12-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - काम-धंदा इत्यादी करत असताना देखील आपले ईश्वरीय विद्यार्थी जीवन आणि अभ्यास नेहमी लक्षात ठेवा, स्वयं भगवान आपल्याला शिकवत आहेत या नशेमध्ये रहा”

प्रश्न:-
ज्या मुलांना ज्ञान अमृत पचवता येते, त्यांचे लक्षण काय असेल?

उत्तर:-
त्यांना कायम रुहानी नशा चढलेला राहील आणि त्या नशेच्या आधारावर सर्वांचे कल्याण करत राहतील. कल्याण करण्याव्यतिरिक्त दुसरी कोणती गोष्ट करणे देखील त्यांना आवडणार नाही. काट्यांना फूल बनविण्याच्या सेवेमध्येच बिझी राहतील.

ओम शांती।
आता तुम्ही मुले इथे बसला आहात आणि हे देखील जाणता की आता आपण पार्टधारी आहोत. ८४ जन्मांचे चक्र पूर्ण केले आहे. तुम्हा मुलांच्या हे स्मृतीमध्ये आले पाहिजे. जाणता की बाबा आलेले आहेत, आम्हाला पुन्हा राज्य प्राप्त करून देण्यासाठी किंवा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनविण्यासाठी. या गोष्टी बाबांशिवाय इतर कोणीही सांगू शकणार नाही. तुम्ही जेव्हा इथे बसता तर तुम्ही जसे शाळेमध्ये बसले आहात. बाहेर आहात म्हणजे शाळेमध्ये नाही आहात. तुम्ही जाणता ही उच्च ते उच्च रुहानी शाळा आहे. रूहानी बाबा बसून शिकवतात. शिक्षणाची तर मुलांना आठवण आली पाहिजे ना. हा (ब्रह्मा) देखील मुलगा झाला. यांना अथवा सर्वांना शिकविणारे ते बाबा आहेत. सर्व मनुष्यमात्राच्या आत्म्यांचे ते पिता आहेत. ते येऊन शरीराचे लोन घेऊन तुम्हाला समजावून सांगत आहेत. रोज समजावतात, इथे जेव्हा बसता तर बुद्धीमध्ये हे लक्षात राहिले पाहिजे की आपण ८४ जन्म घेतले. आम्ही विश्वाचे मालक होतो, देवी-देवता होतो मग पुनर्जन्म घेत-घेत येऊन जमिनीवर कोसळलो आहोत (अधःपतन झाले आहे). भारत किती सॉल्व्हंट (पावन) होता. सगळ्या आठवणी परत आल्या आहेत. भारताचीच कहाणी आहे, त्याच सोबत आपली देखील आहे. मग स्वतःला विसरू नका. आपण स्वर्गामध्ये राज्य करत होतो आणि मग आपल्याला ८४ जन्म घ्यावे लागले. हे पूर्ण दिवस स्मृतीमध्ये आणावे लागेल. काम-धंदा इत्यादी करताना अभ्यास तर आठवला पाहिजे ना. कसे आपण विश्वाचे मालक होतो मग आपण खाली उतरत आलो, खूप सोपे आहे परंतु हे देखील कोणाच्या लक्षात राहत नाही. आत्मा पवित्र नसल्याकारणाने आठवण निसटून जाते. आम्हाला ईश्वर शिकवत आहेत ही आठवणच निसटून जाते. आम्ही बाबांचे विद्यार्थी आहोत. बाबा सांगत राहतात - आठवणीच्या यात्रेवर रहा. बाबा आम्हाला शिकवून हे बनवत आहेत. संपूर्ण दिवस ही आठवण येत रहावी. बाबाच आठवण करून देतात, हाच भारत होता ना. आपण सो देवी-देवता होतो, तेच आता असुर बनलो आहोत. सुरुवातीला तुमची देखील बुध्दी आसुरी होती. आता बाबांनी ईश्वरीय-बुद्धी दिली आहे. परंतु तरी देखील काहीजणांच्या बुद्धीमध्ये रहातच नाही. विसरून जातात. बाबा किती नशा चढवतात. तुम्ही पुन्हा देवता बनता तर तो नशा राहिला पाहिजे ना. आपण आपले राज्य घेत आहोत. आम्ही आमचे राज्य करणार, कोणाला तर बिलकुलच नशा चढत नाही. ज्ञान अमृत पचतच नाही. ज्यांना नशा चढलेला असेल, त्यांना कोणाचे कल्याण केल्याशिवाय दुसरी कोणती गोष्ट करणे देखील चांगले वाटणार नाही. फूल बनविण्याच्या सेवेमध्येच व्यस्त राहतील. आपण सुरुवातीला फूल होतो मग मायेने काटा बनवले. आता परत फूल बनतो. अशा प्रकारे स्वतःशी गोष्टी केल्या पाहिजेत. या नशेमध्ये राहून तुम्ही कोणालाही समजावून सांगाल तर लगेचच कोणालाही तीर लागेल (काळजाला भिडेल). भारत गार्डन ऑफ अल्लाह (ईश्वरीय बगीचा) होता. आता पतित बनला आहे. आपणच साऱ्या विश्वाचे मालक होतो, किती मोठी गोष्ट आहे! आणि आता आपण काय बनलो आहोत! किती घसरलो आहोत (पतन झाले आहे)! हे आपल्या पतन आणि उत्थानाचे नाटक आहे. ही कहाणी बाबा बसून ऐकवतात. ती आहे खोटी, ही आहे खरी. ते सत्यनारायणाची कथा ऐकवतात, समजतात थोडेच की आपण कसे चढलो आणि मग कसे कोसळलो आहोत. ही बाबांनी खरी सत्यनारायणाची कथा ऐकवली आहे. राज्य कसे गमावले, ही सर्व कहाणी आपल्यावर आहे. आत्म्याला आता माहीत झाले आहे की आपण कसे आता बाबांकडून राजाई घेत आहोत. बाबा इथे विचारतात तर म्हणतात - हो, नशा आहे मग बाहेर गेल्यावर काहीच नशा राहत नाही. मुले स्वतः समजतात भले हात तर वर करतात परंतु वर्तन असे आहे ज्यामुळे नशा राहू शकत नाही. जाणीव तर होते ना.

