09-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो,
योगबलाद्वारेच तुम्हाला आपल्या विकर्मांवर विजय प्राप्त करून विकर्माजीत बनायचे आहे”
प्रश्न:-
असा कोणता
विचार पुरुषार्थी मुलांना देखील पुरुषार्थहीन बनवतो?
उत्तर:-
एखाद्या
पुरुषार्थीला जर हा विचार आला की, ‘अजून तर खूप वेळ बाकी आहे, मागाहून वेगाने
पुरुषार्थ करून आपण गॅप भरून काढू’. परंतु बाबा म्हणतात - मुलांनो, मृत्यूचा वेळ
थोडाच निश्चित आहे, उद्या-उद्या करत जर मृत्यू झाला तर कमाई कशी होणार त्यामुळे
जितके शक्य होईल श्रीमतावर आपले आणि इतरांचे कल्याण करत राहा. काळाचा विचार करत
पुरुषार्थ-हीन बनू नका.
गीत:-
ओम् नमो शिवाय…
ओम शांती।
हे तर मुलांना
समजावून सांगितले गेले आहे की निराकार, साकार शिवाय कोणतेही कर्म करू शकत नाहीत.
पार्ट बजावू शकत नाहीत. रूहानी बाबा येऊन ब्रह्मा द्वारे रूहानी मुलांना समजावून
सांगत आहेत. योगबलाद्वारेच सतोप्रधान बनायचे आहे आणि विश्वाचा मालक बनायचे आहे.
मुलांच्या बुद्धीमध्ये हे आहे की कल्प-कल्प बाबा येऊन ब्रह्मा द्वारा राजयोग
शिकवतात.
आणि आदि सनातन
देवी-देवता धर्माची स्थापना करतात अर्थात मनुष्याला देवता बनवतात. मनुष्य जे
देवी-देवता होते, पावन होते ते आता बदलून ८४ जन्मानंतर पतित बनले आहेत. भारत जेव्हा
पारसपुरी होता तेव्हा पवित्रता सुख-शांती सर्व काही होते. ही ५ हजार वर्षांची गोष्ट
आहे. तिथी-तारीख सहीत बाबा सर्व हिशोब समजावून सांगतात. त्यांच्यापेक्षा सर्वोच्च
तर कोणीही नाही. सृष्टी अथवा झाड ज्याला कल्पवृक्ष म्हणतात त्याच्या आदि-मध्य-अंताचे
रहस्य देखील बाबाच बसून समजावून सांगतात. भारताचा जो देवी-देवता धर्म होता, तो आता
प्रायः लोप झाला आहे. केवळ चित्रे बाकी जरूर आहेत. भारतवासी जाणतात की सतयुगामध्ये
लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. भले शास्त्रांमध्ये चूक केली आहे, ज्यामध्ये
श्रीकृष्णाला मध्ये घेऊन गेले आहेत. बाबाच येऊन चुकलेल्याला मार्ग सांगतात. त्यांना
म्हटले जाते मुक्ती-जीवनमुक्तीचे गाईड (मार्गदर्शक). सर्वांना मुक्ती-जीवनमुक्ती
देणारे एकच आहेत. भारत जेव्हा जीवनमुक्त असतो तेव्हा इतर सर्व आत्मे मुक्तिधाम मध्ये
असतात, त्यामुळे त्यांना मुक्ती-जीवनमुक्ती दाता म्हटले जाते. रचयिता एकच आहेत.
सृष्टी देखील एकच आहे, जगाचा इतिहास-भूगोल देखील एकच आहे, जो रिपीट होत राहतो.
सतयुग, त्रेता, द्वापर कलियुग… त्यानंतर असते संगमयुग. कलियुग आहे - पतित, सतयुग आहे
- पावन. सतयुग असेल, तर जरूर अगोदर कलियुगाचा विनाश होईल; विनाशापूर्वीच स्थापना
होईल, सतयुगामध्ये काही स्थापना होणार नाही. भगवान तेव्हाच येतील जेव्हा पतित
दुनियेला पावन बनवायचे असते. आता बाबा सोपी युक्ती सांगत आहेत की देहा सहीत देहाची
सर्व नाती तोडून, देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करा. बाबा आहेत भक्तांना फळ देणारे.
