13-07-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   03.02.2006  ओम शान्ति   मधुबन


“परमात्म प्रेमामध्ये संपूर्ण पवित्रतेची अशी स्थिती बनवा ज्यामध्ये व्यर्थचे नामोनिशाण नसेल”


आज बापदादा चोहो बाजूंच्या आपल्या प्रभु प्रिय मुलांना पहात आहेत. साऱ्या विश्वामधून निवडलेले कोटींमध्ये कोणी या परमात्म प्रेमाचे अधिकारी बनतात. परमात्म प्रेमानेच तुम्हा मुलांना इथे आणले आहे. हे परमात्म प्रेम साऱ्या कल्पामध्ये या वेळेलाच अनुभव करता. बाकी नेहमीच आत्म्यांचे प्रेम, महान आत्म्यांचे प्रेम, धर्म आत्म्यांचे प्रेम अनुभव केलेत; परंतु आता परमात्म प्रेमाचे पात्र बनलात. कोणी तुम्हाला विचारले परमात्मा कुठे आहेत? तर काय सांगाल? परमात्म पिता तर आमच्या सोबतच आहेत. आम्ही त्यांच्या सोबत राहतो. परमात्मा देखील आमच्या शिवाय राहू शकत नाहीत आणि आम्ही देखील परमात्म्या शिवाय राहू शकत नाही. इतके प्रेम अनुभव करत आहात. मोठ्या अभिमानाने म्हणाल - ते आमच्या हृदयामध्ये राहतात आणि आम्ही त्यांच्या हृदयामध्ये राहतो. असे अनुभवी आहात ना! आहात अनुभवी? काय मनामध्ये येते? जर आपण अनुभवी असणार नाही तर मग अजून कोण असणार! बाबा देखील अशा प्रेमाच्या अधिकारी मुलांना पाहून हर्षित होतात.

परमात्म प्रेमाची निशाणी - ज्यांच्यावर प्रेम असते त्याच्यावर सर्वकाही कुर्बान करण्यासाठी सहज तयार होतात. तर तुम्ही सर्वांनीही जे बाबा इच्छितात की प्रत्येक मुलगा बाप समान बनावा, प्रत्येकाच्या चेहऱ्याद्वारे बाबा प्रत्यक्ष दिसून यावेत, असे बनला आहात ना? बापदादांची दिल पसंत (अतिशय आवडती) स्थिती जाणता ना! बाबांची अतिशय आवडती स्थिती आहेच मुळी संपूर्ण पवित्रता. या ब्राह्मण जन्माचे फाउंडेशन देखील संपूर्ण पवित्रता आहे. संपूर्ण पवित्रतेच्या गुह्यतेला जाणता का? संकल्प आणि स्वप्नामध्ये देखील रिंचक मात्र अपवित्रतेचे नामोनिशाणही नसावे. बापदादा आजकालच्या काळाच्या समीपते नुसार पुन्हा-पुन्हा लक्ष वेधून घेत आहेत की संपूर्ण पवित्रतेच्या हिशोबाने व्यर्थ संकल्प, ही देखील संपूर्ण पवित्रता नाही आहे. तर चेक करा व्यर्थ संकल्प चालतात का? कोणत्याही प्रकारचे व्यर्थ संकल्प संपूर्णतेपासून दूर तर करत नाहीत ना? जितके-जितके पुरुषार्थामध्ये पुढे जाता, तितके रॉयल रूपातील व्यर्थ संकल्प, व्यर्थ वेळ तर समाप्त करत नाहीत ना? रॉयल रूपामध्ये अभिमान आणि अपमान व्यर्थ संकल्पाच्या रूपामध्ये वार तर करत नाहीत ना? जर अभिमानाच्या रूपामध्ये कोणीही परमात्म देणगीला आपली विशेषता समजत असतील तर त्या विशेषतेचा देखील अभिमान खाली घेऊन येतो. विघ्न रूप बनतो आणि अभिमान देखील सूक्ष्म रूपामध्ये हाच येतो, जो जाणता देखील - ‘माझे’पणा आला, माझे नाव, मान, शान झाले पाहिजे, हा ‘माझे’पणा अभिमानाचे रूप घेतो. हे व्यर्थ संकल्प देखील संपूर्णते पासून दूर करतात कारण बापदादा हेच इच्छितात - ‘स्वमान’; ना अभिमान, ना अपमान. व्यर्थ संकल्प येण्याचे हेच कारण बनतात.

