12-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आता हे रावण राज्य, जुनी दुनिया नष्ट होऊन नवीन दुनिया येत आहे त्यामुळे श्रीमतावर चालून पवित्र बना, तेव्हाच श्रेष्ठ देवी-देवता बनाल”

प्रश्न:-
बाबा आपल्या मुलांना सत्यनारायणाची कथा ऐकवतात, त्यामागचे रहस्य काय आहे?

उत्तर:-
त्याचे रहस्य आहे - बादशाही घेणे आणि गमावणे. अल्फला अल्लाह मिळाला, तर गदाई सोडून दिली (ओझे वाहणे सोडून दिले). जे विश्वाचे मालक होते तेच ८४ जन्म घेऊन राज्य गमावून बसतात, मग बाबा पुन्हा त्यांना राज्य देतात. पतितापासून पावन बनणे, ओझे वाहणे सोडून राज्य घेणे - हीच खरी सत्य-नारायणाची कथा बाबा ऐकवत आहेत.

गीत:-
आखिर वह दिन आया आज…

ओम शांती।
‘ओम् शांती’चा अर्थ तर रुहानी बाबांनी समजावून सांगितला आहे. ओम् अर्थात मी आत्मा आहे आणि हे शरीर, माझे आहे. आत्मा तर दिसून येत नाही. हे समजून येते की, मी आत्मा आहे, हे माझे शरीर आहे. मन-बुद्धी आत्म्यामध्येच आहे. शरीरामध्ये बुद्धी नाहीये. आत्म्यामध्येच चांगले अथवा वाईट संस्कार असतात. मुख्य आहे आत्मा. त्या आत्म्याला कोणीही पाहू शकत नाही. शरीराला आत्मा बघते. आत्म्याला शरीर पाहू शकत नाही. जाणू शकते की आत्मा निघून जाते तेव्हा शरीर जड होते (निर्जीव होते). आत्मा दिसून येत नाही, शरीर दिसून येते. तसेच आत्म्याचे जे पिता आहेत, ज्यांना ‘ओ गॉड फादर’ असे म्हणतात, ते देखील दिसून येत नाहीत. त्यांना समजू शकतो, जाणू शकतो. सर्व आत्मे आत्मे भाऊ-भाऊ आहेत. शरीरामध्ये येतात तेव्हा म्हणणार - हे भाऊ-भाऊ आहेत अथवा भाऊ-बहीण आहेत. आत्म्यांचे पिता आहेत - परमपिता परमात्मा. देहधारी भाऊ-बहीण एकमेकांना पाहू शकतात. आत्म्यांचे पिता सर्वांचे एकच आहेत, त्यांना पाहू शकत नाही. तर बाबा आले आहेत जुन्या दुनियेला नवीन बनविण्याकरता. नवीन दुनिया सतयुग होती, ही जुनी दुनिया कलियुग आहे. याला आता परिवर्तित करायचे आहे. जसे जुने घर नष्ट होऊन नवीन घर बनते. तशी ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. सतयुगानंतर त्रेता, द्वापर, कलियुग आणि मग पुन्हा सतयुग जरूर येणार आहे. दुनियेचा इतिहास-भूगोल रिपीट होणार आहे. सतयुगामध्ये असते देवी-देवतांचे राज्य. अर्धे कल्प सूर्यवंशी आणि चंद्रवंशींचे चालते. त्याला म्हटले जाते लक्ष्मी-नारायणाची डिनायस्टी (घराणे) आणि राम-सीतेचे घराणे. तर हे समजायला सोपे आहे ना. मग द्वापर, कलियुगामध्ये इतर धर्म येतात. मग देवी-देवता जे पवित्र होते, ते अपवित्र बनतात. याला म्हटले जाते - रावण राज्य. रावणाला वर्षानुवर्षे जाळतात, परंतु जळतच नाही. हा सर्वांचा खूप मोठा शत्रू आहे, म्हणून याला जाळण्याचा रिवाज पडला आहे. भारताचा एक नंबरचा शत्रू आहे रावण आणि एक नंबरचा दोस्त सदा सुख देणारा आहे - खुदा (भगवान). खुदाला दोस्त म्हणतात ना. यावर एक कहाणी देखील आहे. तर खुदा आहे - दोस्त, रावण आहे - दुश्मन. खुदा दोस्तला कधीही जाळणार नाहीत. रावण दुश्मन आहे त्यामुळे दहा डोकी असलेला रावण बनवून त्याला वर्षानुवर्षे जाळतात. गांधीजी देखील म्हणत असत - आम्हाला रामराज्य पाहिजे. राम राज्यामध्ये