11-04-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आता हे नाटक पूर्ण होते, तुम्हाला आता परत घरी जायचे आहे, त्यामुळे या
दुनियेमधील मोह नष्ट करा, घराची आणि नवीन राज्याची आठवण करा”
प्रश्न:-
दानाचे महत्व
कधी आहे, त्याचे रिटर्न कोणत्या मुलांना प्राप्त होते?
उत्तर:-
दानाचे महत्त्व तेव्हा आहे जेव्हा दान केलेल्या वस्तूमध्ये मोह नसेल. जर दान केले
आणि मग जर का त्याची आठवण झाली तर त्याचे रिटर्नमध्ये फळ प्राप्त होऊ शकत नाही. दान
असतेच दुसऱ्या जन्मासाठी त्यामुळे या जन्मामध्ये तुमच्याकडे जे काही आहे त्यामधून
मोह नष्ट करा. ट्रस्टी होऊन सांभाळा. इथे तुम्ही जे ईश्वरीय सेवेमध्ये लावता,
हॉस्पिटल किंवा कॉलेज उघडता त्याद्वारे अनेकांचे कल्याण होते, त्याच्या रिटर्नमध्ये
२१ जन्मांसाठी मिळते.
ओम शांती।
मुलांना आपले घर आणि आपली राजधानी लक्षात आहे? इथे जेव्हा बसता तेव्हा बाहेरचे
घर-परिवार, काम-धंदा इत्यादीचे विचार येता कामा नयेत. बस्स, फक्त आपले घरच आठवले
पाहिजे. आता या जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये परतायचे आहे, ही जुनी दुनिया तर
नष्ट होणार आहे. सर्व आगीमध्ये स्वाहा होईल. जे काही या डोळ्यांनी पाहता,
मित्र-नातलग इत्यादी हे सर्व नष्ट होणार आहे. हे ज्ञान बाबाच आत्म्यांना सांगतात.
मुलांनो, आता परत आपल्या घरी जायचे आहे. नाटक पूर्ण होते. हे आहेच ५ हजार वर्षांचे
चक्र. दुनिया तर आहेच, परंतु तिला हे चक्र फिरण्याकरिता ५ हजार वर्षे लागतात. जे पण
आत्मे आहेत सर्व परत निघून जाणार. ही जुनी दुनियाच नष्ट होईल. बाबा खूप चांगल्या
रीतीने प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. कोणी-कोणी कंजूस असतात तर फुकटची आपली
संपत्ती गमावून बसतात. भक्तिमार्गामध्ये दान-पुण्य तर करतात ना. कोणी धर्मशाळा
बांधली, कोणी हॉस्पिटल बांधले, बुद्धीने समजतात याचे फळ दुसऱ्या जन्मामध्ये मिळणार.
कोणती आशा न ठेवता, अनासक्त होऊन करेल - असे होत नाही. बरेचजण म्हणतात फळाची इच्छा
आम्ही ठेवत नाही. परंतु नाही, फळ अवश्य मिळते. समजा कोणाकडे पैसा आहे, त्याने
दान-धर्म केला तर बुद्धीमध्ये हे राहील की, आपल्याला दुसऱ्या जन्मामध्ये मिळेल. जर
त्यामध्ये मोह गेला की, ही माझी वस्तू आहे असे समजला तर मग तिथे मिळणार नाही. दान
असतेच मुळी दुसऱ्या जन्माकरिता. जेव्हा की दुसऱ्या जन्मामध्ये मिळते तर मग या
जन्मामध्ये मोह का ठेवता, म्हणून ट्रस्टी बनवतात जेणेकरून आपला मोह नाहीसा होईल.
कोणी चांगल्या श्रीमंत घरामध्ये जन्म घेतात तर म्हटले जाईल त्याने चांगली कर्मे केली
आहेत. कोणी राजा-राणीकडे जन्म घेतात, कारण दान-पुण्य केले आहे’; परंतु ती आहे
अल्पकाळाची एका जन्माची गोष्ट. आता तर तुम्ही हे शिक्षण शिकत आहात. जाणता या
शिक्षणाद्वारे आपल्याला हे बनायचे आहे, तर दैवी गुण धारण करायचे आहेत. इथे जे दान
करता त्यातून ही रूहानी युनिव्हर्सिटी, हॉस्पिटल उघडतात. दान केले तर मग त्यामधून
मोह काढून टाकला पाहिजे कारण तुम्ही जाणता आपण भविष्य २१ जन्मांसाठी बाबांकडून घेतो.
