11-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, सर्वांना हाच संदेश द्या की, बाबांचा आदेश आहे - या पुरुषोत्तम संगमयुगामध्ये पवित्र बना, तर सतयुगाचा वारसा मिळेल”

प्रश्न:-
कोणता स्वस्त सौदा सर्वांना सांगायचा आहे?

उत्तर:-
या अंतिम जन्मामध्ये बाबांच्या डायरेक्शनवर (श्रीमतावर) चालून पवित्र बना, तर २१ जन्मांसाठी विश्वाची बादशाही मिळेल, हा खूपच स्वस्त सौदा आहे. हाच सौदा करणे तुम्ही सर्वांना शिकवा. तुम्ही बोला, ‘आता शिवबाबांची आठवण करून पवित्र बना, तर पवित्र दुनियेचे मालक बनाल’.

ओम शांती।
रुहानी मुले जाणतात, रुहानी बाबा समजावून सांगत आहेत की, प्रदर्शनी किंवा मेळाव्यामध्ये स्लाईड शो दाखवता किंवा या चित्रांवर लोकांना समजावून सांगता की, बाबांकडून आता बेहदचा वारसा घ्यायचा आहे. कोणता वारसा? मनुष्यापासून देवता बनण्याचा अथवा बेहदच्या बाबांकडून अर्ध्याकल्पासाठी स्वर्गाचे राज्य कसे घ्यायचे हे समजून सांगायचे आहे. बाबा सौदागर तर आहेतच, त्यांच्याशी हा सौदा करायचा आहे. हे तर मनुष्य जाणतात की, देवी-देवता पवित्र असतात. भारतामध्ये जेव्हा सतयुग होते तेव्हा देवी-देवता पवित्र होते. जरूर त्यांनी कोणती स्वर्गासाठी काही प्राप्ती केली असेल. स्वर्गाची स्थापना करणाऱ्या बाबांशिवाय, कोणीही प्राप्ती करवू शकत नाही. पतित-पावन बाबाच, पतितांना पावन बनवून, पावन दुनियेचे राज्य देणारे आहेत. हा सौदा किती स्वस्त देतात. फक्त म्हणतात - हा तुमचा अंतिम जन्म आहे. जोपर्यंत मी इथे आहे, पवित्र बना. मी पवित्र बनविण्यासाठी आलो आहे. तुम्ही या अंतिम जन्मामध्ये पावन बनण्याचा पुरुषार्थ कराल तर पावन दुनियेचा वारसा घ्याल. हा सौदा तर खूपच स्वस्त आहे. तर बाबांना विचार आला की, मुलांना असे काही समजावून सांगितले पाहिजे की, बाबांचा आदेश आहे - पवित्र बना. हे पुरुषोत्तम संगमयुग आहे, जे पवित्र बनण्याचे युग आहे. उत्तम ते उत्तम पुरुष आहेतच देवता. लक्ष्मी-नारायणाचे राज्य होऊन गेले आहे ना. डीटी वर्ल्ड सावरंटी (दैवी दुनियेचे साम्राज्य) तुम्हाला बाबांकडून वारशामध्ये मिळू शकते. बाबांच्या मतावर हा अंतिम जन्म पवित्र बनाल तर ही देखील युक्ती सांगतात की, योगबलाद्वारे स्वतःला तमोप्रधानापासून सतोप्रधान कसे बनवायचे. मुलांच्या कल्याणासाठी खर्च तर करायचाच आहे. पैसे खर्च केल्याशिवाय राजधानी स्थापन होऊ शकणार नाही. आता लक्ष्मी-नारायणाची राजधानी स्थापन होत आहे. मुलांना पवित्र जरूर बनायचे आहे. मनसा-वाचा-कर्मणा कोणतेही उलटे-सुलटे काम करायचे नाही. देवतांना कधी कोणता खराब विचार देखील येत नाही. मुखावाटे असे कोणते वचन निघत नाही. ते आहेतच मुळी सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम… जे होऊन जातात त्यांची महिमा केली जाते. आता तुम्हा मुलांना देखील तेच देवी-देवता बनविण्यासाठी आलो आहे. तर मनसा-वाचा-कर्मणा, कोणतेही असे वाईट काम करायचे नाहीये. देवता संपूर्ण निर्विकारी होते, हे गुण देखील तुम्ही आताच धारण करू शकता कारण या मृत्युलोकामध्ये तुमचा हा अंतिम जन्म आहे. पतित दुनियेला मृत्युलोक, पावन दुनियेला अमरलोक म्हटले जाते. आता मृत्यूलोकचा विनाश समोर उभा आहे. जरूर अमरपुरीची स्थापना होत असेल. ही तीच महाभारत लढाई आहे, जी शास्त्रांमध्ये दाखवली आहे, ज्याद्वारे जुनी विकारी दुनिया नष्ट होते, परंतु हे ज्ञान कोणाकडेही नाहीये. बाबा म्हणतात - सर्व अज्ञान निद्रेमध्ये झोपी गेले आहेत. ५ विकारांचा नशा असतो. आता बाबा म्हणतात - पवित्र बना. मास्टर गॉड तर बनणार ना. लक्ष्मी-नारायणाला गॉड-गॉडेज (भगवान-भगवती) म्हणतात म्हणजेच भगवंताकडून हा वारसा मिळाला आहे. आता तर भारत पतित आहे. मनसा-वाचा-कर्मणा कामेच अशी करतात. कोणतीही गोष्ट प्रथम बुद्धीमध्ये येते, नंतर मग मुखावाटे निघते. कर्मणामध्ये आल्याने विकर्म बनते. बाबा म्हणतात - तिथे (स्वर्गामध्ये) कोणतेही विकर्म होत नाही. इथे विकर्म होतात, कारण रावण राज्य आहे. आता बाबा म्हणतात - उर्वरित जे आयुष्य आहे त्यामध्ये पवित्र बना. प्रतिज्ञा करायची आहे - पवित्र बनून आणि मग माझ्यासोबत बुद्धीचा योग देखील लावायचा आहे, ज्याद्वारे तुमची जन्म-जन्मांतरीची पापे देखील नष्ट होतील, तेव्हाच तुम्ही २१ जन्मांसाठी स्वर्गाचे मालक बनाल. बाबा ऑफर करत आहेत, हे तर समजावून सांगत राहतात की, यांच्याद्वारे बाबा हा वारसा देतात. ते आहेत शिवबाबा, हे आहेत दादा त्यामुळे नेहमी म्हणताच मुळी बाप-दादा. शिव - बाबा, ब्रह्मा - दादा. बाबा केवढा मोठा सौदा करतात. मृत्युलोकाचा विनाश समोर आहे, अमरलोकची स्थापना होत आहे. प्रदर्शनी मेळावे करतातच यासाठी की, भारतवासीयांचे कल्याण व्हावे. बाबाच येऊन भारतामध्ये राम-राज्य स्थापन करतात. रामराज्यामध्ये जरूर पवित्रच असतील. