13-06-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत साऱ्या दुनियेतील विकारांचा अग्नी विझवून सर्वांना शीतल बनविण्याकरिता, ज्ञानाची वर्षा शीतल बनविते.

प्रश्न:-
कोणती आग साऱ्या दुनियेला जाळत आहे?

उत्तर:-
काम विकाराची आग साऱ्या दुनियेला जाळत आहे. सगळेच काम-विकाराच्या आगीमध्ये जळून काळे झाले आहेत. बाबा ज्ञान-वृष्टीने त्यांना शीतल बनवतात. जसे पाऊस पडल्याने धरती शीतल होते, तर या ज्ञान-वृष्टीने तुम्ही २१ जन्मांकरिता शीतल बनता. कोणत्याही प्रकारचा दाह राहत नाही. तत्वे देखील सतोप्रधान बनतात. कोणालाही दाह होत नाही (विकार रुपी आगीचा त्रास होत नाही).

ओम शांती।
रूहानी मुले कोणाच्या आठवणीमध्ये बसली आहेत? जरूर आपल्या रूहानी बाबांच्या आठवणीमध्ये बसली आहेत. रूह (आत्मा) आपल्या परमपिता परमात्म्याच्या आठवणीमध्ये बसली आहे की, आपल्याला रूहानी बाबा येऊन रिफ्रेश करून शीतल बनवतील, कारण काम-चितेवर बसून भारत जळून खाक झाला आहे. गातात देखील - ‘तपत बुझाये’. तपत (आग) कशाची आहे? काम-विकाराच्या चितेची. अति उष्णता असते तेव्हा मनुष्य मरतात. या काम-विकाराच्या चितेच्या आगीमध्ये भारत एकदम जळून खाक झाला आहे, म्हणून बाबांची आठवण करतात की, येऊन आम्हाला शीतल बनवा. पाऊस पडल्याने थंडावा होतो. धरती शीतल होते. हा तर पाऊस आहे ज्ञानाचा. एकदाच येऊन इतके शीतल बनवतात. इतके सर्व काही देतात की सतयुगामध्ये कोणत्याही गोष्टीची इच्छा उरत नाही. अर्धा कल्प तुम्ही याची आतुरतेने वाट पाहत राहिला आहात - ‘बाबा, येऊन आम्हाला शीतल बनवा’. पतित-पावन बाबांनी येऊन आम्हाला शीतल बनवावे. या ज्ञान-वृष्टीने भारत अर्थात सारी दुनिया शीतल होते. तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. व्यक्तीचा मृत्यू झाला तर म्हणतात - स्वर्गवासी झाला. ते तर फक्त तोंड गोड करतात. तुम्ही जाणता, आता स्वर्गाची स्थापना होत आहे. बाबा आलेले आहेत, ही ज्ञान-वृष्टी करत आहेत. शीतलतेचा प्रभाव २१ जन्म राहतो. तिथे ना पाऊस, ना कुठल्या गोष्टीची इच्छा राहते. नेहमीच वसंत ऋतू राहतो. तिथे कोणत्याही प्रकारचे दुःख राहत नाही. सूर्य देखील सतोप्रधान बनतो, कधी आग ओकत नाही. तुम्ही संपूर्ण विश्वाचे मालक बनता. आता तर गुलाम आहात ना. गातात - ‘मी गुलाम, मी गुलाम तुमचा…’, त्या पित्याची आठवण करतात. आता बाबा म्हणतात - तुमच्या सेवेमध्ये मी येऊन तुमचा गुलाम बनलो आहे. तुम्हा मुलांची सेवा करतो. परक्या, पतित देश, पतित शरीरामध्ये मी येतो. या पतित दुनियेमध्ये एकही पावन असू शकत नाही. सतयुगाला पावन, कलियुगाला पतित म्हटले जाते कारण सर्वच विकारी आहेत. भारतवासीच या नॉलेजला समजू शकतील. ज्यांनी ८४ जन्म घेतले आहेत तेच हे नॉलेज ऐकतील किंवा जे सतयुग-त्रेतामध्ये येणारे आहेत तेच येऊन ब्राह्मण बनतील, नंबरवार पुरुषार्थनुसार. बाबांनी समजावून सांगितले आहे की, आता तुम्ही ब्राह्मण वर्णामध्ये आहात मग तेच देवता वर्णामध्ये येणार. ब्राह्मण वर्ण अर्थात