14-12-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.02.2008 ओम शान्ति
मधुबन
विश्व परिवर्तनासाठी
शांतीच्या शक्तीचा प्रयोग करा
आज बापदादा आपल्या
चोहो बाजूंच्या विश्व परिवर्तक, बाबांच्या आशांचे दीपक असलेल्या मुलांना पाहून
हर्षित होत आहेत. बापदादा जाणतात की मुलांचे बाप-दादांवर अति अति अति प्रेम आहे आणि
बापदादांचे देखील प्रत्येक मुलावर पद्मपटीपेक्षाही जास्त प्रेम आहे आणि हे प्रेम तर
नेहमीच या संगमयुगामध्ये मिळणारच आहे. बापदादा जाणतात जशी-जशी वेळ जवळ येत आहे
तस-तसा प्रत्येक मुलाच्या मनामध्ये हा संकल्प, हा उमंग-उत्साह आहे की आता काहीतरी
करायचेच आहे. कारण बघत आहात की आजच्या तिन्ही सत्ता अतिशय भयग्रस्त स्थितीमध्ये
आहेत. भले मग धर्म सत्ता असेल, राज्य सत्ता असेल किंवा विज्ञानाची सत्ता असेल;
विज्ञान देखील आता प्रकृतीला योग्य रीतीने नियंत्रित करू शकत नाही आहे. हेच म्हणतात
- होणारच आहे कारण विज्ञानाची सत्ता प्रकृती द्वारेच कार्य करते. तर सायन्सची साधने
असतानाही, प्रयत्न करत असताना देखील आता प्रकृती कंट्रोलमध्ये राहिलेली नाही आणि
पुढे चालून प्रकृतीचा खेळ आणखीनच वाढत जाईल कारण प्रकृतीमध्ये देखील सुरुवातीच्या
काळातील ती शक्ती राहिलेली नाहीये. अशावेळी आता विचार करा - आता कोणती सत्ता
परिवर्तन घडवून आणू शकते? ही ‘सायलेन्स’ची शक्तीच विश्व परिवर्तन करेल. तर चोहो
बाजूंची अशांती नाहीशी करणारे कोण आहेत? जाणता ना! हे परमात्म पालनेच्या अधिकारी
आत्म्यांशिवाय इतर कोणीही करू शकत नाही. तर तुम्हा सर्वांना हा उमंग-उत्साह आहे की,
आपण ब्राह्मण आत्मेच बापदादांच्या सोबत देखील आहोत आणि परिवर्तनाच्या कार्यामध्ये
साथीदार सुद्धा आहोत.
बापदादांनी विशेष
अमृतवेलेला तसेच संपूर्ण दिवसभरामध्ये चालत असताना देखील पाहिले आहे की, दुनियेमध्ये
तिन्ही सत्तांची जितकी भयग्रस्त स्थिती आहे तितका तुम्हा शांतीच्या देवींनी,
शांतीच्या देवांनी शक्तिशाली शांतीच्या शक्तीचा प्रयोग केला पाहिजे, त्यामध्ये अजून
कमतरता आहे. तर बापदादा आता सर्व मुलांना हा उमंग देत आहेत. सेवेच्या क्षेत्रामध्ये
आवाज तर चांगला पसरवत आहात, परंतु सायलेन्सच्या शक्तीला चोहो बाजूंना पसरवा ( आज
सारखा-सारखा खोकला येत आहे). बाजा (गुलजार दादींची तब्येत) खराब आहे; तरी देखील
बापदादा तर मुलांना भेटल्याशिवाय राहू शकत नाहीत आणि मुले देखील राहू शकत नाहीत. तर
बापदादा हाच विशेष इशारा देत आहेत की, आता शांतीच्या शक्तीची व्हायब्रेशन्स चोहो
बाजूंना पसरवा.