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, काम विकार महाशत्रू आहे’. या ५ विकारांनाच माया म्हटले जाते. यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. जगतजीत आहेतच मुळी देवी-देवता, दुसरे कोणीही जगतजीत बनू शकत नाही. बाबांनी समजावून सांगितले होते की, क्रिश्चन लोक जर आपसामध्ये मिळाले तर साऱ्या सृष्टीचे राज्य घेऊ शकतात. परंतु तसा कायदा नाही. हे बॉम्ब्स आहेतच जुन्या दुनियेला नष्ट करण्यासाठी. कल्प-कल्प अशीच नवीन दुनियेपासून जुनी, जुन्यापासून नवीन दुनिया होते. नविन दुनियेमध्ये आहे ईश्वरीय राज्य, ज्याला रामराज्य म्हटले जाते. ईश्वराला न जाणल्यामुळे असेच राम-राम जपत राहतात. तर तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी धारण झाल्या पाहिजेत. खरोखर आम्ही ८४ जन्मांमध्ये सतोप्रधानापासून तमोप्रधान बनलो आहोत. आता पुन्हा सतोप्रधान जरूर बनायचे आहे. शिवबाबांचे डायरेक्शन आहे, आता त्यानुसार चालाल तर २१ जन्मांसाठी पवित्र दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त कराल. आता पाहिजे तर पुरुषार्थ करा किंवा नका करु, पाहिजे तर आठवणीमध्ये राहून दुसऱ्यांना रस्ता दाखवा नाहीतर नका दाखवू. प्रदर्शनीद्वारे अनेकांना मुले रस्ता दाखवत आहेत. स्वतःचे देखील कल्याण करायचे आहे. सौदा खूपच स्वस्त आहे. फक्त हा अंतिम जन्म पवित्र राहिल्यामुळे, शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहील्याने तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. किती स्वस्त सौदा आहे. जीवनच बदलून जाते. अशाप्रकारे विचार केला पाहिजे. बाबांकडे समाचार येतात की, ‘आम्ही राखी बांधण्यासाठी गेलो होतो तर काहीजणांनी म्हटले की, यावेळी जेव्हा की तमोप्रधान दुनिया आहे, यामध्ये पवित्र राहणे - हे तर असंभव आहे’. त्या बिचाऱ्यांना कळतही नाही की आता संगमयुग आहे. बाबाच पवित्र बनवतात. यांचे मदतगार परमपिता परमात्मा आहेत. त्यांना हे ठाऊकच नाहीये की, इथे प्राप्ती खूप जबरदस्त आहे. पवित्र बनल्यामुळे पवित्र दुनियेचे मालक बनता येते. बाबा म्हणतात - या मायारूपी ५ विकारांवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. तर आपण का नाही पवित्र बनायचे? खूपच चांगला सौदा आहे. बाबा म्हणतात - काम विकार महाशत्रू आहे. याच्यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही पवित्र बनाल. माया जीत जगतजीत. ही आहे योगबलाद्वारे मायेला जिंकण्याची गोष्ट. परमपिता परमात्माच येऊन आत्म्यांना समजावून सांगतात की, माझी आठवण करा तर भेसळ निघून जाईल. तुम्ही सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. बाबा वारसा देतातच मुळी संगमावर. सर्वात उत्तम पुरुष हे लक्ष्मी-नारायण होते, त्यांनाच मर्यादा पुरुषोत्तम देवी-देवता धर्माचे म्हटले जाते. समजावून तर खूप चांगल्या प्रकारे सांगितले जाते परंतु कधी-कधी हे ज्ञानाचे पॉईंट्स विसरतात. नंतर मग विचार येतो की भाषणामध्ये हे-हे पॉईंट्स सांगितले गेले नाहीत. सांगण्यासारखे मुद्दे तर पुष्कळ आहेत, परंतु असे होते. वकील लोक देखील काही-काही पॉईंट्स विसरतात; आणि मग जेव्हा तो पॉईंट आठवतो तेव्हा मग केस लढतात. डॉक्टर लोकांचे देखील असेच होते. विचार येतो की, या आजारासाठी हे औषध ठीक आहे. इथे देखील ज्ञानाचे पॉईंट्स तर पुष्कळ आहेत. बाबा म्हणतात - आज तुम्हाला गूढ पॉईंट्स समजावून सांगत आहे; परंतु समजून घेणारे सर्व पतित आहेत. म्हणतात देखील - ‘हे पतित-पावन या…’ आणि मग जर कोणाला पतित म्हटले तर चिडतील. ईश्वरा समोर खरे बोलतात - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. ईश्वराला विसरतात आणि मग खोटे आहे असे म्हणतात; त्यामुळे खूप युक्तीने समजावून सांगायचे आहे जेणेकरून साप देखील मरेल आणि काठी देखील मोडणार नाही. बाबा म्हणतात - उंदराकडून गुण ग्रहण करा. उंदीर असे काही युक्तीने चावतो की, रक्त देखील येते परंतु अजिबात कळत सुद्धा नाही. तर मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व पॉईंट्स राहिले पाहिजेत. योगामध्ये राहणाऱ्यांना वेळेवर मदत मिळते. असे होऊ शकते की, बाबांना ऐकणारा, ऐकवणाऱ्या पेक्षाही जास्त प्रिय वाटेल. तर बाबा स्वतः देखील समजावून सांगतील. तर असे समजावून सांगायचे आहे जेणेकरून तो समजेल की, पवित्र बनणे तर खूप चांगले आहे. हा एक जन्म पवित्र राहिल्यामुळे आपण २१ जन्म पवित्र दुनियेचे मालक बनू. भगवानुवाच - हा अंतिम जन्म पवित्र बना, तर आम्ही गॅरंटी देतो की, ड्रामा प्लॅन अनुसार तुम्ही २१ जन्मांसाठी वारसा मिळवू शकता. हा तर आम्ही कल्प-कल्प वारसा मिळवत राहतो. ज्यांना सेवेची आवड असेल ते समजतील की, आपणही जाऊन ज्ञान सांगावे. भागदौड करावी लागेल. बाबा तर आहेत ज्ञानाचे सागर, ते किती ज्ञानाची वर्षा करत राहतात. ज्यांची आत्मा पवित्र आहे, तर धारणा देखील होते. आपले नाव प्रसिद्ध करून दाखवतात. प्रदर्शनी, मेळ्यावरून समजू शकते की, कोण कशा प्रकारे सेवा करत आहेत. टिचरने तपासायला पाहिजे की, कोण कसे समजावून सांगतात. जास्त करून लक्ष्मी-नारायण किंवा शिडीच्या चित्रावर समजावून सांगणे चांगले आहे. योगबलाद्वारे पुन्हा असे लक्ष्मी-नारायण बनतात. लक्ष्मी-नारायण सो आदि देव-आदि देवी. चतुर्भुजमध्ये लक्ष्मी-नारायण दोघेही येतात. दोन भुजा लक्ष्मीच्या, दोन नारायणच्या आहेत. हे देखील भारतवासी जाणत नाहीत. महालक्ष्मीला चार भुजा आहेत, याचा अर्थच आहे ते युगल आहेत. विष्णू आहेच मुळी चतुर्भुज.

