13-12-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमचे हे ईश्वरीय मिशन आहे, तुम्ही सर्वांना ईश्वराचे बनवून त्यांना बेहदचा वारसा मिळवून देता”

प्रश्न:-
कर्मेंद्रियांची चंचलता कधी समाप्त होईल?

उत्तर:-
जेव्हा तुमची स्थिती सिल्वर एज्ड पर्यंत पोहोचेल अर्थात जेव्हा आत्मा त्रेताच्या सतो स्टेज पर्यंत पोहोचेल तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद होईल. आता तुमची रिटर्न जर्नी (परतीचा प्रवास) आहे म्हणून कर्मेंद्रियांना आपल्या काबूत ठेवायचे आहे. लपून असे कोणतेही कर्म करायचे नाहीये ज्यामुळे आत्मा पतित बनेल. अविनाशी सर्जन तुम्हाला जे पथ्य सांगत आहेत, त्यावर चालत रहा.

गीत:-
मुखडा देख ले प्राणी…

ओम शांती।
रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत. फक्त तुम्हा मुलांनाच नाही, तर जी पण रुहानी मुले प्रजापिता ब्रह्मा मुखवंशावळी आहेत, ती जाणतात. आम्हा ब्राह्मणांनाच बाबा समजावून सांगतात. अगोदर तुम्ही शूद्र होता मग येऊन ब्राह्मण बनला आहात. बाबांनी वर्णांचा सुद्धा हिशोब समजावून सांगितला आहे. दुनियेमध्ये वर्णांना सुद्धा समजत नाहीत. फक्त गायन आहे. आता तुम्ही ब्राह्मण वर्णाचे आहात मग देवता वर्णाचे बनाल. विचार करा ही गोष्ट राईट आहे का? जज युअर सेल्फ (स्वतःच निर्णय घ्या). आमची गोष्ट ऐका आणि पडताळून पहा. जन्म-जन्मांतर जी शास्त्रे ऐकलेली आहेत ती आणि ज्ञान सागर बाबा जे समजावून सांगतात ते त्यांना पडताळून पहा - कोणते बरोबर आहे? ब्राह्मण धर्म अथवा कुळ अगदीच विसरून गेले आहेत. तुमच्याकडे विराट रूपाचे चित्र अगदी अचूक बनलेले आहे, यावर समजावून सांगितले जाते. बाकी ही जी अनेक भुजावाली चित्रे बनवलेली आहेत आणि देवींना शस्त्रास्त्रे इत्यादी दिली आहेत, ते सगळे चुकीचे आहे. ही भक्तीमार्गाची चित्रे आहेत. या डोळ्यांनी सर्व बघतात परंतु समजत नाहीत. कोणाच्याही ऑक्युपेशन विषयी देखील ठाऊक नाही आहे. आता तुम्हा मुलांना स्वतःच्या आत्म्याबद्दल माहीत झाले आहे. आणि ८४ जन्मां विषयी देखील माहित झाले आहे. जसे बाबा तुम्हा मुलांना समजावून सांगतात, तसे तुम्हाला मग इतरांना समजावून सांगायचे आहे. शिवबाबा काही सर्वांकडे जाणार नाहीत. जरूर बाबांचे मदतगार हवेत ना; म्हणून तुमचे आहे ईश्वरीय मिशन. तुम्ही सर्वांना ईश्वराचे बनवता. समजावून सांगता ते आम्हा आत्म्यांचे बेहदचे पिता आहेत. त्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळेल. जसे लौकिक पित्याची आठवण केली जाते, त्यांच्यापेक्षाही जास्त पारलौकिक पित्याची आठवण करावी लागेल. लौकिक पिता तर अल्पकाळासाठी सुख देतात. बेहदचे बाबा बेहदचे सुख देतात. हे आता आत्म्यांना ज्ञान मिळत आहे. आता तुम्ही जाणता ३ पिता आहेत. लौकिक, पारलौकिक आणि अलौकिक. बेहदचे पिता अलौकिक पित्या द्वारे तुम्हाला समजावून सांगत आहेत. या पित्याला कोणीही जाणत नाहीत. ब्रह्माच्या बायोग्राफी विषयी कोणालाच माहिती नाहीये. त्यांचे ऑक्युपेशन सुद्धा जाणून घेतले पाहिजे ना. शिवाची, श्रीकृष्णाची महिमा गातात बाकी ब्रह्माची महिमा कुठे आहे? निराकार पित्याला जरूर मुख तर पाहिजे ना, ज्यातून अमृत देतील. भक्तिमार्गामध्ये बाबांना यथार्थ रित्या कधीही आठवण करू शकत नाहीत. आता तुम्ही जाणता, समजता शिवबाबांचा हा रथ आहे. रथाचा सुद्धा श्रृंगार करतात ना. जसे मोहम्मदच्या घोड्याला सुद्धा सजवतात. तुम्ही मुले किती चांगल्या रीतीने लोकांना समजावून सांगता. तुम्ही सर्वांची प्रशंसा करता. सांगता - तुम्ही हे देवता होता मग ८४ जन्म भोगून तमोप्रधान बनले आहात. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे तर त्यासाठी योग पाहिजे. परंतु मोठ्या मुश्किलीने कोणी समजतात. समजतील तर आनंदाचा पारा चढेल. समजावून सांगणाऱ्याचा तर अजूनच पारा चढेल. बेहदच्या बाबांचा परिचय देणे काही छोटी गोष्ट आहे का. समजू शकत नाहीत. म्हणतात - हे कसे होऊ शकते. बेहदच्या बाबांची जीवन कहाणी ऐकवतात.

