10-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - ज्ञानाच्या पॉइंट्सना स्मृतीमध्ये ठेवा तर आनंदी रहाल, तुम्ही आता
स्वर्गाच्या गेटवर उभे आहात, बाबा मुक्ती-जीवनमुक्तीचा रस्ता दाखवत आहेत”
प्रश्न:-
आपल्या
रजिस्टरला ठीक ठेवण्यासाठी कोणते अटेंशन जरूर ठेवायचे आहे?
उत्तर:-
अटेंशन रहावे की मनसा-वाचा-कर्मणा कोणालाही दुःख तर दिले नाही ना? आपला स्वभाव एकदम
फर्स्टक्लास, गोड असावा. माया नाक-कान पकडून असे कोणते कर्तव्य करायला लावू नये
ज्यामुळे कोणाला दुःख होईल. जर दुःख द्याल तर खूप पश्चाताप करावा लागेल. रजिस्टर
खराब होईल.
गीत:-
नयन हीन को
राह दिखाओ…
ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. खूप सोपा रस्ता समजावून सांगितला जातो तरीही
मुले अडखळत राहतात. इथे बसले आहेत तर समजतात आम्हाला बाबा शिकवत आहेत, शांतीधामला
जाण्याचा रस्ता सांगत आहेत. खूप सोपे आहे. बाबा म्हणतात - दिवस-रात्र जितके शक्य
असेल तितके आठवणीमध्ये रहा. ती भक्तीमार्गाची यात्रा पायी करायची असते. खूप त्रास
सहन करावा लागतो. इथे तुम्ही बसलेले असताना देखील आठवणीच्या यात्रेवर आहात. हे
देखील बाबांनी समजावून सांगितले आहे - दैवी गुण धारण करायचे आहेत. सैतानी अवगुणांना
नष्ट करत जा. कोणतेही सैतानी काम करू नका, यामुळे विकर्म बनते. बाबा आलेच आहेत
तुम्हा मुलांना कायम सुखी बनविण्यासाठी. कोणी बादशहाचा मुलगा असेल तर तो पित्याला
आणि राजाईला पाहून आनंदीत होईल ना. भले राजाई आहे परंतु तरी देखील शरीराचे रोग वगैरे
तर असतातच ना. इथे तुम्हा मुलांना निश्चय आहे की, शिवबाबा आलेले आहेत, ते आपल्याला
शिकवत आहेत. मग आपण स्वर्गामध्ये जाऊन राज्य करणार. तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख
असणार नाही. तुमच्या बुद्धीमध्ये रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. हे
ज्ञान इतर कोणत्याही मनुष्यमात्रामध्ये नाही आहे. तुम्ही मुले देखील आता समजता की
आधी आपल्यामध्ये ज्ञान नव्हते. बाबांना आपण जाणत नव्हतो. मनुष्य भक्तीला खूप उत्तम
समजतात, अनेक प्रकारची भक्ती करतात. त्यामध्ये सर्व आहेत स्थूल गोष्टी. कोणतीच
गोष्ट सूक्ष्म नाही आहे. आता अमरनाथच्या यात्रेवर स्थूलमध्ये जातील ना. तिथे सुद्धा
ते लिंगच आहे. कोणाकडे जातो, मनुष्य काहीच समजत नाहीत. आता तुम्ही मुले कुठेही दगदग
सहन करण्यासाठी जाणार नाही. तुम्ही जाणता आपण शिकतोच आहोत नवीन दुनियेसाठी. जिथे ही
वेद-शास्त्रे इत्यादी असतच नाहीत. सतयुगामध्ये भक्ती असत नाही. तिथे आहेच सुख. जिथे
भक्ती आहे तिथे दुःख आहे. हे गोळ्याचे चित्र खूप चांगले आहे. यामध्ये स्वर्गाचे गेट
खूप क्लिअर दाखवले आहे. हे लक्षात राहिले पाहिजे. आता आपण स्वर्गाच्या गेटवर बसलो
