13-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुमचे भाग्य जागृत करण्यासाठी, पावन बनल्यानेच भाग्य जागृत होईल”

प्रश्न:-
ज्या मुलांचे भाग्य जागृत झाले आहे, त्यांची लक्षणे कोणती असतील?

उत्तर:-
१) ते सुखाचे देवता असतील. बेहदच्या बाबांकडून सुखाचा वारसा घेऊन सर्वांना सुख देतील. ते कधीही कोणाला दुःख देऊ शकत नाहीत. ती आहेत व्यासाची मुले खरे-खरे सुखदेव. २) ते ५ विकारांचा संन्यास करून खरे-खरे राजयोगी, राजऋषी म्हणून संबोधले जातात. ३) त्यांची अवस्था एकरस राहते, त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये रडू येऊ शकत नाही. त्यांच्यासाठीच म्हटले जाते - मोहजीत.

गीत:-
तकदीर जगाकर आई हूँ...

ओम शांती।
गाण्याची एक ओळ जरी ऐकली तरी देखील गोड-गोड मुलांच्या अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत. आहे तर सामान्य गाणे परंतु याचे सार इतर कोणीही जाणत नाहीत. बाबाच येऊन प्रत्येक गाण्याचा, शास्त्राचा अर्थ समजावून सांगतात. गोड-गोड मुले हे देखील जाणतात की कलियुगामध्ये सर्वांचे भाग्य झोपी गेलेले आहे. सतयुगामध्ये भाग्य जागृत अवस्थेमध्ये असते. झोपलेल्या नशिबाला जागे करणारे आणि मत देणारे अथवा भाग्य घडविणारे एक बाबाच आहेत. तेच बसून मुलांचे भाग्य जागृत करतात. जसे मुले जन्माला येतात आणि भाग्य जागृत होते. मुलगा जन्मला आणि त्याला हे समजते की आपण वारसदार आहोत. अगदी तशीच ही बेहदची गोष्ट आहे. मुले जाणतात - कल्प-कल्प आमचे भाग्य जागृत होते आणि झोपी जाते. पावन बनतात तेव्हा भाग्य जागृत होते. ‘पावन गृहस्थ आश्रम’, म्हटले जाते. ‘आश्रम’ शब्द पवित्र असतो. पवित्र गृहस्थ आश्रम, त्याच्या विरुद्ध मग आहे ‘अपवित्र पतित धर्म’, आश्रम म्हणणार नाही. ‘गृहस्थ धर्म’ तर सर्वांचा आहेच. प्राण्यांचा देखील आहे. मुले तर सर्वच जन्माला घालतात. प्राण्यांना देखील म्हणणार - गृहस्थ धर्मामध्ये आहेत. आता मुले जाणतात आपण स्वर्गामध्ये पवित्र गृहस्थ आश्रमात होतो, देवी-देवता होतो. त्यांची महिमा देखील गातात सर्वगुण संपन्न... तुम्ही स्वतः देखील गात होता. आता समजता - आपण पुन्हा मनुष्यापासून देवता बनत आहोत. देवी-देवतांचा धर्म आहे. मग ब्रह्मा-विष्णु-शंकर यांना देखील देवता म्हणतात. ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः... शिव करिता म्हणतील ‘शिव परमात्माय नमः’ तर फरक झाला ना. शिव आणि शंकरला एक म्हणू शकत नाही. पत्थर-बुद्धी होते, आता पारस-बुद्धी बनत आहेत. देवतांना काही पत्थर-बुद्धी म्हणणार नाही. मग ड्रामा प्लॅन अनुसार रावण राज्य झाल्यामुळे त्यांना (देवतांना) देखील शिडी उतरायची आहे. पारस बुद्धीपासून पत्थर बुद्धी बनायचे आहे. सर्वात बुद्धिवान बनविणारे तर एक बाबाच आहेत. तुम्हाला पारसबुद्धी बनवतात. तुम्ही इथे येता पारस-बुद्धी बनण्याकरिता. पारसनाथची देखील मंदिरे आहेत. तिथे जत्रा भरते. परंतु हे कोणालाच ठाऊक नाहीये की, पारसनाथ कोण आहे. वास्तविक पारस बनविणारे तर बाबाच आहेत. ते आहेत बुद्धिवानांची बुद्धी. हा आहे तुम्हा मुलांच्या बुद्धीसाठी खुराक. बुद्धी किती बदलते. जसे गायले जाते - ‘सी नो ईविल…’ आता माकडांची तर गोष्ट नाहीये. मनुष्यच जणू मर्कटासारखे बनतात. ‘एप्स’ची (जंगली मनुष्याची) मानवाशी तुलना केली जाते. याला म्हटलेच जाते काट्यांचे जंगल. किती एकमेकांना दुःख देत राहतात.

