09-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबा आले आहेत तुम्हाला बेहदची जागीर (संपत्ती) देण्यासाठी, अशा गोड
बाबांची तुम्ही प्रेमाने आठवण कराल तर पावन बनाल”
प्रश्न:-
विनाशाचा काळ
जसजसा जवळ येत जाईल तसतशी त्याची कोणती चिन्हे दिसून येतील?
उत्तर:-
विनाशाची वेळ जवळ असेल तर - १) सर्वांना माहित होत जाईल की आपले बाबा आलेले आहेत.
२) आता नवीन दुनियेची स्थापना, जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. अनेकांना
साक्षात्कार सुद्धा होतील. ३) संन्याशांना, राजांना सर्वांना ज्ञान मिळेल. ४) जेव्हा
ऐकतील की बेहदचे बाबा आलेले आहेत, तेच सद्गती देणारे आहेत, तर पुष्कळजण येतील. ५)
वर्तमानपत्रांद्वारे अनेकांना संदेश मिळेल. ६) तुम्ही मुले आत्म-अभिमानी बनत जाल,
एका बाबांच्याच आठवणी मध्ये अतींद्रिय सुखामध्ये रहाल.
गीत:-
इस पाप की
दुनिया से…
ओम शांती।
हे कोण म्हणत आहेत आणि कोणाला म्हणत आहेत - रूहानी मुले! बाबा वारंवार ‘रूहानी’ असे
का म्हणतात? कारण आता आत्म्यांना जायचे आहे. मग पुन्हा जेव्हा या दुनियेमध्ये याल
तेव्हा सुख असेल. आत्म्यांनी हा शांती आणि सुखाचा वारसा कल्पापूर्वी देखील मिळवला
होता. आता पुन्हा हा वारसा रिपीट होत आहे. वारसा रिपीट होईल तेव्हाच तर हे सृष्टीचे
चक्र देखील पुन्हा रिपीट होईल. रिपीट तर सर्व होते ना. जे काही पास्ट झाले आहे ते
पुन्हा रिपीट होईल. असे तर नाटक देखील रिपीट होते परंतु त्यामध्ये बदल सुद्धा करू
शकतात. जसे काही शब्द विसरतात तर ते बदल पुन्हा बनवून त्याच नाटकामध्ये ॲड करतात.
याला मग चित्रपट म्हटले जाते, यामध्ये बदल होऊ शकत नाही. हा अनादि पूर्व नियोजित
ड्रामा आहे, त्या नाटकाला पूर्व-नियोजित म्हणणार नाही. या ड्रामाला समजल्याने तोही
ड्रामा लक्षात येतो. मुले समजतात आता जी नाटके इत्यादी बघतो, ती सर्व खोटी आहेत.
कलियुगामध्ये जी वस्तू दिसते ती सतयुगामध्ये नसेल. सतयुगामध्ये जे झाले होते तेच
पुन्हा सतयुगामध्ये होईल. ही हदची नाटके इत्यादी पुन्हा तरीही भक्तीमार्गामध्येच
असतील. ज्या वस्तू भक्तिमार्गामध्ये असतात, त्या ज्ञानमार्गामध्ये अर्थात
सतयुगामध्ये नसतात. तर आता बेहदच्या बाबांकडून तुम्ही वारसा प्राप्त करत आहात.
