11-01-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   20.10.2008  ओम शान्ति   मधुबन


“संतुष्टमणी बनून विश्वामध्ये संतुष्टतेची लाईट पसरवा, संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा”


आज बापदादा आपल्या सदैव संतुष्ट राहणाऱ्या संतुष्टमणींना बघत आहेत. प्रत्येक संतुष्टमणीच्या तेजामुळे चोहो बाजूंना किती सुंदर तेज, चमकत आहे. प्रत्येक संतुष्टमणी बाबांचा किती प्रिय, सर्वांना प्रिय, स्वतःलाही प्रिय आहे. संतुष्टता सर्वांना प्रिय आहे. संतुष्टता सदैव सर्व प्राप्ती संपन्न आहे कारण जिथे संतुष्टता आहे तिथे कोणतीही वस्तु अप्राप्त नाही. संतुष्ट आत्म्यामध्ये संतुष्टतेचे नॅचरल नेचर (नैसर्गिक स्वभाव) आहे. संतुष्टतेची शक्ती स्वतः आणि सहजच चोहो बाजूंना वायुमंडळ पसरवते. त्यांचा चेहरा, त्यांचे नेत्र वायुमंडळामध्ये देखील संतुष्टतेचे तरंग पसरवतात. जिथे संतुष्टता आहे तिथे इतर विशेषता स्वतःच येतात. संतुष्टता संगमावर विशेष बाबांची देणगी आहे. संतुष्टतेची स्थिती नेहमीच परिस्थितीवर विजयी होते. परिस्थिती बदलत रहाते परंतु संतुष्टतेची शक्ती सदैव प्रगती करत राहते. कितीही परिस्थिती समोर आली तरी संतुष्टमणीला नेहमी माया आणि प्रकृती एक पपेट शो प्रमाणे दिसून येते, त्यामुळे संतुष्ट आत्मा कधीही निराश होत नाही. परिस्थितीचा शो मनोरंजना प्रमाणे अनुभव होतो. हे मनोरंजन अनुभव करण्यासाठी, आपल्या स्थितीची सीट सदैव साक्षी-दृष्टाची (साक्षी होऊन पाहणाऱ्याची) हवी. साक्षी-दृष्टा स्थितीमध्ये स्थित राहणारे असे मनोरंजन अनुभव करतात. दृश्य कितीही बदलत असेल परंतु साक्षी-दृष्टाच्या सीटवर स्थित राहणारी संतुष्ट आत्मा साक्षी होऊन, प्रत्येक परिस्थितीला स्व-स्थितीद्वारे बदलून टाकते. तर प्रत्येकाने स्वतःला चेक करा की, मी सदैव संतुष्ट आहे? सदैव? ‘सदैव’ आहे की कधी-कधी आहे?