आहोत. खूप आनंद झाला पाहिजे. ज्ञानाच्या पॉईंट्सची आठवण करत तुम्ही मुले खूप
आनंदामध्ये राहू शकता. जाणता आता आपण स्वर्गाच्या गेटमध्ये जात आहोत. तिथे फार थोडे
मनुष्य असतात. इथे किती असंख्य मनुष्य आहेत. किती त्रास सहन करत राहतात. दान-पुण्य
करणे, साधूंच्या मागे भटकणे किती आहे तरी देखील बोलावत राहतात - ‘हे प्रभू नैन हीन
को राह दिखाओ…’ मार्ग नेहमी मुक्ती-जीवनमुक्तीचा हवा असतो. ही जुनी दुःखाची दुनिया
आहे, हे देखील तुम्ही जाणता. मनुष्यांना माहितच नाहीये. कलियुगाचा कालावधी हजारो
वर्षे आहे असे म्हणतात तर बिचारे अंधारामध्ये आहेत ना. तुमच्यामध्ये देखील नंबरवार
आहेत जे जाणतात खरोखर आमचे बाबा आम्हाला शिकवत आहेत. जसे बॅरिस्टर योग, इंजीनियरिंग
योग असतो ना. शिकवणाऱ्याला टीचरचीच आठवण राहते. बॅरिस्टरीच्या ज्ञानाने मनुष्य
बॅरिस्टर बनेल. हा आहे राजयोग. आमच्या बुद्धीचा योग परमपिता परमात्म्या सोबत आहे.
यामध्ये तर आनंदाचा पारा एकदम चढला पाहिजे. अतिशय गोड बनायचे आहे. स्वभाव एकदम
फर्स्ट क्लास असला पाहिजे. कोणालाही दुःख होऊ नये. वाटते देखील की कोणालाही दुःख
द्यायचे नाही. परंतु तरीही माया नाका-कानाला पकडून चुक करायला लावतेच. मग आतून
पश्चाताप करतात - आपण विनाकारण त्यांना दुःख दिले. परंतु रजिस्टरमध्ये तर खराबी आली
ना. असा प्रयत्न केला पाहिजे - कोणालाही मनसा, वाचा, कर्मणा दुःख द्यायचे नाही. बाबा
येतातच मुळी आम्हाला असे देवता बनविण्यासाठी. हे कधी कोणाला दुःख देतात काय! लौकिक
टीचर शिकवतात, दुःख तर देत नाहीत ना. हां, मुले जेव्हा अभ्यास करत नाहीत तेव्हा काही
शिक्षा वगैरे देतात. आजकाल तर न मारण्याचा देखील कायदा काढला आहे. तुम्ही रूहानी
टीचर आहात, तुमचे काम आहे शिकविणे आणि त्याचसोबत मॅनर्स शिकवणे. मग शिकले-सवरले तर
उच्च पद मिळवतील. शिकले नाही तर स्वतः फेल होतील. हे बाबा देखील रोज येऊन शिकवतात,
मॅनर्स शिकवतात. शिकवण्यासाठी प्रदर्शनी इत्यादीचा प्रबंध करतात. सर्वजण प्रदर्शनी
आणि प्रोजेक्टर मागतात. प्रोजेक्टर्स देखील हजारो घेऊ. प्रत्येक गोष्ट बाबा खूपच
सोपी करून सांगतात. अमरनाथाची देखील सेवा सोपी आहे. चित्रांवर तुम्ही समजावून सांगू
शकता. ज्ञान आणि भक्ती काय आहे? ज्ञान या बाजूला, भक्ती त्या बाजूला. यातून स्वर्ग,
त्यातून नरक - एकदम क्लियर आहे. तुम्ही मुले आत्ता जे शिकता ते खूप सोपे आहे,
अभ्यासही चांगला करता, परंतु आठवणीची यात्रा कुठे आहे. ही आहे सर्व बुद्धीची गोष्ट.
आपल्याला बाबांची आठवण करायची आहे, यामध्येच माया जेरीस आणते. एकदम योग तोडून टाकते.
बाबा म्हणतात - तुम्ही सर्व योगामध्ये खूप कमजोर आहात. चांगले-चांगले महारथी देखील
खूप कमजोर आहेत. समजतात की, यांच्यामध्ये ज्ञान खूप चांगले आहे म्हणून महारथी आहेत.