ब्राह्मण धर्म स्थापन करण्यासाठी बाबा येतात. ब्रह्मा, ब्राह्मण धर्म स्थापन करतात. असे म्हणणार नाही की परमपिता परमात्मा येऊन शूद्रांना ब्राह्मण बनवतात. ही तुमची बाजोली चालते (कोलांटी उडीचा खेळ चालतो). हे तर खूप सोपे आहे. तुम्ही जाणता हे चक्र कसे फिरते? विराट रूपामध्ये ब्राह्मणांची शिखा आणि शिवबाबांनाच दाखवायचे विसरले आहेत. म्हणतात देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र… पुन्हा शूद्र पासून देवता. आता ब्राह्मण कुठे गेले? ब्राह्मण लोक म्हणतात देखील - ब्राह्मण देवताए नमः. तेव्हा प्रजापिता ब्रह्माची वंशावळी असणारे ब्राह्मण कुठे गेले? प्रजापिता ब्रह्माचे नाव किती प्रसिद्ध आहे. चित्रांमध्ये देखील किती चुका केलेल्या आहेत. प्रजापिता ब्रह्माची संतान कोणाचेच नामोनिशाण सुद्धा नाहीये. स्कूलमध्ये टीचर शिकवतात, ते तरीही सोर्स ऑफ इनकम आहे. एम ऑब्जेक्ट तर जरूर पाहिजे. तुम्ही मुले जाणता त्या शिक्षणानेच पद-पोझिशन मिळते. पतित दुनियेमध्ये भगवान येऊन पतितांना शिकवतात. बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांना शिकवून पावन बनवतो. या शिक्षणाने इन्कम पहा किती जबरदस्त आहे. अर्ध्या कल्पाकरिता तुम्ही भाग्यवान बनता. भारतामध्येच गायले गेले आहे - २१ पिढी; आता तुम्ही बेहदच्या बाबांकडून २१ पिढी बेहदचा वारसा प्राप्त करता. लौकिक पित्याचा आहे अल्पकालीन क्षण-भंगुर वारसा. या बाबांकडून तुम्ही असा वारसा मिळवता जे पिढ्यानपिढ्या तुम्हाला दुःख राहणार नाही. भारतामध्येच बेहदचे सुख होते. हे ज्ञान इतर कोणाच्याच बुद्धीमध्ये नाही आहे. हे ज्ञान देणाऱ्या बाबांनाच माहीत आणि ज्यांना देतात त्यांनाच माहीत, इतर कोणालाही नाही. ग्रंथामध्ये देखील त्यांची महिमा गायलेली आहे - एकओंकार… निराकार, निर-अहंकार. याचा अर्थ देखील आता तुम्हाला समजतो आहे. ते तर फक्त गातात - निरहंकारी. इतकी मोठी ऑथॉरिटी असताना देखील त्यांना काहीच अहंकार नाही. इथे थोड्या पोझिशनवाले असले तरी देखील त्यांना किती नशा अर्थात अहंकार असतो. तो आहे अल्प काळाच्या पदाचा नशा की मी अमका आहे… आता तुम्हाला या रूहानी शिक्षणाचा नशा आहे. तुमची आत्मा आता जाणते - आत्म-अभिमानी बनायचे आहे तेव्हाच बाबांची आठवण करू शकाल. बाबांसोबतचा योग तुटल्यामुळे मायेचा गोळा लागतो (फटका बसतो), तर मग कोमेजून जातात. आठवण करत राहिले तर खुशीचा पारा चढलेला राहील. खूप मोठी परीक्षा पास होतात तेव्हा आनंद होतो. समजतात - बस्स, याच्यापेक्षा मोठे दुसरे कोणतेच शिक्षण नाही. तुम्ही देखील जाणता आपल्या या शिक्षणापेक्षा मोठे दुसरे कोणतेच शिक्षण नाही. या लक्ष्मी-नारायणाने मागील जन्मामध्ये जरूर असे शिक्षण घेतले आहे. राजयोग शिकले आहेत, तेव्हाच तर महाराजा-महाराणी बनले आहेत. राजयोग तर प्रसिद्ध आहे. परमपिता परमात्मा येऊन राजयोग शिकवतात - स्वर्गामध्ये जाण्याकरिता. म्हणतात - पास्ट जन्मामध्ये अशी कर्म केली आहेत तेव्हाच तर असे बनले आहेत.

