10-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, तुमची आठवणीची यात्रा अतिशय गुप्त आहे, तुम्ही मुले आता मुक्तीधाम मध्ये
जाण्याची यात्रा करत आहात”
प्रश्न:-
स्थूलवतनवासी
पासून सूक्ष्मवतनवासी फरिश्ता बनण्याचा पुरुषार्थ कोणता आहे?
उत्तर:-
सूक्ष्मवतनवासी फरिश्ता बनायचे असेल तर रुहानी सेवेमध्ये हाड्नहाड स्वाहा करा.
हाड्नहाड स्वाहा केल्याशिवाय फरिश्ता बनू शकत नाही कारण फरिश्ते बिना हाडामासाचे
असतात. या बेहदच्या सेवेमध्ये दधिची ऋषी प्रमाणे हाड्नहाड लावायचे आहे, तेव्हाच
व्यक्त पासून अव्यक्त बनाल.
गीत:-
धीरज धर मनुवा…
ओम शांती।
मुलांना या गाण्यामधून इशारा मिळाला आहे की, धीर धरा. मुले जाणतात आपण श्रीमतावर
पुरुषार्थ करत आहोत आणि हे देखील जाणतो की, आपण या गुप्त योगाच्या यात्रेवर आहोत.
ती यात्रा आपल्या वेळेवर पूर्ण होईल. मुख्य आहेच मुळी ही यात्रा ज्याला
तुमच्याशिवाय इतर कोणीही जाणत नाही. यात्रेवर जायचे आहे जरूर आणि घेऊन जाणारा पंडा
देखील पाहिजे. याचे नावच ठेवले आहे - ‘पांडव सेना’. आता यात्रेवर आहेत. स्थूल
युद्धाची काही गोष्टच नाही. प्रत्येक गोष्ट गुप्त आहे. यात्रा देखील अतिशय गुप्त आहे.
शास्त्रांमध्ये देखील आहे - बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर माझ्याकडे येऊन
पोहोचाल. ही यात्रा तर झाली ना. बाबा सर्व शास्त्रांचे सार सांगत आहेत. प्रत्यक्ष
कृतीमध्ये आणतात. आम्हा आत्म्यांना आपल्या निर्वाणधामच्या यात्रेवर जायचे आहे.
विचार करा तर समजू शकेल. ही आहे मुक्तिधामची खरी यात्रा. सर्वांना वाटते आपण
मुक्तिधाममध्ये जावे. ही यात्रा करण्यासाठी कोणीतरी आम्हाला मुक्तीधामचा रस्ता
सांगावा. परंतु बाबा तर आपल्या ठरलेल्या वेळी आपोआप येतात, ज्या वेळेला कोणीही जाणत
नाही. बाबा येऊन समजावून सांगतात तर मुलांना निश्चय होतो. बरोबर हीच खरी यात्रा आहे
जी गायली गेली आहे. भगवंताने ही यात्रा शिकवली होती. मनमनाभव, मध्याजी भव. हे शब्द
देखील तुमच्या खूप उपयोगाचे आहेत. फक्त हे कोणी म्हटले? ते मात्र चुकीचे लिहिले आहे.