आता तुम्हा मुलांच्या बुद्धीला खुराक मिळत आहे. बेहदचे बाबा खुराक देत आहेत. हे शिक्षण आहे, याला ज्ञान अमृत देखील म्हणतात. कोणतेही जल इत्यादी नाहीये. आजकाल सर्व गोष्टींना अमृत म्हणतात. गंगाजलाला देखील अमृत म्हणतात. देवतांचे पाय धुऊन ते पाणी पितात, ते पाणी तीर्थ म्हणून ठेवतात, त्याला देखील अमृताची अंचली समजतात. हे तीर्थ जे घेतात त्याला असे म्हणत नाहीत की, हे पतितांना पावन बनविणारे आहे. गंगाजलासाठी म्हणतात - हे पतित-पावनी आहे. असे देखील म्हणतात की, मनुष्य मेला तर गंगाजल मुखामध्ये असावे. दाखवतात की, अर्जुनाने बाण मारला आणि मग अमृत जल पाजले. तुम्ही मुलांनी काही कोणते बाण इत्यादी चालवलेले नाहीत. एक गाव आहे जिथे बाणांच्या सहाय्याने युद्ध करतात. तिथल्या राजाला ईश्वराचा अवतार म्हणतात. बाबा म्हणतात - हे सर्व भक्तिमार्गाचे गुरू आहेत. खरा-खरा सद्गुरू एकच आहे. सर्वांचे सद्गती दाता एक आहेत, जे सर्वांना सोबत घेऊन जातात. बाबांशिवाय इतर कोणीही परत घेऊन जाऊ शकत नाही. ‘ब्रह्म’मध्ये लीन होण्याचा देखील प्रश्न नाही. हे नाटक पूर्वनियोजित आहे, जे चक्र अनादि फिरतच राहते. जगाचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो, हे आता तुम्हीच जाणता. मनुष्य अर्थात आत्मे आपला पिता रचयित्याला देखील जाणत नाहीत, ज्यांची, ‘ओ गॉड फादर’ असे म्हणून आठवण देखील करतात. हदच्या पित्याला कधी गॉडफादर म्हणणार नाही. ‘गॉड फादर’ हा शब्द अतिशय आदराने म्हणतात. त्यांच्यासाठीच म्हणतात - ते पतित-पावन, दुःख हर्ता सुख कर्ता आहेत. एका बाजूला म्हणतात, ते दुःख हर्ता सुख कर्ता आहेत, आणि मग जेव्हा एखादे दुःख ओढवते किंवा मुलाचा मृत्यू होतो तेव्हा मग म्हणतात - ‘ईश्वरच सुख-दुःख देतो. ईश्वराने आमचे मूल नेले, हे काय केले!’ मग ईश्वराला शिव्या देतात. म्हणतात देखील की, ‘ईश्वराने मूल दिले आहे’; तर जर त्याने दिले आहे आणि परत घेतले तर तुम्ही रडता कशाला? ईश्वराकडे गेले ना. सतयुगामध्ये कधी कोणी रडत नाहीत. बाबा समजावून सांगतात - रडण्याची तर काहीच गरज नाही. आत्म्याला आपल्या कर्मांच्या हिशोबानुसार जाऊन पार्ट बजावायचा आहे. ज्ञान नसल्याकारणाने मनुष्य किती रडतात. जसे वेडे होतात, इथे तर बाबा म्हणतात - ‘अम्मा मरे तो भी हलुआ खाना… बाप मरे तो भी हलुआ खाना…’ नष्टोमोहा व्हायचे आहे. माझे तर एकच बेहदचे बाबा आहेत, दुसरे कोणीही नाही. मुलांची अशी अवस्था बनली पाहिजे. मोहजीत राजाची कहाणी देखील ऐकली आहे ना. सतयुगामध्ये कधी दुःखाची गोष्ट असत नाही. ना कधी अकाली मृत्यू होतो. मुले जाणतात, आपण काळावर विजय प्राप्त करतो. बाबांना महाकाल सुद्धा म्हणतात, काळांचाही काळ. तुम्हाला काळावर विजय प्राप्त करायचा आहे अर्थात काळ कधीही खात नाही. काळ ना आत्म्याला, ना शरीराला खाऊ शकतो. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. त्याला म्हणतात काळाने खाल्ले, बाकी काळ कोणती वस्तू नाहीये. मनुष्य फक्त महिमा गात राहतात, ‘अच्युतम केशवम…’ समजत तर काहीच नाहीत. बाबा म्हणतात - हे ५ विकार तुमच्या बुद्धीला किती खराब करून टाकतात. यावेळी कोणीही बाबांना जाणत नाहीत म्हणून याला अनाथांची दुनिया म्हटले जाते. आपसात किती भांडण-तंटे करत राहतात. ही संपूर्ण दुनिया बाबांचे घर आहे ना. बाबा संपूर्ण दुनियेतील मुलांना पतितापासून पावन बनविण्यासाठी येतात. अर्धे कल्प खरोखर पावन दुनिया होती ना. गातात देखील - ‘राम राजा राम प्रजा…’ तिथे मग अधर्माची गोष्ट कशी असू शकते. म्हणतात देखील - तिथे वाघ-बकरी एकत्र पाणी पितात, मग तिथे रावण इत्यादी कुठून आले. समजत नाही, बाहेरची माणसे तर अशा गोष्टी ऐकून हसतात.