बाबा ही घरे इत्यादी बनवतात. ही तर टेंपररी आहेत. नाही तर इतकी सर्व मुले कुठे
राहतील. देतात सर्व शिवबाबांना. धनी तेच आहेत. ते यांच्याद्वारे हे करून घेतात.
शिवबाबा तर राज्य करत नाहीत. स्वतः आहेतच दाता. त्यांचा मोह कशामध्ये असेल! आता बाबा
श्रीमत देतात की मृत्यू समोर उभा आहे. अगोदर तुम्ही कोणाला देत होता तेव्हा मृत्यूची
गोष्ट नव्हती. आता बाबा आले आहेत तर जुनी दुनियाच नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात -
मी आलोच आहे या पतित दुनियेला नष्ट करण्याकरिता. या रुद्र ज्ञान यज्ञामध्ये सारी
जुनी दुनिया स्वाहा होणार आहे. जे काही आपले भविष्य बनवाल तर नवीन दुनियेमध्ये
मिळेल. नाही तर इथेच सर्व काही नष्ट होईल. कोणी ना कोणी खाऊन जाईल. आजकाल मनुष्य
उधारीवर देखील देतात. विनाश होईल तर सर्व नष्ट होऊन जाईल. कोणी कोणाला काही देणार
नाही. सर्व राहून जाईल. आज चांगले आहे, उद्या दिवाळे निघते. कोणालाही काहीच पैसे
मिळणार नाहीत. कोणाला दिले, तो मेला मग परत कोण करत बसणार. तर काय केले पाहिजे?
भारताच्या २१ जन्मांच्या कल्याणाकरिता आणि मग आपल्या २१ जन्मांच्या कल्याणाकरिता
त्यामध्ये लावले पाहिजे. तुम्ही स्वतःसाठीच करता. जाणता श्रीमतावर आपण उच्च पद
प्राप्त करतो, ज्यामुळे २१ जन्म सुख-शांती मिळेल. याला म्हटले जाते अविनाशी बाबांचे
रूहानी हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी, ज्याद्वारे हेल्थ, वेल्थ आणि हॅपिनेस (आरोग्य,
संपत्ती, आनंद) मिळतो. कोणाकडे हेल्थ आहे वेल्थ नाहीये तर हॅपिनेस राहू शकत नाही.
दोन्ही असतील तर हॅप्पी सुद्धा असतात. बाबा तुम्हाला २१ जन्मांसाठी दोन्ही देतात.
ते २१ जन्मांसाठी जमा करायचे आहे. मुलांचे काम आहे युक्ती रचणे. बाबांच्या येण्याने
गरीब मुलांचे भाग्य उघडते. बाबा आहेतच गरीब निवाज. श्रीमंतांच्या भाग्यामध्येच या
गोष्टी नाहीत. यावेळी भारत सर्वात गरीब आहे. जो श्रीमंत होता, तोच गरीब बनला आहे.
यावेळी सर्व पाप-आत्मे आहेत. जिथे पुण्य-आत्मे आहेत तिथे एकही पाप-आत्मे असत नाहीत.
ते आहे सतयुग सतोप्रधान, हे आहे कलियुग तमोप्रधान. तुम्ही आता पुरुषार्थ करत आहात
सतोप्रधान बनण्याचा. बाबा तुम्हा मुलांना स्मृती देतात तर तुम्ही समजता बरोबर आपणच
स्वर्गवासी होतो. मग आपणच ८४ जन्म घेतले आहेत. बाकी ८४ लाख योन्या आहेत असे बोलणे
या तर थापा आहेत. इतके जन्म काय पशूच्या योनी मध्ये राहिलात! आणि हा शेवटचा जन्म
मनुष्य योनीमध्ये आहे काय? आता पुन्हा पशूच्या योनी मध्ये जावे लागेल काय?
