09-11-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.11.2007 ओम शान्ति
मधुबन
“सत्यता आणि
पवित्रतेच्या शक्तिला स्वरूपामध्ये आणत बालक आणि मालकपणाचा बॅलन्स ठेवा”
आज सत पिता, सत
शिक्षक, सतगुरू आपल्या चोहो बाजूच्या सत्यता स्वरूप, शक्ती स्वरूप मुलांना बघत आहेत
कारण सत्यतेची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे. या सत्यतेच्या शक्तिचा आधार आहे - संपूर्ण
पवित्रता. मन-वचन-कर्म, संबंध-संपर्क, स्वप्नामध्ये देखील अपवित्रतेचे नामोनिशाण
नसावे. अशा पवित्रतेचे प्रत्यक्ष स्वरूप काय दिसून येते? अशा पवित्र आत्म्याच्या
चलन आणि चेहऱ्यामध्ये दिव्यता स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या डोळ्यांमध्ये रुहानी
(आत्मिक) चमक, चेहऱ्यावर सदैव हर्षितमुखता आणि चलनमध्ये (वर्तनामध्ये) प्रत्येक
पावलामध्ये बाप समान कर्मयोगी. असे सत्यवादी सत् बाबांद्वारे यावेळी तुम्ही सर्व
बनत आहात. दुनियेमध्ये देखील कित्येकजण स्वतःला सत्यवादी म्हणतात, खरे देखील बोलतात
परंतु संपूर्ण पवित्रता हीच खरी सत्यतेची शक्ती आहे. जे यावेळी या संगमयुगामध्ये
तुम्ही सर्व बनत आहात. या संगमयुगाची श्रेष्ठ प्राप्ति आहे - सत्यतेची शक्ती,
पवित्रतेची शक्ती. ज्याची प्राप्ति म्हणून सतयुगामध्ये तुम्ही सर्व ब्राह्मण सो
देवता बनून आत्मा आणि शरीर दोन्हीमध्ये पवित्र बनता. साऱ्या सृष्टिचक्रामध्ये इतर
कोणीही आत्मा आणि शरीर दोन्हीमध्ये पवित्र बनत नाहीत. आत्म्याने पवित्र बनतात देखील
परंतु शरीर पवित्र मिळत नाही. तर अशी संपूर्ण पवित्रता यावेळी तुम्ही सर्व धारण करत
आहात. नशेने म्हणता, लक्षात आहे काय नशेने म्हणता? आठवा. सर्व जण हृदयापासून म्हणता,
अनुभवाने म्हणता की पवित्रता तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार सहज
प्राप्त होतो कारण पवित्रता अथवा सत्यता प्राप्त करण्यासाठी तुम्ही सर्वांनी पहिले
आपल्या सत्य स्वरूप आत्म्याला जाणले आहे. आपल्या सत पिता, शिक्षक, सद्गुरुला ओळखले
आहे. ओळखले आहे आणि प्राप्त केले आहे. जोपर्यंत कोणी आपल्या सत्य स्वरूपाला अथवा सत्
पित्याला जाणत नाहीत तोपर्यंत संपूर्ण पवित्रता, सत्यतेची शक्ती येऊ शकत नाही.
तर तुम्ही सर्व सत्यता
आणि पवित्रतेच्या शक्तिचे अनुभवी आहात ना! आहात अनुभवी? अनुभवी आहात का? ते लोक
प्रयत्न करतात परंतु यथार्थ रूपामध्ये ना आपल्या स्वरूपाला, ना सत् पित्याच्या
यथार्थ स्वरूपाला जाणू शकतात. आणि तुम्ही सर्वांनी यावेळच्या अनुभवाद्वारे
पवित्रतेला असे सहजपणे स्वीकारले आहे जे यावेळच्या प्राप्तीचे प्रारब्ध देवतांची
पवित्रता नॅचरल आहे आणि नेचर आहे (नैसर्गिक आहे आणि स्वाभाविक आहे). अशा नॅचरल
नेचरचा अनुभव तुम्हीच प्राप्त करता. तर चेक करा की पवित्रता अथवा सत्यतेची शक्ती
नॅचरल नेचरच्या रूपामध्ये बनली आहे? तुम्ही काय समजता? जे समजतात की पवित्रता तर
आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यांनी हात वर करा. जन्मसिद्ध अधिकार आहे की मेहनत
करावी लागते? मेहनत तर करावी लागत नाही ना! सहज आहे ना! कारण जन्मसिद्ध अधिकार तर
सहज प्राप्त होतो. मेहनत करावी लागत नाही. दुनियावाले असंभव समजतात आणि तुम्ही
असंभवला संभव आणि सहज बनवले आहे.
