14-06-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
24.10.2010 ओम शान्ति
मधुबन
काळाच्या गतीनुसार आता
विशेष स्वभाव-संस्कार परिवर्तन करण्यामध्ये तीव्रता आणा, मन्सा द्वारे आत्म्यांना
भिन्न-भिन्न किरणे द्या
आज चोहो बाजूंच्या
परमात्म तख्तनशीन, भृकुटी तख्तनशीन आणि विश्वाच्या तख्तनशीन मुलांना पाहून हर्षित
होत आहेत. हे परमात्म दिलतख्त (हृदय सिंहासन) केवळ तुम्हा ब्राह्मणांसाठीच आहे.
भृकुटीचे तख्त तर सर्वांकडे आहे परंतु परमात्म तख्त केवळ ब्राह्मण आत्म्यांच्याच
भाग्यामध्ये आहे. हे परमात्म तख्त विश्वाचे तख्त मिळवून देते. तर तिन्ही तख्तांचे
अधिकारी आत्मे तुम्ही ब्राह्मणच आहात. हे परमात्म तख्त किती श्रेष्ठ आहे इतर
कोणत्याही युगामध्ये परमात्म तख्त प्राप्त होत नाही. हेपरमात्म तख्त गायले देखील
जाते, परमात्म तख्ताचे अधिकारी भक्तिमार्गामध्ये देखील माळेच्या मण्यांच्या
रूपामध्ये गायले जातात आणि पुजले जातात.
कोटींमध्ये कोणीतरी
एक या रूपात गायले जातात. मोठ्या भावनेने प्रत्येक मण्याला किती उच्च दृष्टीने बघत
राहतात. तर तुम्हा सर्वांना फखुर (अभिमान) आहे ना! आहे ना अभिमान की, आमच्या शिवाय
इतर कोणीही या तख्ताचा अनुभव करू शकत नाही? परंतु तुम्हा सर्व ब्राह्मणांचा तर हा
जन्मसिद्ध अधिकार आहे. तुमच्यासाठी हे तख्त गळ्यातील हार आहे. तर एवढा नशा असतो का
की भगवंताच्या दिलतख्ताचे अधिकारी आहोत! हा नशा आणि आनंद सर्वांच्या सदैव
स्मृतीमध्ये राहतो का? आपण कोण आहोत! याचा निश्चय आणि नशा असतो का?
बापदादा तर अशा तीन
तख्तांच्या अधिकारी मुलांना पाहून खुश होतात - ‘वाह माझ्या श्रेष्ठ अधिकारी मुलांनो
वाह!’ मुले म्हणतात - ‘वाह बाबा वाह!’ आणि बाबा म्हणतात - ‘वाह मुलांनो वाह!’ स्वयं
बाबा सुद्धा अशा मुलांची महिमा गातात. तर नशा आहे आपण कोण आहोत? जेवढा निश्चय असेल
तेवढाच नशा असेल. आणि निश्चयाचा नशा तुमच्या चेहऱ्यावरून आणि चलन द्वारे (वर्तनामधून)
दिसून येईल. ज्याला निश्चय आहे त्याला नक्कीच नशा असतो. बापदादा देखील आता प्रत्येक
मुलाच्या चेहऱ्याद्वारे आणि चलन द्वारे आत्म्यांना अनुभव करवू इच्छित आहेत. वाणी
द्वारे तर अनुभव करू लागले आहेत, आता अनुभव करण्याचे कार्य सुरू झाले आहे. पूर्वी
ऐकत होते, विचार करत होते आता तुम्हा ब्राह्मण आत्म्यांच्या स्थितीचा प्रभाव, अनुभव
करू लागले आहेत. तर आपणच स्वतःला चेक करा की, मी पूर्ण दिवसभरामध्ये किती वेळ
परमात्म दिलतख्तावर राहतो? कारण हे दिलतख्त विश्वाचे राज्य प्राप्त करून देण्याचा
आधार आहे. तर या दिलतख्ताच्या आधाराने जेवढा वेळ तुम्ही दिलतख्ताचे अधिकारी होऊन
राहता तेवढा जास्त काळ भविष्यामध्ये राज्य-घराण्यामध्ये अधिकारी बनता. तर चेक करा
की जेव्हापासून मी ब्राह्मण बनलो आहे किती वेळ दिलतख्तनशीन बनलो? तख्तावर तर
नंबरवार बसतील परंतु याच्या आधारे सदैव राज्य फॅमिलीमध्ये, राजघराण्यामध्ये अधिकारी
बनाल. कधी चेक केले आहे का? दिलतख्तावरून उतरत तर नाही ना? आपला हिशोब काढा कारण
याच्या आधारावर तुम्ही सदैव राज्य घराण्यामध्ये याल. चेक करा की तख्त सोडून कधी
मातीत पाय तर ठेवत नाही! ६३ जन्मांच्या संस्कारांनुसार देहभानरूपी मातीत पाय ठेवला.
