10-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - चॅरिटी बिगिन्स ॲट होम अर्थात पहिले स्वतः आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत
करा मग दुसऱ्यांना सांगा, आत्मा समजून आत्म्याला ज्ञान द्या तर ज्ञान तलवारीमध्ये
जोहर भरेल (ज्ञान तलवार शक्तिशाली होईल)”
प्रश्न:-
संगमयुगावर
कोणत्या दोन गोष्टींची मेहनत केल्याने सतयुगी तख्ताचे मालक बनाल?
उत्तर:-
१) दुःख-सुख, निंदा-स्तुतीमध्ये समान स्थिती रहावी - ही मेहनत करा. कोणीही काही
उलटे-सुलटे बोलले, क्रोध केला तर तुम्ही गप्प रहा, कधीही मुखाची टाळी वाजवू नका. २)
डोळ्यांना सिव्हिल (पवित्र) बनवा, क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) पूर्णतः नाहीशी
व्हावी, आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत, आत्मा समजून ज्ञान द्या, आत्म-अभिमानी बनण्याची
मेहनत करा तर सतयुगी तख्ताचे मालक बनाल. संपूर्ण पवित्र बनणारेच गद्दी-नशिन बनतात (सिंहासनावर
बसतात).
ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांशी गोष्टी करतात, तुम्हा आत्म्यांना हा तिसरा नेत्र मिळाला
आहे ज्याला ज्ञानाचा नेत्र देखील म्हटले जाते, त्याने तुम्ही आपल्या भावांना बघता.
तर हे बुद्धीने समजता ना की, जेव्हा आपण भावा-भावाला बघू तर कर्मेंद्रिये चंचल
होणार नाहीत. आणि असे करता-करता डोळे जे क्रिमिनल आहेत ते सिव्हिल बनतील (विकारी
डोळे पवित्र बनतील). बाबा म्हणतात - विश्वाचा मालक बनण्यासाठी मेहनत तर करावी लागेल
ना. तर आता ही मेहनत करा. मेहनत करण्यासाठी बाबा नवे-नवे गुह्य पॉईंट्स ऐकवतात ना.
तर आता स्वतःला भाऊ-भाऊ समजून ज्ञान देण्याची सवय लावायची आहे. मग हे जे गायले जाते
की, “वी आर ऑल ब्रदर्स” (आपण सर्व बांधव आहोत) - हे प्रत्यक्षात होईल. आता तुम्ही
खरे-खरे बांधव आहात कारण बाबांना जाणता. बाबा तुम्हा मुलांसोबत सेवा करत आहेत.
‘हिम्मते बच्चे मददे बाप’. तर बाबा येऊन ही सेवा करण्यासाठी हिंमत देतात. तर हे सोपे
झाले ना. तर रोज ही प्रॅक्टिस करावी लागेल, आळशी होता कामा नये. हे नवीन-नवीन
पॉईंट्स मुलांना मिळतात, मुले जाणतात की आम्हा भावांना बाबा शिकवत आहेत. आत्मे
शिकतात, हे रूहानी नॉलेज आहे, याला स्पिरिच्युअल नॉलेज म्हटले जाते. फक्त यावेळी
रुहानी नॉलेज, रुहानी बाबांकडून मिळते कारण बाबा येतातच संगमयुगावर जेव्हा सृष्टी
बदलते, हे रुहानी नॉलेज मिळते देखील तेव्हा जेव्हा सृष्टी बदलणार असते. बाबा येऊन
हेच तर रूहानी नॉलेज देतात की स्वतःला आत्मा समजा. आत्मा अशरीरी आली होती, मग इथे
शरीर धारण करते. सुरुवातीपासून आतापर्यंत आत्म्याने ८४ जन्म घेतले आहेत, परंतु
नंबरवार जे जसे आले असतील, ते तसेच ज्ञान-योगाची मेहनत करतील. मग दिसूनही येते की
जसा ज्याने कल्पापूर्वी जो पुरुषार्थ केला, मेहनत केली ते आत्ताही तशीच मेहनत करत
राहतात. स्वतःसाठी मेहनत करायची आहे. दुसऱ्या कोणासाठी तर करायची नसते. तर स्वतःलाच
आत्मा समजून स्वतःवर मेहनत करायची आहे. दुसरा काय करतोय, त्यात माझे काय जाते.