म्हणतात - देहा सहित देहाच्या सर्व नात्यांना विसरून जा. यांना (ब्रह्मा बाबांना)
देखील देह आहे. यांना देखील समजावून सांगणारे दुसरे आहेत, ज्यांना आपला देह नाहीये
ते बाबा आहेत विचित्र, त्यांचे कोणतेही चित्र (देह) नाही. बाकी सर्वांचे तर चित्र
आहे (देह आहेत). सारी दुनिया चित्रशाळा आहे. ‘विचित्र’ आणि ‘चित्र’ अर्थात ‘जीव’ आणि
‘आत्मा’ यांचे मिळून हे मनुष्य रूप बनलेले आहे. तर ते बाबा आहेत विचित्र. म्हणतात -
‘मला या चित्राचा (देहाचा) आधार घ्यावा लागतो’. खरोखर, शास्त्रांमध्ये हे नमूद आहे
की, जेव्हा महाभारत युद्ध चालू होते तेव्हा भगवंताने असे म्हटले होते. राजयोग शिकवत
होते, जरूर राज्य स्थापन झाले होते. आता तर राज्यच नाही आहे. भगवंताने राजयोग शिकवला
होता नवीन दुनियेकरिता कारण विनाश समोर उभा होता. समजावून सांगितले जाते असे झाले
होते जेव्हा स्वर्गाची स्थापना झाली होती. ते लक्ष्मी-नारायणाचे राज्य स्थापन झाले
होते. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे सतयुग होते, आता कलियुग आहे. पुन्हा बाबा त्याच
गोष्टी समजावून सांगत आहेत. असे तर कोणी म्हणू शकणार नाही की, मी तुम्हाला परत घेऊन
जाण्यासाठी परमधामवरून आलो आहे. हे केवळ परमपिता परमात्माच ब्रह्माद्वारे म्हणू
शकतात, दुसऱ्या कोणाही द्वारे हे म्हणू शकत नाहीत. सूक्ष्मवतनमध्ये आहेतच
ब्रह्मा-विष्णू-शंकर. ब्रह्मासाठी देखील सांगितले आहे की ते आहेत अव्यक्त ब्रह्मा
आणि हे आहेत व्यक्त. तुम्ही आता फरिश्ता बनत आहात. फरिश्ते काही स्थूल वतनमध्ये
नसतात. फरिश्त्यांना हाड-मांस नसते. इथे या रूहानी सेवेमध्ये हाडांसहीत सर्वकाही
स्वाहा करतात (कामी आणतात), आणि मग फरिश्ते बनतात. आता तर हाडे आहेत ना. हे देखील
लिहिलेले आहे - ‘आपली हाडे देखील सेवेमध्ये दिली’. जणू आपली हाडे स्वाहा करतात.
स्थूलवतनवासी पासून सूक्ष्मवतनवासी बनायचे आहे. इथे आपण हाडे देऊन (हाडे सेवेमध्ये
लावून) सूक्ष्म फरिश्ते बनतो. या सेवेमध्ये सर्व काही स्वाहा करायचे आहे. आठवणीमध्ये
राहता-राहता आपण फरिश्ते बनणार. हे देखील गायले गेले आहे - ‘मिरुआ मौत मलूका शिकार’,
‘मलूका’ फरिश्त्याला म्हटले जाते. तुम्ही मनुष्यापासून फरिश्ते बनता. तुम्हाला देवता
म्हणू शकत नाही. इथे तर तुम्हाला शरीर आहे ना. सूक्ष्मवतनचे वर्णन आता केले जात आहे.
योगामध्ये राहून मग फरिश्ते बनतात. शेवटी तुम्ही फरिश्ते बनाल. तुम्हाला सर्व
साक्षात्कार होतील आणि आनंद होईल. बाकीचे सर्व मनुष्यमात्र तर काळाची शिकार होतील.
तुमच्यामध्ये जे महावीर आहेत ते अडोल (दृढ) राहतील. बाकी किती काय-काय होत राहील!
विनाशाचा सीन तर होणारच आहे ना. अर्जुनाला विनाशाचा साक्षात्कार झाला. काही एकाच
अर्जुनाची गोष्ट नाहीये. तुम्हा मुलांना विनाश आणि स्थापनेचा साक्षात्कार होतो. अगदी
सुरुवातीला बाबांना (ब्रह्मा बाबांना) देखील विनाशाचा साक्षात्कार झाला. त्यावेळी
ज्ञान तर काहीच नव्हते. बघितले की, सृष्टीचा विनाश होत आहे आणि मग चतुर्भुजचा
साक्षात्कार झाला. वाटले, हे तर चांगले आहे. विनाशानंतर मी विश्वाचा मालक बनतो, तर
आनंद झाला. आता हे दुनिया जाणत नाही की विनाश तर चांगला आहे ना. शांतीसाठी प्रयत्न
करतात परंतु सरतेशेवटी विनाश तर होणारच आहे. आठवण करतात - ‘पतित-पावन या’, तर बाबा
येतील जरूर आणि येऊन पावन दुनिया स्थापन करतील, जिथे आपण राज्य करू. हे तर चांगले
आहे ना. पतित-पावनची आठवण का करतात? कारण दुःख आहे. पावन दुनियेमध्ये देवता आहेत,
पतित दुनियेमध्ये तर देवतांची पावले पडू शकत नाहीत. तर जरूर पतित दुनियेचा विनाश
झाला पाहिजे. गायले देखील आहे महाविनाश झाला. त्याच्या नंतर काय होते? एका धर्माची
स्थापना ती तर अशी होणारच ना. इथून राजयोग शिकतील. विनाश होईल बाकी भारतामध्ये कोण
वाचतील? जे राजयोग शिकतात, नॉलेज देतात तेच वाचतील; विनाश तर सर्वांचाच होणार आहे,
यामध्ये घाबरण्याचा प्रश्नच नाही. पतित-पावनला बोलावतात मग जेव्हा ते येतात तेव्हा
आनंद झाला पाहिजे ना. बाबा म्हणतात - विकारामध्ये जाऊ नका. या विकारांवर विजय मिळवा
किंवा दान द्या तर ग्रहण सुटेल. भारताचे ग्रहण सुटते जरूर. काळ्या पासून गोरे बनायचे
आहे. सतयुगामध्ये पवित्र देवता होते, ते जरूर इथेच बनले असतील.