एक आहे - देहभान आणि दुसरा आहे - देह-अभिमान. देह-अभिमानाची माती फार खोलवर आहे,
परंतु देहभान ही सुद्धा मातीच आहे. लोक देखील म्हणतात - जेव्हा मनुष्याचा मृत्यू
होतो आणि त्याला जाळतात तेव्हा हेच म्हणतात - माती मातीत विलीन झाली. तर चेक करा
पाय मातीत तर जात नाही ना! देहभानामध्ये येणे अर्थात मातीत पाय ठेवणे.
बापदादांनी तुम्हा
श्रेष्ठ आत्म्यांसाठी तीन तख्त दिले आहेत कारण तुम्ही लाडके आहात ना. सिकीलधे (अतिशय
प्रिय) देखील आहात, लाडके देखील आहात. तर जे लाडके मूल असते त्याला झुल्यामध्ये
ठेवतात किंवा मांडीवर ठेवतात, मातीत पाय ठेवू देत नाहीत. तर जे तीन तख्तांचे अधिकारी
आहेत त्यांच्यासाठी बापदादांनी किती भिन्न-भिन्न झोपाळे दिले आहेत. कधी शांतीच्या
झोपाळ्यामध्ये झोका घ्या, कधी सुखाच्या झोपाळ्यामध्ये झोका घ्या, कधी प्रेमाच्या
झोपाळ्यामध्ये झोका घ्या. तख्त आणि झोपाळे यामध्येच पाय ठेवायचा आहे. बरीच मुले
विचारतात की, आम्ही भविष्यामध्ये कुठे येणार? आम्ही कोण बनणार? तर बाबा म्हणतात -
जेव्हा पासून तुम्ही इथे आला आहात तेव्हा पासून चेक करा की, जितका वेळ झाला आहे
तितकाच वेळ माझा पाय झोपाळ्यामध्ये अथवा तख्तावर राहिला आहे का? तर भविष्यामध्ये
तितकाच काळ रॉयल घराण्यामध्ये राहाल. रॉयल प्रजेमध्ये देखील येणार नाही, परंतु रॉयल
घराण्यामध्येच याल. तर हा हिशोब प्रत्येकाने आपला आपण स्वतःचा काढा. दुसऱ्याला
पाहायचे नाही, स्वतःचा हिशोब काढा. प्रत्येकाची इच्छा काय आहे? रॉयल घराण्यामध्ये,
राज्य घराण्यामध्येच राहावे. तर आता देखील जेवढा वेळ मिळतो आहे कारण समाप्ती तर
अचानक होणार आहे, तर जोपर्यंत समाप्ती होईल, तोपर्यंत आता देखील चेक करा; तर जितका
जास्त काळ बाबांच्या मांडीवर, तख्तावर, झोपाळ्यामध्ये राहाल तितका वेळ रॉयल
फॅमिलीमध्ये रॉयल घराण्यामध्ये भाग्य प्राप्त कराल.
बापदादा तर प्रत्येक
मुलाला पूर्ण वेळ २१ जन्मच रॉयल घराण्यामध्ये, भले सूर्यवंशी असो नाहीतर चंद्रवंशी
असो दोन्ही युगामध्ये रॉयल फॅमिलीमध्ये राहण्याचा अधिकार देत आहेत. परंतु अधिकार
घेणे हे प्रत्येक मुलावर अवलंबून आहे. ब्रह्माबाबांवर प्रेम आहे तर ब्रह्माबाबांचे
देखील तुम्हा मुलांवर प्रेम आहे. ब्रह्माबाबा तुम्हा मुलांना स्वतःसोबत रॉयल
घराण्यामध्ये पाहू इच्छित आहेत. तुम्हाला काय वाटते - ब्रह्मा बाबांच्या आसपास रॉयल
घराण्यामध्ये राहणारे आहात की थोड्या काळासाठी राहणार? म्हणजे दूर तर जाऊ इच्छित
नाही ना! सांगितले ना - आधार आहे संगमयुगाचा. बापदादांचे मुलांवर इतके प्रेम आहे की
तुम्ही सर्वजण म्हणता की, ‘सोबत राहणार, सोबत येणार…’ आता ब्रह्मा बाबा आणि
ब्राह्मण सोबत आहेत, भले अव्यक्त रूपामध्ये आहेत परंतु सोबत आहेत.
