14-10-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, बाबांची आठवण करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या रचा, पुरुषार्थ करून चार्ट ठेवा, थकू नका, संकटांमध्ये खंबीर राहा”

प्रश्न:-
मुलांनी आपला कोणता अनुभव आपसामध्ये एकमेकांना ऐकवला पाहिजे?

उत्तर:-
१) आपण बाबांची किती वेळ आणि कशी आठवण करतो. भोजनाच्या वेळी बाबांची आठवण राहते की अनेक प्रकारचे विचार मनामध्ये येतात. बाबा म्हणतात - मुलांनो, प्रयत्न करून पहा. भोजन करतेवेळी बाबांशिवाय दुसरे काही आठवत तर नाही ना! आणि मग आपसामध्ये एकमेकांना अनुभव ऐकवा. २) कोणताही दुःखद सीन पाहताना आपली स्थिती कशी होती! याचा देखील अनुभव ऐकवला पाहिजे.

गीत:-
लाख जमाने वाले...

ओम शांती।
गोड-गोड मुले आता बेहदच्या बाबांना कशी बरे विसरतील, ज्यांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो आहे. ज्यांची अर्ध्या कल्पापासून आठवण करत होता. हे तर समजावून सांगितले आहे की, मनुष्याला कधीही भगवान म्हटले जात नाही. तर आता बेहदचे बाबा मिळाले आहेत, त्यांच्या आठवणीमध्येच करामत आहे (जादू आहे). जेवढी तुम्ही पतित-पावन बाबांची आठवण कराल, तेवढे तुम्ही पावन बनत जाल. तुम्ही आता स्वतःला पावन म्हणू शकत नाही, जोपर्यंत या दुनियेचा अंत होत नाही. जेव्हा संपूर्ण पावन बनाल तेव्हा हे शरीर सोडून, मग जाऊन संपूर्ण पवित्र शरीर घ्याल. जेव्हा सतयुगामध्ये नवीन शरीर मिळेल तेव्हा संपूर्ण म्हणणार. आणि मग रावणाचा खात्मा होतो. सतयुगामध्ये रावणाचा पुतळा बनवला जात नाही. तर तुम्ही मुले जेव्हा बसता, चालता-फिरता तेव्हा बुद्धीमध्ये ही आठवण राहावी. आता आपण ८४ चे चक्र पूर्ण केले आहेत, पुन्हा नवीन चक्र सुरू होईल. ती आहेच नवीन पवित्र दुनिया, नवीन भारत, नवीन दिल्ली. मुले जाणतात प्रथम यमुनेचा काठ आहे, जिथे परिस्तान बनणार आहे. मुलांना खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले जाते, सर्वात आधी तर बाबांची आठवण करा. भगवान पिता शिकवत आहेत. तेच पिता टीचर आणि गुरू आहेत, हे चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. बाबांनी हे देखील समजावून सांगितले होते की, तुम्ही बाजोली खेळता (कोलांटी उड्यांचा खेळ खेळता). वर्णांचे चित्र देखील खूप आवश्यक आहे. सर्वांत वर आहेत - शिवबाबा, मग शिखा - ब्राह्मण. हे समजावून सांगण्यासाठी बाबा म्हणतात - ठीक आहे, हे बुद्धीमध्ये ठेवा की आपण ८४ जन्मांची बाजोली खेळतो. आता संगम आहे, बाबा जास्त काळ इथे राहत नाहीत. तरी देखील १०० वर्षे तर लागतात. उलथा-पालथ पूर्ण होऊन मग राज्य सुरू होते. महाभारत युद्ध तर तेच आहे, ज्यामध्ये अनेक धर्मांचा विनाश आणि एका आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. तुमची कलाबाजी (जादू) तर वंडरफुल आहे. तुम्हाला ठाऊक आहे की, फकीर लोक कलाबाजी खेळतात (जादूचे खेळ करतात), तीर्थक्षेत्रांवर जातात. लोकांची श्रद्धा असते ना. तर त्यांना काही ना काही देतात. त्यांची परवरिश (गुजराण) तर होत राहते; कारण असे मनुष्य (फकीर) आपल्या सोबत कितीसे म्हणून घेऊन जातील! बाबा तर या सर्व गोष्टींचे अनुभवी आहेत. बाबांनी अनुभवी रथ घेतला आहे. यांनी (ब्रह्मा बाबांनी) गुरू देखील केले, खूप काही पाहिले. तीर्थयात्रा देखील केल्या आहेत. आता बाबा म्हणतात - बाजोली तर आठवू शकता. आपण आता ब्राह्मण आहोत, नंतर देवता, मग क्षत्रिय बनणार. ही सर्व भारताची गोष्ट आहे. बाबांनी असे सांगितले आहे की, बाकीचे धर्म तर जणू बायप्लॉट आहेत (या नाटकातील उपकथानके आहेत). बाबांनी तुम्हालाच तुमच्या ८४ जन्मांची कहाणी सांगितली आहे. जे सेन्सिबल आहेत ते हिशोबाने समजू शकतात. इस्लामी येतील तर सरासरी किती जन्म घेतील. अगदी अचूक हिशोबाची तर गरजही नाही. या गोष्टींची काही चिंता करण्याची गरज नाही. सर्वांत जास्त चिंता याचीच असते की, आपण सतत बाबांची आठवण करत राहावी. बस्स, केवळ त्या एकाचीच आठवण करणे, हीच एकमेव चिंता आहे. माया तर वारंवार तुम्हाला इतर अनेक चिंतांमध्ये टाकते, आठवणीमध्ये तर माया खूपच चिंतेत टाकते. मुलांनी आठवण जरूर केली पाहिजे. आता आपल्याला घरी जायचे आहे. स्वीट होम कोणाला आठवणार नाही. बोलावतात देखील - ‘शांती देवा’. भगवंताला म्हणतात - आम्हाला शांती द्या.

