12-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, ही कयामतची (महाविनाशाची) वेळ आहे, रावणाने सर्वांना कब्रदाखल केले आहे, बाबा आले आहेत अमृत वर्षा करून सोबत घेऊन जाण्यासाठी”

प्रश्न:-
शिवबाबांना भोला भंडारी देखील म्हटले जाते, ते का?

उत्तर:-
कारण शिव भोलानाथ जेव्हा येतात तेव्हा गणिका, अहिल्या, कुब्जांचे देखील कल्याण करून त्यांना विश्वाचा मालक बनवतात. येतात देखील बघा पतित दुनियेमध्ये आणि पतित शरीरामध्ये, तर भोळा झाला ना. भोळ्या बाबांचे डायरेक्शन आहे - गोड मुलांनो, आता अमृत प्या, विकार रुपी विषाला सोडा.

गीत:-
दूरदेश का रहने वाला…

ओम शांती।
रूहानी मुलांनी गाणे ऐकले अर्थात् आत्म्यांनी या शरीराच्या कान रूपी कर्मेंद्रियांद्वारे गाणे ऐकले. दूर देशाचे मुसाफिर (प्रवासी) येतात, तुम्ही देखील प्रवासी आहात ना. जे काही मनुष्य आत्मे आहेत ते सर्व प्रवासी आहेत. आत्म्यांचे कोणतेही स्थायी घर नसते. आत्मा निराकार आहे. निराकारी दुनियेमध्ये राहणारे निराकारी आत्मे आहेत. त्याला म्हटले जाते निराकारी आत्म्यांचे घर, देश अथवा लोक. याला जीव-आत्म्यांचा देश म्हटले जाते. तो आहे आत्म्यांचा देश आणि जेव्हा आत्मे इथे येऊन शरीरामध्ये प्रवेश करतात तेव्हा निराकारपासून साकार बनतात. असे नाही की आत्म्याचे कोणते रूपच नाहीये. रूप देखील जरूर आहे, नाव देखील आहे. इतकी छोटीशी आत्मा या शरीराद्वारे केवढा मोठा पार्ट बजावते. प्रत्येक आत्म्यामध्ये पार्ट बजावण्याचे केवढे मोठे रेकॉर्डिंग भरलेले आहे. जसे एकदा रेकॉर्ड भरले की मग कितीही वेळा रिपीट करा, तोच चालेल. तसेच आत्मा देखील या शरीरामध्ये एक रेकॉर्ड आहे, ज्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. जसे बाबा निराकार आहेत, तशीच आत्मा देखील निराकार आहे. काही-काही ठिकाणी शास्त्रांमध्ये लिहिले आहे की ते नावा-रूपा पासून न्यारे आहेत; परंतु नावा-रूपापासून न्यारी अशी कोणतीही वस्तू असत नाही. आकाश सुद्धा पोलार (पोकळ) आहे. परंतु नाव तर आहे ना “आकाश”. नावाशिवाय कोणतीही गोष्ट असत नाही. मनुष्य म्हणतात - परमपिता परमात्मा. आता दूर देशामध्ये तर सर्व आत्मे राहतात. हा साकार देश आहे, यामध्ये देखील दोघांचे राज्य चालते - राम-राज्य आणि रावण-राज्य. अर्धा कल्प आहे राम राज्य, अर्धा कल्प आहे रावण-राज्य. बाबा कधी मुलांसाठी दुःखाचे राज्य थोडेच बनवतील? म्हणतात - ईश्वरच सुख-दुःख देतो. बाबा म्हणतात - मी कधीही मुलांना दुःख देत नाही. माझे नावच आहे - ‘दुःख-हर्ता, सुख-कर्ता’. ही मनुष्यांची चूक आहे. ईश्वर कधीही दुःख देत नाहीत. यावेळी आहेच मुळी दुःख धाम. अर्धा कल्प रावण राज्यामध्ये दुःखच दुःख मिळते. सुख रत्तीभर सुद्धा नसते. सुखधामा मध्ये मग दुःख असतही नाही. बाबा स्वर्गाची रचना रचतात. आता तुम्ही आहात संगमावर. याला तर कोणीही नवी दुनिया म्हणणार नाही. नवीन दुनियेचे नावच आहे सतयुग. तीच नंतर जुनी होते, तेव्हा तिला कलियुग म्हटले जाते. नवीन वस्तू चांगली आणि जुनी वस्तू खराब