बापदादा प्रत्येक मुलाला ‘डबल मालक’ या निश्चय आणि नशेमध्ये पाहू इच्छितात. ‘डबल मालक’ म्हणजे काय? एक तर बाबांच्या खजिन्यांचे मालक आणि दुसरे स्वराज्याचे मालक. दोन्हीचे मालक कारण की तुम्ही सर्व बालक देखील आहात आणि मालक सुद्धा आहात. परंतु बापदादांनी पाहिले की बालक तर सर्व आहेतच कारण की सर्वजण म्हणतात - ‘माझे बाबा’. तर ‘माझे बाबा’ अर्थात बालक आहेतच. परंतु बालक असण्यासोबतच दोन्ही प्रकारचे मालक. तर ‘मालक’पणामध्ये नम्बरवार होतात. मी बालक सो मालक देखील आहे. वारशाचा खजिना प्राप्त आहे त्यामुळे बालकपणाचा निश्चय आणि नशा असतोच परंतु ‘मालक’पणाचा प्रॅक्टिकलमध्ये निश्चयाचा नशा त्यामध्ये नंबरवार बनतात. स्वराज्य अधिकारी मालक, यामध्येच विशेष विघ्न आणते ते आहे - मन. मनाचे मालक बनून कधीही मनाच्या अधीन होऊ नका. म्हणतात - स्वराज्य अधिकारी आहोत, तर स्वराज्य अधिकारी अर्थात राजा आहे. जसे ब्रह्मा बाबांनी दररोज आपले चेकिंग करून मनाचा मालक बनून विश्वाच्या मालकीपणाचा अधिकार प्राप्त केला. तसे हे मन-बुद्धी राजाच्या तुलनेमध्ये तर मंत्री आहेत, हे व्यर्थ संकल्प देखील मनामध्ये उत्पन्न होतात, तर मन व्यर्थ संकल्पांच्या वश बनते. तुम्ही जेव्हा मनाला ऑर्डरप्रमाणे चालवत नाही तर मन चंचल बनल्या कारणाने परावलंबी करते. तर चेक करा. तसेही मनाला घोडा म्हणतात, कारण की चंचल आहे ना! आणि तुमच्याकडे श्रीमत रुपी लगाम आहे. जर श्रीमताचा लगाम थोडाजरी सैल झाला तर मन चंचल बनते. लगाम सैल का होतो? कारण कुठे ना कुठे साईडसीन पाहण्यामध्ये रमता. आणि लगाम सैल झाला की मग मनाला चान्स मिळतो. तर मी बालक सो मालक आहे, या स्मृतिमध्ये सदैव रहा. चेक करा खजिन्याचा देखील मालक आणि स्वराज्याचा देखील मालक, डबल मालक आहे? जर मालकीपणा कमी झाला तर कमजोर संस्कार इमर्ज होतात. आणि संस्कारांना काय म्हणता? ‘माझा संस्कार असा आहे’, ‘माझे नेचर असे आहे’, परंतु काय हे ‘माझे’ आहे? म्हणताना तर असेच म्हणता - ‘माझा संस्कार’. हा ‘माझा’ आहे का? ‘माझा संस्कार’ म्हणणे राईट आहे? राईट आहे का? माझा आहे की रावणाची मालमत्ता आहे? कमजोर संस्कार रावणाची मालमत्ता आहे, त्याला माझा कसे म्हणू शकता. माझा संस्कार कोणता आहे? जो बाबांचा संस्कार तो माझा संस्कार. तर बाबांचा संस्कार कोणता आहे? विश्व कल्याण. शुभ भावना, शुभ कामना. तर कोणत्याही कमजोर संस्काराला माझा संस्कार म्हणणेच रॉंग आहे. आणि जर समजा ‘माझा संस्कार’ असे म्हणून जर मनामध्ये भरलात, तर अशुद्ध वस्तूला मनामध्ये भरले आहे. ‘माझ्या’ वस्तूवर तर प्रेम असते ना! तर ‘माझे’ समजल्याने आपल्या हृदयामध्ये जागा दिली आहे त्यामुळे बरेचदा मुलांना खूप युद्ध करावे लागते कारण अशुभ आणि शुभ दोन्हीला मनामध्ये बसवले आहे तर दोघे काय करतील? युद्धच तर करतील! जेव्हा हे संकल्पामध्ये येते, वाणीमध्ये देखील येते की, ‘माझा संस्कार’. तर चेक करा हा अशुभ संस्कार माझा संस्कार माझा नाही आहे. तर संस्कार परिवर्तन करावे लागेल.

