12-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमचे हे ब्राह्मण कुळ अगदी निराळे आहे, तुम्ही ब्राह्मणच नॉलेजफुल आहात, तुम्ही ज्ञान, विज्ञान आणि अज्ञानाला जाणता”

प्रश्न:-
कोणत्या सोप्या पुरुषार्थाने तुम्हा मुलांचे मन सर्व गोष्टींपासून दूर जाईल?

उत्तर:-
फक्त रुहानी धंद्यामध्ये लागा, जेवढी-जेवढी रुहानी सेवा करत रहाल तितके इतर सर्व गोष्टींपासून मन आपणच दुरावत जाईल. राजाई घेण्याच्या पुरुषार्थामध्ये लागाल. परंतु रुहानी सेवेसोबतच जी रचना रचली आहे, त्यांचा देखील सांभाळ करायचा आहे.

गीत:-
जो पिया के साथ है…

ओम शांती।
पिया म्हटले जाते बाबांना. आता बाबांच्या समोर तर मुले बसली आहेत. मुले जाणतात आम्ही काही साधू-संन्यासी इत्यादींच्या समोर बसलेलो नाही आहोत. ते बाबा ज्ञानाचा सागर आहेत, ज्ञानाद्वारेच सद्गती होते. म्हटले जाते - ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. विज्ञान अर्थात देही-अभिमानी बनणे, आठवणीच्या यात्रेमध्ये रहाणे आणि ज्ञान अर्थात सृष्टीचक्राला जाणणे. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान - याचा अर्थ मनुष्य बिलकुल जाणत नाहीत. आता तुम्ही आहात संगमयुगी ब्राह्मण. तुमचे हे ब्राह्मण कुळ निराळे आहे, त्याला कोणीही जाणत नाही. शास्त्रांमध्ये या गोष्टी नाही आहेत की ब्राह्मण संगमावर असतात. हे देखील जाणतात की, प्रजापिता ब्रह्मा होऊन गेले आहेत, त्यांना आदि देव म्हणतात. आदि देवी जगत अंबा, ती कोण आहे! हे देखील दुनिया जाणत नाही. जरूर ब्रह्माची मुखवंशावळीच असेल. ती काही ब्रह्माची पत्नी नव्हती. ॲडॉप्ट करतात ना. तुम्हा मुलांना देखील ॲडॉप्ट करतात (दत्तक घेतात). ब्राह्मणांना देवता म्हणणार नाही. इथे ब्रह्माचे मंदिर आहे, तो देखील मनुष्य आहे ना. ब्रह्मा सोबत सरस्वती देखील आहे. मग देवींची देखील मंदिरे आहेत. सर्व इथलेच मनुष्य आहेत ना. मंदिर एकाचे बनवले आहे. प्रजापित्याची तर असंख्य प्रजा असेल ना. आता बनत आहे. प्रजापिता ब्रह्माचे कुळ वृद्धिंगत होत आहे. आहेत ॲडॉप्टेड धर्माची मुले. आता तुम्हाला बेहदच्या बाबांनी धर्माचे मूल बनवले आहे. ब्रह्मा देखील बेहदच्या पित्याचा मुलगा झाला, यांना देखील वारसा त्यांच्याकडून मिळतो. तुम्हा नातवंडांना देखील वारसा त्यांच्याकडून मिळतो. ज्ञान तर कोणाकडेच नाही कारण ज्ञानाचा सागर एकच आहे, तो पिता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणाचीही सद्गती होत नाही. आता तुम्ही भक्ती मधून ज्ञानामध्ये आला आहात, सद्गतीसाठी. सतयुगाला म्हटले जाते सद्गती. कलियुगाला दुर्गती म्हटले जाते कारण रावणाचे राज्य आहे. सद्गतीला रामराज्य देखील म्हणतात. सूर्यवंशी देखील म्हणतात. यथार्थ नाव सूर्यवंशी, चंद्रवंशी आहे. मुले जाणतात आम्हीच सूर्यवंशी कुळाचे होतो, मग ८४ जन्म घेतले, हे ज्ञान काही शास्त्रांमध्ये असू शकत नाही कारण शास्त्रे आहेतच भक्तिमार्गासाठी. ती तर सगळी नष्ट होतील. इथून जे संस्कार घेऊन जातील तिथे ते सर्व बनवू लागतील. तुमच्यामध्ये देखील संस्कार भरले जातात - राजाईचे. तुम्ही राजाई कराल आणि ते (वैज्ञानिक) मग त्या राजाईमध्ये येऊन, जी कला शिकलेली असते तेच काम करतील. जाणार तर नक्कीच सूर्यवंशी, चंद्रवंशी राजाईमध्ये. त्यांच्यामध्ये आहे फक्त सायन्सचे नॉलेज. ते त्यांचे संस्कार घेऊन जातील. ते देखील संस्कार आहेत. ते देखील पुरुषार्थ करतात, त्यांच्याकडे ती विद्या आहे. तुमच्याकडे दुसरी कोणती विद्या नाही. तुम्ही बाबांकडून राजाई घ्याल. धंदा इत्यादीमध्ये तर ते संस्कार असतात ना. किती कटकट असते. परंतु