14-04-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सुख आणि दुःखाच्या या खेळाला तुम्हीच जाणता, अर्धा कल्प आहे सुख आणि अर्धा कल्प आहे दुःख, बाबा दुःख हरून सुख देण्यासाठी येतात”

प्रश्न:-
बरीच मुले कोणत्या एका गोष्टीमध्ये आपल्या मनाला खुश करून मियां मिट्ठू बनतात?

उत्तर:-
बरेचजण असे समजतात - आम्ही तर संपूर्ण बनलो, आम्ही कंप्लिट तयार झालो. असे समजून आपल्या मनाला खुश करतात. हे देखील मियां मिट्ठू बनणे आहे. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, अजून खूप पुरुषार्थ करायचा आहे. तुम्ही पावन बनाल तर मग दुनिया देखील पावन पाहिजे. राजधानी स्थापन होणार आहे, एकच तर काही जाऊ शकत नाही.

गीत:-
तुम्हीं हो माता, तुम्हीं पिता हो…

ओम शांती।
ही मुलांना स्वतःची ओळख मिळते. बाबा देखील असे म्हणतात - आपण सर्व आत्मे आहोत, सर्व मनुष्यच आहोत. मोठा असेल किंवा छोटा असेल, प्रेसिडेंट, राजा-राणी असेल सर्व मनुष्यच आहेत. आता बाबा म्हणतात - सर्व आत्मे आहेत, मी मग सर्व आत्म्यांचा पिता आहे म्हणून मला म्हणतात - ‘परमपिता परमात्मा’ अर्थात ‘सुप्रीम’. मुले जाणतात आम्हा आत्म्यांचे ते पिता आहेत, आपण सर्व बांधव आहोत. मग ब्रह्माद्वारे भाऊ-बहिणींचे उच्च-नीच कुळ बनते. आत्मे तर सर्व आत्माच आहेत. हे देखील तुम्ही समजता. मनुष्य तर काहीच समजत नाहीत. तुम्हाला बाबा बसून समजावून सांगतात - बाबांना तर कोणीही जाणत नाहीत. मनुष्य गातात - ‘हे भगवान’, ‘हे मात-पिता’, कारण उच्च ते उच्च तर एकच असला पाहिजे ना. ते आहेत सर्वांचे पिता, सर्वांना सुख देणारे. सुख आणि दुःखाच्या खेळाला देखील तुम्ही जाणता. मनुष्य तर असे समजतात, आत्ता-आत्ता सुख आहे, आत्ता-आत्ता दुःख आहे. हेच समजत नाहीत की, अर्धा कल्प सुख, अर्धा कल्प दुःख आहे. सतोप्रधान, सतो रजो, तमो आहेत ना. शांतिधाममध्ये आपण आत्मे आहोत, तर तिथे आपण सर्व खरे सोने आहोत. त्यामध्ये भेसळ असू शकत नाही. भले आपला-आपला पार्ट भरलेला आहे परंतु सर्व आत्मे पवित्र असतात. अपवित्र आत्मा राहू शकत नाही. यावेळी मग कोणीही पवित्र आत्मा इथे असू शकत नाही. तुम्ही ब्राह्मण कुलभूषण देखील पवित्र बनत आहात. तुम्ही आता स्वतःला देवता म्हणू शकत नाही. ते आहेत संपूर्ण निर्विकारी. तुम्हाला थोडेच संपूर्ण निर्विकारी म्हणणार. भले कोणीही असो देवतांशिवाय कोणालाही संपूर्ण निर्विकारी म्हणू शकत नाही. या गोष्टी देखील तुम्हीच ऐकता - ज्ञानसागराच्या मुखाद्वारे. हे देखील जाणता की, ज्ञानसागर एकदाच येतात. मनुष्य तर पुनर्जन्म घेऊन परत येतात. काहीजण ज्ञान ऐकून गेले आहेत, संस्कार घेऊन गेले आहेत तर मग परत येतात, येऊन ऐकतात. असे समजा सहा-आठ वर्षाचा असेल तर काहीजणांमध्ये चांगली समज देखील येते. आत्मा तर तीच आहे ना. ऐकून त्यांना चांगले वाटते. आत्मा समजते आपल्याला बाबांचे पुन्हा तेच ज्ञान मिळत आहे. आतून आनंद होतो, इतरांना देखील शिकवू लागतात. फुर्त (हुशार) बनतात. जसे सैनिक ते संस्कार घेऊन जातात तर लहानपणापासूनच तेच काम आनंदाने करू लागतात. आता तुम्हाला तर पुरुषार्थ करून नवीन दुनियेचा मालक बनायचे आहे. तुम्ही सर्वांना समजावून सांगू शकता - एक तर नवीन दुनियेचे मालक बनू शकता किंवा शांतीधामचे मालक बनू शकता. शांतीधाम तुमचे घर आहे - जिथून तुम्ही इथे पार्ट बजावण्यासाठी आला आहात. हे देखील कोणीही जाणत नाही कारण आत्म्याविषयीच माहिती नाही. तुम्हाला देखील हे अगोदर थोडेच माहीत होते की, आपण निराकारी दुनियेमधून इथे आलो आहोत, आपण बिंदू आहोत. संन्यासी लोक भले म्हणतात - ‘भृकुटीच्या मध्यभागी आत्मा तारा राहते’, तरीही बुद्धीमध्ये मोठेच रुप येते. शाळीग्राम म्हटल्याने मोठे रूप समजतात. आत्मा शाळीग्राम आहे. यज्ञ रचतात तेव्हा त्यात देखील मोठे-मोठे शाळीग्राम बनवतात. पूजताना शाळीग्राम मोठ्या आकारातच बुद्धीमध्ये असतो. बाबा म्हणतात हे सर्व अज्ञान आहे. ज्ञान तर मीच ऐकवतो, बाकी अख्या दुनियेतील कोणीही ऐकवू शकत नाही. हे कोणीच समजत नाहीत की आत्मा देखील बिंदू आहे, परमात्मा सुद्धा बिंदू आहेत. ते (दुनियावाले) तर अखंड ज्योती स्वरूप ब्रह्म म्हणतात. ब्रह्मला भगवान समजतात आणि मग स्वतःला भगवान म्हणतात. आणि म्हणतात - ‘आम्ही पार्ट बजावण्यासाठी छोट्या आत्म्याचे रूप धारण करतो. मग मोठ्या ज्योतीमध्ये लीन होतो’. लीन झाले तर मग काय! पार्ट देखील लीन होईल. किती चुकीचे होते.