आहे सुख, रावण राज्यामध्ये आहे दुःख. आता हे कोण बसून समजावून सांगत आहेत? पतित-पावन बाबा, शिवबाबा, ब्रह्मा दादा. बाबा नेहमी सही करतात - ‘बापदादा’. प्रजापिता ब्रह्मा देखील तर सर्वांचा असेल, ज्यांना ॲडम म्हटले जाते. त्यांना ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हटले जाते. मनुष्य सृष्टीमध्ये ‘प्रजापिता’, झाले. प्रजापिता ब्रह्मा द्वारे ब्राह्मण आणि ‘मग ब्राह्मण सो देवी-देवता’ बनतात. देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनतात, यांना म्हटले जाते - प्रजापिता ब्रह्मा, मनुष्य सृष्टीचे पूर्वज. प्रजापिता ब्रह्माची किती असंख्य मुले आहेत. ‘बाबा-बाबा’ म्हणत राहतात. हे आहेत - साकार बाबा. शिवबाबा आहेत - निराकार बाबा. गायले देखील जाते - प्रजापिता ब्रह्मा द्वारा नवीन मनुष्य सृष्टी रचतात. ही आहे पतित दुनिया रावण राज्य. आता रावणाची आसुरी दुनिया नष्ट होईल, त्यासाठी ही महाभारत लढाई आहे. सतयुगामध्ये मग रावण शत्रूला कोणी जाळणार सुद्धा नाहीत. रावण असणारच नाही. रावणानेच ही दुःखाची दुनिया बनवली आहे. असे नाही की ज्यांच्याकडे भरपूर धन आहे, मोठ-मोठे बंगले इत्यादी आहेत ते स्वर्गामध्ये आहेत. बाबा समजावून सांगत आहेत - भले कोणाकडे करोडों आहेत, परंतु शांती नाहीये, धन इत्यादी तर सर्व मातीत मिसळून जाणार आहे. नवीन दुनियेमध्ये मग नवीन खाणी निर्माण होतात, ज्यातून नवीन दुनियेतील महाल इत्यादी सर्व बनवले जातात. ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. सतयुगामध्ये आहे व्हाईसलेस संपूर्ण निर्विकारी. तिथे मुले योग बलाद्वारे जन्म घेतात. तिथे विकार असतच नाही. ना देह-अभिमान, ना क्रोध, ना काम विकार. हे ५ विकार असतच नाहीत म्हणून तिथे रावणाला कधी जाळतच नाहीत. इथे तर रावण राज्य आहे, म्हणून सर्व बोलावतात की, हे पतित-पावन या. ते तर लिबरेटर देखील आहेत, सर्वांचे दुःख हर्ता आहेत. आता सर्व रावण राज्यामध्ये आहेत. बाबांना येऊन सोडवावे लागते.

आता बाबा म्हणतात - तुम्ही पवित्र बना. ही पतित दुनिया नष्ट होणार आहे, जे श्रीमतावर चालतील ते श्रेष्ठ देवी-देवता बनतील. विनाश तर होणार, सर्वजण नष्ट होतील. शेवटी कोण वाचतील? जे श्रीमतावर पवित्र राहतात, तेच बाबांच्या मतावर चालून विश्वाच्या बादशाहीचा वारसा प्राप्त करतात. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. आता तर रावण राज्य आहे जे नष्ट होणार आहे. सतयुग रामराज्य स्थापन होणार आहे. राम काही तो सीतावाला नाही. लंका तर ही सारी दुनिया आहे, यामध्ये रावणाचे राज्य आहे. सतयुगामध्ये भारत सोन्याची चिडिया होता. जेव्हा दुसरे कोणते राज्यच नव्हते. बाबा भारतामध्ये येऊन पुन्हा सोन्याची चिडिया स्वर्ग बनवतात. बाकी इतके सारे धर्म जे आहेत, ते सर्व नष्ट होतील. समुद्राला देखील उधाण येईल. बॉम्बे काय होती, एक छोटेसे गाव होते. आता सतयुगाची स्थापना होत आहे, त्यानंतर बॉम्बे इत्यादी राहणार सुद्धा नाही. सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात. दिल्ली कॅपिटल असते (राजधानी असते), जिथे लक्ष्मी-नारायणाचे राज्य असते.