दिसते, म्हणून जुन्या वस्तूला नष्ट केले जाते. मनुष्य विषालाच सुख समजतात. गायले देखील जाते - ‘अमृत छोड़ विष काहे को खाए’. आणि मग म्हणतात - ‘तेरे भाने सर्व का भला’. तुम्ही येऊन जे काही कराल त्यातून भलेच होईल. नाहीतर रावण राज्यामध्ये मनुष्य वाईटच काम करतील. हे तर मुलांना आता माहित झाले आहे की गुरुनानकला ५०० वर्षे झाली, मग ते पुन्हा कधी येणार? तर म्हणतात - त्यांची आत्मा तर ज्योतीमध्ये विलीन झाली. मग ते येतील कसे? तुम्ही म्हणाल - आजपासून ४५०० वर्षांनंतर पुन्हा गुरुनानक येतील. तुमच्या बुद्धीमध्ये साऱ्या जगाचा इतिहास-भूगोल फिरत राहतो. यावेळी सर्वजण तमोप्रधान आहेत, याला कयामतची (महाविनाशाची) वेळ म्हटले जाते. सर्व मनुष्य जणूकाही मरून पडले आहेत. सर्वांची ज्योत विझलेली आहे. बाबा येतात सर्वांना जागे करण्यासाठी; जी मुले काम-चितेवर बसून भस्म झाली आहेत, त्यांना अमृतवर्षेने जागे करून सोबत घेऊन जातील. माया रावणाने काम-चितेवर बसवून कब्रदाखल केले आहे. सर्वजण झोपलेले आहेत. आता बाबा ज्ञान-अमृत पाजत आहेत. आता ज्ञान-अमृत कुठे आणि ते पाणी कुठे. शीख लोकांचा मोठा दिवस असतो तेव्हा मोठ्या धूमधडाक्यात तलाव साफ करतात, मातीचा गाळ काढून टाकतात म्हणून नावच ठेवले आहे - अमृतसर. अमृताचा तलाव. गुरूनानकांनी देखील बाबांची महिमा केली आहे. स्वतः म्हणतात - ‘एक ओंकार, सत नाम…’ ते सदैव सत्य बोलणारे आहेत. सत्यनारायणाची कथा आहे ना. मनुष्य भक्तीमार्गामध्ये किती कथा ऐकत आले आहेत. अमरकथा, तीजरीची कथा... म्हणतात शंकराने पार्वतीला कथा ऐकवली. ते तर सूक्ष्मवतनमध्ये राहणारे आहेत, तिथे मग कोणती कथा सांगितली असेल? या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगत आहेत की, वास्तविक मी तुम्हाला अमरकथा सांगून अमरलोक मध्ये घेऊन जाण्याकरिता आलो आहे. मृत्युलोक मधून अमरलोक मध्ये घेऊन जातो. बाकी सूक्ष्मवतनमध्ये पार्वतीने कोणता दोष केला ज्यामुळे तिला अमरकथा ऐकवतील? शास्त्रांमध्ये तर अनेक कथा लिहिल्या आहेत. सत्यनारायणाची सत्य कथा काही नाहीये. तुम्ही किती सत्यनारायणाच्या कथा ऐकल्या असतील. मग त्याने कोणी सत्यनारायण बनतात का उलट अजूनच घसरत जातात (पतन होत जाते). आता तुम्ही समजता की आपण नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी बनत आहोत. ही आहे अमरलोकमध्ये जाण्यासाठी खरी सत्यनारायणाची कथा, तीजरीची कथा. तुम्हा आत्म्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्हीच गुल-गुल पूज्य होता, आणि मग ८४ जन्मा नंतर तुम्हीच पुजारी बनला आहात, म्हणूनच गायले गेले आहे - ‘आपेही पूज्य, आपेही पुजारी’. बाबा म्हणतात - मी तर सदैव पूज्य आहे. तुम्हाला येऊन पुजारी पासून पूज्य बनवतो. ही आहे पतित दुनिया. सतयुगामध्ये पूज्य पावन मनुष्य असतात, यावेळी आहेत पुजारी पतित मनुष्य. साधू-संत गात राहतात - ‘पतित-पावन सीताराम’... हे शब्द अगदी राईट आहेत. सर्व सीता ब्राइड्स आहेत. म्हणतात - हे राम, येऊन आम्हाला पावन बनवा. सर्व भक्तीणी बोलावतात, आत्मा बोलावते - हे राम. गांधीजी देखील गीता ऐकवून पूर्ण झाली की मग म्हणत असत - ‘हे पतित-पावन सीताराम’. आता तुम्ही जाणता की, गीता काही श्रीकृष्णाने ऐकवलेली नाहीये. बाबा म्हणतात - ओपिनियन घेत रहा की, ईश्वर सर्वव्यापी नाही. गीतेचा भगवान शिव आहेत, श्रीकृष्ण नाही. अगोदर विचारा तर खरे की, ‘गीतेचा भगवान कोणाला म्हटले जाते?’ भगवान निराकारला म्हणणार की साकारला म्हणणार? श्रीकृष्ण आहे साकार. शिव आहेत निराकार. ते फक्त या तनाचे (ब्रह्माच्या शरीराचे) लोन घेतात. बाकी मातेच्या गर्भातून जन्म घेत नाहीत. शिवाला शरीरच नाहीये. इथे या मनुष्य लोकमध्ये स्थूल शरीर आहे. बाबा येऊन खरी सत्यनारायणाची कथा ऐकवतात. बाबांची महिमा आहे - पतित-पावन, सर्वांचा सद्गती दाता, सर्वांचा लिबरेटर, दुःखहर्ता सुखकर्ता. अच्छा, सुख कुठे असते? इथे असू शकत नाही. सुख मिळेल दुसऱ्या जन्मामध्ये, जेव्हा जुनी दुनिया नष्ट होईल आणि स्वर्गाची स्थापना होईल. अच्छा, कोणापासून लिबरेट करतात (मुक्त करतात)? रावणाच्या दुःखातून मुक्त करतात. हे तर दुःखधाम आहे ना. अच्छा, आणि मग गाइड देखील बनतात. ही शरीरे तर इथेच नष्ट होतात. फक्त आत्म्यांना घेऊन जातात. आधी साजन त्यांच्या मागून सजनी जाते. तो आहे अविनाशी सुंदर साजन. सर्वांना दुःखातून सोडवून पवित्र बनवून घरी घेऊन जातात. लग्न करून जेव्हा येतात तेव्हा आधी असतो घोट (पती). त्याच्या मागे ब्राइड (पत्नी) असते, त्यांच्या मागून वरात असते. आता तुमची माळा देखील अशीच आहे. वरती शिवबाबा फूल, त्याला नमस्कार करतील. मग युगल मणी - ब्रह्मा-सरस्वती. नंतर मग तुम्ही, जे बाबांचे मदतगार बनता. फूल शिवबाबांच्या आठवणीद्वारेच सूर्यवंशी, विष्णूची माळा बनला आहात. ब्रह्मा-सरस्वती सो लक्ष्मी-नारायण बनतात. लक्ष्मी-नारायण सो ब्रह्मा-सरस्वती बनतात. यांनी मेहनत केली आहे तेव्हाच तर पुजले जातात. कोणालाच ठाऊक नाहीये की, माळा काय चीज आहे. अशीच माळा जपत राहतात. १६,१०८ ची देखील माळा असते. मोठ-मोठ्या मंदिरांमध्ये ठेवलेली असते, मग कोणी कुठून, कोणी कुठून पकडून जप करतात. बाबा बॉम्बेमध्ये लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जात असत, जाऊन माळा जपत असत, ‘राम-राम’ जपत होते, कारण फूल एक बाबाच आहेत ना. फुलालाच राम-राम म्हणतात. मग पूर्ण माळेवर डोके टेकवतात. ज्ञान काहीच नाही. पाद्री लोक देखील हातात माळा धरून जपत राहतात. तुम्ही विचारा - कोणाची माळा जपत आहात? त्यांना तर माहीतच नाहीये. म्हणतील - क्राइस्टच्या आठवणीमध्ये माळा जपत आहोत. त्यांना हे देखील ठाऊक नाहीये की, स्वतः क्राइस्टची आत्मा कुठे आहे. तुम्ही जाणता की क्राइस्टची आत्मा आता तमोप्रधान आहे. तुम्ही देखील तमोप्रधान गरीब होता. आता बेगर टू प्रिन्स बनत आहात. भारत प्रिन्स होता, आता गरीब आहे मग पुन्हा प्रिन्स बनतो. बनविणारे आहेत बाबा. तुम्ही मनुष्यापासून प्रिन्स बनत आहात. एक प्रिन्स कॉलेज (राजकुमारांचे कॉलेज) देखील होते, जिथे प्रिन्स-प्रिन्सेस जाऊन शिकत असत.

