11-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - संगमयुगावर तुम्ही ब्राह्मण संप्रदायाचे बनला आहात, तुम्हाला आता
मृत्यूलोकातील मनुष्या पासून देवता बनायचे आहे”
प्रश्न:-
तुम्ही मुले
कोणत्या नॉलेजला समजल्यामुळे बेहदचा संन्यास करता?
उत्तर:-
तुम्हाला ड्रामाचे यथार्थ नॉलेज आहे, तुम्ही जाणता ड्रामा अनुसार आता या संपूर्ण
मृत्यूलोकला भस्मीभूत व्हायचे आहे. आता ही दुनिया वर्थ नॉट ए पेनी बनली आहे,
आपल्याला वर्थ पाउण्ड बनायचे आहे. मध्ये जे काही होते ते पुन्हा कल्पानंतर हुबेहूब
रिपीट होईल म्हणून तुम्ही या संपूर्ण दुनियेपासून बेहदचा संन्यास घेतला आहे
गीत:-
आने वाले कल
की तुम…
ओम शांती।
मुलांनी गाण्याची लाईन ऐकली. अमरलोक येणार आहे, हे आहे मृत्यूलोक. अमरलोक आणि
मृत्यूलोक मधील हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. आता संगमयुगामध्ये बाबा शिकवत आहेत,
आत्म्यांना शिकवत आहेत म्हणून मुलांना सांगतात आत्म-अभिमानी होऊन बसा. हा निश्चय
करायचा आहे की, आपल्याला बेहदचे बाबा शिकवत आहेत. आपले एम ऑब्जेक्ट हे आहे -
लक्ष्मी-नारायण; या मृत्यूलोकच्या मनुष्यापासून अमरलोकचे देवता बनणे आहे. असे
शिक्षण तर ना कधी कानांनी ऐकले, ना कोणाला सांगताना पाहिले जे म्हणतील की,
‘मुलांनो, तुम्ही आत्म-अभिमानी होऊन बसा’. हा निश्चय करा की बेहदचे बाबा आपल्याला
शिकवत आहेत. कोणते पिता? बेहदचे पिता निराकार शिवबाबा. आता तुम्ही समजता आपण
पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत. आता तुम्ही ब्राह्मण संप्रदायाचे बनले आहात नंतर मग
तुम्हाला देवता बनायचे आहे. अगोदर शूद्र संप्रदायाचे होता. बाबा येऊन पत्थर-बुद्धी
पासून पारस-बुद्धी बनवत आहेत. पहिले सतोप्रधान पारस-बुद्धी होता, आता पुन्हा बनत
आहात. असे म्हणता कामा नये की सतयुगाचे मालक होतो. सतयुगामध्ये विश्वाचे मालक होतो.
मग ८४ जन्म घेऊन शिडी उतरत-उतरत सतोप्रधानापासून सतो, रजो, तमोमध्ये आलो आहोत. पहिले
सतोप्रधान होतो तेव्हा पारस-बुद्धी होतो नंतर मग आत्म्यामध्ये खाद (भेसळ) पडते.
मनुष्य समजत नाहीत. बाबा म्हणतात - तुम्हाला काहीच ठाऊक नव्हते. ब्लाइंड फेथ (अंध-विश्वास)
होता. कोणाला जाणल्या शिवाय एखाद्याची पूजा करणे किंवा आठवण करणे त्याला ब्लाइंड
फेथ (अंध-विश्वास) म्हटले जाते. आणि आपल्या श्रेष्ठ धर्माला, श्रेष्ठ कर्माला देखील
विसरल्यामुळे ते कर्म-भ्रष्ट, धर्म-भ्रष्ट बनतात. भारतवासी यावेळी दैवी धर्मापेक्षा
सुद्धा भ्रष्ट बनले आहेत. बाबा समजावून सांगत आहेत वास्तविक तुम्ही आहात प्रवृत्ती
मार्गवाले. तिथे देवता जेव्हा अपवित्र बनतात तेव्हा देवी-देवता म्हणू शकत नाही;
म्हणून मग नाव बदलून हिंदू धर्म असे ठेवले आहे. हे देखील होते ड्रामा प्लॅन अनुसार.
