12-12-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - सत्य बाबांद्वारे संगमावर तुम्हाला सत्याचे वरदान मिळते त्यामुळे तुम्ही
कधीही
प्रश्न:-
निर्विकारी
बनण्यासाठी तुम्हा मुलांना कोणती मेहनत जरूर करायची आहे?
उत्तर:-
आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत जरूर करायची आहे. भृकुटीमध्ये आत्म्यालाच पाहण्याचा
अभ्यास करा. आत्मा बनून आत्म्याशी बोला, आत्मा होऊन ऐका. देहावर दृष्टी जाऊ नये -
हीच मुख्य मेहनत आहे, याच मेहनती मध्ये विघ्न पडतात. जितके होऊ शकेल हाच अभ्यास करा
- की “मी आत्मा आहे, मी आत्मा आहे”.
गीत:-
ओम् नमो शिवाय…
ओम शांती।
गोड मुलांनो, बाबांनी स्मृती दिली आहे की सृष्टीचे चक्र कसे फिरते. आता तुम्ही मुले
जाणता आपण बाबांकडून जे काही जाणले आहे, बाबांनी जो रस्ता सांगितला आहे, ते
दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. ‘आपे ही पूज्य, आपे ही पुजारी’ याचा अर्थ देखील
तुम्हाला समजावून सांगितला आहे, जे पूज्य विश्वाचे मालक बनतात, तेच मग पुजारी बनतात.
परमात्म्यासाठी असे म्हणणार नाही. आता तुमच्या लक्षात आले आहे की, ही तर एकदम बरोबर
गोष्ट आहे. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचा समाचार बाबाच ऐकवतात, इतर कोणालाही ज्ञानाचा
सागर म्हटले जात नाही. ही महिमा काही श्रीकृष्णाची नाहीये. आता तुम्ही समजता - यांची
आत्मा आता ज्ञान घेत आहे. ही वंडरफुल गोष्ट आहे. बाबांव्यतिरिक्त इतर कुणीही
समजावून सांगू शकत नाही. असे तर बरेच साधू-संत विविध प्रकारचे हठयोग इत्यादी शिकवत
राहतात. तो सर्व आहे भक्तिमार्ग. सतयुगामध्ये तुम्ही कोणाचीही पूजा करत नाही. तिथे
तुम्ही पुजारी बनत नाही. त्याला म्हटलेच जाते - पूज्य देवी-देवता होते, आता नाही
आहेत. तेच पूज्य मग पुजारी बनले आहेत. बाबा म्हणतात - हे (ब्रह्मा बाबा) देखील पूजा
करत होते ना. सारी दुनिया यावेळी पुजारी आहे. नवीन दुनियेमध्ये एकच पूज्य देवी-देवता
धर्म असतो. मुलांना आता स्मृतीमध्ये आले आहे की, ड्रामाच्या प्लॅन अनुसार हे एकदम
बरोबर आहे. गीता एपिसोड बरोबर सुरू आहे. गीतेमध्ये फक्त नाव बदलले आहे. जे
सांगण्यासाठीच तुम्ही मेहनत करत आहात. २५०० वर्षांपासून गीता श्रीकृष्णाची असल्याचे
समजत आले आहेत. आता एका जन्मामध्ये समजतील की गीता निराकार भगवंताने ऐकवली, यामध्ये
वेळ तर लागतो ना. भक्ती विषयी देखील समजावून सांगितले आहे, झाड किती विस्तारलेले आहे.
तुम्ही लिहू शकता - बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. ज्या मुलांना निश्चय होतो तर
ते निश्चयाने समजावून सांगत देखील राहतात. निश्चय नसेल तर स्वतः देखील गोंधळून
जातात - कसे समजावून सांगावे, कुठे गडबड-गोंधळ तर होणार नाही ना. अजून काही निर्भय
झालेले नाहीत ना. निर्भय तेव्हा होतील जेव्हा पूर्ण देही-अभिमानी बनतील, घाबरायला
तर भक्तिमार्गामध्ये होते. तुम्ही सर्व आहात महावीर. दुनियेमध्ये तर कोणीही जाणत
नाहीत की मायेवर कसा विजय प्राप्त केला जातो. मुलांच्या आता लक्षात आले आहे. पहिले
देखील बाबांनी सांगितले होते - मनमनाभव. पतित-पावन बाबाच येऊन हे समजावून सांगतात,
भले गीतेमध्ये शब्द आहेत परंतु असे कोणी समजावून सांगत नाहीत. बाबा म्हणतात -
‘मुलांनो, देही-अभिमानी भव’. गीतेमध्ये शब्द तर आहेत ना - पिठातील मिठा प्रमाणे.