आता बाबा म्हणतात - मुलांनो, पावन बना. तुम्ही हाका मारत होता ना की, ‘हे पतित-पावन, या’. गीतेमध्ये देखील ‘मनमनाभव’ शब्द आहे परंतु त्याचे स्पष्टीकरण कोणाकडेच नाहीये. बाबा, आत्म्या विषयीचे ज्ञान देखील किती क्लिअर करून समजावून सांगतात. कोणत्याही शास्त्रामध्ये या गोष्टीच नाही आहेत. भले म्हणतात - आत्मा बिंदू आहे, भृकुटीच्या मध्यभागी स्टार आहे. परंतु यथार्थ रीतीने कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे. ते देखील जाणून घ्यावे लागेल. कलियुगामध्ये आहेतच अनराइटियस (दुराचारी). सतयुगामध्ये आहेत सर्व राइटियस (नीतिमान). भक्तिमार्गामध्ये मनुष्य समजतात - हे सर्व ईश्वराला भेटण्याचे मार्ग आहेत; म्हणून तुम्ही प्रथम फॉर्म भरायला लावता की, इथे का आला आहात? यासाठी देखील तुम्हाला बेहदच्या बाबांचा परिचय द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही विचारता - आत्म्याचा पिता कोण? मग सर्वव्यापी म्हटल्याने तर काही अर्थच निघत नाही. सर्वांचा पिता कोण? ही आहे मुख्य गोष्ट. आपापल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही समजावून सांगू शकता. एक-दोन मुख्य चित्रे - शिडी, त्रिमूर्ती, झाड ही खूप गरजेची आहेत. झाडाच्या चित्रावरून सगळ्या धर्मांचे समजू शकतात की आपला धर्म केव्हा सुरू झाला! या हिशोबाने आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो का? जे येतातच मागून ते तर स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाहीत. बाकी शांतीधाम मध्ये जाऊ शकतात. झाडाच्या चित्रावरून सुद्धा खूप चांगले स्पष्ट होते. जे-जे धर्म मागाहून आले आहेत त्यांचे आत्मे जरूर वर जाऊन विराजमान होतील. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व फाउंडेशन घातले जाते. बाबा म्हणतात - आदि सनातन देवी-देवता धर्माचे कलम तर लागले मग झाडाची पाने सुद्धा तुम्हाला बनवायची आहेत, पानांशिवाय झाड तर असत नाही म्हणून बाबा आपसमान बनविण्यासाठी पुरुषार्थ करवून घेत राहतात. इतर धर्मवाल्यांना पाने (आपली प्रजा) बनवावी लागत नाहीत. ते तर वरून येतात, फाउंडेशन घालतात. मग पाने मागाहून वरून येत जातात. तुम्ही मग झाडाच्या वृद्धीसाठी ही प्रदर्शनी इत्यादी करता. याद्वारे पाने लागतात (प्रजा क्वालिटीचे आत्मे येतात), आणि मग वादळ आल्याने झडतात, कोमेजून जातात. ही आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. यामध्ये युद्ध इत्यादीची कोणतीही गोष्ट नाही. फक्त बाबांची आठवण करा आणि करवून घ्या. तुम्ही सर्वांना म्हणता इतर जी काही रचना आहे त्याचा विचार सोडा. रचने कडून कधी वारसा मिळू शकत नाही. रचयिता बाबांचीच आठवण करायची आहे. इतर कोणाचीही आठवण येऊ नये. बाबांचे बनून, ज्ञानामध्ये येऊन मग जर असे कोणते काम करतात तर त्याचे ओझे डोक्यावर खूप चढते. बाबा पावन बनविण्यासाठी येतात आणि मग असे काही काम करतात तर अजूनच पतित बनतात; म्हणून बाबा म्हणतात - असे कोणतेही काम करू नका ज्याने तोटा होईल. बाबांची निंदा केली जाते