13-09-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
15.11.2011 ओम शान्ति
मधुबन
“आता निर्विघ्न आणि
एव्हररेडी राहून १०८ ची माळ तयार करा, ब्रह्मा बाबांसमान संपन्न आणि संपूर्ण बना”
आज सर्वशक्तिवान बाबा
आपल्या मास्टर सर्वशक्तिवान मुलांना सर्व शक्तींचा खजिना देण्यासाठी आले आहेत. सर्व
शक्तींचा खजिना किती सहज प्राप्त होतो. एका सेकंदामध्ये जाणले - माझे बाबा, बाबांनी
म्हटले माझी मुले, एवढ्यातच खजिन्याचे मालक बनला. तर प्रत्येक मुलाकडे सर्व खजिने
सदैव सोबत आहेत ना! नशा आहे - जो बाबांचा खजिना तो माझा खजिना. आता चेक करा, बाबांनी
तर प्रत्येक मुलाला सर्व खजिने दिले आहेत, एकही कमी नाही परंतु ते सर्व खजिने
प्रत्येकाकडे सदैव सोबत आहेत की काही खजिने आहेत आणि काही खजिन्यांची कमतरता आहे?
बापदादांनी तर दिले आहेत परंतु प्रत्येकाकडे सर्व खजिने नेहमीच असतात आणि सर्व खजिने
वेळेवर कार्यामध्ये आणत असता का? मालक बनून ऑर्डर करा म्हणजे मग वेळेवर खजिना
अनुभवता येतो? बापदादांनी चोहो बाजूंच्या मुलांचा सेवेचा उमंग पाहिला सुद्धा, ऐकला
सुद्धा. चोहीकडे खूप उमंग उत्साहाने ही ७५ वर्षांची जयंती साजरी करत आहेत, चॅलेंज
करत आहेत, आता परिवर्तन झाले की झाले. चॅलेंज खूप छान करत आहेत. बापदादा मुलांचा
उमंग-उत्साह पाहून खूश होतात आणि कोणते गाणे गातात? ‘वाह मुलांनो वाह!’ त्याच सोबत
बापदादांनी पाहिले की, चॅलेंज तर खूप छान उमंग-उत्साहाने करत आहेत, परंतु सोबत
मुलांचे स्वतः मधील सर्व धारणांच्या सफलतेचे स्वरूप देखील पाहिले. तुम्ही देखील
सर्व आपले संपन्न आणि सफलतेचे स्वरूप जाणता कारण सर्व निमित्त बनलेली मुले सदैव
संपन्न आणि सफलतामूर्त बनली आहेत की बनायचे आहे? कारण तुम्ही मुलेच सुखमय संसाराचा
आधार स्वरूप आहात. तर बापदादांनी सर्व मुलांचा रिझल्ट पाहिला. तुम्ही जी आधारमूर्त
आहात, फक्त थोडीशीच मुले नाहीत, परंतु तुम्हा सर्व मुलांचे चॅलेंज आहे की आम्ही
सुखमय संसार आणण्यासाठी निमित्त आहोत.
तर बापदादा सर्व
मुलांना विचारत आहेत की, सुखमय संसार आणण्यासाठी निमित्त बनलेली मुले संपूर्ण
संपन्न आधारमूर्त बनली आहेत? बापदादांची मुलांकडून जी अपेक्षा आहे, प्रत्येक बच्चा
सफलतामूर्त असावा, कारण तुम्हा लोकांनी बाबांचे साथी बनून संकल्प केला आहे आणि
मोठ्या आनंदाने चॅलेंज केले आहे, परिवर्तन झाले की झाले. तर स्वतःला विचारा विश्व
परिवर्तनासाठी निमित्त असलेली मुले स्वतः संपन्न आणि संपूर्ण कुठंपर्यंत बनली आहेत?