जी नवीन मुले आली
आहेत, जी पहिल्यांदा आलेली आहेत त्यांनी हात वर करा. अच्छा, जी नवीन मुले आहेत,
मुबारक असो पहिल्यांदा येणाऱ्यांना कारण बापदादा म्हणतात की, भले लेट तर आला आहात
परंतु टू लेटमध्ये आलेले नाही आहात. आणि नवीन मुलांना बापदादांचे वरदान आहे की
लास्टवाले देखील फास्ट पुरुषार्थ करून फर्स्ट डिव्हिजन मध्ये येऊ शकतात. फर्स्ट
नंबर नाही परंतु फर्स्ट डिव्हिजनमध्ये येऊ शकतात. तर नवीन मुलांना इतकी हिंमत आहे,
हात वर करा जे फर्स्ट येणार. बघा टी.व्ही. मध्ये तुमचा हात दिसत आहे. अच्छा.
हिंमतवाले आहात. मुबारक असो हिंमतीची. आणि हिंमत आहे तर बाबांची मदत आहेच परंतु
सर्व ब्राह्मण परिवाराच्या देखील शुभ भावना, शुभ कामना तुम्हा सर्वांच्या सोबत आहेत
त्यामुळे जे कोणी नवीन पहिल्यांदा आले आहेत त्या सर्वांप्रति बापदादा आणि
परिवाराच्या वतीने पुन्हा पद्मगुणा अभिनंदन आहे, अभिनंदन आहे, अभिनंदन आहे. तुम्ही
सर्व जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांना देखील आनंद होत आहे ना! हरवलेले आत्मे पुन्हा
आपल्या परिवारामध्ये पोहोचले आहेत. तर बापदादा देखील हर्षित होत आहेत आणि तुम्ही
देखील सर्व हर्षित होत आहात.
बापदादांनी वतनमध्ये
दादीसोबत एक रिझल्ट बघितला. काय रिझल्ट बघितला? तुम्ही सर्व जाणता, मानता की आम्ही
मालक सो बालक आहोत. आहात ना! मालक देखील आहात, बालक देखील आहात. सर्वजण आहात ना?
हात वर करा. विचार करून हात वर केला, असे नको. हिशोब घेणार ना! अच्छा, हात खाली करा.
बापदादांनी बघितले की बालकपणाचा निश्चय आणि नशा हा तर सहज राहतो कारण की
ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी म्हटले जाता तर बालक आहात तेव्हाच तर
ब्रह्माकुमार-कुमारी म्हटले जाते. आणि संपूर्ण दिवस मग ‘माझे बाबा, माझे बाबा’ हेच
स्मृतीमध्ये आणता आणि मग विसरूनही जाता परंतु मधे-मधे आठवते. आणि सेवेमध्ये देखील
‘बाबा-बाबा’ शब्द नॅचरल मुखातून निघतो. जर ‘बाबा’ शब्द निघत नसेल तर ज्ञानाचा काही
प्रभाव पडत नाही. तर जी काही सेवा करता, भाषण करता, कोर्स करता, विविध टॉपिकवर करता,
खऱ्या सेवेचे प्रत्यक्ष स्वरूप अथवा प्रत्यक्ष प्रमाण हेच आहे की, ऐकणाऱ्यांना
देखील अनुभव व्हावे की मी देखील बाबांचा आहे. त्यांच्या मुखातून देखील ‘बाबा-बाबा’
शब्द निघावा. ‘कोणती तर शक्ती आहे’, असे नको. ‘छान आहे’, असेही नको. परंतु ‘माझे
बाबा’ हा अनुभव व्हावा याला म्हणणार सेवेचे प्रत्यक्ष फळ. तर बालकपणाचा नशा अथवा
निश्चय तरीही चांगला राहतो. परंतु मालकपणाचा निश्चय आणि नशा नंबरवार राहतो.
