10-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हाला पुजारीपासून पूज्य बनविण्याकरिता, पूज्यपासून पुजारी आणि पुजारीपासून पूज्य बनण्याची संपूर्ण कथा तुम्ही मुले जाणता”

प्रश्न:-
कोणती गोष्ट दुनियेतील लोकांना असंभव वाटते आणि तुम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये सहजपणे धारण करता?

उत्तर:-
दुनियेतील लोक समजतात की गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र राहणे - हे तर अगदी असंभव आहे आणि तुम्ही सहजपणे धारण करता, कारण जाणता याद्वारे स्वर्गाची बादशाही मिळते. तर हा खूप स्वस्त सौदा झाला ना.

गीत:-
यह कौन आज आया सवेरे…

ओम शांती।
अंधार आणि सकाळ, दुनियेसाठी अगदी वेगळे आहे. तो अंधार आणि सकाळ तर कॉमन आहे. तुम्हा मुलांची सकाळ अन-कॉमन आहे. दुनियेला ठाऊकच नाहीये की, अंधार आणि सकाळ कशाला म्हटले जाते. वास्तविक हा अंधार आणि सकाळ कल्पाच्या या पुरुषोत्तम संगमयुगावर होते. आता अज्ञानाचा अंध:कार दूर होतो. गायले देखील जाते - ‘ज्ञान-सूर्य प्रगटा’. तो सूर्य तर प्रकाश देणारा आहे. ही आहे ज्ञान सूर्याची गोष्ट. भक्तीला अंधार, ज्ञानाला प्रकाश म्हटले जाते. आता तुम्ही मुले जाणता सकाळ होत आहे. भक्तिमार्गाचा अंधार संपुष्टात येतो. भक्तीला अज्ञान म्हटले जाते कारण ज्याची भक्ती करतात त्याच्या विषयी काहीही ज्ञान नाहीये. वेस्ट ऑफ टाईम होतो. बाहुल्यांची पूजा होत राहते. अर्ध्या कल्पापासून अशी बाहुल्यांची पूजा होते. ज्याची पूजा करतात त्याचे पूर्ण ज्ञान देखील हवे. देवी-देवतांचे आहे - पूज्य घराणे. तेच पूज्य मग पुजारी बनतात, पूज्यपासून पुजारी, पुजारीपासून पूज्य बनण्याची किती लांबलचक कथा आहे. मनुष्य तर पूज्य आणि पुजारीचा अर्थ देखील समजत नाहीत. परमपिता परमात्मा येतातच मुळी संगमावर, जेव्हा अंधाराचा काळ पूर्ण होतो; सकाळ बनविण्याकरिता येतात. परंतु त्यांनी कल्पाच्या संगमयुगा ऐवजी युगे-युगे लिहून ठेवले आहे. जेव्हा ४ युगे पूर्ण होतात तेव्हा जुनी दुनिया संपून मग नवीन दुनिया सुरू होते. तर, याला म्हणणार कल्याणकारी संगमयुग. या वेळी सर्व नरकवासी आहेत. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा म्हणतात - स्वर्गामध्ये गेला, तर जरूर नरकामध्ये होता; तरीही, आपण नरकामध्ये आहोत असे कोणालाही वाटत नाही. रावणाने सर्वांच्या बुद्धीला एकदम कुलूप लावले आहे. सर्वांची बुद्धी पूर्णपणे मृतवत झाली आहे. बाबा समजावून सांगत आहेत - भारतवासीयांची बुद्धी सर्वात विशाल होती. नंतर मग जेव्हा अगदीच पत्थर-बुद्धी बनतात तेव्हाच दुःख भोगावे लागते. ड्रामा प्लॅन अनुसार बेसमज (बुद्धिहीन) बनायचेच आहे. बुद्धिहीन बनवते माया. पूज्यला बुद्धिवान आणि पुजारीला बुद्धिहीन म्हटले जाते. म्हणतात देखील - ‘आम्ही नीच पापी आहोत’. परंतु आपण बुद्धिवान कधी होतो, हेच कळत नाही. रावण रुपी माया अगदीच पत्थर-बुद्धी बनवते. आता तुम्हाला समजले आहे की आपणच पूज्य होतो, नंतर मग पुजारी बनलो. आता तुम्हा मुलांना आनंद होत आहे. खूप दिवसांपासून ओरडत आले आहेत की, आम्हाला शांती मिळावी अथवा जन्म-मरणातून सुटका व्हावी. परंतु या मायेच्या बेड्यांपासून मुक्ती होईल, हे ज्ञान देखील कोणाच्या बुद्धीमध्ये नाही.

