14-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


प्रश्न:-
हिऱ्या समान श्रेष्ठ बनण्याचा पुरुषार्थ कोणता आहे?

उत्तर:-
देही-अभिमानी बना. शरीरामध्ये जरासुद्धा मोह राहू नये. सर्व चिंतेपासून मुक्त होऊन एका बाबांच्या आठवणीमध्ये राहा - हाच श्रेष्ठ पुरुषार्थ तुम्हाला हिऱ्या समान बनवेल. जर देह-अभिमान असेल तर समजा, अवस्था कच्ची आहे, तुम्ही बाबांपासून दूर आहात. तुम्हाला या शरीराची काळजी देखील घ्यायची आहे, कारण या शरीरामध्ये राहूनच कर्मातीत अवस्था प्राप्त करायची आहे.

गीत:-
मुखड़ा देख ले प्राणी...

ओम शांती।
बाबा मुलांना समजावून सांगत आहेत की, ज्यांची योगबलाने पापे भस्म होतात, त्यांच्या आनंदाचा पारा चढलेला असतो. मुले आपल्या अवस्थेला स्वतःच जाणू शकतात. जेव्हा अवस्था चांगली असते, तेव्हा सेवेची आवड खूप चांगली असते. जितके-जितके शुद्ध बनत जाल, तितका इतरांना देखील शुद्ध अथवा योगी बनविण्याचा उत्साह येईल, कारण तुम्ही राजयोगी अथवा राजऋषी आहात. हठयोगी-ऋषी तर तत्वालाच भगवान मानतात. राजयोगी-ऋषी भगवंताला पिता मानतात. तत्वाची आठवण केल्याने त्यांची पापे काही भस्म होत नाहीत. तत्वाशी योग लावल्याने काही बळ मिळत नाही. कोणत्याही धर्मातील लोक ‘योग’ ला जाणतच नाहीत, म्हणून कोणीही सच्चा योगी बनून परत घरी जाऊ शकत नाही. आता तुम्ही मुले आपली अवस्था स्वतःच जाणू शकता. आत्मा जितकी बाबांची आठवण करेल, तितका आनंद होईल. स्वतःची तपासणी करत राहायची आहे. मुले देखील एकमेकांच्या अवस्थेला आणि स्वतः आपल्या अवस्थेला जाणू शकतात. पाहायचे आहे की, माझे काही शरीरामध्ये भान तर नाहीये ना! देह-अभिमान असेल तर समजा की, आपण खूप कच्चे आहोत, बाबांपासून खूप दूर आहोत. बाबांचा आदेश आहे - ‘मुलांनो, तुम्हाला आता हिऱ्या समान बनायचे आहे’. बाबा देही-अभिमानी बनवतात. बाबांना देह-अभिमान नसतो. देह-अभिमान असतो मुलांना. बाबांच्या आठवणीने तुम्ही देही-अभिमानी बनाल. स्वतःची तपासणी करत राहा की, आपण किती वेळ आठवण करतो. जितकी आठवण कराल, तितका आनंदाचा पारा चढेल आणि स्वतःला लायक बनवाल. असे देखील समजू नका की, काही मुले कर्मातीत अवस्थेला पोहोचली आहेत. नाही, शर्यत चालू आहे. शर्यत जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा अंतिम निकाल लागेल. त्यानंतर विनाश देखील सुरू होईल. जोपर्यंत कर्मातीत अवस्था होत नाही तोपर्यंत ही रिहर्सल चालू राहील. आपण कोणाचीही निंदा करू शकत नाही. शेवटीच सर्वांविषयी माहित होईल. आता तर थोडा वेळ बाकी आहे. हे दादा देखील म्हणतात - ‘गोड मुलांनो, आता थोडा वेळ बाकी आहे’. यावेळी एकही कोणी कर्मातीत अवस्थेला प्राप्त करू शकत नाही. आजार इत्यादी होतात - याला कर्मभोग म्हटले जाते. भोग काय असतो, हे इतर कोणालाही समजत नाही. ती आंतरिक वेदना असते.