बाबा मुलांना आठवण करून देतात - मुलांनो, तुम्हाला मी राजाई दिली होती मग तुम्ही गमावलीत. तुम्ही खाली घसरत आला आहात कारण हे नाटक आहे चढण्या आणि उतरण्याचे (उत्थान आणि पतनाचे). आज राजा आहे, उद्या त्याला खाली उतरवतात (पदच्युत करतात). वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या पुष्कळ गोष्टी येतात, ज्यांचे उत्तर दिले तर काहीतरी समजू शकेल. हे नाटक आहे, हे लक्षात राहिले तरी देखील सदैव आनंदी रहाल. बुद्धीमध्ये आहे ना - आज पासून ५००० वर्षांपूर्वी शिवबाबा आले होते, येऊन राजयोग शिकवला होता. युद्ध झाले होते. आता या सर्व अचूक गोष्टी बाबा ऐकवत आहेत. हे आहे पुरुषोत्तम युग. कलियुगा नंतर हे पुरुषोत्तम युग येते. कलियुगाला पुरुषोत्तम युग म्हणणार नाही. सतयुगाला देखील पुरुषोत्तम युग म्हणणार नाही. आसुरी संप्रदाय आणि दैवी संप्रदाय म्हणतात, त्यांच्यामधले हे आहे संगमयुग, जेव्हा जुन्या दुनियेपासून नवीन दुनिया बनते. नव्या पासून जुनी होण्यामध्ये संपूर्ण चक्र फिरावे लागते. आता आहे संगमयुग. सतयुगामध्ये देवी-देवतांचे राज्य होते. आता ते नाही आहे. इतर अनेक धर्म आले आहेत. हे तुमच्या बुद्धीमध्ये असते. असे बरेच आहेत जे ६-८ महिने, १२ महिने शिकून मग कोसळतात (पतित होतात). फेल होतात. भले पवित्र बनतात परंतु अभ्यास करत नाहीत त्यामुळे फसतात. केवळ पवित्रता सुद्धा कामी येत नाही. असे अनेक संन्यासी देखील आहेत, ते संन्यास-धर्म सोडून देतात आणि जाऊन गृहस्थी बनतात, लग्न इत्यादी करतात. तर आता बाबा मुलांना समजावून सांगत आहेत - तुम्ही शाळेमध्ये बसले आहात. हे स्मृतीमध्ये आहे की, आपण आपले राज्य कसे गमावले, किती जन्म घेतले. आता पुन्हा बाबा म्हणतात विश्वाचे मालक बना. पावन जरूर बनायचे आहे. जितकी जास्त आठवण कराल तितके पवित्र होत जाल कारण सोन्यामध्ये भेसळ पडते, ती निघणार कशी? तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे आपण आत्मे सतोप्रधान होतो, २४ कॅरेट होतो मग घसरत-घसरत अशी हालत झाली आहे. आपण काय बनलो! बाबा तर असे म्हणत नाहीत की, मी काय होतो. तुम्ही मनुष्यच म्हणता - आम्ही देवता होतो. भारताची महिमा तर आहे ना. भारतामध्ये कोण येतात, कोणते ज्ञान देतात, हे कोणीही जाणत नाही. हे तर माहीत असले पाहिजे ना की लिब्रेटर केव्हा येतात. भारत प्राचीन म्हणून गायला जातो तर जरूर भारतामध्येच रीइनकारनेशन (अवतरण) होत असेल अथवा जयंती देखील भारतामध्येच साजरी करतात. जरूर पिता इथे येतात. म्हणतात देखील ‘भागीरथ’. तर मानवी तनामध्ये आले असतील ना. मग घोडागाडी सुद्धा दाखवली आहे. किती फरक आहे. श्रीकृष्ण आणि रथ दाखवला आहे. माझ्याविषयी कोणालाच माहीत नाहीये. आता तुम्ही समजता बाबा या रथावर (ब्रह्मा तनामध्ये) येतात, यालाच भाग्यशाली रथ म्हटले जाते. ब्रह्मा सो विष्णू, चित्रामध्ये किती क्लियर दाखवले आहे. त्रिमूर्तीच्या वरती शिव, हा शिवाचा परिचय कोणी दिला. बाबांनीच बनवून दिले ना. आता तुम्ही समजता बाबा या ब्रह्मा रथामध्ये आले आहेत. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे, कुठे ८४ जन्मानंतर विष्णू सो ब्रह्मा बनतात, आणि कुठे ब्रह्मा सो विष्णू एका सेकंदामध्ये. या बुद्धीमध्ये धारण करण्यासारख्या अद्भुत गोष्टी आहेत ना. सर्वप्रथम सांगायचा असतो बाबांचा परिचय. भारत स्वर्ग होता जरूर. हेवनली गॉड फादरने स्वर्ग बनवला असेल. हे चित्र तर एकदम फर्स्टक्लास आहे, समजावून सांगण्याची हौस असते ना. बाबांना देखील हौस आहे. तुम्ही सेंटर्सवर देखील असे समजावून सांगत राहता. इथे तर डायरेक्ट बाबा आहेत. बाबा आत्म्यांना बसून समजावून सांगतात. आत्म्यांच्या समजावून सांगण्यामध्ये आणि बाबांच्या समजावून सांगण्यामध्ये फरक तर जरूर असतो ना म्हणून इथे सन्मुख ऐकण्यासाठी येतात. बाबाच वारंवार ‘बाळांनो-बाळांनो’ म्हणत समजावून सांगतात. भावा भावांचा इतका प्रभाव पडत नाही जितका बाबांचा पडतो. इथे तुम्ही बाबांच्या सन्मुख बसले आहात. आत्म्यांचे आणि परमात्म्याचे मिलन होते तर याला मेळावा म्हटले जाते. बाबा सन्मुख बसून समजावून सांगतात तर खूप नशा चढतो. समजतात - बेहदचे बाबा सांगत आहेत तर आम्ही त्यांचे ऐकणार नाही काय! बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठवले होते, मग तुम्ही ८४ जन्म घेत-घेत पतित बनला आहात. तर आता तुम्ही पावन बनणार नाही काय!’ आत्म्यांना म्हणतात. कोणी समजतात, बाबा सत्य सांगत आहेत, कोणी तर लगेचच सांगतात - ‘बाबा, आम्ही का नाही पवित्र बनणार बरें!’

बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. तुम्ही खरे सोने बनाल. मी सर्वांचा पतित-पावन पिता आहे तर बाबांनी स्पष्ट करून सांगण्यामध्ये आणि आत्म्यांनी (मुलांनी) स्पष्ट करून सांगण्यामध्ये किती फरक आहे. समजा कोणी नवीन येतात, त्यांच्यामध्ये देखील जे इथले फूल असेल तर त्यांना टच होईल. हे ठीक सांगत आहेत. जर इथला नसेल तर त्याला काहीच समजणार नाही. तर तुम्ही देखील समजावून सांगा - आम्हा आत्म्यांना बाबा म्हणत आहेत की, तुम्ही पावन बना. मनुष्य पावन बनण्यासाठी गंगा स्नान करतात, गुरु करतात. परंतु पतित-पावन तर बाबाच आहेत. बाबा आत्म्यांना म्हणतात की तुम्ही किती पतित बनला आहात म्हणून आत्मा आठवण करते की येऊन पावन बनवा. बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प येतो, तुम्हा मुलांना म्हणतो हा अंतिम जन्म पवित्र बना’. हे रावण राज्य नष्ट होणार आहे. मुख्य गोष्ट आहेच मुळी पावन बनण्याची. स्वर्गामध्ये विष (विकार) असत नाही. जेव्हा कोणी येतात तर त्यांना समजावून सांगा की बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर पावन बनाल, गंज निघून जाईल. मनमनाभव शब्द लक्षात आहे ना. बाबा निराकार आहेत आपण आत्मे देखील निराकार आहोत. जसे आम्ही शरीराद्वारे ऐकतो, बाबा देखील या शरीरामध्ये येऊन समजावून सांगतात. नाहीतर मग सांगतील कसे की, ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा. देहाचे सर्व संबंध सोडा’. जरूर इथे येतात, ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. प्रजापिता आता प्रॅक्टिकलमध्ये आहेत, यांच्याद्वारे बाबा आम्हाला हे सांगतात, आम्ही बेहदच्या बाबांचेच मानतो. ते म्हणतात - पावन बना. पतितपणा सोडा. जुन्या देहाच्या अभिमानाला सोडा. माझी आठवण करा तर अंत मती सो गती होईल, तुम्ही लक्ष्मी-नारायण बनाल.