बाबा प्रत्येक गोष्टी विषयी निश्चय पक्का करवून घेतात. निश्चय-बुद्धी विजयन्ती.
तुम्ही आता बाबांकडून
वारसा घेत आहात. बाबा म्हणतात - गृहस्थ व्यवहारांमध्ये देखील जरूर राहायचे आहे.
सर्वांनी इथे येऊन बसण्याची गरज नाही. सेवा करायची आहे, सेंटर्स उघडायची आहेत.
तुम्ही आहात सैलवेशन आर्मी (मुक्ती सेना). ईश्वरीय मिशन आहात ना. पहिले शूद्र मायावी
मिशनचे होता, आता तुम्ही ईश्वरीय मिशनचे बनला आहात. तुमचे खूप महत्त्व आहे. या
लक्ष्मी-नारायणाची महिमा काय आहे. जसे राजा असतात, तसे राज्य करतात. बाकी यांना
म्हणणार सर्वगुण संपन्न, विश्वाचे मालक; कारण त्यावेळी इतर कोणतेही राज्य नसते. आता
मुलांना समजले आहे - विश्वाचे मालक कसे बनावे? आता आपण सो देवता बनत आहोत तर मग
त्यांच्या समोर डोके कसे झुकणार. तुम्ही नॉलेजफुल बनले आहात, ज्यांना नॉलेज नाही आहे
ते डोके टेकवत राहतात. तुम्ही सर्वांच्या ऑक्युपेशनला आता जाणले आहे. चित्र कोणती
चुकीची आहेत, कोणती बरोबर आहेत, ते देखील तुम्ही समजावून सांगू शकता. रावण-राज्या
विषयी देखील तुम्ही समजावून सांगता. हे रावण-राज्य आहे, याला आग लागत आहे. भंभोरला
(या जुन्या दुनियेला) आग लागणार आहे, ‘भंभोर’, विश्वाला म्हटले जाते. शब्द जे गायले
जातात त्यावर समजावून सांगितले जाते. भक्तीमार्गामध्ये तर अनेक चित्रे बनवली आहेत.
वास्तविक खरी पूजा होते - शिवबाबांची, नंतर मग ब्रह्मा, विष्णू, शंकराची. त्रिमूर्ती
जो बनवतात तो बरोबर आहे. नंतर मग हे लक्ष्मी-नारायण बस्स. त्रिमूर्तीमध्ये
ब्रह्मा-सरस्वती देखील येतात. भक्तीमार्गामध्ये किती चित्र बनवतात. हनुमानाची देखील
पूजा करतात. तुम्ही महावीर बनत आहात ना. मंदिरामध्ये देखील कोणाला हत्तीवर स्वार
झालेले, कोणाला घोड्यावर स्वार झालेले दाखवले आहे. आता असे स्वार झालेले थोडेच आहेत.
बाबा म्हणतात - महारथी. महारथी अर्थात हत्तीवर स्वार झालेले. तर त्यांनी मग हत्तीला
वाहन बनवले आहे. हे देखील समजावून सांगितले आहे की, कसे हत्तीला मगर खाऊन टाकते.
बाबा म्हणतात जे महारथी आहेत, कधी-कधी त्यांना देखील माया रुपी मगर गिळंकृत करते.
तुम्हाला आता ज्ञानाची समज मिळाली आहे. चांगल्या-चांगल्या महारथींना माया खाऊन टाकते.