जोपर्यंत वानप्रस्थ अवस्था होत नाही तोपर्यंत घरादाराची देखील काळजी घ्यायची आहे. नाहीतर मुलांना कोण सांभाळणार. इथे तर येऊन बसणार नाहीत. असे म्हणतात, जेव्हा या धंद्यामध्ये पूर्णपणे व्यस्त व्हाल तेव्हा ते सुटू शकते. सोबतच रचनेला (पत्नी आणि मुलांना) देखील जरूर सांभाळावे लागते. हो, कोणी चांगल्या रीतीने रूहानी सेवा करू लागतात मग त्यांच्यातून जसे मन उडून जाईल. समजतात जितका वेळ या रूहानी सेवेमध्ये देऊ, तेवढे चांगले आहे. बाबा आले आहेत पतितापासून पावन बनण्याचा रस्ता सांगण्यासाठी, तर तुम्हा मुलांना देखील हीच सेवा करायची आहे. प्रत्येकाचा हिशोब पाहिला जातो. बेहदचे बाबा तर फक्त पतितापासून पावन बनण्याचे मत देतात, ते पावन बनण्याचाच रस्ता सांगतात. बाकी हे देखरेख करणे, सल्ला देणे हा यांचा (ब्रह्मा बाबांचा) धंदा होतो. शिवबाबा म्हणतात - मला धंदा इत्यादीविषयी कोणतीही गोष्ट विचारायची नाही. मला तुम्ही बोलावले आहे की, येऊन पतितापासून पावन बनवा, तर मी यांच्याद्वारे तुम्हाला बनवत आहे. हे देखील पिता आहेत, यांच्या मतावर चालावे लागेल. त्यांची रूहानी मत, यांची जिस्मानी. यांच्यावर देखील किती जबाबदारी असते. हे देखील सांगत राहतात की बाबांचे फर्मान आहे - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबांच्या मतानुसार चाला. बाकी मुलांना काहीही विचारावे लागते, नोकरीमध्ये कसे चालावे, या गोष्टी हे साकार बाबा चांगल्या रीतीने समजावू शकतात, अनुभवी आहेत, हे सांगत राहतील. मी असे-असे करतो, यांना पाहून शिकायचे आहे, हे शिकवत राहतील कारण हे सर्वात पुढे आहेत. सर्व वादळे आधी यांच्याकडे येतात म्हणून सर्वात रुस्तम (मजबूत ) हे आहेत, तेव्हाच तर उच्च पदही प्राप्त करतात. माया बलवान होऊन लढते. यांनी झटक्यात सर्व काही सोडून दिले, यांचा पार्ट होता. बाबांनी यांच्याकडून हे करून घेतले. करनकरावनहार तर ते आहेत ना. आनंदाने सोडून दिले, साक्षात्कार झाला. आता मी विश्वाचा मालक बनतो. या पै-पैशाच्या गोष्टीचे मी काय करणार. विनाशाचा साक्षात्कार देखील घडवला. समजून गेले, या जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे. आपल्याला पुन्हा राजाई मिळते तर झटक्यात ते सोडून दिले. आता तर बाबांच्या मतावर चालायचे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा. ड्रामा अनुसार भट्टी बनणार होती. मनुष्य थोडेच समजत होते की इतके हे सर्व का पळाले. हे काही साधु-संत तर नाहीत. हे तर सोपे आहे, याने (ब्रह्माने) तर कोणाला पळवले सुद्धा नाही. मनुष्यमात्राची कोणतीही महिमा नाहीये. महिमा तर एका बाबांची आहे. बस्स. बाबाच येऊन सर्वांना सुख देतात. तुमच्याशी बोलतात. तुम्ही इथे कोणाकडे आला आहात? तुमची बुद्धी तिथेही जाईल, इथेही जाईल कारण जाणता शिवबाबा तिथले (परमधामचे) राहणारे आहेत. आता यांच्यामध्ये आले आहेत. बाबांकडून आम्हाला स्वर्गाचा वारसा मिळणार आहे. कलियुगा नंतर जरूर स्वर्ग येईल. कृष्ण देखील बाबांकडून वारसा घेऊन जाऊन राजाई करतात, यामध्ये चरित्राची गोष्टच नाही. जसे राजाकडे राजकुमार जन्म घेतो, शाळेमध्ये शिकून मग मोठा होऊन गादीवर बसतो. यामध्ये महिमा किंवा चरित्राची गोष्ट नाहीये. उच्च ते उच्च एक बाबाच आहेत. महिमा सुद्धा त्यांची होते! हे (ब्रह्मा बाबा) देखील त्यांचाच परिचय देतात. जर ते म्हणाले ‘मी म्हणतो’ तर मनुष्य समजतील, हे स्वतःसाठी म्हणतात. या गोष्टी तुम्ही मुले समजता, ईश्वराला कधीही मनुष्य म्हणू शकत नाही. तो एकच तर निराकार आहे. परमधाममध्ये राहतात. तुमची बुद्धी वरती देखील जाते मग खाली देखील येते.