सर्वजण एका बाबांनाच बोलावतात - हे पतित-पावन या. ते एकच गॉड फादर आहेत जे जन्म-मरण
रहित आहेत. असे नाही की नावा-रूपा पासून वेगळी कोणती वस्तू आहे. आत्म्याचे किंवा
परमात्म्याचे रूप अति सूक्ष्म आहे, ज्याला स्टार किंवा बिंदू म्हणतात. शिवाची पूजा
करतात, शरीर काही नाही आहे. आता आत्मा बिंदूची पूजा होऊ शकत नाही म्हणून त्याला
पुजण्याकरिता मोठ्या रूपामध्ये बनवतात. समजतात शिवाची पूजा करत आहोत. परंतु त्यांचे
रूप काय आहे, ते काही जाणत नाहीत. या सर्व गोष्टी बाबा यावेळीच येऊन समजावून
सांगतात. बाबा म्हणतात - तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही. ८४ लाख योनींची तर एक
थाप मारली आहे. आता बाबा तुम्हा मुलांना बसून समजावून सांगत आहेत. आता तुम्ही
ब्राह्मण बनले आहात नंतर मग देवता बनायचे आहे. कलियुगी मनुष्य आहेत शूद्र. तुम्हा
ब्राह्मणांचे एम ऑब्जेक्ट आहे मनुष्या पासून देवता बनण्याचे. हा मृत्यूलोक पतित
दुनिया आहे. नवीन दुनिया ती होती, जिथे हे देवी-देवता राज्य करत होते. यांचेच एक
राज्य होते. ते संपूर्ण विश्वाचे मालक होते. आता तर तमोप्रधान दुनिया आहे. अनेक
धर्म आहेत. हा देवी-देवता धर्म प्राय: लोप झाला आहे. देवी-देवतांचे राज्य कधी होते,
किती काळ चालले, हा जगाचा इतिहास-भूगोल कोणीही जाणत नाही. बाबाच येऊन तुम्हाला
समजावून सांगतात. ही आहे गॉड फादरली वर्ल्ड युनिव्हर्सिटी (ईश्वरीय विश्व विद्यालय),
ज्याचे एम ऑब्जेक्ट आहे - अमरलोकचे देवता बनविणे. याला अमर कथा देखील म्हटले जाते.
तुम्ही या नॉलेज द्वारे देवता बनून काळावर विजय प्राप्त करता. तिथे काळ कधी खाऊ शकत
नाही. मृत्यूचे तिथे नावच नाही. आता तुम्ही ड्रामा प्लॅन अनुसार काळावर विजय
प्राप्त करत आहात. भारतवासी देखील ५ वर्षांचा किंवा १० वर्षांचा प्लॅन बनवतात ना.
समजतात आपण राम-राज्य स्थापन करत आहोत. बेहदच्या बाबांचा देखील प्लॅन आहे -
राम-राज्य बनविण्याचा. ते तर सर्व आहेत मनुष्य. मनुष्य काही राम-राज्य स्थापन करू
शकणार नाहीत. राम-राज्य म्हटलेच जाते सतयुगाला. या गोष्टींना कोणी जाणतच नाही.
मनुष्य किती भक्ती करतात, भौतिक यात्रा करतात. दिवस अर्थात सतयुग-त्रेतामध्ये या
देवतांचे राज्य होते. मग रात्रीमध्ये भक्तीमार्ग सुरू होतो. सतयुगामध्ये भक्ती नसते.
ज्ञान, भक्ती, वैराग्य हे बाबाच समजावून सांगतात. वैराग्य दोन प्रकारचे आहे - एक आहे
हठयोगी निवृत्ती मार्ग वाल्यांचे, ते घरदार सोडून जंगलामध्ये जातात. आता तुम्हाला
तर साऱ्या मृत्यूलोकाचा बेहदचा संन्यास करायचा आहे. बाबा म्हणतात - ही सारी दुनिया
भस्मीभूत होणार आहे. ड्रामाला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहे. ऊवे प्रमाणे
टिक-टिक होत राहते. जे काही होते कल्प ५ हजार वर्षानंतर हुबेहूब रिपीट होईल. याला
खूप चांगल्या रीतीने समजून बेहदचा संन्यास करायचा आहे. समजा कोणी परदेशात जातात तर
विचारतात - आम्ही हे नॉलेज तिथे शिकू शकतो का? बाबा म्हणतात - हो, कुठेही राहून
तुम्ही हे ज्ञान शिकू शकता. यासाठी पहिले ७ दिवसांचा कोर्स करावा लागतो. खूप सोपा
आहे, आत्म्याला फक्त एवढेच समजून घ्यायचे आहे - आपण सतोप्रधान विश्वाचे मालक होतो
तेव्हा सतोप्रधान होतो. आता तमोप्रधान बनलो आहोत. ८४ जन्मांमध्ये अगदीच वर्थ नॉट ए
पेनी (कवडीमोल) बनलो आहोत. आता पुन्हा आपण पाउंड (हिरेतुल्य) कसे बनू शकतो? आता
कलियुग आहे नंतर मग जरूर सतयुग येणार आहे, बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून
सांगतात; ७ दिवसांचा कोर्स समजून घ्यायचा आहे. कसे आपण सतोप्रधानापासून तमोप्रधान
बनलो आहोत. काम-चितेवर बसून तमोप्रधान बनलो आहोत. आता पुन्हा ज्ञान चितेवर बसून
सतोप्रधान बनायचे आहे. वर्ल्डचा इतिहास-भूगोल रिपीट होत आहे, चक्र फिरत राहते ना.
