14-07-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - मोठ-मोठ्या ठिकाणी मोठ-मोठी दुकाने (सेवास्थाने) सुरू करा, सेवा
वाढविण्यासाठी प्लॅन बनवा, मीटिंग करा, विचार करा”
प्रश्न:-
भौतिक आश्चर्ये
तर सर्व जाणतात परंतु सर्वात मोठे आश्चर्य कोणते आहे, जे तुम्ही मुले जाणता?
उत्तर:-
सर्वात मोठे आश्चर्य तर हे आहे की सर्वांचे सद्गती दाता बाबा स्वतः येऊन शिकवतात.
ही आश्चर्यकारक गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला आपापल्या दुकानांचा भपका (सेवाकेंद्राचा
शो) करावा लागतो कारण लोक भपका बघूनच येतात. तर सर्वात चांगले आणि मोठे दुकान
राजधानीमध्ये असले पाहिजे, जेणेकरून सर्वजण येऊन समजून घेतील.
गीत:-
मरना तेरी गली
में...
ओम शांती।
शिव भगवानुवाच. रूद्र भगवानुवाच देखील म्हटले जाते कारण ‘शिव माळा’ असे गायले जात
नाही. भक्तीमार्गामध्ये मनुष्य ज्या माळेचा खूप जप करतात त्याचे नाव ठेवले आहे -
‘रुद्र माळा’. गोष्ट तीच आहे, परंतु शिवबाबा योग्य प्रकारे शिकवतात. तेच नाव असले
पाहिजे, परंतु ‘रुद्र माळा’ नाव चालत येते. तर ते देखील स्पष्ट करावे लागेल. शिव आणि
रुद्र मध्ये काहीच फरक नाहीये. मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आपण चांगल्या प्रकारे
पुरुषार्थ करून बाबांच्या माळेमध्ये जवळ यावे. हा दृष्टांत देखील सांगितला जातो. जशी
मुले पळत जातात, निशाण्या पर्यंत जाऊन पुन्हा परतून शिक्षकापाशी येऊन उभे रहातात.
तुम्ही मुले जाणता आपण ८४ चे चक्र पूर्ण केले आहे. आता सर्वात अगोदर जाऊन माळेमध्ये
ओवले जायचे आहे. ती आहे मानवी स्टुडंट्स ची शर्यत. ही रुहानी (आत्मिक) शर्यत आहे.
ती शर्यत तुम्ही करू शकत नाही. ही तर आहेच आत्म्यांची गोष्ट. आत्मा तर वृद्ध, तरुण
किंवा लहान-मोठी असत नाही. आत्मा तर एकच आहे. आत्म्यालाच बाबांची आठवण करायची आहे,
यामध्ये त्रासाची काही गोष्टच नाही. भले अभ्यासामध्ये थोडे कमी देखील पडत असाल,
परंतु यामध्ये काही त्रास आहे, काहीच नाही. सर्व आत्मे भाऊ-भाऊ आहेत. त्या (दुनियेतील)
शर्यतीमध्ये तरुण वेगाने पळतील. इथे काही अशी गोष्ट नाहीये. तुम्हा मुलांची शर्यत
आहे रुद्रमाळेमध्ये ओवले जाण्याची. बुद्धीमध्ये आहे आम्हा आत्म्यांचे देखील झाड आहे.
ती आहे शिवबाबांची सर्व मनुष्यमात्राची माळा. असे नाही की फक्त १०८ किंवा १६१०८ ची
माळा आहे. नाही. जे काही मनुष्यमात्र आहेत, त्या सर्वांची माळा आहे. मुले समजतात
नंबरवार प्रत्येकजण आपापल्या धर्मामध्ये जाऊन विराजमान होतील, जे मग कल्प-कल्प
त्याच जागेवर येत राहतील. हे देखील आश्चर्य आहे ना. दुनिया या गोष्टींना जाणत नाही.
तुमच्यामध्ये देखील जे विशाल-बुद्धी आहेत ते या गोष्टींना समजू शकतात. मुलांच्या
बुद्धीमध्ये हाच विचार असला पाहिजे की, आपण सर्वांना रस्ता कसा सांगावा. ही आहे
विष्णूची माळा. सुरुवातीपासून वंशावळ सुरू होते. शाखा-उपशाखा सर्व आहेत ना.
छोटे-छोटे आत्मे देखील तिथेच (परमधाममध्ये) राहतात. इथे (साकार वतनमध्ये) आहेत
मनुष्य. मग हुबेहूब पुन्हा सर्व आत्मे तिथे उभे रहातील. या अद्भुत गोष्टी आहेत.
