10-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आपल्या उन्नतीसाठी दररोज पोतामेल (हिशोब) काढा - पूर्ण दिवसभरामध्ये माझे
वर्तन कसे होते, मी यज्ञाप्रति प्रामाणिक राहिलो का ते चेक करा”
प्रश्न:-
कोणत्या
मुलांप्रति बाबांचा खूप रिगार्ड (आदर) आहे? त्या रीगार्डची निशाणी काय आहे?
उत्तर:-
जी मुले बाबांसोबत सच्चाईने राहतात, यज्ञाच्या प्रति प्रामाणिक आहेत, काहीही लपवत
नाहीत, त्या मुलांप्रति बाबांचा खूप रिगार्ड आहे. रिगार्ड असल्यामुळे बाबा त्यांना
प्रेमाने पुढे नेत राहतात. सेवेवर देखील पाठवतात. मुलांना जे असेल ते सत्य सांगून
श्रीमत घेण्याची बुद्धी असली पाहिजे.
गीत:-
महफिल में जल
उठी शमा…
ओम शांती।
आता हे गाणे तर चुकीचे आहे कारण परमात्मा काही शमा तर नाहीये. वास्तविक परमात्म्याला
काही शमा म्हटले जात नाही. ही तर भक्तांनी अनेक नावे ठेवली आहेत. न जाणल्यामुळे
म्हणतात देखील - नेती-नेती, आम्ही जाणत नाही, नास्तिक आहेत. तरीही जे नाव येईल ते
बोलत राहतात. ब्रह्म, शमा, दगड-धोंड्यामध्ये देखील परमात्मा आहे असे म्हणतात कारण
भक्तिमार्गामध्ये कोणीही बाबांना यथार्थ रीती ओळखू शकत नाहीत. बाबांनाच येऊन आपला
स्वतःचा परिचय द्यायचा आहे. शास्त्र इत्यादी कशामध्येही बाबांचा परिचय नाही आहे
म्हणून त्यांना नास्तिक म्हटले जाते. आता मुलांना बाबांनी परिचय दिला आहे, परंतु
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे, यामध्ये बुद्धीचे खूपच काम आहे. यावेळी
आहेत पत्थर बुद्धी. आत्म्यामध्ये बुद्धी आहे. ऑर्गन्स वरून समजते की, आत्म्याची
बुद्धी पारस आहे का पत्थर-बुद्धी आहे? सर्व काही आत्म्यावर अवलंबून आहे. मनुष्य तर
म्हणतात आत्माच परमात्मा आहे. ते तर निर्लेप आहेत त्यामुळे जे हवे ते करत रहा.
मनुष्य असून पित्यालाच जाणत नाहीत. बाबा म्हणतात - माया रावणाने सर्वांची
पत्थर-बुद्धी बनवली आहे. दिवसेंदिवस जास्तच तमोप्रधान होत जातात. मायेचा खूप जोर आहे,
सुधारतच नाहीत. मुलांना समजावले जाते रात्री पूर्ण दिवसाचा पोतामेल (हिशोब) काढा
की, आपण काय केले? मी भोजन देवतांसारखे खाल्ले का? कायद्यानुसार वर्तन झाले की,
अडाण्यासारखे होते? दररोज आपला पोतामेल सांभाळला नाहीत तर तुमची कधीच उन्नती होणार
नाही. खूप जणांना माया थप्पड मारत राहते. असे लिहितात की, आज आमचा बुद्धियोग
अमक्याच्या नावा-रूपामध्ये गेला, आज ही पाप कर्मे झाली. असे खरे लिहिणारा कोटींमध्ये
कोणीतरी एखादाच आहे. बाबा म्हणतात मी जो आहे, जसा आहे मला अजिबात जाणत नाहीत.
स्वतःला आत्मा समजेल आणि बाबांची आठवण करेल तेव्हा काहीतरी बुद्धीमध्ये बसेल. बाबा
म्हणतात - भले चांगली-चांगली मुले आहेत, खूप चांगले ज्ञान ऐकवतात, योग काहीच नाही.