बालकपणापासून मालकपणाचा नशा प्रत्यक्ष वर्तनामधून आणि चेहऱ्याद्वारे कधी दिसून येतो,
कधी कमी दिसून येतो. वास्तविक तुम्ही डबल मालक आहात, एका बाबांच्या खजिन्यांचे मालक
आहात. सर्वजण खजिन्यांचे मालक आहात ना? आणि बाबांनी सर्वांना एकसारखाच खजिना दिलेला
आहे. कोणाला लाख दिले आहे, कोणाला हजार दिले आहेत, असे नाहीये. सर्वांना सर्व खजिने
बेहदचे दिले आहेत कारण बाबांकडे बेहदचे खजिने आहेत, कमी नाही आहेत. तर बाप-दादांनी
सर्वांना सर्व खजिने दिले आहेत आणि एकसारखे, सारख्या प्रमाणामध्ये दिले आहेत. आणि
दुसरे - स्व-राज्याचे मालक आहात म्हणून बाप-दादा अभिमानाने म्हणतात की, माझा एक-एक
मुलगा राजा मुलगा आहे. तर राजा मुले आहात ना! प्रजा तर नाही ना? राजयोगी आहात की
प्रजायोगी आहात? राजयोगी आहात ना! तर स्वराज्याचे मालक आहात. परंतु बापदादांनी
दादींसोबत रिझल्ट बघितला - तर जितका नशा बालकपणाचा असतो, त्यामानाने मालकपणाचा नशा
कमी असतो. असे का? जर स्वराज्याच्या मालकपणाचा नशा सदैव राहिला असता तर या ज्या
मधे-मधे समस्या अथवा विघ्न येतात ती येणे शक्य झाले नसते. तसे बघितले गेले तर समस्या
अथवा विघ्न येण्याचा आधार विशेषत: मन आहे. मनच हलचलमध्ये (अशांतीमध्ये) येते म्हणून
बापदादांचा महामंत्र देखील आहे - मनमनाभव. तनमनाभव. धनमनाभव नाही आहे, मनमनाभव आहे.
तर जर स्वराज्याचा मालक आहे तर मग मन मालक नाही आहे. मन तुमचा कर्मचारी आहे, राजा
नाही आहे. राजा अर्थात अधिकारी. अधीन असणाऱ्याला राजा म्हटले जात नाही. तर
रिझल्टमध्ये काय बघितले? की मनाचा मालक मी राज्य अधिकारी मालक आहे, ही स्मृति, ही
आत्म स्थिती कमी असते, कायम रहात नाही. आहे पहिला धडा, तुम्ही सर्वांनी पहिला धडा
काय शिकला होता? ‘मी आत्मा आहे’, परमात्म्याचा धडा दोन नंबरचा आहे. परंतु पहिला धडा
- मी मालक राजा या कर्मेंद्रियांचा अधिकारी आत्मा आहे, शक्तिशाली आत्मा आहे. सर्व
शक्ती या तर आत्म्याचे निजी गुण आहेत. तर बापदादांनी बघितले की, मी जो आहे, जसा आहे,
त्या नॅचरल स्वरूपाच्या स्मृतिमध्ये चालणे, राहणे, चेहऱ्याद्वारे अनुभव होणे,
समस्येपासून दूर रहाणे, यामध्ये आता आणखी अटेन्शन पाहिजे. फक्त ‘मी आत्मा’ एवढेच
नाही, परंतु कोणती आत्मा आहे, जर हे स्मृतिमध्ये ठेवाल तर मास्टर सर्वशक्तिवान
आत्म्याच्या समोर समस्या अथवा विघ्नाची अजिबात ताकद नाही जी येऊ शकेल. आता देखील
रिझल्टमध्ये कोणती ना कोणती समस्या अथवा विघ्न दिसून येते. जाणतात परंतु वर्तनामध्ये