आता अजून कोणाचीही एकरस अवस्था बनलेली नाही. जितका प्रयत्न करतात, तितके विकल्प आणि अनेक वादळे येतात. तर मुलांना किती आनंद झाला पाहिजे. विश्वाचा मालक बनणे ही काही कमी गोष्ट आहे का? मनुष्य श्रीमंत आहेत, मोठ-मोठे बंगले आहेत, तर त्यांना आनंद होत असतो, कारण भरपूर सुख आहे. आता देखील तुम्ही बाबांकडून अथाह सुख घेत आहात. जाणता - बाबांकडून आम्ही राजाई घेणार. शांतीमध्ये इतका आनंद होत नाही, जितका संपत्तीमुळे आनंद होतो. संन्यासी घरदार सोडून जंगलामध्ये राहत होते. कधीही हातामध्ये पैसा ठेवत नसत, फक्त भाकरी घेत असत. आता तर किती धनवान बनले आहेत. सर्वांना पैशाची खूप चिंता आहे. वास्तविक राजाला प्रजेची चिंता असते, म्हणून युद्ध-सामग्री जवळ ठेवतात. सतयुगामध्ये तर युद्ध इत्यादीची गोष्टच नसते. आता तुम्हा मुलांना आनंद होतो की, आम्ही आमच्या राज्यामध्ये जात आहोत. तिथे भीतीची कोणतीही गोष्टच नसते. टॅक्स इत्यादीचा सुद्धा प्रश्न नसतो. ही शरीराविषयीची चिंता इथेच असते. गायले जाते - ‘फिकर से फारिग स्वामी...’ तुम्ही जाणता, चिंतेपासून मुक्त होण्यासाठी आपण आता इतका पुरुषार्थ करत आहोत. मग २१ जन्म कोणतीही चिंता राहणार नाही. बाबांची आठवण केल्याने तुम्ही खूप अडोल राहाल. रामायणाची कथा देखील तुमच्यावरच आहे. तुम्हीच महावीर बनता. आत्मा म्हणते - रावण मला डगमगवू शकत नाही. ती अवस्था शेवटी येईल. आता तर कोणीही डगमगेल, भय वाटेल. जेव्हा विश्वभरामध्ये युद्ध सुरू होईल, तेव्हा समजतील की आता वेळ आली आहे. जितकी बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ कराल, तितका फायदा होईल. पुरुषार्थ करण्याची वेळ आताच आहे. त्यानंतर तर विनाशाची धूमधाम सुरु होईल. आता तर शरीरामध्ये देखील मोह असतो ना. बाबा स्वतः म्हणतात की, आपल्या शरीराची काळजी घ्या. हे अंतिम शरीर आहे, याच शरीराच्या आधारे पुरुषार्थ करून कर्मातीत अवस्था प्राप्त करायची आहे. जिवंत राहाल, बाबांची आठवण करत राहाल. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, हयात राहा’. जितके हयात राहाल, तितकी बाबांची आठवण करून श्रेष्ठ वारसा घ्याल. आता तुमची कमाई होत राहते. शरीराला निरोगी तंदुरुस्त ठेवा, निष्काळजीपणा करायचा नाही. खाण्या-पिण्याची योग्य काळजी घेतली, तर काहीही होणार नाही. शिस्तबद्ध दिनचर्या असेल तर शरीर देखील तंदुरुस्त राहील. हे शरीर अमूल्य आहे. याच शरीरामध्ये राहून तुम्ही पुरुषार्थ करून देवी-देवता बनता, त्यामुळे बलिहारी या वेळेची आहे. आनंद झाला पाहिजे. जितकी बाबांची आणि वारशाची आठवण कराल, तितका नारायणी नशा चढलेला राहील. बाबांच्या आठवणीनेच तुम्ही उच्च ते उच्च पद प्राप्त कराल. पाहायचे आहे की, मी किती आनंदामध्ये, किती नशेमध्ये राहतो. गरिबांना तर आणखीच आनंद झाला पाहिजे. श्रीमंतांना तर धनाची चिंता असते. तुम्हा कुमारींना तर कोणतीही चिंता नाही. होय, कोणाचे आप्तजन जर गरीब असतील, तर त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यांना जागे देखील करत राहायचे आहे. जर ते जागे होत नसतील, तर तुम्ही तरी किती काळ मदत करत राहणार? बाबा सांगतात ना - तुम्ही स्वतः सेवाधारी बना अथवा पत्नीला रुहानी सेवेसाठी द्या.