कारण राज्य स्थापन व्हायचे आहे तर अगोदर राज्यासाठी निमित्त बनलेले आत्मे निमित्त
बनतील आणि त्यांच्या नंतर बाकीचे निमित्त बनू शकतात. तर बापदादांनी पाहिले की आता
संपूर्ण बनण्यामध्ये थोडी मार्जिन शिल्लक राहिली आहे. सेवा तर केली परंतु सेवेच्या
रिझल्टमध्ये तुमचे साथी किती बनले? हिशोब काढा की जे ऐकतात ते समीप किती येतात?
बापदादा मुलांच्या हिंमतीवर खूश आहेत परंतु आता सेवेच्या रिझल्ट मध्ये अजून वेग
वाढवायचा आहे. दरवेळी आत्म्यांना इतके समीप संबंधामध्ये आणा, खूप खूश होतात, आता
ब्रह्माकुमारींच्या कर्तव्याला ओळखण्याच्या बाबतीत खूप जवळ आले आहेत परंतु
बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की, आत्म्यांना वारसा बाबांद्वारे मिळणार
आहे, त्यामुळे बाबांना ओळखू देत, वेळेला जाणू देत, स्वमानाला ओळखू देत, तेव्हाच तर
वारशाचे अधिकारी बनतील. आता, ‘बाबा आले आहेत, बाबा वारसा देत आहेत’, हे बुद्धीमध्ये
येईल तेव्हाच वारसा घेऊन राज्य अधिकारी बनतील.
चोहो बाजूला हा आवाज
पसरावा जे गाणे गाता - ‘हमारा बाबा आ गया’. आता बापदादा हा रिझल्ट पाहू इच्छित आहेत.
परिवर्तन झाले आहे, सेवेचा लाभ झाला आहे, मेहनतीचे फळ मिळाले आहे परंतु अजून
बाबांपर्यंत पोहोचलेले नाहीत, यासाठी काही प्लॅन बनवा. बाबांची प्रत्यक्षता कशी होऊ
शकेल? राजधानीमध्ये राज्य करणारे देखील निर्विघ्न बनले आहेत का? आता परिवर्तनाचे
बटण ड्रामाने दाबावे, एव्हररेडी? एव्हररेडी आहात? बटण दाबायचे का? काय वाटते, बटण
दाबूया? एव्हररेडी आहात? कारण सर्व तयार हवेत, राज्य अधिकारी सुद्धा, रॉयल फॅमिली
सुद्धा, रॉयल प्रजा देखील आणि साधारण प्रजा तर काही मोठी गोष्ट नाहीये. तर बापदादा
आज मुलांना रिझल्ट विचारत आहेत. काय समजता? बापदादांना बटण दाबण्यास फारसा वेळ
लागणार नाही. तर पहिल्या लाईनमध्ये बसलेल्यांना काय वाटते? शक्तींना काय वाटते?
पांडव काय वाटते? उत्तर द्या. हां, पांडव उत्तर द्या. बटण दाबावे का? एव्हररेडी
आहात? (बाबा, आपणच मालक आहात, आपल्याला ते बटण दाबण्याचा संकल्प आला, तर ते दाबून
टाका) बापदादा मुलांना का विचारत आहेत? कारण बाबांना तर राज्यामध्ये यायचे नाहीये,
ब्रह्मा बाबांना यायचे आहे. (इथेच बापदादांना भेटत राहावे, हे खूप छान वाटते) ही तर
चांगली गोष्ट आहे परंतु पित्यासमान बनून बाबांच्या सोबत जीवनाचा अनुभव करावा हे
देखील हवे ना. ते आहे का? तयार आहात? फक्त तुम्हीच नाही, राजधानी आहे. तुम्ही राज्य
कोणावर करणार? राजधानी तर पाहिजे ना! (आम्ही सर्वजण सोबती आहोत) सर्व तयार आहात का?
(पूर्णपणे तयार आहोत) संपन्न बनण्यास तयार आहात का? अच्छा, सर्वजण विचार करत आहेत,
काही हरकत नाही.