सतयुगामध्ये दिल्ली परिस्तान होती. दिल्लीच राजसत्तेचे मुख्य केंद्र होते. रामराज्यामध्ये देखील दिल्लीच राजधानी असते. परंतु रामराज्यामध्ये हिरे-माणकांचे महाल होते, अथाह सुख होते. बाबा म्हणतात - तुम्ही विश्वाचे राज्य गमावले आहे, ते मी पुन्हा तुम्हाला देत आहे. तुम्ही माझ्या मतावर चाला. श्रेष्ठ बनायचे असेल तर फक्त माझी आठवण करा, इतर कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानपासून सतोप्रधान बनाल, तुम्ही माझ्याकडे निघून याल. तुम्ही माझ्या गळ्यातील माळ बनून मग विष्णूच्या गळ्यातील माळ बनाल. माळेमध्ये वरती मी आहे. मग युगल आहे - ब्रह्मा-सरस्वती. तेच सतयुगाचे महाराजा-महाराणी बनतात. मग त्यांची संपूर्ण माळ आहे, जे नंबरवार सिंहासनावर बसतात. मी भारताला या ब्रह्मा-सरस्वती आणि ब्राह्मणांद्वारे स्वर्ग बनवतो. जे मेहनत करतात त्यांची मग स्मारके (मंदिरे) बनतात. आत्म्यांचे राहण्याचे स्थान परमधाम आहे, ज्याला ब्रह्मांड देखील म्हणतात. आपण सर्व आत्मे तिथे बाबांसोबत स्वीट होम मध्ये राहणारे आहोत. ते आहे शांतीधाम. लोकांना वाटते आपण मुक्तीधाम मध्ये जावे. परंतु परत कोणीही जाऊ शकत नाही. सर्वांना पार्ट मध्ये यायचेच आहे. तोपर्यंत बाबा तुम्हाला तयार करत असतात. तुम्ही तयार व्हाल तेव्हा तिथे जे काही आत्मे आहेत, ते सर्व येतील आणि मग सर्व काही संपेल. तुम्ही जाऊन नवीन दुनियेमध्ये राज्य कराल आणि मग नंबरवार चक्र चालू राहील.

गाण्यामध्ये देखील ऐकले ना - ‘आखिर वह दिन आया आज’. भक्तिमार्गामध्ये धक्के खात होता. बाबा आहेत ज्ञान-सूर्य. ‘ज्ञान सूर्य प्रगटा…’ आता तुमच्या बुद्धीमध्ये सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे. तुम्ही जाणता जे भारतवासी नरकवासी आहेत ते मग स्वर्गवासी बनतील. बाकी इतके सर्व आत्मे शांतीधाम मध्ये निघून जातील. फार थोडेसे सांगायचे आहे, अल्फ बाबा, बे बादशाही. अल्फ द्वारा बादशाही मिळते.

ओझी वाहणे संपून जाते. त्याची कहाणी बाबा बसून समजावून सांगतात. ही आहे खरी सत्य-नारायणाची कथा. बाकी सर्व आहेत दंतकथा. बाबाच नरा पासून नारायण बनण्यासाठी हे ज्ञान ऐकवतात. इतिहास-भूगोल आहे ना. लक्ष्मी-नारायणाचे राज्य कधी सुरू झाले, कधीपर्यंत चालले. तर कथा देखील झाली ना! जे विश्वावर राज्य करत होते, ते ८४ जन्म घेऊन अगदीच तमोप्रधान बनले आहेत.