तुम्ही बाबांचे मदतगार आहात. मदत तर सर्वांना पाहिजे ना. एकटे बाबा तरी काय करतील, किती जणांना मंत्र देतील! आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही मग इतरांना द्यायचा आहे, कलम लावायचे आहे. मुलांना सतत सांगत असतात - जितके शक्य होईल तितके मदतगार बना आणि इतरांना मंत्र देत जा. तुमच्या शास्त्रांमध्ये देखील आहे की, सर्वांना संदेश दिला होता की, ‘बाबा आलेले आहेत, वारसा घ्यायचा असेल तर बाबांची आठवण करा’. देहधारींची आठवण करू नका. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण कराल, तर तुमची विकर्म विनाश होतील आणि वारसा मिळेल. गीता तर खूप ऐकतात आणि ऐकवतात. त्यामध्ये प्रसिद्ध शब्द आहे ‘मनमनाभव’. बाबांची आठवण करा, तर मुक्ती प्राप्त कराल. संन्याशांना देखील हे आवडेल. मध्याजी भव अर्थात जीवनमुक्ती. मुले बाबांची बनतात, तेव्हा बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुमची आत्मा पतित बनली आहे, तर पतित आत्मा घरी येऊ शकणार नाही’. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही भारतवासी सतोप्रधान होता, नंतर तमोप्रधान बनलात. आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे, तर बाबा म्हणतात - पुरुषार्थ करा, तर उच्च पद मिळेल. भक्ती तर जन्म-जन्मांतर करत आला आहात. तुम्ही जाणता - सर्व प्रथम अव्यभिचारी भक्ती सुरू झाली. आता भक्ती किती व्यभिचारी झाली आहे. शरीरांची देखील पूजा होते, ती आहे भूत-पूजा. देवता तरी देखील पवित्र आहेत; परंतु या वेळी तर सर्व जण तमोप्रधान आहेत, त्यामुळे पूजा देखील तमोप्रधान होत जाते. आता बाबांची आठवण करायची आहे. भक्ती मधील कोणताही शब्द उच्चारायचा नाही. ‘हाय राम’, हा देखील भक्तीचा शब्द आहे, अशा पद्धतीने कोणाचीही आळवणी करायची नाही. या ज्ञानामध्ये काहीही उच्चारण करण्याचा प्रश्नच नाही. ‘ओम् शांती’ देखील वारंवार म्हणायचे नाही. शांती अर्थात मी आत्मा शांती स्वरूप आहे. ते तर आहोतच. यामध्ये बोलण्याची गरज नाही. इतर कोणत्या व्यक्तीला जर तुम्ही ओम् शांती म्हणालात, तर त्यांना जरासुद्धा त्याचा अर्थ समजणार नाही. ते लोक तर ‘ओम्’ची खूप भव्य शब्दांमध्ये महिमा करतात. तुम्ही तर अर्थ समजता, त्यामुळे ‘ओम् शांती’ म्हणणे देखील अनावश्यक गोष्ट आहे. होय, एकमेकांना असे विचारू शकता - ‘शिवबाबांच्या आठवणीमध्ये आहात ना?’ जसे मी देखील या मुलीला विचारतो - ‘तू कोणाचा शृंगार करत आहेस?’ तर ती म्हणते - ‘शिवबाबांच्या रथाचा’. हा शिवबाबांचा रथ आहे ना. जसा हुसेनचा रथ असतो ना. घोड्याचा शृंगार करतात, परंतु घोड्याचा अर्थ समजत नाहीत. धर्म स्थापन करणारे जे येतात, त्यांचे आत्मे पवित्र असतात. जुनी पतित आत्मा धर्माची स्थापना करू शकत नाही. तुम्ही धर्माची स्थापना करत नाही, शिवबाबा तुमच्या द्वारे करतात, तुम्हाला पवित्र बनवतात. ते लोक भक्तिमार्गामध्ये खूप शृंगार इत्यादी करतात. इथे आपण शृंगार पसंत करत नाही. बाबा किती निरहंकारी आहेत. स्वतः म्हणतात - मी अनेक जन्मांतील अंतिम जन्मामध्ये देखील अंताला येतो. सर्व प्रथम सतयुगामध्ये श्री नारायण असतील. श्री लक्ष्मी पेक्षाही अगोदर श्री नारायण येतील. ते तर मोठे असतील ना, म्हणून श्रीकृष्णाचे नाव गायले गेले आहे. श्री नारायणा पेक्षाही श्रीकृष्णाची महिमा जास्त प्रमाणात करतात. श्रीकृष्णाचीच जन्माष्टमी साजरी करतात. श्री नारायणाचा जन्म दिवस साजरा करत नाहीत. श्रीकृष्ण तेच श्री नारायण आहेत - हे कोणीही जाणत नाही. नाव तर बालपणीचेच चालते ना. अमक्याने जन्म घेतला, तर त्याचा जन्म दिवस साजरा करतात, म्हणून श्रीकृष्णाचाच जन्म दिवस साजरा करतात. श्री नारायणाच्या जन्माविषयी कोणालाच काही ठाऊक नाहीये. सर्व प्रथम शिवजयंती, त्यानंतर आहे श्रीकृष्ण जयंती आणि नंतर मग रामाची जयंती... ‘शिव’ यांच्या सोबत गीतेचा देखील जन्म होतो. शिवबाबा येतातच मुळी अनेक जन्मांतील अंतिम जन्मामध्ये. वृद्ध आणि अनुभवी रथामध्येच येतात. किती चांगल्या रीतीने समजावून सांगितले गेले आहे, तरी देखील कोणाच्या बुद्धीमध्येच येत नाही.