मनुष्य ही भौतिक वंडर्स सर्व बघतात परंतु ती तर काहीच नाहीत. हे केवढे मोठे वंडर आहे
जे सर्वांचे सद्गती दाता परमपिता परमात्मा येऊन शिकवत आहेत. तुम्हाला हे सर्व मुद्दे
सुद्धा धारण करायचे आहेत. मूळ गोष्ट आहेच गीतेच्या भगवंताची. याच्यावर विजय प्राप्त
केला की बस्स! गीता आहेच - ‘सर्व शास्त्रमई शिरोमणी’, भगवंताद्वारे गायली गेली आहे.
सर्व प्रथम तर हा प्रयत्न करायचा आहे. आज काल तर खूप भपका पाहिजे, जे दुकान जास्त
आकर्षक असते जास्त करून माणसे तिथे जातात. समजतात की इथे चांगला माल असेल. मुले
घाबरतात, इतकी मोठी-मोठी सेंटर्स उघडली तर लाख-दोन लाख डिपॉझीट द्यावे लागेल, तेव्हा
कुठे मनासारखे घर मिळेल. एकच राजेशाही मोठे दुकान असावे, मोठी-मोठी दुकाने
मोठ्या-मोठ्या शहरामध्येच उघडतात. तुमचे सर्वात मोठे दुकान असले पाहिजे राजधानीमध्ये.
मुलांनी विचार सागर मंथन करायला हवे की कशी सेवा वाढेल. मोठे दुकान उघडाल तर
मोठ्या-मोठ्या व्यक्ती येतील. मोठ्या व्यक्तीचा आवाज वेगाने पसरतो. सर्वप्रथम तर हा
प्रयत्न केला पाहिजे. सेवेसाठी मोठ्यात मोठे स्थान अशा ठिकाणी बनवा जेणेकरून
मोठ्या-मोठ्या व्यक्ती ते पाहून चकित होतील आणि मग तिथे समजावून सांगणारे देखील
फर्स्टक्लास पाहिजेत. एखादी जरी कोणी कमजोर बी. के. हे ज्ञान समजावून सांगत असेल तर
समजतात की, कदाचित सगळे बी. के. असेच आहेत, म्हणून दुकानामध्ये सेल्समन (ब्राह्मणी)
देखील चांगली उत्तम दर्जाची पाहिजे. हा देखील व्यवसाय आहे ना. बाबा म्हणतात -
‘हिम्मते बच्चे मददे बापदादा’. ते विनाशी धन तर काही उपयोगी पडणार नाही. आपल्याला
तर स्वतःची अविनाशी कमाई करायची आहे, याने तर अनेकांचे कल्याण होईल. जसे या
ब्रह्माने देखील केले. मग कोणी उपाशी थोडेच मरतात? तुम्ही देखील खाता, हे सुध्दा
खातात. इथे जे खाणे-पिणे मिळते ते इतर कुठेही मिळत नाही. हे सर्वकाही मुलांचेच आहे
ना. मुलांना आपले राज्य स्थापन करायचे आहे, यामध्ये अतिशय विशाल-बुद्धी पाहिजे.
राजधानीमध्ये नाव प्रसिद्ध झाले तर सर्वजण समजतील. म्हणतील - खरोखर या सत्य सांगत
आहेत, विश्वाचा मालक तर भगवंतच बनवतील. मनुष्य, मनुष्याला विश्वाचा मालक थोडेच
बनवेल. बाबा सेवेच्या वृद्धीसाठी मत देत राहतात.
सेवेची वृद्धी
तेव्हाच होईल, जेव्हा मुले उदारचित्त बनतील. जे काही कार्य करता ते उदारचित्तपणे करा.
कोणतेही शुभ कार्य आपणहून करणे - हे खूप चांगले आहे. म्हटले देखील जाते - स्वतःहून
करेल तो देवता, सांगितल्यावर करेल तो मनुष्य. सांगूनही करत नसेल तर... बाबा तर दाता
आहेत, ते थोडेच कोणाला सांगतील की, हे करा, या कार्यामध्ये इतके लावा. नाही. बाबांनी
सांगितले आहे मोठ्या-मोठ्या राजांचे हात कधी आखडते नसतात. राजे कायम दाता असतात.