आता बाबा म्हणतात - मी तेच राज्य पुन्हा स्थापन करत आहे. तुम्ही कसे पतितापासून पावन, पावन पासून पतित बनता तो सारा इतिहास-भूगोल समजावून सांगतो. सर्वप्रथम सूर्यवंशींचे राज्य त्यानंतर चंद्रवंशींचे… त्यादरम्यान दुसरे देखील बौद्धी, इस्लामी आणि मग ख्रिश्चन आले. आणि मग तो जो देवी-देवता धर्म होता तो नाहीसा झाला. मग जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होईल. शास्त्रांमध्ये ब्रह्माचे आयुष्य १०० वर्षे दाखवलेले आहे. हे जे ब्रह्मा आहेत, ज्यांच्यामध्ये बाबा बसून वारसा देतात, यांचे देखील शरीर सुटून जाईल. आत्म्यांना बसून जे आत्म्यांचे पिता आहेत ते ऐकवत आहेत, तेच पतित-पावन आहेत. मनुष्य, मनुष्याला पावन बनवू शकत नाही. जे स्वतःच मुक्त होऊ शकत नाहीत ते मग बाकीच्यांना तरी कसे काय मुक्त करतील. ते तर सर्व भक्ती शिकविणारे पुष्कळ गुरु आहेत. कोणी म्हणतील अमक्याची भक्ती करा, कोणी म्हणतील शास्त्र ऐका. अनेकानेक मतमतांतरे आहेत, त्यामुळे सर्वजण जास्तच बुद्धिहीन बनले आहेत. आता बाबा येऊन बुद्धिमान बनवत आहेत. हे लक्ष्मी-नारायण बुद्धिमान विश्वाचे मालक होते ना. आता किती गरीब बनले आहेत. मग पुन्हा शिवबाबा येऊन नरकवासी पासून स्वर्गवासी बनवतात. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात की इथे भाग्य जागृत होईल. बाबा येतातच मनुष्यमात्राचे भाग्य जागृत करण्याकरिता. सर्व पतित दुःखी आहेत ना. सर्व त्राही-त्राही करून नष्ट होतील, म्हणून बाबा म्हणतात - त्राही-त्राही होण्यापूर्वीच बेहदच्या बाबांकडून थोडा तरी वारसा घ्या. हे जे काही दुनियेमध्ये बघता ते सर्व नष्ट होणार आहे. फॉल ऑफ भारत, राईज ऑफ भारत (भारताचे उत्थान आणि भारताचे पतन). हा भारताचाच खेळ आहे. उत्थान होईल सतयुगामध्ये. आता कलियुगामध्ये पतन होणारच आहे. हा सर्व रावण राज्याचा डामडौल आहे. आता विनाश होणार आहे. फॉल ऑफ वर्ल्ड, राईज ऑफ वर्ल्ड (दुनियेचे उत्थान आणि दुनियेचे पतन). सतयुगामध्ये कोण-कोण राज्य करत होते, ते बाबा बसून समजावून सांगत आहेत. राईज ऑफ भारत, देवतांचे राज्य. फॉल ऑफ भारत, रावणाचे राज्य. आता नवीन दुनिया बनत आहे. जुनी दुनिया नष्ट होईल. त्याच्या अगोदर तुम्ही बाबांकडून वारसा घेण्यासाठी शिकत आहात. किती सोपे आहे. हे आहे मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण. संन्याशांचा आहेच मुळी निवृत्ती मार्ग. तो धर्मच वेगळा आहे. ते तर गृहस्थ व्यवहार सोडून निघून जातात, त्यांचा आहे हदचा संन्यास. तुम्हाला या जुन्या दुनियेचा संन्यास करून मग परत इथे यायचे नाहीये. हे देखील चांगल्या रीतीने समजावून सांगायचे आहे की, कोण-कोणते धर्म कधी येतात. द्वापर नंतरच इतर धर्म येतात. सुरुवातीला सुख उपभोगतात आणि नंतर मग दुःख. हे संपूर्ण चक्र बुद्धीमध्ये पक्के करायचे असते. जेव्हापासून तुम्ही या चक्रामध्ये येता, महाराजा-महाराणी बनता. फक्त अल्फ आणि बे विषयी समजावून सांगायचे आहे.