बापदादा नेहमी प्रत्येक शक्तीसाठी, आनंदीत राहण्यासाठी, डबल लाइट (हलके) बनून उडण्यासाठी हेच मुलांना सांगतात की, ‘सदैव’ शब्द नेहमी लक्षात रहावा. ‘कधी-कधी’ हा शब्द ब्राह्मण जीवनाच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे कारण संतुष्टतेचा अर्थच आहे - सर्व प्राप्ती. जिथे सर्व प्राप्ती आहेत तिथे ‘कधी-कधी’ हा शब्द नसतोच मुळी. तर सदैव अनुभूती करणारे आहात की पुरुषार्थ करत आहात? प्रत्येकाने स्वतःला विचारले, चेक केले? कारण तुम्ही सर्व बाबांची विशेष आवडती, सहयोगी, लाडकी, गोड-गोड स्व-परिवर्तक मुले आहात. असे आहात ना? आहात असे? जसे बाबा बघत आहेत तसेच स्वतःला अनुभव करता का? हात वर करा, जे सदैव, कधी-कधी नाही, सदैव संतुष्ट रहातात. सदैव शब्द लक्षात आहे ना. हात थोडा हळू-हळू वर करत आहेत. अच्छा, खूप छान. थोडे-थोडे वर करत आहेत आणि विचार करत-करत हात वर करत आहेत. परंतु बापदादांनी वारंवार तुमचे लक्ष वेधून घेतले आहे की, आता वेळेला आणि स्वतःला दोघांनाही बघा. वेळेची गती आणि स्वतःची गती दोन्ही चेक करा. पास विद ऑनर तर व्हायचेच आहे ना. प्रत्येकाने विचार करा की, मी बाबांची राजकुमारी अथवा राजकुमार आहे. स्वतःला राजकुमार समजता ना! रोज बापदादा तुम्हाला कोणती प्रेमपूर्वक आठवण देतात? लाडक्या मुलांनो. तर लाडका कोण असतो? लाडका तोच असतो जो फॉलो फादर करतो आणि फॉलो करणे खूप-खूप-खूप सोपे आहे, काही अवघड नाही. फक्त एकाच गोष्टीला फॉलो केले तर बाकी सर्व गोष्टींमध्ये आपोआपच फॉलो होईल. एकच लाईन आहे जी बाबा दररोज आठवण करून देतात. ती लक्षात आहे ना? स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. एकच लाईन आहे ना आणि आठवण करणारी आत्मा जिला बाबांचा खजिना मिळाला, ती सेवेशिवाय राहूच शकत नाही कारण अथाह प्राप्ती आहे, अखुट खजिने आहेत. दात्याची मुले आहेत, ती दिल्याशिवाय राहू शकत नाहीत; आणि मेजॉरिटी तुम्हा सर्वांना कोणते टायटल मिळाले आहे? ‘डबल फॉरेनर्स’. तर टायटलच डबल आहे. बापदादांना देखील तुम्हा सर्वांना पाहून आनंद होतो आणि नेहमी ऑटोमॅटिक गाणे गात राहतात की, ‘वाह मेरे बच्चे वाह!’ चांगले आहे, विविध देशांमधून कोणत्या विमानाने आला आहात? स्थूलमध्ये तर कोणत्याही विमानातून आला असाल परंतु बापदादा कोणते विमान बघत आहेत? अति स्नेहाच्या विमानाने आपल्या अतिप्रिय अशा घरी पोहोचला आहात. बापदादा प्रत्येक मुलाला आज विशेष हेच वरदान देत आहेत की, माझ्या लाडक्या प्रिय मुलांनो, सदैव संतुष्टमणी बनून विश्वामध्ये संतुष्टतेची लाईट पसरवा. संतुष्ट रहा आणि संतुष्ट करा. बरीच मुले म्हणतात की, संतुष्ट रहाणे तर सोपे आहे परंतु संतुष्ट करणे हे थोडे अवघड वाटते. बापदादा जाणतात जर प्रत्येक आत्म्याला संतुष्ट करायचे असेल तर त्याची विधी खूप सोपे साधन आहे, जर कोणी तुमच्यावर असंतुष्ट होतो अथवा असंतुष्ट असतो तर तो देखील असंतुष्ट आहे परंतु तुमच्यावरही त्याच्या असंतुष्टतेचा काहीतरी प्रभाव पडतोच ना. व्यर्थ संकल्प तर चालतात ना. बापदादांनी जो शुभ भावना, शुभ कामनेचा मंत्र दिला आहे, जर तुम्ही स्वतःला या मंत्राच्या स्मृती स्वरूप ठेवाल तर तुमचे व्यर्थ संकल्प चालणार नाहीत. स्वतः जाणत असतानाही की, हा असा आहे, हा तसा आहे परंतु स्वतःला सदैव न्यारा, त्याच्या व्हायब्रेशनपासून न्यारा आणि बाबांचा प्रिय असल्याचे अनुभव करा. तर तुमच्या न्यारेपणाचा आणि बाबांचा प्रिय असण्याच्या श्रेष्ठ स्थितीची व्हायब्रेशन्स जरी त्या आत्म्यापर्यंत पोहोचली नाहीत तरीही वायुमंडळामध्ये नक्कीच पसरतील. जर कोणामध्ये परिवर्तन होत नसेल आणि तुमच्या मनामध्ये त्या आत्म्याचा प्रभाव व्यर्थ संकल्पाच्या रूपामध्ये पडत राहतो तर वायुमंडळामध्ये सर्वांचे संकल्प पसरतात म्हणून तुम्ही न्यारा बनून बाबांचा प्रिय बनून त्या आत्म्याच्याही कल्याणाप्रती शुभ भावना, शुभ कामना ठेवा. बऱ्याच वेळा मुले म्हणतात की, त्याने चूक केली ना, तर मला देखील जोराने सांगावे लागते, थोडा आपला स्वभावही, आवाज देखील फोर्सवाला होतो. तर त्याने चूक केली परंतु तुम्ही जो फोर्स दाखवला काय ती चूक नाही आहे का? त्याने आणखी चूक केली, तुम्ही आपल्या मुखावटे जे फोर्सने बोललात, ज्याला क्रोधाचा अंश म्हटला जातो तर ते राईट आहे का? चुकीचा असणारा, समोरच्या चूक करणाऱ्याला ठीक करू शकेल का? आजकालच्या समयानुसार आपल्या शब्दांना फोर्सफुल बनवणे, यावर देखील विशेष अटेन्शन ठेवा; कारण जोराने बोलणे किंवा वैतागून बोलणे, ‘तो तर बदलतच नाही’, परंतु हा देखील दुसऱ्या नंबरच्या विकाराचा अंश आहे. म्हटले जाते - मुखावाटे असे शब्द निघावेत जशी फुलांची वर्षा होत आहे. गोड शब्द, हसरा चेहरा, गोड वृत्ती, गोड दृष्टी, गोड संबंध-संपर्क हे देखील सेवेचे साधन आहे म्हणून रिझल्ट बघा; जर समजा कोणी चूक केली, चुकीचे आहे आणि तुम्ही समजावण्याच्या हेतूने दुसरा कोणता हेतू नाही आहे, तुमचा हेतू खूप चांगला आहे की याला शिकवण देत आहे, समजावून सांगत आहे, परंतु रिझल्टमध्ये काय दिसून आले? तो बदलला आहे? तो तर अजूनच पुढच्या वेळी, समोर यायला सुद्धा घाबरतो. तर जे लक्ष्य तुम्ही ठेवले ते तर होतंच नाही म्हणून तुम्ही मनसा संकल्प आणि वाणी अर्थात बोल आणि संबंध-संपर्काला सदैव गोड, मधुरता संपन्न अर्थात महान बनवा; कारण वर्तमान समयी लोक प्रॅक्टिकल लाईफ (प्रत्यक्ष जीवन) पाहू इच्छित आहेत, जर वाणीद्वारे सेवा करता तर वाणीच्या सेवेने प्रभावित होऊन जवळ तर येतात, हा तर फायदा आहे परंतु तुमच्यामधील प्रॅक्टिकल मधुरता, महानता, श्रेष्ठ भावना, चलन आणि चेहऱ्याला पाहून स्वतः देखील परिवर्तन करण्यासाठी प्रेरणा घेतात; आणि जस-जशी पुढील काळामध्ये सर्व परिस्थिती बदलणार आहे, तर अशा वेळी तुम्हा सर्वांना चेहऱ्याद्वारे आणि वर्तनाद्वारे जास्त सेवा करावी लागेल. त्यामुळे स्वतःला चेक करा - सर्व आत्म्यांप्रती शुभ भावना, शुभकामनेची वृत्ती आणि दृष्टीचे संस्कार नेचर आणि नॅचरल (स्वाभाविक आणि नैसर्गिक) आहेत?