ना. असे कर्म करू नका ज्याने जास्त विकर्म होईल. पथ्य देखील पाळायचे आहे. औषधांमध्ये सुद्धा पथ्य ठेवले जाते. डॉक्टर म्हणतात - हे आंबट इत्यादी खायचे नाही तर ऐकायचे आहे. कर्मेंद्रियांना वश करावे लागते. जर लपवून खात राहाल तर मग औषधाचा परिणाम होणार नाही. याला म्हटले जाते आसक्ती. बाबा देखील शिकवण देतात की, हे करू नका. सर्जन आहेत ना. मुले लिहितात - बाबा मनामध्ये संकल्प खूप येतात. सावध रहायचे आहे. घाणेरडी स्वप्ने, मनसामध्ये संकल्प इत्यादी खूप येतील, यांना घाबरायचे नाही आहे, सतयुग-त्रेतामध्ये या गोष्टी नसतात. तुम्ही जितके पुढे जवळ येत जाल, सिल्वर एज्ड पर्यंत पोहोचाल तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद होईल. कर्मेंद्रिया वश होतील. सतयुग-त्रेतामध्ये वश होती ना. जेव्हा त्या त्रेताच्या अवस्थेपर्यंत याल तेव्हा वश होतील. मग सतयुगाच्या अवस्थेमध्ये याल तर सतोप्रधान बनाल मग सर्व कर्मेंद्रिये संपूर्ण वश होतील. कर्मेंद्रिये वश होती ना. नवीन गोष्ट थोडीच आहे. आज कर्मेंद्रियांच्या वश आहात, उद्या मग पुरुषार्थ करून कर्मेंद्रियांना वश करता. ते तर ८४ जन्मांमध्ये उतरत आले आहेत. आता रिटर्न जर्नी (परतीचा प्रवास) आहे, सर्वांना सतोप्रधान अवस्थेमध्ये जायचे आहे. आपला चार्ट बघायचा आहे - आपण किती पाप केले, किती पुण्य केले . बाबांची आठवण करता-करता आयर्न एज्ड पासून सिल्वर एज्ड पर्यंत पोहोचाल तर कर्मेंद्रिये वश होतील. मग तुम्हाला जाणीव होईल - आता कोणतेही वादळ येत नाही. ती सुद्धा अवस्था येईल. मग गोल्डन एज्ड मध्ये निघून जाल. मेहनत करून पावन बनल्याने आनंदाचा पारा सुद्धा चढेल. जे कोणी येतात त्यांना समजावून सांगायचे आहे की, कसे तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत? ज्यांनी ८४ जन्म घेतले आहेत, तेच समजतील. म्हणतील - आता बाबांची आठवण करून मालक बनायचे आहे. जर तुम्हाला ८४ जन्म समजले नाहीत तर याचा अर्थ तुम्ही कदाचित राज्याचे मालक बनला नसाल. आम्ही फक्त प्रोत्साहन देतो, चांगली गोष्ट ऐकवतो. तुम्ही खाली घसरता (पतित बनता). ज्यांनी ८४ जन्म घेतले असतील त्यांना लगेच आठवेल. बाबा म्हणतात - तुम्ही शांतिधाममध्ये पवित्र तर होता ना. आता पुन्हा तुम्हाला शांतिधाम, सुखधाममध्ये जाण्याचा रस्ता सांगतो. दुसरे कोणीही रस्ता सांगू शकणार नाहीत. शांतीधाममध्ये देखील पावन आत्मेच जाऊ शकतील. जितकी गंज निघत जाईल तितके उच्चपद मिळेल, जो जितका पुरुषार्थ करेल. प्रत्येकाच्या पुरुषार्थाला तर तुम्ही बघत आहात, बाबा देखील खूप चांगली मदत करतात. हा तर जसा जुना मुलगा आहे. प्रत्येकाच्या नाडीला समजता ना. हुशार जे असतील ते लगेच समजतील. बेहदचे बाबा आहेत, त्यांच्याकडून जरूर स्वर्गाचा वारसा मिळायला हवा. मिळाला होता, आता नाहीये, आता पुन्हा मिळत आहे. एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. बाबांनी जेव्हा स्वर्गाची स्थापना केली होती, तुम्ही स्वर्गाचे मालक होता. मग ८४ जन्म घेऊन खाली उतरत आला आहात. आता हा आहे