14-02-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


(विशेष शिवजयंती निमित्त)

प्रश्न:-
बाबा मुलांना संगमावरच सृष्टीचा समाचार ऐकवतात, सतयुगामध्ये नाही, असे का?

उत्तर:-
कारण सतयुग तर आहेच सुरुवातीचा काळ, त्यावेळी साऱ्या सृष्टीचा समाचार म्हणजेच सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान कसे सांगणार? जोपर्यंत चक्र रिपीटच झालेले नाहीये, तोपर्यंत समाचार सांगूच कसे शकणार? संगमावरच तुम्ही मुले बाबांकडून संपूर्ण समाचार ऐकता. तुम्हालाच ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो.

ओम शांती।
आज आहे त्रिमूर्ती शिवजयंती सो ब्राह्मण जयंती सो संगमयुग जयंतीचा शुभ दिवस. असे अनेक आहेत ज्यांना बाबा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकाराच्या ग्रीटिंग्स (शुभेच्छा) देखील देऊ शकत नाहीत. असे बरेच आहेत ज्यांना माहीतच नाहीये की, शिवबाबा कोण आहेत आणि त्यांच्याकडून काय मिळते. मग ते ग्रीटिंग्स काय समजू शकतील? नवीन मुले तर अजिबात समजू शकणार नाहीत. हा आहे ज्ञानाचा डान्स. म्हणतात ना - श्रीकृष्ण डान्स करत असे. इथे मुली राधे-कृष्ण बनून डान्स करतात. परंतु डान्सची तर गोष्टच नाही. ते तर तिथे सतयुगामध्ये लहानपणी प्रिन्स-प्रिन्सेस सोबत डान्स करतील. मुले जाणतात - हे बाप-दादा आहेत. दादाला ग्रँड फादर (आजोबा) म्हटले जाते. हे दादा (ब्रह्मा बाबा) तर झाले देहधारी फादर. इथे तर वंडरफुल गोष्ट आहे! ते दादा (शिवबाबा) आहेत रूहानी आणि हे आहेत देहधारी, म्हणून यांना म्हणतात बापदादा. बाबांकडून दादाद्वारे वारसा मिळतो. वारसा आहे डाडेचा (ग्रँड फादरचा). सर्व आत्मे ब्रदर्स आहेत, म्हणून वारसा बाबांकडून मिळतो. बाबा म्हणतात - तुम्हा आत्म्यांना आपले शरीर आणि आपली कर्मेंद्रिये आहेत. मला निराकार म्हणतात - तर जरूर मला शरीर हवे. तेव्हाच तर मुलांना राजयोग शिकवेन किंवा मनुष्यापासून देवता, पतितापासून पावन बनण्याचा मार्ग सांगेन किंवा मूत पलीती कपडे धुवेन … तर जरूर मोठा धोबी असेल. संपूर्ण विश्वातील आत्म्यांना आणि शरीराला धुतात. ज्ञान आणि योगाद्वारे तुमच्या आत्म्यांना धुतले जाते.

आज तुम्ही मुले आला आहात, जाणता की आपण शिवबाबांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. बाबा पुन्हा म्हणतात की, तुम्ही ज्यांना ग्रीटिंग्स देता, ते बाबा देखील तुम्हा मुलांना ग्रीटिंग्स देत आहेत कारण तुम्ही अतिशय सर्वोत्तम भाग्यशाली ब्राह्मण कुलभूषण आहात. देवता इतके उत्तम नाही आहेत जितके तुम्ही आहात. ब्राह्मण देवतांपेक्षाही उच्च आहेत. उच्च ते उच्च आहेत बाबा. ते मग ब्रह्माच्या तनामध्ये येतात. त्यांची तुम्ही मुले अतिशय उच्च ते उच्च ब्राह्मण बनता. ब्राह्मणांची आहे शिखा, त्याच्या खाली आहेत देवता. सर्वात वर आहेत बाबा. बाबांनी तुम्हा मुलांना ब्राह्मण-ब्राह्मणी बनवले आहे – स्वर्गाचा वारसा देण्यासाठी. या लक्ष्मी-नारायणाची पहा किती मंदिरे बनवली आहेत. डोके टेकतात. भारतवासियांना हे तर माहीत असायला हवे की हे देखील मनुष्यच आहेत. लक्ष्मी-नारायण दोघेही वेगवेगळे आहेत. इथे तर एका माणसाची दोन नावे ठेवली आहेत. एकाचे नाव लक्ष्मी-नारायण अर्थात स्वतःला विष्णु चतुर्भुज म्हणतात. लक्ष्मी-नारायण अथवा राधे-कृष्ण अशी नावे ठेवली आहेत, तर चतुर्भुज झाले ना. ते विष्णु तर आहेत सूक्ष्मवतनचा एम ऑब्जेक्ट. तुम्ही या विष्णुपुरीचे मालक बनाल. हे लक्ष्मी-नारायण विष्णुपुरीचे मालक आहेत. विष्णूच्या आहेत चार भुजा - दोन लक्ष्मीच्या, दोन नारायणच्या. तुम्ही म्हणाल - आम्ही विष्णुपुरीचे मालक बनत आहोत. अच्छा, बाबांची महिमा असलेले गाणे ऐकवा. (कितना मीठा कितना प्यारा शिव भोला भगवान…)