बापदादा प्रत्येक मुलाला पद्म-पद्मगुणा भाग्यवान चलन आणि चेहऱ्यामध्ये पाहू इच्छितात. बरीच मुले म्हणतात - भाग्यवान तर बनलो आहोत चालता-फिरता भाग्य इमर्ज व्हावे, परंतु ते मर्ज होते आणि बापदादा प्रत्येक वेळी, प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये भाग्याचा सितारा चमकत असलेला पाहू इच्छितात. कोणीही तुम्हाला पाहिले तर चेहऱ्यावरून, वर्तनामधून भाग्यवान दिसून यावा तेव्हा तुम्हा मुलांद्वारे बाबांची प्रत्यक्षता होईल कारण वर्तमान समयी मेजॉरिटी तर अनुभव करू इच्छितात, जसे आजकालचे विज्ञान प्रत्यक्षामध्ये दाखवते ना! अनुभव करविते ना! गरमीचा सुद्धा अनुभव करवते, थंडाईचा सुद्धा अनुभव करवते तर सायलेन्सच्या शक्तीने देखील अनुभव करू इच्छितात. जितकी-जितकी तुम्ही स्वतः अनुभूती करत रहाल तितका इतरांना देखील अनुभव करवू शकाल. बापदादांनी इशारा दिलेलाच आहे की आता कंबाइंड (दोन्ही एकत्र) सेवा करा. फक्त वाणीने नाही, परंतु वाणीसोबत अनुभवी मूर्त बनून अनुभव करवून देण्याची देखील सेवा करा. कोणता ना कोणता शांतीचा अनुभव, आनंदाचा अनुभव, आत्मिक प्रेमाचा अनुभव…, अनुभव ही एक अशी चीज आहे जी एकदा जरी अनुभव झाला तर सोडू शकत नाहीत. ऐकलेली गोष्ट विसरली जाऊ शकते परंतु अनुभव घेतलेली गोष्ट विसरली जात नाही. ती अनुभव करविणाऱ्याच्या जवळ घेऊन येते.