बापदादा जाणतात की,
आता फक्त रेडी आहेत, एव्हररेडी बनावे लागेल. बापदादांनी ज्या दोन गोष्टी सांगितल्या
होत्या की सेकंदामध्ये फुलस्टॉप लावणारी मुले पाहिजेत. व्यर्थ संकल्पांचे नामोनिशाण
राहू नये. ज्यांना पण संदेश देता, ते संदेश ऐकून परिवर्तन करण्यासाठी
उमंग-उत्साहामध्ये यावेत. आता बापदादांना असा रिझल्ट हवा आहे. यासाठी बापदादा
मुलांना सल्ला देत आहेत, आज्ञा देखील करत आहेत की, तुम्ही सेवा करता परंतु ज्यांची
पण सेवा करता, एकाच वेळी तीन रूपांनी आणि तीन प्रकारे सेवा करा. तीन रूपे -
नॉलेजफुल, पॉवरफुल आणि लव्हफुल, या तिन्ही रूपांनी सेवा करा आणि तीन पद्धतीने सेवा
करा, त्या तीन पद्धती आहेत - मनसा, वाचा, कर्मणा एकाच वेळी सेवा. केवळ वाणीद्वारे
सेवा नाही परंतु वाणी सोबतच मनसाद्वारे सेवा देखील एकत्र व्हावी. पॉवरफुल माइंड
असावा. तर आता गरज आहे - एकाच वेळी मनसा पॉवरफुल असण्याची, ज्यामुळे आत्म्यांची
देखील मनसा (मानसिकता) परिवर्तन होऊ शकेल. वाणीद्वारे सर्व ज्ञान स्पष्ट व्हावे आणि
कर्मणा द्वारे, कर्माद्वारे सेवेने त्या आत्म्यांना अनुभव व्हावा की खरोखर, आम्ही
आपल्या परिवारामध्ये पोहोचलो आहोत, आणि परिवाराची फिलिंग आल्यामुळे ते निकटचे
साथीदार बनतील. तर बापदादांना आता एकाच वेळी तीन प्रकारे सेवा एकत्र हवी आहे. हे
होऊ शकते? होऊ शकते का? हात वर करा, होऊ शकते? आता बापदादांनी रिझल्ट मध्ये पाहिले
की वाणीद्वारे नॉलेजफुल बनतात परंतु परिवाराचे साथीदार बनण्याच्या बाबतीत मात्र
अजूनही वेळ लागत आहे. तर बापदादांनी पाहिले की वेळेच्या चॅलेंज सोबतच आता सेवेमध्ये
अशी सेवा करा जी एकाच वेळी तिन्ही सेवेद्वारे त्यांना प्राप्तीचा अनुभव घेता येईल.
तर सर्वजण भेटण्यासाठी
उमंग-उत्साहाने पोहोचले आहेत, तर बापदादा मुलांचा उत्साह पाहून खूश आहेत. आता
संपन्न आणि संपूर्ण बनण्यामध्ये अटेंशन द्यायचे आहे, कारण कमीत-कमी १०८ ची माळ तयार
करू शकाल, करू शकता? १०८ ची माळ तयार आहे? तयार आहे का? कारण राजधानीमध्ये राज्य
अधिकारी तर तेच बनतील ना. तर १०८ रत्नांची लिस्ट आता काढू शकता का? हो सुद्धा म्हणत
नाही आहेत? १०८ राज्य अधिकारी, आणि मग १६ हजार १०८ राज्य अधिकाऱ्यांचे साथीदार.
त्यानंतर मग आहेत नंबरवार. तर बापदादा आता काळा अनुसार, समयाला समीप आणणाऱ्या
मुलांकडून हीच अपेक्षा करत आहेत की, १०८ ची माळ एव्हररेडी असावी, पित्या समान असावी.