आता बाबा येऊन सेकंदामध्ये जीवनमुक्ती देतात मग अर्ध्या कल्पानंतर शिडी उतरत जीवनबंधमध्ये येतात. मग बाबा येऊन जीवनमुक्त बनवतात, म्हणून त्यांना सर्वांचे सद्गती दाता म्हटले जाते. तर जे पतित-पावन बाबा आहेत त्यांचीच आठवण करायची आहे, त्यांच्याच आठवणीने तुम्ही पावन बनाल नाहीतर बनू शकत नाही. उच्च ते उच्च एक बाबाच आहेत. बरीच मुले असे समजतात की, आम्ही संपूर्ण बनलो. आम्ही कंप्लिट तयार झालो आहोत. असे समजून आपल्या मनाला खुश करतात. हे देखील मियां मिट्ठू बनणे आहे. बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, आता भरपूर पुरुषार्थ करायचा आहे. पावन बनाल तर मग दुनिया देखील पावन पाहिजे. फक्त एकजण तर काही जाऊ शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न करो की आपण लवकर कर्मातीत बनावे परंतु होणार नाही’. राजधानी स्थापन होणार आहे. भले एखादा स्टुडंट अभ्यासामध्ये खूप हुशार होतो परंतु परीक्षा तर ठरलेल्या वेळीच होणार ना. परीक्षा काही लवकर तर होऊ शकत नाही. हे देखील असेच आहे. जेव्हा वेळ होईल तेव्हा तुमच्या अभ्यासाचा रिझल्ट लागेल. कितीही चांगला पुरुषार्थ असेल, परंतु असे म्हणू शकत नाही की, आम्ही कंप्लिट तयार आहोत. नाही १६ कला संपूर्ण कोणतीही आत्मा आत्ता बनू शकत नाही. खूप पुरुषार्थ करायचा आहे. स्वतःच्या मनाला फक्त खुश करायचे नाहीये की आपण संपूर्ण बनलो. नाही, संपूर्ण बनायचेच आहे अंतामध्ये. ही तर सर्व राजधानी स्थापन होत आहे. हां, एवढे समजतात की, बाकी थोडा वेळ शिल्लक आहे. मुसळ (मिसाईल्स) देखील निघाली आहेत. यांना बनविण्यासाठी देखील आधी वेळ लागतो नंतर मग प्रॅक्टिस झाली की पटापट बनवतात. हे देखील ड्रामामध्ये सर्व नोंदलेले आहे. विनाशासाठी बॉम्ब्स बनवत राहतात. गीतेमध्ये देखील ‘’मुसळ (‘मिसाईल्स’) शब्द आहे. शास्त्रांमध्ये मग लिहिले आहे - पोटातून लोखंडी मुसळ निघाले, आणि मग असे झाले. या सर्व खोट्या गोष्टी आहेत ना. बाबा येऊन समजावून सांगतात - त्यालाच मिसाईल्स (क्षेपणास्त्र) म्हटले जाते. आता या विनाशाच्या आधी आपल्याला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. मुले जाणतात आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो. खरे सोने होतो. भारताला सच-खंड म्हणतात. आता झूठ-खंड बनला आहे. सोने देखील खरे आणि खोटे असते ना. आता तुम्हा मुलांना माहित झाले आहे - बाबांची महिमा काय आहे! ते मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत, सत् आहेत, चैतन्य आहेत. आधी तर फक्त गायन करत होता. आता तुम्ही समजता की बाबा आमच्यामध्ये सर्व गुण भरत आहेत. बाबा म्हणतात की, सर्वप्रथम आठवणीची यात्रा करा, माझी आठवण करा तर तुमची विकर्मे विनाश होतील. माझे नावच आहे - पतित-पावन. गातात देखील - ‘हे पतित-पावन या’ परंतु ते येऊन काय करतात, हे जाणत नाहीत. एकच सीता तर असणार नाही. तुम्ही सर्व सीता आहात.

