10-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांची अविनाशी ज्ञान रत्नांनी झोळी भरण्याकरिता, हे एक-एक ज्ञान-रत्न लाखो रुपयांचे आहे”

प्रश्न:-
गुप्त दानाचे इतके जास्त महत्त्व का आहे?

उत्तर:-
कारण बाबा तुम्हाला आता गुप्त ज्ञान रत्नांचे दान देत आहेत, हे दुनियेला माहीत नाही. मग तुम्ही मुले या ज्ञान रत्नांचे दान केल्याने विश्वाची राजाई प्राप्त करता. हे देखील गुप्त आहे, ना कोणती लढाई, ना कोणता दारूगोळा इत्यादी, ना कोणता खर्च. गुप्त रीतीने बाबांनी तुम्हाला राजाई दान मध्ये दिली, म्हणून गुप्त दानाचे खूप महत्त्व आहे.

ओम शांती।
डबल ओम् शांती. एक शिवबाबा म्हणतात आणि एक ब्रह्मा दादा म्हणतात. दोघांचाही स्वधर्म शांत आहे. दोघेही शांतीधाम मध्ये राहणारे आहेत. तुम्ही मुले देखील शांतीधाम मध्ये राहणारी आहात. निराकारी देशामध्ये राहणारे साकारी देशामध्ये पार्ट बजावण्याकरिता आला आहात, कारण हा ड्रामा आहे ना. मुलांच्या बुद्धीमध्ये ड्रामाच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान भरलेले आहे - वरपासून खालपर्यंत. उच्च ते उच्च भगवान, आणि त्यांच्या सोबत मुले. या गोष्टींना व्यवस्थित समजून घ्या. तुमच्याशिवाय इतर कोणालाही हे ज्ञान नाही. तुम्ही शिकत आहात - खुदाई स्कूलमध्ये (ईश्वरीय शाळेमध्ये). भगवानुवाच, भगवान तर एकच आहेत. काही १०-२० भगवान नाहीत. सर्व धर्मांचे जे कोणी आहेत, जे पण आत्मे आहेत, सर्वांचे एकच पिता आहेत. मग जेव्हा बाबा सृष्टी रचतात तेव्हा म्हटले जाते - प्रजापिता ब्रह्मा. ‘शिव’ना काही ‘प्रजापिता’ म्हणता येणार नाही. प्रजा तर जन्म-मरणामध्ये येते. आत्मा संस्कारांच्या आधारे जन्म-मरणामध्ये येते. तर मग प्रजापिता ब्रह्मा पाहिजेत. गायले गेले आहे - ‘परमपिता परमात्मा, प्रजापिता ब्रह्मा द्वारे रचना रचतात’. त्यांना बोलावलेच जाते मुळी - ‘पतित-पावन या’. जेव्हा दुनिया पतित बनते आणि तिचा अंत होतो तेव्हाच बाबा पतितापासून पावन बनविण्याकरिता येतात. आता तुम्ही जाणले आहे - बाबा येतात देखील एकदाच, नंतर कधीही येत नाहीत. आता तुम्हाला संपूर्ण नॉलेज मिळाले आहे. तुम्ही ड्रामातील ॲक्टर्स आहात ना. ड्रामातील ॲक्टर्सना सर्वांच्या ॲक्ट विषयी जरूर माहिती असली पाहिजे की कोणाचा काय-काय पार्ट आहे. तो (दुनियेतील नाटकाचा) असतो छोटा हदचा पार्ट (ड्रामा), त्याबद्दल तर सर्वांना समजते. तुम्ही देखील पाहू शकता. हवे तर लिहू देखील शकता, पाहिजे तेव्हा आठवू देखील शकता. अगदी छोटासा असतो. हा तर खूप मोठा बेहदचा ड्रामा आहे, ज्याला तुम्ही सतयुगापासून कलियुगाच्या अंता पर्यंत जाणता. आता तुम्ही मुले जाणता की आपल्याला बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो आहे. आणि मग हदच्या पित्याकडून हदचा वारसा, हदची प्रॉपर्टी मिळते. बाबांनी सांगितले होते - जे राजे बनतात ते मागील जन्मामध्ये दान-पुण्य इत्यादी केल्याने एका जन्मासाठी राजा बनतात. असे नाही की ते दुसऱ्या जन्मामध्ये देखील बनतील! तुम्ही तर सतयुगामध्ये राजे, महाराजे होता. असे समजू नका की तुमची राजाई काही गायब होते; असे नाही, परंतु जेव्हा भक्तिमार्ग सुरू होतो तेव्हा देखील ते जास्त दान-पुण्य करतात, तर ते देखील राजाईमध्ये जातात. परंतु ते विकारी राजे बनतात. तुम्हीच जे पूज्य होता तेच मग पुजारी बनला आहात. तरीही सुख तर असतेच. दुःख तर फक्त आता सुरु होते. आता तमोप्रधानतेमध्ये देखील तुम्हाला सुख आहे, कोणताही भांडण-तंट्याचा प्रश्नच नाही. हे तर नंतर होते, जेव्हा लाखोंच्या अंदाजामध्ये लोकसंख्या होते तेव्हा युद्ध इत्यादी सुरू होते.