तर पहिल्या लाईनमधील तुम्ही ती १०८ नावे काढू शकता का? ‘होय’ किंवा ‘नाही’, एवढे तर
सांगा ना! साकारमध्ये जेव्हा ब्रह्मा बाबा होते तेव्हा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला
परंतु फायनल होऊ शकली नाही, परंतु आता तर ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, तर या ७५
वर्षांच्या जूबिलीमध्ये काहीतरी नवीनता कराल ना! तर नवीनता हीच करा की, प्रत्येकाने
स्वतःला १०८ च्या माळेचा मणी बनवावे, जेणेकरून गणतीमध्ये यावे की हो, १०८ ची माळ तर
बनली; कारण जेव्हा पहिले राज्य अधिकारी बनतील तेव्हाच तर नंतर राज्याच्या
संपर्कातील बनतील. त्यांना देखील जागा हवी ना! तर बापदादांच्या बोलण्याचा हाच
सारांश आहे की, आता प्रत्येकाने स्वतःचा तीव्र पुरुषार्थ करून दृढ संकल्प करायचा आहे
की मला पित्यासमान बनायचेच आहे; कारण बापदादांनी सांगून टाकले आहे की अचानक
परिवर्तन होणार आहे. त्याआधी कमीत-कमी जे सेवेसाठी निमित्त बनलेले आहेत, झोन हेड्स
सोबत सेंटर इंचार्ज, त्याच सोबत त्यांचे जवळचे साथीदार पांडव, ते सेंटर हेड बनत
नाहीत परंतु कोणत्या ना कोणत्या विशेष कार्यासाठी निमित्त बनलेले आहेत, ज्यांना
सर्वजण ‘विशेष आत्मा’, या नजरेने पाहतात, त्या पांडवांना देखील आता तीव्र पुरुषार्थ
करून स्व-परिवर्तनाची झलक बाहेर स्टेजवर आणावी लागेल, यासाठी एव्हररेडी आहात? जे
समजतात की हे कार्य तर करायचेच आहे, स्वतःला पित्यासमान, ब्रह्मा बाबांसमान फॉलो
फादर करायचेच आहे; करायचे असेल तर हात वर करा. हात तर इतके वर करतात की खूश करून
टाकतात. छान करतात. परंतु हातासोबतच दृढ संकल्प देखील करा. दृढतेची शक्ती खूप सहयोग
देते.
तर बापदादा खूश आहेत,
हात वर करण्यामध्ये सर्वजण खूप हुशार आहेत परंतु आता दृढतेला प्रॅक्टिकल मध्ये आणाल.
तुम्ही मुले हुशार आहात ना, दृढतेने करतात देखील परंतु नंतर मग दृढता वेगवेगळ्या
रूपामध्ये बदलते, ‘हे झाले, ते झाले, असे झाले नसते तर तसे झाले नसते’. या बहाणेबाजी
मध्ये खूप हुशार आहेत. तर आता बापदादा काय इच्छित आहेत? आता प्रत्येकाने पित्या
समान बनायचे आहे, मनसा-वाचा-कर्मणा, संबंध-संपर्कामध्ये तुम्हाला जो कोणी पाहील, जो
कोणी भेटेल त्याने हेच म्हणावे - ‘वाह परिवर्तन वाह!’ बापदादांना देखील आनंद होतो;
जी मुले निमित्त बनलेली आहेत त्यांना पाहिल्याने देखील आनंद होतो आणि भेटीतही खूप
आनंद मिळतो.
तर आज कोणता संकल्प
केलात? बनायचेच आहे. ब्रह्मा बाबांसमान बनायचेच आहे. ‘बनायचे आहे’ नाही, परंतु
‘बनायचेच आहे’. कोणतीही गोष्ट आली, गोष्टी ऐवजी बाबांना समोर ठेवा. तर दूर बसलेली
सर्व मुले, जवळ समोर बसलेली मुले, दोघांनाही पाहून बापदादा हर्षित होत आहेत. सर्व
मुले प्लॅन खूप चांगला बनवतात, अमृतवेलेला सर्व खूप गोड-गोड गोष्टी करतात. बहुतांशी
इतक्या गोड गोष्टी करतात की बाबा देखील गोष्टी ऐकून कुर्बान होतात. परंतु माहित आहे
नंतर मग काय होते? जेव्हा कर्माच्या क्षेत्रामध्ये येतात, संबंधामध्ये येतात,
सेवेमध्ये येतात, तर ज्या गोष्टी येतात त्यामध्ये थोडे-थोडे बदलत जातात. अमृतवेलेचा
जो उमंग-उत्साह असतो तो कर्म करताना, संबंधामध्ये येताना थोडा-थोडा बदलून जातो.