तुम्ही जाणता आपण
श्रीमतावर निर्विकारी बनतो. भगवानुवाच, हे आहेत गुप्त. श्रीमतावर चालून तुम्ही
बादशाही प्राप्त करता. बाबा म्हणतात - तुम्हाला नरापासून नारायण बनायचे आहे.
सेकंदामध्ये राजाई मिळू शकते. सुरुवातीला मुली ४-५ दिवस सुद्धा वैकुंठामध्ये जाऊन
राहत होत्या. शिवबाबा येऊन मुलांना वैकुंठाचा देखील साक्षात्कार घडवत होते. किती
मान सन्मानाने देवता येत असत. तर मुलांना मनातून वाटते बरोबर गुप्तवेशामध्ये येणारे
बाबा आम्हाला सांगत आहेत. ब्रह्मा तनामध्ये येतात. ब्रह्माचे तन तर इथे हवे ना.
प्रजापिता ब्रह्माद्वारे स्थापना. बाबांनी सांगितले आहे - कोणीही येतात तर त्यांना
विचारा कोणाकडे येता? बी.के. कडे. ब्रह्माचे नाव कधी ऐकले आहे? ‘प्रजापिता’ तर आहे
ना. आपण सर्व येऊन त्यांचे बनलो आहोत. जरूर पूर्वी सुद्धा बनलो होतो. ब्रह्मा द्वारे
स्थापना तर सोबत ब्राह्मण देखील हवेत. बाबा, ब्रह्मा द्वारे कोणाला समजावून सांगतात?
शूद्रांना तर सांगणार नाहीत. हे आहेत ब्रह्मामुख वंशावळी ब्राह्मण, शिवबाबांनी
ब्रह्माद्वारे आम्हाला आपले बनवले आहे. ब्रह्माकुमार-कुमारी किती असंख्य आहेत,
कित्येक सेंटर्स आहेत. सर्व ठिकाणी ब्रह्माकुमारी शिकवतात. इथे आम्हाला आजोबांचा
वारसा मिळतो. भगवानुवाच, तुम्हाला राजयोग शिकवतो. ते (शिवबाबा) निराकार
असल्याकारणाने यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) शरीराचा आधार घेऊन आम्हाला नॉलेज ऐकवतात.
सर्वजण प्रजापित्याची संतान तर असतील ना! आपण आहोत प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी.
शिवबाबा आहेत दादा (आजोबा). त्यांनी ॲडॉप्ट केले आहे. तुम्ही जाणता आम्ही
आजोबांकडून शिकत आहोत ब्रह्माद्वारे. हे लक्ष्मी-नारायण दोघेही स्वर्गाचे मालक आहेत
ना. भगवान तर एक उच्च ते उच्च निराकारच आहेत. मुलांची धारणा खूप चांगली असली पाहिजे.
सर्वप्रथम हे समजावून सांगा - भक्तिमार्गामध्ये आहेत दोन पिता. स्वर्गामध्ये आहे एक
पिता. पारलौकिक पित्याद्वारे बादशाही मिळाली मग आठवण का कराल. दुःखच नाहीये ज्यासाठी
आठवण करावी लागेल. गातात - ‘दुःख-हर्ता सुख-कर्ता’. ती आत्ताची गोष्ट आहे. जे
भूतकाळामध्ये घडून जाते त्याचे गायन केले जाते. महिमा आहे एकाची. ते एक बाबाच येऊन
पतितांना पावन बनवतात. मनुष्य थोडेच हे समजतात. ते तर भूतकाळातल्या कथा लिहित बसतात.