तुम्ही जाणता - शिडी उतरत येतात, सतयुगामध्ये तर तरीही हळूहळू उतरतात, वेळ लागतो. सुखाची शिडी उतरण्यामध्ये वेळ लागतो. दुःखाची शिडी पटपट उतरतात. सतयुग-त्रेतामध्ये आहेत २१ जन्म, द्वापार-कलियुगामध्ये आहेत ६३ जन्म, आयुष्य कमी होत जाते. आता तुम्ही जाणता - आपली चुटकीसरशी चढती कला होते. गातात देखील - जनकाला सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळाली. परंतु जीवनमुक्तीचा अर्थ समजत नाहीत. एका जनकालाच जीवनमुक्ती मिळाली की संपूर्ण दुनियेला मिळाली? आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे. एखाद्याची मंदबुद्धी असते तर म्हणतात की, भगवंता, याला चांगली बुद्धी द्या. सतयुगामध्ये अशी कोणती गोष्ट नाही. जे आत्मे खूप काळ परमात्म्यापासून दूर राहतात, त्यांचा देखील हिशोब आहे. बाबा जेव्हा परमधाममध्ये होते, त्या वेळी जे आत्मे त्यांच्यासोबत मुक्तिधाममध्ये राहतात, शेवटी येतात, ते जास्त काळ बाबांच्या सोबत राहतात. आपण तर थोडा वेळ तिथे राहतो. सर्वात पहिले तर आम्हीच बाबांपासून दुरावतो; म्हणून गायले जाते - ‘आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल…’ जे खूप काळ बाबांपासून दूर राहिले आहेत, त्यांचाच आता मेळावा भरतो. जे तिथे (परमधाम मध्ये) बाबांसोबत जास्त काळ राहतात, त्यांना बाबा भेटत नाहीत. बाबा म्हणतात - विशेष तुम्हा मुलांना मी शिकविण्याकरिता येतो. तुम्हा मुलांच्या सोबत असतो तेव्हा सर्वांचे कल्याण होते. आता सर्वांच्या कयामतची (महाविनाशाची) वेळ आहे. आता सर्व हिशोब चुकता करून निघून जातील. बाकी तुम्ही राज्य-भाग्य प्राप्त कराल. या गोष्टी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. गातात देखील गॉड फादर, लिबरेटर, गाईड. दुःखातून लिबरेट करून शांतीधाममध्ये घेऊन जाण्यासाठी गाईड बनतात. सुखधामासाठी गाईड बनत नाहीत. आत्म्यांना शांतीधाममध्ये घेऊन जातात, ती आहे निराकारी दुनिया - जिथे आत्मे राहतात. परंतु तिथे कोणीही जाऊ शकत नाही कारण पतित आहेत, म्हणून पतित-पावन बाबांना बोलावत राहतात. खास भारतवासी जेव्हा उलटे बनतात तेव्हा बेहद बाबांनाच कुत्रा-मांजर, दगड-मातीमध्ये घेऊन जातात. वंडर आहे ना. आपल्या पेक्षाही मलाच जास्त खाली घेऊन जातात. हा देखील ड्रामा बनलेला आहे. कोणाचाच दोष नाही, सर्व ड्रामाच्या वश आहेत. ईश्वराच्या वश नाहीत. ईश्वरा पेक्षाही ड्रामा हुशार आहे. बाबा म्हणतात - मी देखील ड्रामा अनुसार माझ्या ठरलेल्या वेळेला येईन. माझे येणे एकदाच होते. भक्तिमार्गामध्ये मनुष्य किती धक्के खातात. तुम्हाला बाबा भेटले आहेत. बाबांकडून चुटकी मध्ये वारसा घ्यायचा आहे. वारसा मिळाला की नंतर मग खस्ता खाण्याची गरज नाही. भगवान स्वतः म्हणतात मी येऊन वेद-शास्त्रांचे सार समजावून सांगतो. अगोदर सचखंड होता, नंतर मग झूठखंड कसा बनला, हे कोणालाच ठाऊक नाहीये. गीता कोणी ऐकवली, हे देखील भारतवासी जाणत नाहीत. भारताचाच आदि सनातन देवी-देवता धर्म होता. देवता धर्माचेच सतोप्रधान पूज्यपासून जेव्हा तमोप्रधान पुजारी बनतात तेव्हा देवताधर्म प्रायःलोप होतो; मग बाबा येऊन पुन्हा त्या धर्माची स्थापना करतात. चित्रे देखील आहेत, शास्त्रे देखील आहेत. भारतवासीयांचे एकच धर्मशास्त्र आहे - शिरोमणी गीता. प्रत्येक जण आपल्या धर्मालाच विसरला आहे, म्हणून नाव बदलून हिंदू ठेवले आहे. ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आत्माच पुनर्जन्मामध्ये येत-येत तमोप्रधान बनते, आत्म्यामध्ये भेसळ पडते.

