14-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आता तुम्ही संगमावर आहात, तुम्हाला जुन्या दुनियेपासून नाते तोडायचे आहे
कारण ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे”
प्रश्न:-
संगमाची कोणती
विशेषता साऱ्या कल्पापेक्षा वेगळी आहे?
उत्तर:-
संगमाची ही विशेषता आहे की, शिक्षण इथे घेता, प्रारब्ध भविष्यामध्ये प्राप्त करता.
साऱ्या कल्पामध्ये कधीही असे शिक्षण शिकवले जात नाही ज्याचे प्रारब्ध दुसऱ्या
जन्मामध्ये मिळेल. आता तुम्ही मुले मृत्युलोकमध्ये शिकत आहात अमरलोक करिता. इतर
कोणीही दुसऱ्या जन्माकरिता शिकत नाही. षा
गीत:-
दूर देश का
रहने वाला…
ओम शांती।
दूरदेशी राहणारा कोण आहे? हे तर कोणीच जाणत नाहीत. त्यांना स्वतःचा देश नाहीये का
ज्यामुळे ते परक्या देशामध्ये आले आहेत? ते आपल्या स्वतःच्या देशामध्ये येत नाहीत.
हे रावण राज्य परका देश आहे ना. तर शिवबाबा स्वतःच्या देशामध्ये येत नाहीत काय?
अच्छा, रावणाचा परदेश कोणता आहे? दुसरा देश कोणता आहे? शिवबाबांचा आपला स्वतःचा देश
कोणता आहे, परका देश कोणता आहे? मग बाबा परक्या देशामध्ये येतात, तर त्यांचा देश
कोणता आहे? आपल्या देशाची स्थापना करण्यासाठी येतात परंतु काय ते आपल्याच देशामध्ये
खुद्द स्वतः येतात काय? (एका-दोघांनी सांगितले) अच्छा, यावर सर्वांनी विचार सागर
मंथन करा. ही व्यवस्थित समजून घेण्याची गोष्ट आहे. रावणाचा परका देश आहे असे सांगणे
खूप सोपे आहे. रामराज्यामध्ये कधीही रावण येत नाही. बाबांना रावणाच्या देशामध्ये
यावे लागते कारण रावण राज्याला परिवर्तित करायचे असते. हे आहे संगमयुग. ते
सतयुगामध्ये सुद्धा येत नाहीत, कलियुगामध्ये सुद्धा येत नाहीत. संगमावर येतात. तर
हा रामाचा देखील देश आहे, तर रावणाचा सुद्धा देश आहे. हा किनारा रामाचा आहे, तो
किनारा रावणाचा आहे. संगम आहे ना. आता तुम्ही मुले संगमावर आहात. ना या बाजूला आहात,
ना त्या बाजूला आहात. स्वतःला संगमावर आहोत असे समजले पाहिजे. त्या बाजूला आपले
काहीही नाते नाही. बुद्धीने जुन्या दुनियेशी नाते तोडावे लागते. राहतो तर इथेच आहोत.
परंतु बुद्धीने जाणतात की, जुनी दुनिया नष्ट होणार आहे. आत्मा म्हणते - ‘आता मी
संगमावर आहे’. बाबा आलेले आहेत, त्यांना खिवैय्या देखील म्हणतात. आता आपण जात आहोत.
कसे? योगाद्वारे. योग लावण्याकरिता देखील ज्ञान पाहिजे. ज्ञानासाठी देखील ज्ञान
पाहिजे. योगासाठी सांगितले जाते स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. हे देखील
ज्ञान आहे ना. ज्ञान अर्थात स्पष्टीकरण. बाबा मत देण्यासाठी आले आहेत. म्हणतात -
स्वतःला आत्मा समजा. आत्माच ८४ जन्म घेते. बाबा मुलांनाच विस्ताराने समजावून
सांगतात. आता हे रावणराज्य नष्ट होणार आहे. इथे आहे कर्म-बंधन, तिथे आहे कर्म-संबंध.
