11-05-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   07.03.2005  ओम शान्ति   मधुबन


“संपूर्ण पवित्रतेचे व्रत घेणे आणि ‘मी’पणाला समर्पित करणे हेच शिवजयंती साजरी करणे आहे”


आज विशेष शिवबाबा आपल्या शाळीग्राम मुलांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहेत. तुम्ही मुले बाबांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आला आहात आणि बापदादा मुलांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहेत कारण बाबांचे मुलांवर खूप प्रेम आहे. बाबा अवतरित होताच यज्ञ रचतात आणि यज्ञामध्ये ब्राह्मणांशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही; म्हणून हा बर्थ डे अलौकिक आहे, वेगळा आणि सुंदर आहे. असा वडिलांचा आणि मुलांचा एकत्र बर्थ डे असेल असे साऱ्या कल्पामध्ये ना झाले आहे आणि ना कधी होऊ शकणार. बाबा आहेत निराकार, एका बाजूला निराकार आहेत आणि दुसऱ्या बाजूला जन्म साजरा करतात. एकच शिवबाबा आहेत ज्यांना आपले स्वतःचे शरीर नसते म्हणून ब्रह्माबाबांच्या तनामध्ये अवतरित होतात, हे अवतरित होणेच जयंतीच्या रूपामध्ये साजरे करतात. तर तुम्ही सर्व बाबांचा जन्म दिवस साजरा करण्यासाठी आला आहात की स्वतःचा साजरा करण्यासाठी आला आहात? मुबारक देण्यासाठी आला आहात की मुबारक घेण्यासाठी आले आहात? हे सोबत एकत्र राहण्याचे वचन बाबांचे मुलांसोबत आहे. आता देखील संगमावर कंबाइंड सोबत आहेत, अवतरण सुद्धा सोबत आहे, परिवर्तन करण्याचे कार्य सुद्धा सोबत आहे आणि घरी परमधाममध्ये जाण्यासाठी देखील एकत्र सोबत आहेत. हे आहे बाबा आणि मुलांच्या प्रेमाचे स्वरूप.

शिवजयंती भक्त देखील साजरी करतात परंतु ते फक्त बोलावतात, गाणी गातात. तुम्ही बोलावत नाही, तुमचे साजरे करणे अर्थात समान बनणे. साजरे करणे अर्थात सदैव उमंग-उत्साहामध्ये उडत राहणे म्हणून याला उत्सव म्हणतात. उत्सवाचा अर्थच आहे उत्साहामध्ये रहाणे. तर सदैव उत्सव अर्थात उत्साहामध्ये रहाणारे आहात ना! सदैव असता की कधी-कधी असता? तसे पहायला गेले तर ब्राह्मण जीवनाचा श्वासच आहे - उमंग-उत्साह. जसे श्वासा शिवाय राहू शकत नाही, तसे ब्राह्मण आत्मे उमंग-उत्साहाशिवाय ब्राह्मण जीवनामध्ये राहू शकत नाहीत. असा अनुभव करता ना? बघा, विशेष जयंती साजरी करण्यासाठी कुठून-कुठून, दूरदूरहून धावत-पळत आले आहेत. बापदादांना आपल्या जन्म दिवसाची इतकी खुशी नाही आहे जितकी मुलांच्या जन्म दिवसाची आहे म्हणून बापदादा प्रत्येक मुलाला पद्मगुणा खुशीच्या थाळ्या भरभरुन मुबारक देत आहेत. मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो.