सर्वजण विचारतात की, आता पुढच्या काळासाठी कोणती नविनता करायची? तर बापदादांनी बघितले सेवा तर सर्व उमंग-उत्साहाने करत आहेत, प्रत्येक वर्ग (विंग) देखील करत आहे. आज देखील बरेच वर्ग (क्षेत्रातील) एकत्र झाले आहेत ना! मेगा प्रोग्राम देखील केला, संदेश तर दिला, आपल्या विषयी होणाऱ्या तक्रारी पासून तर वाचला आहात, त्यासाठी मुबारक असो. परंतु अजून पर्यंत हा आवाज पसरलेला नाही आहे की हे परमात्म ज्ञान आहे. ब्रह्माकुमारी चांगले कार्य करत आहेत, ब्रह्माकुमारींचे ज्ञान खूप चांगले आहे परंतु ‘हेच परमात्म ज्ञान आहे, परमात्म कार्य चालत आहे’ हा आवाज पसरावा. मेडिटेशन कोर्स देखील घेता, आत्म्याचे परमात्म्याशी कनेक्शन सुद्धा जोडता परंतु आता परमात्म कार्य स्वयं परमात्मा करत आहेत, हे मात्र फार कमी प्रमाणात अनुभव करतात. आत्मा आणि धारणा हे प्रत्यक्ष होत आहे, चांगले कार्य करत आहेत, चांगले बोलतात, चांगले शिकवतात, इथं पर्यंत ठीक आहे. नॉलेज चांगले आहे एवढे देखील म्हणतात परंतु परमात्म नॉलेज आहे… हा आवाज बाबांच्या समीप घेऊन येईल आणि जितके बाबांच्या जवळ येतील तितका आपोआपच अनुभव करत राहतील. तर असा प्लॅन बनवा आणि भाषणांमध्ये अशी काही ताकद भरा, ज्यामुळे परमात्म्याच्या जवळ येतील. दिव्यगुणांची धारणा यामध्ये लक्ष गेले आहे; ‘आत्म्याचे ज्ञान देतात, परमात्म्याचे ज्ञान देतात’, एवढे म्हणतात परंतु परमात्मा आलेले आहेत, परमात्म कार्य स्वयं परमात्मा चालवत आहेत, ही प्रत्यक्षता चुंबकाप्रमाणे जवळ घेऊन येईल. तुम्ही लोक देखील जवळ तेव्हा आलात जेव्हा समजले - बाबा मिळाले आहेत, बाबांना भेटायचे आहे. मेजॉरिटी जे स्नेही बनतात, ते काय समजून बनतात? कार्य खूप चांगले आहे. जे कार्य ब्रह्माकुमारी करत आहेत, ते कार्य कोणीही करु शकत नाही, परिवर्तन घडवून आणतात. परंतु परमात्मा बोलत आहेत, परमात्म्याकडून वारसा घ्यायचा आहे, इतके जवळ येत नाहीत; कारण जे अगोदर समजत नव्हते की ब्रह्माकुमारी काय करतात, यांचे नॉलेज काय आहे, ते समजू लागले आहेत. परंतु परमात्म प्रत्यक्षता, जर समजले की परमात्म्याचे ज्ञान आहे, तर थांबू शकतील काय! जसे तुम्ही पळून आला आहात ना, तसे पळून येतील. तर आता असा प्लॅन बनवा, असे भाषण तयार करा, अशा परमात्म अनुभूतीचे प्रॅक्टिकल उदाहरण बना तेव्हाच बाबांची प्रत्यक्षता प्रत्यक्षपणे दिसून येईल. आता ‘हे चांगले आहे’ - इथपर्यंत पोहोचले आहेत परंतु ‘आपल्याला चांगले बनायचे आहे’, ती ओढ परमात्म प्रेमाच्या अनुभूतीने होईल. तर अनुभवी मूर्त बनून अनुभव करवा. आता डबल मालकीपणाच्या स्मृतीने समर्थ बनून समर्थ बनवा. अच्छा.