बाबा म्हणतात - घोडेस्वार प्यादे आहेत. महारथी ते जे आठवणीमध्ये राहतात. उठता-बसता
आठवणीमध्ये राहतील तर विकर्म विनाश होतील, पावन बनतील. नाहीतर सजा देखील खावी लागेल
आणि पदही भ्रष्ट होईल म्हणून आपला चार्ट ठेवा तर तुम्हाला माहिती होईल, बाबा (ब्रह्मा
बाबा) स्वतः सांगतात की, ‘मी देखील पुरुषार्थ करतो. सारखी-सारखी बुद्धी दुसरीकडे
जाते’. बाबांवर तर खूप जबाबदारीची चिंता असते ना. तुम्ही वेगाने जाऊ शकता. मग
त्यासोबत आपली चलन देखील सुधारायची आहे. पवित्र बनून मग परत विकारामध्ये गेला तर
केलेली कमाई नष्ट होईल. कोणावर क्रोध केला, खारट-पाणी झाला तर जसे की असुर बनतात.
अनेक प्रकारची माया येते. संपूर्ण तर कोणी बनलेला नाहीये. बाबा पुरुषार्थ करवत
राहतात. कुमारींसाठी तर खूप सोपे आहे, यामध्ये आपण मजबूत राहिले पाहिजे. आतून
सच्चाई हवी. जर आतून कोणावर मन जडले असेल तर मग ते या ज्ञानामध्ये चालू शकणार नाहीत.
कुमारींनी, मातांनी तर भारताला स्वर्ग बनवण्याच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून दिले
पाहिजे. यामध्ये मेहनत आहे. मेहनती शिवाय काहीही मिळत नाही. तुम्हाला २१ जन्मांसाठी
राजाई मिळते तर किती मेहनत केली पाहिजे. जोपर्यंत या ज्ञानामध्ये पक्के होत नाहीत
तोपर्यंत बाबा म्हणतात - ते लौकिक शिक्षण देखील शिका. असे होऊ नये की मग दोन्ही
जगातून निघून जाईल. कोणाच्या नावा-रूपामध्ये मोहित होऊन अडकून पडतात तर मग नष्ट
होतात.
भाग्यवान मुलेच
शरीराचे भान विसरून स्वतःला अशरीरी समजून बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करू
शकतात. बाबा दररोज समजावून सांगतात - मुलांनो, तुम्ही शरीराचे भान सोडा. आपण अशरीरी
आत्मा आता घरी जात आहोत, हे शरीर इथेच सोडून द्यायचे आहे, ते तेव्हा सोडणार जेव्हा
निरंतर बाबांच्या आठवणीमध्ये राहून कर्मातीत होणार. यामध्ये बुद्धीची गोष्ट आहे
परंतु कोणाच्या भाग्यामध्ये नसेल तर तदबीर (पुरुषार्थ) तरी काय करणार. बुद्धीमध्ये
हे राहिले पाहिजे की आपण अशरीरी आलो होतो, मग सुखाच्या कर्म-संबंधांमध्ये बांधले
गेलो आणि मग रावण राज्यामध्ये विकारी बंधनामध्ये अडकलो. आता पुन्हा बाबा म्हणतात -
अशरीरी होऊन जायचे आहे. स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. आत्माच पतित बनली आहे.
आत्मा म्हणते - ‘हे पतित-पावन या’. आता तुम्हाला पतितापासून पावन होण्याची युक्ती
देखील सांगत राहतात. आत्मा आहेच अविनाशी. तुम्ही आत्मा इथे शरीरामध्ये आले आहात
पार्ट बजावण्याकरिता. हे देखील आता बाबांनी समजावून सांगितले आहे, ज्यांना
कल्पापूर्वी सांगितले होते तेच येत राहतील. आता बाबा म्हणतात - कलियुगी नाती विसरून
जा. आता तर परत जायचे आहे, ही दुनियाच नष्ट होणार आहे. यामध्ये काहीही सार नाही
तेव्हाच तर त्रास सहन करत राहतात. भक्ती करतात भगवंताला भेटण्यासाठी. समजतात की,
भक्ती खूप चांगली आहे. खूप भक्ती केली तर भगवान भेटेल आणि सद्गतीमध्ये घेऊन जातील.