तुम्हा मुलांना तर सतयुग, त्रेता, द्वापरमध्ये देखील सुख आहे. जेव्हा तमोप्रधानता सुरू होते तेव्हा थोडेसे दुःख होते. आता तर आहेतच तमोप्रधान. बाबा समजावून सांगतात - ही आहेच तमोप्रधान दुनिया. तुम्ही जाणता हा बेहदचा ड्रामा आहे, यातून कोणीही सुटू शकत नाही. मनुष्य जेव्हा दुःखाने कंटाळून जातात तेव्हा म्हणतात - ‘भगवंताने असा खेळ का रचला आहे?’ जर भगवंताने रचलाच नसता तर हे जगच अस्तित्वात आले नसते. कशाचेच अस्तित्व राहिले नसते. रचयिता आणि रचना तर आहेत ना. त्याविषयी सतयुगापासून कलियुगाच्या अंतापर्यंत काही तपशील देखील आहे, बाकी थोडे दिवस उरले आहेत. तुम्ही देखील प्रॅक्टिकल मध्ये पाहाल. अगोदरच तर दाखवणार नाहीत. ५ हजार वर्षांच्या चक्राचा थोडाच भाग बाकी आहे. तो आताच थोडेच दाखवतील, जेव्हा घडेल तेव्हा त्याला देखील साक्षी होऊन पाहाल. जे होणार आहे, ते कल्पा पूर्वीप्रमाणेच होईल. हे तर पाहतच आहात, तयारी चालू आहे. विनाश तर जरूर होईल. सर्वांची तयारी होत आहे. हे ड्रामामध्ये पूर्व नियोजित नोंदलेले आहे. विनाश जरूर होईल. आता तुम्हा मुलांना बाबा समजावून सांगत आहेत - तुमची आत्मा जी तमोप्रधान बनली आहे, तिला देखील इथे सतोप्रधान बनवायचे आहे. हे तुम्हाला आता समजते आहे.

बाबा गुप्तपणे येतात, गुप्तपणेच तुम्हाला ज्ञान देत आहेत. दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. तुम्ही गुप्तपणे विश्वाचे राज्य घेता, कोणताही आवाज नाही. अगदी ‘गुप्त दान’ म्हटले जाते ना. बाबा येऊन मुलांना अविनाशी ज्ञान रत्नांचे गुप्त दान देत आहेत. बाबा देखील किती गुप्त आहेत, कोणीही जाणत नाहीत. हे सर्व कुठे जातात, ब्रह्माकुमार-कुमारी काय करतात, काहीच समजत नाहीत. तुम्ही मुले जाणता बाबा किती गुप्त आहेत. तुम्हा मुलांना गुप्तपणे विश्वाचा मालक बनवतात. ना कोणते युद्ध, ना कोणता दारूगोळा, ना कोणता खर्च. इथे तर एक छोटेसे गाव घ्यायचे झाले तरीही किती भांडणे, मारामारी सुरू होते. तर बाबा येऊन गुप्त दान देतात. अविनाशी ज्ञान-रत्नांनी तुमची झोळी भरतात. म्हणतात - ‘झोळी भरा, शिव भोला भंडारी’.