संपूर्ण दुनियेमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत एका व्यतिरिक्त इतर कोणाचीही इतकी महिमा नाहीये. नंबरवार तर आहेतच. सर्वात जास्त सर्वोत्तम महिमा आहे उच्च ते उच्च परमपिता परमात्म्याची, ज्याची तुम्ही सर्व मुले आहात. म्हणता ना - आम्ही ईश्वरीय संतान आहोत. ईश्वर स्वर्गाची रचना करतो तर मग तुम्ही नरकात का पडले आहात? ईश्वराचा इथे जन्म होतो. ख्रिश्चन म्हणतील - आम्ही क्राइस्टचे आहोत. हेच भारतवासीयांना विसरायला झाले आहे की, आपण परमपिता परमात्मा शिवची डायरेक्ट मुले आहोत. बाबा इथे येतात, मुलांना आपले बनवून मग राज्य-भाग्य देण्यासाठी. आज बाबा चांगल्या प्रकारे समजावून सांगत आहेत कारण नवीन मुले देखील खूप आहेत. यांच्यासाठी हे ज्ञान समजणे अवघड आहे. हो, तरीही स्वर्गवासी बनतात. स्वर्गामध्ये सूर्यवंशी राजा-राणी देखील आहेत, दास-दासी देखील आहेत. प्रजा देखील असते. त्यांच्यामध्ये कोणी गरीब, कोणी श्रीमंत असतात. त्यांचे देखील दास-दासी असतात. संपूर्ण राजधानी इथेच स्थापन होत आहे. हे इतर कोणालाही माहीत नाही आहे. सर्वांची आत्मा तमोप्रधान आहे, कोणालाही ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही आहे. (गाणे) आता बाबांची महिमा ऐकली. ते आहेत सर्वांचे पिता. भगवंताला पिता म्हणतात, बेहदचे सुख देणारा पिता. हाच भारत आहे जिथे बेहदचे सुख होते, लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. हे लक्ष्मी-नारायण लहानपणी राधे-कृष्ण असतात, नंतर स्वयंवरानंतर लक्ष्मी-नारायण नाव पडते. या भारतामध्ये ५ हजार वर्षांपूर्वी देवतांचे राज्य होते. लक्ष्मी-नारायणाशिवाय इतर कोणाचेही राज्य नव्हते. कोणताही खंड नव्हता. म्हणून आता भारतवासियांना देखील जरूर माहीत असले पाहिजे की लक्ष्मी-नारायणाने मागील जन्मामध्ये कोणती कर्म केली. जसे आपण म्हणतो - बिर्लांने अशी कोणती कर्म केली ज्यामुळे ते इतके श्रीमंत बनले. नक्कीच म्हणतील की, मागील जन्मामध्ये दान-पुण्य केले असेल. कोणाकडे पुष्कळ धन आहे, कोणाला खाण्यासाठी देखील मिळत नाही, कारण कर्मच अशी केलेली आहेत. कर्मांना तर मानता. कर्म-अकर्म-विकर्म यांची गती गीतेच्या भगवंताने ऐकवली होती, ज्यांची महिमा ऐकलीत. शिव भगवान एकच आहेत. मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. आता बाबा कुठे आले आहेत! म्हणतात - समोर महाभारताची लढाई उभी आहे, तर गोड-गोड बाबा समजावून सांगत आहेत - यांची दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात. ‘दुःख में सिमरण सब करें…’ दुःखामध्ये सर्वजण शिवबाबांची आठवण करतात. सुखामध्ये कोणीही आठवण करत नाही. स्वर्गामध्ये काही दुःख नव्हते. तिथे बाबांकडून मिळालेला वारसा होता. ५ हजार वर्षांपूर्वी जेव्हा शिवबाबा आले होते तेव्हा भारताला स्वर्ग बनवले होते. आता नरक आहे. बाबा आले आहेत स्वर्ग बनविण्याकरिता. दुनियेला तर हे माहीत देखील नाहीये. म्हणतात - ‘आम्ही सर्व आंधळे आहोत. तुम्ही आंधळ्यांची काठी प्रभू या, येऊन डोळे प्रदान करा’. तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. जिथे आपण आत्मे राहतो, ते आहे शांतीधाम. बाबा देखील तिथे राहतात. तुम्ही आत्मे आणि मी राहतो. बाबा म्हणतात - मी तुम्हा सर्व आत्म्यांचा पिता तिथे राहतो. तुम्ही पुनर्जन्माचा पार्ट बजावता, मी बजावत नाही. तुम्ही विश्वाचे मालक बनता, मी बनत नाही. तुम्हाला ८४ जन्म घ्यावे लागतात. तुम्हाला सांगितले होते की, माझ्या मुलांनो, तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाहीत. ८४ लाख जन्म म्हणतात - या खोट्या गोष्टी आहेत. मी ज्ञानाचा सागर, पतित-पावन आहे, मी तेव्हाच येतो जेव्हा सर्व पतित असतात. तेव्हाच येऊन सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून त्रिकालदर्शी बनवतो. बरेच जण विचारतात - अगदी सुरुवातीला मनुष्य कसे रचले गेले? भगवंताने सृष्टी कशी रचली? एका शास्त्रामध्ये देखील असे दाखवतात - प्रलय झाला आणि मग सागरामध्ये पिंपळाच्या पानावर बाळ श्रीकृष्ण आला. बाबा म्हणतात - अशी काही कोणती गोष्ट नाहीये, हा बेहदचा ड्रामा आहे. दिवस आहे - सतयुग-त्रेता, रात्र आहे - द्वापर-कलियुग.