बापदादांना आजच्या दिवशी खऱ्या भक्तांची सुध्दा खूप आठवण येत आहे. ते व्रत करतात एका दिवसाचे आणि तुम्ही व्रत घेतले आहे जीवनभर संपूर्ण पवित्र बनण्याचे. ते खाण्याचे व्रत घेतात, तुम्ही देखील मनाचे भोजन - व्यर्थ संकल्प, निगेटिव्ह संकल्प, अपवित्र संकल्पांचे व्रत घेतले आहे. पक्के व्रत घेतले आहे ना? हे डबल फॉरेनर्स समोर पुढे बसले आहेत. हे कुमारांनो सांगा बरें, कुमारांनी व्रत घेतले आहे, पक्के? कच्चे नाही. माया ऐकत आहे. सर्वजण झेंडे हलवत आहात ना, तर माया बघत आहे झेंडे हलवत आहेत. जेव्हा व्रत घेता - पवित्र बनायचेच आहे, तर व्रत घेणे अर्थात श्रेष्ठ वृत्ती बनविणे. तर जशी वृत्ती असते तशीच दृष्टी, कृती आपोआपच बनते. तर असे व्रत घेतले आहे ना? पवित्र शुभ वृत्ती, पवित्र शुभ दृष्टी, जेव्हा एकमेकांना बघता तेव्हा काय बघता? चेहऱ्याला बघता की भृकुटीच्या मध्यभागी चमकत असलेल्या आत्म्याला बघता? एका मुलाने म्हटले की, ‘जेव्हा बोलायचे असते, काम करायचे असते तेव्हा चेहऱ्याकडे बघूनच बोलावे लागते, डोळ्यांकडेच नजर जाते, त्यामुळे कधी-कधी चेहऱ्याला पाहून थोडी वृत्ती बदलते’. बापदादा म्हणतात - डोळ्यांच्या सोबत भृकुटी देखील आहे, तर भृकुटीच्या मध्यभागी आत्म्याला पाहून बोलू शकत नाही! आता बापदादा समोर बसलेल्या मुलांच्या डोळ्यामध्ये बघत आहेत की भृकुटीमध्ये बघत आहेत, काही समजून येते का? एकत्रच तर आहेत. तर चेहऱ्याला बघा परंतु चेहऱ्यावर भृकुटीमध्ये चमकत असलेला तारा बघा. तर हे व्रत घ्या, घेतले आहे परंतु आणखी अटेंशन द्या. आत्म्याला बघत बोलायचे आहे, आत्मा आत्म्याशी बोलत आहे. आत्मा बघत आहे. तर वृत्ती सदैव शुभ राहील आणि त्याच सोबत दुसरा फायदा हा आहे की जशी वृत्ती तसे वायुमंडळ बनते. वायुमंडळ श्रेष्ठ बनविल्यामुळे स्वतःच्या पुरुषार्थासोबत सेवा देखील होते. तर डबल फायदा आहे ना! अशी आपली श्रेष्ठ वृत्ती बनवा ज्यामुळे कसाही विकारी, पतित तुमच्या वृत्तीच्या वायुमंडळाने परिवर्तित होईल. असे व्रत सदैव स्मृतीमध्ये असावे, स्वरूपामध्ये असावे.

