13-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - अनेक देहधारींमधून प्रीत काढून एका विदेही बाबांची आठवण करा तर तुमची
सर्व अंगे (कर्मेंद्रिये) शीतल होतील”
प्रश्न:-
जे दैवी
कुळातील आत्मे आहेत, त्यांची लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
१. दैवी कुळातील आत्म्यांना या जुन्या दुनियेपासून सहजच वैराग्य येईल. २. त्यांची
बुद्धी बेहदमध्ये असेल. शिवालयामध्ये जाण्यासाठी ते पावन फूल बनण्याचा पुरुषार्थ
करतील. ३. कोणतेही आसुरी वर्तन करणार नाहीत. ४. आपला पोतामेल (चार्ट) ठेवतील की
आपल्याकडून कोणते आसुरी कर्म तर नाही झाले? बाबांना खरे काय ते सांगतील. काहीही
लपवणार नाहीत.
गीत:-
ना वह हमसे
जुदा होंगे…
ओम शांती।
आता या आहेत बेहदच्या गोष्टी. सर्व हदच्या गोष्टी निघून जातात. दुनियेमध्ये तर
अनेकांची आठवण केली जाते, अनेक देहधारींवर प्रीत आहे. विदेही तर एकच आहेत , ज्यांना
‘परमपिता परमात्मा शिव’ म्हटले जाते. तुम्हाला आता त्यांच्यासोबतच बुद्धीचा योग
जोडायचा आहे. कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. ब्राह्मणांना जेवू घालणे
इत्यादी, हे सर्व आहेत कलियुगातील रीती-रिवाज. इथले रीती-रिवाज आणि तिथले
रीती-रिवाज एकदम वेगळे आहेत. इथे कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. जोपर्यंत
ती अवस्था येत नाही तोपर्यंत पुरुषार्थ चालतच राहतो. बाबा म्हणतात - जितके शक्य
असेल तितके जुन्या दुनियेमध्ये जे होऊन गेले आहेत किंवा जे आहेत त्या सर्वांना
विसरायचे आहे. पूर्ण दिवस बुद्धीमध्ये हेच चालत रहावे की कोणाला काय समजावून
सांगायचे. सर्वाना सांगायचे आहे की, येऊन दुनियेचा भूतकाळ, वर्तमान, आणि भविष्याला
समजून घ्या, ज्याला कोणीही जाणत नाहीत. भूतकाळ अर्थात केव्हापासून सुरुवात झाली.
वर्तमान अर्थात आता काय आहे. सुरुवात झाली आहे सतयुगापासून. तर सतयुगापासून आता
पर्यंत आणि भविष्यामध्ये काय होणार आहे या विषयी दुनिया अजिबात जाणत नाही. तुम्ही
मुले जाणता म्हणून चित्र इत्यादी बनवता. हे आहे बेहदचे मोठे नाटक. ती हदची खोटी
नाटके तर खूप बनतात. स्टोरी बनविणारे वेगळे असतात आणि नाटकाची सीन-सिनेरी बनविणारे
वेगळे असतात. हे सर्व रहस्य आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आता जे काही बघत आहात ते
राहणार नाही. विनाश होईल. तर तुम्हाला सतयुगी नवीन दुनियेतील सीन-सिनेरी खूप सुंदर
दाखवावी लागेल. जसे अजमेरमध्ये सोन्याची द्वारका आहे, तर त्यातूनही सिन-सिनेरी घेऊन
वेगळी नवीन दुनिया बनवून नंतर मग दाखवा. या जुन्या दुनियेला आग लागणार आहे, याचा
देखील नकाशा तर आहे ना; आणि ही नवीन दुनिया इमर्ज होत आहे. अशा प्रकारे विचार करून
चांगल्या रीतीने बनवले पाहिजे. हे तर तुम्ही समजता. यावेळी मनुष्यांची एकदम जशी
पत्थर-बुद्धी आहे. तुम्ही किती समजावून सांगता तरी देखील बुद्धीमध्ये जातच नाही. जसे
नाटकवाले सुंदर सीन-सीनेरी बनवतात, तशी कोणाची तरी मदत घेऊन स्वर्गाची सिन-सीनेरी
खूप सुंदर बनवली पाहिजे. ते लोक चांगली आयडिया देतील. युक्ती सांगतील. त्यांना
समजावून सांगून असा सुंदर सीन बनवला पाहिजे ज्यामुळे मनुष्य येऊन समजून घेतील.
