10-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, खुदा तुमचा दोस्त आहे, रावण दुश्मन आहे, म्हणून तुम्ही खुदावर प्रेम करता
आणि
रावणाला जाळता”
प्रश्न:-
कोणत्या
मुलांना अनेकांचे आशीर्वाद स्वत:च मिळत जातात?
उत्तर:-
जी मुले आठवणीमध्ये राहून स्वत:च पवित्र बनतात आणि दुसऱ्यांनाही आप समान पवित्र
बनवतात. त्यांना अनेकांचे आशीर्वाद मिळतात, ते खूप उच्च पद प्राप्त करतात. बाबा
तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनण्यासाठी एकच श्रीमत देतात - मुलांनो, कोणत्याही देहधारीची
आठवण न करता माझी आठवण करा.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज...
ओम शांती।
ओम् शांतीचा अर्थ तर रुहानी बाबांनी रुहानी मुलांना समजावून सांगितला आहे. ओम्
अर्थात मी आत्मा आहे आणि हे माझे शरीर आहे. आत्मा तर दिसून येत नाही. आत्म्यामध्येच
चांगले किंवा वाईट संस्कार असतात. आत्म्यामध्येच मन-बुद्धी आहे, शरीरामध्ये बुद्धी
नाहीये. मुख्य आहे आत्मा. शरीर तर माझे आहे. आत्म्याला कोणी पाहू शकत नाही. शरीराला
आत्मा पाहू शकते, आत्म्याला शरीर पाहू शकत नाही. आत्मा निघून जाते तर शरीर जड बनते.
आत्म्याला पाहू शकत नाही. शरीराला पाहू शकतो. तसेच आत्म्याचे जे पिता आहेत, ज्याला
‘ओ गॉड फादर’ म्हणतात, ते देखील दिसून येत नाहीत, त्यांना समजले जाते, जाणले जाते.
आपण सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहोत. शरीरामध्ये येतो, तेव्हा म्हणतो - हे भाऊ-भाऊ आहेत हे
बहिण-भाऊ आहेत. आत्मे तर सर्व भाऊ-भाऊ आहेत. आत्म्यांचे पिता आहेत - परमपिता
परमात्मा. देहधारी भाऊ-बहिण एकमेकांना पाहू शकतात. आत्म्यांचे पिता एकच आहेत,
त्यांना पाहू शकत नाहीत. तर आता बाबा आले आहेत, जुन्या दुनियेला नवीन बनविण्याकरिता.
नवीन दुनिया सतयुग होती. आता जुनी दुनिया कलियुग आहे, याला आता बदलायचे आहे. जुनी
दुनिया तर नष्ट झाली पाहिजे ना. जुने घर नष्ट होऊन, नवीन घर बनते ना, तसे ही जुनी
दुनिया देखील नष्ट होणार आहे. सतयुगा नंतर मग त्रेता, द्वापर, कलियुग आणि पुन्हा मग
सतयुग जरूर येणार आहे. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होणार आहे. सतयुगामध्ये असते
देवी-देवतांचे राज्य. सूर्यवंशी आणि चंद्रवंशी, त्यांना म्हटले जाते
लक्ष्मी-नारायणाची डिनायस्टी (लक्ष्मी-नारायणाचे घराणे), राम-सीतेचे घराणे. हे तर
सोपे आहे ना. नंतर मग द्वापर-कलियुगामध्ये इतर धर्म येतात. आणि मग देवता जे पवित्र
होते, ते अपवित्र बनतात, याला म्हटले जाते रावण राज्य. रावणाला वर्षानुवर्षे जाळत
आले आहेत परंतु जळतच नाही, पुन्हा-पुन्हा जाळत राहतात. हा आहे सर्वांचा सर्वात मोठा
शत्रू म्हणून त्याला जाळण्याची प्रथा प्रचलित झाली आहे. भारताचा एक नंबरचा शत्रू
कोण आहे? आणि मग एक नंबरचा दोस्त, नेहमी सुख देणारा आहे खुदा. खुदाला दोस्त म्हणतात
ना. यावर एक कहाणी देखील आहे. तर खुदा आहे - दोस्त (मित्र) आणि रावण आहे - शत्रू.