‘चॅरिटी बिगिन्स ॲट होम’ म्हणजेच सर्वप्रथम स्वतः मेहनत करायची आहे, मागाहून
दुसऱ्यांना (भावांना) सांगायचे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मा समजून आत्म्याला
ज्ञान द्याल तर तुमच्या ज्ञान तलवारीमध्ये जौहर (शक्ती) भरेल. मेहनत तर आहे ना. तर
जरूर काही ना काही सहन करावे लागते. यावेळी सुख-दुःख, निंदा-स्तुती, मान-अपमान, हे
सर्व थोडे बहुत सहन करावे लागते. तर जेव्हा पण कोणी उलटे-सुलटे बोलतो तेव्हा
म्हणतात - गप्प बैस. जेव्हा कोणी गप्प बसवतात तर नंतर कोणी काय रागवणार. जेव्हा कोणी
बोलतात आणि दुसराही बोलतो तर मुखाची टाळी वाजते. जर एकाने मुखाची टाळी वाजवली आणि
दुसऱ्याने शांत केले की, गप्प रहा. बस हेच बाबा शिकवतात. कधीही बघा कोणी रागामध्ये
येतात तर गप्प बसा, त्याचा राग आपोआप शांत होईल. दुसरी टाळी वाजणारच नाही. जर टाळीने
टाळी वाजली तर मग गडबड होते; म्हणून बाबा म्हणतात - ‘मुलांनो, कधीही या गोष्टींमध्ये
टाळी वाजवू नका. ना विकाराची, ना काम विकाराची, ना क्रोधाची’.
मुलांनी प्रत्येकाचे
कल्याण करायचेच आहे, इतकी जी सेंटर्स बनली आहेत ती कशासाठी? कल्पापूर्वी देखील तर
अशी सेंटर्स उघडली असतील. देवांचाही देव, बाबा बघत असतात की, पुष्कळ मुलांना ही आवड
असते तर विचारतात की ‘बाबा, सेंटर उघडू. आम्ही सेंटर उघडतो, आम्ही खर्च उचलतो’. तर
दिवसेंदिवस अशी सेंटर्स बनत जातील कारण जितके विनाशाचे दिवस जवळ येत जातील तितके मग
इकडेही सेवेची आवड वाढत जाईल. आता बापदादा दोघे एकत्र आहेत तर प्रत्येकाला बघतात
की, कसा पुरुषार्थ करत आहेत? कोणते पद मिळवतील? कोणाचा पुरुषार्थ उत्तम, कोणाचा
मध्यम, कोणाचा कनिष्ठ आहे? ते तर बघत आहेत. टीचर देखील शाळेमध्ये बघत असतात की,
स्टुडंट कोणत्या विषयामध्ये कमी-जास्त आहेत. तर इथे देखील असेच आहे. काही मुले
व्यवस्थित लक्ष देतात तर स्वतःला उच्च समजतात. काहीवेळा मग चूक करतात, आठवणीमध्ये
राहत नाहीत तर स्वतःला कमी लेखतात. ही शाळा आहे ना. मुले म्हणतात - ‘बाबा, आम्ही
कधी-कधी खूप खुशी मध्ये राहतो, कधी-कधी खुशी कमी होते’. तर बाबा आता समजावून सांगत
राहतात की जर खुशीमध्ये राहू इच्छिता तर मनमनाभव, स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची
देखील आठवण करा. समोर परमात्म्याला बघा तर ते अकाल तख्तावर बसलेले आहेत. असेच
भावांकडे सुद्धा बघा, स्वतःला आत्मा समजून मग भावाशी बोला. मी भावाला ज्ञान देत आहे;
बहिण नाही, भाऊ-भाऊ, आत्म्यांना ज्ञान देतो; जर तुम्हाला ही सवय लागली तर तुमची जी
विकारी दृष्टी आहे, जी तुम्हाला धोका देते ती हळू-हळू बंद होईल. आत्मा-आत्मा
एकमेकांमध्ये काय करतील? जेव्हा देह-अभिमान येतो तेव्हा घसरतात. बरेचजण म्हणतात -
बाबा, आमची विकारी दृष्टी आहे. ठीक आहे, आता विकारी दृष्टीला निर्विकारी दृष्टी बनवा.