आता तुमची भक्ती पूर्ण होते. तुमच्या मुखातून ‘हे राम’, ‘हे भगवान’ असे भक्तीमधील
शब्द निघू नयेत. हे बंद झाले पाहिजे. बाबा म्हणतात - फक्त माझी आठवण करा. ही
दुनियाच तमोप्रधान आहे. सतोप्रधान सतयुगामध्ये राहतात. सतयुग आहे चढती कला मग उतरती
कला होते. त्रेताला देखील खरेतर स्वर्ग म्हटले जात नाही. स्वर्ग फक्त सतयुगालाच
म्हटले जाते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. आदि अर्थात
सुरुवात, मध्य हाफ नंतर मग अंत. मध्य काळामध्ये रावण राज्य सुरु होते. बाबा
भारतामध्येच येतात. भारतच पतित आणि पावन बनतो. ८४ जन्म देखील भारतवासीच घेतात.
बाकीचे धर्मवाले तर नंबरवार येतात. झाड वृद्धिंगत होते पुन्हा मग त्या वेळेसच येतील.
या गोष्टी दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये नसतील. तुमच्यामध्ये देखील सगळेच काही
धारण करू शकत नाहीत. हे ८४ जन्मांचे चक्र बुद्धीमध्ये राहिले तरीही आनंदात रहाल. आता
बाबा आलेले आहेत, आपल्याला परत घेऊन जाण्यासाठी. खराखुरा माशुक आलेला आहे; ज्यांची
आपण भक्तीमार्गामध्ये खूप आठवण करत होतो ते आता आले आहेत आम्हा आत्म्यांना परत घेऊन
जाण्यासाठी. मनुष्य मात्र हे जाणत नाहीत की शांती सुद्धा कशाला म्हटले जाते. आत्मा
तर आहेच शांत स्वरूप. हे ऑर्गन्स (ही कर्मेंद्रिये) मिळतात तेव्हा कर्म करावे लागते.
बाबा जे शांतीचे सागर आहेत, ते सर्वांना घेऊन जातात; तेव्हा सर्वांना शांती मिळेल.
सतयुगामध्ये तुम्हाला शांती देखील आहे, सुख देखील आहे. बाकी सर्व आत्मे निघून जातील
शांतीधामला. बाबांनाच शांतीचा सागर म्हटले जाते. बरीच मुले हे देखील विसरतात कारण
देह-अभिमानामध्ये राहतात, देही-अभिमानी बनत नाहीत. बाबा शांती तर सर्वांना देतात
ना. चित्रामध्ये संगमावर जाऊन दाखवा. यावेळी सगळे अशांत आहेत. सतयुगामध्ये तर इतके
धर्म असणारही नाहीत. सगळे शांतीमध्ये निघून जातील. तिथे पोटभर शांती मिळते. तुम्हाला
राजाईमध्ये शांतीही आहे तसेच सुखही आहे. सतयुगामध्ये पवित्रता, सुख, शांती सर्व काही
आहे. मुक्तिधाम म्हटले जाते स्वीट होमला. तिथे पतित दुःखी असणार नाहीत. सुख-दुःखाचा
काही प्रश्नच नाही. तर शांतीचा अर्थच समजत नाहीत. राणीच्या हाराचे उदाहरण देतात ना.