‘बंधन’ दुःखाचे नाव आहे. ‘संबंध’ (नाते) सुखाचे नाव आहे. आता कर्म-बंधनाला तोडायचे
आहे. बुद्धीमध्ये आहे आपण यावेळी ब्राह्मण संबंधामध्ये आहोत नंतर मग दैवी
संबंधामध्ये जाणार. ब्राह्मण संबंधाचा हा एकमेव जन्म आहे. नंतर मग ८ आणि १२ जन्म
दैवी संबंधामध्ये असणार. हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे म्हणून आपण कलियुगी घाणेरड्या
कर्म-बंधनापासून जशी ग्लानी करतो. या दुनियेच्या कर्म-बंधनामध्ये आता रहायचे नाहीये.
बुद्धी मिळते (ज्ञान मिळते) की, ही सर्व आहेत आसुरी कर्म-बंधने. आपणही एका गुप्त
यात्रेवर आहोत. ही यात्रा बाबांनी शिकवली आहे. मग या कर्म बंधनापासून दूर होऊन आपण
कर्मातीत बनणार. हे कर्म-बंधन आता तुटणारच आहे. आपण बाबांची यासाठी आठवण करतो की
पवित्र बनून चक्राला समजून घेऊन चक्रवर्ती राजा बनावे. शिकत आहोत तर मग त्याचे
देखील एम ऑब्जेक्ट, प्रारब्ध देखील पाहिजे ना. तुम्ही जाणता आपल्याला शिकविणारे
बेहदचे बाबा आहेत. बेहदच्या बाबांनी आम्हाला ५००० वर्षांपूर्वी शिकवले होते. हा
ड्रामा आहे ना. ज्यांना कल्पापूर्वी शिकवले होते त्यांनाच शिकवणार. अजूनही येत
राहतील, वृद्धी होत राहील. सगळेच काही सतयुगामध्ये येणार नाहीत. बाकीचे सगळे परत घरी
(शांतीधामला) जातील. या बाजूला आहे नरक, त्या बाजूला आहे स्वर्ग. त्या (लौकिक)
शिक्षणामध्ये तर समजतात की आपण इथे शिकत आहोत, आणि मग प्रारब्ध देखील इथेच मिळवणार.
इथे आपण शिकतो संगमयुगावर, याचे प्रारब्ध आपल्याला नवीन दुनियेमध्ये मिळणार. ही आहे
नवीन गोष्ट. दुनियेमध्ये असे कोणी म्हणणार नाही की तुम्हाला याचे प्रारब्ध दुसऱ्या
जन्मामध्ये मिळेल. या जन्मामध्ये पुढील जन्मांसाठीचे प्रारब्ध मिळविणे - हे केवळ या
संगमयुगावरच होते. बाबा देखील येतात संगम युगावर. तुम्ही शिकता पुरुषोत्तम
बनण्यासाठी. भगवान ज्ञानसागर एकदाच येऊन नवीन दुनिया अमरपुरीसाठी शिकवतात. हे तर आहे
कलियुग, मृत्युलोक. आपण शिकतो सतयुगासाठी. नरकवासीचे स्वर्गवासी बनण्यासाठी. हा आहे
परका देश, तो आहे आपला देश. त्या आपल्या देशामध्ये बाबांना येण्याची आवश्यकता नाही.
तो देश मुलांसाठीच आहे, तिथे सतयुगामध्ये रावण येत नाही, रावण नाहीसा होतो. तो परत
येईल द्वापरमध्ये. तेव्हा मग बाबा गुप्त होतात. सतयुगामध्ये त्यांना कोणीही जाणत
नाहीत. तर मग आठवण सुद्धा कशाला करतील. सुखाचे प्रारब्ध पूर्ण होते तेव्हा मग रावण
राज्य सुरु होते आणि याला परका देश म्हटले जाते.
आता तुम्ही समजता आपण
संगमयुगावर आहोत, आम्हाला रस्ता दाखवणारे बाबा मिळाले आहेत. बाकी सर्वजण भटकत, धक्के
खात राहतात. जे खूप थकलेले असतील, ज्यांनी अर्ध्या कल्पापूर्वी हा मार्ग पकडला असेल,
ते येत राहतील. तुम्ही पंडे सर्वांना रस्ता दाखवता, हा आहे रूहानी यात्रेचा मार्ग.
सरळ सुखधामला निघून जाल. तुम्ही पंडे ‘पांडव संप्रदाय’ आहात. ‘पांडव राज्य’ म्हटले
जाणार नाही. राज्य ना पांडवांकडे आहे, ना कौरवांकडे आहे. दोघांनाही मुकुट नाही आहे.