बापदादा प्रत्येक मुलाला विजयी माळेचा मणी पाहू इच्छित आहेत. तर तुम्ही सर्वजण स्वतःला समजता का की, आम्ही माळेचा मणी बनणारे आहोत. बरीच मुले विचार करतात की, १०८ च्या माळेमध्ये तर जी निमित्त बनलेली मुले आहेत तीच येतील; परंतु बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे - हे तर १०८ चे गायन भक्तीच्या माळेचे आहे परंतु जर तुम्ही प्रत्येकजण विजयी मणी बनाल तर बापदादा माळेमध्ये अनेक लड्या लावतील. बाबांच्या हृदयातील माळेमध्ये तुम्हा प्रत्येक विजयी मुलांना स्थान आहे, ही बाबांची गॅरंटी आहे. फक्त स्वतःला मनसा-वाचा-कर्मणा आणि चलन-चेहऱ्यामध्ये विजयी बनवा. पसंत आहे, बनणार? बापदादांची गॅरंटी आहे विजयीमाळेचा मणी बनवतील. कोण बनणार? (सर्वांनी हात वर केला) अच्छा, तर बापदादा माळेच्या आत माळा बनवायला सुरुवात करतील. डबल फॉरेनर्सना पसंत आहे ना! विजयमाळेमध्ये आणणे बाबांचे काम आहे परंतु तुमचे काम आहे विजयी बनणे. सोपे आहे ना की अवघड आहे? कठीण वाटते का? ज्यांना अवघड वाटते त्यांनी हात वर करा. वाटते असे? थोडे-थोडे, कोणी-कोणी आहेत. बापदादा म्हणतात - जेव्हा बापदादा म्हणता तर बाबा म्हटल्याने बाबांचा वारसा मिळणार नाही काय! जर सर्वजण वारशाचे अधिकारी आहात आणि किती सहज बाबांनी वारसा दिला, सेकंदाची गोष्ट आहे, तुम्ही मानले, जाणले - ‘माझे बाबा’ आणि बाबांनी काय म्हटले? ‘माझा बच्चा’. तर बच्चा तर स्वतःच वारशाचा अधिकारी आहे. ‘बाबा’ म्हणता ना! सर्व जण एकच शब्द बोलता - ‘माझे बाबा’. आहे असे? माझे बाबा आहेत? यामध्ये हात वर करा. माझे बाबा आहेत, तर माझा वारसा नाही आहे का? जेव्हा माझे बाबा आहेत तर माझा वारसा देखील बांधील आहे आणि वारसा कोणता आहे? बाप समान बनणे, विजयी बनणे. बापदादांनी बघितले की, डबल फॉरेनर्समध्ये मेजॉरिटी हातात हात देऊन चालतात. हातामध्ये हात देणे, चालणे, ही फॅशन आहे. तर आता देखील बाबा म्हणतात, पिता शिवबाबांचा हात कोणता आहे? हा स्थूल हात तर नाही आहे, तर शिवबाबांचा हात पकडला, तर तो हात कोणता आहे? श्रीमत, बाबांचा हात आहे. तर जसे स्थूलमध्ये हातामध्ये हात देऊन चालायला आवडते, तर मग श्रीमताच्या हातामध्ये हात देऊन चालणे हे काय कठीण आहे! ब्रह्माबाबांना बघितले, प्रॅक्टिकल पुरावा पाहिला की प्रत्येक पाऊल श्रीमत प्रमाण चालल्यामुळे संपूर्ण फरिश्तेपणाच्या ध्येयावर पोहोचले ना! अव्यक्त फरिश्ता बनले ना. तर फॉलो फादर, प्रत्येक श्रीमत, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत प्रत्येक पावलासाठी श्रीमत बापदादांनी सांगितले आहे. उठायचे कसे, चालायचे कसे, कर्म कसे करायचे, मनामध्ये संकल्प काय-काय करायचे आणि वेळ श्रेष्ठ पद्धतीने कसा व्यतीत करायचा. रात्री झोपेपर्यंत श्रीमत मिळालेले आहे. विचार करण्याची देखील गरज नाही, हे करू की नको करू, फॉलो ब्रह्मा बाबा. तर बापदादांचे जिगरी प्रेम आहे, बापदादा एकाही मुलाला असा पाहू इच्छित नाहीत की जो विजयी बनला नाही, राजा बनला नाही. प्रत्येक बच्चा राजा बच्चा आहे. स्वराज्य अधिकारी आहे त्यामुळे आपले स्वराज्य विसरायचे नाही. समजले.