आता विशेष ब्रह्माबाबा
आणि जगदंबाला बघा स्वतः
आदि देव असताना देखील शांतीच्या शक्तीचा किती गुप्त पुरुषार्थ केला. तुमच्या दादीने
कर्मातीत बनण्यासाठी याच गोष्टीला किती पक्के केले. जबाबदारी असताना, सेवेचा प्लॅन
बनवत असताना शांतीची शक्ती जमा केली (खोकला सारखा-सारखा येत आहे). बाजा कितीही खराब
असला तरीही बापदादांचे प्रेम आहे! तर सेवेची जबाबदारी कितीही मोठी असो परंतु
सेवेच्या सफलतेचे प्रत्यक्ष फळ शांतीच्या शक्ती शिवाय, जितके पाहिजे तितके मिळू शकत
नाही. आणि स्वतःकरिता संपूर्ण कल्पामध्ये हव्या असणाऱ्या प्रारब्धाला देखील
सायलेन्सच्या शक्तीनेच मिळवू शकता. म्हणून आता प्रत्येकाने स्वयं प्रति, साऱ्या
कल्पासाठीचे प्रारब्ध राज्याचे आणि पूज्यचे जमा करण्यासाठी आताही वेळ आहे; कारण
नाजूक काळ येणारच आहे. अशा वेळी शांतीच्या शक्ती द्वारे टचिंग पॉवर, कॅचिंग पॉवर
अतिशय आवश्यक असेल. एक वेळ अशी येईल जेव्हा ही साधने काहीही करू शकणार नाहीत, फक्त
अध्यात्मिक बळ, बापदादांच्या डायरेक्शन्सची टचिंग कार्य करू शकेल. तर स्वतःमध्ये
चेक करा - अशा वेळी मन आणि बुद्धीमध्ये बापदादांचे टचिंग येऊ शकेल? यामध्ये
दीर्घकाळाचा अभ्यास पाहिजे, याचे साधन आहे मन-बुद्धी नेहमीच कधी-कधी नाही, सदैव
क्लीन आणि क्लिअर पाहिजे. आता रिहर्सल वाढत जाईल आणि सेकंदामध्ये रिअल (वास्तवात)
होईल. थोडेसुद्धा जर मनामध्ये, बुद्धीमध्ये कोणत्याही आत्म्याप्रती किंवा कोणत्याही
कार्याप्रती, कोणत्याही साथी-सहयोगी प्रति थोडे जरी निगेटिव्ह असेल तर त्याला क्लीन
आणि क्लिअर म्हटले जाणार नाही; म्हणून बापदादा यावर लक्ष वेधून घेत आहेत. पूर्ण
दिवसभरामध्ये चेक करा - सायलेन्सची पॉवर (शांतीची शक्ती) किती जमा केली? सेवा करत
असताना देखील सायलेन्सची शक्ती जर वाणीमध्ये नसेल तर प्रत्यक्ष फळ - सफलता, जितकी
पाहिजे तितकी मिळणार नाही. मेहनत जास्त आणि फळ कमी. सेवा करा परंतु शांतीच्या
शक्तीने संपन्न राहून सेवा करा. त्यामध्ये जितका रिझल्ट अपेक्षित आहे त्यापेक्षाही
जास्त मिळेल. वारंवार चेक करा. बाकी बापदादांना याचा आनंद आहे की, दिवसेंदिवस जी
काही जिथे पण सेवा करत आहेत ती चांगली करत आहेत; परंतु स्वयं प्रति शांतीची शक्ती
जमा करण्याकडे, परिवर्तन करण्याकडे अजून लक्ष पाहिजे.
आता सारी दुनिया शोधत
आहे की शेवटी विश्व परिवर्तक निमित्त कोण बनतो! कारण दिवसेंदिवस दुःख आणि अशांती
वाढत आहे आणि वाढणारच आहे. तर भक्त आपल्या इष्टची आठवण करत आहेत, कोणी अतिमध्ये
जाऊन नैराश्यामध्ये जीवन जगत आहेत. धर्मगुरूंच्या दिशेने नजर वळवत आहेत आणि
वैज्ञानिक देखील आता हाच विचार करत आहेत - कसे करायचे, कधी पर्यंत होईल! तर या
सर्वांना उत्तर देणारे कोण? सर्वांच्या मनातील हीच हाक आहे की शेवटी गोल्डन
मॉर्निंग केव्हा येणार आहे. तर तुम्ही सर्वजण आणणारे आहात ना! आहात का? हात वर करा
जे समजतात की आम्ही निमित्त आहोत. निमित्त आहात? (सर्वांनी हात वर केला) अच्छा. इतके
सारे निमित्त आहेत तर किती वेळामध्ये झाले पाहिजे! तुम्ही देखील सर्वजण खुश होता आणि
बापदादा देखील खुश होतात. बघा, हा गोल्डन चान्स प्रत्येकाला गोल्डन समयानुसार
प्राप्त झाला आहे.