आता आहे संगमयुग मग सतयुग असेल. आता आपण कलियुगी विशश (विकारी) बनलो आहोत, मग आता
पुन्हा सतयुगी वाईसलेस (निर्विकारी) कसे बनावे? त्यासाठी बाबा रस्ता सांगतात.
बोलावतात देखील - आमच्यामध्ये कोणतेही गुण नाहीत. आता आम्हाला असे गुणवान बनवा. जे
कल्पा पूर्वी बनले होते त्यांनाच पुन्हा बनायचे आहे. बाबा समजावून सांगत आहेत -
सर्वात आधी स्वतःला आत्मा तर समजा. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. आता तुम्हाला
देही-अभिमानी बनायचे आहे. आता यावेळीच तुम्हाला देही-अभिमानी बनण्याचे शिक्षण मिळते.
असे नाही तुम्ही सदैव देही-अभिमानी रहाल. नाही, सतयुगामध्ये तर शरीराची नावे असतात.
लक्ष्मी-नारायणाच्या नावानेच सर्व कारभार चालतो. आता हे आहे संगमयुग जेव्हा की बाबा
समजावून सांगत आहेत. तुम्ही नंगे (अशरीरी) आला होता. पुन्हा अशरीरी बनून परत जायचे
आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. ही आहे रूहानी यात्रा. आत्मा आपल्या
रूहानी पित्याची आठवण करते. बाबांची आठवण केल्यानेच पापे भस्म होतील. याला योग-अग्नी
म्हटले जाते. आठवण तर तुम्ही कुठेही करू शकता. ७ दिवसांमध्ये समजावून सांगायचे आहे.
हे सृष्टी चक्र कसे फिरते, कसे आपण शिडी उतरतो? आता पुन्हा या एकाच जन्मामध्ये चढती
कला होते. परदेशामध्ये मुले राहतात, तिथे देखील मुरली जाते. हे स्कूल आहे ना.
वास्तविक ही आहे गॉड फादरली युनिव्हर्सिटी. गीतेचाच राजयोग आहे. परंतु श्रीकृष्णाला
भगवान म्हटले जात नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकराला देखील देवता म्हटले जाते. आता
तुम्ही पुरुषार्थ करून पुन्हा सो देवता बनता. प्रजापिता ब्रह्मा देखील जरूर इथेच
असेल ना. प्रजापिता तर मनुष्य आहे ना. प्रजा जरूर इथेच रचली जाते. ‘हम सो’चा अर्थ
बाबांनी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. भक्ती मार्गामध्ये तर म्हणतात -
‘हम आत्मा सो परमात्मा’, म्हणून परमात्म्याला सर्वव्यापी म्हणतात. बाबा सांगतात -
सर्वांमध्ये व्याप्त आहे आत्मा. मी कसा व्यापक असेन? तुम्ही मला बोलावता - ‘हे
पतित-पावन या, आम्हाला पावन बनवा’. सर्व निराकार आत्मे येऊन आपापला रथ घेतात (शरीर
घेतात). प्रत्येक अकालमूर्त आत्म्याचे हे तख्त आहे. तख्त म्हणा नाहीतर रथ म्हणा.
बाबांना काही रथ नाही आहे. ते निराकारच गायले जातात. त्यांना ना सूक्ष्म शरीर आहे,
ना स्थूल शरीर आहे. निराकार स्वतः रथामध्ये जेव्हा बसतील तेव्हा बोलू शकतील. रथा
शिवाय पतितांना पावन कसे बनवतील? बाबा म्हणतात - मी निराकार येऊन यांचे (ब्रह्मा
बाबांचे शरीर) लोन घेतो. टेंपररी लोन घेतले आहे, याला भाग्यशाली रथ म्हटले जाते.
बाबाच सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य सांगून तुम्हा मुलांना त्रिकालदर्शी बनवतात.