आणि चेहऱ्यावरून निश्चयाचे प्रत्यक्ष स्वरूप - रुहानी नशा तो अजूनही प्रत्यक्ष
व्हायचा आहे. यासाठी हा मालकपणाचा नशा याला पुन्हा-पुन्हा चेक करा. चेक करणे
सेकंदाची गोष्ट आहे. कर्म करताना, कोणतेही कर्म आरंभ करता, तर आरंभ करते वेळी चेक
करा - मालकपणाच्या ऑथॉरिटीने कर्मेंद्रियांद्वारे कर्म करून घेणारी कंट्रोलिंग पॉवर,
रुलिंग पॉवरवाली आत्मा समजून कर्म सुरु केले की साधारण कर्म सुरु झाले? स्मृति
स्वरुप राहून कर्म आरंभ करणे आणि साधारण स्थितीमध्ये राहून कर्म आरंभ करणे यामध्ये
खूप फरक आहे. जसे हदची पदे असणारे आपले कार्य करतात तर कार्याच्या सीटवर सेट होऊन
मग कार्य आरंभ करतात, असे आपल्या मालकपणाच्या स्वराज्य अधिकाराच्या सीटवर सेट होऊन
मग प्रत्येक कार्य करा. या मालकपणाच्या ऑथॉरिटीच्या चेकिंगला आणखी वाढवायचे आहे (मालकीपणाच्या
अधिकाराची तपासणी अजून काटेकोरपणे करायची आहे). आणि या मालकपणाच्या ऑथॉरिटीची निशाणी
आहे - सदैव प्रत्येक कार्यामध्ये डबल लाईट आणि खुशीची अनुभूति होईल आणि रिझल्ट -
सफलता सहज अनुभव होईल. अजूनही कुठे-कुठे अधिकारीच्या ऐवजी अधीन बनता. अधिनतेची कोणती
निशाणी दिसून येते? जे वारंवार म्हणतात - ‘माझे संस्कार आहेत, इच्छा नाही आहे परंतु
माझे संस्कार आहेत, माझी नेचर आहे (माझा स्वभाव आहे)’.
बापदादांनी या अगोदर
देखील सांगितले आहे की, जेव्हा असे म्हणता की, ‘माझा संस्कार आहे, माझे नेचर आहे’,
तर हे कमजोरीचे संस्कार तुमचे संस्कार आहेत काय? माझे आहेत? हे तर रावणाचे
मध्यकालीन संस्कार आहेत, रावणाची देणगी आहे. त्याला माझे म्हणणेच चुकीचे आहे. तुमचे
संस्कार तर जे बाबांचे संस्कार आहेत तेच संस्कार आहेत. त्यावेळी विचार करा की
माझे-माझे म्हणताच ते अधिकारी बनले आहेत आणि तुम्ही अधीन बनता. एक समान बाबांसारखे
बनायचे असेल तर ते (रावणाचे) संस्कार माझे संस्कार नाहीत, जे बाबांचे संस्कार ते
माझे संस्कार आहेत. बाबांचे संस्कार कोणते आहेत? विश्व कल्याणकारी, शुभ भावना, शुभ
कामनाधारी. तर त्यावेळी बाबांचे संस्कार समोर आणा, लक्ष्य आहे बाप समान बनण्याचे आणि
लक्षणे आहेत रावणाची. तर मिक्स होऊन जातात, थोडे बाबांचे चांगले संस्कार, थोडे ते
माझे पास्टचे संस्कार, दोन्ही मिक्स असतात ना त्यामुळे संघर्ष होत राहतो. आणि
संस्कार बनतात कसे, ते तर सर्वजण जाणता ना! मन आणि बुद्धीच्या संकल्प आणि कृतीपासून
संस्कार बनतात. अगोदर मन संकल्प करते, बुद्धी सहयोग देते आणि मग चांगले अथवा वाईट
संस्कार बनतात.