तुम्ही जाणता - शिवबाबा आमची अविनाशी ज्ञान रत्नांनी झोळी भरत आहेत. तर एक-एक रत्न लाखो रुपयांचे आहे. तुम्ही किती रत्ने देता. तर मग तुम्ही किती दानी बनता. ते देखील गुप्त आहे. देवतांना किती अस्त्र-शस्त्रे, आणि भुजा इत्यादी दाखवल्या आहेत. खरे पाहता असे मात्र काहीच नाहीये. सतयुगामध्ये देवतांना इतक्या भुजा इत्यादी असतही नाहीत. कलियुगामध्ये किती अनेक प्रकारची अस्त्र-शस्त्रे दाखविली आहेत. विनाशासाठी बॉम्ब्स आहेत, तर मग तलवार, बाण इत्यादींचे काय करतील? तुम्ही म्हणता - ज्ञान खड्ग, ज्ञान तलवार, तर ते (दुनियावाले) त्याला स्थूल शस्त्रच समजले आहेत. खरेतर असे काहीच नाहीये. तुम्हाला तर गुप्त दान मिळते. तुम्ही मग सर्वांना गुप्त दान देता. तुम्ही जाणता बाबा आपल्याला श्रीमत देत आहेत, श्रीमत आहेच भगवंताचे. तुम्ही जाणता आपण नरापासून नारायण बनण्या करिता येतो. त्यांना सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण, दैवी गुणधारी म्हटले जाते. दैवी गुण फक्त त्या देवी-देवतांमध्ये असतात, नंतर मग कला कमी होत जातात. जसे पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश चांगला असतो, नंतर मग कमी-कमी होत जातो. कमी होत-होत शेवटी बारीक कोर शिल्लक राहते. चंद्र पूर्णपणे नाहीसा होत नाही. कोर जरूर असते, ज्याला अमावस्या म्हटले जाते. आता तुमची आहे बेहदची गोष्ट. तुम्ही १६ कला संपूर्ण बनता. असे दाखवतात की, कृष्णाच्या मुखामध्ये मातांना चांदोबा दिसत असे. या आहेत साक्षात्काराच्या गोष्टी, ज्याबद्दल बाबा बसून स्पष्ट करून सांगतात. आता तुम्हाला संपूर्ण बनायचे आहे. मायेचे संपूर्ण ग्रहण लागलेले आहे. बाकी जाऊन कोर राहते, शिडी उतरत आला आहात. सर्वांना शिडी उतरायचीच आहे, तेव्हाच मग सर्वांना परत जावेच लागेल. तुम्ही तर आता फार थोडे आहात. हळू-हळू वृद्धी होईल. या शिक्षणामध्ये सगळेच काही पास होत नाहीत. तुमची सेंटर्स देखील हळू-हळू वृद्धीला प्राप्त होत आहेत. जसजसा वेळ जवळ येत जाईल, तेव्हा मग लोकांना समजेल की, यांच्याकडे काय आहे. दिवसेंदिवस सेंटर्स वृद्धीला प्राप्त होतच आहेत. आता दुनियावाले म्हणतात - ‘आम्हाला तर वाटले होते हे कुठपर्यंत चालतील, सर्व सेवा केंद्रे बंद पडतील’. सुरुवातीला या भीतीने अनेक जण पळून गेले. त्यांना वाटत होते - ‘माहीत नाही काय होईल! ना इथले, ना तिथले राहू, यापेक्षा पळा’. पळून गेले, आता मग त्यातील काहीजण परत येत आहेत. बाबा किती सोप्या पद्धतीने बसून समजावून सांगत आहेत. या अबलांना, अहिल्यांना काहीही त्रास देत नाहीत. यांचा देखील उद्धार तर होणारच आहे. म्हणतात - ‘बाबा, आम्ही तर अजिबात शिकलेल्या नाही आहोत’. बाबा म्हणतात - काहीच शिकलेल्या नाहीत हे तर खूप चांगले आहे. शास्त्र इत्यादीचे जे काही वाचन केले आहे ते सर्व विसरून जा. मी काही जास्त शिकवत नाही. फक्त एवढेच सांगतो - ‘माझी आठवण करा तर मग बादशाही तुमची आहे’. बस्स, तुमचा बेडा (जीवन नौका) पार होईल. बाळ जन्माला आले आणि म्हणेल - ‘बाबा’. बस्स, वारशाचे हक्कदार बनतात. इथे देखील तुम्ही हक्कदार बनता. बापदादांची आठवण केली आणि राजधानी तुमची; म्हणून गायले गेले आहे - सेकंदामध्ये जीवनमुक्ती. श्रीमंत लोकांचा पार्ट शेवटी आहे. अगोदर गरीबांची पाळी आहे. तुमच्याकडे आपोआप येतील. दलितांचा देखील उद्धार होणार आहे. भिल्लिणीचे (शबरीचे) देखील गायन आहे. म्हणतात - रामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली. वास्तविक राम देखील नाही, शिवबाबा सुद्धा नाहीत. हो, असे होऊ शकते की, या ब्रह्माला खावी लागतील. भिल्लीणी इत्यादी येतील. समजा टोली इत्यादी घेऊन आल्या तर नकार कसा देऊ शकणार. भिल्लीणी, गणिका घेऊन येतील तर तुम्ही देखील खाल. शिवबाबा सांगतात, मी तर खाणार नाही, मी तर अभोक्ता आहे. तुमच्याकडे सर्वजण येतील. गव्हर्मेंट देखील मदत करेल की यांना प्रोत्साहन द्या. तुम्हाला देखील आपोआप प्रेरणा होईल. बाबा गरीब निवाज आहेत तर आपणही गरीबांना हे ज्ञान समजावून सांगू. भिल्लीणींमधून सुद्धा निघतील. इतके मोठे झाड आहे, यामध्ये एकही देवी-देवता धर्माचा राहिलेला नाहीये, बाकीच्या सर्व धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत.