पूर्ण ओळख नाही आहे, समजू शकत नाहीत त्यामुळे दुसऱ्या कोणाला समजावून सांगू शकत नाही.
साऱ्या दुनियेतील मनुष्य मात्र रचता आणि रचनेला अजिबात जाणत नाहीत तर जणू काहीच
जाणत नाहीत. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. तरी देखील पुन्हा तेच होईल. ५०००
वर्षानंतर परत ही वेळ येईल आणि मला येऊन समजावून सांगावे लागेल. राजाई घेणे काही कमी
गोष्ट नाहीये! खूप मेहनत आहे. माया चांगलाच वार करते, खूप युद्ध चालते. बॉक्सिंग
होते ना. जे खूप हुशार असतात, त्यांचीच बॉक्सिंग होते. तरी देखील एक-दोघांना
बेशुद्ध करतात ना. म्हणतात - ‘बाबा, मायेची वादळे खूप येतात, असे होते’. ते देखील
खूप थोडे असे खरे लिहितात. असे बरेचजण आहेत जे लपवतात. समजत नाही की आपल्याला
बाबांना कसे खरे सांगायचे आहे? कोणते श्रीमत घ्यायचे आहे? वर्णन करू शकत नाहीत. बाबा
जाणतात माया खूप प्रबळ आहे. खरे सांगण्याची खूप लाज वाटते, त्यांच्याकडून कर्मच अशी
होतात जी सांगायला लाज वाटते. बाबा तर खूप आदर देऊन पुढे नेतात. हा खूप चांगला आहे,
याला ऑलराऊंड सेवेसाठी पाठवणार. बस्स, देह-अहंकार आला, मायेचे थप्पड खाल्ले आणि हा
कोसळला. बाबा तर पुढे घेऊन जाण्यासाठी महिमा देखील करतात - ‘तुला प्रेमाने ऊठवेन.
तू तर खूप चांगला आहेस. स्थूल सेवेमध्ये देखील चांगला आहेस’. परंतु यथार्थ रीतीने
बसून सांगतात की ध्येय खूप उच्च आहे. देह आणि देहाच्या संबंधांना सोडून स्वतःला
अशरीरी आत्मा समजणे - हा पुरुषार्थ करणे बुद्धीचे काम आहे. सर्वजण पुरुषार्थी आहेत.
किती मोठी राजाई स्थापन होत आहे. सर्वजण बाबांची मुले देखील आहेत, स्टुडंट देखील
आहेत तर फॉलोअर्स देखील आहेत. हे साऱ्या दुनियेचे पिता आहेत. सर्व त्या एकालाच
बोलावतात. ते येऊन मुलांना समजावून सांगत राहतात. तरी देखील इतका रिगार्ड थोडाच
ठेवतात. मोठ-मोठ्या व्यक्ती येतात, किती आदराने त्यांची काळजी घेतात. केवढा भपका
असतो. यावेळी तर आहेत सर्वजण पतितच. परंतु स्वतःला तसे समजतात थोडेच. मायेने अगदीच
तुच्छ बुद्धि बनवले आहे. असे म्हणतात सतयुगाची आयु इतकी मोठी आहे तर बाबा म्हणतात
१०० टक्के अडाणी झाले ना. मनुष्य असून आणखी काय काम करत राहतात. ५००० वर्षांच्या
गोष्टीला लाखो वर्षांची आहे असे म्हणतात! हे देखील बाबा येऊन समजावून सांगतात. ५०००
वर्षांपूर्वी या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. हे दैवी गुणवाले मनुष्य होते म्हणून
त्यांना देवता, आसुरी गुणवाल्यांना असुर म्हटले जाते. असुर आणि देवतांमध्ये
रात्रंदिवसाचा फरक आहे. किती मारामारी भांडणे चालू आहेत. जबरदस्त तयारी होत राहते.
या यज्ञामध्ये सारी दुनिया स्वाहा होणार आहे. त्यासाठी ही सर्व तयारी पाहिजे ना.