आजकाल बापदादांनी मुलांचा चार्ट बघितला, आपल्या वृत्तीने वायुमंडळ बनविण्या ऐवजी कुठे-कुठे, कधी-कधी दुसऱ्यांच्या वायुमंडळाचा प्रभाव पडतो. कारण काय असते? मुले रुहरिहानमध्ये खूप गोड-गोड गोष्टी करतात, म्हणतात - ‘यांची विशेषता चांगली वाटते, यांचा सहयोग खूप चांगला मिळतो’; परंतु विशेषता ईश्वराची देणगी आहे. ब्राह्मण जीवनामध्ये जी काही प्राप्ती आहे, जी काही विशेषता आहे, सर्व प्रभु प्रसाद आहे, प्रभूचे देणे आहे. तर दात्याला विसरुन, घेणाऱ्याला आठवायचे…! प्रसाद कधी कोणाचा पर्सनल गायला जात नाही, ‘प्रभु प्रसाद’ म्हटले जाते. अमक्याचा प्रसाद असे म्हटले जात नाही. सहयोग मिळतो, चांगली गोष्ट आहे परंतु सहयोग देणाऱ्या दात्याला विसरू नका ना! तर पक्के-पक्के बर्थ डे चे व्रत घेतले आहे का? वृत्ती बदलली आहे का? संपूर्ण पवित्रता, हे खरे-खरे व्रत घ्या अथवा प्रतिज्ञा करा. चेक करा - मोठ्या-मोठ्या विकारांचे व्रत तर घेतले आहे परंतु छोट्या-छोट्या त्यांच्या मुला-बाळांपासून मुक्त आहात? तसेही पहा जीवनामध्ये प्रवृत्तीवाल्यांचे आपल्या मुलांपेक्षाही नातवंडांवर जास्त प्रेम असते. मातांचे प्रेम असते ना. तर मोठ्या रूपामध्ये तर जिंकले आहे परंतु छोट्या-छोट्या सूक्ष्म स्वरुपामध्ये वार तर करत नाहीत ना? जसे बरेचजण म्हणतात - आसक्ती नाहीये परंतु चांगले वाटते. ही वस्तू जास्त आवडते परंतु आसक्ती नाहीये. विशेष चांगली का वाटते? तर चेक करा छोट्या-छोट्या रुपामध्ये देखील अपवित्रतेचा अंश तर राहिलेला नाही ना? कारण अंशा मधून कधीही वंश जन्म घेऊ शकतो. कोणताही विकार भले छोट्या रुपामध्ये, नाही तर मोठ्या रुपामध्ये येण्यासाठी निमित्त एका शब्दाचा भाव आहे, तो एक शब्द आहे - “मी”. बॉडी-कॉन्शस वाला ‘मी’. या एका ‘मी’ शब्दामुळे अभिमानही येतो आणि जर अभिमान पूर्ण नाही झाला तर क्रोध देखील येतो कारण अभिमानाची निशाणी आहे - तो आपल्यासाठी अपमानास्पद एक शब्द देखील सहन करू शकत नाही, म्हणून क्रोध येतो. तर भक्त तर बळी देतात परंतु तुम्ही आजच्या दिवशी जो काही हदचा ‘मी’पणा असेल, तो बाबांना देऊन समर्पित करा. असा विचार करु नका की, करायचे तर आहे, बनायचे तर आहे… ‘तर-तर’ करु नका. समर्थ आहात आणि समर्थ बनून समाप्ती करा. ही काही नवीन गोष्ट नाहीये, किती कल्प, किती वेळा संपूर्ण बनला आहात, लक्षात आहे? काही नवीन गोष्ट नाहीये. कल्प-कल्प बनला आहात, बनलेले बनत आहे, फक्त रिपीट करायचे आहे. बनलेल्याला बनवायचे आहे, म्हणून म्हटले जाते - पूर्वनियोजित ड्रामा. बनलेला तयार आहे फक्त आता रिपीट करायचा अर्थात बनवायचा आहे. काही अवघड आहे की सोपे आहे? बापदादा समजतात संगमयुगाचे वरदान आहे - सहज पुरुषार्थ. या जन्मामध्ये सहज पुरुषार्थाच्या वरदानाद्वारे २१ जन्म सहज जीवन स्वतःच प्राप्त होईल. बापदादा प्रत्येक मुलाला मेहनतीपासून मुक्त करण्यासाठी आले आहेत. ६३ जन्म मेहनत केली, एक जन्म परमात्म प्रेम, प्रेमाने मेहनती पासून मुक्त व्हा. जिथे प्रेम आहे तिथे मेहनत नाही, जिथे मेहनत आहे तिथे प्रेम नाही. तर बापदादा ‘सहज पुरुषार्थी भव’चे वरदान देत आहेत आणि मुक्त होण्याचे साधन आहे - प्रेम, बाबांवर हृदयापासून प्रेम. प्रेमामध्ये लवलीन आणि महायंत्र आहे - मनमनाभवचा मंत्र. तर यंत्राला कामामध्ये वापरा. कामामध्ये वापरता तर येते ना! बापदादांनी बघितले संगमयुगामध्ये परमात्म प्रेमाद्वारे, बापदादांद्वारे किती शक्ती मिळाल्या आहेत, गुण मिळाले आहेत, ज्ञान मिळाले आहे, आनंद मिळाला आहे, या सर्व प्रभूच्या देणगींना, खजिन्यांना वेळेवर कार्यामध्ये वापरा.

तर बापदादा काय इच्छितात, ऐकले? प्रत्येक मुलगा सहज पुरुषार्थी, सहज देखील आणि शक्तिशाली देखील. दृढतेला युज करा. बनायचेच आहे, आम्ही नाही बनणार तर कोण बनणार. आम्हीच होतो, आम्हीच आहोत आणि प्रत्येक कल्प आम्हीच असणार. इतका दृढ निश्चय स्वतःमध्ये धारण करायचाच आहे. ‘करु’, असे फक्त म्हणायचे नाही, करायचेच आहे. होणारच आहे. झालेलेच आहे.