मुले बाबांना शुभेच्छा देतात. बाबा म्हणतात - ततत्वम्. तुम्ही देखील १०० प्रतिशत दुर्भाग्यशाली पासून १०० प्रतिशत सौभाग्यशाली बनता. तुम्ही भारतवासी जे देवता होता, परंतु तुम्हाला माहीत नाही आहे. बाबा येऊन सांगतात. तुम्ही आपल्या जन्मांना जाणत नाही. मी येऊन सांगतो - तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत. बाबा तुम्हाला संगमावर साऱ्या सृष्टीचा समाचार ऐकवतात. सतयुगामध्ये थोडेच ऐकवतील? जो पर्यंत सृष्टीचा आदि-मध्य-अंत झालेलाच नाहीये, तर त्याचा समाचार कसा समजावून सांगतील? मी येतो शेवटी, कल्पाच्या संगमयुगावर. शास्त्रांमध्ये लिहिले आहे - युगे-युगे, श्रीकृष्ण भगवानुवाच - असे गीतेमध्ये लिहिले आहे. सगळ्याच धर्माचे श्रीकृष्णाला भगवान थोडेच मानतील. भगवान तर निराकार आहेत ना. ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता. पित्याकडून वारसा मिळतो. तुम्ही सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहात. परमात्म्याला सर्वव्यापी म्हटल्याने मग फादरहूड (पितृभाव) होतो. फादरला कधी वारसा मिळतो का? वारसा मुलांना मिळतो. तुम्ही सर्व आत्मे मुले आहात. बाबांचा वारसा जरूर पाहिजे. हदच्या वारशाने तुम्ही संतुष्ट होत नाही म्हणून बोलावता - ‘तुमच्या कृपेने आम्हाला भरभरून सुख मिळाले होते’. आता पुन्हा रावणाकडून दुःख मिळाल्यामुळे बोलावू लागले आहात. सर्वांचे आत्मे बोलावतात कारण त्यांना दुःख आहे म्हणून आठवण करतात - ‘बाबा, येऊन सुख द्या’. आता या ज्ञानाने तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. तुमची सद्गती होते, म्हणून गायले जाते - ‘सर्वांचा सद्गती दाता एक बाबा’. आता सर्वजण दुर्गतीमध्ये आहेत नंतर सर्वांची सद्गती होते. जेव्हा लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते तेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये होता. बाकीचे सर्व मुक्तिधाम मध्ये होते. आता आपण बाबांकडून राजयोग शिकत आहोत. बाबा म्हणतात - कल्पाच्या संगमावर मी तुम्हाला शिकवतो. मनुष्यापासून देवता बनवतो.

