13-04-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.12.2004  ओम शान्ति   मधुबन


“या वर्षाच्या आरंभापासूनच बेहदची वैराग्यवृत्ती इमर्ज करा, हीच मुक्तिधामच्या गेटची चावी आहे”


आज नवयुग रचता बापदादा आपल्या मुलांसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी, परमात्मा मिलन साजरे करण्यासाठी मुलांच्या प्रेमापोटी आपल्या दूर देशातून साकार वतनमध्ये मिलन साजरे करण्यासाठी आले आहेत. दुनियेमध्ये तर नववर्षाची मुबारक एकमेकांना देतात. परंतु बापदादा तुम्हा मुलांना नवयुग आणि नवीन वर्षाची, दोन्हींची मुबारक देत आहेत. नवीन वर्ष तर एक दिवस साजरे करायचे आहे. नवयुग तर तुम्ही संगमावर कायम साजरे करत राहता. तुम्ही देखील सर्वजण परमात्म प्रेमाच्या आकर्षणाने ओढीने इथपर्यंत पोहोचला आहात. परंतु सर्वात दूर देशावरून येणारे कोण? डबल विदेशी? ते तर तरीही या साकार देशामध्येच आहेत परंतु दूरदेशी बापदादा किती दुरून आले आहेत? हिशोब काढू शकता, किती मैलावरून आले आहेत? तर दूरदेशी बापदादा चोहो बाजूंच्या मुलांना भले समोर डायमंड हॉलमध्ये बसले आहेत, किंवा मधुबन मध्ये बसले आहेत, किंवा ज्ञान सरोवरमध्ये बसले आहेत, गॅलरीमध्ये बसले आहेत, तुम्हा सर्वांसोबत जे दूर बसून देश-विदेशमध्ये बापदादांसोबत मिलन साजरे करत आहेत, बापदादा बघत आहेत सर्वजण किती प्रेमाने, दुरून बघत सुद्धा आहेत, ऐकत सुध्दा आहेत. तर चारी बाजूच्या मुलांना नवयुग आणि नवीन वर्षाची पदम गुणा मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. मुलांसाठी तर नवयुग डोळ्यांसमोर आहे ना! बस्स, आज संगमावर आहोत, उद्या आपल्या नवयुगामध्ये राज्य अधिकारी बनून राज्य करणार. इतके जवळ अनुभव होत आहे का? आज आणि उद्याचीच तर गोष्ट आहे. काल होता, उद्या परत होणार आहे. आपल्या नवयुगाचा, गोल्डन युगाचा गोल्डन ड्रेस समोर दिसत आहे? किती सुंदर आहे! स्पष्ट दिसत आहे ना? आज साधारण ड्रेसमध्ये आहोत उद्या नवयुगाच्या सुंदर ड्रेसमध्ये चमकताना दिसणार. नवीन वर्षामध्ये तर एका दिवसासाठी एकमेकांना गिफ्ट देतात. परंतु नवयुग रचता बापदादांनी तुम्हा सर्वांना गोल्डन वर्ल्डची सौगात दिली आहे, जी अनेक जन्म चालणार आहे. विनाशी सौगात नाहीये. अविनाशी सौगात बाबांनी तुम्हा मुलांना दिली आहे. लक्षात आहे ना! विसरला तर नाही आहात ना! सेकंदामध्ये येऊ-जाऊ शकता. आता-आता संगमावर, आता-आता आपल्या गोल्डन दुनियेमध्ये पोहोचता की वेळ लागतो? आपले राज्य स्मृतीमध्ये येत आहे ना!