या आहेत ज्ञानाच्या गोष्टी, याचे वर्णन कोणीही करू शकणार नाही. बाबा म्हणतात
निर्विकारी बनायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. कल्प-कल्प बाबा म्हणतात - काम
महाशत्रू आहे. यामध्ये आहे मेहनत. यावर तुम्ही विजय प्राप्त करता. प्रजापित्याचे
बनला आहात तर भाऊ-बहीणी झालात. वास्तविक तुम्ही खरोखर आत्मा आहात. आत्मा, आत्म्याशी
बोलते. आत्माच या कानांद्वारे ऐकते. हे लक्षात ठेवावे लागेल. आपण आत्म्याला ऐकवत
आहोत, देहाला नाही. खरे तर आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत, मग आपसामध्ये भाऊ-बहिणी देखील
आहोत. ऐकवायचे तर भावाला असते. दृष्टी आत्म्याकडे गेली पाहिजे. मी भावाला ऐकवत आहे.
भाई ऐकत आहात? हो, मी आत्मा ऐकत आहे. बिकानेरमध्ये एक मुलगा आहे जो नेहमी
‘आत्मा-आत्मा’ असे म्हणून लिहितो. मी आत्मा या शरीराद्वारे लिहीत आहे. मज आत्म्याचा
हा विचार आहे. माझी आत्मा हे करत आहे. तर हे आत्म-अभिमानी बनणे मेहनतीची गोष्ट आहे
ना. माझी आत्मा नमस्ते करत आहे. जसे बाबा म्हणतात - रूहानी मुलांनो. तर भृकुटीकडे
पहावे लागेल. आत्माच ऐकणारी आहे, आत्म्याला मी ऐकवत आहे. तुमची नजर आत्म्यावर पडली
पाहिजे. आत्मा भृकुटीच्या मध्यभागी आहे. शरीरावर नजर पडल्याने विघ्ने येतात.
आत्म्याशी बोलायचे आहे. आत्म्यालाच पाहायचे आहे. देह-अभिमानाला सोडा. आत्मा जाणते -
बाबा देखील इथे भृकुटीमध्ये बसले आहेत. त्यांना मी नमस्ते करतो. बुद्धीमध्ये हे
ज्ञान आहे की, आपण आत्मा आहोत, आत्माच ऐकते. हे ज्ञान या पूर्वी नव्हते. हा देह
मिळाला आहे पार्ट बजावण्याकरिता; म्हणून देहालाच नाव दिले जाते. यावेळी तुम्हाला
देही-अभिमानी बनून परत जायचे आहे. हे नाव ठेवले आहे पार्ट बजावण्याकरिता. नावाशिवाय
कारभार तर चालू शकणार नाही. तिथे (स्वर्गामध्ये) देखील कारभार तर चालेल ना. परंतु
तुम्ही सतोप्रधान बनता म्हणून तिथे कोणतीही विकर्म बनणार नाहीत. तुम्ही असे कोणते
कामच करणार नाहीत ज्यामुळे विकर्म बनेल. मायेचे राज्यच नाहीये. आता बाबा म्हणतात -
तुम्हा आत्म्यांना परत जायचे आहे. हे तर जुने शरीर आहे नंतर मग जाणार
सतयुग-त्रेतामध्ये. तिथे ज्ञानाची गरजच नाही. इथे तुम्हाला ज्ञान का देतात? कारण
दुर्गतीला प्राप्त झालेले आहात. कर्म तर तिथे देखील करायचे आहे परंतु ते अकर्म होते.
आता बाबा म्हणतात - ‘हथ कार डे…’ आत्मा बाबांची आठवण करते. सतयुगामध्ये तुम्ही पावन
असता त्यामुळे संपूर्ण कारभार पावन असतो. तमोप्रधान रावण राज्यामध्ये तुमचा कारभार
खोटा होतो, म्हणून मनुष्य तीर्थयात्रा इत्यादीवर जातात. सतयुगामध्ये कोणीही पाप करत
नाहीत जे तीर्थ इत्यादीवर जावे लागेल. तिथे तुम्ही जे काही काम करता ते सत्यच करता.