आता आपसामध्ये जशी
सेवेची मीटिंग करता, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी देखील मीटिंग करता ना. तशी ही मीटिंग
करा, हा प्लॅन बनवा. आठवण आणि सेवा. आठवणीचा अर्थ आहे शांतीची शक्ती आणि ती तेव्हाच
प्राप्त होईल जेव्हा तुम्ही टॉपच्या स्टेजवर (सर्वश्रेष्ठ स्थितीमध्ये) असाल. जसे
एखादे टॉपचे स्थान असते ना तर उभे रहा तर तिथून सर्व काही किती स्पष्ट दिसते. तशी
तुमची टॉपची स्टेज, सर्वात टॉपला काय आहे? परमधाम. बापदादा म्हणतात सेवा केली आणि
मग टॉपच्या स्टेजवर बाबांसोबत येऊन बसा. जसे जेव्हा थकून जातात ना तेव्हा ५ मिनिटे
तरी कुठेही शांतीमध्ये बसतात तर फरक पडतो ना. असेच अधून-मधून बाबांसोबत येऊन बसा.
आणि दुसरे टॉपचे स्थान आहे सृष्टी चक्र; या सृष्टी चक्राला बघा, सृष्टीचक्रामध्ये
टॉपचे स्थान कोणते आहे? संगमावर येऊन सुईचे टोक वरती दाखवता ना. तर खाली या, सेवा
करा आणि पुन्हा टॉपच्या स्थानावर निघून जा. तर समजले काय करायचे आहे? समय तुम्हाला
बोलवत आहे का तुम्ही समयाला समीप आणत आहात? रचता कोण? तर आपसामध्ये अशा प्रकारचे
प्लॅन बनवा. अच्छा.
मुलांनी म्हटले -
‘तुम्हाला यावेच लागेल’, तर बाबांनी म्हटले -
‘हो’. असेच एकमेकांच्या गोष्टींना, स्वभावाला, वृत्तीला समजून घेत, ‘हो, हो’
केल्यामुळे संघटनची शक्ती शांतीची ज्वाळा प्रकट करेल. ज्वालामुखी बघितला आहे ना. तर
ही संघटनची शक्ती शांतीची ज्वाळा प्रकट करेल. अच्छा
महाराष्ट्र, आंध्र
प्रदेश, मुंबईच्या सेवेचा टर्न आहे:-
नावच आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राला विशेष ड्रामा अनुसार गोल्डन गिफ्ट प्राप्त झाली
आहे. ती कोणती? ब्रह्माबाबांची आणि मम्माची पालना महाराष्ट्राला डायरेक्ट मिळाली आहे.
दिल्ली आणि यु.पी. ला देखील मिळाली आहे परंतु महाराष्ट्राला जास्त मिळाली आहे. आता
महाराष्ट्र, महान तर आहेच. आता काय करायचे आहे! महाराष्ट्राने मिळून असा प्लॅन बनवा,
अशी मीटिंग करा ज्यामध्ये सर्वांचा एकच स्वभाव, एकच संस्कार, एकच सेवेचे लक्ष्य -
शांतीची शक्ती कशी पसरवावी, याचे प्लॅन बनवा. बनवणार ना! बनवणार? अच्छा, बापदादांना
एका महिन्यानंतर रिपोर्ट देणार का की काय प्लॅन बनवला आहे! तुमच्या या रुहरिहान मुळे
अजूनच भर पडेल. विविध झोन आहेत ना, तर ते देखील या कार्यामध्ये भर घालतील; त्यामध्ये
आकार तुम्ही बनवा, हिरे ते जडवतील. आहे ना हिंमत. टीचर्स हिंमत आहे! पहिली लाईन वाले
हिंमत आहे? संस्कार मिलनाची ही रास कोणता झोन करेल? कोणता झोन शुभ वृत्ती, शुभ
दृष्टी आणि शुभ कृती ही कशी असावी, एका झोनने ही जबाबदारी घ्या. दुसरा झोन - जर
कोणती आत्मा स्वतः संस्कार परिवर्तन करू शकत नसेल, इच्छा देखील आहे परंतु करू शकत
नाही तर त्यांच्या प्रति दयाळू बनून, क्षमा, सहयोग, स्नेह देऊन आपल्या ब्राह्मण
परिवाराला कसे शक्तिशाली बनवता येईल - याचा प्लॅन बनवा. हे होऊ शकते का? होऊ शकते?