आजच्या दिवसाला निरोपाचा दिवस म्हटले जाते आणि बारा वाजल्यानंतर बधाईचा दिवस (शुभेच्छांचा दिवस) म्हटले जाईल. तर निरोपाच्या दिवशी, गतवर्षाला निरोप देण्यासोबतच तुम्ही सर्वांनी गतवर्षा सोबत आणखी कशाला निरोप दिलात? चेक केलेत कायमसाठी निरोप दिला का थोड्या वेळासाठी निरोप दिला? बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की, वेळ फार तीव्र गतीने पुढे जात आहे, तर पूर्ण वर्षाच्या रिझल्टमध्ये चेक केले आहे का की, माझ्या पुरुषार्थाची गती तीव्र होती? का कधी कशी, कधी कशी होती? दुनियेच्या कठीण परिस्थितीला पाहून आता आपल्या विशेष दोन स्वरूपांना इमर्ज करा, ती दोन स्वरूप आहेत - एक सर्वांप्रती दयाळू आणि कल्याणकारी आणि दुसरे प्रत्येक आत्म्याप्रती सदैव दात्याची मुले मास्टर दाता. विश्वातील आत्मे बिलकुल शक्तिहीन, दुःखी, अशांत ओरडत आहेत. बाबांसमोर, तुम्हा पूज्य आत्म्यांच्या समोर आळवणी करत आहेत - काही क्षणांसाठी तरी सुख द्या, शांती द्या. खुशी द्या, हिंमत द्या. बाबा तर मुलांच्या दुःखाला, कष्टाला पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत. तुम्हा सर्व पूज्य आत्म्यांना दया येत नाही काय? मागत आहेत - द्या, द्या, द्या. तर दात्याची मुले किमान ओंजळभर तरी द्या. बाप देखील तुम्हा मुलांना साथी बनवून, मास्टर दाता बनवून, आपला राईट हँड बनवून हाच इशारा देत आहेत - इतक्या विश्वाच्या आत्म्यांना सर्वांना मुक्ती द्यायची आहे. मुक्तिधाममध्ये जायचे आहे. तर हे दात्याच्या मुलांनो, आपल्या श्रेष्ठ संकल्पा द्वारे, मनसा शक्ती द्वारे, वाणी द्वारे, संबंध संपर्का द्वारे, शुभ-भावना, शुभ-कामने द्वारे, व्हायब्रेशन, वायुमंडळा द्वारे कोणत्याही युक्तीने मुक्ती द्या. ओरडत आहेत मुक्ती द्या, बापदादा आपल्या राईट हॅंड्सना म्हणतात - दया करा.

आता पर्यंतचा हिशोब काढा. भले मेगा प्रोग्राम केला आहे, कॉन्फरन्स केली आहे, भले भारतामध्ये किंवा विदेशांमध्ये सेंटर्स देखील उघडली आहेत परंतु टोटल विश्वामध्ये आत्म्यांच्या संख्येच्या हिशोबाने किती पर्सेंट मध्ये आत्म्यांना मुक्तीचा रस्ता सांगितला आहे? फक्त भारतासाठी कल्याणकारी आहात का विदेशामध्ये जे काही ५ खंड आहेत, तर जिथे-जिथे सेवाकेंद्र उघडली आहेत तिथले कल्याणकारी आहात का विश्वाचे कल्याणकारी आहात? विश्वाचे कल्याण करण्यासाठी प्रत्येक मुलाला बाबांचा हँड, राईट हँड बनायचे आहे. कोणालाही काही द्यायचे असेल तर कशाने दिले जाते? हातांनीच दिले जाते ना. तर बापदादांचे तुम्ही हँड्स आहात ना, हात आहात ना. तर बापदादा राईट हँड्सना विचारत आहेत, किती टक्के कल्याण केले आहे? किती टक्के झाले आहे? मला सांगा, हिशोब काढा. पांडव हिशोब करण्यामध्ये हुशार आहेत ना? म्हणून बापदादा म्हणतात आता स्व-पुरुषार्थ आणि सेवेच्या भिन्न-भिन्न विधिद्वारे पुरुषार्थ तीव्र करा (वेगवान करा). स्व-स्थितीमध्ये देखील चार गोष्टी विशेष चेक करा - याला म्हणणार तीव्र पुरुषार्थ.