बाबा दूरदेशातून परक्या देशामध्ये येऊन आपल्याला शिकवून परत निघून जातात. स्वतः म्हणतात - मी सेकंदामध्ये येतो. वेळ लागत नाही. आत्मा देखील सेकंदामध्ये एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जाते. कोणी पाहू शकत नाही. आत्मा खूप वेगवान आहे. गायले देखील आहे सेकंदामध्ये जीवनमुक्ती. रावण राज्याला जीवनबंध राज्य म्हटले जाईल. बाळ जन्माला आले आणि वडिलांचा वारसा मिळाला. तुम्ही देखील बाबांना ओळखले आणि स्वर्गाचे मालक बनलात मग त्यामध्ये पुरुषार्थानुसार नंबरवार पदे आहेत. बाबा खूप चांगल्या रीतीने समजावून सांगत राहतात, दोन पिता आहेत - एक लौकिक आणि एक पारलौकिक. गातात देखील - ‘दुख में सिमरण सब करे, सुख में करे न कोई…’ अर्थात दुःखामध्ये स्मरण सर्वजण करतात, सुखामध्ये कोणीही करत नाही. तुम्ही जाणता - आपण भारतवासी जेव्हा सुखात होतो तेव्हा सिमरण करत नव्हतो. मग आपण ८४ जन्म घेतले. आत्म्यामध्ये भेसळ पडते तेव्हा डिग्री कमी होत जाते. १६ कला संपूर्ण मग दोन कला कमी होतात. कमी मार्कांनी पास झाल्याकारणाने रामाला बाण दाखवला आहे. बाकी कोणते धनुष्य तोडलेले नाहीये. ही एक खूण दिली आहे. या आहेत सर्व भक्तीमार्गाच्या गोष्टी. भक्तीमध्ये मनुष्य किती भटकतात. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे, तर भटकणे बंद होते.