बाबा सल्ला देतात - जाऊन काय-काय केले पाहिजे. खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. मायेवर
विजय मिळवायचा आहे, खूप उच्च पद आहे. शेवटी निकाल लागल्यावर मग जे खूप चांगल्या
मार्कांनी पास होतात त्यांना आनंद देखील होतो. शेवटी साक्षात्कार तर सर्वांनाच
होतील ना, परंतु त्या वेळी काय करू शकाल? नशिबामध्ये जे आहे तेच मिळते. पुरुषार्थाची
गोष्ट वेगळी आहे. बाबा मुलांना समजावून सांगतात, विशाल-बुद्धी बना. आता तुम्ही
धर्म-आत्मे बनत आहात. दुनियेमध्ये धर्मात्मे तर खूप होऊन गेले आहेत ना. त्यांचे नाव
खूप प्रचलित होते. अमका खूप धर्मात्मा मनुष्य होता. कोणी-कोणी तर पैसे कमावता-कमावता
अचानक मरतात. मग ट्रस्टी नेमतात. एखाद्याचा मुलगा जर नालायक असेल तर मग ट्रस्ट
बनवतात. यावेळी तर ही आहेच पाप-आत्म्यांची दुनिया. मोठ-मोठ्या गुरु इत्यादींना दान
करतात. जसा काश्मीरचा महाराजा होता, मृत्युपत्र करून गेला की, सर्व संपत्ती आर्य
समाजींना मिळावी. त्यांच्या धर्माची वृद्धी व्हावी. आता तुम्हाला काय करायचे आहे,
कोणत्या धर्माची वृद्धी करायची आहे? आदि सनातन देवी-देवता धर्मच आहे. हे देखील
कोणाला माहित नाहीये. आता तुम्ही पुन्हा स्थापन करत आहात. ब्रह्मा द्वारे स्थापना!
आता मुलांनी एकाच्याच आठवणीमध्ये राहिले पाहिजे. तुम्ही आठवणीच्या बळानेच सर्व
सृष्टीला पवित्र बनवता कारण तुमच्यासाठी तर पवित्र सृष्टी पाहिजे. हिला आग
लागल्यामुळे पवित्र बनते. अशुध्द गोष्टीला अग्नीमध्ये टाकून पवित्र बनवतात. यामध्ये
सर्व अपवित्र वस्तू पडल्यावर मग चांगली (पवित्र) होऊन निघेल. तुम्ही जाणता ही खूप
छी-छी (विकारी) तमोप्रधान दुनिया आहे. आता पुन्हा सतोप्रधान होणार आहे. हा ज्ञान
यज्ञ आहे ना. तुम्ही आहात ब्राह्मण. हे देखील तुम्ही जाणता शास्त्रांमध्ये अनेक
गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, यज्ञाला मग दक्ष प्रजापित्याचे नाव दिले आहे. मग रुद्र
ज्ञान यज्ञ कुठे गेला? यासाठी देखील काय-काय कहाण्या लिहून ठेवल्या आहेत. यज्ञाचे
वर्णन कायद्यानुसार (यथार्थ) नाहीये. बाबाच येऊन सर्व काही समजावून सांगतात. आता
तुम्ही मुलांनी श्रीमतानुसार ज्ञान यज्ञ रचला आहे. हा आहे ज्ञान यज्ञ आणि विद्यालय
देखील आहे. ‘ज्ञान’ आणि ‘यज्ञ’ दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. यज्ञामध्ये आहुती टाकायची
आहे. ज्ञानसागर बाबाच येऊन यज्ञ रचतात. हा खूप मोठा (श्रेष्ठ) यज्ञ आहे, ज्यामध्ये
सारी जुनी दुनिया स्वाहा होणार आहे.
तर मुलांना सेवेचा
प्लॅन बनवायचा आहे. भले गावांमध्ये देखील सेवा करा. तुम्हाला अनेकजण म्हणतात - की
गरिबांना हे नॉलेज दिले पाहिजे. फक्त सल्ला देतात, स्वतः काहीच काम करत नाहीत. सेवा
करत नाहीत, फक्त सल्ला देतात की असे करा, खूप चांगले आहे, परंतु आम्हाला फुरसत नाही.
नॉलेज खूप छान आहे. सर्वांना हे नॉलेज मिळाले पाहिजे. स्वतः(हा)ला मोठी व्यक्ती
समजतात आणि तुम्हाला छोटे समजतात. तुम्हाला खूप सावध राहिले पाहिजे. त्या
शिक्षणाबरोबरच मग हे शिक्षण देखील मिळते. शिक्षणामुळे बोलण्याची अक्कल येते… मॅनर्स
(शिष्टाचार) चांगले बनतात. अशिक्षित तर जणूकाही बुद्धू असतात. कसे बोलायला पाहिजे
ही अक्कल नाही. मोठ्या व्यक्तींना नेहमी ‘तुम्ही’ म्हणून बोलायचे असते. इथे तर
काहीजण असे देखील आहेत जे पतीला सुद्धा ‘तू-तू’ म्हणतील. ‘तुम्ही’ हा शब्द रॉयल आहे.
