहिंसा परमो देवी-देवता धर्म. तुम्हाला अहिंसक बनायचे आहे. ना
काम कटारी चालवायची आहे, ना भांडण-तंटे करायचे आहेत. बाबा म्हणतात मी दर ५ हजार
वर्षानंतर येतो. लाखो वर्षांची तर गोष्टच नाही. बाबा म्हणतात यज्ञ, तप, दान, पुण्य
इत्यादी करत तुम्ही खाली घसरत (पतित होत) आला आहात. ज्ञानानेच सद्गती होते. मनुष्य
तर कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपलेले आहेत, जे उठतच नाहीत म्हणून बाबा म्हणतात मी
कल्प-कल्प येतो, माझा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. पार्ट शिवाय मी देखील काहीच करू
शकत नाही. मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये आहे, पूर्ण वेळ झाल्यावर येतो. ड्रामाच्या
प्लॅन अनुसार मी तुम्हा मुलांना परत घेऊन जातो. आता म्हणतो - मनमनाभव. परंतु याचा
देखील अर्थ कोणीही जाणत नाहीत. बाबा म्हणतात - देहाची सर्व नाती सोडून मामेकम् (मज
एकाची) आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. मुले बाबांची आठवण करण्याची मेहनत करत राहतात.
हे आहे ईश्वरीय विश्वविद्यालय, साऱ्या विश्वाला सद्गती देणारे दुसरे कोणते ईश्वरीय
विश्व विद्यालय असू शकत नाही. ईश्वर पिता स्वतः येऊन साऱ्या विश्वाला चेंज करतात.
हेल पासून हेवन बनवितात. ज्यावर मग तुम्ही राज्य करता. शिवाला बबूलनाथ देखील
म्हणतात कारण ते येऊन तुम्हाला काम कटारी पासून सोडवून पावन बनवितात.
भक्तीमार्गामध्ये तर खूप दिखावा आहे, इथे तर शांतीमध्ये आठवण करायची आहे. ते (भक्तीवाले)
अनेक प्रकारचे हटयोग इत्यादी करतात. त्यांचा तर निवृत्ती मार्गच वेगळा आहे. ते
ब्रह्मला मानतात. ब्रह्म-योगी, तत्व-योगी आहेत. ते तर झाले आत्म्यांचे राहण्याचे
ठिकाण, ज्याला ब्रह्मांड म्हटले जाते. ते मग ब्रह्मलाच भगवान समजतात. त्यामध्ये लीन
होतील. म्हणजे जणू आत्म्याला मॉर्टल (विनाशी) बनवतात. बाबा म्हणतात - मीच येऊन
सर्वांची सद्गती करतो. शिवबाबाच सर्वांची सद्गती करतात, तर ते आहेत हिऱ्यासारखे. मग
तुम्हाला गोल्डन एज्ड मध्ये घेऊन जातात. तुमचा देखील हा हिऱ्यासारखा जन्म आहे नंतर
गोल्डन एज्ड मध्ये येता. हे नॉलेज तुम्हाला बाबाच येऊन शिकवतात ज्याद्वारे तुम्ही
देवता बनता. नंतर मग हे नॉलेज प्राय: लोप होते. या लक्ष्मी-नारायणामध्ये देखील रचता
आणि रचनेचे नॉलेज नाही आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या जुन्या
दुनियेमध्ये राहून डबल अहिंसक बनून योगबळाद्वारे आपली नवीन दुनिया स्थापन करायची आहे.
आपले जीवन हिऱ्यासारखे बनवायचे आहे.
२) बाबा जे ऐकवतात
त्यावर विचार सागर मंथन करून मग इतरांना ऐकवायचे आहे. नेहमी हा नशा रहावा की हे
शिक्षण पूर्ण होईल तेव्हा आपण कृष्णपुरीमध्ये जाणार.
वरदान:-
अपवित्रतेच्या
नामो-निशाणाला देखील नष्ट करून हिज होलीनेसचे (परम-पावनचे) टायटल प्राप्त करणारे
होलीहंस भव
जसे हंस कधीही दगड
टिपत नाहीत, रत्न धारण करतात. तसे होली हंस कोणाचेही अवगुण अर्थात दगडांना धारण करत
नाहीत. ते व्यर्थ आणि समर्थ ला वेगळे करून व्यर्थला सोडून देतात, समर्थला
अंगिकारतात. असे होलीहंसच पवित्र शुद्ध आत्मे आहेत, त्यांचा आहार, व्यवहार सर्व
शुद्ध असतो. जेव्हा अशुद्धी अर्थात अपवित्रतेचे नामो-निशाणही नष्ट होईल तेव्हा
भविष्यामध्ये हिज होलीनेसचे (परम-पावनचे) टायटल प्राप्त होईल त्यामुळे कधीही चुकून
सुद्धा कोणाचे अवगुण धारण करायचे नाहीत.
बोधवाक्य:-
सर्वंश त्यागी
तो आहे जो जुन्या स्वभाव-संस्काराच्या वंशाचा देखील त्याग करतो.
अव्यक्त इशारे -
सहजयोगी बनायचे असेल तर परमात्म प्रेमाचे अनुभवी बना:-
कोणतेही कार्य करत
असताना बाबांच्या आठवणी मध्ये लवलीन रहा. कोणत्याही गोष्टीच्या विस्तारामध्ये न जाता,
विस्ताराला बिंदू लावून बिंदूमध्ये सामावून जा, बिंदू बना, बिंदू लावा, तेव्हा सर्व
विस्तार, सर्व जाळे सेकंदामध्ये विलीन होईल (संपुष्टात येईल) आणि वेळ वाचेल, मेहनती
पासून सुटाल. बिंदू बनून बिंदूमध्ये लवलीन व्हाल.