बापदादांनी कित्येकदा इशारा दिलेला आहे की वेळ अचानक आणि नाजूक येत आहे त्यामुळे एव्हररेडी, अशरिरीपणाचा अनुभव आवश्यक आहे. कितीही बिझी असाल परंतु बिझी असताना देखील एक सेकंद अशरीरी बनण्याचा अभ्यास आत्तापासूनच करून बघा. तुम्ही म्हणाल - ‘आम्ही खूप बिझी असतो’, जर मानले कितीही बिझी आहात आणि तुम्हाला तहान लागते, काय कराल? पाणी प्याल ना! कारण समजता की तहान लागली आहे तर पाणी पिणे जरुरी आहे. तसाच मधून-मधून अशरीरी, आत्मिक स्थितीमध्ये स्थित राहण्याचा अभ्यास देखील जरुरी आहे; कारण येणाऱ्या काळामध्ये चारी बाजूच्या भयग्रस्त वातावरणामध्ये अचल स्थितीची आवश्यकता आहे. तर आतापासूनच हा अभ्यास जर दीर्घकाळ केला नाहीत तर अति अशांततेच्या काळामध्ये तुम्ही अचल कसे राहू शकणार! संपूर्ण दिवसभरामध्ये एक-दोन मिनिटे काढून चेक देखील करा की, समयानुसार आत्मिक स्थिती द्वारे अशरीरी बनू शकतो का? चेक करा आणि चेंज करा. फक्त चेक करू नका, चेंज देखील करा. तर वारंवार या अभ्यासाला चेक केल्यामुळे, उजळणी केल्याने नॅचरल स्थिती बनेल. बापदादांवर प्रेम आहे, यामध्ये तर सर्व जण हात वर करतात. आहे ना प्रेम! संपूर्ण प्रेम आहे, संपूर्ण की अपूर्ण? अपूर्ण तर नाही आहे ना! प्रेम आहे तर वायदा काय आहे? कोणता वायदा केला आहे? सोबत येणार? अशरीरी बनून सोबत येणार की मागून येणार? सोबत येणार? आणि थोडा वेळ वतनमध्ये सोबत राहणार सुद्धा आणि मग ब्रह्माबाबांसोबत पहिल्या जन्मामध्ये येणार. आहे हा वायदा? आहे ना! हात वर करायला सांगत नाही, असे डोके हलवा. हात वर करून थकून जाल ना. जेव्हा सोबत जायचेच आहे, मागे रहायचे नाही आहे तर बाबा देखील सोबत कोणाला घेऊन जातील? बाबा, समान असणाऱ्याला घेऊन जातील. बाबांना देखील एकटे जाणे पसंत नाही आहे, मुलांसोबत जायचे आहे. तर सोबत येण्यासाठी तयार आहात ना! मान हलवा. आहात तयार? सर्व जण येणार? अच्छा, सर्व जण येण्यासाठी तयार आहात? जेव्हा बाबा जातील तेव्हा जाणार ना. आत्ता नाही जाणार, आता तर फॉरेनमध्ये परत जायचे आहे ना. बाबा ऑर्डर करतील, नष्टोमोहा स्मृती लब्धाची बेल वाजवतील आणि सोबत चालू लागाल. तर तयारी आहे ना! प्रेमाची निशाणी आहे सोबत येणे. अच्छा.