एक गोष्ट - प्रथम हे चेक करा की निमित्त भाव आहे? कोणत्याही रॉयल रूपातील ‘मी’पणा तर नाही आहे? ‘माझे’पणा तर नाही आहे? साधारण लोकांचा ‘मी’ आणि ‘माझे’ सुद्धा साधारण आहे, वरवरचा आहे परंतु ब्राह्मण जीवनामध्ये ‘माझे’ आणि ‘मी’पणा सूक्ष्म आणि रॉयल आहे. त्याची भाषा माहिती आहे काय आहे? ‘हे तर होतच असते, हे तर चालतच असते. हे तर होणारच आहे. चालत आहोत, बघत आहोत…’ तर एक निमित्त भाव, प्रत्येक गोष्टीमध्ये निमित्त आहे. भले सेवेमध्ये, किंवा स्थितीमध्ये, किंवा संबंध-संपर्कामध्ये चेहरा आणि वर्तन निमित्त भाव असणारे असावे. आणखी त्याची दुसरी विशेषता असेल - निर्मान भावना. ‘निमित्त’ आणि ‘निर्मान’ भावाने निर्माण करणे. तर तीन गोष्टी ऐकल्या - ‘निमित्त’, ‘निर्मान’, आणि ‘निर्माण’ आणि चौथी गोष्ट आहे - ‘निर्वाण’. जेव्हा इच्छा असेल तेव्हा निर्वाणधाम मध्ये पोहोचू शकता. निर्वाण स्थितीमध्ये स्थित व्हा, कारण स्वतः निर्वाण स्थितीमध्ये असाल तेव्हाच दुसऱ्यांना निर्वाणधाममध्ये पोहोचवू शकाल. आता सर्वांना मुक्ती हवी आहे, सोडवा, सोडवा असे ओरडत आहेत. तर या चार गोष्टी चांगल्या प्रमाणात प्रत्यक्ष जीवनामध्ये असणे अर्थात तीव्र पुरुषार्थी. तेव्हा बापदादा म्हणतील वाह! वाह! बच्चे वाह! तुम्ही देखील म्हणाल वाह! बाबा वाह! वाह! ड्रामा वाह! वाह! पुरुषार्थ वाह! परंतु आता काय करता ठाऊक आहे? ठाऊक आहे? कधी ‘वाह!’ म्हणता कधी ‘व्हाय (का)’ असे म्हणतात. वाह! ऐवजी व्हाय, आणि व्हाय मग होते हाय. तर व्हाय नाही, वाह! तुम्हाला देखील काय चांगले वाटते, ‘वाह!’ चांगले वाटते की व्हाय? काय चांगले वाटते? वाह! कधी व्हाय करत नाही ना? चुकून येते.

डबल फॉरेनर्स व्हाय-व्हाय करता का? कधी-कधी म्हणता? जे डबल फॉरेनर्स कधीही व्हाय म्हणत नाहीत त्यांनी हात वर करा. फार थोडे आहेत. अच्छा - भारतवासी, जे वाह! वाह! ऐवजी ‘का’, ‘काय’ म्हणतात त्यांनी हात वर करा. ‘का’, ‘काय’ म्हणता का? कोणी परवानगी दिली आहे तुम्हाला? संस्कारांनी? जुन्या संस्कारांनी तुम्हाला ‘व्हाय’ म्हणायची परवानगी दिली आहे आणि बाबा म्हणतात वाह! वाह! म्हणा. ‘व्हाय-व्हाय’ नाही. तर आता नवीन वर्षामध्ये काय करणार? वाह! वाह! करणार? का कधी-कधी ‘व्हाय’ म्हणण्याची परवानगी द्यावी? व्हाय चांगले नाहीये. जसे वायू (पोटामध्ये गॅस) होतो ना, तर पोट खराब होते ना. तर व्हाय, वायू आहे, असे करू नका. वाह! वाह! किती चांगले वाटते. होय म्हणा, वाह! वाह! वाह!