‘सत्या’चे वरदान मिळाले आहे. विकाराची गोष्टच नाही. कारभारामध्ये देखील खोट्याची
गरजच राहत नाही. इथे तर लोभ असल्या कारणाने मनुष्य चोरी, फसवणूक करतात, तिथे या
गोष्टी घडत नाहीत. ड्रामा अनुसार तुम्ही असे फूल बनता. ती आहेच निर्विकारी दुनिया,
ही आहे विकारी दुनिया. संपूर्ण खेळ बुद्धीमध्ये आहे. यावेळीच पवित्र बनण्यासाठी
मेहनत करावी लागेल. योगबलाद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता, योगबळ आहे मुख्य. बाबा
म्हणतात - भक्तिमार्गातील यज्ञ-तप इत्यादी केल्याने कोणीही मला प्राप्त करत नाहीत.
सतो-रजो-तमोमध्ये जायचेच आहे. ज्ञान खूप सोपे आणि रमणीक आहे, मेहनत देखील आहे. या
योगाचीच महिमा आहे ज्याद्वारे तुम्हाला सतोप्रधान बनायचे आहे. तमोप्रधानापासून
सतोप्रधान बनण्याचा रस्ता बाबाच सांगतात. इतर कोणीही हे ज्ञान देऊ शकणार नाही. भले
कोणी चंद्रा पर्यंत जातात, कोणी पाण्यावरून चालत जातात. परंतु तो काही राजयोग नाही
आहे. नरापासून नारायण तर बनवू शकत नाहीत. इथे तुम्ही समजता आपण आदि सनातन देवी-देवता
धर्माचे होतो; जे आता पुन्हा बनत आहोत. स्मृती आली आहे. बाबांनी कल्पापूर्वी देखील
हे समजावून सांगितले होते. बाबा सांगतात निश्चय-बुद्धी विजयन्ती. निश्चय नसेल तर ते
ऐकायला येणारच नाहीत. निश्चय-बुद्धीचे मग संशय-बुद्धी देखील बनतात. खूप
चांगले-चांगले महारथी देखील संशयामध्ये येतात. मायेचे थोडेसे वादळ आल्याने
देह-अभिमान येतो.
हे बापदादा दोघेही
कंबाइंड आहेत ना. शिवबाबा ज्ञान देतात आणि मग निघून जातात किंवा काय होते, कोण सांगू
शकेल. बाबांना विचारा - तुम्ही नेहमीच इथे असता की निघून जाता? बाबांना तर हे तुम्ही
विचारू शकत नाही ना. बाबा म्हणतात मी तुम्हाला रस्ता सांगतो पतितापासून पावन
होण्याचा. येतो-जातो, मला तर खूप कामे करावी लागतात. मुलांकडे सुद्धा जातो,
त्यांच्या द्वारे कार्य करून घेतो. यामध्ये कोणताही संशय येऊ देऊ नका. आपले काम आहे
- बाबांची आठवण करणे. संशय आल्याने कोसळतात (अधोगती होते). माया जोरात थप्पड मारते.
बाबांनी सांगितले आहे अनेक जन्मांच्या अंताच्या देखील अंतामध्ये मी यांच्यामध्ये (ब्रह्मा
बाबांमध्ये) येतो. मुलांना निश्चय आहे खरोखर बाबाच आपल्याला हे ज्ञान देत आहेत, इतर
कोणीही देऊ शकणार नाही. तरीही निश्चय असून देखील कित्येकजण कोसळतात (पतन होते), हे
बाबाच जाणतात. तुम्हाला पावन बनायचे असेल तर बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची)
आठवण करा, बाकी कोणत्या गोष्टींमध्ये जाऊ नका. तुम्ही या अशा गोष्टी करता तेव्हा
लक्षात येते - पक्का निश्चय नाही आहे. पहिले या एका गोष्टीला समजून घ्या ज्यामुळे
तुमची पापे नष्ट होतात, बाकी फालतू गोष्टी करण्याची गरज नाही. बाबांच्या आठवणीने
विकर्म विनाश होतील मग इतर गोष्टींमध्ये का येता! बघा, कोणी प्रश्नोत्तरांमध्ये
गोंधळून जात असेल तर त्याला बोला की तुम्ही या गोष्टींना सोडून एका बाबांच्या
आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करा. संशय आला तर शिक्षण सोडून देईल; मग काहीच
कल्याण होणार नाही. नाडी पाहून समजावून सांगायचे आहे. काही संशय असेल तर एकाच पॉईंट
वर थांबवून ठेवायचे आहे. खूप युक्तीने समजावून सांगावे लागते. मुलांना पहिले तर हा
निश्चय व्हावा की, बाबा आले आहेत, आम्हाला पावन बनवत आहेत. हा तर आनंद होतो ना.
