13-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - इथे तुमचे सर्व काही गुप्त आहे, त्यामुळे तुम्हाला कोणताही थाट करायचा नाही आहे, आपल्या नव्या राजधानीच्या नशेमध्ये राहायचे आहे”

प्रश्न:-
श्रेष्ठ धर्म आणि दैवी कर्म यांच्या स्थापनेसाठी तुम्ही मुले कोणती मेहनत करता?

उत्तर:-
तुम्ही आता ५ विकारांना सोडण्याची मेहनत करता, कारण या विकारांनीच सर्वांना भ्रष्ट बनवले आहे. तुम्ही जाणता यावेळी सर्वजण दैवी धर्म आणि कर्म यांच्यापासून भ्रष्ट आहेत. बाबाच श्रीमत देऊन श्रेष्ठ धर्म आणि श्रेष्ठ दैवी कर्माची स्थापना करतात. तुम्ही श्रीमतावर चालून बाबांच्या आठवणीद्वारे विकारांवर विजय प्राप्त करता. अभ्यासाने स्वतःला राजतिलक देता.

गीत:-
तुम्हें पाके…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी हे गाणे ऐकले. रुहानी मुलेच म्हणतात की ‘बाबा’. मुले जाणतात हे बेहदचे बाबा बेहदचे सुख देणारे आहेत अर्थात ते सर्वांचे पिता आहेत. सर्व बेहदची मुले, आत्मे त्यांची आठवण करत राहतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आठवण करतात परंतु त्यांना हे ठाऊक नाही आहे की आपल्याला त्या परमपिता परमात्म्याकडून कोणती विश्वाची बादशाही मिळते. तुम्ही जाणता - आपल्याला बाबा जे सतयुगी विश्वाची बादशाही देतात, ती अटल, अखंड, अडोल आहे, ती आपली बादशाही २१ जन्म कायम राहते. साऱ्या विश्वावर आपले राज्य असते ज्याला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, लुटू शकत नाही. आपली राजाई आहे अडोल कारण तिथे एकच धर्म आहे, द्वैत नाही आहे. ते आहे अद्वैत राज्य. मुले जेव्हा पण गाणे ऐकतात तेव्हा आपल्या राजधानीचा नशा चढला पाहिजे. अशा प्रकारची गाणी घरामध्ये असायला हवीत. तुमचे सर्व काही गुप्त आहे आणि मोठमोठ्या लोकांचा मोठा थाट असतो. तुमचा काही थाट नाही आहे. तुम्ही बघता बाबांनी ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे ते देखील किती साधारण राहतात. हे देखील मुले जाणतात इथे प्रत्येक मनुष्य अनराइटीयस (दुराचारी) आहेत, छी-छी कामच करतात, म्हणून बेसमज (निर्बुद्ध) म्हटले जाते. बुद्धीला अगदीच कुलूप लागलेले आहे. तुम्ही किती बुद्धिमान होता. विश्वाचे मालक होता. आता मायेने इतके निर्बुद्ध बनवले आहे जे काहीच कामाचे राहिलेले नाहीत. बाबांकडे जाण्यासाठी यज्ञ-तप इत्यादी खूप करत राहतात परंतु मिळत काहीच नाही. असेच धक्के खात राहतात. दिवसेंदिवस अकल्याणच होत जाते. जेवढे मनुष्य तमोप्रधान होतात, तेवढे अकल्याण होणारच आहे. ऋषी-मुनी ज्यांचे गायन आहे ते पवित्र राहत होते. नेती-नेती म्हणत होते. आता तमोप्रधान बनले आहेत तर म्हणतात - शिवोहम् ततत्वम्, सर्वव्यापी आहे, तुझ्या-माझ्यात सर्वांमध्ये आहे. ते लोक फक्त ‘परमात्मा’ म्हणतात. ‘परमपिता’ कधीच म्हणणार नाहीत. परमपिता, त्यांना मग सर्वव्यापी म्हणणे हे तर चुकीचे ठरते म्हणून मग ईश्वर किंवा परमात्मा म्हणतात. ‘पिता’ शब्द बुद्धीमध्ये येत नाही. नाही म्हणायला काहीजण म्हणतात देखील परंतु तेही म्हणण्या पुरते. जर ते ‘परमपिता’ आहेत असे समजले तर बुद्धी एकदम उजळून निघेल. बाबा स्वर्गाचा वारसा देतात, ते आहेतच हेवनली गॉड फादर. मग आपण नरकामध्ये का पडलो आहोत. आता आम्ही मुक्ती-जीवनमुक्ती कशी मिळवू शकतो. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही. आत्मा पतित बनली आहे. आत्मा आधी सतोप्रधान, हुशार असते नंतर मग सतो, रजो, तमोमध्ये येते, निर्बुद्ध बनते. आता तुम्हाला समज आली आहे. बाबांनी आपल्याला ही आठवण करून दिली आहे. जेव्हा नवीन दुनिया भारत होता तेव्हा आमचेच राज्य होते. एकच मत, एकच भाषा, एकच धर्म, एकच महाराजा-महाराणीचे राज्य होते, मग द्वापरमध्ये वाममार्ग सुरू होतो तेव्हा मग प्रत्येकाच्या कर्मांवर अवलंबून राहते. कर्मानुसार एक शरीर सोडून दुसरे घेतात. आता बाबा म्हणतात - मी तुम्हाला अशी कर्म शिकवतो ज्यामुळे २१ जन्म तुम्ही बादशाही प्राप्त करता. भले तिथेही हदचा पिता तर मिळतो परंतु तिथे हे ज्ञान राहत नाही की हा राजाईचा वारसा बेहदच्या बाबांनी दिलेला आहे. मग द्वापर पासून रावण राज्य सुरू होते, विकारी नाते होते. मग कर्मानुसार जन्म मिळतो. भारतामध्ये पूज्य राजा सुद्धा होते तर पुजारी राजा सुद्धा आहेत. सतयुग-त्रेतामध्ये सर्व पूज्य असतात. तिथे पूजा किंवा भक्ती काही असत नाही मग द्वापरमध्ये जेव्हा भक्तीमार्ग सुरू होतो तर यथा राजा-राणी तथा प्रजा पुजारी, भक्त बनतात. मोठ्यात मोठा राजा जो सूर्यवंशी पूज्य होता तोच पुजारी बनतो.