बाबांपासून बेमुख करणारा मुख्य अवगुण आहे - एकमेकांचे पर-चिंतन करणे. वाईट गोष्टी ऐकणे आणि ऐकविणे. बाबांचे डायरेक्शन आहे तुम्हाला वाईट गोष्टी ऐकायच्या नाही आहेत. याची गोष्ट त्याला, त्याची गोष्ट याला ऐकवणे हा मूर्खपणा तुम्हा मुलांमध्ये असता कामा नये. यावेळी दुनियेमध्ये सर्वजण विपरीत-बुद्धी आहेत. रामाव्यतिरिक्त (शिवबाबांची सोडून) दुसरी कोणती गोष्ट ऐकविणे, याला मूर्खपणा म्हटला जातो. आता बाबा म्हणतात - हा मूर्खपणा सोडा. तुम्ही सर्व आत्म्यांना सांगा की हे सीता, तुम्ही एका रामाशी योग लावा. तुम्ही आहात मेसेंजर, हा मेसेज द्या की बाबांनी सांगितले आहे माझी आठवण करा, बस्स. ही एक गोष्ट सोडून बाकी सर्व आहेत मूर्खपणाच्या गोष्टी. बाबा सर्व मुलांना म्हणतात - मूर्खपणा सोडा. सर्व सीतांचा एका रामाशी योग जोडा. तुमचा धंदाच हा आहे, बस्स, हाच संदेश देत रहा. बाबा आलेले आहेत, ते म्हणतात तुम्हाला गोल्डन एजमध्ये जायचे आहे. आता या आयर्न एजला सोडायचे आहे. तुम्हाला ‘वन’वास मिळाला आहे, जंगलामध्ये बसला आहात ना. ‘वन’ जंगलाला म्हटले जाते. मुलीचे जेव्हा लग्न होते तेव्हा वनामध्ये बसते आणि मग महालामध्ये जाते. तुम्ही देखील जंगलामध्ये बसला आहात. आता सासरी जायचे आहे, या जुन्या देहाला सोडायचे आहे. एका बाबांची आठवण करा. ज्यांची विनाशकाले प्रीत-बुद्धी आहे ते तर महालामध्ये जातील, बाकी विपरीत-बुद्धी असणाऱ्यांचा आहे ‘वन’वास. जंगलामध्ये वास आहे. बाबा तुम्हा मुलांना विविध प्रकारे समजावून सांगतात. ज्या बाबांकडून एवढी बेहदची बादशाही घेतली आहे, त्यांना विसरले आहात त्यामुळे मग वनवासामध्ये गेले आहात. ‘वन’वास आणि ‘गार्डन’वास. बाबांचे नावच आहे बागवान (माळी). परंतु जेव्हा कोणाच्या बुद्धीत येईल तेव्हा. भारतामध्येच आपले राज्य होते. आता नाहीये. आता तर वनवास आहे. नंतर मग गार्डनमध्ये जातो. तुम्ही इथे बसले आहात तरी देखील बुद्धीमध्ये आहे - आम्ही बेहदच्या बाबांकडून आपले राज्य घेत आहोत. बाबा म्हणतात - माझ्यासोबत प्रीत ठेवा तरी देखील विसरतो. बाबा उल्हना देतात - तुम्ही मज पित्याला कुठवर विसरत राहणार. मग गोल्डन एजमध्ये कसे जाल. स्वतःला विचारा आपण बाबांची किती वेळ आठवण करतो? आम्ही जसे की आठवणीच्या अग्नीमध्ये पडलेले आहोत. ज्याद्वारे विकर्म विनाश होतात. एका बाबांशी प्रीत-बुद्धी व्हायचे आहे. सर्वात फर्स्ट क्लास माशुक आहेत जे तुम्हाला देखील फर्स्ट क्लास बनवतात. कुठे थर्ड क्लासमध्ये बकऱ्यांसारखे प्रवास करणे, कुठे एअर कंडिशनमध्ये. किती फरक आहे. हे सर्व विचार सागर मंथन करायचे आहे तर तुम्हाला मजा येईल. हे बाबा देखील म्हणतात मी देखील बाबांना आठवण करण्यासाठी खूप डोकेफोड करतो. पूर्ण दिवस विचार चालत राहतात. तुम्हा मुलांना देखील हीच मेहनत करायची आहे. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणालाही एक राम (बाबांच्या) गोष्टींव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही गोष्टी ऐकवायच्या नाहीत. एकाची गोष्ट दुसऱ्याला सांगणे, परचिंतन करणे हा मूर्खपणा आहे, याला सोडायचे आहे.