आता बापदादांनी पाहिले
की मुलांना माया देखील अजून पर्यंत सोडत नाहीये, तिचे देखील प्रेम आहे. आणि आजकाल
दोन रूपांमध्ये विशेषतः माया देखील चान्स घेते. दोन रूपांमध्ये येते, एक आहे -
व्यर्थ संकल्प आणि दुसरे आहे - कुठे-कुठे, कधी-कधी ही देखील लाट आहे की, ‘मी जे केले
अथवा विचार केला मीच बरोबर आहे, मी काही कमी नाहीये’. ही लाट सर्वत्र पसरलेली आहे -
मीच राईट आहे, परंतु जे कनेक्शनमध्ये (संपर्कात) येतात किंवा निमित्त बनलेले आहेत
ते देखील तुमच्या विचारांना साथ देतात का? इतरांचा देखील त्या विचाराला दुजोरा
मिळाला पाहिजे. हे व्यर्थ संकल्प टाइम वेस्ट करतात म्हणूनच बापदादा दररोज
होमवर्कमध्ये रोजची मुरली मनन करण्यासाठी, सेवा करण्यासाठी देतात. जर मनन कराल अथवा
मनन करता-करता मग्न व्हाल तर हा रोजचा होमवर्क मनाला बिझी ठेवण्याचे साधन आहे. ऐकणे
आणि मनन करणे अथवा मग्न होणे, बापदादा म्हणूनच हा रोजचा होमवर्क देतात. जसे मुलांना
होमवर्क इतका जास्त देतात की ज्यामुळे त्यांची बुद्धी तो करण्यामध्ये बिझी राहावी.
तसे रोजच्या मुरलीमध्ये चारही सब्जेक्टचा होमवर्क आहे. मनसाचा देखील आहे, वाणीचा
देखील आहे, कर्माकडे देखील अटेन्शन आणि दिव्यतेचा इशारा, हा होमवर्क आहे. तर
होमवर्कमध्ये बिझी राहाल तर व्यर्थ संकल्पांना येण्यासाठी जागाच राहणार नाही. या
विधीचा जर अवलंब करत राहाल तर व्यर्थ संकल्प स्वतःहूनच तुमचा निरोप घेतील; कारण
बापदादांनी पाहिले की, आठवणीच्या यात्रेवर सर्वांचे नंबरवार अटेन्शन आहे, वाचा
सेवेमध्ये देखील अटेन्शन आहे. परंतु आता स्वतःचे संस्कार किंवा इतरांचे संस्कार
परिवर्तन करणे, हा स्वभाव-संस्कार ज्याला रॉयल रूपामध्ये तुम्ही म्हणता नेचर (स्वभाव),
माझी नेचर आहे, भाव नाहीये नेचर आहे, हा धारणेचा सब्जेक्ट अजूनही रॉयल रूपामध्ये
येत असतो. तर बापदादा आजकाल हाच इशारा देत आहेत की, धारणेमध्ये जी काही कमतरता आहे
त्याकडे आता विशेष अटेन्शन द्या.
बापदादांनी यापूर्वी
देखील सांगितले आहे की आता धारणेमध्ये या मुख्य धारणेवर अटेन्शन द्या, कोणतीही
गोष्ट घडली तर चेक करा सेकंदामध्ये फुलस्टॉप देऊ शकता का? की हवा असतो फुलस्टॉप
परंतु बनतो क्वेश्चनमार्क? फुलस्टॉप नाही, अर्धा फुलस्टॉप लागतो आणि मात्रा बनते.