अच्छा - तर दूर देशामध्ये ऐकत आहेत, बघत आहेत, भारतामध्ये देखील, विदेशामध्ये देखील, त्या मुलांना देखील विचारतात वाह! वाह! करता का व्हाई, व्हाई करता? आता निरोपाचा दिवस आहे ना! आज या वर्षाचा निरोपाचा शेवटचा दिवस आहे. तर सर्वांनी संकल्प करा - ‘व्हाई’ म्हणणार नाही. विचार सुद्धा करणार नाही. क्वेश्चन मार्क नाही, आश्चर्याची मात्रा नाही, बिंदू. क्वेश्चन मार्क लिहा, किती वाकडा आहे आणि बिंदू किती सोपा आहे. बस डोळ्यांमध्ये बाबा बिंदूला सामावून घ्या. जसा पाहण्याचा बिंदू डोळ्यांमध्ये सामावलेला आहे ना! असेच सदैव नयनांमध्ये बिंदू बाबांना सामावून घ्या. सामावून घेणे येते? येते का फिट होत नाही? खाली-वर होते का? तर काय करणार? निरोप कोणाला देणार? ‘व्हाई’ला? कधीही आश्चर्याची रेषा सुद्धा येऊ नये - ‘असे कसे! असे देखील होते का! असे झाले नाही पाहिजे, असे होतेच का! क्वेश्चन मार्क नको, आश्चर्याची मात्रा सुद्धा नको, बस्स, बाबा आणि मी. बरीच मुले म्हणतात - हे तर चालतेच ना! बापदादांना रुहरिहानमध्ये खूप मनोरंजक गोष्टी सांगतात, समोर तर सांगू शकत नाहीत ना. तर रूहरिहानमध्ये सर्व काही सांगतात. ठीक आहे, काहीही चालते परंतु तुम्हाला चालायचे नाही, तुम्हाला उडायचे आहे तर चालण्याच्या गोष्टी का बघता, उडा आणि उडवा. शुभ-भावना, शुभ-कामना अशी शक्तीशाली आहे की, या शुभ भावना, शुभ कामने व्यतिरिक्त, याच्यामध्ये ‘व्हाई’ येऊ नये, म्हणजे ती इतकी पावरफुल आहे ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही अशुभ भावना असणाऱ्याला सुद्धा शुभ भावनेमध्ये बदलू शकता. दुसरे म्हणजे - जर बदलू शकत नसाल तरी देखील तुमची शुभ-भावना, शुभ-कामना अविनाशी आहे, कधी-कधी वाली नाही, अविनाशी आहे त्यामुळे तुमच्यावर अशुभ भावनेचा प्रभाव पडू शकत नाही. प्रश्नांच्या मागे जाता - ‘हे असे का होत आहे? हे किती दिवस चालणार? कसे होणार?’ यामुळे शुभ भावनेची शक्ती कमी होते. नाहीतर ‘शुभ-भावना, शुभ-कामना’ या संकल्पशक्ती मध्ये खूप ताकद आहे. बघा, तुम्ही सर्व बापदादांकडे आला आहात. पहिला दिवस आठवा, बापदादांनी काय केले? भले पतित येवो, पापी येवो, साधारण येवो, भिन्न भिन्न वृत्ती वाले, भिन्न भिन्न भावना वाले येवो, बापदादांनी काय केले? शुभ भावना ठेवली ना! माझे आहात, मास्टर सर्वशक्तिवान आहात, दिलतख्तनशीन आहात, ही शुभ भावना ठेवली ना, शुभ-कामना ठेवली ना, त्यामुळेच तर बाबांचे बनलात ना. बाबांनी म्हटले का की, ‘हे पापी, तू का आला आहेस?’ शुभ भावना ठेवली, माझी मुले, मास्टर सर्वशक्तिवान मुले; जेव्हा बाबांनी तुम्हा सर्वांविषयी शुभ-भावना ठेवली, शुभ-कामना ठेवली तर तुमच्या मनाने काय म्हटले? ‘मेरा बाबा’. बाबांनी काय म्हटले? ‘मेरे बच्चे’. अशीच जर शुभ-भावना, कामना ठेवाल तर काय दिसून येईल? माझा कल्पापूर्वीवाला गोड भाऊ, माझी सिकीलधी बहिण (खूप-खूप वर्षानंतर भेटलेली बहीण). परिवर्तन होईल.