बाबांनी आत्म्याला दिलाच आहे मुळी - तिसरा नेत्र. तिसऱ्या नेत्राने बघाल तर मग तुमची
देहाला बघण्याची सवय नाहीशी होईल. बाबा मुलांना डायरेक्शन तर देत राहतात, यांना (ब्रह्माला)
देखील असेच म्हणतात. हे बाबा देखील देहामध्ये आत्म्याला बघतील. तर यालाच म्हटले जाते
- रुहानी नॉलेज. बघा, किती उच्च पद मिळवता. जबरदस्त पद आहे. तर पुरुषार्थ देखील असा
करायला हवा. बाबा देखील समजतात कल्पापूर्वी प्रमाणे सर्वांचा पुरुषार्थ चालेल. कोणी
राजा-राणी बनतील, कोणी प्रजेमध्ये जातील. तर इथे जेव्हा बसून नेष्ठा (योग) देखील
करवता तर स्वतःला आत्मा समजून दुसऱ्याच्या देखील भृकुटीमध्ये आत्म्याला बघत रहाल तर
मग त्यांची चांगली सेवा होईल. जे देही-अभिमानी होऊन बसतात ते आत्म्यांनाच बघतात.
याची खूप प्रॅक्टिस करा. अरे, उच्च पद मिळवायचे आहे तर काहीतरी मेहनत कराल ना. तर
आता आत्म्यांसाठी हीच मेहनत आहे. हे रुहानी नॉलेज एकदाच मिळते अजून कधीही मिळणार
नाही. ना कलियुगामध्ये, ना सतयुगामध्ये फक्त संगमयुगावर, ते देखील ब्राह्मणांना. हे
पक्के लक्षात ठेवा. जेव्हा ब्राह्मण बनाल तेव्हाच देवता बनाल. ब्राह्मण बनला नाहीत
तर मग देवता कसे बनाल? या संगमयुगामध्येच ही मेहनत करता. बाकी इतर कोणत्याही वेळी
हे सांगणार नाहीत की, ‘स्वतःला आत्मा, दुसऱ्याला देखील आत्मा समजून त्यांना ज्ञान
द्या’. बाबा जे समजावून सांगतात त्यावर विचार सागर मंथन करा. निर्णय करा की काय हे
बरोबर आहे, आपल्या फायद्याची गोष्ट आहे? आपल्याला सवय लागेल की बाबांची जी शिकवण आहे
ती भावंडांना द्यायची आहे, स्त्रियांना सुद्धा द्यायची आहे तर पुरुषांना सुद्धा
द्यायची आहे. द्यायचे तर आत्म्यांनाच आहे. आत्माच पुरुष आणि स्त्री बनली आहे.
बहिण-भाऊ बनली आहे.
बाबा म्हणतात मी
तुम्हा मुलांना ज्ञान देतो. मी मुलांकडे, आत्म्यांना बघतो आणि आत्मे सुद्धा समजतात
की आमचे परमात्मा जे पिता आहेत ते ज्ञान देत आहेत; तर याला म्हटले जाईल - हे
रूहानी-अभिमानी बनले आहेत. यालाच म्हटले जाते - आत्म्याची परमात्म्यासोबत
स्पिरिच्युअल ज्ञानाची देवाण-घेवाण. तर हे पिता शिकवण देतात की जेव्हा पण कोणी
व्हीजिटर इत्यादी येतात तेव्हा देखील स्वतःला आत्मा समजून, आत्म्याला पित्याचा
परिचय द्यायचा आहे. आत्म्यामध्ये ज्ञान आहे, शरीरामध्ये नाहीये. तर त्यांना देखील
आत्मा समजूनच ज्ञान द्यायचे आहे. तर ते मग त्यांना देखील चांगले वाटेल. जणूकाही हे
जौहर (ही शक्ती) तुमच्या वाणीमध्ये आहे. या ज्ञानाच्या तलवारीमध्ये ताकद भरेल कारण
देही-अभिमानी बनता ना. तर ही देखील प्रॅक्टिस करून बघा. बाबा म्हणतात - तुम्ही ठरवा
की, हे बरोबर आहे का? आणि मुलांसाठी देखील ही काही नवीन गोष्ट नाहीये कारण बाबा
सांगतातच अगदी सोपे करून. चक्र फिरलात, आता नाटक पूर्ण होत आहे, आता बाबांच्या
आठवणीमध्ये राहता. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनून, सतोप्रधान दुनियेचे मालक बनता
नंतर मग असेच शिडी उतरता, बघा बाबा किती सोपे करून सांगतात. दर ५ हजार वर्षांनंतर
मला यायचे असते. ड्रामाच्या प्लॅन अनुसार मी बांधील आहे. येऊन मुलांना अगदी सोपी
आठवणीची यात्रा शिकवतो. बाबांच्या आठवणीमध्ये अंत मती सो गती होईल, हे या वेळेसाठी
आहे. हा अंतीम काळ आहे. आता यावेळी बाबा बसून युक्ती सांगतात की, मामेकम् (मज एकाची)
आठवण करा तर सद्गती होईल. मुले देखील समजतात की शिक्षणाने मी हा बनेन, अमका बनेन.