बॉम्ब्स निघाले ते निघाले पुन्हा बंद थोडेच होऊ शकतात. थोड्या वेळामध्येच सर्वांकडे
पुष्कळ होतील कारण विनाश तर फटाफट झाला पाहिजे ना. मग हॉस्पिटल इत्यादी थोडीच
राहणार. कुणाला कळणार सुद्धा नाही. मावशीचे घर थोडेच आहे. विनाशाचा साक्षात्कार काही
पै-पैशाची गोष्ट नाहीये. साऱ्या दुनियेला लागलेली आग पाहू शकाल! साक्षात्कार होतो -
फक्त आगच आग लागलेली आहे. सारी दुनिया नष्ट होणार आहे. किती मोठी दुनिया आहे. आकाश
तर जळणार नाही. यामध्ये जे काही आहे, सर्वाचा विनाश होणार आहे. सतयुग आणि
कलियुगामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. किती असंख्य मनुष्य आहेत, पशु आहेत, किती
सामग्री आहे. हे देखील मुलांच्या बुद्धीमध्ये मुश्किलीने बसते. विचार करा - ५०००
वर्षांची गोष्ट आहे. देवी-देवतांचे राज्य होते ना! किती थोडे मनुष्य होते. आता किती
मनुष्य आहेत. आता आहे कलियुग, याचा जरूर विनाश होणार आहे.
आता बाबा आत्म्यांना
म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ही देखील समजून घेऊन आठवण करायची आहे. असेच
‘शिव-शिव’ तर खूप म्हणत राहतात. छोटी मुले देखील म्हणतात परंतु बुद्धीमध्ये समज
काहीच नाही. अनुभवाने म्हणत नाहीत की ते बिंदू आहेत. आपण देखील इतकी छोटी बिंदू
आहोत. असे समजून घेऊन आठवण करायची आहे. पहिले तर मी आत्मा आहे - हे पक्के करा मग
बाबांचा परिचय बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने धारण करा. अंतर्मुखी मुलेच चांगल्या
रीतीने समजू शकतात की आपण आत्मा बिंदू आहोत. आपल्या आत्म्याला आता नॉलेज मिळत आहे
की आपल्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट कसा भरलेला आहे, मग आत्मा कशी सतोप्रधान बनते. या
सर्व खूप अंतर्मुख होऊन समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. यालाच वेळ लागतो. मुले
जाणतात आपला हा अंतिम जन्म आहे. आता आपण घरी जातो. हे बुद्धीमध्ये पक्के झाले पाहिजे
की आपण आत्मा आहोत. शरीराचे भान कमी असेल तेव्हाच संभाषण करण्यामध्ये सुधारणा होईल.
नाहीतर वर्तन एकदम खराब होते कारण शरीरापासून वेगळे होत नाहीत. देह-अभिमानामध्ये
येऊन काही ना काही म्हणत राहतात. यज्ञा सोबत तर खूप प्रामाणिक पाहिजे. आता तर खूप
निष्काळजी आहेत. खाणे-पिणे, वातावरण काहीच सुधारलेले नाहीये. आता तर खूप वेळ पाहिजे.
सेवाभावी मुलांचीच बाबा आठवण करतात, पद देखील तेच प्राप्त करू शकतील. असेच फक्त
स्वतःला खुश करणे, ते तर चणे चघळण्यासारखे आहे. यामध्ये खूप अंतर्मुखता पाहिजे.
समजावून सांगण्याची देखील युक्ती पाहिजे. प्रदर्शनीमध्ये कोणी समजतात थोडेच. फक्त
म्हणतात - तुमच्या गोष्टी बरोबर आहेत. इथे देखील नंबरवार आहेत. निश्चय आहे आपण
संतान बनलो आहोत, बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळतो. जर आपण बाबांची पूर्ण सेवा करत
राहिलो तर आपला हाच धंदा आहे. पूर्ण दिवस विचार सागर मंथन होत राहील. हे बाबा (ब्रह्मा
बाबा) देखील विचार सागर मंथन करत असतील ना. नाहीतर हे पद कसे प्राप्त करतील! मुलांना
दोघेजण (ब्रह्माबाबा आणि शिवबाबा) एकत्र समजावून सांगत राहतात. दोन इंजिन मिळाली
आहेत कारण चढण खूप मोठी आहे ना. टेकडीवर जातात तेव्हा गाडीला दोन इंजिन लावतात.