पुढे जाऊन असे सरकमस्टान्स (परिस्थिती) येतील ज्यामुळे तुम्हाला सेकंदामध्ये
फुलस्टॉप लावावा लागेल. त्या वेळी क्वेश्चनमार्क, आश्चर्याची मात्रा यांनाच जर ठीक
करू लागाल, तर इतका वेळ मिळणार नाही. सेकंदामध्ये फुलस्टॉपची आवश्यकता असेल, याचा
अभ्यास खूप आधीपासूनचा हवा तेव्हाच वेळेवर विजयी बनू शकाल. तर गडबड गोंधळाच्या
काळात जेव्हा संस्कार, स्वभावाचा पेपर असेल, त्यासाठी आतापासूनच अशा वेळी अभ्यास करा
म्हणजे मग हा खूप काळाचा अभ्यास पुढे जाऊन तुमचा खूप सहयोगी बनेल.
तर बापदादा अमृतवेलेला
फेरी मारतात तेव्हा प्रत्येकाचा पुरुषार्थ चेक करतात. चारही सब्जेक्टमध्ये
पुरुषार्थ तीव्र आहे की साधारण आहे? तर काय पाहिले? काळाच्या गतीनुसार आता
पुरुषार्थामध्ये सदैव तीव्र पुरुषार्थाची आवश्यकता आहे. तर बापदादा इशारा देत आहेत
की वेळ तीव्र गतीने समीपतेच्या जवळ येत आहे. त्या हिशोबाने आता विशेष स्वभाव आणि
संस्कारांच्या परिवर्तनामध्ये तीव्रगती पाहिजे.
आता बापदादा सर्व
मुलांना समान बनवू इच्छित आहेत. तुमचे लक्ष्य देखील आहे - पित्या समान बनायचेच आहे.
यासाठी सर्वात सोपे साधन आहे ब्रह्मा बाबांना फॉलो करा. पडताळणी करा, जे पण कर्म
कराल आधी पडताळणी करा (तपासून पहा), तुलना करा. हे कर्म अथवा बोल किंवा संकल्प
ब्रह्मा बाबांचे आहेत का? म्हटले देखील जाते की, आधी विचार करा मग करा.
बोलण्यापूर्वी विचार करा आणि मग बोला. तर ऐकले बापदादांना आता काय हवे आहे ते? तुमची
देखील इच्छा तर आहेच, जेव्हा रूहरिहान करता ना तेव्हा बापदादा खूप गोड-गोड गोष्टी
ऐकतात. उमंगाच्या गोष्टी देखील खूप छान करता - ‘हे करून दाखवू, हे करायचेच आहे, हे
होणारच आहे!’ संकल्प खूप उमंगाचे असतात, परंतु कर्मामध्ये येईपर्यंत काही बदलतात,
काही पूर्ण होतात. बाकी बापदादा भिन्न-भिन्न प्रकारच्या सेवेचे तुम्ही जे प्लॅन
बनवता ते सर्व पसंत करतात. प्रोग्राम्स देखील जिथे-तिथे छान चालले आहेत परंतु आता
जितके वाचेद्वारे किंवा भिन्न-भिन्न विधींद्वारे करत आहात, सफलता देखील आहे, बापदादा
खुश देखील आहेत, फक्त आता मनसा द्वारे अनेक आत्म्यांना सुखाची किरणे, शांतीची किरणे,
आनंदाची किरणे, प्रेमाची किरणे पोहोचविणे, ही सेवा देखील सोबतच करा. आपल्याच
संस्कार परिवर्तनामध्ये अथवा दुसऱ्यांच्या संस्कारांना सहयोग देणे, यामध्ये बऱ्याच
जणांचा जास्त वेळ जातो. तर मन्सा सेवेद्वारे आत्म्यांना भिन्न-भिन्न किरणे द्या,
यावर अटेंशन हवे, पुढे जाऊन याची खूप आवश्यकता पडेल, त्यावरही लक्ष देत राहा. जी
मुले समजतात की, ही सेवा मी करत असतो, त्यांनी हात वर करा. अच्छा, करत आहेत, त्यांना
मुबारक आहे आणि जे करत नाहीत, त्यांनी करायला हवे कारण पुढे जाऊन सरकमस्टान्स असे
बनतील जे ऐकणारे आणि ऐकविणारे, दोघांची भेट होणे देखील कठीण होईल; त्यामुळे दोन्ही
सेवा, आत्तापासूनच जितकी होईल तितकी सवय लावा. मन बिझी देखील राहील तर मनमनाभव होणे
सोपे होईल. मन बिझी राहिल्याने संस्कार आणि स्वभावाला सहज परिवर्तन करण्यामध्ये मदत
मिळेल.