बापदादा देश विदेशच्या मुलांना पाहून खुश आहेत. परंतु तुम्हा समोर बसलेल्यांनाच फक्त बघत नाहीत, तर चोहो बाजूंच्या देश आणि विदेशच्या मुलांना बघत आहेत. विविध ठिकाणाहून मेजॉरिटी बर्थडेच्या शुभेच्छा आल्या आहेत, कार्ड देखील मिळाली आहेत, ई-मेल सुद्धा मिळाली आहेत, अंतःकरणातील संकल्प सुद्धा मिळाला आहे. बाबा देखील मुलांची गाणी गातात, तुम्ही लोक गाणे गाता ना - ‘बाबा आपने कर दी कमाल’, तर बाबा सुद्धा गाणे गातात - ‘मीठे बच्चों ने कर दी कमाल’. बापदादा नेहमी म्हणतात की, तुम्ही तर सन्मुख बसला आहात परंतु दूर असणारे देखील बापदादांच्या हृदय सिंहासनावर बसले आहेत. आज चोहो बाजूला मुलांच्या संकल्पामध्ये आहे - मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. बापदादांच्या कानामध्ये आवाज पोहोचत आहे आणि मनामध्ये संकल्प पोहोचत आहे. हे कार्ड केवळ एक निमित्त आहे, पत्र आहे परंतु खूप मोठ्या हिऱ्यापेक्षाही जास्त मौल्यवान गिफ्ट आहे. सर्व ऐकत आहेत, हर्षित होत आहेत. तर सर्वांनी आपला बर्थ डे साजरा केला. भले दोन वर्षाचा असो, एक वर्षाचा असो, किंवा अगदी एका आठवड्याचा असो, परंतु यज्ञाच्या स्थापनेचा बर्थ डे आहे. तर तुम्ही सर्व ब्राह्मण यज्ञ निवासी तर आहातच, म्हणून सर्व मुलांना खूप-खूप हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण सुद्धा आहे, आशीर्वाद सुद्धा आहेत, सदैव आशीर्वादांमध्येच वाढत रहा, उडत रहा. आशीर्वाद देणे आणि घेणे सोपे आहे ना! सोपे आहे? जे समजतात सोपे आहे, त्यांनी हात वर करा. झेंडे हलवा. मग आशीर्वाद सोडत तर नाही ना? सर्वात सोपा पुरुषार्थ हाच आहे - आशीर्वाद देणे, आशीर्वाद घेणे. यामध्ये योग सुद्धा येतो, ज्ञान सुद्धा येते, धारणा सुद्धा येते, सेवा सुद्धा येते. आशीर्वाद देणे आणि घेणे यामध्ये चारही सब्जेक्ट येतात.

तर डबल फॉरेनर्स आशीर्वाद देणे आणि घेणे सोपे आहे ना! सोपे आहे? २० वर्ष झालेले जे आले आहेत त्यांनी हात उंच करा. तुम्हाला तर २० वर्षे झाली आहेत परंतु बापदादा तुम्हा सर्वांना पद्म गुणा मुबारक देत आहेत. किती देशांमधून आले आहेत? (६९ देशांमधून) मुबारक असो. ६९ वा बर्थ डे साजरा करण्यासाठी ६९ देशांमधून आले आहेत. किती छान आहे. येताना काही त्रास तर नाही झाला ना. सहज आलात ना! जिथे प्रेम असते तिथे कोणतीही मेहनत नसते. तर आजचे विशेष कोणते वरदान लक्षात ठेवाल? ‘सहज पुरुषार्थी’. सोपे काम नेहमीच खूप लवकर पूर्ण होते. कष्टाचे काम अवघड असते ना त्यामुळे वेळ लागतो. तर सर्वजण कोण आहात? सहज पुरुषार्थी. बोला, लक्षात ठेवा. आपल्या देशामध्ये जाऊन मेहनत करायला लागू नका. एखादे कोणते कष्टाचे काम आले जरी तरीही मनापासून म्हणा - ‘बाबा, मेरा बाबा’, म्हणजे मेहनत संपेल. अच्छा. साजरा केलात ना! बाबांनी देखील साजरा केला, तुम्ही सुद्धा साजरा केलात. अच्छा.

आता एक सेकंदामध्ये ड्रिल करू शकता? करू शकता ना! अच्छा. (बापदादांनी ड्रिल करून घेतली)

चोहो बाजूच्या सदैव उमंग-उत्साहामध्ये राहणाऱ्या श्रेष्ठ मुलांना, सदैव सहज पुरुषार्थी संगमयुगातील सर्व वरदानी मुलांना, सदैव बाबा आणि मी आत्मा या स्मृतीने ‘मी’ बोलणाऱ्या, मी आत्मा, सदैव सर्व आत्म्यांना आपल्या वृत्तीने वायुमंडळाला सहयोग देणाऱ्या अशा मास्टर सर्वशक्तिवान मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, आशीर्वाद, मुबारक आणि नमस्ते.

डबलविदेशी मोठ्या बहिणींसोबत संवाद:- सर्वांनी मेहनत चांगली केली आहे. स्वतंत्र ग्रुप बनवले आहेत ना तर मेहनत चांगली केली आहे. आणि इथे वायुमंडळ देखील चांगले आहे, संघटनची सुद्धा शक्ती आहे, तर सर्वांना रिफ्रेशमेंट चांगली मिळते आणि तुम्ही निमित्त बनता. छान आहे. दूर-दूर राहतात ना, तर संघटनची जी शक्ती असते ती सुद्धा खूप चांगली आहे. एवढा सगळा परिवार एकत्र होतो तर प्रत्येकाच्या विशेषतेचा प्रभाव तर पडतोच. प्लॅन चांगला बनवला आहे. बापदादा खुश आहेत. सर्वांचा सुगंध तुम्ही घेता. ते खुश होतात आणि तुम्हाला आशीर्वाद मिळतात. चांगले आहे, हे जे सर्व एकत्र येता हे खूप चांगले आहे, आपसात देणे-घेणे देखील होते आणि रिफ्रेशमेंट सुद्धा होते. एकमेकांची विशेषता जी चांगली वाटते, त्याला यूज करता, यामुळे संघटन चांगले बनते. हे ठीक आहे.