खरोखर सतयुगामध्ये तर एकच धर्म होता. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत ज्यांना
धारणा होते. देह-अभिमानी बुद्धीला छी-छी (पतित) म्हटले जाते. देही-अभिमानीला
गुल-गुल (फूल) म्हटले जाते. आता तुम्ही फूल बनता. देह-अभिमानी होऊन राहिल्याने काटे
ते काटेच राहतात. तुम्हा मुलांना तर या जुन्या दुनियेपासून वैराग्य आहे. तुमची आहे
बेहदची बुद्धी, बेहदचे वैराग्य. आम्हाला या वैश्यालयाचा खूप तिरस्कार वाटतो. आता
आपण शिवालयामध्ये जाण्याकरिता फूल बनत आहोत. बनत असताना देखील जर कोणाचे असे खराब
वर्तन होते तर समजले जाते यांच्यामध्ये आता भुताची प्रवेशता आहे. एकाच घरामध्ये पती
हंस बनत असतो आणि पत्नीला समजत नाही तर अवघड होते. सहन करावे लागते. समजले जाते
यांच्या भाग्यामध्ये नाही आहे. सगळेच काही दैवी कुळाचे बनणारे नाही आहेत, जे बनणारे
असतील तेच बनतील. बऱ्याच जणांचे खराब वर्तन असल्याचे रिपोर्ट्स येतात की, हा-हा
आसुरी गुण आहे; म्हणून बाबा दररोज समजावून सांगतात - रात्रीला आपला पोतामेल (चार्ट)
बघा की आज कोणतेही आसुरी काम तर आपण केले नाही ना? बाबा म्हणतात पूर्ण आयुष्यात ज्या
चुका केल्या आहेत, त्या सांगा. कोणती मोठी चूक करतात तर मग सर्जनला सांगण्याची लाज
वाटते कारण इज्जत जाईल ना. परंतु न सांगितल्यामुळे मग नुकसान होईल. माया अशी चापट
मारते ज्यामुळे एकदम सत्यानाश होतो. माया खूप शक्तिशाली आहे. ५ विकारांवर विजय
प्राप्त करू शकत नाही तर बाबा तरी काय करणार.
बाबा म्हणतात - मी
दयाळू देखील आहे तर काळांचा काळ सुद्धा आहे. मला बोलवतातच की, पतित-पावन येऊन पावन
बनवा. दोन्ही माझीच तर नावे आहेत. कसा दयाळू आहे, आणि मग कसा काळांचा काळ आहे, तो
पार्ट आता बजावत आहे. काट्यांना फूल बनवत आहेत तर तुमच्या बुद्धीमध्ये तो आनंद आहे.
अमरनाथ बाबा म्हणतात - तुम्ही सर्वजण पार्वती आहात. आता तुम्ही मामेकम् (मज एकाची)
आठवण करा तर तुम्ही अमरपुरीमध्ये निघून जाल आणि तुमची पापे नष्ट होतील. ती यात्रा
केल्याने तुमची पापे काही नष्ट होत नाहीत. या आहेत भक्तीमार्गाच्या यात्रा. मुलांना
हा प्रश्न देखील विचारतात की, घरखर्च कसा चालतो. परंतु कोणीही असा समाचार देत नाहीत
की, आम्ही याला असा प्रतिसाद दिला. इतकी सर्व मुले ब्रह्माची मुले ब्राह्मण आहेत
आम्हीच आमच्यासाठी खर्च करणार ना. श्रीमतावर राजाई देखील आम्ही स्थापन करत आहोत
स्वतःसाठी. राज्य देखील आम्हीच करणार. राजयोग आम्ही शिकतो तर खर्च देखील आम्हीच
करणार. शिवबाबा तर अविनाशी ज्ञानरत्नांचे दान देतात, ज्याद्वारे आम्ही राजांचाही
राजा बनतो. जी मुले शिकतील तीच खर्च करतील ना. समजावून सांगितले पाहिजे की, आमचा
खर्च आम्हीच खर्च करतो, आम्ही कोणाकडूनही दान अथवा देणगी घेत नाही. परंतु मुले फक्त
लिहितात की, हे देखील विचारतात म्हणून बाबांनी सांगितले होते जे कोणी पूर्ण
दिवसभरामध्ये सेवा करतात त्यांनी रात्री पोतामेल सांगितला पाहिजे. त्यानाही पाठबळ
मिळाले पाहिजे. बाकी येतात तर पुष्कळ. ते सर्व प्रजा बनतात, उच्च पद प्राप्त करणारे
फार थोडे आहेत. राजा फार थोडे असतात, श्रीमंत देखील थोडेजण बनतात. बाकी गरीब
पुष्कळजण असतात. इथे देखील असे आहेत तर दैवी दुनियेमध्ये देखील असेच असतील. राजाई
स्थापन होते, त्यामध्ये नंबरवार सर्व पाहिजेत. बाबा येऊन राजयोग शिकवून आदि सनातन
दैवी राजधानीची स्थापना करतात. दैवी धर्माची राजधानी होती, आता नाही आहे. बाबा
म्हणतात - मी पुन्हा स्थापना करतो. तर कोणालाही समजावून सांगण्यासाठी चित्र देखील
तसे पाहिजे. बाबांची मुरली ऐकलीत, करतील. दिवसेंदिवस सुधारणा तर होतच राहतात. तुम्ही
आपल्या अवस्थेला सुद्धा बघत रहा किती करेक्ट होत जाते. बाबा येऊन घाणीतून (विकारातून)
काढतात, जितके जे अनेकांना काढण्याची सेवा करतील तितके उच्च पद प्राप्त करतील.