आता तुम्ही मुले हे तर जाणता की ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. हे देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे, परंतु मनुष्य तर घोर अंधारामध्ये आहेत. शांती सतयुगामध्येच असते. एक धर्म, एक भाषा, रीति-रिवाज देखील एकच असतात. तिथे आहेच शांतीचे राज्य. अद्वैताची गोष्टच नाही. तिथे तर एकच राजाई असते आणि सर्व सतोप्रधान असतात. रावण राज्यच नसते ज्यामुळे लढाई होईल. तर तुम्हा मुलांचा आनंदाचा पारा चढला पाहिजे. शास्त्रांमध्ये जे गायन आहे - अतींद्रिय सुख गोप-गोपींना विचारा. गोप-गोपी तर तुम्ही आहात ना. तुम्ही सन्मुख बसला आहात. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत ज्यांना आठवण असते की, बाबा आपले पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत आणि गुरू देखील आहेत. हे तर वंडर आहे ना. जीवनभर साथ देतात. दत्तक घेतात आणि शिकवायला सुरुवात करतात. तर ही आठवण राहिल्याने देखील खूप आनंद होत राहील. परंतु माया मग हे देखील विसरायला लावते. मनुष्यांना हे देखील समजावून सांगायचे आहे की, मनुष्य जेव्हा विचारतात की, ‘तुम्ही म्हणता, वेळ थोडाच बाकी आहे, तर याला पुरावा काय आहे?’ तर तुम्ही सांगा - ‘हे बघा यामध्ये लिहिलेले आहे भगवानुवाच’. यज्ञ देखील रचलेला आहे. हा आहे ज्ञान-यज्ञ. आता श्रीकृष्ण काही यज्ञ रचू शकत नाही.