आता तुम्हा मुलांना संपूर्ण रहस्य समजावून सांगत आहेत - शिवरात्रि कधी झाली, हे तर माहीत असायला हवे. काय झाले, शिवबाबा कधी आले? काहीच जाणत नाही. तर पत्थर-बुद्धी झालात ना. आता तुम्ही पारस-बुद्धी बनत आहात. भारत पारस-पुरी, गोल्डन एज्ड होता. लक्ष्मी-नारायणाला देखील भगवान-भगवती म्हणतात. त्यांना वारसा भगवंताने दिला, आता पुन्हा देत आहेत. तुम्हाला पुन्हा भगवान-भगवती बनवत आहेत. आता हा तुमचा अनेक जन्मांतील अंतीम जन्म आहे. बाबा म्हणतात - विनाश समोर उभा आहे. याला म्हटले जाते - रूद्र ज्ञान यज्ञ. ते सर्व भौतिक यज्ञ असतात. ही आहे ज्ञानाची गोष्ट. यामध्ये बाबा येऊन मनुष्याला देवता बनवतात. तुम्ही शिवबाबांच्या आगमना निमित्त शुभेच्छा देता. बाबा मग म्हणतात - मी एकटा थोडाच येतो. मला देखील शरीर हवे. ब्रह्माच्या तनामध्ये यावे लागेल. सर्वप्रथम सूक्ष्मवतन रचावे लागेल, म्हणून यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश केला आहे, हे (ब्रह्मा बाबा) तर पतित होते. ८४ जन्म घेऊन पतित बनले आहेत. सर्वजण बोलावत होते. आता बाबा म्हणतात - मी पुन्हा तुम्हा मुलांना वारसा देण्याकरिता आलो आहे. बाबाच भारताला स्वर्गाचा वारसा देतात. स्वर्गाचे रचयिता बाबा आहेत, तर जरूर स्वर्गाचीच सौगात देतील. आता तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात. ही पाठशाळा आहे - भविष्यामध्ये मनुष्यापासून २१ जन्मांसाठी देवता बनण्याची. तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात. २१ पिढ्या तुम्ही सुख भोगता. तिथे अकाली मृत्यू होत नाही. जेव्हा शरीराची आयु पूर्ण होते, तेव्हा साक्षात्कार होतो. एक शरीर सोडून दुसरे घेतात. सापाचे देखील उदाहरण आहे ना!