कधी-कधी चालता-चालता गाडी उभी राहते तर घसरून खाली येतात. आमच्या मुलांचे देखील
असेच आहे. चढता-चढता, मेहनत करता-करता मग चढण चढू शकत नाहीत. मायेचे ग्रहण किंवा
वादळ लागते तर एकदम खाली पडून तुकडे-तुकडे होतात. थोडीशी सेवा केली तरी अहंकार येतो,
खाली कोसळतात. समजतच नाहीत की बाबा आहेत, सोबत धर्मराज देखील आहे. जर असे काय केले
तर आपल्यावर खूप भारी दंड पडतो यापेक्षा तर बाहेर रहा ते चांगले. बाबांचे बनून राहणे
आणि वारसा घेणे काही मावशीचे घर नाहीये. बाबांचे बनून मग पुन्हा असे काही काम करतात
तर नाव बदनाम करून टाकतात. फार मोठे नुकसान होते. वारसदार बनणे काही मावशीचे घर
थोडेच आहे. प्रजेमध्ये कोणी इतके श्रीमंत बनतात, काही विचारू नका. अज्ञान काळामध्ये
कोणी चांगले असतात, कोणी कसे! नालायक मुलाला तर म्हणतील आमच्या समोरून निघून जा. इथे
काही एक-दोन मुलांची तर गोष्ट नाही. इथे माया खूप बलवान आहे. यामध्ये मुलांना खूप
अंतर्मुखी व्हायचे आहे, तेव्हा तुम्ही कोणाला समजावून सांगू शकाल. तुमच्यावर बलिहार
जातील आणि मग खूप पश्चाताप करतील - आम्ही बाबांना इतक्या शिव्या देत आलो. सर्वव्यापी
म्हणणे किंवा स्वतःला ईश्वर म्हणणे - त्यांच्यासाठी दंड काही कमी थोडाच आहे. असेच
थोडेच निघून जातील. त्यांच्यासाठी तर आणखीनच त्रासाचे आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा
बाबा या सर्वांकडून हिशोब घेतील. विनाशाच्या वेळी सर्वांचा हिशोब चुकता होतो ना,
यामध्ये अतिशय विशाल-बुद्धी पाहिजे.
मनुष्य तर बघा
कोणा-कोणाला पीस प्राइज (शांतता पुरस्कार) देत असतात. आता वास्तविक पीस करणारा (शांती
स्थापन करणारा) तर एकच आहे ना. मुलांनी लिहिले पाहिजे - दुनियेमध्ये
प्युरिटी-पीस-प्रोस्परिटी (पवित्रता-शांती-समृद्धी) भगवंताच्या श्रीमताच्या आधारे
स्थापन होत आहे. ‘श्रीमत’ प्रसिद्ध आहे. ‘श्रीमत भगवद्गीता’ या शास्त्राला किती
रिगार्ड देतात. जर कोणी कोणाच्या शास्त्र (धर्म ग्रंथ) किंवा मंदिराला काही केले तर
किती भांडतात. आता तुम्ही जाणता ही सारी दुनियाच जळून भस्म होईल. या मंदिर-मस्जिद
इत्यादींना जाळत राहतील. हे सर्व होण्यापूर्वी पवित्र व्हायचे आहे. ही काळजी लागून
रहावी. घरदार देखील सांभाळायचे आहे. इथे येतात तर भरपूर. इथे बकऱ्यांसारखे तर
ठेवायचे नाहीये ना कारण हे तर अमूल्य जीवन आहे, याला अत्यंत काळजीपूर्वक सांभाळायचे
आहे. लहान मुले इत्यादींना घेऊन येणे - हे बंद करावे लागेल. इतक्या मुलांना कुठे
सांभाळत बसणार. मुलांना सुट्टी मिळाली की असे समजतात - अजून कुठे जाण्यापेक्षा चला
मधुबनला बाबांकडे जाऊया. ही तर जशी की धर्मशाळा होईल. मग युनिव्हर्सिटी कशी झाली!