तर बापदादांनी
दादींच्या सोबत रिझल्ट पाहिला की मालकपणाचा नॅचरल आणि नेचर मध्ये (नैसर्गिक आणि
स्वाभाविक) जो नशा हवा तो बालकपणाच्या तुलनेमध्ये अजूनही कमी आहे. म्हणून बापदादा
बघतात की समाधान करण्यासाठी मग युद्ध करायला चालू करतात. आहेत ब्राह्मण परंतु
मधे-मधे क्षत्रिय बनतात. तर क्षत्रिय बनायचे नाही. ब्राह्मण सो देवता बनायचे आहे.
क्षत्रिय बनणारे तर खूप येणार आहेत, ते नंतर येणार आहेत तुम्ही तर अधिकारी आत्मे
आहात. तर ऐकला रिझल्ट. म्हणून वारंवार ‘मी कोण’, हे स्मृतिमध्ये आणा. आहेच, असे नको,
परंतु स्मृती स्वरूपामध्ये आणा. ठीक आहे ना. अच्छा. रिझल्ट देखील ऐकवला. आता
समस्येचे नाव, विघ्नाचे नाव, अशांततेचे नाव, व्यर्थ संकल्पाचे नाव, व्यर्थ कर्माचे
नाव, व्यर्थ संबंधाचे नाव, व्यर्थ स्मृतीचे नाव नष्ट करा आणि करवून घ्या. ठीक आहे
ना, करणार ना? करणार असाल तर दृढ संकल्पाचा हात वर करा. हा हात वर करणे तर कॉमन झाले
आहे म्हणून हात वर करायला सांगत नाही, मनामध्ये दृढ संकल्पाचा हात वर करा. या देहाचा
हात वर करू नका, तो खूप बघितला आहे. जेव्हा सर्वांचा मिळून मनापासून दृढ संकल्पाचा
हात वर होईल तेव्हाच विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वांचा आनंदाने हात वर होईल -
आमचे सुखदाता, शांतिदाता बाबा आले आहेत.
बाबांना प्रत्यक्ष
करण्याचा विडा उचलला आहे ना! उचलला आहे ना? पक्के? टीचर्सनी उचलला आहे? पांडवांनी
उचलला आहे? पक्के. अच्छा डेट फिक्स केली आहे. डेट फिक्स केलेली नाही? किती वेळ
पाहिजे? एक वर्ष पाहिजे, दोन वर्षे हवीत? किती वर्षे हवीत? बापदादांनी सांगितले होते
- प्रत्येकाने आपल्या पुरुषार्थाची यथाशक्ति आपल्या नॅचरल चालण्याच्या अथवा
उडण्याच्या विधी नुसार संपन्न बनण्याची आपली डेट तुम्ही स्वतःच फिक्स करा. बापदादा
तर म्हणतील - आत्ता करा, परंतु यथाशक्ती आपल्या पुरुषार्थानुसार आपली डेट फिक्स करा
आणि वेळो-वेळी त्याला चेक करा की समयानुसार मनसाची स्टेज, वाचेची स्टेज,
संबंध-संपर्काची स्टेज यामध्ये प्रोग्रेस (सुधारणा) होत आहे का? कारण की डेट फिक्स
केल्यामुळे आपणच अटेंशन राहते.
बाकी सर्व बाजूंनी,
चोहो बाजूंनी संदेश देखील आले आहेत. ई-मेल सुद्धा आली आहेत. तर ई-मेल जोपर्यंत
बापदादांकडे पोहोचेल त्याच्या अगोदरच पोहोचते, मनाच्या संकल्पाचे ई-मेल खूप वेगवान
असते. ते अगोदर पोहोचते. तर ज्यांनी पण प्रेमपूर्वक आठवण, आपल्या स्थितीचा, आपल्या
सेवेचा समाचार पाठवला आहे, त्या सर्वांचा बापदादांनी स्वीकार केला आहे, प्रेमपूर्वक
आठवण सर्वांनी खूप चांगल्या उमंग-उत्साहाने देखील पाठवली आहे. तर बापदादा त्या
सर्वांना भले विदेशवाले नाहीतर देशवाले सर्वांना रिटर्नमध्ये प्रेमपूर्वक आठवण आणि
हृदयापासूनच्या आशीर्वादांसहित प्रेम आणि शक्तिची सकाश देखील देत आहेत. अच्छा.