भक्तिमार्गामध्ये दोघांनाही मुकुट दाखवले आहेत. आणि जरी दाखवला तरीही कौरवांना
लाईटचा मुकुट (पवित्रतेचा ताज) दाखवणार नाहीत. पांडवांना देखील लाईट (पवित्रता)
दाखवू शकत नाही कारण पुरुषार्थी आहेत. चालता-चालता घसरतात त्यामुळे कोणाला द्यावा;
म्हणून मग या सर्व निशाण्या विष्णूला दिल्या आहेत कारण ते पवित्र आहेत. सतयुगामध्ये
सर्व पवित्र संपूर्ण निर्विकारी असतात. पवित्रतेचा लाईटचा ताज असतो. यावेळी तर
कोणीही पवित्र नाहीत. संन्यासी लोक म्हणतात की आम्ही पवित्र आहोत. परंतु दुनिया तर
पवित्र नाही आहे ना. जन्म तरी देखील विकारी दुनियेमध्येच घेतात. ही आहे रावणाची
पतित पुरी. पावन राज्य सतयुग नवीन दुनियेला म्हटले जाते. आता तुम्हा मुलांना बाबा
बागवान काट्यांपासून फुल बनवतात. ते पतित-पावन देखील आहेत, खिवैय्या देखील आहेत,
बागवान सुद्धा आहेत. बागवान आले आहेत काट्यांच्या जंगलामध्ये, तुमचा कमांडर तर एकच
आहे. यादवांचा कमांडर चीफ शंकराला म्हणावे का? असे तर ते काही विनाश घडवून आणत
नाहीत. जेव्हा वेळ येते तेव्हा युद्ध सुरू होते. म्हणतात की, शंकराच्या प्रेरणेने
मुसळ (मिसाईल) इत्यादी बनतात. या सर्व कहाण्या बसून बनवल्या आहेत. जुनी दुनिया तर
नष्ट जरूर होणार आहे. घर जुने होते तेव्हा मग कोसळते. मनुष्य मरतात. ही देखील जुनी
दुनिया नष्ट होणार आहे. हे सर्व गाडले जाऊन मरतील, कोणी बुडून मरतील, कोणी शॉक
लागून मरतील. बॉम्ब्स इत्यादीचा विषारी वायू देखील मारून टाकेल. मुलांच्या
बुद्धीमध्ये आहे की आता विनाश होणारच आहे. आपण पार पलीकडे जात आहोत. कलियुग पूर्ण
होऊन सतयुगाची स्थापना जरूर होणार आहे. मग अर्धा कल्प युद्ध होतच नाही.
आता बाबा आले आहेत
पुरुषार्थ करवून घेण्यासाठी, हा शेवटचा चान्स आहे. उशीर केलात तर मग अचानक मराल.
मृत्यू समोर उभा आहे. अचानक बसल्या-बसल्या मनुष्य मरतात. मरण्यापूर्वी तरी आठवणीची
यात्रा करा. आता तुम्हा मुलांना घरी जायचे आहे म्हणून बाबा म्हणतात - ‘मुलांनो,
घराची आठवण करा, यामुळे अंत मती सो गती होईल, घरी निघून जाल. परंतु फक्त घराची आठवण
कराल तर तुमची पापे भस्म होणार नाहीत. बाबांची आठवण कराल तर पापे भस्म होतील आणि
तुम्ही आपल्या घरी निघून जाल; म्हणून बाबांची आठवण करत रहा. आपला चार्ट ठेवा तर
माहित होईल, पूर्ण दिवसभरामध्ये आपण काय केले? वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून
आपण जीवनामध्ये काय-काय केले… त्याची देखील आठवण असते. असेही नाही, प्रत्येक वेळी
लिहावे लागते. लक्षात राहते - बगीच्यामध्ये बसून बाबांची आठवण केली, दुकानात कोणी
ग्राहक नव्हते तर आपण आठवणीमध्ये बसलो. मनामध्ये नोंद असते. जर लिहायची इच्छा असेल
तर मग डायरी ठेवावी लागेल. मुख्य गोष्ट हीच आहे की, आपण तमोप्रधानापासून सतोप्रधान
कसे बनावे! पवित्र दुनियेचे मालक कसे बनावे! पतितापासून पावन कसे बनावे! बाबा येऊन
हे नॉलेज देतात. ज्ञानाचा सागर बाबाच आहेत. तुम्ही आता म्हणता बाबा आम्ही तुमचे
आहोत. कायम तुमचेच आहोत, फक्त विसरल्यामुळे देह-अभिमानी बनलो आहोत. आता तुम्ही
सांगितले आहे तर आम्ही पुन्हा देही-अभिमानी बनतो. सतयुगामध्ये आम्ही देही-अभिमानी
होतो. आनंदाने एक शरीर सोडून दुसरे घेत होतो तर तुम्हा मुलांना हे सर्व धारण करून
मग इतरांना समजावून सांगण्यासाठी लायक बनायचे आहे, म्हणजे अनेकांचे कल्याण होईल.