बाबा कोणाला परदेशात जाण्यासाठी मनाई करत नाहीत. तसे तर त्या सर्वांना वाटते की, आपला मृत्यू आपल्या देशामध्येच व्हावा. आता विनाश तर होणारच आहे, अंदाधुंदी तर इतकी माजेल की परदेशातून पुन्हा परत येऊ देखील शकणार नाही; म्हणून बाबा समजावून सांगतात की भारत भूमी सर्वात उत्तम आहे, जिथे बाबा येऊन अवतार घेतात. शिवजयंती देखील साजरी केली जाते. फक्त श्रीकृष्णाचे नाव घातल्याने सारी महिमाच नाहीशी झाली आहे. सर्व मनुष्य मात्रांचे लिबरेटर इथे येऊन अवतार घेतात. गॉड फादरच आहेत जे येऊन लिबरेट करतात. तर अशा बाबांसमोर नतमस्तक झाले पाहिजे, त्यांची जयंती साजरी केली पाहिजे. परंतु श्रीकृष्णाचे नाव टाकल्याने सर्व महत्वच नाहीसे झाले आहे. नाहीतर भारत सर्वात सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान आहे. ते बाबा इथेच येऊन सर्वांना पावन बनवतात, तर हे सर्वात मोठे तीर्थ झाले. सर्वांना दुर्गती मधून सोडवून सद्गती देतात. हा ड्रामा पूर्वनियोजित आहे. आता तुम्ही आत्मे जाणता, ते आमचे बाबा या आपल्या शरीराद्वारे हे रहस्य समजावून सांगत आहेत. आपण आत्मे या शरीराद्वारे ऐकतो. आत्म-अभिमानी बनायचे आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तेव्हाच गंज निघत जाईल आणि पवित्र बनून तुम्ही बाबांकडे याल. जितकी आठवण कराल तितके पवित्र बनाल, इतरांना देखील आप समान बनवाल तर अनेकांचे आशीर्वाद मिळतील. उच्चपद प्राप्त कराल म्हणूनच गायले जाते सेकंदामध्ये जीवनमुक्ती. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांच्या गळ्यातील माळा बनून विष्णूच्या गळ्यामध्ये ओवले जाण्याकरिता संपूर्ण सतोप्रधान बनायचे आहे. एका बाबांच्या मतावर चालायचे आहे.

२) सेवा अशी करायची आहे जेणेकरून अनेक आत्म्यांचे आशीर्वाद मिळत राहतील. त्राही-त्राही होण्यापूर्वी बाबांकडून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे.

वरदान:-
प्रिय बनवण्याच्या गूढ रहस्याला ओळखून सर्वांना संतुष्ट करणारे राजयुक्त, योगयुक्त भव

जी मुले एका सर्वशक्तिमान बाबांची प्रिय बनून राहतात, ती सर्व आत्म्यांची स्वतः प्रिय बनतात. या गूढ रहस्याला जे ओळखतात ते राजयुक्त, योगयुक्त अथवा दिव्य गुणांनी युक्तियुक्त बनतात. अशी राजयुक्त आत्मा सर्व आत्म्यांना सहजच संतुष्ट करते. जे या रहस्याला जाणत नाहीत ते कधी दुसऱ्याला नाराज करतात आणि कधी स्वतः नाराज होतात; त्यामुळे सदैव प्रिय असण्याच्या रहस्याला जाणून राजयुक्त बना.

बोधवाक्य:-
जे निमित्त आहेत ते जबाबदारी सांभाळत असताना देखील नेहमी हलके असतात.

अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

जसे बापदादा नेहमी मोठ्या दिलाचे, बेहद दिलाचे आहेत, त्यामुळे सर्वांचे दिल घेणारे दिलाराम आहेत, तशीच मुले देखील बेहदचे दिल, फ्राकदिल (उदार मनाचे) दातापणाचे दिल ठेवणारे, सदैव दिल-खुश बनून साऱ्या दुनियेला खुश करणारे खुशनसीब (भाग्यशाली) आत्मे आहेत. तुम्ही श्रेष्ठ आत्मेच दुनियेचे आधारस्तंभ आहात. तुम्ही सर्व जागृत होता, जागती ज्योत बनता तेव्हा दुनियावाले देखील जागृत होतात. तुम्हा सर्वांची चढती कला असते तेव्हा सर्व आत्म्यांचे कल्याण होते.