पहिली लाईन वाले सांगा होऊ शकते? हात वर करा होऊ शकते. कारण पहिल्या लाईनमध्ये सर्व
महारथी बसले आहेत. आता बापदादा नाव सांगत नाहीत, प्रत्येक झोनला जे चांगले वाटते
त्यावर रूहरीहान करून मग शिवरात्री नंतर देखील एका महिन्यामध्ये रिझल्ट ऐकवा.
महाराष्ट्र आहे ना आणि चांगला आहे. वृद्धी तर सर्व ठिकाणी होत आहे त्यासाठी बापदादा
मुबारक, मुबारक देतच आहेत. आता जे केलेत त्याची तर मुबारक आहेच परंतु आता क्वालिटीची
वृद्धी करा. क्वालिटीचा अर्थ हा नाही की श्रीमंत असावा; क्वालिटीचा अर्थ आहे -
आठवणीला नियमाप्रमाणे जीवनामध्ये पुरावा बनवून दाखवेल. बाकी माईक आणि वारसदार ते तर
तुम्ही जाणताच. निश्चय-बुद्धी आणि निश्चिंत आहात. अच्छा
डबल फॉरेनर्समध्ये,
युगलांची आणि कुमारींची विशेष रिट्रीट झाली आहे:-
हे निशाणी लावून आले
आहेत. चांगले वाटते. कुमारी असे गोल फिरा ज्यामुळे बाकीचे बघतील, फेरी मारा. चांगले
आहे. सर्व लकी आहेत परंतु कुमारी डबल लकी आहेत. का? तसे तर कुमार देखील लकी आहेत
परंतु कुमारींना जेव्हा कुमारी आपल्या जीवनामध्ये अमर राहतात तेव्हा बापदादांचा,
गुरु-बंधूचा तख्त मिळतो. दिल तख्त तर आहेच. ते तर सर्वांसाठी आहे; परंतु गुरुचे
तख्त आहे - जिथे बसून मुरली ऐकवली जाते. टीचर बनून शिकवता म्हणून बापदादा म्हणतात
की, कुमारी डबल लकी आहेत. कुमारींसाठी गायन आहे की २१ परिवारांचा उद्धार करणारी. तर
तुम्ही आपल्या २१ जन्मांचा तर उद्धार केला आहे परंतु ज्यांच्या निमित्त बनता त्यांचा
देखील २१ जन्मांसाठी उद्धार होतो. तर अशा कुमारी आहात ना. अशा आहात! पक्के. ज्या
थोड्या-थोड्या कच्च्या आहेत त्यांनी हात वर करा. पक्क्या आहेत. (दादींना उद्देशून)
तुम्ही बघितलेत पक्क्या कुमारी आहेत. पक्क्या आहेत! मोहिनी बहन (न्यूयॉर्क) तुम्ही
सांगा, पक्क्या आहेत. कुमारींचा ग्रुप पक्का आहे? यांची टीचर कोण (मीरा बहन).
पक्क्या आहेत तर टाळी वाजवा. बाप दादांना देखील आनंद होतो. अच्छा. (ही कुमारींची
आठवी रिट्रीट आहे - यांचा विषय होता आपलेपणाचा अनुभव, ३० देशांमधून ८० कुमारी आल्या
आहेत, सर्वांनी आपलेपणाचा खूप चांगला अनुभव केला आहे). मुबारक असो. या तर कुमारी
झाल्या, तुम्ही सर्व कोण आहात? तुम्ही म्हणा - या तर कुमारी आहेत, आम्ही
ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी आहोत. तुम्ही देखील कमी नाही आहात. हा कुमारांचा
ग्रुप आहे, मिळता-जुळता ग्रुप आहे. चांगले आहे. युगलांना कोणता नशा आहे? एक्स्ट्रा
नशा, माहित आहे! जेव्हा पासून प्रवृत्ती वाले या नॉलेजला धारण करू लागले आहेत तर
मेजॉरिटी आता लोकांमध्ये हिंमत आली आहे की आम्ही देखील करू शकतो. आधी समजत होते की
ब्रह्माकुमारी बनणे अर्थात सर्वकाही सोडणे परंतु आता समजतात की ब्रह्माकुमार-कुमारी
बनून परिवार, व्यवहार सर्व चालवू शकतो. आणि युगलांची एक विशेषता आणखी आहे, त्यांनी
महात्म्यांना देखील चॅलेंज केले आहे की आम्ही सोबत राहात असताना, व्यवहार करत असताना,
आमचा परमार्थ श्रेष्ठ आहे. विजयी आहोत. तर विजयाची हिंमत देणे, हे युगलांचे काम आहे
म्हणून बापदादा युगलांना देखील मुबारक देत आहेत. ठीक आहे ना. चॅलेंज करणारे आहात
ना, पक्के. कोणी येऊन सी. आय. डी. (हेरगिरी) करत असतील तर करू द्या. त्यांना म्हणा
- करू द्या. आहे एवढी ताकद? हात वर करा. अच्छा
बापदादा नेहमीच डबल
फॉरेनर्सना हिंमतवान समजतात. असे का? बापदादांनी बघितले आहे की, कामावर देखील जातात,
क्लास देखील करतात, बरेचजण क्लास देखील घेतात तरीसुद्धा ऑलराऊंडर सेंटरच्या
सेवेमध्ये देखील मदतगार बनतात. म्हणून बापदादा टायटल देतात, हा आहे ऑलराऊंड ग्रुप.