सर्व काही ऐकले. जसे
ऐकणे सोपे वाटते ना! असेच ऐकण्यापासून परे स्वीट सायलेन्सची स्थिती देखील व्हावी;
जेव्हा पाहिजे, जितका वेळ पाहिजे तितका वेळ मालक बनून, सर्वात पहिले विशेष आहे मन
या मनाचे मालक बना, म्हणूनच म्हटले जाते - ‘मन जीते जगतजीत’. तर आता ऐकलेत, पाहिलेत,
आत्मा राजा बनून मन-बुद्धी-संस्काराला आपल्या कंट्रोलमध्ये करू शकता का?
मन-बुद्धी-संस्कार तिघांचेही मालक बनून ऑर्डर करा - स्वीट सायलेन्स; तर अनुभव करा
की ऑर्डर केल्यामुळे, अधिकारी बनल्यामुळे तिघेही ऑर्डरमध्ये राहतात का? आता-आता
अधिकाराच्या स्टेजवर स्थित व्हा. (ड्रिल) अच्छा.
चोहो बाजूंच्या सदैव
स्वमानधारी, सत्यतेचे शक्ती स्वरूप, पवित्रतेचे सिद्धी स्वरूप, सदैव अचल-अडोल
स्थितीचे अनुभवी, स्व-परिवर्तक आणि विश्व परिवर्तक, सदा अधिकारी स्थिती द्वारे सर्व
आत्म्यांना बाबांद्वारे अधिकार देणाऱ्या चोहो बाजूंच्या बापदादांच्या लकी आणि लवली
आत्म्यांना परमात्म प्रेमपूर्वक आठवण आणि हृदयापासूनचे आशीर्वाद स्वीकार असो आणि
बापदादांचा गोड-गोड मुलांना नमस्ते.
वरदान:-
स्वतःला
स्वतःच परिवर्तन करून विश्वाचे आधारमुर्त बनणारे श्रेष्ठ पदाचे अधिकारी भव
श्रेष्ठ पद प्राप्त
करण्यासाठी बापदादांची हीच शिकवण आहे की मुलांनो स्वतःला बदला. स्वतःला बदलण्याऐवजी,
परिस्थितींना अथवा अन्य आत्म्यांना बदलण्याचा विचार करता अथवा संकल्प येतो की हे
सैलवेशन मिळावे (ही सुविधा मिळावी), सहयोग आणि आधार मिळावा तर परिवर्तित होऊ - असे
कोणत्याही आधारावर परिवर्तन होणाऱ्याचे प्रारब्ध देखील आधारावरच राहील कारण की
जितक्यांचा आधार घ्याल तितके जमेचे खाते शेअर्समध्ये वाटले जाईल. म्हणून नेहमी हे
लक्ष्य ठेवा की मला स्वतःला परिवर्तन करायचे आहे. मी स्वतः विश्वाचा आधारमूर्त आहे.
सुविचार:-
संगठन मध्ये
उमंग-उत्साह आणि श्रेष्ठ संकल्पाद्वारे सफलता झालेलीच आहे.
अव्यक्त इशारे -
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. जसे कोणी कमजोर असतो तर त्याला शक्ती
भरण्यासाठी ग्लुकोज चढवतात, असे जेव्हा आपल्याला शरीरापासून परे अशरीरी आत्मा समजता
तर ही साक्षीपणाची अवस्था शक्ती भरण्याचे काम करते आणि जितका वेळ साक्षी अवस्थेची
स्थिती राहते, तितकाच साथी बाबा देखील आठवणीत राहतो अर्थात सोबत राहतो.