बाबा तुम्हा मुलांना बेहदमध्ये घेऊन जाण्यासाठी बेहदच्या गोष्टी ऐकवतात. तुम्ही बेहदच्या बुद्धीने जाणता की, मेल आणि फिमेल सर्व सीता आहेत. सर्व रावणाच्या कैदेमध्ये आहेत. बाबा (राम) येऊन सर्वांना रावणाच्या कैदेतून बाहेर काढतात. रावण काही कोणी मनुष्य नाहीये. हे समजावून सांगितले जाते - प्रत्येकामध्ये ५ विकार आहेत, म्हणून रावण राज्य म्हटले जाते. नावच आहे विशश वर्ल्ड (विकारी दुनिया), ते आहे व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया), दोन्ही नावे वेगवेगळी आहेत. हे वेश्यालय आहे आणि ते आहे शिवालय. निर्विकारी दुनियेचे हे लक्ष्मी-नारायण मालक होते. यांच्या समोर विकारी मनुष्य जाऊन डोके टेकवतात. विकारी राजे त्या निर्विकारी राजांसमोर जाऊन डोके टेकवतात. हे देखील तुम्ही जाणता. मनुष्यांना कल्पाच्या आयु विषयीच माहिती नाही तर मग कसे समजू शकतील की रावण राज्य कधी सुरू होते. अर्धे-अर्धे असले पाहिजे ना. राम राज्य, रावण राज्य केव्हापासून सुरू करावे, गोंधळ करून ठेवला आहे.