आता बापदादा एक कार्य
देत आहेत, करण्यासाठी तयार आहात ना! मान हलवा. हात वर करा. बापदादांचा संकल्प आहे
की एका महिन्यासाठी स्वतःला दृढ संकल्पाच्या आधारे पित्या समान स्थितीमध्ये स्थित
करू शकता का? एक महिना करू शकता की जास्त वेळ वाटतो आहे? जे समजतात की, एक महिना
दृढतेने, दृढतेला सोबती बनवा, बाबांना सदैव समोर ठेवा, ब्रह्मा बाबांना नजरेमध्ये
सामावून ठेवा; ब्रह्मा बाबांनी अजून काय केले, मनसा-वाचा-कर्मणा जे केले तेच करायचे
आहे. भले मग कोणी प्रॅक्टिकलमध्ये त्यांना पाहिले असो अथवा नसो, परंतु नॉलेज तर आहे
ना! कोणतेही कर्म करण्यापूर्वी हे चेक करा की, ब्रह्मा बाबांचा हा संकल्प होता,असे
बोल होते, असे कर्म होते, असा संबंध होता, असा संपर्क होता? आधी विचार करा नंतर कृती
करा. होऊ शकते का? यामध्ये हात वर करा. होऊ शकत असेल तर उंच हात वर करा. मातांनो इथे
एक्सरसाइज करता ना तर उंच हात वर करा. समोर असणारे देखील हात वर करतील ना? सर्व
मधुबनवाले यामध्ये नंबर वन मध्ये या. मधुबन वाले अगदी समोर बसले आहेत ना. मधुबनमध्ये
फक्त शांतीवन नाही, जे कोणी आहेत एक महिना निर्विघ्न, प्रत्येक सेंटर देखील
निर्विघ्न, गुजरातच्या टीचर्स हात वर करा. गुजरातच्या टीचर्सना वाटते की हे होऊ शकते,
यामध्ये उंच हात वर करा. असे-असे करू नका उंच वर करा. होऊ शकते? अच्छा. शांतीवन
निवासी हात वर करा, थोडे आहेत. जे पण बसलेले आहेत, मागेसुद्धा बसलेले आहेत. तर
मधुबनची जी ४-५ स्थाने, जी पण आहेत ते करतील? करतील? हात वर करा. मधुबनवाले दोन हात
वर करा. गुजरातचे जिज्ञासू सुद्धा, निमित्त टीचर्स सुद्धा, निमित्त भाऊ सुद्धा
सर्वांनी हात वर करा, करणार. मोठा हात वर करा. मागच्या लोकांचा हात दिसत नाहीये,
अच्छा, गुजरातवाले उभे राहा. गुजरात तर खूप आले आहे. अर्धा हॉल तर गुजरात आहे. (गुजरात
१५ हजार आहे, बाकी ३ हजार आहेत) गुजरातवाल्याना बापदादांकडून आणि परिवाराच्या वतीने
खूप-खूप मुबारक असो, मुबारक असो. जशा आता टाळ्या वाजवल्या ना, तसेच एका महिन्यानंतर
रिझल्टमध्ये गुजरात नंबरवन येईल! चांगले आहे. संख्या तर खूप छान आहे. बापदादा खुश
होतात की मुलांचे बाबांवर आणि मधुबनवर मनापासून प्रेम आहे. खूप सुंदर आहे, आता
गुजरातवाल्यांनी चमत्कार करून दाखवा. या एका महिन्याच्या रिझल्टमध्ये नंबरवन येऊन
दाखवा. तसेही सर्वांनाच नंबर वन यायचे आहे. मधुबनवाले नंबरवन येणार ना, हात वर करा.