आता बाबा म्हणतात, जे भक्ती करणारे आहेत त्यांना हे ज्ञान समजावून सांगा. तुम्ही पाहत आहात, कलम कसे लागत आहे. ब्राह्मण कसे बनत आहेत. जे सूर्यवंशी, चंद्रवंशी देवता बनणारे असतील तेच येत जातील. एकदा जरी ऐकले तरी स्वर्गामध्ये जरूर येतील. बाबांनी काशी-कलवटचे देखील उदाहरण सांगितले आहे. शिवावर जाऊन बळी चढत होते. त्यांना देखील काहीतरी मिळाले पाहिजे. तुम्ही देखील बळी चढता. तुम्ही पुरुषार्थ करता राजाई करिता. भक्तिमार्गामध्ये काही राजाई नसते. परत घरी कोणीही जाऊ शकत नाही. तर काय होते, त्याने (काशी-कलवट खाणाऱ्याने) जी पापे केलेली आहेत त्याची शिक्षा भोगून चुकते करतात आणि मग नव्याने जन्म होतो. नव्याने पाप सुरू होते. बाकी राहायचे तर सर्वांना इथेच आहे. नंबरवनमध्ये तुम्हीच आहात. तुम्हीच ८४ जन्म भोगता. सर्वांना सतो-रजो-तमोमध्ये यायचेच आहे. बाबा म्हणतात, यावेळी संपूर्ण मनुष्यसृष्टीचे झाड जडजडीभूत झाले आहे. मनुष्य तर पूर्णपणे घोर अंधारामध्ये कुंभकर्णाच्या झोपेमध्ये झोपलेले आहेत. कुंभकर्ण काही एकच नाहीये, अनेक आहेत. तुम्ही कितीही समजावून सांगितले, तरीही ऐकतच नाहीत. ज्यांचा पार्ट आहे ते पुरुषार्थ करतात आणि तेच माता-पित्याच्या हृदयावर चढतात. तख्तनशीन देखील तेच बनतील. किती मुली विचारतात - ‘बाबा, मुलांना रागवावे लागते’. बाबा म्हणतात - याने तुमच्याकडून फारसे काही पाप घडत नाही. तुम्ही बोलवता - ‘आम्हा पतितांना पावन बनवा’. बाबा देखील सांगतात - काम महाशत्रू आहे. असे म्हटले जात नाही की, क्रोध शत्रू आहे. मातांमध्ये इतका नसतो, पुरुष खूप मारामारी करतात. आता बाबांनी तुम्हा मातांना पुढे केले आहे. वंदे मातरम्. नाही तर दुनियावाले मातांना सांगतात - तुमचा पती गुरू, ईश्वर आहे. त्यांच्या मतावर चालायचे आहे. लग्न गाठ बांधली आणि लगेच पतित बनले. असा ईश्वर त्यांना मिळाला का! आता रामराज्य स्थापन होत आहे, बाकी सर्वांचा मृत्यू होत जाईल. बाबांनी समजावून सांगितले आहे - विनाशकाले विपरीत बुद्धी आणि विनाशकाले प्रीत बुद्धी. तुमची परमपिता परमात्म्यासोबत प्रीत बुद्धी आहे. तुमची आत्मा जाणते, शिवबाबा यांच्यामध्ये (ब्रह्माबाबांमध्ये) येतात, यांच्या द्वारे आपण ऐकत आहोत. इतका छोटासा बिंदू आहे. शिवबाबांचा हा टेम्पररी रथ आहे, यांच्याद्वारे हा रुद्र ज्ञान-यज्ञ रचला आहे, जो वाढतच जाईल. मुलांच्या थेंब-थेंबाने तलाव भरत राहतो. मुले आपले सफल करत राहतात कारण जाणतात, हे तर सर्व काही मातीमध्ये मिसळून जाणार आहे. काहीही राहणार नाही. एवढे तरी सफल होऊ दे. सुदाम्याचे देखील उदाहरण आहे ना. मुली बाबांकडे मूठभर तांदूळ किंवा ६-८ रुपये पाठवून देतात. वाह बच्ची! बाबा तर गरीब निवाज आहेत ना. हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे, तरीही पुन्हा होईल. बंधनात असणाऱ्या आहेत. बाबा म्हणतात, भाग्यशाली आहात - शिवबाबांचा हात तर मिळाला ना. एक दिवस येईल, सर्व आर्य समाजी इत्यादी देखील येतील. जाणार कुठे? मुक्ती-जीवनमुक्तीचे दुकान तर एकच आहे. सजा खाऊन सर्वांना मुक्तीमध्ये जायचे आहे. ही महाविनाशाची वेळ आहे. सर्व परत घरी जातील. ही आहे साजनची वरात. वरात कशी जाईल, त्याचा देखील साक्षात्कार होईल. तुमच्याशिवाय इतर कोणीही पाहू शकणार नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांद्वारे ज्ञानाचे जे गुप्त दान मिळाले आहे, त्याची किंमत लक्षात घेऊन आपली झोळी ज्ञान रत्नांनी भरपूर करायची आहे. सर्वांना गुप्त दान देत जायचे आहे.