तुम्ही जाणता - या जन्मामध्ये आपण अशी कर्म शिकतो जे भविष्य २१ जन्मांकरिता राज्य करणार अथवा स्वर्गामध्ये विराजमान होणार. यथा राजा-राणी तथा प्रजा देखील आहे ना. राजधानी आहे ना. बाबा आले आहेत राजधानी स्थापन करण्याकरिता. नंतर मग तुम्ही जाऊन २१ जन्म पालना कराल. ६३ जन्म तर दुःख भोगले आहे. ते सर्व नष्ट होणार आहे. भारताला स्वर्ग म्हटले जाते, आता तर नरक आहे. सृष्टी किती बदलली आहे. ती राजाई कुठे गेली? रावण-राज्य सुरू झाल्याने मग तुम्ही पतित बनता. बाबा म्हणतात - तुम्ही आपल्या ८४ जन्मांच्या चक्राला जाणत नाही. आता तुम्हा मुलांना वारंवार समजावून सांगितले जात आहे. तुम्ही ८४ जन्मांचे चक्र पूर्ण केले आहे. आता तुमचा हा अंतिम जन्म आहे. आता पुन्हा तुम्हाला आपला वारसा घ्यायचा आहे. तुम्हाला मुक्तिधाम मध्ये बसून राहायचे नाहीये. तुमचा ऑलराऊंड पार्ट आहे. असे अनेक आहेत जे सतयुगापासून द्वापर, कलियुगापर्यंत देखील मुक्तिधाम मध्येच राहतात. ते असे म्हणणार नाहीत की, इथे येण्यापेक्षा मुक्तिधाम चांगले आहे. ते तर मच्छरांप्रमाणे झाले. आला आणि हा गेला. मनुष्यांची महिमा गायली जाते. ही मंदिरे कोणाची आहेत? जे सुरुवाती पासून पार्ट बजावत आले आहेत, त्यांचीच यादगार (स्मृतिस्थळे) बनविलेली आहेत. नंतर जे येतात त्यांचे काही यादगार आहे का? काहीच नाही. तुमचे किती जबरदस्त यादगार आहे. सर्वात जास्त पार्ट तुम्ही बजावता. तुम्ही आपल्या प्रारब्धाचा काळ पूर्ण करून जेव्हा भक्तिमार्गामध्ये येता तेव्हा मग तुमचे यादगार तसेच शिवबाबांची मंदिरे बनण्यास सुरुवात होते, आणि मग इतर धर्म येतात. त्यांचा धर्म स्थापन होतो. तुम्ही तुमच्या हिस्ट्री-जिओग्राफीला देखील जाणता आणि इतर धर्मांच्या हिस्ट्री-जिओग्राफीला देखील जाणता. ८४ जन्मांची शिडी आहे. सर्वप्रथम आपण स्वर्गामध्ये येतो आणि मग कसे खाली उतरतो (पतन होते) - हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे. प्रत्येक जन्मामध्ये भिन्न नाव-रूप असलेले मित्र-नातेवाईक इत्यादी मिळाले आहेत. हा सर्व ड्रामामध्ये तुमचा पार्ट अगोदरच नोंदलेला आहे. हा बेहदचा ड्रामा आहे, जो हुबेहूब रिपीट होतो. तुम्ही जाणता आपण सो देवी-देवता होतो जे ८४ जन्म घेऊन शूद्र बनलो आहोत. पुन्हा आपण सो देवी-देवता बनतो. मनुष्य तर म्हणतात - आत्मा सो परमात्मा. ‘हम सो’ चा अर्थ खरेतर हा आहे. ते मग म्हणतात - आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा. रात्रं-दिवसाचा फरक आहे ना. तुम्ही आता या सर्व गोष्टींना जाणता. तुम्ही आता पांडव बनले आहात. कौरव-पांडव भाऊ-भाऊ होते ना. आता बाबा भेटले आहेत तर तुम्ही कौरवांचे पांडव बनला आहात. बाबा तुम्हाला दुःखातून लिबरेट करून (मुक्त करून), गाईड बनून घेऊन जातात. घराबद्दल तर कोणालाच माहीत नाही आहे. ते म्हणतात आत्मा ब्रह्म मध्ये लीन होते. तर घर थोडेच झाले. घर तर राहण्याचे ठिकाण आहे. त्याला इनकॉर्पोरियल वर्ल्ड (निराकारी दुनिया) म्हटले