बाबांनी समजावून सांगितले आहे - एक लौकिक पित्याकडून आणि दुसरा पारलौकिक पित्याकडून
वारसा मिळतो, बाकी जे अलौकिक पिता आहेत त्यांच्याकडून (ब्रह्मा बाबांकडून) वारसा
मिळत नाही. हे स्वतः त्यांच्याकडून वारसा प्राप्त करत आहेत. ही जी नवीन दुनियेची
प्रॉपर्टी आहे, ती बेहदचे बाबाच देतात फक्त यांच्याद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे)
देतात. यांच्याद्वारे ॲडॉप्ट करतात म्हणून यांना पिता म्हटले जाते. भक्तीमार्गामध्ये
देखील लौकिक आणि पारलौकिक पिता दोघांचीही आठवण येते. या अलौकिक पित्याची (ब्रह्माबाबांची)
काही आठवण येत नाही कारण यांच्याकडून कोणताही वारसाच मिळत नाही. ‘बाबा’ शब्द तर
बरोबर आहे परंतु ही देखील रचना आहे ना. रचनेला रचयित्याकडून वारसा मिळतो. तुम्हाला
देखील शिवबाबांनी क्रिएट केले (रचले) आहे. ब्रह्माला देखील त्यांनीच क्रिएट केले आहे.
वारसा क्रियेटर कडून मिळतो, ते आहेत बेहदचे बाबा. ब्रह्माकडे बेहदचा वारसा आहे का?
बाबा यांच्याद्वारे बसून सांगत आहेत यांना देखील वारसा मिळतो. असे नाही की वारसा
घेऊन तुम्हाला देतात. बाबा म्हणतात - तुम्ही यांची (ब्रह्मा बाबांची) देखील आठवण करू
नका. या बेहदच्या बाबांकडून तुम्हाला प्रॉपर्टी मिळते. लौकिक पित्याकडून हदचा,
पारलौकिक पित्याकडून बेहदचा वारसा मिळतो, दोन्ही रिझर्व झाले. शिवबाबांकडून वारसा
मिळतो - बुद्धीमध्ये येते! बाकी ब्रह्माबाबांचा वारसा कसा काय म्हणणार! बुद्धीमध्ये
जागीर (इस्टेट) येते ना. ही बेहदची बादशाही तुम्हाला त्यांच्याकडून (शिवबाबांकडून)
मिळते. हे आहेत मोठे बाबा. हे (ब्रह्मा बाबा) तर म्हणतात - माझी आठवण करू नका, माझी
काही कोणती प्रॉपर्टी नाही आहे, जी तुम्हाला मिळेल. ज्यांच्याकडून प्रॉपर्टी मिळणार
आहे त्यांची आठवण करा. तेच म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. लौकिक पित्याच्या
प्रॉपर्टीवरून किती भांडणे होतात. इथे तर भांडण करण्याचा प्रश्नच नाही. बाबांची
आठवण केली नाहीत तर ऑटोमॅटिकली बेहदचा वारसा देखील मिळणार नाही. बाबा म्हणतात -
‘स्वतःला आत्मा समजा’. या रथाला (ब्रह्मा बाबांना) देखील सांगतात - तू स्वतःला आत्मा
समजून माझी आठवण कर तर विश्वाची बादशाही मिळेल. याला म्हटले जाते आठवणीची यात्रा.
देहाची सर्व नाती सोडून स्वतःला अशरीरी आत्मा समजायचे आहे. यामध्येच मेहनत आहे.
अभ्यास करताना थोडी तरी मेहनत केली पाहिजे ना. या आठवणीच्या यात्रेद्वारे तुम्ही
पतितापासून पावन बनता. ती यात्रा करतात शरीराद्वारे. ही तर आहे आत्म्याची यात्रा.
ही तुमची यात्रा आहे परमधामला जाण्याकरिता. हा पुरुषार्थ केल्याशिवाय परमधामला अथवा
मुक्तिधामला कोणीही जाऊ शकत नाही. जे चांगल्या रीतीने आठवण करतात तेच जाऊ शकतात आणि
मग उच्च पद देखील तेच प्राप्त करू शकतात. जाणार तर सगळेच आहेत. परंतु ते तर पतित
आहेत ना म्हणून बोलावतात. आत्मा आठवण करते. खाते-पिते सर्व काही आत्माच करते ना.