तुम्हा मुलांना तर एकदम क्षीरखंड होऊन राहिले पाहिजे. सतयुगापेक्षा देखील इथे बाबा
तुम्हाला श्रेष्ठ बनवतात. बाबा ईश्वर शिकवतात तर त्यांना आपल्या शिक्षणाचा जलवा
दाखवायचा आहे तेव्हाच तर बाबा देखील कुरबान होतील. मनामध्ये आले पाहिजे - बस्स, आता
तर आपण भारताला स्वर्ग बनवण्याचा धंदाच करणार. हे नोकरी इत्यादी करणे, ते तर करतच
राहणार. आधी आपल्या उन्नतीसाठी तर करा. आहे तर खूप सोपे. मनुष्य सर्वकाही करू शकतात.
गृहस्थ व्यवहारामध्ये राहून राजाई पद मिळवायचे आहे, म्हणून दररोज आपला पोतामेल काढा.
संपूर्ण दिवसाचा नफा आणि तोटा काढा. पोतामेल काढला नाहीत तर मग सुधारणे खूप अवघड आहे.
बाबांचे म्हणणे मानत नाहीत. रोज बघितले पाहिजे - कोणाला आपण दुःख तर नाही दिले? पद
खूप उच्च आहे, अथाह कमाई आहे. नाहीतर मग रडावे लागेल. शर्यत असते ना. कोणी तर लाखो
रुपये कमावतात, कोणी तर गरीब ते गरीबच राहतात.
आता तुमची आहे
ईश्वरीय शर्यत, यामध्ये काही धावायचे वगैरे नाहीये फक्त बुद्धीने प्रेमळ बाबांची
आठवण करायची आहे. काहीही चूक झाली तर ताबडतोब बाबांना सांगितली पाहिजे - बाबा,
माझ्याकडून ही चूक झाली. कर्मेंद्रियांद्वारे ही चूक केली. बाबा म्हणतात - बरोबर
काय, चूक काय हा विचार करण्याची बुद्धी मिळाली आहे तर आता चुकीचे काम करायचे नाही.
चुकीचे काम केले - तर बापरे, तोबा-तोबा, क्षमा करा कारण बाबा आता इथे बसले आहेत
ऐकण्यासाठी. काहीही वाईट काम झाले असेल ते ताबडतोब सांगा किंवा लिहा - ‘बाबा, हे
चुकीचे काम झाले आहे’; तर तुमचे अर्धे माफ होईल. असे नाही की मी कृपा करेन. एका
पैशाचीसुद्धा क्षमा अथवा कृपा मिळणार नाही. सर्वांनी स्वतःला सुधारायचे आहे.
बाबांच्या आठवणीने विकर्म विनाश होतील. पास्टचे (भूतकाळातील) सुद्धा योगबलाने नष्ट
होत जाईल. बाबांचे बनून मग बाबांची निंदा करू नका. सद्गुरु के निंदक ठौर न पाये (सद्गुरूच्या
निंदकाला उच्च पद मिळू शकत नाही). ठौर (पद) तुम्हाला मिळते - खूप उच्च. इतर गुरूंकडे
काही राजाईचे पद थोडेच आहे. इथे तुमचे एम ऑब्जेक्ट आहे. भक्तिमार्गामध्ये कोणते एम
ऑब्जेक्ट असत नाही. आणि जरी असेल तरीही अल्पकाळासाठी. कुठे २१ जन्मांचे सुख, कुठे
दीडदमडीचे थोडेसे सुख. असे नाही धनाने सुख मिळते. दुःख देखील किती असते. अच्छा -
समजा कोणी हॉस्पिटल बांधले तर त्याला दुसऱ्या जन्मामध्ये कमी आजार होतील. असेल तर
नाही शिक्षण जास्त मिळेल. धन देखील जास्त मिळेल. त्यासाठी तर मग सर्वकाही करा. कोणी
धर्मशाळा बांधतात तर दुसऱ्या जन्मामध्ये महाल मिळेल. असे नाही की निरोगी राहतील.
नाही. तर बाबा किती गोष्टी समजावून सांगतात. कोणी तर चांगल्या रीतीने समजून घेऊन
इतरांनाही समजावून सांगतात, कोणी तर समजतच नाहीत. तर रोज पोतामेल काढा. आज कोणते
पाप केले? या गोष्टीमध्ये फेल झालो. बाबा सल्ला देतील तर असे काम करता कामा नये.