भक्तांना पावन बनण्याकरिता ज्ञान देतात. सर्वांना पावन बनविणारा आहे - योग (आठवण).
ज्ञान-सागर येऊन मुखावाटे ज्ञान ऐकवतात. पतितांना पावन बनवतात. यावेळी सर्व आत्मे
पतित बनलेले आहेत, म्हणून बाबांना बोलावत आहेत, कारण बाबांशिवाय इतर कोणीही पावन तर
बनवू शकणार नाही. जर पतित-पावनी गंगा आहे तर मग ‘पतित-पावन सीताराम’ असे म्हणून का
बोलावता? बुद्धी म्हणते की, परमपिता परमात्मा जरूर पुन्हा नवीन दुनियेची स्थापना आणि
जुन्या दुनियेचा विनाश करण्यासाठी येतील. कल्पवृक्षाचे आयुर्मान देखील असते, जी
वस्तू जडजडीभूत होते, तिलाच तमोप्रधान म्हटले जाते. याला नवीन दुनिया म्हणणार नाही,
हे आहे आयर्न एज्ड वर्ल्ड. या सर्व गोष्टी इतरांना समजावून सांगण्याकरिता
बुद्धीमध्ये पक्क्या केल्या जातात. घरोघरी संदेश द्यायचा आहे. असे म्हणायचे नाही की
परमात्मा आले आहेत. युक्तीने समजावून सांगायचे आहे, बोला - दोन पिता आहेत लौकिक आणि
पारलौकिक. दुःखाच्या वेळेला पारलौकिक पित्याचीच आठवण केली जाते. सुखधाममध्ये कधी
कोणी परमात्म्याची आठवण करत नाही. सतयुग, लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये सुख-शांती,
पवित्रता सर्व काही होते. बाबांचा वारसा मिळाला, मग बोलावतील कशासाठी? तिथे सुखच
सुख आहे. बाबांनी दुःखासाठी दुनिया रचलेली नाही. हा पूर्वनियोजित खेळ आहे, ज्यांचा
पार्ट शेवटी आहे ते २-४ जन्म घेतात, बाकीचा वेळ शांतीधाम मध्ये राहतील. बाकी
खेळातून मधेच कोणीही बाहेर पडेल, असे होऊ शकत नाही. एक-दोन जन्म घेतले बाकीचा काळ
जसे मोक्ष आहे, आत्मा पार्टधारी आहे. कोणाचा उच्च दर्जाचा पार्ट आहे, कोणाचा कमी
दर्जाचा. गायले गेले आहे ईश्वराचा अंत कोणीही मिळवू शकत नाही. ईश्वरच येऊन रचयिता
आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. बाबा म्हणतात की, मी साधारण
तनामध्ये प्रवेश करतो. मी ज्या तनामध्ये प्रवेश करतो, ते (ब्रह्मा बाबा) आपल्या
जन्मांना जाणत नाहीत, मी यांच्या ८४ जन्मांची कहाणी ऐकवतो; कोणाचाही पार्ट चेंज होऊ
शकत नाही. हा पूर्वनियोजित खेळ आहे. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही.
बुद्धीमध्ये तेव्हा येईल जेव्हा पवित्र बनून समजून घेतील. चांगल्या रीतीने
समजण्यासाठी ७ दिवस भट्टीमध्ये बसावे लागेल. भागवत इत्यादी देखील ७ दिवस ठेवतात.
कोणाला ७ दिवसांमध्ये चांगल्या प्रकारे समजते, कोणी तर म्हणतात की आमच्या
बुद्धीमध्ये काहीही गेले नाही. उच्चपद मिळणार नसेल तर बुद्धीमध्ये जाईल कसे. ठीक आहे,
तरीही कल्याण तर झाले ना. प्रजा तर अशीच बनते, बाकी राज्य-भाग्य घेण्यासाठी मेहनत
करावी लागते. बाबांची आठवण केल्यानेच विकर्म विनाश होतील. आता करा अथवा नका करू.