हे नॉलेज इतर कोणताही मनुष्य जाणू शकत नाही. यावेळी सर्वजण नास्तिक आहेत. बाबा येऊन
आस्तिक बनवतात. रचयिता आणि रचनेचे रहस्य बाबांनीच तुम्हाला सांगितले आहे. आता
तुमच्याशिवाय इतर कोणीही हे ज्ञान समजावून सांगू शकत नाही. तुम्हीच या ज्ञाना द्वारे
मग हे इतके उच्च पद प्राप्त करता. हे ज्ञान फक्त आताच तुम्हा ब्राह्मणांना मिळते.
बाबा संगमावरच येऊन हे ज्ञान देतात. सद्गती देणारे एक बाबाच आहेत. मनुष्य मनुष्याला
सद्गती देऊ शकत नाही. हे सर्व गुरु आहेत भक्ती मार्गाचे. सद्गुरु एकच आहेत, त्यांना
म्हटले जाते - ‘वाह सद्गुरु वाह!’ याला पाठशाळा देखील म्हटले जाते. एम ऑब्जेक्ट नरा
पासून नारायण बनण्याचे आहे. त्या सर्व आहेत भक्ती मार्गाच्या कथा. गीतेद्वारे सुद्धा
काही कोणती प्राप्ती होत नाही. बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांना सन्मुख येऊन शिकवतो,
ज्याद्वारे तुम्ही हे पद प्राप्त करता. यामध्ये मुख्य आहे पवित्र बनण्याची गोष्ट.
बाबांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे. यामध्येच माया विघ्न टाकते. तुम्ही बाबांची
आठवण करता आपला वारसा प्राप्त करण्यासाठी. हे नॉलेज सर्व मुलांकडे जाते. कधीही मुरली
मिस होता कामा नये. मुरली मिस झाली अर्थात गैरहजेरी लागते. मुरली द्वारे कुठेही
राहून रिफ्रेश होत रहाल. श्रीमतावर चालावे लागेल. बाहेर गावी जातात तर बाबा म्हणतात
- पवित्र जरूर बनायचे आहे, वैष्णव होऊन रहायचे आहे. वैष्णव देखील दोन प्रकारचे
असतात, वैष्णव, वल्लभाचारी देखील असतात परंतु ते विकारामध्ये जातात. पवित्र तर
नाहीत. तुम्ही पवित्र बनून विष्णू-वंशी बनता. तिथे तुम्ही वैष्णव होऊन रहाल,
विकारामध्ये जाणार नाही. ते आहे अमरलोक, हे आहे मृत्युलोक. इथे विकारामध्ये जातात.
आता तुम्ही विष्णूपुरी मध्ये जाता, तिथे विकार नसतात. ती आहे निर्विकारी दुनिया.
योगबलाद्वारे तुम्ही विश्वाची बादशाही घेता. ते दोघेही आपसामध्ये भांडतात आणि
मधल्यामध्ये लोणी तुम्हाला मिळते. तुम्ही आपली राजधानी स्थापन करत आहात. सर्वांना
हाच संदेश द्यायचा आहे. छोट्या मुलांचा देखील अधिकार आहे. शिवबाबांची मुले आहेत ना.
तर सर्वांचा अधिकार आहे. सर्वांना सांगायचे आहे - स्वतःला आत्मा समजा. आई-वडिलांना
ज्ञान असेल तर मुलांना देखील शिकवतील - शिवबाबांची आठवण करा. शिवबाबांशिवाय दुसरे
कोणीच नाही. एकाच्याच आठवणी द्वारे तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. यासाठी अभ्यास
खूप चांगला पाहिजे. परदेशामध्ये राहून देखील तुम्ही शिकू शकता. यामध्ये पुस्तक
इत्यादीची कशाचीही गरज नाही. कुठेही राहून तुम्ही शिकू शकता. बुद्धीने आठवण करू शकता.
हे शिक्षण इतके सोपे आहे. योग अथवा आठवणी द्वारे बळ मिळते. तुम्ही आता विश्वाचे
मालक बनत आहात. बाबा राजयोग शिकवून पावन बनवत आहेत. तो आहे हठयोग, हा आहे राजयोग.
यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पथ्य पाहिजे. या लक्ष्मी-नारायणा सारखे सर्व गुण
संपन्न बनायचे आहे ना. खाण्या-पिण्याचे देखील पथ्य पाहिजे, आणि दुसरी गोष्ट बाबांची
आठवण करायची आहे तर जन्म-जन्मांतरीची पापे भस्म होतील. याला म्हटले जाते - सहज
राजयोग, राजाई प्राप्त करण्यासाठी. जर राजाई घेतली नाहीत तर गरीब बनाल. पूर्णत:
श्रीमतावर चालल्याने श्रेष्ठ बनाल. भ्रष्ट पासून श्रेष्ठ बनायचे आहे त्यासाठी
बाबांची आठवण करायची आहे. कल्पा पूर्वी देखील तुम्हीच हे ज्ञान घेतले होते, जे आता
पुन्हा घेत आहात. सतयुगामध्ये दुसरे कोणतेही राज्य नव्हते. त्याला म्हटले जाते -
सुखधाम. आता हे आहे दुःखधाम आणि जिथून आपण आत्मे आलो आहोत ते आहे - शांतीधाम.
शिवबाबांना आश्चर्य वाटते - दुनियेमध्ये माणसे काय-काय करत आहेत! मुलांचा जन्मदर कमी
होण्यासाठी देखील किती डोके फोड करत असतात (योजना आखत असतात). समजत नाहीत की हे तर
बाबांचेच काम आहे. बाबा लगेच एका धर्माची स्थापना करून बाकी सर्व अनेक धर्मांचा
विनाश करवतात, एका झटक्यात. ते लोक जन्मदर कमी करण्यासाठी किती औषधे इत्यादी शोधून
काढतात. बाबांकडे तर एकच औषध आहे. एका धर्माची स्थापना होणारच आहे. ती वेळ येईल
जेव्हा सर्वजण म्हणतील - हे तर पवित्र बनत आहेत. औषध इत्यादीची तरी काय गरज आहे.
तुम्हाला बाबांनी मनमनाभवचे असे औषध दिले आहे, ज्याद्वारे तुम्ही २१ जन्मांकरिता
पवित्र बनता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) पवित्र
बनून पक्का वैष्णव बनायचे आहे. खाण्या-पिण्याचे देखील पूर्ण पथ्य पाळायचे आहे.
श्रेष्ठ बनण्याकरिता श्रीमतावर जरूर चालायचे आहे.
२) मुरली द्वारे
स्वतःला रिफ्रेश करायचे आहे, कुठेही राहत असताना सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ
करायचा आहे. मुरली एकही दिवस चुकवायची नाही.
वरदान:-
स्व-कल्याणाच्या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे विश्व कल्याणाच्या सेवेमध्ये सदा सफलता
मूर्त भव
जसे आजकाल हार्ट फेलचा
शारीरिक रोग जास्त प्रमाणामध्ये आहे तसा अध्यात्मिक उन्नती मध्ये दिलशिकस्त होण्याचा
(हताश होण्याचा) रोग जास्त आहे. अशा हताश आत्म्यांमध्ये प्रत्यक्ष परिवर्तन
पाहिल्यानेच हिंमत अथवा शक्ती येऊ शकते. ऐकले तर पुष्कळ आहे परंतु आता पाहू
इच्छितात. प्रमाणा द्वारे (पुराव्या द्वारे) परिवर्तन हवे आहे. तर विश्व
कल्याणाकरिता पहिले स्व-कल्याण सॅम्पल रूपामध्ये दाखवा. विश्व कल्याणाच्या सेवेमध्ये
सफलता मुर्त बनवण्याचे साधनच आहे - प्रत्यक्ष पुरावा; याद्वारेच बाबांची प्रत्यक्षता
होईल. जे बोलता ते तुमच्या स्वरूपातून प्रत्यक्षामध्ये दिसून यावे तेव्हाच विश्वास
ठेवतील.
बोधवाक्य:-
दुसऱ्यांच्या
विचारांना आपल्या विचारांशी जुळवून घेणे - हाच रिगार्ड देणे आहे.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
कर्मातीत बनण्याकरिता
चेक करा - कर्माच्या बंधना पासून आपण कितपत न्यारे बनलो आहोत? लौकिक आणि अलौकिक,
कर्म आणि संबंध दोन्ही मध्ये स्वार्थ भावनेपासून मुक्त कितपत बनलो आहोत? जेव्हा
कर्मांच्या हिशोबा पासून किंवा कोणत्याही व्यर्थ स्वभाव-संस्काराच्या अधीन होण्या
पासून मुक्त व्हाल तेव्हा कर्मातीत स्थितीला प्राप्त करू शकाल. कोणतीही सेवा, संघटन,
प्रकृतीची परिस्थिती स्वस्थितीला किंवा श्रेष्ठ स्थितीला डळमळीत करू नये. या बंधना
पासून देखील मुक्त राहणे हीच कर्मातीत स्थितीची समीपता आहे.