प्रदर्शनीमध्ये तर दररोज समजावून सांगितले जाते. रथ देखील दाखवला आहे. म्हणतात - रथामध्ये अर्जुन बसला होता, कृष्ण रथ चालवत होता. या सर्व आहेत दंतकथा. आता या आहेत ज्ञानाच्या गोष्टी. असे दाखवतात ज्ञान अमृताचा कलश लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवला आहे. वास्तविक कलश तर जगत अंबेवर ठेवला आहे, जी मग लक्ष्मी बनते. हे देखील समजावून सांगावे लागेल. सतयुगामध्ये एक धर्म, एक मत असणारे मनुष्य असतात. देवतांचे आहेच मुळी एक मत. देवतांनाच ‘श्री’ म्हटले जाते बाकी कोणाला म्हटले जात नाही. तर बाबांचा विचार चालला होता की, समजावून सांगण्यासाठी थोडेच शब्द असावेत. या अंतिम जन्मामध्ये ५ विकारांवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही रामराज्याचे मालक बनाल. हा तर खूपच स्वस्त सौदा आहे. बाबा येऊन अविनाशी रत्नांचे दान देतात. बाबा आहेत ज्ञानाचे सागर. तेच ज्ञान रत्न देतात. इंद्रसभेमध्ये कोणी सब्जपरी, पुखराज परी देखील आहेत. हे तर सर्व मदत करणारे आहेत. रत्नांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात ना, म्हणून ९ रत्ने दाखवली आहेत. हे तर नक्की आहे, जे चांगल्या प्रकारे शिकतील तर ते पद देखील प्राप्त करतील. नंबरवार तर आहेत ना. पुरुषार्थ करण्याची हीच वेळ आहे. हे तर मुले समजतात की, आम्ही बाबांच्या माळेतील मणी बनतो. जितकी शिवबाबांची आठवण करू, तेवढे आम्ही जसे की आठवणीच्या यात्रेमध्ये आहोत. पाप देखील लवकर विनाश होतील.