तर या वर्षामध्ये काही करून दाखवायचे आहे. फक्त हात वर करायचा नाही. हात वर करणे खूप सोपे आहे. मनाचा हात वर करा कारण खूप काम बाकी राहिलेले आहे. बापदादांच्या तर नजरेस पडत आहे, विश्वातील आत्म्यांची खूप दया येते. आता प्रकृती सुद्धा हैराण झाली आहे. प्रकृती स्वतः हैराण झाली, तर काय करायचे? आत्म्यांना हैराण करत आहे. आणि बाबांना आपल्या मुलांना पाहून दया येते. तुम्हा सर्वांना दया येत नाही का? फक्त समाचार ऐकून गप्प बसता, बस्स, इतके आत्मे निघून गेले. ते आत्मे संदेशापासून तर वंचित राहिले. आता तरी दाता बना, दयाळू बना. हे तेव्हा होईल, दया तेव्हा येईल जेव्हा या वर्षाच्या आरंभापासून स्वतःमध्ये बेहदची वैराग्य वृत्ती इमर्ज कराल. बेहदची वैराग्य वृत्ती. या देहाची, देहभानाची स्मृती असणे, ही देखील बेहदच्या वैराग्याची कमी आहे. छोट्या-छोट्या हदच्या गोष्टी स्थितीला डगमग करतात, कारण? बेहदची वैराग्य वृत्ती कमी आहे, आकर्षण आहे. वैराग्य नाहीये आकर्षण आहे. जेव्हा पूर्णतः बेहदचे वैरागी बनाल, वृत्तीमध्ये देखील वैरागी, दृष्टीमध्ये देखील बेहदचे वैरागी, संबंध-संपर्कामध्ये, सेवेमध्ये सर्वांमध्ये बेहदचे वैरागी… तेव्हाच मुक्तीधामचा दरवाजा उघडेल. आता तर जे आत्मे शरीर सोडून जात आहेत आणि परत जन्म घेणार, परत दु:खी होणार. आता मुक्तिधामचे गेट उघडण्यासाठी निमित्त तर तुम्ही आहात ना? ब्रह्मा बाबांचे साथीदार आहात ना! तर गेट उघडण्याची चावी आहे - बेहदची वैराग्य वृत्ती. अजून चावी लागलेली नाही आहे, चावी तयारच नाहीये की आहे. ब्रह्माबाबा देखील वाट पाहत आहेत, ॲडव्हान्स पार्टी देखील वाट पाहत आहे, प्रकृती देखील वाट पाहत आहे, खूप हैराण झाली आहे. माया देखील आपले दिवस मोजत आहे. आता बोला, हे मास्टर सर्वशक्तिवान, बोला काय करायचे आहे?