बाबा म्हणतात - हे ज्ञान प्रायः लोप होते. जेव्हा मी येऊन ऐकवेन, तेव्हाच तुम्ही देखील ऐकवू शकता. आता तुम्ही मुले जाणता की, भविष्यामध्ये आपण हुबेहूब असे देवी-देवता बनणार आहोत. बाबांना (ब्रह्मा बाबांना) २-३ प्रकारचे साक्षात्कार झाले होते की, मी हा बनेन, मुकुटधारी बनेन, पगडीवाला बनेन. २-४ राजाईच्या जन्मांचे साक्षात्कार झाले होते. आता तुम्ही समजू शकता - या गोष्टींना दुनियेमध्ये इतर कोणीही समजू शकणार नाही. होय, एवढे समजतात की, चांगले कर्म केले तर चांगला जन्म मिळेल. आता तुम्ही नरापासून नारायण बनण्याचा पुरुषार्थच मुळी भविष्याकरिता करत आहात. तुम्ही जाणता की, आपण हे पद प्राप्त करणार आहोत. याचा सर्वाधिक आनंद त्यांना होईल जे कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करत असतील. म्हणतात - बाबा, आम्ही तर मम्मा-बाबांना फॉलो करणार, तेव्हाच तर तख्तावर बसू शकू. याची देखील जाणीव पाहिजे की, आपण किती सेवा करतो आणि किती आनंदामध्ये राहतो. स्वतः आनंदी राहाल, तर इतरांना देखील आनंदी कराल. आतमध्ये जर एखादी वाईट सवय असेल, तर मन खात राहील. काहीजण येऊन बाबांना सांगतात - ‘बाबा, माझ्या मध्ये क्रोध आहे. हे भूत माझ्यामध्ये आहे’. ही तर चिंतेची गोष्ट झाली ना. भूताला राहू देता कामा नये. क्रोध कशाला करायचा! प्रेमाने समजावून सांगायचे असते. बाबा कोणावर क्रोध थोडेच करतील! शिवबाबांची महिमा आहे ना. खूप निरर्थक आणि खोटी महिमा देखील करतात. मी काय करतो! मला म्हणतात - ‘येऊन पतितापासून पावन बनवा’. जसे डॉक्टरला सांगतात - आमचा आजार दूर करा. ते औषध देऊन, इंजेक्शन देतात, ते तर त्याचे कामच आहे. ही काही मोठी गोष्ट थोडीच आहे. शिकतातच मुळी सर्व्हिस करण्यासाठी. जे जास्त शिकतात, ते मग जास्त कमाई करतात. बाबांना काही कोणती कमाई करायची नाहीये. त्यांना (दुनियेतील टिचर लोकांना) तर कमाई करवून द्यायची आहे. बाबा म्हणतात - तुम्ही मला अविनाशी सर्जन देखील म्हणता, ही तर जास्तच महिमा केली आहे. पतित-पावनला काही ‘सर्जन’ म्हटले जात नाही. ही फक्त महिमा केली आहे. बाबा तर फक्त एवढेच सांगतात - ‘माझी आठवण करा, तर तुमची विकर्म विनाश होतील’. बस्स. माझा पार्टच तुम्हाला हे समजावून सांगण्याचा आहे की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. जितकी आठवण कराल, तितके उच्च पद प्राप्त कराल. हे आहेच राजयोगाचे ज्ञान. ज्यांनी गीता वाचली आहे, त्यांना समजावून सांगणे सोपे होते. तुम्ही पूज्य राजांचेही राजे बनता, नंतर मग पुजारी बनाल. तुम्हाला मेहनत करायची आहे. तुम्ही विश्वाला पवित्र बनवता. किती जबरदस्त मर्तबा आहे. तुम्ही सर्व जण या कलियुगी पर्वताला उलटवून टाकण्यासाठी एक बोट देता. बाकी प्रत्यक्ष पर्वत इत्यादी काहीही नाहीये. आता तुम्ही जाणता की, नवीन दुनिया येणार आहे, म्हणून राजयोग जरूर शिकायचा आहे. बाबाच येऊन शिकवतात. सतोप्रधान बनायचे आहे. जे कल्पापूर्वी बनले असतील, त्यांना समजावून सांगितले तर त्यांना ते पटेल की, हे तर बरोबर सांगत आहेत. खरोखर बाबांनी सांगितले होते - ‘मनमनाभव’. हा संस्कृत शब्द आहे. बाबा तर हिंदीमध्ये सांगतात - ‘माझी आठवण करा’. आता तुम्ही समजता की, आपण किती श्रेष्ठ धर्माचे आणि श्रेष्ठ कर्म करणारे होतो. तेव्हाच तर गायन आहे - ‘१६ कला संपूर्ण…’ आता पुन्हा तसे बनायचे आहे. स्वतःला पाहायचे आहे की, आपण कितपत सतोप्रधान बनलो आहोत, पावन बनलो आहोत. कितपत नरकवासीयांना स्वर्गवासी बनविण्याची सेवा करतो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पित्या समान निरहंकारी बनायचे आहे. या शरीराची काळजी घेत असताना शिवबाबांची आठवण करायची आहे. रुहानी सेवेमध्ये बाबांचा मदतगार बनायचे आहे.