“हे शिवबाबा” असे म्हणणे हा आळवणी करणारा शब्द आहे. तुम्हाला हे शब्द बोलायचे नाही आहेत. बाबांची आठवण करायची आहे. धावा केलात तर भक्ती मार्गाचा अंश आला. ‘हे भगवान’, असे म्हणणे ही देखील भक्तीमधील सवय आहे. बाबांनी थोडेच म्हटले आहे की, ‘हे भगवान’, असे म्हणून आठवण करा. अंतर्मुख होऊन माझी आठवण करा. नाम स्मरण देखील करायचे नाही. नाम स्मरण देखील भक्तिमार्गाचा शब्द आहे. तुम्हाला बाबांचा परिचय मिळाला, आता बाबांच्या श्रीमतावर चाला. अशी बाबांची आठवण करा जसे लौकिक मुले देहधारी वडिलांची आठवण करतात. स्वतः देखील देह-अभिमानामध्ये आहेत तर आठवण देखील देहधारी पित्याची करतात. पारलौकिक पिता तर आहेच देही-अभिमानी. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येतात तरी देखील देह-अभिमानी होत नाहीत. म्हणतात - ‘मी हे लोन घेतले आहे, तुम्हाला ज्ञान देण्यासाठी मी हे लोन घेतो. ज्ञानसागर आहे परंतु ज्ञान कसे देऊ. गर्भामध्ये तर तुम्ही जाता, मी थोडेच गर्भामध्ये जातो. माझी गत मतच न्यारी आहे’. बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) येतात हे देखील कोणी जाणत नाही. म्हणतात देखील - ब्रह्मा द्वारे स्थापना. परंतु कसे ब्रह्माद्वारे स्थापना करतात? काय प्रेरणा देणार! बाबा म्हणतात - साधारण तनामध्ये येतो. त्याचे नाव ब्रह्मा ठेवतो कारण संन्यास करतात ना’.