तुम्ही जाणता आपण खरे दागिने होतो, आता खोटे बनलो आहोत. ‘दागिना’, शरीराला म्हटले जाते. शरीराद्वारेच पार्ट बजावतात. आपल्याला किती मोठा ८४ जन्मांचा पार्ट मिळालेला आहे. देवता, क्षत्रिय... आपे ही पूज्य, पुजारी तुम्हीच बनता. मी जर पूज्य आणि मग पुजारी बनलो तर तुम्हाला पूज्य कोण बनवेल? मी तर सदा पावन, ज्ञानाचा सागर, पतित-पावन आहे. तुम्हीच पूज्य आणि पुजारी बनून दिवस आणि रात्रीमध्ये येता. परंतु ते लोक जाणत नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत - दुनिया जेव्हा खोटी बनते तेव्हा मग इतक्या खोट्या कथा बसून बनवल्या आहेत. व्यासांनी देखील कमाल केली आहे. आता व्यास काही भगवान तर नाहीत. भगवंताने तर येऊन ब्रह्मा द्वारे वेद-शास्त्रांचे सार समजावून सांगितले आहे. त्यांनी शास्त्रे दाखवली आहेत - ब्रह्माला. आता भगवान कुठे? असे तर नाही की विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाला. तर विष्णूने बसून शास्त्रांचे सार सांगितले काय? नाही, ब्रह्मा द्वारे समजावून सांगितले आहे. त्रिमूर्तीच्या वर आहेत शिवबाबा, ते बसून सार सांगतात - ब्रह्माद्वारे. ज्यांच्याद्वारे समजावून सांगतात तेच मग पालना करतील. तुम्ही आहात ब्रह्माकुमार-कुमारी. ब्राह्मण वर्ण आहे - उच्च ते उच्च. तुम्ही आता आहात - ईश्वरीय संतान. ईश्वराने रचलेल्या यज्ञाला तुम्ही सांभाळता. या ज्ञान-यज्ञामध्ये संपूर्ण जुनी दुनिया स्वाहा होणार आहे. याचे नाव ठेवले आहे - ‘राजस्व अश्वमेध अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ’. राजाई प्राप्त करून देण्यासाठी बाबांनी यज्ञ रचला आहे. ते (दुनियावाले) जेव्हा यज्ञ रचतात तेव्हा मातीचे शिवलिंग आणि शाळीग्राम बनवतात. उत्पत्ती करून, पालना करून मग विसर्जित करून टाकतात. देवतांच्या मूर्तींचे देखील असेच करतात. जशी लहान मुले बाहुल्यांचा खेळ करतात, तसेच हे देखील करतात. आता बाबांसाठी तर म्हणतात - स्थापना, पालना नंतर मग विनाश करतात, आधी स्थापना.