यावेळी तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे, हीच मेहनत आहे. मेहनती शिवाय तर काहीच
मिळत नाही. हे आहे देखील खूप सोपे. परंतु मायेचा खूप विरोध होतो. एखाद्याचे चांगले
भाग्य असेल तर ते लगेच या ज्ञानामध्ये चालू लागतात. कोणी उशिराने देखील येतील. जर
बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने पक्के झाले असेल तर म्हणतील - बस्स, मी याच रूहानी
यात्रेमध्ये व्यस्त होणार. अशा तीव्र गतीने पुरुषार्थ करू लागतील तर चांगली धाव घेऊ
शकतात (चांगल्या रीतीने आठवण करू शकतात). घरामध्ये राहत असताना देखील बुद्धीमध्ये
येईल की, ही तर चांगली अगदी योग्य गोष्ट आहे; मी स्वतःला आत्मा समजून पतित-पावन
बाबांची आठवण करतो. बाबांच्या श्रीमतावर चालतील तर पावन बनू शकतात. बनतीलही नक्कीच.
पुरुषार्थाची गोष्ट आहे. आहे खूप सोपी. भक्तिमार्गामध्ये तर खूप अडचणी येतात. इथे
तुमच्या बुद्धीमध्ये आहे आता आपल्याला परत बाबांकडे जायचे आहे. आणि मग इथे येऊन
विष्णूच्या माळेमध्ये ओवले जायचे आहे. माळेचा हिशोब करा. माळा तर ब्रह्माची देखील
आहे, विष्णूची देखील आहे, रुद्राची देखील आहे. सर्वात पहिले नवीन सृष्टीचे हे आहेत
ना. बाकीचे सर्व नंतर येतात. जणू शेवटी ओवले जातात. विचारतील - तुमचे उच्च कुळ कोणते
आहे? तुम्ही म्हणाल - विष्णू कुळ. खरे तर आम्ही विष्णू कुळाचे होतो, नंतर मग
क्षत्रिय कुळाचे बनलो. मग त्यांच्यापासून इतर बिरादऱ्या (जाती) निर्माण होतात. या
नॉलेजवरून तुम्ही समजता की, बिरादऱ्या कशा बनतात. सर्वप्रथम ‘रुद्र’ची माळा बनते.
ही उच्च ते उच्च बिरादरी आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - हे तुमचे खूप उच्च
कुळ आहे. हे देखील लक्षात येते की, साऱ्या दुनियेला संदेश जरूर मिळेल. जसे बरेच लोक
म्हणतात - भगवान कुठेतरी आलेले आहेत जरूर परंतु कुठे ते कळत नाही आहे. अखेरीला ठाऊक
तर सर्वांना होईल. वर्तमानपत्रांमध्ये येत राहील. आता तर थोडे लिहीतात. असे नाही की
सर्वजण एकच वर्तमानपत्र वाचतात. लायब्ररीमध्ये वाचू शकतात. कोणी २-४ वर्तमानपत्रे
देखील वाचतात. कोणी अजिबातच वाचत नाहीत. हे सर्वांना ठाऊक होणारच आहे की, बाबा आलेले
आहेत, विनाशाचा काळ जवळ येईल तेव्हा ठाऊक होईल. नवीन दुनियेची स्थापना, जुन्या
दुनियेचा विनाश होतो. असे होऊ शकते की, अनेकांना साक्षात्कार देखील होईल. तुम्हाला
संन्याशी, राजा इत्यादींना ज्ञान द्यायचे आहे. अनेकांना संदेश मिळणार आहे. जेव्हा
ऐकतील बेहदचे बाबा आले आहेत, तेच सद्गती देणारे आहेत तर भरपूर येतील. आता