आता बाबा समजावून सांगतात हे ५००० वर्षांचे चक्र फिरत राहते. आता तुम्हाला माहिती झाली आहे की आपण ८४ चा पार्ट बजावतो. मग आपण घरी जातो. सतयुग-त्रेतामध्ये देखील पुनर्जन्म घेतात. ते आहे रामराज्य मग रावण राज्यामध्ये यायचे आहे. हार-जीतचा हा खेळ आहे. तुम्ही विजय प्राप्त करता तर स्वर्गाचे मालक बनता. हार खाता तर नरकाचे मालक बनता. स्वर्ग वेगळा आहे, कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात स्वर्गामध्ये गेला. आता तुम्ही असे थोडेच म्हणाल! कारण तुम्ही जाणता स्वर्ग कधी असेल. ते (दुनियावाले) तर म्हणतात ज्योत ज्योतीमध्ये सामावली किंवा निर्वाणला गेला. तुम्ही म्हणाल ज्योत काही ज्योतीमध्ये सामावून जावू शकत नाही. सर्वांचा सद्गती दाता तर एकच गायला जातो. स्वर्ग सतयुगाला म्हटले जाते. आता आहे नरक. भारताचीच गोष्ट आहे. बाकी वर काहीही नाही. दिलवाडा मंदिरामध्ये वर स्वर्ग दाखवला आहे तर मनुष्य समजतात की, खरोखर स्वर्ग वरतीच आहे. अरे, वर छतावर मनुष्य कसे असतील, बुद्दू आहेत ना. आता तुम्ही स्पष्ट करून समजावून सांगता. तुम्ही जाणता इथेच स्वर्गवासी होते, इथेच मग नरकवासी बनतात. आता पुन्हा स्वर्गवासी बनायचे आहे. हे नॉलेज आहेच नरापासून नारायण बनण्याचे. कथा देखील सत्यनारायण बनण्याचीच ऐकवतात. राम-सीतेची कथा म्हणत नाहीत, ही आहे नरापासून नारायण बनण्याची. उच्च ते उच्च पद लक्ष्मी-नारायणाचे आहे. त्यांच्या (राम-सीतेच्या) तरीही दोन कला कमी होतात. पुरुषार्थ उच्च पद प्राप्त करण्याचा केला जातो आणि मग जर नाही केला तर जाऊन चंद्रवंशी बनतात. भारतवासी पतित बनतात तेव्हा मग आपल्या धर्माला विसरतात. ख्रिश्चन भले सतोपासून तमोप्रधान बनले आहेत तरी देखील ख्रिश्चन संप्रदायाचे तर आहेत ना. आदि सनातन देवी-देवता संप्रदायवाले तर स्वतःला हिंदू म्हणतात. हे देखील समजत नाहीत की, खरेतर आपण देवी-देवता धर्माचे आहोत. आश्चर्य आहे ना. तुम्ही विचारता - ‘हिंदू धर्म कोणी स्थापन केला?’ तर गोंधळून जातात. देवतांची पूजा करतात तर देवता धर्माचे झाले ना. परंतु समजत नाहीत. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व नॉलेज आहे. तुम्ही जाणता आपण आधी सूर्यवंशी होतो नंतर मग इतर धर्म येतात. आपण पुनर्जन्म घेत येतो. तुमच्यापैकी देखील कोणी यथार्थ रीतीने जाणतात. स्कूलमध्ये देखील काही स्टुडंटच्या बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने येते, काहींच्या बुद्धीमध्ये कमी येते. इथे देखील जे नापास होता त्यांना क्षत्रिय म्हटले जाते. चंद्रवंशीमध्ये जातात. दोन कला कमी झाल्या ना. संपूर्ण बनू शकत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये आता बेहदचा इतिहास-भूगोल आहे. त्या शाळांमध्ये तर हदचा इतिहास-भूगोल शिकतात. ते काही मूल वतन, सूक्ष्म वतनला थोडेच जाणतात. साधु-संत इत्यादी कोणाच्याही बुद्धीमध्ये हे नाही आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे - मूल वतनमध्ये आत्मे राहतात. हे आहे स्थूल वतन. तुमच्या बुद्धीमध्ये सर्व नॉलेज आहे. ही स्वदर्शन चक्रधारी सेना बसली आहे. ही सेना बाबांची आणि चक्राची आठवण करते. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे. बाकी कोणते शस्र इत्यादी नाहीये. ज्ञानाद्वारे स्व चे दर्शन झाले आहे. बाबा आपल्याला रचयित्याचे, आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. आता बाबांचा आदेश आहे की, रचयित्याची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. जितके जे स्वदर्शन चक्रधारी बनतात, इतरांना बनवितात, जे जास्त सेवा करतात त्यांना जास्त मोठे पद मिळेल. ही तर कॉमन गोष्ट आहे - बाबांना विसरलेच आहेत मुळी गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव घातल्यामुळे. श्रीकृष्णाला सर्वांचा पिता म्हणणार नाही. वारसा तर पित्याकडून मिळतो. पतित-पावन, बाबांना म्हटले जाते, ते जेव्हा येतील तेव्हा आपण परत शांतीधाममध्ये जाऊ. मनुष्य मुक्तीसाठी किती डोकेफोड करतात. तुम्ही किती सहज समजावून सांगता. तुम्ही बोला - ‘पतित-पावन तर परमात्मा आहेत मग गंगेमध्ये स्नान करण्यासाठी का जाता!’ गंगातीरी जाऊन बसतात की इथेच आपण मरावे. पूर्वी बंगालमध्ये जेव्हा कोणी मरणासन्न अवस्थेमध्ये येत असे तेव्हा त्याला गंगेवर नेऊन ‘हरी बोल’ करत होते. आणि समजत होते हा मुक्त झाला. आता आत्मा तर निघून गेली. ती काही पवित्र तर बनली नाही. आत्म्याला पवित्र बनविणारे बाबाच आहेत, त्यांनाच बोलावतात. आता बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. बाबा येऊन जुन्या दुनियेला नवीन बनवितात. बाकी नवीन काही रचत नाहीत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांमध्ये जे गुण आहेत, ते स्वतःमध्ये भरायचे आहेत. परीक्षेच्या आधी पुरुषार्थ करून स्वतःला कंप्लिट पावन बनवायचे आहे, यामध्ये मियां मिट्ठू बनायचे नाही.