मुलांच्या बुद्धीमध्ये हे देखील राहिले पाहिजे की, आपण या बेहदच्या यज्ञाचे ब्राह्मण आहोत. बाबांनी आम्हाला निमित्त बनवले आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या रीतीने ज्ञान आणि योगाची धारणा करता, आत्मा संपूर्ण बनते तेव्हा या भंभोरला (जुन्या दुनियेला) आग लागेल. मनुष्यांनाच कळते ना की, हे बेहदचे कर्मक्षेत्र आहे, जिथे सर्व जण येऊन खेळ करतात. बनी बनाई बन रही... बाबा म्हणतात - मुलांनो, चिंता त्याची केली जाते जे अनहोनी असेल (असंभव असेल). जे घडून गेले ते ड्रामामध्ये होते, मग त्याचे चिंतन कशाला करायचे. आपण ड्रामाला पाहतो. ड्रामामध्ये जेव्हा एखादा असा दुःखद सीन असतो तेव्हा मनुष्य पाहून रडतात. आता तो तर आहे खोटा ड्रामा. हा तर खरा ड्रामा आहे. ‘खरे आहे, खरे आहे’, करत राहतात. परंतु तुम्हाला मात्र दुःखाश्रू येता कामा नयेत. तुम्हाला साक्षी होऊन पाहायचे आहे. तुम्ही जाणता की हा ड्रामा आहे, यामध्ये रडण्याची काय गरज आहे. पास्ट इज पास्ट. कधीही त्याचा विचार देखील करता कामा नये. तुम्ही पुढे जात बाबांची आठवण करत राहा आणि सर्वांना मार्ग सांगत राहा. बाबा तर सल्ला देत राहतात. तुमच्याकडे त्रिमूर्तीची चित्रे भरपूर आहेत. त्यामध्ये क्लिअर लिहिलेले आहे - ते शिवबाबा आणि हा वारसा. तुम्हा मुलांना हे चित्र पाहून खूप आनंद झाला पाहिजे. बाबांकडून आपल्याला विष्णुपुरीचा वारसा मिळतो. जुनी दुनिया तर नष्ट होणार आहे. बस्स, हे चित्र समोर ठेवून द्या, यामध्ये काहीच खर्च नाहीये. झाडाचे चित्र देखील खूप चांगले आहे. रोज पहाटे उठून विचार सागर मंथन करा. स्वतःच स्वतःचे टीचर बनून शिका. बुद्धी तर सर्वांनाच आहे. चित्रे आपल्या घरामध्ये ठेवा. प्रत्येक चित्रामध्ये फर्स्टक्लास ज्ञान आहे. म्हणतात - विनाश होईल, तरीही तुमची बाबांवर प्रीत आहे ना. म्हणतात देखील - ‘सद्गुरु दलालाच्या रूपामध्ये भेटला…’ तर तुम्हाला समजण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी किती चांगल्या-चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत. तरी देखील मायेचा भपका खूप आहे. १०० वर्षांपूर्वी ही वीज, गॅस इत्यादी थोडेच होते. पूर्वी व्हाइसरॉय इत्यादी ४ घोड्यांच्या, ८ घोड्यांच्या गाडीमधून येत होते. पूर्वी श्रीमंत लोक गाडीमध्ये बसत होते. आता तर विमान इत्यादी निघाली आहेत. पूर्वी हे काहीही नव्हते. १०० वर्षांच्या आत हे काय झाले आहे. मनुष्य समजतात की हाच स्वर्ग आहे. आता तुम्ही मुले जाणता की स्वर्ग तर स्वर्गच आहे. या सर्व कवडीमोलाच्या वस्तू आहेत, याला कृत्रिम भपका म्हटले जाते. आता तुम्हा मुलांना ही एकच चिंता असली पाहिजे की आपण बाबांची आठवण करावी, यामध्येच माया विघ्न आणते. बाबा (ब्रह्मा बाबा) आपले उदाहरण देखील सांगतात. मी भोजन करतो, खूप प्रयत्न करतो की - आठवणीमध्ये राहून भोजन करावे तरीही विसरून जातो. मग समजतो मुलांना तर खूप मेहनत करावी लागत असेल. अच्छा मुलांनो, तुम्ही प्रयत्न करून पहा. बाबांच्या आठवणीमध्ये राहून दाखवा. बघा संपूर्ण वेळ आठवण टिकू शकते का. अनुभव सांगितला पाहिजे - ‘बाबा, संपूर्ण वेळ आठवण टिकू शकत नाही. अनेक तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी आठवत राहतात’. बाबा (ब्रह्मा बाबा) स्वतः आपला अनुभव सांगतात. बाबांनी ज्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे हे (ब्रह्मा बाबा) देखील पुरुषार्थी आहेत, यांच्यावर तर खूप जबाबदाऱ्या आहेत. मोठे म्हणवून घेणे म्हणजे मोठे दुःख ओढवून घेणे आहे. कितीतरी समाचार येतात, विकारांसाठी किती मारहाण करतात. घरातून बाहेर काढतात. मुली म्हणतात - ‘मी ईश्वराच्या आश्रयाला आले आहे’. किती विघ्न येतात. कोणाकडेच शांती नाहीये. तुम्हा मुलांना खात्री आहे; आता पुरुषार्थ करून श्रीमतावर चालून तुम्ही शांतीमध्ये राहता. या बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) इथे देखील अशी कितीतरी घरे पाहिली आहेत जिथे आपसामध्ये खूप मिळून-मिसळून राहतात. सर्व जण मोठ्यांच्या आज्ञेमध्ये राहतात. म्हणतात - आमच्याकडे तर जणू स्वर्गच अवतरला आहे.