वर्तमानपत्रामध्ये नियमानुसार इतका हृदयस्पर्शी लेख अद्याप आलेला नाही. कोणी ना कोणी
निघतील, चौकशी करतील. मुले समजतात आपण श्रीमतावर सतयुगाची स्थापना करत आहोत. तुमचे
हे नवीन मिशन आहे. तुम्ही आहात ईश्वरीय मिशनचे ईश्वरीय सदस्य. जसे ख्रिश्चन
मिशनमध्ये ख्रिश्चन सदस्य बनतात. तुम्ही आहात ईश्वरीय सदस्य म्हणून गायन आहे
अतींद्रिय सुख गोप-गोपींना विचारा, जे आत्म-अभिमानी बनले आहेत. एका बाबांचीच आठवण
करायची आहे, दुसरे कोणीही नाही. हा राजयोग एक बाबाच शिकवत आहेत. तेच गीतेचे भगवान
आहेत. सर्वांना बाबांचे हेच निमंत्रण किंवा संदेश द्यायचा आहे. बाकी सर्व गोष्टी
आहेत - ज्ञानाचा शृंगार. ही सर्व चित्रे आहेत ज्ञानाचा शृंगार, ना की भक्तीचा. ही
लोकांना समजावून सांगण्याकरिता बाबांनी बसून बनवून घेतली आहेत. ही चित्रे इत्यादी
तर प्राय:लोप होतील. बाकी हे ज्ञान आत्म्यामध्ये राहणार आहे. बाबांना देखील हे
ज्ञान आहे, ड्रामामध्ये नोंदलेले आहे.
तुम्ही आता
भक्तिमार्ग पार करून ज्ञानमार्गामध्ये आला आहात. तुम्ही जाणता - आपल्या आत्म्यामध्ये
हा पार्ट आहे जो सुरू आहे. नोंदलेलेच होते जे पुन्हा आपण बाबांकडून राजयोग शिकत
आहोत. बाबांनाच येऊन हे नॉलेज द्यायचे होते. आत्म्यामध्ये नोंदलेले आहे. तिथे जाऊन
पोहोचणार आणि पुन्हा नवीन दुनियेचा पार्ट रिपीट होईल. यावेळी तुम्हाला आत्म्यातील
सुरुवातीपासूनचे संपूर्ण रेकॉर्ड समजले आहे. नंतर मग हे सर्व बंद होईल.
भक्तीमार्गाचा पार्ट देखील बंद होईल. नंतर मग पुन्हा सतयुगामध्ये तुमची जी ॲक्ट (कृती)
चालली असेल, तीच चालेल. काय होईल, ते बाबा सांगत नाहीत. जे काही झाले होते तेच होईल.
समजले जाते सतयुग आहे नवीन दुनिया. जरूर तिथे सर्व काही नवीन सतोप्रधान आणि स्वस्त
असेल, जे काही कल्पापूर्वी झाले होते, तेच होईल. पाहता देखील - या लक्ष्मी-नारायणाला
किती सुख आहे. हिरे-माणके धन पुष्कळ असते. धन आहे तर सुख देखील आहे. इथे तुम्ही
तुलना करू शकता. तिथे करू शकणार नाही. इथल्या गोष्टी तिथे सर्व विसरून जाल. या आहेत
नवीन गोष्टी ज्या बाबाच मुलांना समजावून सांगतात. आत्म्यांना तिथे जायचे आहे, जिथे
सर्व कारभार बंद होतो. हिशोब चुक्त्तू होतो. रेकॉर्ड पूर्ण होते. एकच रेकॉर्ड खूप
मोठे आहे. म्हणतील - मग तर आत्मा देखील इतकी मोठी असली पाहिजे. परंतु नाही. इतक्या
छोट्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट आहे. आत्मा देखील अविनाशी आहे. याला फक्त एक
आश्चर्य म्हणता येईल. अशी आश्चर्यकारक गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही.