२) स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे आणि इतरांना बनवायचे आहे. बाबांची आणि चक्राची आठवण करायची आहे. बेहदच्या बाबांद्वारे बेहदच्या गोष्टी ऐकून आपली बुद्धी बेहद मध्ये ठेवायची आहे. हद मध्ये यायचे नाही.

वरदान:-
स्व-स्थिती द्वारे परिस्थितींवर विजयप्राप्त करणारे संगमयुगी विजयरत्न भव

परिस्थितींवर विजय प्राप्त करण्याचे साधन आहे - स्व-स्थिती. हा देह देखील ‘पर’ आहे, ‘स्व’ नाही. ‘स्व-स्थिती’ आणि ‘स्व-धर्म’ नेहमी सुखाचा अनुभव करवितो आणि ‘प्रकृती-धर्म’ अर्थात ‘पर धर्म’ किंवा देहाची स्मृती कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दुःखाचा अनुभव करविते. तर जो सदैव ‘स्व-स्थिती’मध्ये राहतो तो सदा सुखाचा अनुभव करतो; त्यांच्याकडे दुःखाची लाट येऊ शकत नाही. ते संगमयुगी विजयी रत्न बनतात.

बोधवाक्य:-
परिवर्तन शक्तीद्वारे व्यर्थ संकल्पांच्या प्रवाहाचा फोर्स नाहीसा करा.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृती द्वारे सदा विजयी बना”

लोक म्हणतात - ‘जिथे बघतो तिथे तूच तू आहेस’ आणि आपण म्हणतो - ‘आम्ही जे करतो, जिथे जातो बाबा सोबतच आहेत अर्थात तूच तू आहेस’. जसे कर्तव्य सोबत आहे, तसा प्रत्येक कर्तव्य करवून घेणारा देखील सदैव सोबत आहे. करनहार आणि करावनहार दोन्ही कंबाइंड आहेत.