जाते. आता तुम्ही मुले जाणता - आपण निराकारी आत्मे निराकारी दुनियेमध्ये बिंदू रुपात निवास करतो. तिथे देखील निराकारी झाड आहे. हा ड्रामा बनलेला आहे. बीज आणि झाडाला जाणून घ्यायचे आहे. याचे नावच आहे - व्हरायटी धर्मांचे झाड, ही मनुष्य सृष्टी आहे. याचे बीज रूप बाबा आहेत, किती व्हरायटी आहे. प्रत्येक धर्मातील लोकांची फीचर्स (चेहऱ्याची ठेवण) वेगळी आणि इथे देखील एकाचा चेहरा दुसऱ्याच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता नसतो. हा देखील ड्रामा बनलेला आहे. कल्प वृक्षाचे आयुष्य ५ हजार वर्षांचे आहे - हे केवळ बाबाच स्पष्ट करून सांगतात. मनुष्य ॲक्टर्स आहेत, इथे पार्ट बजावण्याकरिता येतात. ही दुनिया एक मंडप आहे, प्रकाशासाठी सूर्य-चंद्र इत्यादी आहेत. हे काही देवता थोडेच आहेत, हे तर दिवे आहेत; परंतु सेवा करतात, म्हणून त्यांना (सूर्य-चंद्राला) देवता म्हणतात. वास्तविक पाहता, देवता कोणतीही सेवा करत नाहीत, सेवा तर तुम्ही मुले करता. बाबा ओबीडियंट सर्व्हंट (आज्ञाधारक सेवक) आहेत. मुले दुःखी होतात, तर बाबांना दया येते. बाबा आले आहेत समजावून सांगण्याकरिता; तुम्हा मुलांना पुन्हा सो देवी-देवता पद प्राप्त करून देण्याकरिता येतो. चढती कला, उतरती कला प्रत्येक वस्तूची होते. जुन्या दुनियेला तमोप्रधान, नवीन दुनियेला सतोप्रधान म्हटले जाते. प्रत्येक गोष्ट नवीन सो जुनी होते. आत्मा म्हणते - हे शरीर देखील तमोप्रधान पतित आहे. सतयुगामध्ये आत्मा आणि शरीर दोन्ही सतोप्रधान होते. स्वतःला त्रास करून घेत नव्हते. आत्म्याला आता ज्ञान मिळाले आहे. स्मृती आली आहे, आपण ८४ जन्म घेतले आहेत. हे रहस्य बेहदचे बाबाच समजावून सांगत आहेत. दुःखामध्ये बाबांनाच बोलावत राहतात - दया करा, हे दु:ख-हर्ता, सुख-कर्ता… भारतच सर्वात सुखी होता ना. भारता सारखा पवित्र खंड दुसरा कोणताच असू शकत नाही. आता बाबा तुम्हा मुलांची झोळी अविनाशी ज्ञान रत्नांनी भरत आहेत. कधी असा पिता पाहिला आहे? म्हणतात - ‘मुलांनो, मी तुमच्याकरिता वैकुंठ सौगातमध्ये घेऊन आलो आहे. तुम्ही स्वर्गवासी होता, आता पतित नरकवासी बनले आहात. पावन त्यांना म्हटले जाते जे विकारामध्ये जात नाहीत. सतयुगामध्ये आहेत संपूर्ण निर्विकारी. यावेळी आहेत - संपूर्ण विकारी. बाबा म्हणतात - तुम्ही देखील संपूर्ण निर्विकारी होता. आता संपूर्ण विकारी बनले आहात, आता बाबांची आठवण करून पुन्हा संपूर्ण निर्विकारी देवता पद प्राप्त करायचे आहे. शब्द पहा किती सुंदर आहे - मनमनाभव. मज पित्याची आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानाचे सतोप्रधान बनाल. मी सर्वशक्तिमान आहे ना. माझी आठवण करा. आठवणीलाच योग अग्नी म्हटले जाते, ज्यामुळे तुमची पापे भस्म होतात. तुम्ही पवित्र बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) रुहानी शिक्षणाच्या नशेमध्ये राहायचे आहे. पित्या समान निरहंकारी बनायचे आहे. पद-पोझिशन इत्यादीचा अहंकार ठेवायचा नाही.