बाबा येऊन ज्ञान देतात, ही पतित दुनिया आहे ना. आता प्रेरणेने पतितांना पावन बनवतील काय! बोलावतात - ‘पतित-पावन या’, तर जरूर भारतामध्येच आले होते. आता देखील म्हणतात - मी ज्ञानाचा सागर आलो आहे - तुम्हाला आप समान मास्टर ज्ञान सागर बनविण्यासाठी. बाबांनाच खरा-खरा व्यास म्हटले जाईल. तर हे व्यास देव आणि तुम्ही त्यांची मुले सुखदेव, तुम्ही आता सुखाची देवता बनत आहात. व्यास, शिवाचार्यांकडून सुखाचा वारसा घेत आहात. व्यासाची मुले तुम्ही आहात. परंतु मनुष्य गोंधळून जाऊ नये म्हणून म्हटले जाते - शिवची मुले. त्यांचे मूळ नाव आहे - ‘शिव’. आत्म्याला ओळखले जाते, परमात्म्याला देखील ओळखले जाते. तेच येऊन पतितापासून पावन बनण्याचा मार्ग सांगतात. म्हणतात - मी तुम्हा आत्म्यांचा पिता आहे. म्हणतात अंगुष्ठाकृती आहेत. इतका मोठा आकार असेल तर इथे भृकुटीमध्यावर राहू देखील शकणार नाहीत. ते तर अतिशय सूक्ष्म आहेत. डॉक्टर लोक देखील आत्म्याला पाहण्यासाठी डोकेफोड करतात, परंतु पाहू शकत नाहीत. आत्म्याला रियलाइज (अनुभव) केले जाते. बाबा विचारतात आता तुम्ही आत्म्याला अनुभव केले आहे का? इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. ज्याप्रमाणे एखादे रेकॉर्डिंग केलेले असते. आधी तुम्ही देह-अभिमानी होता, आता देही-अभिमानी बनला आहात. तुम्ही जाणता, आपली आत्मा ८४ जन्म कसे घेत राहते. त्याचा अंत होत नाही. काहीजण विचारतात - हा ड्रामा कधीपासून सुरू झाला. परंतु हा तर अनादि आहे, याचा कधीही विनाश होत नाही. याला म्हटले जाते पूर्वनियोजित अविनाशी वर्ल्ड ड्रामा. वर्ल्डला देखील तुम्ही जाणता. जसे अशिक्षित मुलांना शिकवले जाते, तसे बाबा तुम्हा मुलांना शिकवत आहेत. आत्माच शरीराद्वारे शिकते. हे आहे पत्थर-बुद्धीसाठी फूड. बुद्धीला समज मिळते. तुम्हा मुलांसाठीच बाबांनी चित्रे बनवून घेतली आहेत. समजावून सांगायला खूप सोपी आहेत. त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णु, शंकर; आता ब्रह्माला त्रिमूर्ती का म्हणतात बरे! देव-देव महादेव... एकावर एक ठेवतात. अर्थ काहीही जाणत नाहीत. आता ब्रह्मा कसे असू शकतात, कारण ब्रह्माला तर ‘प्रजापिता’ म्हटले जाते. तर सूक्ष्मवतनमध्ये ते देवता कसे असू शकतात. प्रजापिता ब्रह्मा तर इथेच असले पाहिजेत. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. बाबा म्हणतात - मी या शरीरामध्ये (ब्रह्मा तनामध्ये) प्रवेश करून यांच्याद्वारे तुम्हाला समजावून सांगतो, यांना माझा रथ बनवतो. यांच्या अनेक जन्मांच्या अंतिम जन्मातील अंतिम समयी मी येतो. हे (ब्रह्मा बाबा) देखील ५ विकारांचा संन्यास करतात. संन्यास करणाऱ्याला योगी, ऋषी म्हटले जाते. आता तुम्ही राजऋषी आहात. तुम्ही प्रतिज्ञा करता. ते संन्यासी लोक तर घरदार सोडून निघून जातात. इथे तर पती-पत्नी एकत्र राहतात. म्हणतात आम्ही विकारामध्ये कधीही जाणार नाही. मूळ गोष्ट आहेच विकाराची.