तुम्ही मुले आता बाबांना शुभेच्छा देता. बाबा मग तुम्हाला शुभेच्छा देतात. तुम्ही आता दुर्भाग्यशाली पासून सौभाग्यशाली बनत आहात. पतित मनुष्यापासून पावन देवता बनत आहात. चक्र तर फिरतच राहते. हे तर तुम्हा मुलांनी सर्वांना समजावून सांगायचे आहे. नंतर हे प्रायः लोप होते. सतयुगामध्ये ज्ञानाची गरजच राहत नाही. आता तुम्ही दुर्गतीमध्ये आहात, तेव्हाच या ज्ञानाद्वारे सद्गती मिळते. बाबाच येऊन स्वर्गाची स्थापना करतात. सर्वांचा सद्गुरु एकच आहे. बाकी भक्तीमार्गाच्या कर्मकांडाने कोणाचीही सद्गती होत नाही. सर्वांना शिडी खाली उतरायचीच आहे. भारत सतोप्रधान होता आणि मग ८४ जन्म घ्यावे लागले, आता पुन्हा तुम्हाला चढायचे आहे. मुक्तिधाम - आपल्या घरी जायचे आहे. आता नाटक पूर्ण होत आहे. ही जुनी दुनिया नष्ट होईल. भारताला अविनाशी खंड म्हटले जाते. बाबांचे जन्मस्थान कधीही नष्ट होत नाही. तुम्ही शांतिधाममध्ये जाऊन परत याल, येऊन राज्य कराल. पावन आणि पतित भारतामध्येच होतात. ८४ जन्म घेत-घेत पतित बनला आहात. योगी पासून भोगी बनला आहात. हा आहे रौरव नरक. हा प्रचंड दु:खाचा काळ आहे. अजून तर खूप दु:ख येणार आहे. खुने नाहेक खेळ (विनाकारण रक्तपाताचा खेळ) आहे. बसल्या-बसल्या बॉम्ब पडतील. तुम्ही काय अपराध केला आहे? नाहक सर्वांचा विनाश होणार आहे. विनाशाचे साक्षात्कार तर मुलांनी पाहिले आहेत. आता तुम्हाला सृष्टीचक्राचे ज्ञान समजले आहे. तुमच्याकडे ज्ञानाची तलवार, ज्ञान-खड्ग आहे. तुम्ही आहात ब्रह्माचे मुखवंशावळी ब्राह्मण. प्रजापिता देखील पिता आहेत. कल्पापूर्वी देखील यांनी मुखवंशावली जन्माला घातली होती. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प येतो. यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हाला मुखवंशावली बनवतो. ब्रह्माद्वारे स्वर्गाची स्थापना करवतो. स्वर्गामध्ये तर भविष्यातच जाणार. ही छी-छी दुनिया तर नष्ट झाली पाहिजे. बेहदचे बाबा येतातच मुळी नवीन दुनिया रचण्याकरिता. बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांसाठी तळहातावर बहिश्त (स्वर्ग) घेऊन आलो आहे. तुम्हाला कोणताही त्रास देत नाही. तुम्ही सर्व द्रौपदी आहात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) देवतांपेक्षाही उच्च आपण सर्वोत्तम ब्राह्मण आहोत - या रूहानी नशेमध्ये राहायचे आहे. ज्ञान आणि योगाद्वारे आत्म्याला स्वच्छ बनवायचे आहे.

२) सर्वांना शिवबाबांच्या अवतरणाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. बाबांचा परिचय देऊन पतितापासून पावन बनवायचे आहे. रावण शत्रूपासून स्वतःला मुक्त करायचे आहे.

वरदान:-
विस्ताराच्या रंगीबेरंगी गोष्टींपासून किनारा करून अवघड गोष्टीला सोपे बनविणारे सहजयोगी भव जेव्हा बाबांना पाहण्या ऐवजी गोष्टींना पाहू लागता तेव्हा अनेक प्रश्न उत्पन्न होतात आणि सोपी गोष्ट देखील अवघड वाटू लागते कारण गोष्टी आहेत वृक्ष आणि बाबा आहेत बीज. जे विस्तार रुपी वृक्षाला हातामध्ये घेतात ते बाबांना दूर करतात, आणि मग विस्तार एक जाळे बनते ज्यामध्ये अडकत जातात. गोष्टीच्या विस्तारामध्ये रंगीबेरंगी गोष्टी असतात ज्या आपल्या दिशेने आकर्षित करतात, त्यामुळे बीजरूप बाबांच्या आठवणी द्वारे बिंदू लावून त्यापासून किनारा करा तर सहज योगी बनाल.

बोधवाक्य:-
‘मी’ आणि ‘माझे’पणाच्या भेसळीला नष्ट करणे म्हणजेच रियल गोल्ड बनणे आहे.

हे अव्यक्त इशारे:- एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. आता सर्व मिळून एकमत होऊन सेवेच्या कोणत्याही कार्याला धुमधडाक्यात पुढे वाढवा. प्रत्येक ब्राह्मण आत्म्याच्या सहयोगाने, शुभ-कामना, शुभ-भावनेद्वारे सेवेचा उत्साह निर्माण करा. जर कोणी मुखाने बोलू शकत नसतील तर मनसा वायुमंडळाद्वारे सुखाची वृत्ती, सुखमय स्थितीद्वारे सुखमय संसार बनवा. कुठे जाऊ शकत नसाल, तब्येत ठीक नसेल तर घरी बसून ही सेवा करा, सेवेमध्ये सहयोगी जरूर बना तेव्हाच सर्वांच्या सहयोगा द्वारे सुखमय संसार बनेल.