सेवेचा टर्न पंजाब झोनचा आहे:- हात हलवा. हे चांगले आहे ज्या पण झोनला टर्न मिळतो ते खुल्या मनाने येतात. (पंजाब झोनमधून ४००० आले आहेत) बापदादांना देखील आनंद होत आहे की प्रत्येक झोन सेवेचा चान्स चांगल्या प्रकारे घेतात. पंजाबला सर्व कॉमन रीतीने ‘शेर’ म्हणतात, पंजाब शेर आणि बापदादा म्हणतात ‘शेर’ अर्थात ‘विजयी’. तर सदैव पंजाबवाल्यांनी आपल्या मस्तकावर विजयाच्या तिलकाचा अनुभव करायचा आहे. विजयाचा तिलक मिळालेला आहे. हे सदैव स्मृतिमध्ये रहावे आम्हीच कल्प-कल्पाचे विजयी आहोत. होतो, आहोत आणि कल्प-कल्प बनणार. छान आहे. पंजाब देखील वारसदार क्वालिटी असणाऱ्यांना बाबांच्या समोर आणण्याचा प्रोग्राम बनवत आहे ना! अजून बापदादांच्या समोर वारसदार क्वालिटी आणलेली नाहीये. स्नेही क्वालिटी आणली आहे, सर्व झोननी स्नेही सहयोगी क्वालिटी आणली आहे परंतु वारसदार क्वालिटी आणलेली नाहीये. तयारी करत आहात ना! सर्व प्रकारचे पाहिजेत ना! वारसदार देखील हवेत, स्नेही देखील हवेत, सहयोगी देखील हवेत, माईक देखील हवेत, माइट देखील हवेत. सर्व प्रकारचे पाहिजेत. हे चांगले आहे की, सेंटर्सची वृद्धी तर होत आहे. प्रत्येकजण उमंग-उत्साहाने सेवेमध्ये वृद्धी करत देखील आहेत, आता बघणार की कोणत्या झोनमध्ये हे प्रत्यक्ष होते ते - ‘परमात्मा आलेले आहेत’. बाबांना प्रत्यक्ष कोणता झोन करतो, ते बापदादा पाहत आहेत. फॉरेन करणार का? फॉरेन देखील करु शकतो. पंजाब नंबर घ्या. घ्या, चांगले आहे. सर्वजण तुम्हाला सहयोग देतील. ‘हेच आहेत, हेच आहेत, हेच आहेत…’ हा आवाज पसरवण्याचा बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहेत. आता आवाज आहे - ‘हे देखील आहेत’, ‘ते हेच आहेत’ असा आवाज नाही आहे. तर पंजाब काय करणार? हा आवाज येऊ दे - ‘हेच आहेत, हेच आहेत…’ टीचर्स, बरोबर आहे ना? कधी पर्यंत कराल? या वर्षामध्ये करणार? नविन वर्ष सुरु झाले आहे ना! तर नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन झाले पाहिजे ना! ‘हे देखील आहेत’ - हे तर खूप ऐकले. जसे तुमच्या मनामध्ये बस्स ‘बाबा, बाबा, बाबा’ आपोआप आठवते, तसे त्यांच्या मुखातून निघावे - ‘आमचे बाबा आले’. त्यांनी देखील म्हणावे - ‘माझे बाबा’, ‘माझे बाबा’ - हा आवाज चारही कोपऱ्यातून निघू दे, परंतु सुरुवात तर एका कोपऱ्यातून होईल ना. तर पंजाब कमाल करणार (चमत्कार करणार)? का नाही करणार! करायचेच आहे. खूप छान. इनॲडव्हान्स मुबारक असो. अच्छा.

सर्व बाजूंच्या सर्व रुहानी गुलाब मुलांना, सदैव बाबांचे अतिप्रिय आणि देह-भानापासून अति न्यारे असणाऱ्या, बापदादांच्या मनापासून लाडक्या मुलांना, सदैव एक बाबा, एकाग्र मन आणि एकरस स्थितीमध्ये स्थित रहाणाऱ्या मुलांना, चोहो बाजूंच्या विविध स्थानांवर वेगवेगळ्या टाइम प्रमाणे रहात असताना देखील सायन्सच्या साधनांद्वारे मधुबनमध्ये पोहोचणाऱ्या, सन्मुख बघणाऱ्या, सर्व लाडक्या, सिकीलध्या (खूप वर्षानंतर भेटलेल्या), कल्पा-कल्पाचे परमात्म प्रेमाचे पात्र असणाऱ्या अधिकारी मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि हृदयापासूनचे आशीर्वाद, पदम-पदम गुणा स्वीकार असो आणि सोबत डबल मालक मुलांना बापदादांचा नमस्ते.