बाबा जाणतात ड्रामा अनुसार नंबरवार पुरुषार्थानुसार सेवायोग्य बनत आहेत. अच्छा,
कोणाला झाडाचे चित्र इत्यादी विषयी समजावून सांगू शकत नसाल, तर मग निदान हे तर सोपे
आहे ना की, कोणालाही बोला - ‘तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा’. हे तर
एकदम सोपे आहे. ‘हे बाबाच म्हणतात की, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’; हे
तुम्हा ब्राह्मणांशिवाय इतर कोणताही मनुष्य असे म्हणू शकणार नाही. दुसरे कोणीही ना
आत्म्याला जाणत, ना परमात्मा पित्याला जाणत. फक्त असेच जर कोणाला सांगाल तर तीर
लागणार नाही (काळजाला भिडणार नाही). भगवंताचे रूप जाणून घेतले पाहिजे. हे सर्व
नाटकाचे ॲक्टर्स आहेत. प्रत्येक आत्मा शरीरासोबत ॲक्ट करते. एक शरीर सोडून दुसरे
घेऊन मग पार्ट बजावते. ते (या दुनियेतील नाटकातील) ॲक्टर्स कपडे बदलून भिन्न-भिन्न
पार्ट बजावतात. आणि तुम्ही मग शरीर बदलता. ते (दुनियेतील नाटकातील ॲक्टर्स) कोणी
पुरुषाचा किंवा स्त्रीचा ड्रेस घालतील अल्पकाळासाठी. परंतु इथे पुरुषाचे शरीर धारण
केले तर पूर्ण आयुष्य पुरुषच राहणार. ते आहेत हदचे ड्रामा, हा आहे बेहदचा ड्रामा.
सर्वात पहिली मुख्य गोष्ट आहे बाबा म्हणतात माझी आठवण करा. ‘योग’ हा शब्द देखील
वापरू नका कारण योग तर अनेक प्रकारचे शिकतात. ते सर्व आहेत भक्तिमार्गातील. आता बाबा
म्हणतात - माझी आठवण करा आणि घराची आठवण करा तर तुम्ही घरी निघून जाल. शिवबाबा
यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) येऊन शिकवण देतात. बाबांची आठवण करता-करता तुम्ही
पावन बनाल मग पवित्र आत्मा उडेल. जितकी म्हणून आठवण केली असेल, सेवा केली असेल तितके
ते उच्च पद मिळवतील. आठवणीमध्येच खूप विघ्न येतात. पावन बनला नाहीत तर मग
धर्मराजपुरीमध्ये सजा सुद्धा भोगावी लागेल. इज्जत सुद्धा जाईल, पदही भ्रष्ट होईल.
शेवटी सर्व साक्षात्कार होतील. परंतु काहीही करू शकणार नाही. साक्षात्कार घडवतील -
तुला इतके समजावून सांगितले तरी देखील आठवण केली नाहीस, पापे राहून गेली. आता भोग
सजा. त्यावेळी शिकण्यासाठी वेळ राहणार नाही. पश्चाताप करतील आपण हे काय केले!
विनाकारण वेळ वाया घालवला. परंतु सजा तर खावी लागेल. थोडीच काही होऊ शकते. नापास
झाले की झाले. मग शिकण्याची गोष्टच नाही. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये तर जर नापास
झाले तर पुन्हा शिकायला जातात, हे (अलौकिक रुहानी) शिक्षण तर पूर्ण होणार. अंतीम
समयी पश्चाताप करावा लागू नये यासाठी बाबा सल्ला देतात - मुलांनो, नीट शिका.