२) आपल्यामध्ये कोणतेही भूत राहू द्यायचे नाही. कधीही कोणावर क्रोध करायचा नाहीये. सर्वांशी अतिशय प्रेमाने मिळून मिसळून राहायचे आहे. माता-पित्याला फॉलो करून तख्तनशीन बनायचे आहे.

वरदान:-
‘स्वार्थ’ शब्दाच्या अर्थाला जाणून कायम एकरस स्थितीमध्ये स्थित होणारे सहज पुरुषार्थी भव

आज-काल एकमेकांबद्दल जे आकर्षण आहे ते स्नेहापोटी नसून स्वार्थापोटी आहे. स्वार्थामुळे आकर्षण आहे आणि या आकर्षणामुळे न्यारे (अलिप्त) बनू शकत नाही म्हणून ‘स्वार्थ’ शब्दाच्या अर्थामध्ये स्थित होऊन अर्थात सर्वप्रथम ‘स्व’ च्या रथाला स्वाहा करा. हा स्वार्थ जर संपला तर तुम्ही आपोआपच न्यारे (अलिप्त) व्हाल. या एका शब्दाच्या अर्थाला जाणल्याने सदैव एकाचे आणि एकरस बनाल, हाच सहज पुरुषार्थ आहे.

बोधवाक्य:-
फरिश्ता रूपामध्ये राहिल्याने कोणतेही विघ्न आपला प्रभाव टाकू शकत नाही.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

संपूर्ण पवित्रता तुम्हा ब्राह्मणांचा शृंगार आहे, सदैव शृंगारलेली मूर्ती अर्थात कायम पवित्र स्वरूपामध्ये स्थित राहून बेहदच्या स्टेजवर हिरो पार्ट बजावा. ‘सदा ब्रह्मचारी’ अर्थात संकल्पामध्ये देखील कोणत्याही प्रकारची अपवित्रता वृत्तीला चंचल बनवू नये. वृत्तीची चंचलता देखील तुमचे रजिस्टर डागाळलेले (खराब) बनवते, म्हणूनच वृत्तीने देखील ‘सदा ब्रह्मचारी’ बना.