बाबा तपास करत आहेत मग कधीतरी ऑर्डर देतील - कोणीही मुलांना घेऊन येऊ नये. ही बंधने
देखील कमी होतील. मातांवर दया येते. हे देखील मुले जाणतात शिवबाबा तर आहेत गुप्त.
यांचा देखील (ब्रह्मा बाबांचा) कोणाला रिगार्ड थोडाच आहे. समजतात आमचे तर
शिवबाबांसोबत कनेक्शन आहे. एवढेसुद्धा समजत नाहीत - शिवबाबाच तर यांच्याद्वारे
समजावून सांगतात ना. माया नाकाला पकडून उलटे काम करवून घेत राहते, सोडतच नाही.
राजधानीमध्ये तर सर्व पाहिजेत ना. अंताला हे सर्व साक्षात्कार होतील. सजेचे देखील
साक्षात्कार होतील. मुलांना सुरुवातीला देखील हे सर्व साक्षात्कार झाले आहेत. तरी
देखील काहीजण पाप करणे सोडत नाहीत. काही मुलांनी जशी गाठच बांधली आहे की, आम्हाला
तर बनायचेच आहे थर्ड क्लास, त्यामुळे पाप करणे सोडतच नाहीत. आणखीनच चांगल्या रीतीने
आपली सजा तयार करत आहेत. समजावून सांगावे तर लागते ना. ही गाठ बांधू नका की आम्हाला
तर थर्ड क्लासच बनायचे आहे. आता अशी गाठ बांधा की आम्हाला असे लक्ष्मी-नारायण बनायचे
आहे. कोणी तर चांगलीच गाठ बांधतात, चार्ट लिहितात - आजच्या दिवशी आपण काय केले तर
नाही! असे चार्ट देखील खूप ठेवत होते, ते आज नाही आहेत. माया खूप पछाडते. अर्धाकल्प
मी सुख देतो तर अर्धाकल्प मग माया दुःख देते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अंतर्मुखी
होऊन शरीराच्या भानापासून परे राहण्याचा अभ्यास करायचा आहे, खाणे-पिणे, उठणे-बसणे
आपले वर्तन सुधारायचे आहे; फक्त स्वतःला खुश करून निष्काळजी बनायचे नाही.
२) चढण खूप उंच आहे,
त्यामुळे अतिशय सावध होऊन चालायचे आहे. कोणतेही कर्म जपून करायचे आहे. अहंकारामध्ये
यायचे नाही. उलटे कर्म करून आपल्यासाठीच सजेची तयारी करायची नाही. गाठ बांधायची आहे
की, मला या लक्ष्मी-नारायणा सारखे बनायचेच आहे.
वरदान:-
रुहानियतच्या
श्रेष्ठ स्थितीद्वारे वातावरणाला रूहानी बनविणारे सहज पुरुषार्थी भव
रुहानीयतच्या
स्थितीद्वारे आपल्या सेवा केंद्राचे असे रूहानी वातावरण बनवा ज्यामुळे स्वतःची आणि
येणाऱ्या आत्म्यांची सहज उन्नती होऊ शकेल कारण जे पण बाहेरच्या वातावरणामुळे थकून
येतात त्यांना एक्स्ट्रा सहयोगाची आवश्यकता असते म्हणून त्यांना रूहानी वायुमंडळाचा
सहयोग द्या. सहज पुरुषार्थी बना आणि बनवा. येणाऱ्या प्रत्येक आत्म्याने अनुभव करावा
की, सहजच उन्नती प्राप्त करण्याचे हे स्थान आहे.
बोधवाक्य:-
वरदानी बनून
शुभ भावना आणि शुभकामनेचे वरदान देत रहा.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना" बाबा कंबाइंड आहेत त्यामुळे
उमंग-उत्साहाने पुढे जात रहा. दुबळेपणा, निराशा बाबांच्या हवाली करा, स्वतःजवळ ठेवू
नका. आपल्याकडे फक्त उमंग-उत्साह ठेवा. सदैव उमंग-उत्साहामध्ये नाचत रहा, गात रहा
आणि ब्रह्मा भोजन करत रहा.