बाबांबद्दल तर म्हटले जाते सतयुग-त्रेताच्या काळामध्ये विश्रांती घेतात. आपण तर
ऑलराऊंड पार्ट बजावतो. सर्वात जास्त आपला पार्ट आहे. तर बाबा वारसा देखील उच्च
देतात. म्हणतात - ८४ जन्म देखील तुम्हीच घेता. माझा तर पार्ट असा आहे जो इतर कोणीही
बजावू शकत नाही. वंडरफुल गोष्टी आहेत ना. हे देखील आश्चर्य आहे जे आत्म्यांना बाबा
बसून समजावून सांगतात. आत्मा काही स्त्री-पुरुष नाही आहे. जेव्हा शरीर धारण करते
तेव्हा मेल-फिमेल (स्त्री-पुरुष) म्हटले जाते. सर्व आत्मे मुले आहेत त्यामुळे
भाऊ-भाऊ होतात. वारसा घेतात तर जरूर भाऊ-भाऊ आहेत. आत्मा शिवबाबांची संतान आहे ना.
पित्याकडून वारसा घेतात म्हणून मेलच (पुरुषच) म्हटले जाईल. बाबांकडून वारसा घेण्याचा
सर्व आत्म्यांना अधिकार आहे. त्यासाठी बाबांची आठवण करायची आहे. स्वतःला आत्मा
समजायचे आहे. आपण सर्व ब्रदर्स आहोत. आत्मा, आत्माच आहे. ती कधीही बदलत नाही. बाकी
शरीर कधी पुरुषाचे, कधी स्त्रीचे घेते. या खूप विचित्र गोष्टी समजून घ्यायच्या आहेत,
दुसरे कोणीही सांगू शकणार नाही. बाबांकडून किंवा तुम्हा मुलांकडूनच ऐकू शकतात. बाबा
तर तुम्हा मुलांशीच बोलतात. पूर्वी तर सर्वांना भेटत होते, सर्वांशी बोलत होते. आता
असे करता-करता शेवटी तर कोणाशी बोलणारही नाहीत. सन शोज फादर आहे ना. मुलांनीच
शिकवायचे आहे. तुम्ही मुलेच अनेकांची सेवा करून घेऊन येता. बाबा समजतात हे अनेकांना
आप समान बनवून घेऊन येतात. हे मोठा राजा बनतील, हे छोटा राजा बनतील. तुम्ही रूहानी
सेना देखील आहात, जे सर्वांना रावणाच्या कैदेतून सोडवून आपल्या मिशनमध्ये घेऊन येता.
जितकी जे सेवा करतात तितके फळ मिळते. ज्यांनी जास्त भक्ती केली आहे तेच जास्त हुशार
होतात आणि वारसा घेतात. हे शिक्षण आहे, चांगल्या रीतीने शिकला नाहीत तर नापास व्हाल.
अभ्यास खूप सोपा आहे. समजून घ्यायला आणि समजावून सांगायला देखील सोपा आहे. कठीण
वाटण्याचा प्रश्नच नाही, परंतु राजधानी स्थापन होणार आहे, त्यामध्ये तर सर्व
पाहिजेत ना. पुरुषार्थ करायचा आहे. त्यामध्ये आपण उच्च पद प्राप्त करावे. मृत्यूलोक
मधून ट्रान्सफर होऊन अमरलोकमध्ये जायचे आहे. जितका चांगला अभ्यास कराल तितके
अमरपुरीमध्ये उच्च पद प्राप्त कराल.