मोठ्या व्यक्तीला ‘तुम्ही’ म्हणून बोलाल. तर बाबा सर्वप्रथम हा सल्ला देतात की
दिल्ली जी परिस्तान होती, तिला पुन्हा परिस्तान बनवायचे आहे. तर दिल्लीमध्ये
सर्वांना संदेश दिला पाहिजे. खूप चांगली जाहिरात करायची आहे. टॉपिक्स सुद्धा (विषय
देखील) सांगत राहतात, विषयांची यादी बनवा आणि मग लिहीत रहा. विश्वामध्ये शांती कशी
होऊ शकेल हे येऊन समजून घ्या, २१ जन्मांसाठी निरोगी कसे बनू शकतो, येऊन समजून घ्या.
अशा आनंददायक गोष्टी लिहिलेल्या असाव्यात. येऊन २१ जन्मांसाठी निरोगी, सतयुगी डबल
सिरताज (डबल मुकुटधारी) बना. ‘सतयुगी’ हा शब्द तर सगळ्यामध्ये घाला. सुंदर अक्षर
असेल तर लोक पाहून खुश होतील. घरामध्ये देखील अशी चित्रे, फलक इत्यादी लावलेले
असावेत. आपला धंदा इत्यादी भले करा. त्याच्यासोबत सेवा देखील करत रहा. पूर्ण दिवस
धंद्यामध्ये थोडेच रहायचे असते? वरून फक्त थोडी देखभाल करायची असते. बाकी काम
असिस्टंट मॅनेजर बघतात. कोणी शेठ उदारचित्त असतात तर ते असिस्टंटला चांगला पगार
देऊनही गादीवर बसवतात. ही तर बेहदची सेवा आहे. बाकी सर्व आहेत हदच्या सेवा. या
बेहदच्या सेवेमध्ये किती विशाल-बुद्धी असली पाहिजे. ‘आपण विश्वावर विजय प्राप्त करतो;
काळावर देखील आपण विजय मिळवून अमर बनतो’ - अशा प्रकारचा मजकूर पाहून येतील आणि
जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. अमरलोकचा मालक तुम्ही कसे बनू शकता ते येऊन समजून
घ्या, खूप विषय निघू शकतात. तुम्ही कोणालाही विश्वाचा मालक बनवू शकता. तिथे दुःखाचे
नामोनिशाणही नसते. मुलांना किती आनंद झाला पाहिजे. बाबा आम्हाला पुन्हा काय
बनविण्यासाठी आले आहेत! मुले जाणतात जुन्या सृष्टीपासून नवीन बनणार आहे, मृत्यू
समोर उभा आहे. बघत आहात युद्ध चालू असतात. मोठे युद्ध झाले तर खेळच संपून जाईल.
तुम्ही तर चांगल्या प्रकारे जाणता. बाबा खूप प्रेमाने सांगतात - ‘गोड मुलांनो,
विश्वाची बादशाही तुमच्याकरिता आहे. तुम्ही विश्वाचे मालक होता, भारतामध्ये तुम्ही
अथाह सुख बघितले आहे. तिथे रावण राज्यच नाही. तर इतका आनंद पाहिजे. मुलांनी
आपसामध्ये सल्लामसलत करून काही निर्णय घेतला पाहिजे. वर्तमानपत्रांमध्ये छापून आले
पाहिजे. दिल्लीमध्ये देखील विमानातून पत्रके टाका. निमंत्रण देतो, जास्त खर्च काही
थोडाच होणार, मोठ्या ऑफिसरला जर समजले तर मोफत देखील करू शकतील. बाबा सल्ला देत
आहेत, जसे कलकत्ता आहे तिथे चौरंगीमध्ये फर्स्टक्लास रॉयल असे एकदम एकच मोठे दुकान
असावे, तर भरपूर ग्राहक येतील. मद्रास, मुंबई मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये मोठे दुकान
असावे. बाबा बिझनेसमन देखील आहेत ना. तुमच्याकडून कखपण (अवगुण) घेऊन त्याच्या
बदल्यात काय देतो! म्हणून गायन आहे - दयाळू. कौडी पासून हिऱ्या समान बनविणारा,
मनुष्याला देवता बनविणारा. बलिहारी एका बाबांची आहे. बाबा नसते तर तुमची कसली महिमा
झाली असती?