खुदा जो दोस्त आहे त्यांना कधी जाळणार नाहीत. रावण आहे शत्रू म्हणून दहा तोंडाचा
रावण बनवून त्याला वर्षानुवर्षे जाळतात. गांधीजी देखील म्हणत होते की, आम्हाला
रामराज्य हवे. राम राज्यामध्ये सुख आहे, तर रावण राज्यामध्ये दुःख आहे. आता हे कोण
बसून समजावून सांगत आहेत? पतित-पावन बाबा. शिव आहेत बाबा, ब्रह्मा आहेत दादा. बाबा
नेहमी सही देखील करतात - ‘बापदादा’. प्रजापिता ब्रह्मा देखील सर्वांचे झाले ना,
ज्यांना ॲडम सुद्धा म्हटले जाते. त्यांना ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हटले जाते.
मनुष्य सृष्टीमध्ये प्रजापिता झाले. प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्राह्मण रचले जातात
नंतर मग ब्राह्मण सो देवता बनतात. देवता मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतात. यांना
म्हटले जाते प्रजापिता ब्रह्मा, मनुष्य सृष्टीचे वडीलधारे. प्रजापिता ब्रह्माची किती
असंख्य मुले आहेत. बाबा-बाबा म्हणत राहतात. हे (ब्रह्मा बाबा) आहेत साकार बाबा,
शिवबाबा आहेत निराकार बाबा. गायले देखील जाते, प्रजापिता ब्रह्मा द्वारे नवीन
मनुष्य सृष्टी रचतात. आता तुमची ही जुनी खाल (शरीर) आहे. ही आहेच पतित दुनिया, रावण
राज्य. आता रावणाची आसुरी दुनिया नष्ट होईल. त्यासाठीच ही महाभारत लढाई आहे. परत
सतयुगामध्ये, या रावण शत्रूला कोणी जाळणार नाहीत. रावणच नसेल. रावणानेच दुःखाची
दुनिया बनवली आहे. असे नाही की, ज्यांच्याकडे पुष्कळ धन आहे, मोठ-मोठे बंगले आहेत,
ते स्वर्गामध्ये आहेत.
बाबा समजावून सांगत
आहेत, भले कोणाकडे करोडो रुपये आहेत, परंतु हे तर सर्व मातीमध्ये मिसळणार आहेत.
नवीन दुनियेमध्ये मग नवीन खाणी निघतील, ज्याद्वारे नवीन दुनियेतील महाल इत्यादी
सर्व बनवले जातात. ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. मनुष्य भक्ती करतातच
सद्गतीसाठी, आम्हाला पावन बनवा, आम्ही विशश (विकारी) बनलो आहोत. विकारीला पतित
म्हटले जाते. सतयुगामध्ये आहेतच व्हाईसलेस, संपूर्ण निर्विकारी. तिथे मुले
योगबळाद्वारे जन्म घेतात, तिथे विकार असतच नाही. ना देह-अभिमान आहे, ना काम क्रोध
आहे... ५ विकार असतही नाहीत म्हणून तिथे कधी रावणाला जाळतच नाहीत. इथे तर
रावण-राज्य आहे. आता बाबा म्हणतात - तुम्ही पवित्र बना. ही पतित दुनिया तर नष्ट
होणार आहे; जे श्रीमतावर पवित्र राहतात, तेच बाबांच्या मतावर चालून, विश्वाच्या
बादशाहीचा वारसा घेतात. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. आता तर रावण राज्य आहे
जे नष्ट होणार आहे. सतयुगी रामराज्य स्थापन होणार आहे. सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य
असतात. दिल्लीच राजधानी असते. जिथे लक्ष्मी-नारायणाचे राज्य असते. दिल्ली
सतयुगामध्ये परिस्तान होती. दिल्लीलाच गादी होती. रावणाच्या राज्यामध्ये देखील
दिल्लीच राजधानी आहे, राम राज्यामध्ये सुद्धा दिल्लीच राजधानी असते. परंतु राम
राज्यामध्ये तर हिऱ्या-माणकांचे महाल होते, अथाह सुख होते. आता बाबा म्हणतात -
तुम्ही विश्वाचे राज्य गमावले आहे, मी पुन्हा तुम्हाला ते देत आहे. तुम्ही माझ्या
मतावर चाला, श्रेष्ठ बनायचे असेल तर फक्त माझी आठवण करा इतर कोणत्याही देहधारीची
आठवण करू नका. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा, तर तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनाल. तुम्ही माझ्याकडे निघून याल. माझ्या गळ्यातील माळा बनून, परत
विष्णूची माळा बनाल. माळेमध्ये वरती मी आहे, नंतर खाली दोघे ब्रह्मा-सरस्वती आहेत.