आता बाबा समजावून
सांगतात - मृत्यू समोर उभा आहे. ४०-५० हजार वर्षे नाहीत. मनुष्य तर एकदम घोर
अंधारामध्ये आहेत म्हणून म्हटले जाते पत्थर-बुद्धी. आता तुम्ही पत्थर-बुद्धी पासून
पारस-बुद्धी बनता. या गोष्टी कोणी संन्यासी इत्यादी थोडेच सांगू शकतात. आता तुम्हाला
बाबा आठवण करून देतात की, आता आपल्याला परत जायचे आहे. जितके शक्य होईल आपले
बॅग-बॅगेज ट्रान्सफर करा. बाबा, हे सर्व घ्या, आम्ही सतयुगामध्ये २१ जन्मांसाठी
घेणार. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील तर दान-पुण्य करत होते. खूप आवड होती. व्यापारी
लोक दोन पैसे धर्माऊ म्हणून बाजूला काढतात. बाबा एक आणा बाजूला काढत होते. कोणीही
आले तर दरवाजातून रिकामे जाऊ नये. आता भगवान सन्मुख आले आहेत, हे कोणालाच माहित
नाहीये. मनुष्य दान-पुण्य करता-करता मरून जातील मग कुठून मिळणार? पवित्र बनत नाहीत,
बाबांवर प्रेम करत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे - यादव आणि कौरवांची आहे
विनाशकाले विपरीत बुद्धी. पांडवांची आहे विनाशकाले प्रीत बुद्धी. युरोपवासी सर्व
यादव आहेत जे मुसळ (मिसाईल्स) इत्यादीचा शोध लावत राहतात. शास्त्रांमध्ये तर
काय-काय गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. ड्रामाप्लॅन अनुसार असंख्य शास्त्रे बनलेली
आहेत. यामध्ये प्रेरणा इत्यादीची गोष्ट नाही. प्रेरणा अर्थात विचार. बाकी असे थोडेच
बाबा प्रेरणेने शिकवतात. बाबा म्हणतात - हा (ब्रह्मा बाबा) देखील एक व्यापारी होता.
चांगले नाव होते. सर्वजण आदर देत होते. बाबांनी प्रवेश केला आणि याने शिव्या खायला
सुरुवात केली. शिवबाबांना जाणत नाहीत. ना त्यांना शिवी देऊ शकत. शिव्या हे खातात.
श्रीकृष्णाने म्हटले ना - ‘मैं नहीं माखन खायो’. हे (ब्रह्मा बाबा) देखील म्हणतात -
‘कार्य तर सर्व बाबांचे आहे, मी काहीच करत नाही. जादूगार ते आहेत, मी थोडाच आहे.
फुकटचे यांना शिव्या देतात. मी कोणाला पळवले का? कोणालाही म्हटले नाही की, तुम्ही
पळून या. आम्ही तर तिथे होतो, हे सर्व स्वतःच पळून आले. फुकटच दोष दिला आहे. किती
शिव्या खाल्ल्या. काय-काय गोष्टी शास्त्रांमध्ये लिहिल्या आहेत. बाबा म्हणतात - हे
तरीही पुन्हा होणार. या आहेत सर्व ज्ञानाच्या गोष्टी. कोणी मनुष्य हे थोडेच करू शकतो.
ते देखील ब्रिटिश गव्हर्मेंटच्या राज्यामध्ये कोणा जवळ इतक्या कन्या-माता बसतील.