२) आपली झोळी ज्ञान रत्नांनी भरायची आहे. संपूर्ण निर्विकारी बनून देवता पद प्राप्त करायचे आहे. कधीही कोमेजून जायचे नाही.

वरदान:-
स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही रीतीने स्वतःला बिझी ठेवणारे मायाजीत, विजयी भव

स्वतःला सेवाधारी समजून आपल्या आवडीने, उमंगाने सेवेमध्ये बिझी राहा म्हणजे मग मायेला चान्स मिळणार नाही. जेव्हा संकल्पाने, बुद्धीने, स्थूल कर्मणा सेवेपासून फ्री राहता तेव्हा मग माया चान्स घेते. परंतु स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारे आनंदाने सेवेमध्ये बिझी राहा, तर आनंदित राहिल्यामुळे माया सामना करण्याचे साहस करू शकत नाही. त्यामुळे स्वतःच टीचर बनून बुद्धीला बिझी ठेवण्याचा डेली प्रोग्राम बनवा म्हणजे मग मायाजीत, विजयी बनाल.

बोधवाक्य:-
निश्चयाने आणि गर्वाने म्हणा - ‘बाबा माझ्या सोबत आहेत’, तर माया जवळ येऊ शकत नाही.

हे अव्यक्त इशारे - सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.

बापदादांना सर्व मुलांच्या वागण्यात आणि चेहऱ्यावर, बोलण्यात आणि कृतीमध्ये साधेपणा आणि मधुरता पाहायची आहे. जर आवेशामुळे किंवा थकव्यामुळे थोडी जरी बोलण्यामध्ये मधुरता कमी असेल, चेहरा मधुर नसेल, सिरीयस असेल तर गुण संपन्न म्हणता येणार नाही. कशीही परिस्थिती असो परंतु माझा जो गुण आहे, तो माझा गुण इमर्ज झाला पाहिजे. जसे बापदादा तसे हुबेहूब तेच गुण, तेच कर्तव्य, तेच बोलणे, तसेच संकल्प अनुभव व्हावेत. सर्वांच्या मुखातून हेच निघावे की, हे तर तेच वाटतात.