२) एका बाबांसोबत प्रीत ठेवायची आहे. जुन्या देहाचा अभिमान सोडून एका बाबांच्या आठवणीने स्वतःला पावन बनवायचे आहे.

वरदान:-
सामावण्याच्या शक्तीद्वारे चुकीला देखील योग्य बनविणारे विश्व परिवर्तक भव

दुसऱ्यांच्या चुकांना बघून स्वतः चुका करू नका. जर कोणी चूक करत असेल तर आपण योग्यच्या बाजूने रहावे, त्याच्या संगतीच्या प्रभावामध्ये येऊ नये, जे प्रभावामध्ये येतात ते निष्काळजी बनतात. प्रत्येकाने फक्त ही जबाबदारी घ्या की, मी बरोबर असणाऱ्या मार्गावरच राहीन, जर दुसरा चूक करत असेल तर त्यावेळी सामावण्याच्या शक्तीचा वापर करा. कोणाच्या चुकीला नोट करण्याऐवजी त्याला सहयोगाचे बोट द्या अर्थात सहयोगाने भरपूर करा तर विश्व परिवर्तनाचे कार्य आपोआपच होईल.

बोधवाक्य:-
निरंतर योगी बनायचे असेल तर हदच्या ‘मी’ आणि ‘माझे’पणाला बेहदमध्ये परिवर्तन करा.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-

वर्तमान वेळेप्रमाणे फरिश्तेपणाच्या संपन्न स्टेजच्या किंवा बाप समान स्टेजच्या समीप येत आहात, त्याचप्रमाणे पवित्रतेची परिभाषा देखील अतिसूक्ष्म होत जाते. फक्त ब्रह्मचारी बनणेच पवित्रता नाही परंतु ब्रह्मचारी सोबतच ब्रह्मा बाबांच्या प्रत्येक कर्म रूपी पावलावर पाऊल ठेवणारे ब्रह्माचारी बना.