आता बाबा म्हणतात - शांती-सुख सर्व घ्या. आयुष्यमान भव… इथे नियमानुसार मुलगा देखील
होईल. मुले व्हावीत यासाठी कोणता पुरुषार्थ करावा लागत नाही. शरीर सोडण्याची वेळ
येते तेव्हा साक्षात्कार होतो आणि आनंदाने शरीर सोडतात. जसा बाबांना हा आनंद वाटतो
ना की, मी हे शरीर सोडून हे (नारायण) बनणार, आता शिकत आहे. तुम्ही देखील जाणता आपण
सतयुगामध्ये जाणार. संगमावरच तुमच्या बुद्धीमध्ये हे असते. तर किती आनंदात राहिले
पाहिजे. जितके उच्च शिक्षण तितका आनंद. आम्हाला भगवान शिकवतात. एम ऑब्जेक्ट समोर आहे
तर किती आनंद झाला पाहिजे. परंतु चालता-चालता कोसळतात (पतन होते). तुमच्या सेवेची
वृद्धी तेव्हा होईल जेव्हा कुमारी मैदानामध्ये येतील. बाबा म्हणतात – एक तर
आपसामध्ये खारट-पाणी बनू नका. जेव्हा जाणता की आपण अशा दुनियेमध्ये जातोय जिथे
वाघ-बकरी एकत्र पाणी पितात, तिथे तर प्रत्येक गोष्ट बघूनच मन आनंदित होते. नावच आहे
स्वर्ग. तर कुमारींनो लौकिक आई-वडिलांना सांगा - आता आम्ही तिथे जाण्याची तयारी करत
आहोत, पवित्र तर जरूर बनायचे आहे. बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे. आता मी योगिनी
बनली आहे त्यामुळे पतित बनू शकत नाही. बोलण्याची हिंमत पाहिजे. अशा कुमारी जेव्हा
निघतील मग बघा किती लवकर सेवा होते. परंतु नष्टोमोहा पाहिजे. एकदा जर का मेली तर मग
आठवण कशाला आली पाहिजे. परंतु बऱ्याच जणांना घराची, मुले इत्यादींची आठवण येत राहते.
मग बाबांसोबत योग कसा लागेल. यामध्ये तर हेच बुद्धीमध्ये रहावे की आम्ही बाबांचे
आहोत. ही जुनी दुनिया नष्ट झाल्यात जमा आहे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा’. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपले उच्च
भाग्य बनविण्यासाठी जितके शक्य असेल - अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे. शरीराचे
भान पूर्णपणे विसरून जावे, कोणाचेही नाव-रुप आठवता कामा नये - ही मेहनत करायची आहे.
२) आपल्या वर्तनाचा
चार्ट ठेवायचा आहे - कधीही आसुरी वर्तन आचरणामध्ये आणायचे नाही. अंतःकरणातील
सच्चाईने नष्टोमोहा बनून भारताला स्वर्ग बनविण्याच्या सेवेमध्ये तत्पर व्हायचे आहे.
वरदान:-
मायेच्या रॉयल
रूपातील बंधनांपासून मुक्त, विश्व-जीत, जगतजीत भव
माझा पुरुषार्थ, माझे
संशोधन, माझी सेवा, माझे टचिंग, माझे गुण चांगले आहेत, माझी निर्णय शक्ती खूप चांगली
आहे, हा ‘माझे’पणाच रॉयल मायेचे रूप आहे. माया असा जादू मंत्र करते ज्यामुळे
‘तुझे’ला देखील ‘माझे’ बनविते, त्यामुळे आता अशा अनेक बंधनांपासून मुक्त बनून एका
बाबांच्या नात्यामध्ये या, तेव्हाच मायाजीत बनाल. मायाजीत असणारेच प्रकृती-जीत,
विश्व-जीत आणि जगत-जीत बनतात. तेच एका सेकंदाच्या ‘अशरीरी भव’च्या डायरेक्शनला सहजच
आणि स्वतः कार्यामध्ये वापरू शकतात.
बोधवाक्य:-
विश्व
परिवर्तक तेच आहेत जे कोणत्याही निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये बदलतात.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
तुमचे स्व-स्वरूप
पवित्र आहे, स्वधर्म अर्थात आत्म्याची पहिली धारणा पवित्रता आहे. स्वदेश पवित्र देश
आहे. स्वराज्य पवित्र राज्य आहे. स्व चे यादगार परम पवित्र पूज्य आहे.
कर्मेंद्रियांचा अनादि स्वभाव सुकर्म आहे, बस हेच सदैव स्मृतीमध्ये ठेवा म्हणजे
मेहनत आणि हट्ट या पासून सुटाल, पवित्रता वरदानाच्या रूपामध्ये धारण कराल.