आता तुम्ही मृत्युलोकामध्ये अमरलोकसाठी शिकत आहात. हा तुमचा मृत्युलोक मधील अंतिम जन्म आहे. बाबा येतात अमरलोक स्थापन करण्यासाठी. फक्त एका पार्वतीला कथा ऐकवल्याने काय होणार. शंकराला, अमरनाथ म्हणतात, त्याच्यासोबत पार्वतीला दाखवतात. आता शंकर-पार्वती स्थूल रूपामध्ये कसे येऊ शकतात? जेव्हा की त्यांना सूक्ष्मवतन मध्ये दाखवले आहे. आता तुम्हाला समजावून सांगितले आहे - जगत-अंबा, जगत-पिताच नंतर लक्ष्मी-नारायण बनतात. मग लक्ष्मी-नारायण ८४ जन्मानंतर पुन्हा जगत-अंबा, जगत-पिता बनतात. वास्तविक जगत-अंबा आहे पुरुषार्थी आणि लक्ष्मी आहे - पावन प्रालब्ध. जास्त महिमा कोणाची आहे? जगत-अंबेवर बघा किती मेळावा भरतो. काली कलकत्तेवाली प्रसिद्ध आहे. काली मातेच्या शेजारी मग काळा पिता का नाही बनवला? वास्तविक जगत-अंबा आदि देवी ज्ञान-चितेवर बसून काळ्याची गोरी बनते. अगोदर ज्ञान-ज्ञानेश्वरी आहे नंतर मग राज-राजेश्वरी बनते. इथे तुम्ही आला आहात ईश्वराकडून ज्ञान घेऊन राज-राजेश्वरी बनण्यासाठी. लक्ष्मी-नारायणाला राज्य कोणी दिले? ईश्वराने. अमर कथा, सत्यनारायणाची कथा बाबाच ऐकवतात, ज्याद्वारे सेकंदामध्ये नरापासून नारायण बनता.

आता तुम्हा मुलांची बुद्धीची कवाडे उघडली आहेत की, काम-विकार महाशत्रू आहे. म्हणतात - गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र राहणे असंभव आहे. समजावून सांगितले जाते - बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत तर जरूर ते आपल्या मुलांना स्वर्गाची बादशाही देतील. तर स्वर्गाची बादशाही मिळविण्यासाठी एक जन्म तरी पवित्र राहावे लागेल. हा तर स्वस्त सौदा झाला ना. व्यापारी लोक या गोष्टीचा चांगला लाभ घेतील कारण व्यापारी लोक दान देखील करतात. धर्मादाय देखील काढतात. बाबा म्हणतात - हा सौदा कोणी विरळेच करतात. किती स्वस्त व्यापार आहे. तरीही कित्येकजण असे आहेत जे सौदा करून मग सोडचिठ्ठी देखील देतात. हे ज्ञान बाबांशिवाय इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. ज्ञान सागर एकच आहेत, तेच समजावून सांगतात. जो पावन पूज्य होता मग ८४ जन्मांच्या शेवटी पुजारी बनला आहे. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) शरीरामध्ये मी प्रवेश केला आहे. ‘प्रजापिता’ तर इथेच असेल ना. आता तुम्ही पुरुषार्थ करून फरिश्ता बनत आहात. आता भक्तिमार्गाच्या रात्री नंतर ज्ञान अर्थात दिवस होतो. तिथी-तारीख काही नाही आहे. शिवबाबा कधी आले, कोणालाच ठाऊक नाहीये. कृष्ण जयंती धुमधडाक्यात साजरी करतात. शिवजयंती विषयी तर पूर्णपणे कोणालाच माहिती नाहीये. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या कल्याणकारी युगामध्ये एका बाबांकडूनच खरी सत्यनारायणाची कथा, अमर कथा ऐकायची आहे. बाकी जे काही ऐकले आहे ते सर्व विसरून जायचे आहे.