आज खास डबल
फॉरेनर्सच्या मिलनाचा दिवस आहे, बापदादा खुश आहेत, वाह डबल फॉरेनर्स वाह! बापदादांना
आनंद आहे की विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये जी बाबांची कल्पा पूर्वीची मुले लपलेली
आहेत तर विश्वाच्या सेवेमध्ये डबल फॉरेनर्स निमित्त बनले आहेत. आणि बापदादांनी ऐकले
आहे की प्रत्येक जण आपापल्या एरियामध्ये, गावागावामध्ये किंवा शहरांमध्ये जे राहून
गेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्लॅन बनवत राहतात, यासाठी मुबारक असो,
मुबारक असो! नाहीतर जेव्हा समाप्ती होणार असेल, परिस्थिती बदलेल तेव्हा तुम्हा
सर्वांना, भले भारत असो नाहीतर विदेश असो अशा पुष्कळ तक्रारी येतील की, ‘आमचे बाबा
आले आणि तुम्ही आम्हाला सांगितले सुद्धा नाही. संदेश तरी द्यायचा होता’, खूप तक्रारी
येतील; त्यामुळे आता करत आहात, अजून कुठे कोणता कोपरा राहून जाऊ नये यासाठी प्रयत्न
करा. बाकी बापदादा डबल फॉरेनर्स अथवा देशातील दोन्ही कडील मुले जी चोहो बाजूंनी आपला
पुरुषार्थ करत आहेत त्यांना पाहून खुश आहेत, खूप-खूप खुश आहेत. कशासाठी? का खुश
आहेत? आता देशामध्ये, विदेशामध्ये हे प्लॅन बनवत आहेत, बापदादांना पसंत आहे,
कोणत्याही साधनाद्वारे संदेश पोहोचला पाहिजे. हे विज्ञान खरेतर तुम्हा लोकांसाठी
समयानुसार खूप मदत करणारे आहे. दिवसेंदिवस नवीन-नवीन साधने निघत असतात, त्यांना
निर्विघ्न बनून कार्यामध्ये वापरत जा. सेवा वाढविण्यासाठी तुम्ही जिथे कुठे मिटिंग
करता, बापदादा ती ऐकतात आणि खुश होतात की मुलांची बुद्धी आता साधनांना सेवेमध्ये
लावण्यासाठी सर्वत्र जात आहे. म्हणूनच जे देखील तुम्ही प्लॅन बनवता ते बापदादा
ऐकतात, फेरी मारतात ना! तुम्ही कुठेही मीटिंग करा, मग ती दिल्लीमध्ये करा, देशामध्ये,
कोणत्याही शहरामध्ये करा, भले विदेशामध्ये कुठेही करा, बापदादा सर्व काही ऐकत असतात.
बापदादांकडे सुद्धा साधन आहे. यासाठी बापदादा फॉरेनच्या प्रत्येक देशामधून जे पण
कोणी आले आहेत, त्या प्रत्येकाला काय देतात? खूप-खूप प्रेम देत आहेत. फक्त आता थोडी
तीव्रता आणा (वेग वाढावा). प्लॅन करून प्रॅक्टिकलमध्ये नवीन-नवीन गोष्टी अंमलात आणत
राहा. बघा, तुमचा हा यज्ञ सुरू होण्याच्या काही वर्षांपूर्वीच हे सर्व शोध सुरू झाले
आहेत. सायन्स देखील तुमच्या सेवेमध्ये मदत करत आहे. खूप लाभ घ्या, तुमच्यासाठीच तर
हे शोध उदयास आले आहेत. दिवसेंदिवस बघा, किती नवीन-नवीन गोष्टी आत्ता-आत्ता उदयास
येत आहेत. हा ड्रामा तुम्हाला सहयोग देत आहे. साधने तुम्हाला सहयोग देत आहेत. अच्छा.