परंतु बाबांचे डायरेक्शन आहे, आवडत्या वस्तूची आठवण केली जाते ना. भक्तिमार्गामध्ये
देखील म्हणतात की, ‘हे पतित-पावन या’. आता ते भेटले आहेत. म्हणतात - माझी आठवण करा
तर गंज उतरेल’. बादशाही अशीच थोडीच मिळणार. आठवणीमध्ये थोडी मेहनत आहे. खूप आठवण
करणारेच कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात. पूर्ण आठवण न केल्यामुळे विकर्म विनाश
होणार नाहीत. योगबलाद्वारेच विकर्माजीत बनायचे आहे. लक्ष्मी-नारायण एवढे पवित्र कसे
बनले? जेव्हा की कलियुगाच्या अखेरीला कोणीही पवित्र नाहीत. यावेळी गीता-ज्ञानाचा
एपिसोड रिपीट होत आहे. शिव भगवानुवाच, चुका तर सर्वांकडून होत राहतात. मी येऊन
सर्वांना अभूल (निर्दोष) बनवतो. भारताची जी शास्त्रे आहेत ती सर्व आहेत
भक्तिमार्गाची. बाबा म्हणतात - मी जे काही सांगितले होते ते कोणालाही माहित नाही.
ज्यांनी माझ्याकडून ऐकले, त्यांनी २१ जन्मांचे प्रारब्ध प्राप्त केले, त्यानंतर
ज्ञान प्रायः लोप होते. तुम्हीच चक्र फिरून आता पुन्हा हे ज्ञान ऐकत आहात.
तुम्ही जाणता - आपण
मनुष्यापासून देवता बनविण्याचे कलम लावत आहोत. हे आहे दैवी झाडाचे कलम. ते लोक (दुनियावाले)
तर त्या झाडांचे कलम लावत राहतात. बाबा येऊन विरोधाभास सांगतात. तुम्ही दाखवता
देखील की, त्यांचा काय प्लॅन आहे आणि तुमचा प्लॅन काय आहे. ते लोक दुनियेची वृद्धी
होऊ नये यासाठी फॅमिली प्लॅनिंग करतात. बाबा तर खूप चांगली गोष्ट सांगतात की अनेक
धर्म विनाश होतील आणि देवी-देवता धर्माची फॅमिली स्थापन होईल. सतयुगामध्ये आदि
सनातन देवी-देवता धर्माची एकच फॅमिली होती, बाकीच्या अनेक फॅमिली अस्तित्वातच
नव्हत्या. यावेळी भारतामध्ये बघा किती प्रकारच्या फॅमिली आहेत. गुजराती फॅमिली, शिख
फॅमिली… वास्तविक भारताची एकच फॅमिली असली पाहिजे. अनेक फॅमिली असतील तर जरूर कलह
होतील. आणि मग सिव्हील वॉर (गृहयुद्ध) होते. फॅमिलीमध्येच गृहयुद्ध होते. जसे
ख्रिश्चनांची आपसामध्ये फॅमिली आहे, तर त्यांच्यामध्ये देखील दोन भाऊ एकमेकांना
भेटत नाहीत, फूट पडते. पाण्याची देखील वाटणी केली जाते. शीख धर्मवाल्यांना वाटते
की, आपण आपल्या धर्माच्या फॅमिलीला जास्त सुख द्यावे. रग जाते (आसक्ती जाते) ना.
डोकेफोड करत राहतात. जेव्हा अंतिम समय येतो तेव्हा आपसामध्ये भांडू लागतात. विनाश
तर होणारच आहे. असंख्य बॉम्ब्स बनवत राहतात. जेव्हा मोठे युद्ध सुरू झाले होते
तेव्हा दोन बॉम्ब टाकले होते. आता तर पुष्कळ बनवले आहेत. समजून घेण्याची गोष्ट आहे
ना. तुम्ही हे समजावून सांगायचे आहे की, ही तीच महाभारत लढाई आहे. मोठ-मोठे लोक
देखील म्हणतात की, जर युद्ध बंद केले नाही तर साऱ्या दुनियेला आग लागेल. तुम्ही
जाणता आग तर लागणारच आहे.