२) सतयुगी बादशाही प्राप्त करण्यासाठी या एका जन्मामध्ये पवित्र राहायचे आहे. फरिश्ता बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
प्रत्येक संकल्प, समय, शब्द आणि कर्माद्वारे ईश्वरी सेवा करणारे संपूर्ण इमानदार भव

संपूर्ण इमानदार त्यांना म्हटले जाते जे प्रत्येक वस्तूची व्यवस्थित काळजी घेतात. कोणतीही वस्तू वाया जाऊ देत नाहीत. जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून संकल्प, समय आणि कर्म सर्व ईश्वरी सेवेसाठी असावे. जर ईश्वरी सेवेऐवजी कुठेही संकल्प अथवा वेळ जात असेल, व्यर्थ बोल निघत असतील अथवा शरीराद्वारे व्यर्थ कार्य होत असेल तर त्यांना संपूर्ण इमानदार म्हटले जाणार नाही. असे नाही की एक सेकंद अथवा एक पैसा व्यर्थ गेला - तर काय मोठी गोष्ट आहे. नाही. संपूर्ण इमानदार अर्थात सर्व काही सफल करणारे.

बोधवाक्य:-
श्रीमताला यथार्थरित्या समजून त्यानुसारच पावलोपावली चालण्यामधेच सफलता सामावलेली आहे.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये -

“राजऋषी सतयुगी असतात”

माणसे हे जे काही म्हणतात की, ‘द्वापरमध्ये राजऋषी होते, ज्यांनी बसून या वेद-शास्त्रांची रचना केली कारण ते त्रिकालदर्शी होते’. आता खरेतर राजऋषी आपण सतयुगातच म्हणू शकतो कारण तिथे विकारांवर पूर्ण विजय मिळवलेला असतो अर्थात कमळाच्या फुला समान जीवनमुक्त अवस्थेमध्ये राहून राज्य चालवतात. बाकी हे जे द्वापरमध्ये परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी तप करणारे ऋषी आहेत, ज्यांनी वेद-शास्त्रे रचली आहेत सतयुगामध्ये तर वेद-शास्त्रांची गरजच राहत नाही, ना आपण त्यांना त्रिकालदर्शी म्हणू शकतो. जर का आपण ब्रह्मा, विष्णू, शंकराला त्रिकालदर्शी म्हणू शकत नाही तर मग हे द्वापरयुगातील रजोगुण काळातील ऋषी-मुनी कसे बरे त्रिकालदर्शी बनू शकतात. त्रिकालदर्शी, त्रिमूर्ती, त्रिनेत्री फक्त एक परमात्मा शिव यांनाच म्हणू शकतो, जे स्वतः या कल्पाच्या शेवटी येऊन संपूर्ण रचनेचा अंत देतात (संपूर्ण रहस्य सांगतात). तिथे सतयुगामध्ये फक्त प्रालब्ध भोगायचे आहे, तिथे हे ज्ञान राहत नाही की, आपण ब्रह्मावंशी ब्राह्मणच फक्त मास्टर त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनतो, बाकी संपूर्ण कल्पामध्ये कोणालाही ज्ञान मिळू शकत नाही, ना देवतांना ना मनुष्यांना त्रिकालदर्शी म्हणू शकतो. अच्छा, ओम् शांती.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

कधीही आपल्या पुण्याच्या बदल्यात प्रशंसा मिळण्याची इच्छा देखील ठेवू नका, या हदच्या प्रशंसेचा स्वीकार करणे म्हणजेच सदाकाळाच्या प्राप्तीपासून वंचित होणे आहे; त्यामुळे देण्याच्या बाबतीत सदैव सागरासारखे संपन्न बना. तुमचा प्रत्येक शब्द इतरांना आनंदामध्ये, बाबांच्या प्रेमामध्ये, अतींद्रिय सुखामध्ये रूहानी आनंदमय जीवनाचा अनुभव करवून देणारा असावा आणि प्रत्येक कर्म सर्व आत्म्यांप्रती सदैव सहयोगाची प्राप्ती करवून देणारे असावे.