यामध्ये देखील हेच आहे की, मी जाऊन नवीन दुनियेमध्ये देवी-देवता बनणार. काही नवीन
गोष्ट नाहीये, बाबा तर वारंवार सांगत असतात - नथिंग न्यू. ही तर शिडी उतरायची आणि
चढायची आहे, एक जिन्नची कहाणी आहे ना. त्याला शिडी उतरण्याचे आणि चढण्याचे काम दिले
गेले. हे नाटकच आहे चढण्याचे आणि उतरण्याचे. आठवणीच्या यात्रेने खूप मजबूत व्हाल
म्हणून विविध प्रकारे बाबा मुलांना बसून शिकवतात की मुलांनो, आता देही-अभिमानी बना.
आता सर्वांना परत जायचे आहे. तुम्ही आत्मे पूर्ण ८४ जन्म घेऊन तमोप्रधान बनले आहात.
भारतवासीच सतो-रजो-तमो बनतात. दुसऱ्या कोणत्याही देशाला असे म्हणणार नाही की, ८४
जन्म घेतले आहेत. बाबांनी येऊन सांगितले आहे नाटकामध्ये प्रत्येकाचा पार्ट आपापला
असतो. आत्मा किती छोटी आहे. वैज्ञानिकांना हे समजणार सुद्धा नाही की इतक्या छोट्याशा
आत्म्यामध्ये हा अविनाशी पार्ट भरलेला आहे. ही आहे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट. इतकी
छोटीशी आत्मा आणि पार्ट किती मोठा बजावते! तो देखील अविनाशी! हा ड्रामा देखील
अविनाशी आहे आणि पूर्वनियोजित आहे. असे कोणी म्हणणार नाही की केव्हा बनला? नाही. हा
निसर्गाचा चमत्कार आहे. हे ज्ञान अतिशय वंडरफुल आहे, कधीच कोणी हे ज्ञान सांगू
देखील शकणार नाही. एवढी कोणाची ताकदच नाही जो हे ज्ञान सांगेल.
तर आता मुलांना बाबा
दिवसेंदिवस समजावून सांगत राहतात. आता प्रॅक्टिस करा की आम्ही आपल्या भाऊ आत्म्याला
आप समान बनविण्याकरिता ज्ञान देत आहोत. बाबांकडून वारसा घेण्यासाठी कारण सर्व
आत्म्यांचा तो अधिकार आहे. बाबा येतातच सर्व आत्म्यांना आपापला शांती आणि सुखाचा
वारसा देण्यासाठी. आपण जेव्हा राजधानीमध्ये असू तेव्हा बाकीचे सर्व शांतिधाममध्ये
असतील. शेवटी मग जयजयकार होईल, इथे सुखच सुख असेल; म्हणून बाबा म्हणतात - पावन
बनायचे आहे. जितके-जितके तुम्ही पवित्र बनता तितकी कशिश होते (ओढ उत्पन्न होते).