आता बाबा तुम्हाला अशा स्वर्गामध्ये घेऊन जात आहेत जिथे सर्व प्रकारची सुखे आहेत. देवतांचे ३६ प्रकारचे भोजन गायले गेले आहे. आता तुम्ही बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेत आहात. तिथे तर अनेक स्वादिष्ट पक्वान्ने खात राहाल आणि पवित्र असाल. आता तुम्ही त्या दुनियेचे मालक बनत आहात. राजा-राणी, प्रजा यांच्यामध्ये फरक तर असेलच ना. पूर्वी राजे लोक खूपच थाटामाटात राहत होते. हे तर आहेत पतित आणि रावणाच्या राज्यामध्ये आहेत, तर मग विचार करा की, सतयुगामध्ये काय असेल. समोर लक्ष्मी-नारायणाचे चित्र ठेवलेले आहे. श्रीकृष्णा विषयी खोट्या गोष्टी लिहून बदनामी केली आहे. खोटे अर्थात खोटे, त्यामध्ये सत्याचा लवलेश सुद्धा नाही. आता तुम्ही समजता आपण स्वर्गाचे मालक होतो, आणि मग ८४ जन्म घेऊन अगदी शूद्र-बुद्धी बनलो आहोत. काय अवस्था झाली आहे. आता पुन्हा पुरुषार्थ करून काय बनत आहात! बाबा विचारतात देखील ना की, ‘तुम्ही कोण बनणार आहात?’ तर सर्व जण हात वर करतात - ‘आम्ही सूर्यवंशी बनणार’. आम्ही तर मात-पित्याला पूर्णपणे फॉलो करणार. आम्ही थोडाच असा कमी पुरुषार्थ करू. सारी मेहनत आठवण आणि आप समान बनविण्यावर आहे; म्हणून बाबा म्हणतात - जितके शक्य असेल तितके सेवा करायला शिका. हे खूप सोपे आहे. हे शिवबाबा, ही विष्णुपुरी, लक्ष्मी-नारायणाचे राज्य असेल. हे तर खूप अनुभवी आहेत. शिडीच्या चित्रावरून तुम्ही समजावून सांगू शकता.

हे झाडाचे चित्र आणि सृष्टी चक्राचे चित्र बघताच क्षणी तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आले पाहिजे. हे जे लक्ष्मी-नारायण आहेत यांचे राज्य कुठे गेले? कोणी युद्ध केले? कोणी त्यांना हरवले? आता तर ते राज्यच राहिलेले नाहीये. या ईश्वरीय गोष्टींना कोणीही अजिबात जाणत नाहीत. तुम्हा मुलांना हा देखील साक्षात्कार झालेला आहे की, कसे जाऊन गुहांमधून, खाणींमधून सोने, हिरे इत्यादी घेऊन येतात. तिथे हे विज्ञान तुमच्या सुखासाठी असेल. इथे ते दुःखासाठी आहे, तिथे विमाने देखील फुलप्रूफ (पूर्ण सुरक्षित) असतील. मुलांना अगदी सुरुवातीला या सर्वांचे साक्षात्कार झालेले आहेत. शेवटी देखील तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. हा देखील तुम्ही साक्षात्कार केला आहे की, चोर लुटण्यासाठी येतात, आणि मग तुमचे शक्तीशाली रूप पाहून पळून जातात. या सर्व गोष्टी अखेरच्या काळातील आहेत. चोर लुटण्यासाठी तर येतील, परंतु तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये उभे राहाल तर ते लगेच पळून जातील.

आता बाबा म्हणतात - मुलांनो, भरपूर पुरुषार्थ करा. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. एक जन्म पवित्र बनायचे आहे.