कोणी काहीही करू शकत नाही. कोणाचे नातलग येत होते तर एकदम पळवून लावत होते. बाबा तर
म्हणत होते भले यांना समजावून घेऊन जा. मी काही मना थोडेच करतो परंतु कोणाची हिंमत
होत नव्हती. बाबांची ताकद होती ना. नथिंग न्यू. हे तरीही पुन्हा सर्व होईल. शिवी
देखील खावी लागेल. द्रौपदीची देखील गोष्ट आहे. हे सगळे द्रौपदी आणि दु:शासन आहेत,
काही एकाचीच गोष्ट नव्हती. शास्त्रांमध्ये या थापा कोणी लिहिल्या? बाबा म्हणतात -
हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. आत्म्याचे ज्ञानच कोणामध्ये नाही आहे, अगदीच
देह-अभिमानी बनले आहेत. देही-अभिमानी बनण्यामध्ये मेहनत आहे. रावणाने एकदम उलटेच
केले आहे. आता बाबा सुलटे बनवतात.
देही-अभिमानी बनल्याने
स्वतः स्मृती राहते की आपण आत्मा आहोत, हा देह वाद्य आहे, वाजविण्यासाठी. एवढी जरी
स्मृती राहिली तरीही दैवी गुण सुद्धा येत जातात. तुम्ही कोणाला दुःखसुद्धा देऊ शकत
नाही. भारतामध्येच या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. जर
कोणी लाखो वर्षे म्हणतात तर घोर अंधारामध्ये आहेत. ड्रामा अनुसार जेव्हा वेळ पूर्ण
झाला आहे तेव्हा बाबा पुन्हा आले आहेत. आता बाबा म्हणतात - माझ्या श्रीमतावर चाला.
मृत्यू समोर उभा आहे. मग मनामधील जी काही आशा आहे, ती राहून जाईल. मरायचे तर आहे
जरूर. ही तीच महाभारत लढाई आहे, जितके आपले कल्याण करू शकत असाल तितके चांगले आहे.
नाही तर तुम्ही रिकाम्या हाताने जाल. सारी दुनिया रिकाम्या हाताने जाणार आहे. केवळ
तुम्ही मुले भरल्या हाताने अर्थात श्रीमंत बनता. हे समजण्यासाठी मोठी विशाल-बुद्धी
पाहिजे. किती धर्मांचे मनुष्य आहेत. प्रत्येकाची आपली ॲक्ट (कृती) चालते. एकाची कृती
दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. सर्वांची फीचर्स (वैशिष्ट्ये) आपली-आपली आहेत, किती
सारी फीचर्स आहेत, हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. वंडरफुल गोष्टी आहेत ना. आता
बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. आपण आत्मा ८४ चे चक्र फिरतो, आपण आत्मा या
ड्रामामध्ये ॲक्टर आहोत, याच्यामधून आपण बाहेर पडू शकत नाही, मोक्ष प्राप्त करू शकत
नाही. मग प्रयत्न करणे देखील व्यर्थ आहे. बाबा म्हणतात - ड्रामामधून कोणी निघून
जाईल, दुसरा कोणी ॲड होईल - हे होऊ शकत नाही. इतके सारे ज्ञान सर्वांच्या
बुद्धीमध्ये राहू शकत नाही. पूर्ण दिवस असेच ज्ञानामध्ये तल्लीन व्हायचे आहे. एक
मिनिट, अर्धे मिनिट… याची आठवण करा मग त्याला वाढवत जा. ८ तास भले स्थूल सेवा करा,
आराम सुद्धा करा, या रूहानी सेवेसाठी देखील वेळ द्या. तुम्ही आपलीच सेवा करता, ही
आहे मुख्य गोष्ट. आठवणीच्या यात्रेमध्ये रहा, बाकी ज्ञानाद्वारे उच्च पद प्राप्त
करायचे आहे. आठवणीचा आपला पूर्ण चार्ट ठेवा. ज्ञान तर सोपे आहे. ज्याप्रमाणे
बाबांच्या बुद्धीमध्ये आहे की मी मनुष्य सृष्टीचा बीजरूप आहे, याच्या
आदि-मध्य-अंताला जाणतो. आपण देखील बाबांची मुले आहोत. बाबांनी हे समजावून सांगितले
आहे की, कसे हे चक्र फिरते. त्या कमाईसाठी देखील तुम्ही ८-१० तास देता ना. चांगले
ग्राहक मिळाले की रात्रीची जांभई येत नाही. जांभई दिली तर समजले जाते की हा थकलेला
आहे. बुद्धी कुठे बाहेर भटकत असेल. सेंटर्सवर सुद्धा खूप सावध रहायचे आहे. जी मुले
इतरांचे चिंतन करत नाहीत, आपल्या अभ्यासामध्ये मस्त राहतात त्यांची नेहमी उन्नती
होत राहते. तुम्ही दुसऱ्यांविषयीचे चिंतन करून आपले पद भ्रष्ट करायचे नाही. हिअर नो
इविल, सी नो इविल… कोणी चांगले बोलत नसेल तर एका कानाने ऐकून दुसऱ्या बाजूने सोडून
द्या. नेहमी स्वतःला पाहिले पाहिजे, ना की दुसऱ्यांना. आपले शिक्षण सोडता कामा नये.