आता तुम्ही जे व्हाईसलेस बनता, त्याचे प्रारब्ध २१ जन्मांसाठी आहे. नंतर मग भक्तीमार्ग सुरू होतो. देवतांची मंदिरे बनवून पूजा करत राहतात. हे फक्त भारतामध्येच घडते. ८४ जन्मांची कहाणी जी बाबा ऐकवतात, ही देखील भारतवासीयांकरिताच आहे. इतर धर्माचे तर येतातच मागाहून. मग तर वृद्धी होत-होत प्रचंड लोकसंख्या होते. व्हरायटी धर्मवाल्यांची भिन्न-भिन्न फीचर्स, प्रत्येक गोष्टीमध्ये विभिन्नता असते. रीती-रिवाज देखील भिन्न-भिन्न असतात. भक्तिमार्गासाठी सामग्री देखील हवी. जसे बीज छोटे असते आणि झाड किती मोठे असते. झाडाची पाने इत्यादी मोजू शकत नाही. तसाच भक्तीचा देखील विस्तार होतो. असंख्य शास्त्रे तयार करत जातात. आता बाबा मुलांना म्हणतात - ही भक्ती मार्गाची सामग्री सर्व नष्ट होते. आता मज पित्याची आठवण करा. भक्तीचा प्रभाव देखील खूप आहे ना. किती सुंदर आहे, नाच, तमाशा, गायन इत्यादी किती खर्च करतात. आता बाबा म्हणतात - मज पित्याची आणि वारशाची आठवण करा. आदि सनातन आपल्या धर्माची आठवण करा. तुम्ही जन्म-जन्मांतर अनेक प्रकारची भक्ती करत आला आहात. संन्यासी देखील आत्म्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला, तत्वाला परमात्मा समजतात. ‘ब्रह्म’चीच किंवा ‘तत्व’चीच आठवण करतात. वास्तविक संन्यासी जेव्हा सतोप्रधान आहेत तर त्यांना जंगलामध्ये जाऊन राहायचे आहे शांतीमध्ये. असे नाही की त्यांना ब्रह्ममध्ये जाऊन लीन व्हायचे आहे. ते समजतात ‘ब्रह्म’तत्वाच्या आठवणीमध्ये राहिल्याने, त्याच आठवणीमध्ये शरीर सोडल्याने ‘ब्रह्म’मध्ये लीन होऊन जाऊ. बाबा म्हणतात - कोणीही लीन होऊ शकत नाही. आत्मा तर अविनाशी आहे ना, ती लीन कशी होऊ शकते. भक्तिमार्गामध्ये किती डोकेफोड करतात, मग म्हणतात भगवान कोणत्या ना कोणत्या रूपात येतील. आता राईट कोण? ते म्हणतात - ‘आम्ही ‘ब्रह्म’शी योग लावल्याने ब्रह्ममध्ये लीन होऊ’. गृहस्थ धर्मवाले म्हणतात भगवान कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पतितांना पावन बनविण्यासाठी येतील. असे नाही की वरून प्रेरणे द्वारेच शिकवतील. टीचर घर बसल्या प्रेरणा देतील काय! ‘प्रेरणा’ शब्दच नाही आहे. प्रेरणेने काही काम होत नाही. भले शंकराच्या प्रेरणेने विनाश होतो असे म्हटले जाते परंतु प्रत्यक्षात आहे ही ड्रामातील नोंद. त्यांना ही मुसळे (मिसाईल) इत्यादी तर बनवायचीच आहेत. ही फक्त महिमा गायली जाते. कोणीही आपल्या मोठ्यांची महिमा जाणत नाहीत. धर्म स्थापकांना देखील गुरु म्हणतात परंतु ते तर फक्त धर्म स्थापन करतात. गुरु त्यांना म्हटले जाते जे सद्गती करतील. ते (इब्राहिम, बुद्ध, क्राईस्ट) तर धर्म स्थापन करण्यासाठी येतात, त्यांच्या मागून त्यांची वंशावळ येत राहते. सद्गती काही कोणाचीच करत नाहीत. तर त्यांना गुरु कसे म्हणणार. गुरु तर एकच आहेत ज्यांना सर्वांचे सद्गती दाता म्हटले जाते. ईश्वर पिताच येऊन सर्वांची सद्गती करतात. मुक्ती-जीवनमुक्ती देतात. त्यांची आठवण कधी कुणाकडून सुटू शकत नाही. भले पतीवर कितीही प्रेम असो तरीही ‘हे भगवान’, ‘हे ईश्वर’ जरूर म्हणतील. कारण तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत. बाबा बसून समजावून सांगतात की, ही सारी रचना आहे, रचयिता पिता मी आहे. सर्वांना सुख देणारा एकच पिता आहे. भाऊ भावाला वारसा देऊ शकत नाही. वारसा नेहमी पित्याकडून मिळतो. तुम्हा सर्व बेहदच्या मुलांना बेहदचा वारसा देतो म्हणूनच माझी आठवण करता - ‘ओ परमपिता, क्षमा करा, दया करा’. समजत काहीच नाहीत. भक्तिमार्गामध्ये अनेक प्रकारची महिमा करतात, हा देखील ड्रामा अनुसार पार्ट बजावत राहतात. बाबा म्हणतात - मी काही यांच्या बोलावण्यावरून येत नाही. हा तर ड्रामा बनलेला आहे. ड्रामामध्ये माझ्या येण्याचा पार्ट नोंदलेला आहे. अनेक धर्मांचा विनाश, एका धर्माची स्थापना किंवा कलियुगाचा विनाश, सतयुगाची स्थापना करायची असते. मी माझ्या ठरलेल्या वेळेवर आपोआप येतो. या भक्तीमार्गाचा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. आता जेव्हा भक्तिमार्गाचा पार्ट पूर्ण झाला आहे तेव्हा मी आलो आहे. मुले देखील म्हणतात, आता आम्हाला माहित झाले आहे, ५००० वर्षानंतर पुन्हा तुम्हाला भेटलो आहोत. कल्पापूर्वी देखील बाबा तुम्ही ब्रह्मा तनामध्येच आला होता. हे ज्ञान तुम्हाला आता मिळत आहे, नंतर कधीही मिळणार नाही. हे आहे ज्ञान, ती आहे भक्ती. ज्ञानाचे आहे प्रारब्ध, चढती कला. सेकंदामध्ये जीवनमुक्ती म्हटले जाते. म्हणतात - जनकाने सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त केली. फक्त एकाच जनकाने जीवनमुक्ती प्राप्त केली काय? जीवनमुक्ती अर्थात या रावण राज्यातून जीवनाला मुक्त करतात.