मृत्यू तर समोर उभा आहे. अतिशय भयंकर नैसर्गिक आपत्ती येतील, ज्यामध्ये सर्व नष्ट होईल. शिवबाबा यांच्या द्वारे समजावून सांगत आहेत, तर यांची आत्मा देखील ऐकते. हे बाबा सर्व सांगतात. शिवबाबांना तर अनुभव नाहीये. मुलांना अनुभव होतो. मायेची वादळे कशी येतात. पहिल्या नंबरला हे (ब्रह्मा बाबा) आहेत, तर यांना सर्व अनुभव होईल. तर यामध्ये घाबरायचे नाही, अचल राहायचे आहे. बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्यानेच शक्ती मिळते. काही मुले चार्ट लिहितात मग चालता-चालता बंद करतात. बाबा समजतात थकले आहेत. पारलौकिक पिता ज्यांच्याकडून इतका मोठा वारसा मिळत आहे अशा बाबांना कधी पत्र सुद्धा लिहित नाहीत. आठवणच करत नाहीत! अशा बाबांची तर किती आठवण केली पाहिजे. ‘शिवबाबा, आम्ही तुमची खूप आठवण करतो. बाबा तुमच्या आठवणी शिवाय आम्ही कसे बरे राहू शकणार! ज्या बाबांकडून विश्वाची बादशाही मिळत आहे, अशा बाबांना आम्ही कसे विसरू शकतो’. एक कार्ड लिहून पाठवले तर ही देखील आठवण केली ना. लौकिक पिता देखील मुलांना पत्र लिहितात - नूरे रत्न… पत्नी, पतीला कसे पत्र लिहिते! इथे तर दोन्ही नाती आहेत. ही देखील आठवण करण्याची युक्ती आहे. बाबा किती गोड आहेत! आमच्याकडे काय मागतात? काहीही नाही. ते तर दाता आहेत, देणारे आहेत ना. ते घेणारे नाहीत. म्हणतात - ‘स्वीट चिल्ड्रेन, मी आलो आहे, भारताला सुगंधी बगिचा बनवून जातो. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सूर्यवंशी बनण्यासाठी मात-पित्याला पूर्णपणे फॉलो करायचे आहे. आठवणीमध्ये राहण्याची आणि आप समान बनविण्याची मेहनत करायची आहे.

२) पुरुषार्थ करून श्रीमतावर चालत शांत राहायचे आहे. मोठ्यांची आज्ञा पाळायची आहे.

वरदान:-
‘एक बल, एक भरोसा’ या आधारावर ध्येयाला समीप अनुभव करणारे हिंमतवान भव

उच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी चक्री वादळे येतातच, आगबोटीला पलीकडे जाण्यासाठी महासागराच्या भरमध्यातून क्रॉस करावेच लागते, त्यामुळे असे लवकर घाबरून जाऊ नका, थकू नका किंवा थांबू नका. साथीदाराला सोबत ठेवा म्हणजे मग प्रत्येक कठीण गोष्ट सोपी होईल, हिंमतवान बनून बाबांच्या मदतीच्या लायक बना. ‘एक बल एक भरोसा’ - हा पाठ सदैव पक्का ठेवा, म्हणजे मग महासागराच्या भोवऱ्यातून सहज बाहेर पडाल आणि ध्येय समीप आल्याचा अनुभव होईल.

बोधवाक्य:-
विश्वकल्याणकारी ते आहेत, जे प्रकृती सहित प्रत्येक आत्म्याप्रति शुभ भावना ठेवतात.

हे अव्यक्त इशारे - परोपकाराच्या भावनेने संपन्न बनून अपकारीवर देखील उपकार करा.

प्रत्येक आत्म्याप्रति दयेची भावना, सदैव सहयोगाची भावना, हिंमत वाढविण्याची भावना असावी. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, सहयोगाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये निःस्वार्थपणाची भावना असावी, तेव्हा म्हणणार - परोपकाराची भावना. जसे ब्रह्मा बाबांनी स्वतःसाठी काहीही स्वीकारले नाही. ना महिमा स्वीकारली, ना वस्तू स्वीकारली, ना राहण्याचे स्थान स्वीकारले. स्थूल आणि सूक्ष्म सदैव “अगोदर मुले”, यालाच म्हणतात - पर-उपकारी, यामध्ये फॉलो फादर करून समान बना.