तुम्ही आता समजता - बरोबर बाबांनी राजयोग शिकवला, ज्याच्याद्वारे बादशाही मिळाली.
८४ चे चक्र फिरलो. आता पुन्हा आम्ही शिकत आहोत, नंतर मग २१ जन्म राज्य करणार. असे
देवता बनणार. असे कल्पापूर्वी बनलो होतो. समजता आपण पूर्ण ८४ जन्मांचे चक्र फिरलो
आहोत. आता पुन्हा सतयुग-त्रेतामध्ये जाणार तेव्हाच तर बाबा विचारतात यापूर्वी किती
वेळा भेटला आहात? ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना! एखाद्या नवीन असणाऱ्याने जरी ऐकले तरी
तो देखील समजेल ८४ चे चक्र तर जरूर आहे. जे पहिले येणारे आहेत त्यांचेच चक्र पूर्ण
झाले असेल. बुद्धीने विचार करायचा आहे. याच घरामध्ये, याच ड्रेसमध्ये बाबा आम्ही
तुम्हाला अनेकदा भेटलो आहोत आणि भेटत राहणार. पतितापासून पावन, पावनपासून पतित होतच
आलो आहोत. कोणतीही गोष्ट कायम नवीच राहील, असे तर होऊ शकत नाही. जुनी जरूर बनते.
प्रत्येक गोष्ट सतो-रजो-तमोमध्ये येते. आता तुम्ही मुले जाणता नवीन दुनिया येत आहे.
त्याला स्वर्ग म्हटले जाते. हा आहे नरक. ती आहे पावन दुनिया. बराच काळ बोलावत
राहतात - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’; कारण दुःख वाढत जात आहे ना.
परंतु हे समजत नाहीत की, आम्हीच पूज्य होतो आणि आता पुजारी बनलो आहोत. द्वापरमध्ये
पुजारी बनलो. अनेक धर्म होत गेले. खरोखर, पतितापासून पावन, पावनपासून पतित होत आलो
आहोत. हा खेळ भारतावरच आधारित आहे.
तुम्हा मुलांना आता
स्मृती आली आहे, आता तुम्ही शिवजयंती साजरी करता. बाकीचे कोणीही शिवाला तर जाणत
सुद्धा नाहीत, आपण जाणतो. खरोखर, आम्हाला राजयोग शिकवतात. ब्रह्माद्वारे स्वर्गाची
स्थापना होत आहे. जरूर जे योग शिकतील, स्थापना करतील तेच मग राज्य-भाग्य मिळवतील.
आम्ही म्हणतो - खरोखर, आम्ही कल्प-कल्प बाबांकडून हा राजयोग शिकलो आहोत. बाबांनी
समजावून सांगितले आहे - आता हे ८४ जन्मांचे चक्र पूर्ण होत आहे. मग नव्याने चक्र
फिरायचे आहे. चक्राला तर जाणून घेतले पाहिजे ना. भले ही चित्रे नसली तरी देखील
तुम्ही समजावून सांगू शकता. ही तर अगदी सोपी गोष्ट आहे. बरोबर भारत स्वर्ग होता, आता
नरक आहे. फक्त ते लोक समजतात कलियुग अजून बाल्यावस्थेमध्ये आहे. तुम्ही म्हणता - हा
तर कलियुगाचा अंतिम समय आहे. चक्र पूर्ण होत आहे. बाबा म्हणतात - मी येतो पतित
दुनियेला पावन बनविण्याकरिता. तुम्ही जाणता आपल्याला पावन दुनियेमध्ये जायचे आहे.
तुम्ही मुक्ती, जीवन मुक्तीधाम, शांतीधाम, सुखधाम आणि दुःखधामला सुद्धा समजता. परंतु
नशिबात नसेल तर मग हा विचार करत नाहीत की, का नाही आपण सुखधाममध्ये जावे. खरोखर
आम्हा आत्म्यांचे घर ते शांतीधाम आहे. तिथे आत्म्याला ऑर्गन्स (अवयव) नसल्याकारणाने
काही बोलत नाही. तिथे सर्वांना शांती मिळते. सतयुगामध्ये आहे एक धर्म. हा अनादि,
अविनाशी वर्ल्ड ड्रामा आहे, जो चक्र फिरतच राहतो. आत्म्याचा कधी विनाश होत नाही.