बापदादा प्रत्येक मुलाला दूर असून देखील जवळ असल्याचा अनुभव करत आहेत. जर विज्ञानाची साधने दूर असणाऱ्याला जवळ करू शकतात, बघू शकतात, बोलू शकतात, तर बापदादा देखील दूर बसलेल्या मुलांना सर्वात जवळ बघत आहेत. दूर नाही आहात, हृदयामध्ये सामावलेले आहात. तर बापदादा विशेष टर्नच्या अनुसार आलेल्या मुलांना आपल्या हृदयामध्ये, नयनांमध्ये सामावून घेत प्रत्येकाला सोबत येणारे, सोबत राहणारे सोबत राज्य करणारे असे बघत आहेत. तर आजपासून साऱ्या दिवसभरामध्ये वारंवार कोणती ड्रिल कराल? आता लगेच एका सेकंदामध्ये आत्म-अभिमानी, आपल्या शरीराला देखील बघत असताना अशरीरी स्थितीमध्ये न्यारा आणि बाबांचा प्रिय असल्याचा अनुभव करू शकता ना! तर आता एका सेकंदामध्ये अशरीरी भव! अच्छा. (बापदादांनी ड्रिल करवून घेतली) असेच संपूर्ण दिवसामध्ये मधून-मधून कसेही करून एक मिनिट काढून या अभ्यासाला पक्के करत चला कारण बापदादा जाणतात पुढचा काळ अतिशय हाहाकार वाला असणार आहे. तुम्हा सर्वांना सकाश द्यावी लागेल आणि सकाश देण्यामध्येच तुमचा स्वतःचा तीव्र पुरुषार्थ होईल. थोड्या वेळामध्ये सकाश द्वारे सर्व शक्ती द्याव्या लागतील आणि जे अशा नाजूक वेळी सकाश देतील, जितक्याजणांना देतील, भले खूप जणांना, भले थोड्या जणांना तितकेच द्वापार आणि कलियुगाचे भक्त त्यांचे बनतील. तर संगमावर प्रत्येक जण आपले भक्त देखील बनवत आहेत कारण दिलेले सुख आणि शांती त्यांच्या हृदयामध्ये सामावून राहील आणि भक्तिच्या रूपामध्ये ते तुम्हाला रिटर्न करतील. अच्छा!