या वर्षांमध्ये काही नवीन तर कराल ना! नवीन वर्ष म्हणता मग नवीनता तर कराल ना! आता बेहदच्या वैराग्याची, मुक्तिधामला जाण्याची चावी तयार करा. तुम्हा सर्वांना तर आधी मुक्तीधाममध्ये जायचे आहे ना. ब्रह्मा बाबांना वचन दिले आहे - सोबत जाणार, सोबत येणार, सोबत राज्य करणार, सोबत भक्ती करणार… तर आता तयारी करा, या वर्षामध्ये करणार की दुसरे वर्ष पाहिजे? जे समजतात या वर्षांमध्ये अटेंशन प्लीज, पुन्हा-पुन्हा करणार त्यांनी हात वर करा. करणार? मग तर ॲडव्हान्स पार्टी तुम्हाला खूप मुबारक देईल. ते देखील थकले आहेत. अच्छा - टीचर्स काय म्हणता? पहिली लाईन काय म्हणते आहे? आधी तर पहिल्या लाईन मधले पांडव आणि पहिल्या लाईन मधल्या शक्ती जे करणार आहेत त्यांनी हात वर करा. अर्धवट हात नको, अर्धवट हात वर कराल तर म्हणणार अर्धे करणार. पूर्ण उंच हात वर करा. अच्छा. मुबारक असो, मुबारक असो. अच्छा - डबल विदेशी हात वर करा. एकमेकांकडे बघा कोणी हात वर केला नाहीये. अच्छा, हा सिंधी ग्रुप देखील हात वर करत आहे, कमाल आहे. तुम्ही देखील करणार? सिंधी ग्रुप तुम्ही कराल? मग तर डबल मुबारक असो. खूप चांगले. एकमेकांना साथ देऊन, शुभ भावनेचा इशारा देत, हातामध्ये हात मिळवत करायचेच आहे. अच्छा (सभेमध्ये कोणीतरी आवाज केला) सर्वांनी खाली बसा, नथिंग न्यू.

आत्ता लगेच एका सेकंदामध्ये बिंदू बनून बिंदू बाबांची आठवण करा आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याला बिंदू लावा. लावू शकता? बस्स, एका सेकंदामध्ये - “मी बाबांचा, बाबा माझे”. अच्छा.

आता चारही बाजूंच्या सर्व नव युगाच्या मालक मुलांना, चारही बाजूंच्या नवीन वर्ष साजरे करणाऱ्या उमंग-उत्साहवाल्या मुलांना, सदा उडत रहायचे आहे आणि उडवत रहायचे अशा उडती कलावाल्या मुलांना, सदैव तीव्र पुरुषार्थाद्वारे विजयी माळेचे मणी बनणाऱ्या विजयी रत्नांना बापदादांच्या नवीन वर्ष आणि नवीन युगाच्या आशीर्वादांसोबतच पदम गुणा थाळ्या भर-भरून मुबारक असो, मुबारक असो. एका हाताची टाळी वाजवा. अच्छा!

वरदान:-
एकाग्रतेच्या अभ्यासाद्वारे एकरस स्थिती बनविणारे सर्व सिद्धी स्वरूप भव

जिथे एकाग्रता आहे तिथे स्वतः एक रस स्थिती असते. एकाग्रतेमुळे संकल्प, बोल आणि कर्मातील व्यर्थपणा समाप्त होतो आणि समर्थपणा येतो. एकाग्रता अर्थात एकाच श्रेष्ठ संकल्पामध्ये स्थित राहणे. ज्या एका बीज रुपी संकल्पामध्ये संपूर्ण वृक्षरूपी विस्तार सामावलेला आहे. एकाग्रतेला वाढवा तर सर्व प्रकारची हलचल समाप्त होईल. सर्व संकल्प, बोल आणि कर्म सहजच सिद्ध होतील त्यासाठी एकांतवासी बना.

सुविचार:-
एकदा झालेल्या चुकीविषयी सारखा-सारखा विचार करणे अर्थात डागावर डाग लावणे त्यामुळे होऊन गेलेल्या गोष्टींना बिंदू लावा.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृतीद्वारे सदा विजयी बना”

जसे यावेळी आत्मा आणि शरीर कंबाइंड आहे, तसे बाबा आणि तुम्ही कंबाइंड रहा. फक्त हे लक्षात ठेवा की, “मेरा बाबा”. आपल्या मस्तकावर सदा सोबतीचा तिलक लावा. जे सौभाग्य असते, सोबत असते ते कधीच विसरायला होत नाही. तर साथीदाराला नेहमी सोबत ठेवा. जर सोबत रहाल तर सोबत याल. सोबत रहायचे आहे, सोबत जायचे आहे, प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्पामध्ये सोबतच आहे.