जेव्हा तुम्ही पूर्णपणे पवित्र बनता तेव्हा गद्दी नशीन होता (सिंहासनावर विराजमान
होता). तर ही प्रॅक्टिस करा. असे समजू नका की बस्स, हे ऐकले आणि दुसऱ्या कानाने
सोडून दिले. नाही, ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःला
आत्मा समजा, ते देखील आत्मा भावा-भावाला बसून ज्ञान सांगा. रूहानी बाबा रुहानी
मुलांना समजावून सांगतात याला म्हटले जाते रूहानी स्पिरिच्युअल नॉलेज, देणारे आहेत
स्पिरिच्युअल फादर. जेव्हा मुले संपूर्ण स्पिरिच्युअल बनतात, संपूर्ण प्युअर बनतात
तर जाऊन सतयुगी तख्ताचे मालक बनतात. जे प्युअर (पवित्र) बनणार नाहीत ते माळेमध्ये
देखील येणार नाहीत. माळेचा सुद्धा काही अर्थ तर असेल ना. जपमाळेचे रहस्य इतर कोणीही
जाणत नाहीत. माळेचा जप कशासाठी करतात? कारण त्यांनी बाबांची खूपच मदत केली आहे, तर
का नाही त्यांचा जप केला जाणार. तुमचा जप देखील केला जातो, तुमची पूजा देखील होते
आणि तुमच्या शरीराला देखील पूजले जाते. आणि माझ्या तर फक्त आत्म्याला पुजले जाते.
बघा तुम्ही तर डबल पूजले जाता, माझ्यापेक्षाही जास्त. तुम्ही जेव्हा देवता बनता तर
देवतांची सुद्धा पूजा करतात म्हणून पूजेमध्ये देखील तुम्ही तिखे आहात (पुढे आहात),
यादगार मध्ये सुद्धा तुम्ही पुढे आहात आणि बादशाहीमध्ये देखील तुम्हीच पुढे आहात.
तर बघा, तुम्हाला किती श्रेष्ठ बनवतो. तर जशी लाडकी मुले असतात, खूप प्रेम असते अशा
मुलांना खांद्यावर, डोक्यावरही उचलून घेतात. बाबा एकदम डोक्यावर उचलून घेतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) गायन आणि
पूजन योग्य बनण्यासाठी स्पिरिच्युअल बनायचे आहे, आत्म्याला पवित्र बनवायचे आहे.
आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे.
२) मनमनाभवच्या
अभ्यासाद्वारे अपार खुशीमध्ये राहायचे आहे. स्वतःला आत्मा समजून आत्म्याशी बोलायचे
आहे, डोळ्यांना सिव्हिल (शुद्ध) बनवायचे आहे.
वरदान:-
मास्टर
रचयित्याच्या स्टेज द्वारे संकटांमध्ये देखील मनोरंजनाचा अनुभव करणारे संपूर्ण योगी
भव
मास्टर रचयित्याच्या
स्टेजवर स्थित राहिल्याने मोठ्यात मोठे संकट एक मनोरंजनाचे दृश्य अनुभव होईल. जसे
महाविनाशाच्या संकटाला देखील स्वर्गाचे गेट उघडण्याचे साधन असल्याचे सांगता, तसेच
कोणत्याही प्रकारच्या लहान-मोठ्या समस्या किंवा संकटे मनोरंजनाचे रूप दिसावे,
‘हाय-हाय’च्या ऐवजी ‘ओहो!’ शब्द निघावा; दुःख देखील सुखाप्रमाणे भासावे. सुख-दुःखाचे
नॉलेज असताना सुद्धा त्याच्या प्रभावामध्ये येऊ नये, सुखाचे दिवस येण्यासाठी दुःखाची
सुद्धा बलिहारी समजा - तेव्हा म्हणणार संपूर्ण योगी.
बोधवाक्य:-
दिलतख्ताला
सोडून साधारण संकल्प करणे अर्थात धरणीवर पाय ठेवणे.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
कर्म करताना तनाचा
सुद्धा हलकेपणा, मनाच्या स्थितीमध्ये सुद्धा हलकेपणा. कर्माचा रिझल्ट मनाला खेचू नये.
जितके म्हणून कार्य वाढत जाईल तितकाच हलकेपणा सुद्धा वाढत जावा. कर्माने स्वतःकडे
आकर्षित करू नये परंतु मालक बनून कर्म करविणारा करवून घेत आहे आणि करणारे निमित्त
बनून करत आहेत - हा अभ्यास वाढवा तर संपन्न कर्मातीत सहजच बनाल.