सेंटर निवासी भाऊ-बहिणींसोबत संवाद:- (सगळे बॅनर दाखवत आहेत, त्यावर लिहिले आहे - प्रेम आणि दयेची ज्योत जागृत ठेवू) खूप चांगला संकल्प घेतला आहे. स्वतःवरही दया दृष्टी, साथीदारांवर देखील दया दृष्टी आणि सर्वांवर सुद्धा दया दृष्टी. ईश्वरीय प्रेम एक चुंबक आहे, तर तुमच्यापाशी ईश्वरीय प्रेमाचे चुंबक आहे. कोणत्याही आत्म्याला ईश्वरीय प्रेमाच्या चुंबकाने बाबांचे बनवू शकता. बापदादा सेंटरवर राहणाऱ्यांना विशेष अंतःकरणापासूनचे आशीर्वाद देत आहेत, जे तुम्हा सर्वांनी विश्वामध्ये नाव मोठे केले आहे. कानाकोपऱ्यामध्ये ब्रह्माकुमारीजचे नाव तर पसरवले आहे ना! आणि बापदादांना खूप चांगली गोष्ट ही वाटते की, जसे डबल विदेशी आहात, तसे डबल जॉब करणारे आहात. मेजॉरिटी लौकिक जॉब देखील करतात तर अलौकिक जॉब देखील करतात आणि बापदादा बघत असतात, बापदादांचा टी.व्ही. खूप मोठा आहे, असा मोठा टी.व्ही. इथे नाहीये. तर बापदादा बघत असतात की, कसे फटाफट क्लास करतात, उभ्या-उभ्याच नाष्टा करतात, ऑफिसला वेळेवर पोहोचतात, कमाल करतात. बापदादा हे बघत असताना हृदयापासून प्रेम देत राहतात. खूप छान, सेवेच्या निमित्त बनला आहात आणि निमित्त बनण्याची गिफ्ट म्हणून बाबा सदैव विशेष दृष्टी देत राहतात. खूप चांगले लक्ष्य ठेवले आहे, छान आहात, छानच रहाल, आणि इतरांनाही छान बनवाल. अच्छा.

वरदान:-
सर्व खजिन्यांच्या इकॉनॉमीचे (बचतीचे) बजेट बनविणारे सूक्ष्म पुरुषार्थी भव जसे लौकिक दृष्ट्या जर एखादे घर इकॉनॉमीवाले नसेल (बचत करणारे नसेल) तर ते घर चांगल्या प्रकारे चालू शकत नाही. असे जर निमित्त बनलेली मुले इकॉनॉमीवाली नसतील (बचत करणारी नसतील) तर सेंटर ठीक चालत नाही. ती झाली हदची प्रवृत्ती, ही आहे बेहदची प्रवृत्ती. तर चेक करायला हवे की, संकल्प, बोल आणि शक्तींमध्ये काय-काय एक्स्ट्रा खर्च केले? जे सर्व खजिन्यांच्या इकॉनॉमीचे बजेट बनवून त्यानुसार चालतात त्यांनाच ‘सूक्ष्म पुरुषार्थी’ म्हटले जाते. त्यांचे संकल्प, बोल, कर्म आणि ज्ञानाच्या शक्ती काहीही व्यर्थ जाऊ शकत नाही.

सुविचार:-
स्नेहाच्या खजिन्याने मालामाल बनून सर्वांना स्नेह द्या आणि स्नेह घ्या.

अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- पवित्रतेची शक्ती परमपूज्य बनविते. पवित्रतेच्या शक्तीने या पतित दुनियेला परिवर्तीत करता. पवित्रतेची शक्ती विकारांच्या अग्निमध्ये पोळत असणाऱ्या आत्म्यांना शीतल बनवते, आत्म्याला अनेक जन्मांतील विकर्मांच्या बंधनातून सोडवते. पवित्रतेच्या आधारावर द्वापरपासून ही सृष्टी थोडी-बहुत तरलेली आहे. याच्या महत्वाला जाणून पवित्रतेच्या लाइटचा क्राऊन धारण करा.