हे शिक्षण फारसे मोठे नाहीये, फक्त पवित्र राहायचे आहे. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. मुखावाटे कधीही दगड काढायचे नाहीत. दगड फेकणारे पत्थर-बुद्धीच बनतील. मुखावाटे रत्न काढणारेच उच्च पद प्राप्त करतील. हे तर खूप सोपे आहे. जिज्ञासूंना समजावून सांगा, पतित-पावन सर्वांचे मुक्ती-जीवनमुक्ती दाता परमपिता परमात्मा शिव म्हणतात - हे भारतवासी रुहानी मुलांनो, रावण राज्य मृत्युलोक मधील या कलियुगी अंतिम जन्मामध्ये पवित्र बनून राहील्यामुळे आणि परमपिता परमात्मा शिव यांच्याशी बुद्धीने योगबलाच्या यात्रेद्वारे तमोप्रधान आत्मे सतोप्रधान आत्मा बनून सतयुगी विश्वावर पवित्रता, सुख, शांती, संपत्ती संपन्न मर्यादा पुरुषोत्तम दैवी स्वराज्य पद ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे पुन्हा प्राप्त करू शकता, परंतु होणाऱ्या महाभारी विनाशाच्या अगोदर बाबा आम्हाला वारसा देतात, राजयोग शिकवतात. जितके शिकाल तेवढे उच्च पद प्राप्त कराल. सोबत तर घेऊनच जातील मग आपल्याला या जुन्या शरीराचा किंवा या जुन्या दुनियेचा विचारच कशाला केला पाहिजे. तुमची ही वेळ आहे जुन्या दुनियेला सोडण्याची. असे ज्ञानाच्या गोष्टींचे बुद्धीमध्ये मंथन होत राहिले तरीही खूपच चांगले आहे. पुढे चालून पुरुषार्थ करत-करत वेळ जवळ येईल, नंतर मग घुसमट होणार नाही. तुम्ही पहाल दुनिया देखील थोड्या काळासाठी आहे तर बुद्धियोग लावला पाहिजे ना. सेवा केल्यामुळे मदत देखील मिळेल. जेवढा कोणाला सुखाचा रस्ता सांगाल तेवढा आनंद होत राहील. पुरुषार्थ देखील होत राहतो. भाग्य देखील दिसून येते. बाबा तर पुरुषार्थ करायला शिकवतात. कोणी त्याप्रमाणे पुरुषार्थ करू लागतात, कोणी करतही नाहीत. तुम्ही जाणता, करोडपती, पदमपती सर्व असेच नष्ट होतील, अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) उच्च पद प्राप्त करण्यासाठी मुखावाटे नेहमी रत्नेच काढायची आहेत, दगड नाही. मनसा-वाचा-कर्मणा अशी कर्मे करायची आहेत, जी मर्यादा पुरुषोत्तम बनविणारी असतील.