तुम्ही इथे शिकून २१ जन्मांसाठी स्वर्गामध्ये प्रिन्स-प्रिन्सेस बनता. हा श्रीकृष्ण प्रिन्स आहे ना. त्यांच्या ८४ जन्मांची कहाणी लिहिलेली आहे. मनुष्य काय जाणणार! या गोष्टी फक्त तुम्ही जाणता. “भगवानुवाच” ते तर सर्वांचे पिता आहेत. तुम्ही गॉडफादरकडून ऐकता, जे स्वर्गाची स्थापना करतात. त्याला म्हटलेच जाते सचखंड. हा आहे झूठ खंड. सचखंड तर बाबा स्थापन करतील. झूठ खंड रावण स्थापन करतो. रावणाचे रूप बनवतात, परंतु अर्थ काहीच समजत नाहीत, कोणालाही माहीतच नाहीये की अखेरीस रावण आहे तरी कोण, ज्याला मारतात आणि तो पुन्हा जिवंत होतो. वास्तविक ५ विकार स्त्रीमधील, ५ विकार पुरुषामधील… याला म्हटले जाते रावण. त्याला मारतात. रावणाला मारून मग सोने लुटतात.

तुम्ही मुले जाणता - हे आहे काट्यांचे जंगल. बॉम्बे मध्ये बबुलनाथचे देखील मंदिर आहे. बाबा येऊन काट्यांना फूल बनवतात. सर्वजण एकमेकांना काटे लावतात अर्थात् काम कटारी चालवत राहतात, म्हणून याला काट्यांचे जंगल म्हटले जाते. सतयुगाला गार्डन ऑफ अल्लाह म्हटले जाते, तीच फुले काटे बनतात आणि पुन्हा काट्यांपासून फूल बनतात. आता तुम्ही ५ विकारांवर विजय प्राप्त करता. या रावणराज्याचा विनाश तर होणारच आहे. अखेरीस मोठी लढाई देखील होईल. खराखुरा दसरा देखील होणार आहे. रावणराज्यच नष्ट होईल, मग तुम्ही लंका लुटाल. तुम्हाला सोन्याचे महाल मिळतील. आता तुम्ही रावणावर विजय प्राप्त करून स्वर्गाचे मालक बनत आहात. बाबा संपूर्ण विश्वाचे राज्य-भाग्य देतात म्हणून त्यांना शिव भोला भंडारी म्हणतात. गणिका, अहिल्या, कुब्जा… सर्वांना बाबा विश्वाचे मालक बनवतात. किती भोळे आहेत! येतात देखील पतित दुनियेमध्ये, पतित शरीरामध्ये. बाकीचे जे स्वर्गाच्या लायक नाहीत, ते काम विकार रूपी विष पिणे सोडतच नाहीत. बाबा म्हणतात - मुलांनो, आता हा एक अंतिम जन्म पावन बना. हे विकार तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःखी बनवतात. काय तुम्ही या एका जन्मासाठी विष पिणे सोडू शकत नाही काय? मी तुम्हाला अमृत पाजून अमर बनवतो, तरी सुद्धा तुम्ही पवित्र बनत नाही. विषाशिवाय (विकाराशिवाय), सिगारेट-दारू शिवाय राहू शकत नाही. मी बेहदचा बाबा तुम्हाला सांगत आहे - मुलांनो, या एका जन्मासाठी पावन बना तर मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवेन. जुन्या दुनियेचा विनाश आणि नवीन दुनियेची स्थापना करणे - हे बाबांचेच काम आहे. बाबा आले आहेत साऱ्या दुनियेला दुःखातून लिबरेट करून सुखधाम-शांतीधाम मध्ये घेऊन जाण्याकरिता. आता सर्व धर्म नष्ट होतील. एक आदि सनातन देवी-देवता धर्माची पुन्हा स्थापना होईल. शास्त्रांमध्ये देखील परमपिता परमात्म्याला अकालमूर्त म्हटले आहे. बाबा आहेत महाकाल - काळांचा काळ. तो काळ तर एक-दोन आत्म्यांना घेऊन जाईल. मी तर सर्व आत्म्यांना घेऊन जाणार आहे, म्हणून मला महाकाल म्हणतात. बाबा येऊन तुम्हा मुलांना किती हुशार बनवतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या अंतिम जन्मामध्ये कामरुपी विषाचा त्याग करून ज्ञान अमृत प्यायचे आहे आणि पाजायचे आहे. पावन बनायचे आहे. काट्यांना फूल बनविण्याची सेवा करायची आहे.