झरमुई-झगमुईमध्ये (व्यर्थ गोष्टींमध्ये) आपला वेळ वाया घालवू नका. नाहीतर खूप
पश्चाताप करावा लागेल. माया खूप उलटे काम करायला लावते. कधी चोरी केली नसेल, ती
देखील करायला लावेल. मागाहून आठवेल की, आपल्याला तर मायेने दगा दिला. आधी मनामध्ये
विचार येतो, अमकी वस्तू उचलावी. बुद्धी तर मिळाली आहे, हे बरोबर आहे किंवा चुकीचे
आहे. ही वस्तू उचलली तर चुकीचे ठरेल, नाही उचलली तर योग्य आहे. आता मला काय करायचे
आहे? पवित्र राहणे तर चांगले आहे ना. संगतीमध्ये येऊन ढिले होता कामा नये. आपण
भाऊ-बहीण आहोत तर मग नावा-रूपामध्ये का फसायचे! देह-अभिमानामध्ये यायचे नाही. परंतु
माया खूप शक्तिशाली आहे. माया चुकीचे काम करण्यासाठीचे संकल्प उत्पन्न करते. बाबा
म्हणतात - तुम्हाला चुकीचे काम करायचे नाही आहे. युद्ध चालते आणि मग कोसळतात, तर मग
राईट-बुद्धी कामच करत नाही. आपल्याला राईट काम करायचे आहे. आंधळ्यांची काठी बनायचे
आहे. चांगल्यात चांगले काम हे आहे. शरीर निर्वाहासाठी वेळ तर आहे ना. रात्री झोप
देखील घ्यायची आहे. आत्मा थकते तर मग झोपून जाते. शरीर देखील झोपून जाते. तर शरीर
निर्वाहासाठी, आराम करण्यासाठी वेळ तर आहे. बाकी राहिलेल्या वेळेमध्ये माझ्या
सेवेमध्ये तत्पर व्हा. आठवणीचा चार्ट ठेवा. लिहितात देखील परंतु चालता-चालता फेल
होतात. बाबांची आठवण करत नाहीत, सेवा करत नाहीत त्यामुळे मग चुकीचे काम होत राहते.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
झरमुई-झगमुईमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. माया कोणतेही उलटे काम करून घेऊ नये,
यावर लक्ष ठेवायचे आहे. संगदोषामध्ये येऊन कधी ढिले व्हायचे नाही. देह-अभिमानामध्ये
येऊन कोणाच्या नावा-रूपामध्ये फसायचे नाही.
२) घराच्या आठवणी
सोबत बाबांचीही आठवण करायची आहे. आठवणीच्या चार्टची डायरी बनवायची आहे. नोट करायचे
आहे - आपण पूर्ण दिवसभरामध्ये काय-काय केले? किती वेळ बाबांच्या आठवणीमध्ये राहिलो?
वरदान:-
नम्रता रुपी
कवचा द्वारे व्यर्थच्या रावणाला जाळणारे सच्चे स्नेही, सहयोगी भव कोणी कितीही
तुमच्या संघटनमध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न करेल परंतु जरासुद्धा स्वभाव-संस्काराची
टक्कर दिसू नये. जर कोणी अपशब्द जरी काढला, अपमान देखील केला, तुम्ही सेंट (संत) बना.
जर कुणी चुकीचे केले तरीही तुम्ही राईट रहा. कोणी टक्कर दिली तरीही तुम्ही त्याला
स्नेहाचे पाणी द्या. ‘हे का, असे का’ - असे संकल्प करून आगीमध्ये तेल ओतू नका.
नम्रतेचे कवच घालून रहा. जिथे नम्रता असेल तिथे स्नेह आणि सहयोग देखील अवश्य असेल.
बोधवाक्य:-
‘माझे’पणाच्या
अनेक हदच्या भावना एका “माझे बाबा” मध्ये सामावून घ्या.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- रूहानी रॉयल्टीचे फाउंडेशन
संपूर्ण पवित्रता आहे. तर स्वतःला विचारा की रुहानी रॉयल्टीची झलक आणि फलक आपल्या
रूप अथवा चरित्रामधून प्रत्येकाला अनुभव होते? नॉलेजच्या आरशामध्ये स्वतःला बघा की
माझ्या चेहऱ्यावर, वर्तनामध्ये ती रूहानी रॉयल्टी दिसते का साधारण वर्तन आणि चेहरा
दिसून येतो.