दादीजींसोबत संवाद:- मधुबनचा हिरो ॲक्टर आहे, सदैव झीरो लक्षात आहे. शरीर भले चालत नाही, थोडे हळू-हळू चालते परंतु सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद चालवत आहेत. बाबांचे आशीर्वाद तर आहेतच परंतु बाकी सर्वांचे देखील आहेत. तुम्ही सर्व दादींवर खूप प्रेम करता ना! बघा सर्वजण हेच म्हणतात की दादी पाहिजेत, दादी पाहिजेत, दादी पाहिजेत… तर दादींच्या विशेषता काय आहेत? दादींच्या विशेषता आहेत - प्रत्येक पाऊल बाबांच्या श्रीमतानुसार उचलणे. मनाला देखील बाबांच्या आठवणीमध्ये आणि सेवेमध्ये समर्पण करणे. तुम्ही देखील सर्व असेच करत आहात ना! मनाला समर्पण करा. बापदादांनी पाहिले आहे, मन मोठा चमत्कार करून दाखवते. काय चमत्कार करते? चंचलता करते. मन एकाग्र व्हावे, जसा झेंडा वरती करता ना, तसा मनाचा झेंडा - ‘शिव बाबा’, मन शिवबाबांमध्ये एकाग्र व्हावे. येत आहे, ती वेळ जवळ येत आहे. कधी-कधी बापदादा मुलांचे खूप छान-छान संकल्प ऐकतात. सर्वांचे लक्ष्य खूप छान आहे. अच्छा. बघा हॉलचे दृश्य किती सुंदर आहे. माळा वाटत आहे ना! आणि माळेमधले मणी बसले आहेत. अच्छा. ओम् शांती.

वरदान:-
सायलेन्सच्या शक्तीद्वारे सेकंदामध्ये मुक्ती आणि जीवनमुक्तिचा अनुभव करविणारे विशेष आत्मा भव

विशेष आत्म्यांची शेवटची विशेषता आहे की, सेकंदामध्ये कोणत्याही आत्म्याला मुक्ती आणि जीवनमुक्तीचे अनुभवी बनवतील. फक्त रस्ता नाही सांगणार परंतु एका सेकंदामध्ये शांतीचा अथवा अतींद्रिय सुखाचा अनुभव करवतील. जीवनमुक्तीचा अनुभव आहे - सुख आणि मुक्तीचा अनुभव आहे - शांती. तर जो कोणी समोर येईल त्याला सेकंदामध्ये याचा अनुभव व्हावा - जेव्हा असा स्पीड असेल तेव्हा सायन्सवर सायलेन्सचा विजय पाहून सर्वांच्या मुखातून ‘वाह-वाह’चा आवाज निघेल आणि प्रत्यक्षतेचे दृश्य समोर येईल.

सुविचार:-
बाबांच्या प्रत्येक आदेशावर स्वतःला कुर्बान करणारे खरे परवाने बना.

अव्यक्त इशारे - संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:- आता जसे वाचेद्वारे डायरेक्शन द्यावे लागते, तसा श्रेष्ठ संकल्पाद्वारे सर्व कारभार चालू शकतो. वैज्ञानिक खाली पृथ्वीवरून वर अंतराळापर्यंत डायरेक्शन्स कॅच करत असतात, तर काय तुम्ही श्रेष्ठ संकल्पाच्या शक्तिद्वारे सर्व कारभार चालवू शकत नाही! जसे बोलून गोष्टीला स्पष्ट करतात, तसे पुढे जाऊन संकल्पाद्वारे सर्व कारभार चालेल, यासाठी श्रेष्ठ संकल्पांचा स्टॉक जमा करा.