बाबा जाणतात सर्व मुलांची किती दुर्गती झाली आहे. त्यांची मग सद्गती होणार आहे. दुर्गतीमधून मग उच्च गती, मुक्ती-जीवनमुक्तीला प्राप्त करतात. अगोदर मुक्तीमध्ये जाऊन मग जीवनमुक्तीमध्ये येतील. शांतीने मग सुखधाममध्ये येतील. हे चक्राचे सारे रहस्य बाबांनी समजावून सांगितले आहे. तुमच्यासोबत इतरही धर्म येत जातात, मनुष्य सृष्टीची वृद्धी होत जाते. बाबा म्हणतात यावेळी हे मनुष्य सृष्टीचे झाड तमोप्रधान जडजडीभूत झाले आहे. आदि सनातन देवी-देवता धर्माचे फाउंडेशन संपूर्ण सडले आहे. बाकी सर्व धर्म उभे आहेत. भारतामध्ये एकही कोणी स्वतःला आदि सनातन देवी-देवता धर्माचा समजत नाही. आहेत देवता धर्माचे परंतु यावेळी हे समजत नाहीत की, आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो; कारण देवता तर पवित्र होते. समजतात आम्ही काही पवित्र नाही आहोत. आम्ही अपवित्र पतित स्वतःला देवता कसे म्हणू शकतो? ही देखील ड्रामा प्लॅन अनुसार हिंदू म्हणवून घेण्याची प्रथा पडते. जनगणनेमध्ये देखील हिंदू धर्म लिहितात. भले गुजराती असले तरीही हिंदू-गुजराती म्हणतील. त्यांना विचारा तर खरे की, हिंदू धर्म कुठून आला? तर कोणालाच माहित नाही आहे; फक्त म्हणतात - आमचा धर्म श्रीकृष्णाने स्थापन केला. कधी केला? द्वापर मध्ये. द्वापरपासूनच हे लोक आपल्या धर्माला विसरून हिंदू म्हणू लागले आहेत म्हणूनच त्यांना दैवी-धर्म भ्रष्ट म्हटले जाते. तिथे सर्वजण चांगले कर्म करतात. इथे सर्वजण छी-छी (वाईट) कर्म करतात म्हणून धर्म-भ्रष्ट कर्म-भ्रष्ट म्हटले जाते. आता पुन्हा श्रेष्ठ धर्म, श्रेष्ठ दैवी कर्माची स्थापना होत आहे; म्हणूनच सांगितले जाते - आता या ५ विकारांना सोडत जा. हे विकार अर्ध्याकल्पापासून सोबत राहिले आहेत. आता एका जन्मामध्ये यांना सोडायचे यामध्येच मेहनत लागते. मेहनती शिवाय थोडीच विश्वाची बादशाही मिळेल. बाबांची आठवण कराल तेव्हाच तुम्ही स्वतःला राजाईचा तिलक देता अर्थात राजाईसाठी अधिकारी बनता. जितके चांगल्या रितीने आठवणीत रहाल, श्रीमतावर चालाल तर तुम्ही राजांचे राजा बनाल. शिकवणारा टीचर तर आला आहे शिकवण्यासाठी. ही पाठशाळा आहेच मुळी मनुष्यापासून देवता बनण्याची. नरापासून नारायण बनण्याची कथा ऐकवतात. ही कथा किती प्रसिद्ध आहे. याला अमरकथा, सत्यनारायणाची कथा, तीजरीची कथा देखील म्हणतात. तिघांचाही अर्थ देखील बाबा समजावून सांगतात. भक्तिमार्गाच्या तर अनेक कथा आहेत. तर बघा गाणे किती सुंदर आहे. बाबा आम्हाला संपूर्ण विश्वाचे मालक बनवतात, जो मालकीपणा कोणीही लुटू शकत नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नेहमी हे लक्षात ठेवायचे आहे की, आपण एक मत, एक राज्य, एक धर्माच्या स्थापनेसाठी निमित्त आहोत म्हणून एक मत होऊन राहायचे आहे.