शिकले नाहीत तर नापास होतील, त्यांना मग आनंद तरी कशाला होईल. स्कूलमध्ये शिक्षण तर
एकच असते. मग कोणी शिकून लाखो रुपये कमाई करतात, कोणी ५-१० रुपये कमावतात. तुमचे एम
ऑब्जेक्टच आहे नरापासून नारायण बनणे. राजाई स्थापन होत आहे. तुम्ही मनुष्यापासून
देवता बनणार. देवतांची तर मोठी राजधानी आहे, त्यामध्ये उच्च पद प्राप्त करणे ते मग
अभ्यास आणि वर्तणुकीवर अवलंबून आहे. तुमची वर्तणुक खूप चांगली असली पाहिजे. बाबा (ब्रह्मा
बाबा) आपल्यासाठी देखील म्हणतात - आता कर्मातीत अवस्था बनलेली नाही आहे. आपल्याला
देखील संपूर्ण बनायचे आहे, आता अजून बनलेलो नाही आहोत. ज्ञान तर खूप सोपे आहे.
बाबांची आठवण करणे देखील सोपे आहे परंतु जेव्हा करतील तेव्हा ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणत्याही
गोष्टीमध्ये संशय-बुद्धी बनून शिक्षण सोडायचे नाही. पहिले तर पावन बनण्याकरिता एका
बाबांची आठवण करायची आहे, इतर गोष्टींमध्ये जायचे नाही.
२) शरीराकडे दृष्टी
गेल्याने विघ्न येतात, म्हणून भृकुटीमध्ये पहायचे आहे. आत्मा समजून, आत्म्याशी
बोलायचे आहे. आत्म-अभिमानी बनायचे आहे. निर्भय बनून सेवा करायची आहे.
वरदान:-
सदैव बाबांच्या
अविनाशी आणि नि:स्वार्थ प्रेमामध्ये लवलीन राहणारे मायाप्रूफ भव
जी मुले नेहमी
बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहतात त्यांना माया आकर्षित करू शकत नाही. जसे
वॉटरप्रूफ कपडा असतो तर त्यावर पाण्याचा एक थेंब सुद्धा टिकत नाही. असे जे लगनमध्ये
(प्रेमामध्ये) लवलीन राहतात ते माया प्रूफ बनतात. माया कोणत्याही प्रकारचा वार करू
शकत नाही कारण बाबांचे प्रेम अविनाशी आणि नि:स्वार्थ आहे, याचे जे अनुभवी बनले आहेत
ते अल्पकाळाच्या प्रेमामध्ये अडकू शकत नाहीत. एक बाबा आणि दुसरा मी, दोघांच्या मध्ये
तिसरा कोणीही येऊ शकत नाही.
बोधवाक्य:-
न्यारा-प्यारा
(अलिप्त आणि प्रेमळ) होऊन कर्म करणाराच सेकंदामध्ये फुलस्टॉप लावू शकतो.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.
कर्मातीत अर्थात
कर्माच्या अधीन होणारा नाही परंतु मालक बनून, ऑथॉरिटी बनून कर्मेंद्रियांच्या
संबंधामध्ये येईल, विनाशी कामनेपासून न्यारा होऊन कर्मेंद्रिया द्वारे कर्म करेल.
आत्मा मालकाला कर्म आपल्या अधीन करू नये परंतु अधिकारी बनून कर्म करत राहील. करवून
घेणारा बनून कर्म करुन घेणे - यालाच म्हणणार कर्माच्या संबंधामध्ये येणे. कर्मातीत
आत्मा संबंधामध्ये येते, बंधनामध्ये नाही.