तुम्ही जाणता आपण तर आता स्वर्गामध्ये जात आहोत. मुलांना आनंदाचा पाराच चढत नाही.
बाबांना (ब्रह्मा बाबांना) किती आनंद होते. मी वृद्ध आहे, हे शरीर सोडून आता मी
प्रिन्स बनणार आहे. तुम्ही देखील शिकता तर आनंदाचा पारा चढला पाहिजे. परंतु बाबांची
आठवणच करत नाहीत. बाबा किती सहजपणे समजावून सांगतात, ते इंग्रजी इत्यादी शिकताना
डोके किती उठते. खूप अडचण येते. हे तर खूप सोपे आहे. या रूहानी शिक्षणाने तुम्ही
शीतल बनता. यामध्ये तर फक्त बाबांची आठवण करत रहा म्हणजे अंग (कर्मेंद्रिये) एकदम
शीतल होतील. शरीर तर तुम्हाला मिळाले आहे ना. शिवबाबांना काही शरीर नाहीये. अंग (कर्मेंद्रिये)
आहेत श्रीकृष्णाला. त्याची कर्मेंद्रिये तर शीतलच आहेत म्हणून त्यांचे नाव ठेवले
गेले आहे. आता त्यांची संगत कशी मिळेल. तो तर असतोच सतयुगामध्ये. त्याची
कर्मेंद्रिये देखील इतकी शीतल कोणी बनवली? हे देखील तुम्ही आता समजता. तर आता तुम्हा
मुलांना देखील इतकी धारणा केली पाहिजे. अजिबात भांडण-तंटे होत नाहीत. खरे तेच
बोलायचे आहे. खोटे बोलल्याने सत्यानाश होतो.
बाबा तुम्हा मुलांना
ऑलराऊंड सर्व गोष्टी समजावून सांगतात. चांगली-चांगली चित्रे देखील बनवा जी मग
सर्वांकडे जातील. चांगली गोष्ट पाहून तुम्ही म्हणाल, जाऊन बघा. समजावून सांगणारा
देखील हुशार पाहिजे. सेवा करायला देखील शिकायचे आहे. चांगल्या ब्राह्मणी देखील
पाहिजेत ज्या आप समान बनवतील. ज्या आप समान मॅनेजर बनवतात त्यांना चांगली ब्राह्मणी
म्हणणार. ती पद देखील मोठे वरचे मिळवेल. बालिश-बुद्धी सुद्धा असू नये, नाहीतर उचलून
घेऊन जातील. रावण संप्रदाय आहे ना. अशी ब्राह्मणी तयार करा जी पाठीमागे सेंटर
सांभाळू शकेल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांना
आपल्या अभ्यासाचा जलवा दाखवायचा आहे. भारताला स्वर्ग बनविण्याच्या धंद्यामध्ये
लागायचे आहे. पहिले स्व-उन्नतीचा विचार करायचा आहे. क्षीरखंड होऊन रहायचे आहे.
२) कोणती चूक झाली तर
बाबांकडून क्षमा घेऊन स्वतःला सुधारायचे आहे. बाबा काही कृपा करत नाहीत, बाबांच्या
आठवणीने विकर्म नष्ट करायची आहेत, निंदा होईल असे कोणतेही काम करायचे नाही.
वरदान:-
नॉलेजफुलच्या
विशेषतेद्वारे संस्कारांच्या संघर्षापासून वाचणारे कमलपुष्प समान न्यारे आणि साक्षी
भव
संस्कार तर
शेवटपर्यंत कुणाचे दासीचे असतील, कुणाचे राजाचे. संस्कार बदलतील याची वाट पाहू नका.
परंतु माझ्यावर कोणाचा प्रभाव पडू नये, कारण एक तर प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत
आणि दुसरे म्हणजे मायेचे रूप सुद्धा घेऊन येतात, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा
निर्णय मर्यादेमध्ये राहून करा, भिन्न-भिन्न संस्कार असताना देखील संघर्ष होऊ नये
यासाठी नॉलेजफुल बनून कमलपुष्प समान न्यारे व साक्षी रहा.
बोधवाक्य:-
हट्ट किंवा
मेहनत करण्याच्या ऐवजी रमणीकतेने पुरुषार्थ करा.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
पवित्रता सुख-शांतीची
जननी आहे. जिथे पवित्रता आहे तिथे दुःख-अशांती येऊ शकत नाही. तर चेक करा नेहमी
सुखाच्या शय्येवर आरामात अर्थात शांत स्वरूपामध्ये विराजमान राहता का? आतमध्ये का,
काय आणि कसे असा गोंधळ होतो का या गोंधळापासून परे सुख स्वरूप स्थिती असते?