काहीही होवो, कशीही परिस्थिती असो, परिस्थिती येईल, माया ऐकत आहे ना, तर माया आपले
रूप तर दाखवणार परंतु मायेचे काम आहे येणे आणि तुमचे काम आहे विजय प्राप्त करणे. असे
म्हणायचे नाही की, ‘हे झाले, ते झाले, असे करायचे नाही’. येणार, होणार, हे तर
बापदादा आधीच सांगून टाकतात कारण माया ऐकत आहे, ती खूप चतुर आहे परंतु तुम्ही, माया
कितीही चतुर असो तुम्ही तर सर्वशक्तिवानचे साथीदार आहात, तर माया काय करणार. बापदादा
पाहत आहेत, टी.व्ही. मध्ये पाहत आहेत, तर सर्वांनी नंबरवन घ्या. कोणीही नंबर टू
बनायचे नाही, नंबर वन. अच्छा.
बापदादा आता सर्व
मुलांना एकच श्रेष्ठ संकल्प सांगू इच्छितात की आता स्वतः देखील निर्विघ्न राहा आणि
आपल्या साथीदारांना, संबंधामध्ये येणाऱ्यांना देखील निर्विघ्न बनवा. समयाला समीप आणा.
बापदादा मुलांचे दुःख आणि अशांती पाहू शकत नाहीत. आता आपले राज्य लवकरात लवकर
धरतीवर आणा. बापदादांना प्रत्येक मूल प्रिय आहे, लास्ट नंबरचा जो बच्चा आहे तो
देखील प्रिय आहे कारण कमजोर आहे ना. तर कमजोर असणाऱ्याची अजूनच जास्त दया येते.
तुम्ही देखील सर्वांनी कशीही स्थिती असणारा, स्वभाव असलेला असो परंतु आपला आहे, जसे
बाबा आपले आहेत, तसेच परिवार आपला आहे, तर त्यांचे स्वभाव-संस्कार न पाहता त्यांना
आणखी सहयोग द्या, सद्भावना द्या, शुभ भावना द्या. अच्छा, समोर बसलेल्या मुलांना अथवा
दूर बसून पाहणाऱ्या मुलांना, बापदादा प्रत्येक मुलाला आपल्या समोर बघत दृष्टि देखील
देत आहेत आणि मुबारक सुद्धा देत आहेत. अच्छा.
वरदान:-
वाचे द्वारे
ज्ञान-रत्नांचे दान करणारे मास्टर नॉलेजफुल भव
जे वाचे द्वारे
ज्ञान-रत्नांचे दान करतात त्यांना मास्टर नॉलेजफुलचे वरदान प्राप्त होते. त्यांच्या
प्रत्येक शब्दाची खूप व्हॅल्यू असते. त्यांचे एक-एक वचन ऐकण्यासाठी अनेक आत्मे
तहानलेले असतात. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये सार भरलेले असते. त्यांना विशेष
आनंदाची प्राप्ती होते. त्यांच्याकडे खजिना भरपूर असतो त्यामुळे ते सदैव संतुष्ट आणि
हर्षित राहतात. त्यांचे शब्द अधिकाधिक प्रभावशाली होत जातात. वाणीचे दान केल्याने
वाणीमध्ये खूप गुण येतात.
सुविचार:-
स्वराज्याचे मालक बना
तेव्हाच संपूर्ण वारशाचा अधिकार मिळेल.
अव्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
तुम्हा मास्टर दाता,
प्राप्ती स्वरूप मुलांना विश्वातील आत्म्यांप्रती दया अथवा उमंग आला पाहिजे की आमचे
भाऊ अल्पकाळाच्या इच्छेसाठी किती भटकत आहेत; दात्याची मुले आपल्या भावांवर दया आणि
करुणेची दृष्टी टाका. महादानी, वरदानी बना. चमकणारे संतुष्ट मणी बनून सर्वांना
संतोष द्या.