तेच सतयुगाचे महाराजा-महाराणी बनतात. त्यांचीच मग सर्व माळा आहे, जे क्रमवारीने
गादीवर बसतात (राज्य चालवतात). मी या भारताला या ब्रह्मा-सरस्वतीद्वारे आणि
ब्राह्मणांद्वारे स्वर्ग बनवतो. जे मेहनत करतात, त्यांचीच मग यादगार (स्मृतीस्थळे)
बनतात. ती आहे रुद्र माळा आणि ती आहे विष्णूची माळा. रुद्र माळा आहे - आत्म्यांची
आणि विष्णूची माळा आहे - मनुष्यांची. आत्म्यांचे राहण्याचे स्थान ते निराकारी
परमधाम आहे, ज्याला ब्रह्मांड देखील म्हणतात. आत्मा काही अंड्या सारखी नाहीये, आत्मा
तर बिंदू सारखी आहे. आपण सर्व आत्मे तिथे स्वीट होम मध्ये राहणारे आहोत. बाबांसोबत
आपण आत्मे राहतो. ते आहे मुक्तिधाम. सर्व मनुष्यांची इच्छा असते, आपण मुक्तिधाममध्ये
जावे, परंतु असा परत एकही कोणी जाऊ शकत नाही. सर्वांना पार्टमध्ये यायचेच आहे,
तोपर्यंत बाबा तुम्हाला तयार करत राहतात. तुम्ही तयार व्हाल, तेव्हा मग जे काही
आत्मे आहेत, ते सर्व खाली येतील, आणि मग संपले. तुम्ही जाऊन नवीन दुनियेमध्ये राज्य
कराल, मग नंबरवार चक्र सुरु राहील. गाण्यामध्ये ऐकले ना - ‘आखिर वह दिन आया आज…’
तुम्ही जाणता जे भारतवासी आता नरकवासी आहेत, ते मग स्वर्गवासी बनतील. बाकी सर्व
आत्मे शांतीधाममध्ये निघून जातील. फार थोडे समजावून सांगायचे आहे. अल्फ - बाबा, बे
- बादशाही. अल्फला बादशाही मिळते. आता बाबा म्हणतात - मी तेच राज्य, पुन्हा एकदा
स्थापन करत आहे. तुम्ही ८४ जन्म भोगून आता पतित बनला आहात. पतित बनवले आहे रावणाने.
मग पावन कोण बनवतात? भगवान ज्यांना पतित-पावन म्हणतात, तुम्ही कसे पतितापासून पावन,
पावन पासून पतित बनता, तो सारा इतिहास-भूगोल रिपीट होईल. हा विनाश आहेच याच्यासाठी.
म्हणतात - ब्रह्माचे आयुष्य शास्त्रांमध्ये शंभर वर्षे लिहिले आहे. हे जे ब्रह्मा
आहेत, ज्यांच्यामध्ये बाबा विराजमान होऊन वारसा देतात, त्यांचे देखील शरीर सुटणार
आहे. आत्म्यांना बसून, आत्म्यांचे जे पिता आहेत ते समजावून सांगत आहेत. मनुष्य
मनुष्याला पावन बनवू शकत नाहीत. देवता कधीही विकारातून जन्म घेत नाहीत. पुनर्जन्म
तर सर्व घेत आले आहेत ना. बाबा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगत आहेत की कुठे
एखाद्याचे भाग्य जागृत होईल. बाबा येतातच मुळी मनुष्यमात्राचे भाग्य जागे करण्यासाठी.
सर्व पतित दु:खी आहेत ना. त्राही-त्राही करत नष्ट होतील म्हणून बाबा म्हणतात -
त्राही-त्राही करण्याच्या अगोदर, मज बेहदच्या पित्याकडून वारसा घ्या. हे जे काही
दुनियेमध्ये बघत आहात, हे सर्व नष्ट होणार आहे. फॉल ऑफ भारत आणि राईज ऑफ भारत (भारताचे
पतन आणि भारताचे उत्थान), याचाच हा खेळ आहे. जगाचे उत्थान. स्वर्गामध्ये कोण-कोण
राज्य करतात, ते बाबाच बसून समजावून सांगतात. भारताचे उत्थान तर देवतांचे राज्य,
भारताचे पतन तर रावणाचे राज्य. आता नवीन दुनिया बनत आहे. नवीन दुनियेचा वारसा
घेण्यासाठी बाबांकडून शिकत आहोत. खूपच सोपे आहे. हे आहे मनुष्यापासून देवता बनण्याचे
शिक्षण. हे देखील चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहे. कोण-कोणते धर्म कधी येतात,
द्वापर नंतरच बाकी दुसरे धर्म येतात. प्रथम सुख भोगतात नंतर मग दुःख. हे पूर्ण चक्र
बुद्धीमध्ये पक्के झाले पाहिजे, ज्याद्वारे तुम्ही चक्रवर्ती महाराजा-महाराणी बनता.