तुम्ही मुले जाणता आता ब्राह्मणांची माळा बनू शकत नाही कारण तुटत राहतात. जेव्हा फायनल ब्राह्मण बनतात तेव्हा रुद्रमाळा बनते, मग विष्णूच्या माळेमध्ये जातात. माळेमध्ये येण्यासाठी आठवणीची यात्रा हवी. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की हम सो सुरुवातीला सतोप्रधान होतो मग सतो, रजो, तमोमध्ये येतो. ‘हम सो’चा अर्थ देखील आहे ना. ‘ओम्’चा अर्थ वेगळा आहे, ओम् अर्थात आत्मा. मग तीच आत्मा म्हणते - हम सो देवता, क्षत्रिय… ते लोक (भक्तिमार्गातील लोक) मग म्हणतात - ‘हम आत्मा सो परमात्मा’. तुमचा ‘ओम्’ आणि ‘हम सो’ चा अर्थ अगदी वेगळा आहे. आपण आत्मा आहोत मग आत्मा वर्णांमध्ये येते, आपण आत्मा सो आधी देवता, क्षत्रिय बनतो. असे नाही की, आत्मा सो परमात्मा; ज्ञान पूर्ण नसल्याकारणाने अर्थच चुकीचा करून टाकला आहे. ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणतात, हे देखील चुकीचे आहे. बाबा म्हणतात - मी काही रचनेचा मालक तर बनत नाही. या रचनेचे मालक तुम्ही आहात. विश्वाचे देखील मालक तुम्ही बनता. ब्रह्म तर तत्व आहे. तुम्ही आत्मा सो या रचनेचे मालक बनता. आता बाबा सर्व वेद शास्त्रांचा यथार्थ अर्थ बसून ऐकवतात. आता तर शिकत रहायचे आहे. बाबा तुम्हाला नव्या-नव्या गोष्टी सांगत राहतात. भक्ती काय म्हणते, ज्ञान काय म्हणते. भक्तीमार्गामध्ये मंदिरे बनवली, जप-तप केली, पैसे बरबाद केले. तुमच्या मंदिरांना अनेकांनी लुटले आहे. हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे मग जरूर त्यांच्याकडूनच परत मिळणार आहे. आता बघा किती देत आहेत. दिवसेंदिवस वाढवत राहतात. हे देखील घेत राहतात. त्यांनी जितके घेतले आहे तितकाच पूर्ण हिशोब देतील. तुमचे जे पैसे खाल्ले आहेत, ते गडप करू शकत नाहीत. भारत तर अविनाशी खंड आहे ना. बाबांचे बर्थ प्लेस (अवतरण भूमी) आहे. इथेच बाबा येतात. बाबांच्या खंडातूनच घेऊन जातात तर परत द्यावे लागेल. बघा कसे वेळेवर मिळते. या गोष्टी तुम्ही जाणता. त्यांना थोडेच माहित आहे - विनाश कोणत्या वेळी होईल. गव्हर्मेंट देखील या गोष्टी मानणार नाही. ड्रामा मध्ये नोंदलेले आहे, कर्ज उचलतच राहतात. रिटर्न होत आहे. तुम्ही जाणता आपल्या राजधानीमधून पुष्कळ धन घेऊन गेले आहेत, ते मग देत आहेत. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही आहे. चिंता असते फक्त बाबांची आठवण करण्याची. आठवणीनेच पापे भस्म होतील. ज्ञान तर खूप सोपे आहे. आता जो जितका पुरुषार्थ करेल. श्रीमत तर मिळत राहते. अविनाशी सर्जनकडून प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ला घ्यावा लागेल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जितका वेळ मिळेल तितका वेळ हा रुहानी धंदा करायचा आहे. रुहानी धंद्याचे संस्कार बनवायचे आहेत. पतितांना पावन बनविण्याची सेवा करायची आहे.

२) अंतर्मुखी बनून बाबांची आठवण करायची आहे. तोंडातून ‘हे भगवान’ असे शब्द काढायचे नाहीत. जसा बाबांना अहंकार नाही, असे निरहंकारी बनायचे आहे.

वरदान:-
मनसा संकल्प किंवा वृत्तीद्वारे श्रेष्ठ व्हायब्रेशन्सचा सुगंध पसरविणारे शिव-शक्ती कंबाइंड भव

जसे आज-काल स्थूल सुगंधाच्या साधनांनी गुलाब, चंदन आणि भिन्न-भिन्न प्रकारचा सुगंध पसरवतात तसे तुम्ही शिव-शक्ती कंबाइंड बनून मनसा संकल्प आणि वृत्तीद्वारे सुख-शांती, प्रेम, आनंदाचा सुगंध पसरवा. दररोज अमृतवेलेला भिन्न-भिन्न श्रेष्ठ व्हायब्रेशन्सचे कारंजाप्रमाणे आत्म्यांवरती गुलाब जल शिंपडा. फक्त संकल्पाचा ऑटोमॅटिक स्विच ऑन करा तर विश्वामध्ये अशुद्ध वृत्तींची जी दुर्गंधी आहे ती नाहीशी होईल.

बोधवाक्य:-
सुखदात्याद्वारे सुखाचे भंडार प्राप्त होणे - हीच त्यांच्या प्रेमाची निशाणी आहे.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

जितकी शक्तींची शक्ती आहे तितकीच पांडवांची देखील शक्ती प्रचंड आहे म्हणून चतुर्भुज रूप दाखविले आहे. शक्ती आणि पांडव या दोघांच्या कंबाइंड रूपा द्वारेच विश्व सेवेच्या कार्यामध्ये सफलता प्राप्त होते. म्हणून कायम एकमेकांचे सहयोगी बनून रहा. जबाबदारीचा मुकुट कायम घातलेला असावा.