२) विष्णूच्या गळ्यातील माळेचा मणी बनण्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. पूर्णपणे मदतगार बनून बाप समान दु:ख हर्ता बनायचे आहे.

वरदान:-
आपल्या अलौकिक रूहानी वृत्तीद्वारे सर्व आत्म्यांवर आपला प्रभाव टाकणारे मास्टर ज्ञानसूर्य भव ज्याप्रमाणे एखादी आकर्षक वस्तू आजूबाजूच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करते, सर्वांचे लक्ष तिच्याकडे जाते. तसेच जेव्हा तुमची वृत्ती अलौकिक, रूहानियतवाली होईल तेव्हा तुमचा प्रभाव अनेक आत्म्यांवर आपोआप पडेल. अलौकिक वृत्ती अर्थात न्यारेपणाची आणि प्रेमळपणाची स्थिती, जी आपोआप अनेक आत्म्यांना आकर्षित करते. असे अलौकिक शक्तिशाली आत्मे मास्टर ज्ञानसूर्य बनून आपला प्रकाश चारही दिशांना पसरवतात.

बोधवाक्य:-
नेहमी स्वमानाच्या सीटवर स्थित रहा तर सर्व शक्ती तुमची ऑर्डर मानत राहतील.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. ज्ञानी बनण्यासोबतच स्नेही देखील बना. स्वतःची सेवा विश्व-सेवेचा आधार आहे. सेवेमध्ये फक्त दोन शब्द लक्षात ठेवा - एक - मी निमित्त आहे आणि दुसरे - निर्मान (नम्र) बनायचेच आहे. यामुळे एकतेचे वातावरण बनेल. एकमेकांचे सहयोगी बनाल. तुझे-माझे, मान-शान, आणि टकराव या सर्व भावना नष्ट होतील.