चोहो बाजूंच्या बापदादांच्या नयनातील नूर, विश्वाचा आधार आणि उद्धार करणारे आत्मे, मास्टर दुःख हर्ता, सुख कर्ता, विश्व परिवर्तक मुलांना खूप-खूप हृदयापासून स्नेह, हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण आणि पदम-पदम वरदान स्वीकार असो. अच्छा.

वरदान:-
कंबाइंड स्वरूपाची स्मृती आणि पोझिशनच्या नशे द्वारे कल्प-कल्पाचे अधिकारी भव

मी आणि माझे बाबा - या स्मृतिमध्ये कंबाइंड रहा तसेच ही श्रेष्ठ पोझिशन सदैव स्मृतिमध्ये रहावी की आम्ही आज ब्राह्मण आहोत उद्या देवता बनणार. हम सो, सो हम चा मंत्र सदैव लक्षात राहावा तर या नशेमध्ये आणि खुशीमध्ये जुनी दुनिया सहजच विसरली जाईल. सदैव हाच नशा राहील की आम्हीच कल्प-कल्पाचे अधिकारी आत्मे आहोत. आम्हीच होतो, आम्हीच आहोत आणि आम्हीच कल्प-कल्प असणार.

सुविचार:-
आपणच आपले टीचर बना तर सर्व प्रकारच्या कमजोरी आपोआप नष्ट होतील.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.

तसे तर बंधन कोणालाही चांगले वाटत नाही, परंतु जेव्हा पराधीन होता तेव्हा बांधले जाता. तर चेक करा की, मी पराधीन आत्मा आहे की स्वतंत्र आत्मा आहे? जीवन-मुक्तीची मजा तर आताच आहे. भविष्यामध्ये जीवन-मुक्त आणि जीवन-बंधचा विरोधाभास असणार नाही. या वेळचा जीवनमुक्तचा अनुभव श्रेष्ठ आहे. जीवन जगत आहे परंतु मुक्त आहे, बंधनामध्ये नाही.