तुमचा अंतिम जन्म. हिस्ट्री रिपीट तर जरूर होईल ना. तुम्ही ८४ चा पूर्ण हिशोब सांगता. जितक्या जणांना समजेल तितकी पाने बनत जातील. तुम्ही देखील अनेकांना आपसमान बनवता ना. तुम्ही म्हणाल आम्ही आलो आहोत साऱ्या विश्वाला मायेच्या कैदेतून सोडवण्यासाठी. बाबा म्हणतात - मी सर्वांना रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी येतो. तुम्ही मुले देखील समजता बाबा ज्ञानाचा सागर आहेत. तुम्ही देखील ज्ञान प्राप्त करून मास्टर ज्ञानसागर बनता ना. ज्ञान वेगळे आहे, भक्ती वेगळी आहे. तुम्ही जाणता भारताचा प्राचीन राजयोग बाबाच शिकवतात. कोणताही मनुष्य शिकवू शकत नाही. परंतु ही गोष्ट सर्वांना कशी सांगणार? इथे तर असुरांची विघ्ने सुद्धा खूप पडतात. पूर्वी तर समजत होते की, कदाचित कोणी कचरा टाकतात. आता तुम्ही समजता की, ही विघ्न कशी टाकतात. नथिंग न्यू. कल्पापूर्वी देखील हे झाले होते. तुमच्या बुद्धीमध्ये हे सारे चक्र फिरत राहते. बाबा आम्हाला सृष्टीच्या आदी-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगत आहेत; बाबा आम्हाला लाईट हाऊसचे देखील टायटल देतात. एका डोळ्यामध्ये मुक्तिधाम, दुसऱ्या डोळ्यामध्ये जीवन-मुक्ती-धाम. तुम्हाला शांतीधाममध्ये जाऊन मग सुखधाममध्ये यायचे आहे. हे आहेच दुःख धाम. बाबा म्हणतात या डोळ्यांनी जे काही तुम्ही बघता, त्याला विसरा. आपल्या शांतीधामची आठवण करा. आत्म्याला आपल्या पित्याची आठवण करायची आहे, यालाच अव्यभिचारी योग म्हटले जाते. ज्ञान देखील एकाकडूनच ऐकायचे आहे. ते आहे अव्यभिचारी ज्ञान. आठवण देखील एकाचीच करा. ‘मेरा तो एक, दूसरा न कोई’. जोपर्यंत स्वतःला आत्मा निश्चय करत नाही तोपर्यंत एकाची आठवण येणार नाही. आत्मा म्हणते मी तर एका बाबांचीच बनणार. मला जायचे आहे बाबांकडे. हे शरीर तर जुने जडजडीभूत आहे, यामध्ये देखील ममत्व ठेवायचे नाही. ही ज्ञानाची गोष्ट आहे. असे तर नाहीये की, शरीराची काळजी घ्यायची नाहीये. आतून समजायचे आहे - ही जुनी चामडी आहे, याला तर आता सोडायचे आहे. तुमचा आहे बेहदचा संन्यास. ते तर जंगलामध्ये निघून जातात. तुम्हाला तर घरी राहून आठवणीमध्ये रहायचे आहे. आठवणीमध्ये राहता-राहता तुम्ही देखील शरीर सोडू शकता. कुठेही असा तुम्ही बाबांची आठवण करा. आठवणीमध्ये रहाल, स्वदर्शन चक्रधारी बनाल तर कुठेही राहून तुम्ही उच्च पद मिळवाल. जितकी वैयक्तिक मेहनत कराल तितके उच्च पद मिळवाल. घरी असताना देखील आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. अजून फायनल रिझल्टला थोडा वेळ बाकी आहे. मग नवीन दुनिया सुद्धा तयार हवी ना. आता कर्मातीत अवस्था झाली तर सूक्ष्मवतनमध्ये रहावे लागेल. सूक्ष्मवतनमध्ये राहून देखील पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुढे जाऊन तुम्हाला सर्व साक्षात्कार होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एका बाबांकडूनच ऐकायचे आहे. एकाच्याच अव्यभिचारी आठवणीमध्ये राहायचे आहे. या शरीराची काळजी घ्यायची आहे, परंतु मोह ठेवायचा नाही.