बरेचजण असे रुसतात. येणे बंद करतात, पुन्हा येतात. नाही आले तर जातील कुठे? शाळा तर
एकच आहे. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारायची नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये मस्त
रहा. खूप आनंदामध्ये रहा. भगवान शिकवत आहेत अजून काय पाहिजे. भगवान आपले पिता, टीचर,
सद्गुरु आहेत, त्यांच्याशीच बुद्धीचा योग लावला जातो. ते आहेत संपूर्ण दुनियेचे
नंबर वन माशुक जे तुम्हाला नंबर वन विश्वाचा मालक बनवितात.
बाबा म्हणतात - तुमची
आत्मा खूप पतित आहे, उडू शकत नाही. पंख कापले गेले आहेत. रावणाने सर्व आत्म्यांचे
पंख कापले आहेत. शिवबाबा म्हणतात - माझ्याशिवाय इतर कोणीही पावन बनवू शकत नाही.
सर्व ॲक्टर्स इथे आहेत, वृद्धी होत राहते, कोणीही परत जात नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्व-चिंतन
आणि अभ्यासामध्ये मस्त रहायचे आहे. इतरांना पहायचे नाही. जर कोणी चांगले बोलत नसेल
तर एका कानाने ऐकून दुसऱ्या बाजूने सोडून द्यायचे आहे. रुसून शिक्षण सोडायचे नाही.
२) जिवंतपणी सर्व काही
दान करून आपला मोह नष्ट करायचा आहे. पूर्ण विल करून ट्रस्टी बनून हलके रहायचे आहे.
देही-अभिमानी बनून सर्व दैवी गुण धारण करायचे आहेत.
वरदान:-
भिन्नतेला
नाहीसे करून एकता आणणारे सच्चे सेवाधारी भव
ब्राह्मण परिवाराची
विशेषता आहे अनेक असताना देखील एक. तुमच्या एकते द्वारेच संपूर्ण विश्वामध्ये एक
धर्म, एका राज्याची स्थापना होते म्हणून विशेष अटेंशन देऊन भिन्नतेला संपवा आणि
एकतेला आणा तेव्हा म्हणणार सच्चे सेवाधारी. सेवाधारी स्वतः प्रति नाही परंतु
सेवेप्रती असतात. स्वतःचे सर्व काही सेवे प्रति स्वाहा करतात, ज्याप्रमाणे साकार
बाबांनी सेवेमध्ये हाडे देखील स्वाहा केली तशी तुमच्या प्रत्येक कर्मेंद्रियाद्वारे
सेवा होत राहावी.
बोधवाक्य:-
परमात्म
प्रेमामध्ये हरवून जा म्हणजे दुःखाची दुनिया विसरून जाल.
अव्यक्त इशारे -
“कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना” नेहमी लक्षात ठेवा की, आपण कंबाइंड
होतो, कंबाइंड आहोत आणि कंबाइंड राहणार. कोणाची ताकद नाही जे अनेक वेळच्या कंबाइंड
स्वरूपाला वेगळे करू शकतील. प्रेमाची निशाणी आहे कंबाइंड राहणे. ही आत्मा आणि
परमात्म्याची सोबत आहे. परमात्मा कुठेही सोबत निभावतात आणि प्रत्येकाशी कंबाइंड
रुपामध्ये प्रीतीची रीत निभावणारे आहेत.