तुम्ही जाणता शिवबाबा रचयिता आहेत. ते नवीन रचना रचतात. ते बीजरूप सत् चित्, आनंदाचा सागर, ज्ञानाचा सागर आहेत. स्थापना, पालना आणि विनाश कसा करतात - हे बाबाच जाणतात. या गोष्टींना मनुष्य काही जाणत नाहीत. तुम्ही मुले आता या सर्व गोष्टींना जाणता, त्यामुळे सर्वांना समजावून सांगू शकता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) प्रत्येक आत्म्याचा कर्मांचा हिशोब आपापला आहे, त्यामुळे कोणी शरीर सोडले तर रडायचे नाही. पूर्णत: नष्टोमोहा बनायचे आहे. बुद्धीमध्ये राहावे की माझे तर एक बेहदचे बाबा, दुसरे कोणीही नाही.

२) ५ विकार जे बुद्धीला खराब करतात त्यांचा त्याग करायचा आहे. सुख देणारा देवता बनून सर्वांना सुख द्यायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही.

वरदान:-
सदैव मर्यादांच्या रेषेच्या आत राहण्याची काळजी घेणारे मर्यादा पुरुषोत्तम भव

जी मुले स्वतःला एका बाबांचीच अर्थात रामाची खरी सीता समजून सदैव मर्यादांच्या रेषेच्या आत राहतात अर्थात याची केअर घेतात (काळजी घेतात), ते केअरफुल सो चियरफुल (सावध तो सुखी) आपोआप राहतात. तर पहाटेपासून रात्रीपर्यंत ज्या काही मर्यादा दिल्या गेल्या आहेत त्यांचे स्पष्ट नॉलेज बुद्धीमध्ये ठेवून, स्वतःला खरी सीता समजून मर्यादांच्या रेषेच्या आत राहा तेव्हाच म्हणणार - मर्यादा पुरुषोत्तम.

बोधवाक्य:-
सेवेच्या अती मध्ये जाऊ नका, सेवा आणि स्व-पुरुषार्थ यांचा बॅलन्स ठेवा.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये :-

“अखंड ज्योती तत्त्व - सायलेन्स लॉज आणि साकारी दुनिया - प्ले ग्राउंड”

आत्म्यांचे निवासस्थान आहे अखंड ज्योती महतत्त्व, जिथे या शरीराच्या पार्ट पासून मुक्त आहे अर्थात दुःख-सुखापासून अलिप्त अवस्थेमध्ये आहे ज्याला सायलेन्स लॉज (शांतीचे विश्रामगृह) असे देखील म्हणतात आणि आत्म्यांचे शरीरासह पार्ट बजावण्याचे स्थान ‘प्ले ग्राउंड’ (खेळाचे मैदान), ही साकारी दुनिया आहे. तर मुख्य दोन दुनिया आहेत एक आहे - निराकारी दुनिया, दुसरी आहे - साकारी दुनिया. दुनियावाले तर फक्त बोलायचे म्हणून बोलतात की, परमात्मा रचयिता आहेत, पालनकर्ता आहेत, संहार करणारे आहेत, खाऊ घालणारे, मारणारे, जाळणारे देखील तेच आहेत. त्यामुळे सुख-दुःख देणारे देखील तेच आहेत; जेव्हा कोणावर दुःख ओढवते तेव्हा म्हणतात - ‘प्रभू तेरा भाना मीठा लागे’, (‘प्रभू तुमची इच्छा गोड वाटते’) आता हे आहे अयथार्थ ज्ञान कारण हे काही परमात्म्याचे काम नाहीये, परमात्मा ‘दुःख-हर्ता’ आहेत, ‘दुःख-कर्ता’ नाहीत. जन्म घेणे आणि शरीर सोडणे, सुख-दुःख भोगणे हे प्रत्येक मनुष्य आत्म्याचे संस्कार आहेत. भौतिक जन्म देणारे आई-वडील आहेत, ते देखील कर्मबंधन अनुसार वडील-मुलाच्या नात्यामध्ये येतात, याच पद्धतीने आत्म्यांचे पिता मग परमात्म पिता आहेत, ते बेहदच्या रचनेची स्थापना आणि पालना कशी करतात! कसे ते आपली तीन रूपे - ब्रह्मा, विष्णु, शंकर यांचे रचयिता आहेत; आणि मग या आकारी रूपांद्वारे दैवी सृष्टीची स्थापना, आसुरी दुनियेचा विनाश आणि मग दैवी दुनियेची पालना करवून घेतात. परमात्म्याची ही तीन कामे बेहदची आहेत. बाकी हे सुख-दुःख, जन्म-मृत्यू कर्मानुसार होते. परमात्मा तर आहेतच सुखदाता ते काही आपल्या मुलांना दुःख देत नाहीत. अच्छा - ओम् शांती.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

संपूर्ण पवित्रता अर्थात मनसामध्ये देखील कोणत्या एकासुद्धा विकाराचा अंश देखील नसावा. ज्ञान, गुण आणि सर्व शक्तींच्या प्राप्तीमध्ये सदैव संपन्न, सर्व प्राप्तींचा लाईटचा क्राऊन स्पष्ट दिसून यावा. स्वतःला सदैव लाईट आत्मिक स्वरूपामध्ये अनुभव करा. कर्मामध्ये देखील स्वतःला लाईट (हलके) अनुभव करा.