२) या अंतिम जन्मामध्ये पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे. पवित्र बनण्याचीच युक्ती सर्वांना सांगायची आहे.

वरदान:-
एव्हररेडी बनून प्रत्येक परिस्थिती रुपी पेपरामध्ये पूर्ण पास होणारे एव्हरहॅपी भव

जे एव्हररेडी आहेत त्यांचे प्रत्यक्ष स्वरूप एव्हर हॅपी असेल. कोणताही परिस्थितीरुपी पेपर किंवा नैसर्गिक आपत्तीद्वारे आलेला पेपर अथवा कोणताही शारीरिक कर्मभोग रुपी पेपर आला तर या सर्व प्रकारच्या पेपरांमध्ये पूर्ण पास होणाऱ्यालाच एव्हररेडी म्हणणार. जसे वेळ कोणासाठी थांबत नाही, तसे कधी कोणतीही अडचण थांबवू शकणार नाही, मायेचे सूक्ष्म किंवा स्थूल विघ्न एका सेकंदात समाप्त व्हावे तेव्हाच एव्हर हॅपी राहू शकाल.

बोधवाक्य:-
वेळेवर सर्व शक्तींना कार्यामध्ये लावणे अर्थात मास्टर सर्वशक्तीमान बनणे.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

एकतेचे दोन आधार आहेत एक - फेथ (विश्वास) आणि दुसरा - लव्ह (प्रेम). कधीही एकमेकांमधील विश्वास कमी होता कामा नये, एकाने सांगितले दुसऱ्याने मान्य केले… हीच एकतेच्या सूत्रामध्ये ओवले जाण्याची विधी आहे. अंतःकरणातील एकमेकांबद्दलचा स्नेह जवळ आणतो. जसे बाबांवर सर्वांचे प्रेम आहे तसे परिवारावर देखील मनापासून खरे प्रेम असावे, यासाठी स्वमानामध्ये राहून सर्वांना सन्मान द्या.