२) स्वतःला राजाईचा तिलक देण्याकरिता विकारांना सोडण्याची मेहनत करायची आहे. शिक्षणावर पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे.

वरदान:-
कर्मातीत स्टेजवर स्थित राहून चारी बाजूंच्या सेवेला हँडल करणारे सिद्धी स्वरूप भव

पुढे चालून चारी बाजूंच्या सेवेच्या विस्ताराला हँडल करण्यासाठी विविध साधनांचा वापर करावा लागेल कारण त्यावेळी पत्र व्यवहार किंवा टेलिग्राम, टेलिफोन इत्यादी कार्य करणार नाहीत. अशा वेळेस वायरलेस सेट पाहिजे. यासाठी आता-आता कर्मयोगी, आता-आता कर्मातीत स्टेजमध्ये स्थित राहण्याचा अभ्यास करा. तेव्हा सर्वत्र संकल्पाच्या सिद्धीद्वारे सेवेमध्ये सहयोगी बनू शकाल.

बोधवाक्य:-
परमात्म प्रेमाच्या पालनेचे स्वरूप - तुमचे सहजयोगी जीवन आहे.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.

प्रत्येकाला दोन गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या आहेत - एक नेहमी संस्कारांना एकसमान बनविण्याची युनिटी. दुसरी एकमेकांवर विश्वास ठेवून नेहमी संतुष्ट राहणे आणि सर्वांना संतुष्ट करायचे आहे. जेव्हा या दोन गोष्टी नेहमी लक्षात राहतील तेव्हा बाबा जे आहेत, जसे आहेत, तसेच दिसून येतील आणि प्रत्यक्षता होईल.