शांतीधाम मध्ये देखील थोडा वेळ थांबावेच लागते. या नीट समजून घेण्याच्या गोष्टी
आहेत. कलियुग आहे - दुःखधाम. किती अनेक धर्म आहेत, खूप अराजकता आहे. जेव्हा पूर्णपणे
दुःख-धाम बनते तेव्हाच बाबा येतात. दुःखधाम नंतर आहे पूर्ण सुखधाम. शांतीधाम मधून
आपण सुखधाममध्ये येतो, आणि नंतर मग दुःखधाम बनते. सतयुगामध्ये संपूर्ण निर्विकारी,
इथे आहेत संपूर्ण विकारी. हे समजावून सांगणे खूप सोपे आहे ना. हिंमत पाहिजे. कुठेही
जाऊन ज्ञान समजावून सांगा. हे देखील लिहिलेले आहे - हनुमान सत्संगामध्ये मागे
चपलांमध्ये जाऊन बसत असे. तर जे महावीर असतील ते कुठेही जाऊन युक्तीने ऐकतील, बघू
काय बोलतात ते तर ऐकू. त्यांचे कल्याण करण्यासाठी तुम्ही ड्रेस बदलून कुठेही जाऊ
शकता. बाबा सुद्धा गुप्त वेशामध्ये तुमचे कल्याण करत आहेत ना. मंदिरांमध्ये कुठेही
निमंत्रण मिळते तर जाऊन हे ज्ञान समजावून सांगायचे आहे. दिवसेंदिवस तुम्ही हुशार
होत जाता. सर्वांना बाबांचा परिचय तर द्यायचाच आहे, प्रयत्न करायचा असतो. हे तर
गायले गेले आहे, अखेरीला संन्यासी, राजे इत्यादी आले. जनक राजाला सेकंदामध्ये
जीवन-मुक्ती मिळाली. तो मग जाऊन त्रेतामध्ये अनुजनक बनला! अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अखेरचा
विनाशाचा सीन बघण्यासाठी आपली स्थिती महावीराप्रमाणे निर्भय, अडोल बनवायची आहे.
गुप्त आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे.
२) अव्यक्तवतनवासी
फरिश्ता बनण्यासाठी बेहद सेवेमध्ये दधिची ऋषी प्रमाणे आपले हाड्नहाड स्वाहा करायचे
आहे.
वरदान:-
पहिल्या
श्रीमतावर विशेष अटेंशन देऊन फाउंडेशनला मजबूत बनविणारे सहयोगी भव
बापदादांचे पहिल्या
नंबरचे श्रीमत आहे की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. जर आत्म्याऐवजी
स्वतःला साधारण शरीरधारी समजत असाल तर आठवण टिकू शकणार नाही. तसेही जेव्हा कोणी दोन
वस्तूंना जेव्हा जोडतात तर पहिले त्याला एक समान (समान मापाचे) करतात, अगदी तसेच
आत्मा समजून आठवण कराल तर आठवण सहज होईल. हे श्रीमतच मुख्य फाउंडेशन आहे. या
गोष्टीवर वारंवार लक्ष द्या तर सहजयोगी बनाल.
बोधवाक्य:-
तुमचे कर्म हे
आत्म्याचे दर्शन करविणारा एक आरसा आहे त्यामुळे कर्मा द्वारे शक्ती स्वरूपाला
प्रत्यक्ष करा.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
ब्राह्मण सो फरिश्ता
अर्थात जीवनमुक्त, जीवन-बंध नाही. ना देहाचे बंधन, ना देहाच्या नात्याचे बंधन, ना
देहाच्या पदार्थांचे बंधन. जर आपल्या देहामधील आसक्ती नष्ट केली असेल तर देहाची नाती
आणि पदार्थांचे बंधन आपोआपच नष्ट होईल. असे नाही प्रयत्न करू. ‘प्रयत्न’ हा शब्दच
हे सिद्ध करतो की, जुन्या दुनियेचे आकर्षण आहे त्यामुळे ‘प्रयत्न’ हा शब्द नाहीसा
करा. देहभानाला सोडा.