फक्त अल्फ आणि बे ला समजून घ्यायचे आहे. आता विनाश तर होणारच आहे. इतका हंगामा होईल
जे परदेशामधून परत येऊ देखील शकणार नाहीत, म्हणून बाबा समजावून सांगतात - भारत भूमी
सर्वात उत्तम आहे. जबरदस्त युद्ध होईल मग तिथले तिथेच राहतील. ५०-६० लाख जरी दिले
तरीही मोठ्या मुश्किलीने येऊ शकतील. भारत भूमी सर्वात उत्तम भूमी आहे. जिथे बाबा
येऊन अवतार घेतात. शिवजयंती देखील इथेच साजरी केली जाते. फक्त श्रीकृष्णाचे नाव
घातल्यामुळे सर्व महिमाच नष्ट झाली आहे. सर्व मनुष्यमात्रांचे लिबरेटर (मुक्तिदाता)
इथेच येवून अवतार घेतात. शिवजयंती देखील इथेच साजरी करतात. गॉड फादरच आहेत जे येऊन
सर्वांना लिबरेट करतात (मुक्त करतात). तर अशा बाबांनाच नमस्कार केला पाहिजे,
त्यांचीच जयंती साजरी केली पाहिजे. ते पिता इथे भारतामध्ये येऊन सर्वांना पावन
बनवतात, तर हे खूप मोठे तीर्थ झाले ना. सर्वांना दुर्गती मधून सोडवून सद्गती देतात.
हा ड्रामा पूर्व नियोजित आहे. आता तुम्ही आत्मे जाणता, आमचे बाबा आम्हाला या शरीरा
द्वारे सर्व रहस्य समजावून सांगत आहेत, मी आत्मा या शरीराद्वारे ऐकत आहे.
आत्म-अभिमानी बनायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर गंज निघत जाईल
आणि पवित्र बनून तुम्ही बाबांकडे याल. जितकी आठवण कराल तेवढे पवित्र बनाल. इतरांनाही
आपसमान बनवाल तर अनेकांचे आशीर्वाद मिळतील, उच्च पद मिळेल, म्हणून गायले जाते -
सेकंदामध्ये जीवनमुक्ती. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) श्रीमतावर
पवित्र बनून, प्रत्येक पाऊल बाबांच्या मतावर चालून विश्वाची बादशाही घ्यायची आहे.
बाप समान दुःख-हर्ता, सुख-कर्ता बनायचे आहे.
२) मनुष्यापासून देवता
बनण्याच्या या शिक्षणाचा नियमित अभ्यास करत रहायचे आहे. सर्वांना आपसमान बनविण्याची
सेवा करून आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत.
वरदान:-
कल्याणाची
वृत्ती आणि शुभचिंतक भावाद्वारे विश्व कल्याणाच्या निमित्त बनणारे तीव्र पुरुषार्थी
भव
तीव्र पुरुषार्थी तो
आहे जो सर्वांप्रती कल्याणाची वृत्ती आणि शुभचिंतक भाव ठेवेल. भले कोणी वारंवार खाली
पाडण्याचा प्रयत्न करेल, मनाला डगमग करेल, विघ्न रूप बनेल तरी देखील तुमचा त्याच्या
प्रति सदैव शुभचिंतकाचा अडोल भाव असावा, गोष्टीमुळे भाव बदलू नये. प्रत्येक
परिस्थितीमध्ये वृत्ती आणि भाव यथार्थ असावा तर तुमच्यावर त्याचा प्रभाव पडणार नाही.
मग कोणत्याही व्यर्थ गोष्टी दिसणारही नाहीत, वेळ वाचेल. हीच आहे विश्व कल्याणकारी
स्टेज.
बोधवाक्य:-
संतुष्टता
जीवनाचा शृंगार आहे त्यामुळे संतुष्टमणी बनून संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. एकमत अर्थात एकतेचे वातावरण
बनविण्यासाठी सामावण्याची शक्ती धारण करा. भिन्नतेला सामावून घ्या. प्रत्येकाच्या
विशेषतांना बघा, त्रुटींना तर अजिबात बघायचेच नाहीये. जसे चंद्राला अथवा सूर्याला
ग्रहण लागते तर असे म्हणतात ना की, बघितले नाही पाहिजे, नाही तर ग्रहचारी बसेल. तर
कोणाची त्रुटी देखील एक ग्रहण आहे, त्याला कधीही पाहू नका.