बाबा आदि सनातन
देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. राजयोग आहेच मुळी सतयुगाकरिता. जो देवता धर्म
प्रायः लोप झाला आहे तो पुन्हा स्थापन करतात. आता कलियुग आहे, याच्या नंतर सतयुग
पाहिजे. आता कलियुग विनाशासाठी ही महाभारत लढाई आहे. हे सर्व व्यवस्थित धारण करून
समजावून सांगायचे आहे कारण मनुष्य आसुरी संप्रदायाचे आहेत, त्यामुळे खबरदारी
बाळगायची आहे. कल्पा पूर्वीप्रमाणे जी विघ्न पडायची असतील ती पडणार जरूर. हा
पूर्वनियोजित ड्रामा आहे. आपण बांधील आहोत. आठवणीची यात्रा कधीही विसरता कामा नये.
एक गाणे आहे ना - ‘रात के राही थक मत जाना…’ याचा अर्थ कोणीही समजू शकत नाही. रात्र
पूर्ण होऊन दिवस येणार आहे. अर्धे कल्प पूर्ण झाले, आता सुख सुरू होईल. बाबांनी
‘मनमनाभव’चा अर्थ देखील समजावून सांगितला आहे, फक्त गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव
घातल्याने ती ताकद राहिलेली नाहीये. श्रीकृष्णाला कधी सर्वशक्तिमान म्हणू शकत नाही.
ते तर पूर्ण ८४ जन्म घेतात, त्यामुळे गीतेमध्ये तेवढी ताकद राहिलेली नाही. आता आपण
सर्व मनुष्यमात्राचे कल्याण करत आहोत. जो कल्याणकारी बनेल त्याला वारसा मिळेल.
आठवणीच्या यात्रे शिवाय कल्याण होऊ शकत नाही. यावेळी सर्व विपरीत बुद्धी आहेत.
म्हणतात की, परमात्मा सर्वव्यापी आहे. तुम्ही हे समजावून सांगायचे आहे की ते बेहदचे
पिता आहेत. भारतवासीयांना बेहदच्या बाबांकडूनच बेहदचा वारसा मिळाला आहे.
भारतवासीयांनीच ८४ जन्म घेतले आहेत. आता तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघत आहात की ज्ञान
तर तुम्ही ऐकतच राहता. दिवसेंदिवस तुमच्याकडे नवीन-नवीन लोक भरपूर येत राहतील. आताच
जर बड्या-बड्या हस्ती आल्या तर मग वेळ लागणार नाही. लगेच सर्वत्र आवाज पसरेल, हंगामा
होईल, त्यामुळे युक्तीने हळूहळू चालत राहते. हे आहेच मुळी गुप्त ज्ञान, कोणाला कळत
सुद्धा नाही की हे काय करत आहेत. भक्तीमध्ये आहे - दुःख, ज्ञानामध्ये आहे - सुख.
रावणासोबत तुमचे युद्ध कसे आहे ते तर तुम्हीच जाणता इतर कोणीही जाणू शकत नाही.
भगवानुवाच, तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे असेल तर माझी आठवण करा तेव्हाच पापे
भस्म होतील. पवित्र बना, तेव्हाच सोबत घेऊन जाईन. मुक्ती तर सर्वांना मिळणार आहे.