२) या महाविनाशाच्या वेळी, जेव्हा परत घरी जायचे आहे, तर आपले सर्व काही सफल करायचे आहे. प्रीत बुद्धी बनायचे आहे. मुक्ती आणि जीवनमुक्तीचा मार्ग सर्वांना सांगायचा आहे.

वरदान:-
भोळेपणासोबत ऑलमाइटी ऑथॉरिटी बनून मायेचा सामना करणारे शक्ती स्वरूप भव

कधी-कधी भोळेपणा खूप मोठे नुकसान करतो. साधेपणा, भोळे रूप धारण करते. परंतु इतके भोळे बनू नका की सामना करू शकणार नाही. साधेपणा सोबतच सामावून घेण्याची आणि सहन करण्याची शक्ती देखील पाहिजे. जसे बाबा भोलानाथ असण्यासोबतच ऑलमाइटी ऑथॉरिटी आहेत, तसे तुम्ही देखील भोळेपणासोबत शक्ती स्वरूप देखील बना, म्हणजे मग मायेचा गोळा लागणार नाही. माया सामना करण्या ऐवजी नमस्कार करेल.

बोधवाक्य:-
आपल्या हृदयामध्ये आठवणीचा झेंडा फडकवा, तेव्हाच प्रत्यक्षतेचा झेंडा फडकेल.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

विशेषत: आठवणीच्या यात्रेला पॉवरफुल बनवा, ज्ञान-स्वरूपाचे अनुभवी बना. तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांची शुभ वृत्ती आणि कल्याणाची वृत्ती तसेच शक्तिशाली वातावरण अनेक तडफडणाऱ्या, भटकणाऱ्या, साद घालणाऱ्या आत्म्यांना आनंद, शांती आणि शक्तीची अनुभूती करून देईल.