अच्छा. असेच पुढे जात रहा आणि इतरांना देखील पुढे नेत रहा. अच्छा.
टीचर्स सोबत संवाद -
टीचर्स ठीक आहात? टीचर्स भरपूर आल्या आहेत. चांगले आहे बघा, ‘बाप समान’ टायटल
तुम्हाला देखील दिले आहे. बाबा देखील टीचर बनून येतात तर टीचर अर्थात स्वानुभवाच्या
आधारे इतरांना देखील अनुभवी बनविणे. अनुभवाची ऑथॉरिटी सर्वात मोठी आहे. एकदा जरी
कोणत्याही गोष्टीचा अनुभव करतात, तर तो जीवन भर विसरला जात नाही. ऐकलेली गोष्ट,
बघितलेली गोष्ट विसरून जायला होते परंतु अनुभव केलेली गोष्ट कधीही विसरायला होत नाही.
तर टीचर्स अर्थात अनुभवी बनून अनुभवी बनविणे. हेच काम करत आहात ना. चांगले आहे.
अनुभवामध्ये जी काही कमतरता असेल ना, ती एका महिन्यामध्ये भरून काढा. मग बापदादा
रिझल्ट मागवतील. अच्छा.
चोहो बाजूंच्या
बापदादांच्या दिल तख्तनशीन आणि विश्व राज्याच्या तख्तनशीन असणाऱ्या, सदैव आपल्या
सायलेन्सच्या शक्तीला अजून वाढविणारे आणि इतरांना देखील पुढे जाण्यासाठी
उमंग-उत्साह देणाऱ्या, सदैव आनंदात राहणारे आणि सर्वांना आनंदाची गिफ्ट देणाऱ्या
चोहो बाजूंच्या बापदादांच्या लकी आणि लवली मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि
आशीर्वाद, नमस्ते.
वरदान:-
प्रत्येक
कंडीशनमध्ये (परिस्थितीमध्ये) सेफ राहणारे एअरकंडिशनच्या तिकीटाचे अधिकारी भव
एअरकंडीशनचे तिकीट
त्याच मुलांना मिळते जे इथे प्रत्येक कंडीशनमध्ये सेफ राहतात. कोणतीही परिस्थिती
येऊ देत, कशीही समस्या येऊ देत परंतु प्रत्येक समस्येला सेकंदामध्ये पार करण्याचे
सर्टिफिकेट पाहिजे. जसे त्या तिकिटासाठी पैसे देता तसे इथे “सदा विजयी” बनण्याचे
पैसे पाहिजेत जेणेकरून तिकीट मिळू शकेल. हे पैसे प्राप्त करण्यासाठी मेहनत करण्याची
गरज नाही, फक्त सदैव बाबांच्या सोबत रहा तर अगणित कमाई जमा होत राहील.
सुविचार:-
कशीही परिस्थिती असो,
परिस्थिती निघून जाऊ दे परंतु आनंद जाऊ नये.
अव्यक्त इशारे:- आता
संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. जशी तुमची रचना कासव सेकंदामध्ये सर्व
अवयव समेटून घेते. समेटण्याची शक्ती रचनेमध्ये देखील आहे. तुम्ही मास्टर रचता
समेटण्याच्या शक्तीच्या आधारे सेकंदामध्ये सर्व संकल्पांना समेटून एका संकल्पामध्ये
स्थित व्हा. जेव्हा सर्व कर्मेंद्रियांच्या कर्माच्या स्मृतीपासून दूर एकाच आत्मिक
स्वरूपामध्ये स्थित व्हाल तेव्हा कर्मातीत अवस्थेचा अनुभव होईल.