तुम्हा मुलांना
अभिमान वाटला पाहिजे की भगवान आम्हाला शिकवत आहेत. नरापासून नारायण बनण्याचे एम
ऑब्जेक्ट समोर उभे आहे. सर्वप्रथम ज्यांनी अव्यभिचारी भक्ती सुरू केली आहे, ते येऊन
उच्च पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतील. बाबा किती चांगले-चांगले पॉईंट्स
समजावून सांगतात. मुले विसरून जातात, म्हणून तर बाबा म्हणतात - मुद्दे लिहा!
टॉपिक्स लिहीत रहा. डॉक्टर लोक देखील पुस्तक वाचतात. तुम्ही आहात - ‘मास्टर रुहानी
सर्जन’, आत्म्याला इंजेक्शन कसे लावायचे ते तुम्हाला शिकवतात. हे आहे ज्ञानाचे
इंजेक्शन. यामध्ये सुई इत्यादी तर काहीच नाहीये. बाबा आहेत अविनाशी सर्जन, येऊन
आत्म्यांना शिकवतात. तिच अपवित्र बनली आहे. हे तर खूप सोपे आहे. जे बाबा आम्हाला
विश्वाचा मालक बनवतात त्यांची आपण आठवण करू शकत नाही! मायेचा खूप विरोध आहे; म्हणून
बाबा म्हणतात - चार्ट ठेवा आणि सेवेचा विचार करा म्हणजे खूप आनंद होईल. कितीही छान
मुरली चालवतात, परंतु योग नाहीये. बाबांसोबत खरे होऊन रहाणे देखील खूप अवघड आहे. जर
समजत असतील की, आपण खूप हुशार आहोत तर बाबांची आठवण करून तो चार्ट पाठवावा तेव्हा
बाबा समजतील हे कितपत खरे आहेत की खोटे? अच्छा, मुलांना समजावून सांगितले आहे -
अविनाशी ज्ञान रत्नांचा सेल्समन बनायचे आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) एम
ऑब्जेक्टला समोर ठेवून शुद्ध नशेमध्ये रहायचे आहे, मास्टर रुहानी सर्जन बनून
सर्वांना ज्ञान इंजेक्शन लावायचे आहे. सेवे सोबतच आठवणीचा देखील चार्ट ठेवायचा आहे
तर आनंद होईल.
२) संभाषण करण्याचे
चांगले मॅनर्स (शिष्टाचार) असले पाहिजेत. ‘तुम्ही’ असे म्हणून बोलायचे आहे.
प्रत्येक काम उदारचित्त बनून करायचे आहे.
वरदान:-
सर्व
कर्मेंद्रियांच्या आकर्षणापासून मुक्त कमळासारखे राहणारे दिव्य-बुद्धी आणि
दिव्य-दृष्टीचे वरदानी भव
बापदादांद्वारे
प्रत्येक ब्राह्मण मुलाचा जन्म होताच दिव्य समर्थ बुद्धी आणि दिव्य दृष्टीचे वरदान
मिळाले आहे. जी मुले आपल्या वाढदिवसाची ही भेट सदैव यथार्थ रित्या वापरतात ते
कमलपुष्प समान श्रेष्ठ स्थितीच्या आसनावर स्थित राहतात. कोणत्याही प्रकारचे आकर्षण
- देहाची नाती, देहाचे पदार्थ आणि कोणतीही कर्मेंद्रिये त्यांना आकर्षित करू शकत
नाहीत. ते सर्व आकर्षणांपासून दूर, सदैव हर्षित राहतात. ते स्वतःला कलियुगी पतित
विकारी आकर्षणांपासून दूर गेल्याचा अनुभव करतात.
बोधवाक्य:-
जेव्हा कुठेही
आसक्ती नसते तेव्हा शक्तीस्वरूप प्रत्यक्ष होते.
अव्यक्त इशारे -
संकल्पांची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेच्या निमित्त बना:-
आपल्या श्रेष्ठ
संकल्पांद्वारे इतर आत्म्यांच्या व्यर्थ संकल्पांच्या आणि विकल्पांच्या वहाणाऱ्या
पुरापासून आणि आपल्या शक्तीने अल्प काळामध्ये अलिप्त होऊन दाखवा. व्यर्थ संकल्पांना
शुद्ध संकल्पांमध्ये परिवर्तित करा. एका स्थानावर असताना देखील अनेक आत्म्यांवर
तुमच्या श्रेष्ठ संकल्पाचा आणि दिव्य दृष्टीचा प्रभाव पडावा.