२) बाबांनी जे पथ्य सांगितले आहे त्याचे पूर्णपणे पालन करायचे आहे. कोणतेही असे कर्म करायचे नाही ज्याने बाबांची निंदा होईल, पापाचे खाते बनेल. स्वतःला तोट्यात टाकायचे नाही.

वरदान:-
तीन सेवांच्या बॅलन्सद्वारा सर्व गुणांची अनुभूती करणारे गुणमूर्त भव

जी मुले संकल्प, बोल आणि प्रत्येक कर्माद्वारे सेवेमध्ये तत्पर राहतात तेच सफलतामूर्त बनतात. तिन्ही मध्ये मार्क्स समान आहेत, पूर्ण दिवसामध्ये तिन्ही सेवांचा बॅलन्स असेल तर पास विद ऑनर किंवा गुणमूर्त बनतात. त्यांच्याद्वारे सर्व दिव्य गुणांचा शृंगार स्पष्ट दिसून येतो. एकमेकांना बाबांच्या गुणांचा किंवा स्वतःमध्ये धारण केलेल्या गुणांचा सहयोग देणे हेच गुणमूर्त बनणे आहे कारण गुणदान सर्वात मोठे दान आहे.

बोधवाक्य:-
निश्चय रुपी फाउंडेशन पक्के असेल तर श्रेष्ठ जीवनाचा अनुभव स्वतः होतो.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.

मागील कर्मांच्या हिशोबाच्या फलस्वरूप शरीराचे रोग असोत, मनाच्या संस्कारांची अन्य आत्म्यांच्या संस्कारांशी टक्कर सुद्धा होत असेल परंतु कर्मातीत, कर्मभोगाच्या वश न होता मालक बनून हिशोब चुकता करा. कर्मयोगी बनून कर्मभोग चुकता करणे - ही आहे कर्मातीत स्थितीची निशाणी. प्रॅक्टिस करा आत्ता-आत्ता कर्मयोगी, आत्ता-आत्ता कर्मातीत स्टेज.