सर्वजण नेहमी आनंदी
तर राहता ना! नेहमी आनंदीत असता? जे नेहमी आनंदीत असतात त्यांनी हात वर करा, नेहमी
आनंदी. एखादी गोष्ट घडली तरी देखील आनंदी? गोष्टी येतात ना, तरी देखील आनंदी राहता
का? राहता का? हात उंच करा. वेलकम करता ना! घाबरत नाही, वेलकम करता. ही अनुभवी
बनवतात. ही विघ्ने अनुभवाच्या ऑथॉरिटीला वाढवतात. ‘माया आली, माया आली’, असे म्हणू
नका, हा पेपर आहे; माया-माया म्हणत मायेला पुढे करता. हा पेपर आहे. मायेला तर तुम्ही
ओळखले आहे, माया काय आहे, हे तर तुम्ही कितीतरी वर्षांपासून ओळखत आहात. म्हणूनच
मायेला घाबरू नका, पेपर समजून आनंदाने पेपर द्या आणि अनुभवाच्या वर्गामध्ये पुढे
जा. पुढच्या वर्गात जायचे आहे, गोंधळून जायचे नाही - ‘काय करू, कसे करू, काय, का’,
हा विचार करण्याचे काम ब्राह्मणांचे नाही. त्रिकालदर्शी आहात; ‘काय, का, कसे’, हे
प्रश्नच उठू शकत नाहीत. पेपर आला आणि अनुभवाच्या वर्गामध्ये पुढच्या वर्गात गेला.
आनंदी रहा. आता तर अनुभवी बनला आहात आणि बनत राहाल. अच्छा.
जे देखील पत्र, फोन,
ज्यांची पण प्रेमपूर्वक आठवण किंवा संदेश बापदादांच्या प्रति आले आहेत, त्या सर्व
मुलांना बापदादा आपल्या नयनांमध्ये सामावून घेत याद-प्यार देत आहेत; किंवा सेवेचा
समाचार दिला आहे किंवा मनाच्या पुरुषार्थाचा समाचार दिला आहे, त्या सर्वांना बापदादा
मनसाद्वारे इमर्ज करून सुखाची, शांतीची, आनंदाची किरणे देत आहेत. भले कोणी इथे
पाठवले नसेल परंतु मनामध्ये संकल्प जरी केला तरी तो संकल्प देखील बाबांपर्यंत
पोहोचला आहे.
चोहो बाजूंच्या
मुलांची हिंमत आणि बाबांची मदत, गोड-गोड मुलांना बापदादा प्रेमपूर्वक आठवण देत आहेत.
आणि या वर्षी कोणी ना कोणी स्वयंप्रति अथवा सेवाकेंद्राप्रति किंवा विश्वातील
आत्म्यांप्रति कोणता ना कोणता असा प्लॅन बनवा ज्यामुळे सेवेचे बळ आणि फळ सर्व
आत्म्यांना प्राप्त होईल. चोहो बाजूंच्या मुलांना बापदादांची विशेष मनापासूनची आठवण
आणि प्रेम स्वीकार असो. ओम् शांती.
वरदान:-
साधेपणातून
महानतेला प्रसिद्ध करणारे सिंपल आणि सॅंपल भव
जसे एखादी सिंपल (साधी)
गोष्ट जर स्वच्छ असेल तर ती आपल्याकडे नक्कीच आकर्षित करते. तसेच मनसा संकल्पांमध्ये,
संबंधामध्ये, व्यवहारामध्ये आणि राहणीमानामध्ये जे साधे आणि स्वच्छ राहतात ते
सॅम्पल (आदर्श) बनून सर्वांना आपल्याकडे स्वतः आकर्षित करतात. सिंपल अर्थात साधारण.
साधारणतेमधूनच महानता प्रसिद्ध होते. जे साधारण अर्थात सिंपल नाहीत ते समस्या रूप
बनतात.
सुविचार:-
मनापासून म्हणा -
‘माझे बाबा’, तर मायेच्या बेशुद्धीमुळे बंद झालेले डोळे उघडतील.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
आता-आता आवाजामध्ये,
आता-आता आवाजापासून परे (दूर), हा अभ्यास जितका सरळ आणि सहज होईल तितकी संपूर्णता
समीप दिसून येईल. संपूर्ण स्टेजची निशाणी आहे - त्यांचा पुरुषार्थ सहज असेल. आठवणीची
यात्रा आणि सेवा दोन्ही गोष्टी, सहज पुरुषार्थामध्ये येतात. जेव्हा या दोन्ही गोष्टी
सोप्या आणि सहज वाटू लागतील तेव्हा समजा संपूर्णतेची अवस्था प्राप्त होणार आहे.