बाबांवर प्रेम देखील
करायचे आहे कारण ही आहे सर्वात प्रिय गोष्ट. प्रेमाचा सागर देखील आहेत, सर्वांचेच
एकसारखे प्रेम असू शकत नाही. कोणी आठवण करतात, कोणी करत नाहीत. कोणाला मग इतरांना
ज्ञान समजावून सांगण्याचा देखील नशा असतो ना. हे खूप मोठे प्रलोभन आहे. कोणालाही
सांगायचे आहे की, ही युनिव्हर्सिटी आहे, हे स्पिरिच्युअल शिक्षण आहे. अशी चित्रे
इतर कोणत्याही स्कूलमध्ये दाखवली जात नाहीत. दिवसेंदिवस अजूनही विविध चित्रे बनत
राहतील, जी पाहिल्यावर मनुष्य लगेचच समजतील. शिडीचे चित्र खूप चांगले आहे. परंतु
देवता धर्माचा नसेल तर त्याला समजणार नाही. जो या कुळाचा असेल त्याला तीर लागेल. जे
आपल्या देवता धर्माची पाने असतील तेच येतील. तुम्हाला जाणवेल की, हे तर खूप आवडीने
ऐकत आहेत. कोणी तर असेच निघून जातील. दिवसेंदिवस नवीन-नवीन गोष्टी देखील मुलांना
सांगत राहतात. सेवेची खूप आवड असली पाहिजे. जे सेवेमध्ये तत्पर असतील तेच हृदयामध्ये
स्थान मिळवतील आणि तख्तावर देखील बसतील. पुढे चालून तुम्हाला सर्व साक्षात्कार होत
राहतील. त्याच आनंदामध्ये तुम्ही रहाल. दुनियेमध्ये तर खूप हाहाकार होणार आहे.
रक्ताच्या नद्या सुद्धा वाहणार आहेत. सेवाभावी बहाद्दुर मुले कधीही उपाशी मरणार
नाहीत. परंतु इथे तर तुम्हाला वनवासी बनून रहायचे आहे. सुख देखील तिथेच मिळेल.
कन्येला तर वनवासी असल्याप्रमाणे बसवतात ना. सासरी जाऊन खूप घालायचे आहे. तुम्ही
देखील सासरी जात आहात तर तो नशा असतो. ते आहेच सुखधाम. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) माळेत
ओवण्याकरिता देही-अभिमानी बनून तीव्र गतीने आठवणीची यात्रा करायची आहे. बाबांच्या
आदेशानुसार चालून पावन बनायचे आहे.
२) बाबांचा परिचय
देऊन अनेकांना आप समान बनविण्याची सेवा करायची आहे. इथे वनवासी बनून रहायचे आहे.
अंतिम हाहाकाराचे दृश्य पाहण्याकरिता महावीर बनायचे आहे.
वरदान:-
बंधनांच्या
पिंजऱ्याला तोडून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करणारे खरे ट्रस्टी भव
शरीराचे अथवा नात्याचे
बंधनच एक पिंजरा आहे. कर्तव्ये देखील नाममात्र निभावायची आहेत, मोहापोटी नाहीत,
तेव्हा म्हणणार निर्बंधन. जे ट्रस्टी बनून राहतात तेच निर्बंधन आहेत; जर कोणताही
‘माझे’पणा असेल तर पिंजऱ्यामध्ये बंद आहात. पिंजऱ्यातील मैने पासून आता फरिश्ते बनला
आहात त्यामुळे जरा सुद्धा कोणतेही बंधन नसावे. मनाचे देखील बंधन नाही. ‘काय करू, कसे
करू, व्हावे वाटते परंतु होत नाही’ - हे देखील मनाचे बंधन आहे; जेव्हा मरजीवा बनला
आहात तर सर्व प्रकारची बंधने समाप्त, सदैव जीवनमुक्त स्थितीचा अनुभव होत रहावा.
बोधवाक्य:-
संकल्पांना
वाचवा तेव्हाच वेळ, बोल सर्व आपोआप वाचेल.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
कर्मातीत अर्थात
कर्माच्या कोणत्याही बंधनाच्या स्पर्शा पासून न्यारे. असाच अनुभव वाढत जावा. कोणतेही
कार्य स्पर्श करू नये आणि केल्या नंतर जो रिजल्ट निघतो त्याचा देखील स्पर्श नसावा,
पूर्णतः न्यारेपणाचा अनुभव होत रहावा. जणूकाही दुसऱ्या कोणीतरी करवून घेतले आणि मी
केले. निमित्त बनण्यामध्ये देखील न्यारेपणाचा अनुभव व्हावा. जे काही झाले, फुल
स्टॉप लावून न्यारे बना.