रावण राज्यामधून मुक्त व्हाल. तुम्ही म्हणता की, परमपिता परमात्म्याच्या श्रीमतावर
कल्पा पूर्वीप्रमाणे शिव-शक्ती ब्रह्माकुमार-कुमारीच श्रेष्ठाचारी दुनिया स्थापन
करतील. ५ हजार वर्षांपूर्वी श्रेष्ठाचारी दुनिया होती, हे बुद्धीमध्ये पक्के केले
पाहिजे. मुख्य पॉईंट्स जेव्हा बुद्धीमध्ये धारण होतील तेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये
राहाल. कोणी समजतात की अजून वेळ बाकी आहे, मागाहून पुरुषार्थ करू. परंतु मृत्यूचा
नियम थोडाच आहे. उद्या मृत्यू झाला तर! त्यामुळे असे समजू नका की शेवटी गॅलप करू (अभ्यास
भरून काढू). हा विचार अजूनच खाली पाडेल. जितके होईल पुरुषार्थ करत रहा. श्रीमतावर
प्रत्येकाला आपले कल्याण करायचे आहे. स्वतःला तपासायचे आहे की, मी बाबांची किती
आठवण करतो? आणि बाबांची किती सेवा करतो? रूहानी खुदाई खिदमतगार (ईश्वरीय मदतगार)
तुम्ही आहात ना. तुम्ही आत्म्यांना सैलवेज करता (मदत करता). आत्मा पतितापासून पावन
कशी बनेल, त्याची युक्ती सांगतात. श्रीकृष्णाची आठवण केल्याने विकर्म विनाश होणार
नाहीत. तो तर प्रिन्स होता, त्याने प्रारब्ध उपभोगले, त्याची महिमा करण्याची गरज
नाही. देवतांची काय महिमा कराल! हो, बर्थ डे तर सर्वच साजरा करतात. ही तर कॉमन
गोष्ट आहे. बाकी त्यांनी काय केले? शिडी तर उतरतच येतात. चांगले अथवा वाईट मनुष्य
तर असतातच. प्रत्येकाचा पार्ट आपला-आपला आहे. ही आहे बेहदची गोष्ट. मुख्य
शाखा-उपशाखा मोजल्या जातात. बाकी पाने तर अनेक आहेत. त्यांची तुम्ही किती म्हणून
मोजणी करत राहाल. बाबा समजावून सांगत राहतात - मुलांनो, मेहनत करा, सर्वांना बाबांचा
परिचय द्या, तेव्हा बुद्धीचा योग बाबांशी जुळेल. बाबा म्हणतात - सर्वांना सांगा की,
पवित्र बना तेव्हाच मुक्तिधाम मध्ये निघून जाल. दुनियेला थोडेच माहित आहे की
महाभारत लढाईने काय होणार आहे. हा यज्ञ रचला आहे, कारण नवीन दुनिया पाहिजे. आपला
यज्ञ पूर्ण होईल तेव्हा सर्व काही या यज्ञामध्ये स्वाहा होणार आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) खरे-खरे
खुदाई खिदमतगार बनून (ईश्वरीय मदतगार बनून) सर्व आत्म्यांना सॅल्व्हेज करण्याची (मदत
करण्याची) सेवा करायची आहे. सर्वांचे कल्याण करायचे आहे. बाबांचा परिचय द्यायचा आहे.
२) सर्वात प्रिय
वस्तूची (बाबांची) प्रेमाने आठवण करायची आहे. पूर्वनियोजित ड्रामावर अटल राहायचे आहे.
विघ्नांना घाबरायचे नाही.
वरदान:-
‘मनमनाभव’च्या
विधी द्वारे मनरसाच्या स्थितीचा अनुभव करणारे आणि करविणारे सर्व बंधनमुक्त भव
जी मुले लोखंडाच्या
बेडयांना आणि महीन धाग्यांच्या बंधनाला तोडून बंधनमुक्त स्थितीमध्ये राहतात ते
कलियुगी स्थूल वस्तूंच्या रसापासून (आनंदापासून) अथवा मनाच्या आसक्तीपासून मुक्त
होतात. त्यांना देह-अभिमान अथवा देहाच्या जुन्या दुनियेतील कोणतीही वस्तू जरा सुद्धा
आकर्षित करत नाही. जेव्हा कोणत्याही इंद्रियांच्या रसामध्ये अर्थात विनाशी रसामध्ये
आकर्षण नसेल तेव्हाच अलौकिक अतींद्रिय सुखाचा अथवा मनरस स्थितीचा अनुभव होतो. यासाठी
निरंतर मनमनाभवची स्थिती पाहिजे.
बोधवाक्य:-
खरी सेवा ती
आहे ज्यामध्ये सर्वांच्या आशीर्वादासोबतच आनंदाची अनुभूती होईल.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
दुनियेमध्ये देखील
दानाला पुण्य समजतात, तुम्ही दात्याची मुले सदैव दान करणारे पुण्य-आत्मे आहात.
तुम्ही कोणत्याही आत्म्याकडून अल्पकाळाची प्राप्ती मिळविण्याची इच्छा करू शकत नाही.
‘या आत्म्याने काही दिले तर मी देईन, अथवा हे देखील काही करतील तर मी देखील करेन’,
अशी हदची इच्छा ठेवायची नाही. दात्याची मुले बनून सर्वांप्रती स्नेह, सहयोग, शक्ती
देणारे पुण्य-आत्मा बना.